दहाव्या खेळीला त्याने ७ मिनिटे घेत्ली आहेत. मॅग्नुस त्याचा वजिराच्या बाजूचा घोडा एफ१ आणि मग जी ३ असा आणणार असे वाटते आहे बहुदा.
आनंदने त्याचा घोडा डी७-एफ८ मार्गे ई६ वरती आणायचा विचार पक्का केलाय ..
रंगाचे उंट शिल्लक म्हणजे लढाईची नांदी. आता काळ्याचा प्रयत्न सगळी प्यादी काळ्या घरात आणून उंटाची हालचाल मर्यादित करणे आणि त्याच्या विरुद्ध प्रयत्न मॅग्नुसचा.
मॅग्नुसने ए पट्टीतला हत्ती ए ३ असा आणला...कुठे न्यायचाय हा हत्ती?
बहुतेक ई ३? डबल करणे
आनंदच्या वजीराच्या मदतीने तीन प्यादी सी पट्टीवरून पुढे सरकू पाहतायत त्याला पायबंद घालणे हा हेतू असू शकेल. यावर आनंदने डी प्यादे मारून हत्तीला धोका निर्माण केला तर वजीराने ते प्यादे घेऊन मध्य भागावर वर्चस्व निर्माण करणे शक्य होईल. पण समोर तीन प्यादी हल्ल्याला तयार असताना वजीर थेट समोर नेणे कितपत शहाणपणाचे होईल कोण जाणे.
प्यादी एक्स्चेंज करून मधल्या पट्टीवर नियंत्रण मिळवण्याचा हेतू साध्य झाला कार्ल्याचा. वजीर ती पट्टी ताब्यात ठेवून आहेच. हत्ती त्याच्या जोडीला येऊन हल्ला करू शकतो. पण आता प्यादे तिथे नसल्याने ही शक्यता कमी झाली. घोडा हटवून हत्ती थेट जी पट्टीत नेऊन राजावरच्या हल्ल्याची तयारीही करता येईल.
लागलाय असे वाटते ...एक चाल करुन एखादा रोख दाखवायचा आणि समोरच्याला वेगळ्याच दिशेने न्यायचे आणि नंतर सामान्यपणे प्रेडिक्टेबल चाल न करता वेगळेच काही खेळायचे ...
गेम हा मॅग्नुसचा प्रांत नाही असे समजले जाते परंतु हा देखील साचेबद्ध विचार ठरु शकतो...आनंद्ला टॅक्टिकल गेम्स आवडतात म्हटल्यावर मॅग्नुस त्याच्याच मैदानात येऊन खेळणारच नाही असेही नाही.. अनदर अनप्रेडि़क्टेबिलिटी!!
Carlsen remains calm and tries to improve slowly because black can't actually do anything on the open file. This is the first time in the game I see Anand some real pressure. So far he defended superbly.
पण बचाव करायला लागणं ही मूळातच अवघड परिस्थिती आहे.
हत्ती ई६ मधे आला. आता वजीर एफ ६ आणून आनंद वजिरावजिरीला आमंत्रण देणार का? एफ ४ वरचे प्यादे बिनजोरी आहे त्यामुळे त्याचा विचारही करावा लागेलच..परिस्थिती कालच्यापेक्षा कठिण आहे :(
मॅग्नुस प्रॉफिलॅकमुव्ह्,ऊव्ज करतो हे जे काल म्हंट्ले होते त्याचा पुरावा. सद्यस्थितीत काळा जेरबंद आहे तोवरच बचावाची तयारी करुन घेणे म्हणजे बॅकरँक चेक्स बसणार नाहीत! क्या बात है!! मॅग्नुस इज ऑस्सम!!
प्रतिक्रिया
ई४!
क्या बात है! आज लढाई बघायला मिळणार. पहिल्या चार खेळ्या कॉपीबुक. मॅग्नुसचा किल्लेलोक राजाच्या बाजूला पूर्ण
बर्लिन वेरिएशन!
सुपर ग्रँडमास्टर्स स्पर्धांमधून अतिशय प्रसिद्ध!
