आदरणीय डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी आज भारतीय जनता पक्षाचे “निवडणूक प्रतिज्ञापत्र” सादर केले आहे, ज्यात जमेल तिथे विदेशी अर्थपुरवठा वापरून पण त्याच्या कुबड्या न बनवता भारतीय अर्थपुरवठा व भारतीय साधनसामुग्री वापरून श्रेष्ठ भारत, सशक्त भारत आणि दृढ भारत बनवण्यासाठी पक्षाने धोरण सुनिश्चित केले आहे.
ध्येय(Goals): एक भारत, श्रेष्ठ भारत, सुशासन, सर्वसमावेशक सर्वस्पर्शी व सर्वदेशी विकास
आव्हाने(Challenge): भ्रष्टाचार, महागाई, रोजगार, आर्थिक विषमता, देशाचा इतर पक्ष्यांच्या कार्यकाळात गेल्या ६१ वर्षांत झालेला अल्पसा विकास, वित्तीय नुकसान(CAD), रुपयाचे झालेले अवमूल्यन, परदेशी गुंतवणुकीवर अवलंबून असलेली भारतीय अर्थव्यवस्था, देशातील अंतर्गत बाजारपेठेत चीन व इतर देशांनी काबीज केलेला मोठा वाटा, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील भारतीय निर्यातीचा घटलेला वाटा.
मुख्य कार्यवाही केंद्र(Focus for Action): महिला सबलीकरण व संरक्षण, शेतकरी, कामगार, विद्ध्यार्थी, रोजगार निर्माण करणारे छोटे व्यावसायिक यांना हव्या त्या सुविधा स्वस्तात पुरविणे, लहान लहान खेड्यांपर्यंत रस्ते व मुलभूत साधनसुविधा उपलब्ध करणे, औद्योगिक उत्पादने, जल व उर्जा स्वतंत्रता, रस्ते-जहाज व नवीन गोदी बांधणी, शिक्षण, स्वास्थ्य व संशोधन यात अग्रेसर होणे, सिंचनाचे आधुनिक मार्ग अवलंबणे, नवीन मार्ग शोधणे व जरूर पडल्यास नदीजोड प्रकल्प उभरणे, पर्यटन व निर्यात यात मुलभूत सुधारणा, आर्थिक क्षेत्रासाठी व प्रामुख्याने NBFC साठी चांगले नियंत्रक उभे करणे व भारताला आर्थिक महासत्ता बनविणे.
काश्मीर व राममंदिरासारख्या मुद्द्याला भारतीय घटनेला अनुसरूनच कार्यवाही केली जाईल, असेही स्पष्ट केले आहे.
भाजपच्या जाहीरनाम्यातील ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे-
- काळाबाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी विशेष न्यायालये स्थापन करणार. कठोर उपाययोजना करणार.
- कायद्याच्या चौकटीत राहून राम मंदिराची उभारणी करणार.
- विदेशातील बॅंकांमध्ये असलेला काळा पैसा भारतात आणण्याला प्राथमिकता.
- ज्या क्षेत्रांमध्ये रोजगार आणि संपत्तीच्या वाढीसाठी थेट विदेशी गुंतवणुकीची गरज आहे, तेथेच एफडीआयला परवानगी देणार.
- नाशवंत शेतीमालाचा इतर भागांमध्ये पुरवठा करण्यासाठी अॅग्री रेल नेटवर्क उभारणार.
- हायस्पिड ट्रेन नेटवर्कसाठी डायमंड क्वॉड्रिलॅटरल प्रकल्प सुरू करणार.
- महागाई रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करणार.
- शिक्षण आणि उद्योगात अल्पसंख्याकांना अधिक संधी देणार.
- केंद्र आणि राज्य सरकार या मधील संबंध सुधारण्यावर भर देणार.
- ज्युडिशिअल रिफॉर्म, इलेक्ट्रोल रिफॉर्मला प्राथमिकता देणार.
- नवीन आरोग्य धोरण आणले जाईल.
- ग्रामीण भागात वाय-फाय झोन उभारणार.
- महिला सबलीकरणासाठी युनिफॉर्म सिव्हिल कोड.
- टॅक्स व्यवस्था आणि बॅंकांची आर्थिक स्थिती सुधारण्यावर विशेष भर.
- प्रत्येक राज्याच्या राजधानीत एम्स उभारले जाईल.
- नॅशनल ई-वाचनालय सुरू केले जाईल. त्यामुळे देशभरातील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता येईल.
- राष्ट्रीय मदरसा विकास कार्यक्रम राबविला जाईल. उर्दू भाषेचे संरक्षण आणि प्रसार केला जाईल.
- एससी, एसटी प्रवर्गातील नागरिकांना सामाजिक न्याय आणि सबलिकरण करण्यावर भर.
- शहरी आणि ग्रामीण भारतातील दरी दूर करणार.
- प्रत्येक भारतीयाला पक्क्या घराचे आश्वासन.
सर्व वर्ग, प्रांतिय व धर्मियांना सुख, शांती, समाधान, सुरक्षा, विकास व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत देशाची विक्रयमूल्य (ब्रांड व्हॅल्यू) वाढविण्यासाठी गुजराथचे सलग तीन वेळेला निवडून आलेले व प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव असलेले “माननीय श्री नरेंद्र भाई मोदी” व “भारतीय जनता पक्ष व इतर मित्र पक्षांचे खासदार पदासाठीचे इतर अधिकृत उमेदवार” यांनाच निवडून आणावे, ही विनंती माननीय श्री लाल कृष्ण अडवाणी व श्री राजनाथ सिंग यांनी केलेला आहे.
प्रथमदर्शनी अशक्य भासणारे परंतु तितकेच महत्वाचे मुद्दे ऐकून माझे कान टवकारले गेले व हातातील कामे सोडून मी टीवीवर नजर खिळवून बसलो. देशहिताला प्रथम व पूर्ण प्राधान्य देवून भाजप व मित्र पक्षांनी निवडणूक जिंकल्यावर काय चांगले होवू शकते यावर केलेला विचार मनाला पूर्ण भावून गेला. निवडणुकीला सामोरे जातांनाच अगदी पहिल्या पायरीवरच या तऱ्हेने बारीकसारीक गोष्टींचा पूर्ण विचार करणारा भाजप हा एकमेव पक्ष आहे व पक्षाची देशाप्रती असणारी एकूण तळमळ (प्रतीबद्धता) या “संकल्प पत्रा” द्वारे व्यक्त केली गेली आहे असेच वाटले.
चांगला मुद्दा हाती नसल्यामुळे, अगदी निवडणूक सुरु होण्याच्या मुहूर्तावरच हे प्रकाशन झाले आहे, यावरच बऱ्याच पक्षांनी टीका केली आहे. इतर सर्व पक्षांनी निव्वळ कागदी प्रकाशनाची औपचारिकता दाखवून केवळ मतदारांच्या तोंडाला पाने पुसली आहेत असेच वाटते. त्यातही काहींनी मागासलेल्यांना तर काहींनी पुढारलेल्यांना आरक्षण अशी सवंग व स्वस्त जाहिरात करून आरक्षणाचे शिळे झालेले तेच गाजर पुढे केलेले आहे. या आरक्षणामुळे फक्त वरवर लेप लावून खालची जखम तशीच भळभळत ठेवण्यासारखेच आहे, हे आजवर कोणाच्याही लक्षात कसे आलेले नाही?
नुसती खोटी प्रलोभने देत व मोठमोठे घोटाळ्यांचे विश्वविक्रम रचलेल्या कॉंग्रेसने गेल्या १० वर्षात जेमतेम सव्वा लाख रोजगार निर्माण केला आहे. त्यांच्या जाहीरनाम्यात तर पुढच्या एका वर्षात १० लाख रोजगार निर्माण करू अशी पोकळ आश्वासने दिली आहेत, ज्यावर कोणा मतदाराचा विश्वास बसेल का?
गरिबांच्या रोजच्या खर्चावरचे चमत्कारिक व अवास्तव गणित करून कोंग्रेसच्या नियोजनमंत्र्यांनी त्यांच्या तोंडावर चपराक मारलेली आहे, हे कोणी विसरेल का?
विदेशी अर्थपुरवठ्याशिवाय विकास शक्य नाही असेच इतर सर्व विरोधी पक्षांना वाटत असतांना, आजपर्यंत असा आमुलाग्र बदल घडवण्याचा “१८०अंश विरुद्ध” विचार कोणत्याही पक्षाला करणे जमलेले नाही. पण काळाची हीच खरी गरज आहे, ज्यामुळे मरगळलेली भारतीय मने निश्चितच जागरूक होऊन भारत एक आर्थिक महासत्ता बनेल अशी खात्री वाटू लागते. व त्याचा परिणाम कि काय गेल्या १० वर्षात रुपयाचे मूल्य ४० वरून ६८रुपये प्रती डॉलर एवढे घसरलेले असतांना नुसते “मोदीच निवडून येतील असा मतदारांचा आशावाद” दोन महिन्यात ५९ रुपया प्रती डॉलर पर्यंत मूल्यवर्धन करू शकतो, याचा अर्थ मोदी निवडून येण्याबद्दल किती उत्सुकता व विश्वास आहे हेच दिसून येते.
बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो!
एक आवाहन: मेरा देश लंगडा हो गया है|आप देशको उठाकर चला दिजीये|
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
57590
प्रतिक्रिया
219
मिसळपाव
प्रतिक्रिया
सोरटी सोमनाथ उभारणीमुळे
In reply to ? by आजानुकर्ण
राम आणि कृष्ण हे आम्हा
In reply to राममंदिर आणि देशाच्या अर्थकारणाचा संबंध... by विटेकर
एवढा तिरस्कार?
च्यामारी, मोदी
कडक प्रतिक्रिया. ह्याला
In reply to च्यामारी, मोदी by Dhananjay Borgaonkar
एनडीटिव्ही
एनडीटिव्हीच्या आज जाहीर
In reply to एनडीटिव्ही by विकास
निष्कर्ष
In reply to एनडीटिव्हीच्या आज जाहीर by क्लिंटन
शेवटची जनमत चाचणी...तरिही...
In reply to निष्कर्ष by विकास
पक्षाला एकही जागा पूर्ण देशात मिळाली नाही ?
In reply to एनडीटिव्हीच्या आज जाहीर by क्लिंटन
एक म्हण
In reply to पक्षाला एकही जागा पूर्ण देशात मिळाली नाही ? by संजय क्षीरसागर
फारच बाळबोध म्हण आहे
In reply to एक म्हण by आयुर्हित
भ्रम
In reply to पक्षाला एकही जागा पूर्ण देशात मिळाली नाही ? by संजय क्षीरसागर
>जर कोणाची लाट आलीच असली तर ती मोदींची लाट आली आहे
In reply to भ्रम by क्लिंटन
हू केअर्स?
In reply to >जर कोणाची लाट आलीच असली तर ती मोदींची लाट आली आहे by संजय क्षीरसागर
हू केअर्स? शाब्बास! हेच तर झालंय
In reply to हू केअर्स? by क्लिंटन
:)
In reply to हू केअर्स? शाब्बास! हेच तर झालंय by संजय क्षीरसागर
ज्यांना स्वतःचा राजकीय बेस आहे असे कोणते (खरं तर एकूण किती)
In reply to :) by क्लिंटन
मला वाटते अडवाणी जोशीना
In reply to ज्यांना स्वतःचा राजकीय बेस आहे असे कोणते (खरं तर एकूण किती) by संजय क्षीरसागर
मोदिंची वाट बिकट आहेच.
In reply to मला वाटते अडवाणी जोशीना by संपत
मान्य. मुद्दा हा होता कि
In reply to मोदिंची वाट बिकट आहेच. by अर्धवटराव
अकलेचे तारे तोडू नका!
In reply to हू केअर्स? शाब्बास! हेच तर झालंय by संजय क्षीरसागर
पण मग...
In reply to हू केअर्स? शाब्बास! हेच तर झालंय by संजय क्षीरसागर
कशाची कशाशीही सांगड घालणं तुमच्याकडून शिकावं!
In reply to पण मग... by विकास
तरी पण...
In reply to कशाची कशाशीही सांगड घालणं तुमच्याकडून शिकावं! by संजय क्षीरसागर
अपरीहार्यता..
In reply to कशाची कशाशीही सांगड घालणं तुमच्याकडून शिकावं! by संजय क्षीरसागर
मोदींसाठी बडोदा मतदारसंघ बिजेपीनं निवडला होता,
In reply to अपरीहार्यता.. by विकास
ब्ररोब्र हाय तुमचं
In reply to >जर कोणाची लाट आलीच असली तर ती मोदींची लाट आली आहे by संजय क्षीरसागर
ई-सकाळ मध्ये आंध्रात १५ फुटी
In reply to ब्ररोब्र हाय तुमचं by गब्रिएल
(No subject)
In reply to ई-सकाळ मध्ये आंध्रात १५ फुटी by सुहास..
वडोदरा
In reply to पक्षाला एकही जागा पूर्ण देशात मिळाली नाही ? by संजय क्षीरसागर
पुन्हा ज्योक!
In reply to वडोदरा by विकास
बालीश उत्तर
In reply to पुन्हा ज्योक! by संजय क्षीरसागर
चोराच्या उलट्या बोंबा!
In reply to पुन्हा ज्योक! by संजय क्षीरसागर
आयुर्विमा!
In reply to चोराच्या उलट्या बोंबा! by आयुर्हित
संजय साहेब,
मोदींनी राम मंदिर बांधलं तर तुम्हाला नक्की काय प्रोब्लेम आहे ?
In reply to संजय साहेब, by लोटीया_पठाण
+१
In reply to मोदींनी राम मंदिर बांधलं तर तुम्हाला नक्की काय प्रोब्लेम आहे ? by संजय क्षीरसागर
राम मंदिर
In reply to मोदींनी राम मंदिर बांधलं तर तुम्हाला नक्की काय प्रोब्लेम आहे ? by संजय क्षीरसागर
२. लोकसभेत पुरेसे संख्याबळ
In reply to राम मंदिर by मोहन
म्हणूनच जाहीरनाम्यात मुद्दा
In reply to २. लोकसभेत पुरेसे संख्याबळ by संपत
गैर...
In reply to २. लोकसभेत पुरेसे संख्याबळ by संपत
आभारी आहे अर्धवटराव. मी ह्या
In reply to गैर... by अर्धवटराव
गडकरी स्पष्टीकरण देणार आणि जनता नादावणार!
In reply to राम मंदिर by मोहन
गडकरी सांगतायंत आणि जनता
In reply to गडकरी स्पष्टीकरण देणार आणि जनता नादावणार! by संजय क्षीरसागर
अरे वा! हिब्रू शिकलात तर!
In reply to गडकरी सांगतायंत आणि जनता by कवितानागेश
?
In reply to अरे वा! हिब्रू शिकलात तर! by संजय क्षीरसागर
अहो अजून का आलं हे कळले नाही
In reply to ? by विकास
मंदिरामुळे हिंदूंची पराभूत
.
In reply to मंदिरामुळे हिंदूंची पराभूत by लोटीया_पठाण
.
In reply to मंदिरामुळे हिंदूंची पराभूत by लोटीया_पठाण
कोण आहेत हे सगळे?
दिनेश साय्ब, तुमी इतं नवे
In reply to कोण आहेत हे सगळे? by दिनेश सायगल
हायकमांड का आतला आवाजा?
In reply to दिनेश साय्ब, तुमी इतं नवे by गब्रिएल
न्हाय न्हाय. त्ये स्वयबू
In reply to हायकमांड का आतला आवाजा? by दिनेश सायगल
दिनेशजी,
In reply to कोण आहेत हे सगळे? by दिनेश सायगल
धन्यवाद!
In reply to दिनेशजी, by संजय क्षीरसागर
?
In reply to धन्यवाद! by दिनेश सायगल
+१००० हाणूमोदन !
In reply to ? by विकास
संजय क्षीरसागर जी,
आवो, त्येंचा मनावर्च इश्वास
In reply to संजय क्षीरसागर जी, by सिद्धार्थ ४
आचारसंहिता लागू झाली म्हणे...
जो पर्यंत
In reply to आचारसंहिता लागू झाली म्हणे... by असंका
Being a confused accountant.
In reply to जो पर्यंत by विकास
Vote for India
राजकारण निधर्मी आणि इश्यू बेस्ड व्हावं यासाठी नवा विचार देण्याचा
>>> निधर्मी आणि इश्यू बेस्ड
In reply to राजकारण निधर्मी आणि इश्यू बेस्ड व्हावं यासाठी नवा विचार देण्याचा by संजय क्षीरसागर
@ प्रशांत आवळे,
In reply to >>> निधर्मी आणि इश्यू बेस्ड by प्यारे१
(No subject)
In reply to @ प्रशांत आवळे, by कवितानागेश
भ्रष्टाचारापेक्षा जास्त
In reply to राजकारण निधर्मी आणि इश्यू बेस्ड व्हावं यासाठी नवा विचार देण्याचा by संजय क्षीरसागर