✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आनंद-कार्लसन, सोची २०१४ - डाव २

च
चतुरंग यांनी
Sun, 11/09/2014 - 17:30  ·  लेख
लेख
आज काय बघायला मिळणार? कालचा ग्रुन्फेल्ड? चला बघूयात

Book traversal links for आनंद-कार्लसन, सोची २०१४ - डाव २

  • ‹ आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव १
  • Up
  • आनंद-कार्लसन, सोची २०१४ - डाव ३ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
क्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
25677 वाचन

💬 प्रतिसाद (114)

प्रतिक्रिया

ई४!

चतुरंग
Sun, 11/09/2014 - 17:31 नवीन
क्या बात है! आज लढाई बघायला मिळणार. पहिल्या चार खेळ्या कॉपीबुक. मॅग्नुसचा किल्लेलोक राजाच्या बाजूला पूर्ण
  • Log in or register to post comments

बर्लिन वेरिएशन!

चतुरंग
Sun, 11/09/2014 - 17:33 नवीन
सुपर ग्रँडमास्टर्स स्पर्धांमधून अतिशय प्रसिद्ध!
  • Log in or register to post comments

आनंदने हत्ती ई स्तंभात आणला

चतुरंग
Sun, 11/09/2014 - 17:44 नवीन
कारण ई५ वर्च्या प्याद्याला जोर, कारण मग डी५ असे प्यादे खेळता येईल
  • Log in or register to post comments

कालपासुन चेक करतोय.पण भारतात

जेपी
Sun, 11/09/2014 - 17:49 नवीन
कालपासुन चेक करतोय.पण भारतात कुठल्याही चॅनेलवर प्रक्षेपण होत नाही.मोबल्यावर दिसत नाही. कंमेट्री करक राहा तेवढाच आनंद
  • Log in or register to post comments

जालावर इथे लाईव्ह पाहू शकाल

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 11/09/2014 - 18:24 नवीन
जालावर इथे लाईव्ह पाहू शकाल .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

हुश्श

रमताराम
Sun, 11/09/2014 - 17:51 नवीन
आलो एकदाचा. आज मिपा बराच वेळ लॉगिन करूच देईना. आमच्या ब्राउजरने काही काशी केली बहुतेक.
  • Log in or register to post comments

आनंद विचारा पडलाय

चतुरंग
Sun, 11/09/2014 - 17:52 नवीन
दहाव्या खेळीला त्याने ७ मिनिटे घेत्ली आहेत. मॅग्नुस त्याचा वजिराच्या बाजूचा घोडा एफ१ आणि मग जी ३ असा आणणार असे वाटते आहे बहुदा. आनंदने त्याचा घोडा डी७-एफ८ मार्गे ई६ वरती आणायचा विचार पक्का केलाय ..
  • Log in or register to post comments

माग्च्या

रमताराम
Sun, 11/09/2014 - 18:06 नवीन
वर्षी आनन्दला बर्लिन'ने बराच त्रास दिला होता. यावर्षी तो तयारीत असेल अशी अपेक्षा आहे.
  • Log in or register to post comments

हो. बघूयात.

चतुरंग
Sun, 11/09/2014 - 18:07 नवीन
अजून तरी कंफर्टेबल वाटतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

चेहेरे वाचणं कठीण आहे.

रामदास
Sun, 11/09/2014 - 18:13 नवीन
अजून मॅग्नुस खुर्चीवर रांगत नाहीय्ये. (कालच्या खेळात एकदा हा पडतो का काय असं वाटलं होतं.)ही सुरवात जर्रा डल वाटते आहे.
  • Log in or register to post comments

मॅग्नुस तर

चतुरंग
Sun, 11/09/2014 - 18:18 नवीन
पोकरफेस आहे! आनंदला देखील सहजासहजी वाचता येत नाही....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

हो मॅग्नुस अगदी रिलॅक्स होऊन बस्तो!

