Skip to main content

आनंद-कार्लसन, सोची २०१४ - डाव २

लेखक चतुरंग यांनी रविवार, 09/11/2014 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
आज काय बघायला मिळणार? कालचा ग्रुन्फेल्ड? चला बघूयात
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 25797
प्रतिक्रिया 114

प्रतिक्रिया

क्या बात है! आज लढाई बघायला मिळणार. पहिल्या चार खेळ्या कॉपीबुक. मॅग्नुसचा किल्लेलोक राजाच्या बाजूला पूर्ण

कालपासुन चेक करतोय.पण भारतात कुठल्याही चॅनेलवर प्रक्षेपण होत नाही.मोबल्यावर दिसत नाही. कंमेट्री करक राहा तेवढाच आनंद

आलो एकदाचा. आज मिपा बराच वेळ लॉगिन करूच देईना. आमच्या ब्राउजरने काही काशी केली बहुतेक.

दहाव्या खेळीला त्याने ७ मिनिटे घेत्ली आहेत. मॅग्नुस त्याचा वजिराच्या बाजूचा घोडा एफ१ आणि मग जी ३ असा आणणार असे वाटते आहे बहुदा. आनंदने त्याचा घोडा डी७-एफ८ मार्गे ई६ वरती आणायचा विचार पक्का केलाय ..

वर्षी आनन्दला बर्लिन'ने बराच त्रास दिला होता. यावर्षी तो तयारीत असेल अशी अपेक्षा आहे.

अजून मॅग्नुस खुर्चीवर रांगत नाहीय्ये. (कालच्या खेळात एकदा हा पडतो का काय असं वाटलं होतं.)ही सुरवात जर्रा डल वाटते आहे.

काळ्याच्या काळ्या उंटाची घुसमट हा प्लॅन...आनंद ए ५ खेळला आणि मॅग्नुसचे प्यादे थोपवले

डाव सोपा करण्याकडे कल आहेच मॅग्नुसचा. चेन्नैप्रमाणेच तो ग्राइंडिंग खेळणार, तासन्तास खेळून समोरच्याला वेअराउट करणे हे तंत्र..

मारले न जाता मोहरी पटावरुन जाण्याचे दुर्मिळ दृष्य बघायला मिळते आहे...

या प्रायोजकांचा ब्रेक सुरु झाला की त्यांचा लेगब्रेक करायची इच्छा होते. अरे खेळ चाललाय आणि मधेच तुमचे विडिय्यो कशाला? पण काय पैसा बोलता है!!

रंगाशेट, यावेळी तुम्ही नाही म्हणून आमची तानिया पण आली नाही. आता तुम्ही रिटायरमेंट मागे घेतली आहे तर तिला परत आणणे ही तुमची जबाबदारी आहे. :P

In reply to by रमताराम

म्हणजे आनंदच्या बोर्डावरचा वजीर ही तुमची खरी 'क्वीन' नाहीये तर!! ;)

रंगाचे उंट शिल्लक म्हणजे लढाईची नांदी. आता काळ्याचा प्रयत्न सगळी प्यादी काळ्या घरात आणून उंटाची हालचाल मर्यादित करणे आणि त्याच्या विरुद्ध प्रयत्न मॅग्नुसचा. मॅग्नुसने ए पट्टीतला हत्ती ए ३ असा आणला...कुठे न्यायचाय हा हत्ती? बहुतेक ई ३? डबल करणे

In reply to by चतुरंग

आनंदच्या वजीराच्या मदतीने तीन प्यादी सी पट्टीवरून पुढे सरकू पाहतायत त्याला पायबंद घालणे हा हेतू असू शकेल. यावर आनंदने डी प्यादे मारून हत्तीला धोका निर्माण केला तर वजीराने ते प्यादे घेऊन मध्य भागावर वर्चस्व निर्माण करणे शक्य होईल. पण समोर तीन प्यादी हल्ल्याला तयार असताना वजीर थेट समोर नेणे कितपत शहाणपणाचे होईल कोण जाणे.

In reply to by रमताराम

नव्हे कदाचित डी३ असू शकेल म्हणजे मग डी प्याद्याने ई प्यादे मारुन स्तंभ मोकळा करुन घेणे..

हत्ती फक्त रांगेतून हलवून न नेता थेट आहे त्याच स्तंभातून पुढे आणून आडव्या पट्ट्यांचा ताबा घेणे असा रोख बर्‍याचदा दिसायला लागला आहे...

प्यादी एक्स्चेंज करून मधल्या पट्टीवर नियंत्रण मिळवण्याचा हेतू साध्य झाला कार्ल्याचा. वजीर ती पट्टी ताब्यात ठेवून आहेच. हत्ती त्याच्या जोडीला येऊन हल्ला करू शकतो. पण आता प्यादे तिथे नसल्याने ही शक्यता कमी झाली. घोडा हटवून हत्ती थेट जी पट्टीत नेऊन राजावरच्या हल्ल्याची तयारीही करता येईल.

In reply to by रमताराम

घोडा एच ४ मधे आलाच आहे.शिवाय वजिराला थेट एच ५ कर्ण मोकळा आहेच, हत्ती जी ३ मधे आला तर सरळ तीन मोहोरी राजाच्या दिशेने चाल करणारी असतील.

लागलाय असे वाटते ...एक चाल करुन एखादा रोख दाखवायचा आणि समोरच्याला वेगळ्याच दिशेने न्यायचे आणि नंतर सामान्यपणे प्रेडिक्टेबल चाल न करता वेगळेच काही खेळायचे ...

In reply to by रामदास

गेम हा मॅग्नुसचा प्रांत नाही असे समजले जाते परंतु हा देखील साचेबद्ध विचार ठरु शकतो...आनंद्ला टॅक्टिकल गेम्स आवडतात म्हटल्यावर मॅग्नुस त्याच्याच मैदानात येऊन खेळणारच नाही असेही नाही.. अनदर अनप्रेडि़क्टेबिलिटी!!

आनंदने व्जिरावर हल्ला केला हत्ती डी८ मधे आणून..आता मॅग्नुस वजीर ई२ मधे नेतोय का हत्ती मधे घालतोय?

बी एच ६ आणि हत्ती जी ३ राजाच्या नाड्या थेट आवळल्या जाण्याचा धोका!!

In reply to by चतुरंग

तीनही अ‍ॅनलिसिस एंजिन्स हे वेरिएशन तपासत नाहीयेत. त्यांच्याकडे हत्ती जी-३ मात्र आहे. अर्थात उंट एच-६ ला घो जी-६ हे उत्तर आहेच.

घड्याळात दणकट आहेत त्यामुळे या डायनामिक पोझीशन मधे भरपूर विचार करणे शक्य आहे...

In reply to by रामदास

निर्बळी नाही हो. तो कधीही एफ ७ असा येऊ शकतोच खेळात परंतु बाकी चिल्लिपिल्ली मोहोरी जर बचाव करु शकत असतील तर वजिराला कशाला इरेस घाला?

In reply to by चतुरंग

ते 'निर्बळी'उपहासाने वजीरापुढे लावले असेल का रामदासांनी? त्यांना उद्धवजींना ते विशेषण लावायचं होतं बहुतेक असं वाटून गेलं क्षणभर! :-)

In reply to by रामदास

निर्बळी काय म्हणून? घोडा ए-फ-४ साठी मोठा आधार आहे त्याचा. तिथे एक्स्चेंज झाले की थेट कार्ल्याच्या राजावर मोर्चे बसतील.

बचाव नीट सुरु आहे. आता हत्ती जी ३ मधे आलाय तर घोडा जी ६ मधे आणला की काम भागते. गरज पडल्यास उंटाने घोडा मारुन पोझीशन मोकळी करता येईल.

आता मॅग्नुस उंट कुठे नेतोय ते बघायचे..का वजीर मागे घेऊन एच प्यादे मुसंडी मारणार?

In reply to by संजय क्षीरसागर

आहेत हे नक्की परंतु थ्रेट वाटते तितकी घातक नाहीये. बचाव अगदी शक्य आहे आणि आनंद बचाव किंग आहे!!

In reply to by संजय क्षीरसागर

आता प्याद्याने उंट मारला तर घोडा एफ ४ घेऊन वजिरावर हल्ला करणार असे दिसते..

In reply to by संजय क्षीरसागर

Carlsen remains calm and tries to improve slowly because black can't actually do anything on the open file. This is the first time in the game I see Anand some real pressure. So far he defended superbly.
पण बचाव करायला लागणं ही मूळातच अवघड परिस्थिती आहे.

आता आनंद हत्ती डी७ असा आणेल आणि व्जिरावरचा ताण कमी करेल. शिवाय मॅग्नुसचा हत्ती डी१ असा चाल करुन आलाच तर दुसरा हत्ती ड्डी८ येऊ शकतोच..

मी आलो की रंगाशेठ जातील किचनमध्ये . रविवार आहे ना .

In reply to by रामदास

पहिला चहा मॅच सुरु व्हायच्या आधी झाला सुद्धा! रविवार असतोच तसा विश्रांतीचा!! :)

मी धाग्यात पट टाकलाय पान उघडायला जड जात असेल तर सांगा काढून टाकतो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रत्येकी चाळीस असतात. त्यामुळे राहिलेल्या ४५ मिनिटात २० चाली करायच्यात आनंदला आणि १९ मॅग्नुसला.

ई स्तंभ मोकळा करुन घेतलान आता हत्ती ई६ मधे येणार!! पुन्हा वेगळाच प्लॅन...मॅग्नुस ताल सारखा खेळतोय का?