आनंदने हत्ती ई स्तंभात आणला
कारण ई५ वर्च्या प्याद्याला जोर, कारण मग डी५ असे प्यादे खेळता येईल
कालपासुन चेक करतोय.पण भारतात
कालपासुन चेक करतोय.पण भारतात कुठल्याही चॅनेलवर प्रक्षेपण होत नाही.मोबल्यावर दिसत नाही.
कंमेट्री करक राहा तेवढाच आनंद
जालावर इथे लाईव्ह पाहू शकाल
In reply to कालपासुन चेक करतोय.पण भारतात by जेपी
जालावर इथे लाईव्ह पाहू शकाल .
हुश्श
आलो एकदाचा. आज मिपा बराच वेळ लॉगिन करूच देईना. आमच्या ब्राउजरने काही काशी केली बहुतेक.
आनंद विचारा पडलाय
दहाव्या खेळीला त्याने ७ मिनिटे घेत्ली आहेत. मॅग्नुस त्याचा वजिराच्या बाजूचा घोडा एफ१ आणि मग जी ३ असा आणणार असे वाटते आहे बहुदा.
आनंदने त्याचा घोडा डी७-एफ८ मार्गे ई६ वरती आणायचा विचार पक्का केलाय ..
माग्च्या
वर्षी आनन्दला बर्लिन'ने बराच त्रास दिला होता. यावर्षी तो तयारीत असेल अशी अपेक्षा आहे.
हो. बघूयात.
In reply to माग्च्या by रमताराम
अजून तरी कंफर्टेबल वाटतोय.
चेहेरे वाचणं कठीण आहे.
अजून मॅग्नुस खुर्चीवर रांगत नाहीय्ये. (कालच्या खेळात एकदा हा पडतो का काय असं वाटलं होतं.)ही सुरवात जर्रा डल वाटते आहे.
मॅग्नुस तर
In reply to चेहेरे वाचणं कठीण आहे. by रामदास
पोकरफेस आहे! आनंदला देखील सहजासहजी वाचता येत नाही....
हो मॅग्नुस अगदी रिलॅक्स होऊन बस्तो!
त्याला जर बर्मुडा घालून यायला परवानगी मिळाली तर तो ते सुद्धा करेल! :)
ए प्यादे पुढे सरकले
काळ्याच्या काळ्या उंटाची घुसमट हा प्लॅन...आनंद ए ५ खेळला आणि मॅग्नुसचे प्यादे थोपवले
कृपया पुढे कॉमेंट्री करा.
कृपया पुढे कॉमेंट्री करा.
रामदास, आपण व्हिडिओ कोठे पाहत
रामदास, आपण व्हिडिओ कोठे पाहत आहात?
https://chess24.com/en/watch/live-tournaments/worldChampionship2
In reply to रामदास, आपण व्हिडिओ कोठे पाहत by arunjoshi123
कालचीच लिंक आहे
इथे गेम आणि विवरण चालू आहे
In reply to रामदास, आपण व्हिडिओ कोठे पाहत by arunjoshi123
इथे गेम आणि विवरण चालू आहे
पहीली चकमक आता अपेक्षीत आहे
बळी कोणाचा ?
हा या दुसर्या डावाचा 'लाईव्ह' प्रक्षेपणाचा दुवा आहे का?
https://chess24.com/en/watch/live-tournaments/worldChampionship2014/1/1…
की pre-recorded पहिला डाव आहे?
http://www.sochi2014.fide.com
In reply to हा या दुसर्या डावाचा 'लाईव्ह' प्रक्षेपणाचा दुवा आहे का? by बहुगुणी
https://www.sochi2014.fide.com/live-games/
धन्यवाद!
In reply to http://www.sochi2014.fide.com by रमताराम
धन्यवाद!
आनंदचा काळा उंट मारला
डाव सोपा करण्याकडे कल आहेच मॅग्नुसचा. चेन्नैप्रमाणेच तो ग्राइंडिंग खेळणार, तासन्तास खेळून समोरच्याला वेअराउट करणे हे तंत्र..
एकही प्यादे
मारले न जाता मोहरी पटावरुन जाण्याचे दुर्मिळ दृष्य बघायला मिळते आहे...
मुख्य खेळ सोडून
या प्रायोजकांचा ब्रेक सुरु झाला की त्यांचा लेगब्रेक करायची इच्छा होते. अरे खेळ चाललाय आणि मधेच तुमचे विडिय्यो कशाला? पण काय पैसा बोलता है!!
तानिया
रंगाशेट, यावेळी तुम्ही नाही म्हणून आमची तानिया पण आली नाही. आता तुम्ही रिटायरमेंट मागे घेतली आहे तर तिला परत आणणे ही तुमची जबाबदारी आहे. :P
अच्छा!
In reply to तानिया by रमताराम
म्हणजे आनंदच्या बोर्डावरचा वजीर ही तुमची खरी 'क्वीन' नाहीये तर!! ;)
विरुद्ध
रंगाचे उंट शिल्लक म्हणजे लढाईची नांदी. आता काळ्याचा प्रयत्न सगळी प्यादी काळ्या घरात आणून उंटाची हालचाल मर्यादित करणे आणि त्याच्या विरुद्ध प्रयत्न मॅग्नुसचा.
मॅग्नुसने ए पट्टीतला हत्ती ए ३ असा आणला...कुठे न्यायचाय हा हत्ती?
बहुतेक ई ३? डबल करणे
c3?
In reply to विरुद्ध by चतुरंग
आनंदच्या वजीराच्या मदतीने तीन प्यादी सी पट्टीवरून पुढे सरकू पाहतायत त्याला पायबंद घालणे हा हेतू असू शकेल. यावर आनंदने डी प्यादे मारून हत्तीला धोका निर्माण केला तर वजीराने ते प्यादे घेऊन मध्य भागावर वर्चस्व निर्माण करणे शक्य होईल. पण समोर तीन प्यादी हल्ल्याला तयार असताना वजीर थेट समोर नेणे कितपत शहाणपणाचे होईल कोण जाणे.
सी ३
In reply to c3? by रमताराम
नव्हे कदाचित डी३ असू शकेल म्हणजे मग डी प्याद्याने ई प्यादे मारुन स्तंभ मोकळा करुन घेणे..
हल्ली
हत्ती फक्त रांगेतून हलवून न नेता थेट आहे त्याच स्तंभातून पुढे आणून आडव्या पट्ट्यांचा ताबा घेणे असा रोख बर्याचदा दिसायला लागला आहे...
ते घोडं परत तबेल्यात
आणि दोन प्यादी साट्यालोट्यात
आहा
प्यादी एक्स्चेंज करून मधल्या पट्टीवर नियंत्रण मिळवण्याचा हेतू साध्य झाला कार्ल्याचा. वजीर ती पट्टी ताब्यात ठेवून आहेच. हत्ती त्याच्या जोडीला येऊन हल्ला करू शकतो. पण आता प्यादे तिथे नसल्याने ही शक्यता कमी झाली. घोडा हटवून हत्ती थेट जी पट्टीत नेऊन राजावरच्या हल्ल्याची तयारीही करता येईल.
हो तसाच रोख दिसतोय
In reply to आहा by रमताराम
घोडा एच ४ मधे आलाच आहे.शिवाय वजिराला थेट एच ५ कर्ण मोकळा आहेच, हत्ती जी ३ मधे आला तर सरळ तीन मोहोरी राजाच्या दिशेने चाल करणारी असतील.
मॅग्नुस फसवा खेळायला
लागलाय असे वाटते ...एक चाल करुन एखादा रोख दाखवायचा आणि समोरच्याला वेगळ्याच दिशेने न्यायचे आणि नंतर सामान्यपणे प्रेडिक्टेबल चाल न करता वेगळेच काही खेळायचे ...
ताल की चाल ?
किंमत किती ?
खरेतर टॅक्टिकल
In reply to ताल की चाल ? by रामदास
गेम हा मॅग्नुसचा प्रांत नाही असे समजले जाते परंतु हा देखील साचेबद्ध विचार ठरु शकतो...आनंद्ला टॅक्टिकल गेम्स आवडतात म्हटल्यावर मॅग्नुस त्याच्याच मैदानात येऊन खेळणारच नाही असेही नाही.. अनदर अनप्रेडि़क्टेबिलिटी!!
येस!
आनंदने व्जिरावर हल्ला केला हत्ती डी८ मधे आणून..आता मॅग्नुस वजीर ई२ मधे नेतोय का हत्ती मधे घालतोय?
आता सरळ थ्रेट आहे
बी एच ६ आणि हत्ती जी ३ राजाच्या नाड्या थेट आवळल्या जाण्याचा धोका!!
गंमत म्हणजे
In reply to आता सरळ थ्रेट आहे by चतुरंग
तीनही अॅनलिसिस एंजिन्स हे वेरिएशन तपासत नाहीयेत. त्यांच्याकडे हत्ती जी-३ मात्र आहे. अर्थात उंट एच-६ ला घो जी-६ हे उत्तर आहेच.
ऊप्स
In reply to गंमत म्हणजे by रमताराम
नाही चालणार.
दोघेही
घड्याळात दणकट आहेत त्यामुळे या डायनामिक पोझीशन मधे भरपूर विचार करणे शक्य आहे...
काय बघावं ते कळेना
उध्दवजींकडे बघू की आनंदच्या निर्बळी वजीराकडे .
हा हा!
In reply to काय बघावं ते कळेना by रामदास
निर्बळी नाही हो. तो कधीही एफ ७ असा येऊ शकतोच खेळात परंतु बाकी चिल्लिपिल्ली मोहोरी जर बचाव करु शकत असतील तर वजिराला कशाला इरेस घाला?
ते 'निर्बळी' बहुतेक...
In reply to हा हा! by चतुरंग
ते 'निर्बळी'उपहासाने वजीरापुढे लावले असेल का रामदासांनी? त्यांना उद्धवजींना ते विशेषण लावायचं होतं बहुतेक असं वाटून गेलं क्षणभर! :-)
निर्बळी?
In reply to काय बघावं ते कळेना by रामदास
निर्बळी काय म्हणून? घोडा ए-फ-४ साठी मोठा आधार आहे त्याचा. तिथे एक्स्चेंज झाले की थेट कार्ल्याच्या राजावर मोर्चे बसतील.
आनंद अचूक खेळतोय
बचाव नीट सुरु आहे. आता हत्ती जी ३ मधे आलाय तर घोडा जी ६ मधे आणला की काम भागते. गरज पडल्यास उंटाने घोडा मारुन पोझीशन मोकळी करता येईल.
येस घोडा जी ६ आलाच.
आता मॅग्नुस उंट कुठे नेतोय ते बघायचे..का वजीर मागे घेऊन एच प्यादे मुसंडी मारणार?
बचाव सुरु आहे मग ठिकाय , बघा तुम्ही
मी आलोच. कुकर चढवतो गॅसवर.
ओक्के या लवकर.
In reply to बचाव सुरु आहे मग ठिकाय , बघा तुम्ही by रामदास
वाट पाहतो या लवकर. एकटे रंगाशेठवर लोड नका टाकू.
मी वाचतोय. समालोचन.
-दिलीप बिरुटे
पायलीभर
In reply to बचाव सुरु आहे मग ठिकाय , बघा तुम्ही by रामदास
पायलीभर भात जास्त चढवा. गेम संपला की येतो, पोस्ट-मॅच अॅनलासिस करू या. :p
भात अन मासे का?
In reply to पायलीभर by रमताराम
आणि सोबत घुटक्या घुटक्याने अॅनालिसिस ;)
घुटक्या घुटक्याने अॅनालिसिस
In reply to भात अन मासे का? by चतुरंग
घुटक्या घुटक्याने अॅनालिसिस >> =))
शिट्टी विसरु नका हो!
In reply to बचाव सुरु आहे मग ठिकाय , बघा तुम्ही by रामदास
:)
डावावर कार्लसननं नियंत्रण मिळवलंय
त्याची मोहरी अत्यंत स्ट्रॅटेजिक पोझिशनला असून त्याच्या खेळाला एक निश्चित दिशा आलीये.
मोहोरी स्ट्रेटेजिक पोझीशनला
In reply to डावावर कार्लसननं नियंत्रण मिळवलंय by संजय क्षीरसागर
आहेत हे नक्की परंतु थ्रेट वाटते तितकी घातक नाहीये. बचाव अगदी शक्य आहे आणि आनंद बचाव किंग आहे!!
कार्लसनचा C-1 ऊंट कमाल करेल असा माझा अंदाज आहे
In reply to मोहोरी स्ट्रेटेजिक पोझीशनला by चतुरंग
बघा
आनंदने घोडा मारला!
In reply to कार्लसनचा C-1 ऊंट कमाल करेल असा माझा अंदाज आहे by संजय क्षीरसागर
आता प्याद्याने उंट मारला तर घोडा एफ ४ घेऊन वजिरावर हल्ला करणार असे दिसते..
आणि त्याच्या H-4 या खेळीबद्दल ही कमेंट वाचनीय आहे!
In reply to कार्लसनचा C-1 ऊंट कमाल करेल असा माझा अंदाज आहे by संजय क्षीरसागर
पण बचाव करायला लागणं ही मूळातच अवघड परिस्थिती आहे.
येस एच ४ खेळलाच...
आता आनंद हत्ती डी७ असा आणेल आणि व्जिरावरचा ताण कमी करेल. शिवाय मॅग्नुसचा हत्ती डी१ असा चाल करुन आलाच तर दुसरा हत्ती ड्डी८ येऊ शकतोच..
आलोच
मी आलो की रंगाशेठ जातील किचनमध्ये . रविवार आहे ना .
मगाशीच आलो जाऊन
In reply to आलोच by रामदास
पहिला चहा मॅच सुरु व्हायच्या आधी झाला सुद्धा! रविवार असतोच तसा विश्रांतीचा!! :)
मी धाग्यात पट टाकलाय पान
मी धाग्यात पट टाकलाय पान उघडायला जड जात असेल तर सांगा काढून टाकतो.
-दिलीप बिरुटे
नाही बरं झालं टाकलात त्यामुळे मला दुसरी खिडकी
In reply to मी धाग्यात पट टाकलाय पान by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
उघडायला लागत नाहीये!
मला उगाचच
In reply to नाही बरं झालं टाकलात त्यामुळे मला दुसरी खिडकी by चतुरंग
प्रभू मास्तरांची सुरक्षीत खिडकी आठवली
https://www.misalpav.com/node/28480
राहीलेल्या पंचेचाळीस मिनिटात
राहीलेल्या पंचेचाळीस मिनिटात किती चाली खेळाव्या लागतील ?
की वेळेचं तसं काही नाही ?
पहिल्या दोन तासात
In reply to राहीलेल्या पंचेचाळीस मिनिटात by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रत्येकी चाळीस असतात. त्यामुळे राहिलेल्या ४५ मिनिटात २० चाली करायच्यात आनंदला आणि १९ मॅग्नुसला.
च्यायला, आनंदने उंट फुकट दिला
च्यायला, आनंदने उंट फुकट दिला नसेल बॉ.
पाहु पुढं काय होतं. :(
-दिलीप बिरुटे
आता प्याद्याने उंट मारल तर
घोडा एफ ४ आणून वजिरावर हल्ला करता येईल का?
मॅग्नुसने
ई स्तंभ मोकळा करुन घेतलान आता हत्ती ई६ मधे येणार!! पुन्हा वेगळाच प्लॅन...मॅग्नुस ताल सारखा खेळतोय का?
म्हणुनच मी मघा विचारत होतो
In reply to मॅग्नुसने by चतुरंग
ताल की चाल
येस ते समजले होते!
In reply to म्हणुनच मी मघा विचारत होतो by रामदास
डिसेप्टिव गेमप्लॅन्स!!
अरे बापरे
आता आनंदला हत्ती डी७ असा घेता येत नाही कारण मगहहत्तीने ई८ असा चेक आणि मग आनंदच्या हत्तीने मारामारी केळी की वजिराने ई ८ वरचा हत्ती मारुन मेट!!
बोक्यासारखा
दबा धरुन बसलाय मॅग्नुस बोर्डावरती!! आज आनंदच्या बचावाचा कस लागणार!!
आता वजीर क्यू ई२ असा आणून
एच प्याद्याला पट्टी मोकळी करुन देणार की काय मॅग्नुस? त्याला बर्याच मुव्ज आहेत त्यामुळे आनंदचे काम कठिण होते आहे!!
मी पहेलेच बोललेलो
In reply to आता वजीर क्यू ई२ असा आणून by चतुरंग
कार्लसननं डावावर नियंत्रण मिळवलंय.
आला अपेक्षेप्रमाणे
हत्ती ई६ मधे आला. आता वजीर एफ ६ आणून आनंद वजिरावजिरीला आमंत्रण देणार का? एफ ४ वरचे प्यादे बिनजोरी आहे त्यामुळे त्याचा विचारही करावा लागेलच..परिस्थिती कालच्यापेक्षा कठिण आहे :(
मला वाटताय सोचीत (ह्या) डावात
मला वाटताय सोचीत (ह्या) डावात आनंदची जबरदस्त गोची झालीय
आता
एच ६ असे प्यादे सरकवून आनंदला वेंट ओपनिंग करुन ठेवावे लागणार अन्यथा दोन्ही हत्ती मागच्या पट्टीत अडकून पडतील आणि वजीर अतिताणाचा बळी ठरेल!!
आता मॅग्नुसचा हत्ती
ई४ मधे येणार आणि पुढच्या खेळीला हत्ती ई७!! थ्रेट्स सरळ आहेत पण बचाव कसा?
मॅग्नुस आता
आधी प्यादे घेणार! म्हणजे मग एक पॉन डाउन असल्याचा मानसिक तणाव बचावाच्या कठिणपणात भर घालेल..
कार्लसन इतका साधा अॅडवांटेज घेणार नाही
In reply to मॅग्नुस आता by चतुरंग
माझ्या मते त्याचं सगळं लक्ष फक्त एका घरावर केंद्रित आहे : E-7! आनंदची एक चूक आणि डाव जाईल.
E-8!
In reply to कार्लसन इतका साधा अॅडवांटेज घेणार नाही by संजय क्षीरसागर
.
आनंदसाठी पटावर एकही घोडं शिल्लक नाही
त्याची उणीव आता भासेल . पण हे अत्यंत दवणीय विधान आहे
व्वा. वजीर काय प्रेशर आणतो
व्वा. वजीर काय प्रेशर आणतो बघु या.
हत्ती घेईल का आनंद.
-दिलीप बिरुटे
खेळला आनंद
वजीर डी७ खेळला. आता हत्ती ई४ येणार. त्याला आनंदचे उत्तर एच ६ असे असेल आणि मग राजा एफ ८!
राजा एच २
मॅग्नुस प्रॉफिलॅकमुव्ह्,ऊव्ज करतो हे जे काल म्हंट्ले होते त्याचा पुरावा. सद्यस्थितीत काळा जेरबंद आहे तोवरच बचावाची तयारी करुन घेणे म्हणजे बॅकरँक चेक्स बसणार नाहीत! क्या बात है!! मॅग्नुस इज ऑस्सम!!
+१
In reply to राजा एच २ by चतुरंग
+१
माताय,
माताय,
असली जबरा कंमट्री फक्त जेष्ठ मिपाकरच करु शकतात.
कंमेट्री चालु राहु द्या.
विषयच संपला!
कार्लसनचा राजा अभेद्य स्थितीत गेलायं! आता तो हल्ला करायला मोकळा आणि आनंदला फक्त बचावाशिवाय पर्याय नाही!
वजीर ई२
एका रस्त्यावर तीन अवजड वहाने आणली आहेत मॅग्नुसने!! काम चालू रस्ता बंद!!! :)