चतुरंग
Sun, 11/09/2014 - 18:17 नवीन
त्याला जर बर्मुडा घालून यायला परवानगी मिळाली तर तो ते सुद्धा करेल! :)
  • Log in or register to post comments

ए प्यादे पुढे सरकले

चतुरंग
Sun, 11/09/2014 - 18:20 नवीन
काळ्याच्या काळ्या उंटाची घुसमट हा प्लॅन...आनंद ए ५ खेळला आणि मॅग्नुसचे प्यादे थोपवले
  • Log in or register to post comments

कृपया पुढे कॉमेंट्री करा.

arunjoshi123
Sun, 11/09/2014 - 18:21 नवीन
कृपया पुढे कॉमेंट्री करा.
  • Log in or register to post comments

रामदास, आपण व्हिडिओ कोठे पाहत

arunjoshi123
Sun, 11/09/2014 - 18:23 नवीन
रामदास, आपण व्हिडिओ कोठे पाहत आहात?
  • Log in or register to post comments

https://chess24.com/en/watch/live-tournaments/worldChampionship2

रामदास
Sun, 11/09/2014 - 18:28 नवीन
कालचीच लिंक आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123

इथे गेम आणि विवरण चालू आहे

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 11/09/2014 - 18:44 नवीन
इथे गेम आणि विवरण चालू आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123

पहीली चकमक आता अपेक्षीत आहे

रामदास
Sun, 11/09/2014 - 18:26 नवीन
बळी कोणाचा ?
  • Log in or register to post comments

हा या दुसर्‍या डावाचा 'लाईव्ह' प्रक्षेपणाचा दुवा आहे का?

बहुगुणी
Sun, 11/09/2014 - 18:31 नवीन
https://chess24.com/en/watch/live-tournaments/worldChampionship2014/1/1/1 की pre-recorded पहिला डाव आहे?
  • Log in or register to post comments

http://www.sochi2014.fide.com

रमताराम
Sun, 11/09/2014 - 18:38 नवीन
http://www.sochi2014.fide.com/live-games/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

धन्यवाद!

बहुगुणी
Sun, 11/09/2014 - 18:48 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

आनंदचा काळा उंट मारला

चतुरंग
Sun, 11/09/2014 - 18:37 नवीन
डाव सोपा करण्याकडे कल आहेच मॅग्नुसचा. चेन्नैप्रमाणेच तो ग्राइंडिंग खेळणार, तासन्तास खेळून समोरच्याला वेअराउट करणे हे तंत्र..
  • Log in or register to post comments

एकही प्यादे

चतुरंग
Sun, 11/09/2014 - 18:39 नवीन
मारले न जाता मोहरी पटावरुन जाण्याचे दुर्मिळ दृष्य बघायला मिळते आहे...
  • Log in or register to post comments

मुख्य खेळ सोडून

चतुरंग
Sun, 11/09/2014 - 18:42 नवीन
या प्रायोजकांचा ब्रेक सुरु झाला की त्यांचा लेगब्रेक करायची इच्छा होते. अरे खेळ चाललाय आणि मधेच तुमचे विडिय्यो कशाला? पण काय पैसा बोलता है!!
  • Log in or register to post comments

तानिया

रमताराम
Sun, 11/09/2014 - 18:44 नवीन
रंगाशेट, यावेळी तुम्ही नाही म्हणून आमची तानिया पण आली नाही. आता तुम्ही रिटायरमेंट मागे घेतली आहे तर तिला परत आणणे ही तुमची जबाबदारी आहे. :P
  • Log in or register to post comments

अच्छा!

चतुरंग
Sun, 11/09/2014 - 18:48 नवीन
म्हणजे आनंदच्या बोर्डावरचा वजीर ही तुमची खरी 'क्वीन' नाहीये तर!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

विरुद्ध

चतुरंग
Sun, 11/09/2014 - 18:47 नवीन
रंगाचे उंट शिल्लक म्हणजे लढाईची नांदी. आता काळ्याचा प्रयत्न सगळी प्यादी काळ्या घरात आणून उंटाची हालचाल मर्यादित करणे आणि त्याच्या विरुद्ध प्रयत्न मॅग्नुसचा. मॅग्नुसने ए पट्टीतला हत्ती ए ३ असा आणला...कुठे न्यायचाय हा हत्ती? बहुतेक ई ३? डबल करणे
  • Log in or register to post comments

c3?

रमताराम
Sun, 11/09/2014 - 18:52 नवीन
आनंदच्या वजीराच्या मदतीने तीन प्यादी सी पट्टीवरून पुढे सरकू पाहतायत त्याला पायबंद घालणे हा हेतू असू शकेल. यावर आनंदने डी प्यादे मारून हत्तीला धोका निर्माण केला तर वजीराने ते प्यादे घेऊन मध्य भागावर वर्चस्व निर्माण करणे शक्य होईल. पण समोर तीन प्यादी हल्ल्याला तयार असताना वजीर थेट समोर नेणे कितपत शहाणपणाचे होईल कोण जाणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

सी ३

चतुरंग
Sun, 11/09/2014 - 18:54 नवीन
नव्हे कदाचित डी३ असू शकेल म्हणजे मग डी प्याद्याने ई प्यादे मारुन स्तंभ मोकळा करुन घेणे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

हल्ली

चतुरंग
Sun, 11/09/2014 - 18:52 नवीन
हत्ती फक्त रांगेतून हलवून न नेता थेट आहे त्याच स्तंभातून पुढे आणून आडव्या पट्ट्यांचा ताबा घेणे असा रोख बर्‍याचदा दिसायला लागला आहे...
  • Log in or register to post comments

ते घोडं परत तबेल्यात

रामदास
Sun, 11/09/2014 - 18:57 नवीन
आणि दोन प्यादी साट्यालोट्यात
  • Log in or register to post comments

आहा

रमताराम
Sun, 11/09/2014 - 18:58 नवीन
प्यादी एक्स्चेंज करून मधल्या पट्टीवर नियंत्रण मिळवण्याचा हेतू साध्य झाला कार्ल्याचा. वजीर ती पट्टी ताब्यात ठेवून आहेच. हत्ती त्याच्या जोडीला येऊन हल्ला करू शकतो. पण आता प्यादे तिथे नसल्याने ही शक्यता कमी झाली. घोडा हटवून हत्ती थेट जी पट्टीत नेऊन राजावरच्या हल्ल्याची तयारीही करता येईल.
  • Log in or register to post comments

हो तसाच रोख दिसतोय

चतुरंग
Sun, 11/09/2014 - 19:02 नवीन
घोडा एच ४ मधे आलाच आहे.शिवाय वजिराला थेट एच ५ कर्ण मोकळा आहेच, हत्ती जी ३ मधे आला तर सरळ तीन मोहोरी राजाच्या दिशेने चाल करणारी असतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

मॅग्नुस फसवा खेळायला

चतुरंग
Sun, 11/09/2014 - 19:00 नवीन
लागलाय असे वाटते ...एक चाल करुन एखादा रोख दाखवायचा आणि समोरच्याला वेगळ्याच दिशेने न्यायचे आणि नंतर सामान्यपणे प्रेडिक्टेबल चाल न करता वेगळेच काही खेळायचे ...
  • Log in or register to post comments

ताल की चाल ?

रामदास
Sun, 11/09/2014 - 19:04 नवीन
किंमत किती ?
  • Log in or register to post comments

खरेतर टॅक्टिकल

चतुरंग
Sun, 11/09/2014 - 19:07 नवीन
गेम हा मॅग्नुसचा प्रांत नाही असे समजले जाते परंतु हा देखील साचेबद्ध विचार ठरु शकतो...आनंद्ला टॅक्टिकल गेम्स आवडतात म्हटल्यावर मॅग्नुस त्याच्याच मैदानात येऊन खेळणारच नाही असेही नाही.. अनदर अनप्रेडि़क्टेबिलिटी!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

येस!

चतुरंग
Sun, 11/09/2014 - 19:04 नवीन
आनंदने व्जिरावर हल्ला केला हत्ती डी८ मधे आणून..आता मॅग्नुस वजीर ई२ मधे नेतोय का हत्ती मधे घालतोय?
  • Log in or register to post comments

आता सरळ थ्रेट आहे

चतुरंग
Sun, 11/09/2014 - 19:08 नवीन
बी एच ६ आणि हत्ती जी ३ राजाच्या नाड्या थेट आवळल्या जाण्याचा धोका!!
  • Log in or register to post comments

गंमत म्हणजे

रमताराम
Sun, 11/09/2014 - 19:16 नवीन
तीनही अ‍ॅनलिसिस एंजिन्स हे वेरिएशन तपासत नाहीयेत. त्यांच्याकडे हत्ती जी-३ मात्र आहे. अर्थात उंट एच-६ ला घो जी-६ हे उत्तर आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

ऊप्स

रमताराम
Sun, 11/09/2014 - 19:16 नवीन
नाही चालणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

दोघेही

चतुरंग
Sun, 11/09/2014 - 19:14 नवीन
घड्याळात दणकट आहेत त्यामुळे या डायनामिक पोझीशन मधे भरपूर विचार करणे शक्य आहे...
  • Log in or register to post comments

काय बघावं ते कळेना

रामदास
Sun, 11/09/2014 - 19:22 नवीन
उध्दवजींकडे बघू की आनंदच्या निर्बळी वजीराकडे .
  • Log in or register to post comments

हा हा!

चतुरंग
Sun, 11/09/2014 - 19:38 नवीन
निर्बळी नाही हो. तो कधीही एफ ७ असा येऊ शकतोच खेळात परंतु बाकी चिल्लिपिल्ली मोहोरी जर बचाव करु शकत असतील तर वजिराला कशाला इरेस घाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

ते 'निर्बळी' बहुतेक...

बहुगुणी
Sun, 11/09/2014 - 19:44 नवीन
ते 'निर्बळी'उपहासाने वजीरापुढे लावले असेल का रामदासांनी? त्यांना उद्धवजींना ते विशेषण लावायचं होतं बहुतेक असं वाटून गेलं क्षणभर! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

निर्बळी?

रमताराम
Sun, 11/09/2014 - 19:41 नवीन
निर्बळी काय म्हणून? घोडा ए-फ-४ साठी मोठा आधार आहे त्याचा. तिथे एक्स्चेंज झाले की थेट कार्ल्याच्या राजावर मोर्चे बसतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

आनंद अचूक खेळतोय

चतुरंग
Sun, 11/09/2014 - 19:36 नवीन
बचाव नीट सुरु आहे. आता हत्ती जी ३ मधे आलाय तर घोडा जी ६ मधे आणला की काम भागते. गरज पडल्यास उंटाने घोडा मारुन पोझीशन मोकळी करता येईल.
  • Log in or register to post comments

येस घोडा जी ६ आलाच.

चतुरंग
Sun, 11/09/2014 - 19:41 नवीन
आता मॅग्नुस उंट कुठे नेतोय ते बघायचे..का वजीर मागे घेऊन एच प्यादे मुसंडी मारणार?
  • Log in or register to post comments

बचाव सुरु आहे मग ठिकाय , बघा तुम्ही

रामदास
Sun, 11/09/2014 - 19:43 नवीन
मी आलोच. कुकर चढवतो गॅसवर.
  • Log in or register to post comments

ओक्के या लवकर.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 11/09/2014 - 19:44 नवीन
वाट पाहतो या लवकर. एकटे रंगाशेठवर लोड नका टाकू. मी वाचतोय. समालोचन. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

पायलीभर

रमताराम
Sun, 11/09/2014 - 19:45 नवीन
पायलीभर भात जास्त चढवा. गेम संपला की येतो, पोस्ट-मॅच अ‍ॅनलासिस करू या. :p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा