✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

जंगल घडवणारा माणूस: जादव पायेंग

च
चैतन्य गौरान्गप्रभु यांनी
Sun, 04/22/2012 - 22:49  ·  लेख
लेख
जंगल! परमेश्वराने अगदी मुक्तहस्ताने सृष्टीसौंदर्याची उधळण केलेलं वसुंधरेचं हिरवं लेणं! जंगल म्हटलं की वाघोबाच्या डरकाळीपासुन ते टारझनच्या आरोळीपर्यंतच्या आठवणी मनात घर न करतील तरच नवल. अवघ्या जीवसृष्टीला आकार देणा-या या जंगलातूनच मानवजातीला जिवंत राहण्याचे तंत्र, जीवन सुखी करण्यासाठीचे यंत्र, आणि जीवनाचं सार्थक करण्याचे मंत्र गवसलेत. जंगलाकडून हे सगळं घेत असतांना आपण जंगालाचंही काहीतरी देणं लागतो हे मात्र आपण सामान्य माणसं सोयिस्करपणे विसरतो. जादव पायेंग मात्र विसरभोळा नाही. सोयिस्करपणे विसरणे तर त्याच्या गावीही नाही. आणि रेताड, ओसाड शिवाय दुर्लक्षीत अश्या १३६० एकर जमिनिवर आपलं आयुष्य खर्ची घालत एक संपुर्ण अरण्य फुलवल्यानंतर तो, तुमच्या-आमच्यासारखा सामान्यही रहात नाही. होय. आसाममधल्या जोरहट जिल्ह्यातल्या जादव पायेंगचं आयुष्य कुठल्याही दंतकथेपेक्षा कमी नाही. या भागावर राज्य चालतं ते 'ब्रम्हपुत्र' नदिचं. अ-कारान्त पुल्लींगी नाव असणारी कदाचीत ही एकमेव नदी असावी. वेग, विस्तार आणि विध्वंस करण्याची क्षमताही एखाद्या विर पुरूषालाच साजेशी. सागरासमान विशाल अश्या ब्रम्हपुत्रच्या पात्रात अनेक छोटीछोटी बेटे तयार झालीत. तीस वर्षापुर्वी याच ब्रम्हपुत्र नदिच्या पात्राजवळून सुरू झालेली जादव पायेंगचीही अरण्ययात्रा आज तब्बल ५५० हेक्टर जमीनीवर एक छोटं अभयारण्य तयार करण्य़ापर्यंत येऊन पोचलीय. हे एकमेवाद्वीतीय मनुष्यनिर्मित अरण्य आज चार वाघ, तीन गेंडे, शंभरेक हरणं, शेकडो माकडं, ससे आणि ईतर जनावरांचं हक्काचं घर आहे. कित्येक प्रवासी पक्षी पाहूणे म्हणुन ईथे येतात. जवळपास सव्वाशे जंगली हत्तींचा कळप येथे वर्षातले सहा महिने वास्तव्यास असतो. मात्र १९७९ साली सोळा वर्षाच्या एका पोरट्याने या बेटावर पाय ठेवला होता, तेव्हा परिस्थीती अगदीच वेगळी होती. ब्रम्हपुत्र नदिच्या विद्धंसकारी पुराने सगळं काही वाहून नेलं होतं. अगदी छोटीछोटी झुडुपे देखील ठेवली नव्हती. बी रूजायला मातीच नव्हती. नजर जाईल तेथे रेती आणि रेती नसेल तेथे खडक. होते नव्हते ते सगळे जीव वाहून गेले. राहिले ते फक्त सरपटणारे प्राणी. पण पूर ओसरला, उन पडलं, आणि सावलीचा कुठेच पत्ता नसल्याने त्यांनीही उन्हाने पोळून निघून जीव सोडले. त्याच्या कबिल्यात ज्यांची पुजा व्हायची त्या शेकडो साप, अजगर आणि ईतर प्राण्यांचे तडफडून जीव गेलेले पाहून त्या सोळा वर्षाच्या मुलाला अश्रृ आवरले नाहीत. त्याने ठरवलं की, या बेटावर पुन्हा जंगल निर्माण करायचं. रोपटी मागायला तो वनविभागाच्या कर्मचा-यांकडे गेला. सहाजीक सगळ्यांनी त्याला मुर्खात काढलं. या ओसाड जागेवर बांबु उगवला तरी भरून पावलं, असा विचार करून कुणीतरी बांबुची रोपटी दिली. मग बांबुचं वन उभारण्याचा ध्यासच या पोराने घेतला. 'मुलई' म्हणायचे त्याला घरचे आणि गावचे लोक. म्हणुन मग त्याने उभारलेल्या जंगलाचं नाव पडलं 'मुलई कथोनी' म्हणजे मुलईचं जंगल. बांबुच्या बनापासुन सुरू झालेल्या या जंगलाला आज अभयारण्य दर्जा मिळण्याईतपत जैवविविधता ईथे आहे. मुलईच्या अथक परिश्रमाचंच ते फळ. येथे अथक म्हणजे अगदी शब्दशः अथक! खडकाळ मातीत लाल मुंग्या राहिल्या तर मातीचा दर्जा बदलतो. ती सुपीक होते असा गावक-यांचा अनुभव लक्षात घेऊन मुलईने आपल्या खेड्यातून लाल मुंग्या पकडून आणुन त्यांचं पुनर्वसन या बेटावर करायला सुरूवात केली. गावापासुन बेटावर पोचण्यासाठी आधी तीस किलोमिटरचा चिंचोळा रस्ता, नंतर होडीत बसुन तासभर केलेला प्रवास आणि त्याहीनंतर तब्बल सात आठ किलोमीटरचा पाई प्रवास या मुंग्यांना जवळ घेऊन करत असतांना त्यांनी घेतलेले अगणीत चावे त्याने कसे सहन केले असतील? बांबुच्या या बनाला एक संपुर्ण अरण्य बनवण्यासाठी भटकंती करत वालकोल, अर्जुन, इजर, गुलमोहर, कोरोई, मोज आणि हिमोलू ची रोपटी जमवत फिरणा-या मुलईला सरकार, गावातले लोक आणि कुटुंबानेही मदत नाकारल्यावर कुणाच्या भरवश्यावर तो उभा राहिला असेल? लावलेली रोपटी जगावीत, म्हणुन तब्बल तीस वर्षापासुन न चुकता सकाळ-संध्याकाळ त्यांना नदिवरून आणून पाणी टाकणा-या मुलईला हे सगळं करत राहण्याची प्रेरणा त्या जंगलात कुठुन बरं मिळाली असेल? विश्वास बसणार नाही ईतकं या जंगलाशी मुलईचं दृढ नातं आहे. ईथले वाघही त्याला ओळखतात आणि एकशिंगी गेंडेही. आजुबाजुच्या गावात विध्वंस करणारे जंगली हत्ती गावक-यांच्या प्रकोपापासुन वाचण्यासाठी याच जंगलात येतात. कारण त्यांना मारायला जमलेल्या गावक-यांना सामोरा जाऊन 'आधी मला मारा. मग हत्तींवर गोळ्या चालवा' असं जाहिर आव्हान हा शिडशिडित प्रकृतीचा बुटकासा माणुसच फक्त देऊ शकतो. एकशिंगी गेंड्यांच्या शिका-यांची तक्रार तो त्त्वरीत वनवीभागाकडे सोपवतो. अध्ये मध्ये गावक-यांना जंगल तोडण्याची हुक्की आली, की झाडांना कवटाळून बसतो. एखादा नवा पक्षी पाहूणा म्हणुन आलेला पाहिला की त्याचा पाहूणचारही करतो. गेल्या तीस वर्षापासुन मुलई हे काम निःस्वार्थ भावनेने करतो आहे. त्याच जंगलात त्याच्या जुन्या झोपडीतच तो अजुनही राहतो. बायको, दोन मुले आणि एक मुलगी अश्या आपल्या कुटुंबाचा चरितार्थ तो घरात पाळलेल्या गाई आणि म्हशिंचं दूध विकून चालवतो. प्रसिद्धी, पैसा किंवा सन्मान यांची त्याला दूरदूरपर्यंत पुसटशीही आशा नाही. पण पैसा आणि सन्मान सोडले, तरी प्रसिद्धी मात्र त्याच्या वाट्याला थोडीफार आली आहे. तेही अगदी अलीकडे २००८ नंतर. त्याचं झालं असं, की जंगली हतींच्या कळपाच्या पाठलागावर आलेल्या वनविभागाच्या लोकांना नदिच्या मधोमध ईतकं संपन्न अरण्य पाहून धक्काच बसला. बेटावर मुलईचा शोध घेतल्यावर जुन्या वन अधिका-यांना त्याची ओळख पटली. जवळपास पंचवीस वर्षापुर्वी वनवीभागाने हाती घेतलेल्या एका योजनेसाठी काम करणारा एक साधा मजुर आपलं आयुष्य खर्ची घालतो, आणि हजारो एकरामध्ये एकहाती ईतक्या भव्य अरण्याची निर्मीती करतो, हा त्यांच्यासाठी कुतुहलाच तसाच अभिमानाचा विषय झाला. वनवीभागाच्या गस्ती मग या भागात वाढू लागल्या. गेंड्याची शिकार करणा-यांचं रॅकॅटच या भागात कार्यरत आहे. मुलईच्या मदतीने त्यांना या शिका-यांनाही अटक करता आली. सुंदरबन बघायला येणा-या पर्यटकांसाठीही 'मुलई कथोनी' हे 'हॅपनींग डेस्टीनेशन' बनलं. ब्रिटिश डॉक्युमेन्ट्रीकार टॉम रॉबर्ट याने या जंगलात काही काळ राहून एक अप्रतीम माहितीपटही बनवला. त्यामाध्यमातून मुलईचं नाव आणि कार्य जगभर माहिती झालं. बाहेर देशातल्या एनजीओ आणि जंगलप्रेमींनी चौकशी केल्यावर मग ओरीसा सरकारलाही जाग आली. मुलईच्या कार्याची दखल घेत त्यांनी त्याचा गौरव केला. निसर्ग रक्षणाच्या गोष्टी करणा-या आणि भाषणे देणा-या पेज थ्री 'ईनव्हायर्नमेन्ट ऍक्टीव्हीस्टस' लोकांपेक्षा आपल्या कर्तृत्त्वाने आदर्श घालून देणा-या मुलईला आज देश विदेशांतून मार्गदर्शनासाठी बोलावलं जातंय. पण आपलं जंगल सोडून कुठेही जायला तो तयार नाही. सरकार आणि वनवीभागाने 'मुलई कथोनी' च्या संरक्षणाची संपुर्ण जबाबदारी घेतली, तर आपण देशातल्या ईतर ठीकाणी जाऊनही अरण्यनिर्माणाचा प्रयोग करू शकतो, असा त्याला विश्वास आहे. त्यासाठी या जंगलाला अभयारण्य घोषित करण्याची नितांत आवश्यकता आहे. सरकारी स्तरावर सरकारी गतीने ते प्रयत्न सुरू आहेत, पण मुलईचं त्याच्याशी काहीही देणंघेणं नाही. जगभर आज वसुंधरा दिवस साजरा होत असतांना आपल्या अवघ्या आयुष्याचाच वानप्रस्थ करून दररोजच वसुंधरा दिवस साजरा करणा-या या अवलीयाचं अरण्यक असंच सुरू राहणार आहे. जे असतील त्यांच्यासह, जे नसतील त्यांच्याशिवाय!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
तंत्र
राहणी
भूगोल
देशांतर
राहती जागा
शिक्षण
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
शुभेच्छा
अभिनंदन
माध्यमवेध
लेख
बातमी
अनुभव
मत
शिफारस
सल्ला
माहिती
चौकशी
वाद

प्रतिक्रिया द्या
47726 वाचन

💬 प्रतिसाद (87)

प्रतिक्रिया

सुंदर माहिती.

सुधीर
Tue, 08/20/2013 - 09:45 नवीन
सुंदर माहिती. धन्यवाद!
  • Log in or register to post comments

अप्रतिम लेख

जुइ
Fri, 08/23/2013 - 22:27 नवीन
अप्रतिम लेख आणि कल्पनाही करू शकत नाही असे काम केलेल्या व्यक्ति ची ओळख करुन दिल्याब्दल अनेक धन्यवाद!!
  • Log in or register to post comments

खुप सुंदर आणि माहितीपुर्ण लेख

Mrunalini
Mon, 08/26/2013 - 16:23 नवीन
खुप सुंदर आणि माहितीपुर्ण लेख.. खरच त्याच्या कार्याला सलाम!!
  • Log in or register to post comments

अत्यंत माहितीपुर्ण लेख !

किलमाऊस्की
Mon, 08/26/2013 - 22:08 नवीन
हे कार्य आमच्यापर्यंत पोचवल्याबद्द्ल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

सलाम या महामानवाला

रानवेडा सचिन
Sat, 08/31/2013 - 16:08 नवीन
सलाम या महामानवाला अश्या निसर्गप्रेमींची खरच खुप गरज आहे.
  • Log in or register to post comments

सलाम!! __/\__

मोदक
गुरुवार, 09/05/2013 - 01:55 नवीन
सलाम!! __/\__
  • Log in or register to post comments

*****

जेपी
Tue, 09/10/2013 - 10:31 नवीन
*****
  • Log in or register to post comments

*****

जेपी
Tue, 09/10/2013 - 10:31 नवीन
*****
  • Log in or register to post comments

goosebumps !!

शिल्पा ब
Tue, 09/10/2013 - 22:12 नवीन
goosebumps !!
  • Log in or register to post comments

खूप दिवसांनी मिपावर आलो

निनाद मुक्काम …
Fri, 09/13/2013 - 17:20 नवीन
खूप दिवसांनी मिपावर आलो हा लेख पाहून मी मिपावर इतके दिवस का नाही आलो ह्याबद्दल स्वतःला बोल लावले
  • Log in or register to post comments

धन्यवाद यशोधरा

मनिष
Wed, 04/30/2014 - 13:06 नवीन
हा फार म्हणजे फारच आश्वासक लेख आहे! ह्या माणसाविषयी कुठेतरी वाचल्याचे आठवते..पण हा सविस्तर लेख खुपच आवडला. फारसे प्रतिसाद मिळाले नाही म्हणून फार वाईट वाटायची गरज नाही. प्रतिसाद काय पुणे Vs. xyzपुर वरच्या कुठल्याही धाग्याला मिळतील...पण असे लेख आणि ती माणसे लक्षात राहतात, ते महत्वाचे नाही का?
  • Log in or register to post comments

परवा पैसाताईने फेसबुकवर लिंक

यशोधरा
Wed, 04/30/2014 - 19:50 नवीन
परवा पैसाताईने फेसबुकवर लिंक शेअर केली होती. तिथेफेबुआवर spiritual ecology असे सर्च करा, त्यांच्या भिंतीवर सापडेल. त्यावरुनच खाली दिलेला उतारा कॉपी केला आहे- Indian man single-handedly plants a 1,360-acre forest (and changes the story) Jadav Payeng turned a barren sandbar in northern India into a lush new forest ecosystem. A little more than 30 years ago, a teenager named Jadav "Molai" Payeng began burying seeds along a barren sandbar near his birthplace in northern India's Assam region to grow a refuge for wildlife. Not long after, he decided to dedicate his life to this endeavor, so he moved to the site so he could work full-time creating a lush new forest ecosystem. Incredibly, the spot today hosts a sprawling 1,360 acres of jungle that Payeng planted — single-handedly. The Times of India recently caught up with Payeng in his remote forest lodge to learn more about how he came to leave such an indelible mark on the landscape. It all started way back in 1979, when floods washed a large number of snakes ashore on the sandbar. One day, after the waters had receded, Payeng, only 16 then, found the place dotted with the dead reptiles. That was the turning point of his life. "The snakes died in the heat, without any tree cover. I sat down and wept over their lifeless forms. It was carnage. I alerted the forest department and asked them if they could grow trees there. They said nothing would grow there. Instead, they asked me to try growing bamboo. It was painful, but I did it. There was nobody to help me. Nobody was interested," says Payeng, now 47. While it's taken years for Payeng's remarkable dedication to planting to receive some well-deserved recognition internationally, it didn't take long for wildlife in the region to benefit from the manufactured forest. Demonstrating a keen understanding of ecological balance, Payeng even transplanted ants to his burgeoning ecosystem to bolster its natural harmony. Soon the shadeless sandbar was transformed into a self-functioning environment where a menagerie of creatures could dwell. The forest, called the Molai woods, now serves as a safe haven for numerous birds, deer, rhinos, tigers and elephants — species increasingly at risk from habitat loss. Despite the conspicuousness of Payeng's project, forestry officials in the region first learned of this new forest in 2008 — and since then they've come to recognize his efforts as truly remarkable, but perhaps not enough. "We're amazed at Payeng," says Gunin Saikia, assistant conservator of Forests. "He has been at it for 30 years. Had he been in any other country, he would have been made a hero."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष

सलाम...

बाबा पाटील
Wed, 04/30/2014 - 13:30 नवीन
या माणसाच्या चिकाटीला अन जिद्दीला सलाम.
  • Log in or register to post comments

शब्दच नाहीत!

उदय के'सागर
Wed, 04/30/2014 - 15:18 नवीन
शब्दच नाहीत! खुप खुप धन्यवाद इथे शेअर केल्याबद्दल.
  • Log in or register to post comments

असामान्य

मधुरा देशपांडे
Wed, 04/30/2014 - 19:44 नवीन
असामान्य कार्य आहे हे. लेख आवडलाच. आपल्या आजूबाजूची झाडे टिकवून ठेवण्यात आणि अगदी घरातल्या बागेत काही नवीन वाढवण्यात जरी यश आले तरी अंश रूपाने त्यांच्या कार्याला मदत होईल.
  • Log in or register to post comments

असामान्य..

चिगो
गुरुवार, 05/01/2014 - 09:58 नवीन
सालं घरासमोरच "गार्डन" वाढवायला जमत नाही आम्हाला, आणि हा ग्रेट माणूस जंगल निर्माण करतो? ग्रेटच !! जादव पायेंगच्या जिद्दीला सलाम..
  • Log in or register to post comments

+१

सखी
Tue, 05/06/2014 - 22:03 नवीन
असचं म्हणते. यशोधरा लेख वरती काढल्याबद्दल तुझेही आभार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

प्रेरणादायी

सुवर्णमयी
Fri, 05/02/2014 - 01:55 नवीन
लेख आवडला.
  • Log in or register to post comments

अविश्वसनिय कामगिरी

श्रीरंग_जोशी
Fri, 05/02/2014 - 02:28 नवीन
जादव पायेंग यांची अविश्वसनिय कामगिरी येथे मांडल्याबद्दल अनेक धन्यवाद.
  • Log in or register to post comments

एक आवाहन करावंसं वाटतं...

बहुगुणी
Fri, 05/02/2014 - 03:15 नवीन
जादव पायेंग विषयीचा हा व्हिडिओ; ४:१५-४:३५ या वेळात लक्ष देऊन पहा, रोमांच उठतील... दोन वर्षांपूर्वी या लेखावर पहिली प्रतिक्रिया दिली होती, अजूनही वाचकांना हा लेख वाचावासा वाटतो यातच बरंच काही आलं. पण या निमित्ताने एक आवाहन करावंसं वाटतं... मिपाकर जगभरात अनेक ठिकाणी कट्टे करतात. प्रत्येक कट्टेकर्‍याने येतांना एक रोपटं घेऊन यावं, आणि कट्ट्यानंतर जवळच्या मोकळ्या सार्वजनिक बागेत / जमिनीत (किंवा घर / हॉटेल मालकाची परवानगी असेल तर चक्क घराबाहेरच्या / हॉटेलाबाहेरच्या मोकळ्या जागेत) ही रोपं लावावीत. कुणास ठाऊक, कल्पना पटली आणि प्रत्यक्षात आली तर भविष्यात अगदी जादव पायेंगचं जंगल नाही तरी जगभरात बरीचशी मिपा-मिनी-उद्यानं तयार होतील :-)
  • Log in or register to post comments

(य)

डावखुरा
Tue, 05/06/2014 - 20:46 नवीन
(य)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

अलौकिक कामगिरी

बबन ताम्बे
Wed, 05/07/2014 - 20:11 नवीन
अलौकिक कामगिरी. सलाम या महापुरुषाला !!
  • Log in or register to post comments

जादेव पायेंग

भ ट क्या खे ड वा ला
Tue, 07/15/2014 - 18:35 नवीन
नुकतेच १३ वे गिरिमित्र संमेलन महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड येथे संपन्न झाले. जादेव पायेंग हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या निमित्ताने ज्या भटक्यांना त्यांच्या बद्दल माहिती नव्हती त्यांना अगदी जवळून त्यांच्याशी मोडका तोडका का होईना संवाद साधता आला. त्यांच्या अफाट कार्याची माहिती सर्वाना झाली. मिपावरील आपल्या लेखामुळे त्यांना भेटण्याची उत्कंठा निर्माण झाली होती ती पूर्ण झाली. मिपाला आणि आपल्याला मनापासून धन्यवाद.
  • Log in or register to post comments

नशिबवान आहात, हेवा वाटला!

बहुगुणी
Tue, 07/15/2014 - 20:13 नवीन
गिरिमित्र संमेलनाविषयीही लिहा, वाचायला आवडेल. थोडंसं संबंधितः कालच एक विरोप वाचायला मिळाला; त्यानुसार 'कल्पवृक्ष' ही संस्था 'सह्याद्री - एक अनमोल ठेवा' हे ४०० पानी पुस्तक प्रकाशित करण्याच्या मार्गावर आहे, प्रत्येकी २०० रुपये किंमतीस हे उपलब्ध असेल. याविषयीची आधिक माहिती विरोपातून खाली देतो आहे (ज्यांना या प्रकाशन प्रकल्पात काही मदत करण्याची इच्छा आहे त्यांनी माझ्याशी व्यनितून संपर्क केला तर त्यांची प्रकल्प-चालकांशी इ-गाठ घालून देउ शकेन): We are happy to announce that our Marathi handbook on the Sahyadri region of Maharashtra - "Sahyadri - Nisargacha Anmol Theva" is ready to go to print. The mountain ranges of the Western Ghats of Maharashtra – popularly known as the Sahyadris – is a unique landscape which harbours a huge variety of plant and animal life, some which are not found anywhere else in the world. They support several tribal groups which are leading traditional lifestyles. Due to rapid urbanization, there are several threats which are impacting the region. There are steps being taken by the government as well as communities to reduce these impacts, and to conserve the region. This book offers information on various aspects like ecosystems, biodiversity, threats and conservation measures with specific focus on the Sahyadri region in Maharashtra.An effort has been made to simplify scientific concepts as far as possible for a layperson’s understanding. Visually attractive with photos and illustrations, the book also contains sample activities after every chapter which could be adapted by users according to their context.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भ ट क्या खे ड वा ला

सह्याद्री - एक अनमोल ठेवा

यशोधरा
Fri, 01/01/2016 - 21:33 नवीन
सह्याद्री - एक अनमोल ठेवा प्रकाशित झाले का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

उपलब्धता, थोडी माहिती, PDF Sampler

बहुगुणी
Wed, 01/13/2016 - 02:15 नवीन
उपलब्धता: BNHS India: http://bnhs.org/bnhs/index.php?option=com_virtuemart&view=productdetails&virtuemart_product_id=244&virtuemart_category_id=13&Itemid=652 बुकगंगा: http://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5722580869706533510 Sahyadri - Nisargacha Anmol Theva Rs. 490/- 200pgs all photos in colour Published by Sakaal Papers in Marathi कल्पवृक्षच्या दुव्यावरून थोडी माहिती: This handbook on the Sahyadri region of Maharashtra focuses on mountain ranges of the Western Ghats of Maharashtra , popularly known as the Sahyadri s , forming a unique landscape which harbours a huge variety of plant and animal life, some which are not found anywhere else in the world. They support several tribal groups which are leading traditional lifestyles. Due to rapid urbanization, there are several threats which are impacting the region. There are steps being taken by the government as well as communities to reduce these impacts, and to conserve the region. This book offers information on various aspects like ecosystems, biodiversity, threats and conservation measures with specific focus on the Sahyadri region in Maharashtra. An effort has been made to simplify scientific concepts as far as possible for a layperson’s understanding. Visually attractive with photos and illustrations, the book also contains sample activities after every chapter which could be adapted by users according to their context. The book will be of interest to teachers, environment educators, the government officials (specially Education dept, Forest Department, and Tribal department), wildlife tourists, groups involved in tourism, NGOs and concerned individuals. We would be happy to give a discount on bulk order (above 5) or if there is genuine need for a concession (for e.g. use in a rural school). PDF Sampler (A selection of random pages): http://kalpavriksh.org/images/Publications/Sahyadribooksampler.pdf
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

धन्यवाद, हो, मध्यंतरी पगमार्क

यशोधरा
Wed, 01/13/2016 - 09:54 नवीन
धन्यवाद, हो, मध्यंतरी पगमार्क संस्थेनी पुरस्कृत केलेले एक प्रदर्शन पाहिले होते, तिथे ते पुस्तक पाहिले मी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

या गिरिमित्र संमेलनाच्या

ज्ञानोबाचे पैजार
Wed, 07/16/2014 - 12:17 नवीन
या गिरिमित्र संमेलनाच्या निमित्ताने जादेव पायेंग यांची म.टा. मधे प्रसिध्द झालेली मुलाखत. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भ ट क्या खे ड वा ला

हाच दुवा द्यायला शोधत होरे,

यशोधरा
गुरुवार, 07/17/2014 - 04:58 नवीन
हाच दुवा द्यायला शोधत होरे, पैजारबुवा, धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

वा! कित्येक शतके टिकणारा

असंका
Mon, 09/22/2014 - 18:00 नवीन
वा! कित्येक शतके टिकणारा वारसा!! केवढे हे कर्तृत्व!! (लेख सुचविल्याबद्दल स्वॅप्स यांचे आभार!)
  • Log in or register to post comments

माहितीपूर्ण!!

सूड
Tue, 09/23/2014 - 22:38 नवीन
माहितीपूर्ण!!
  • Log in or register to post comments

अप्रतिम

भंकस बाबा
Sat, 01/02/2016 - 00:47 नवीन
अप्रतिम लेख,
  • Log in or register to post comments

अफलातून!

बोका-ए-आझम
Sat, 01/02/2016 - 13:07 नवीन
एका अवलियाबद्दल तितक्याच संवेदनशीलपणे लिहिलेला लेख!
  • Log in or register to post comments

__/\__

नीलमोहर
Sat, 01/02/2016 - 14:04 नवीन
सलाम !!
  • Log in or register to post comments

झाडं लावणारा माणूस

भाते
Sun, 01/03/2016 - 10:50 नवीन
आजच्या मटामध्ये आलेला लेख
  • Log in or register to post comments

अत्यंत मोलाचे कार्य !

कविता१९७८
Wed, 01/13/2016 - 08:50 नवीन
अत्यंत मोलाचे कार्य ! सुंदर माहिती.
  • Log in or register to post comments

सुदंर लेख

छोटा चेतन-२०१५
Wed, 03/29/2017 - 12:45 नवीन
सुदंर लेख
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा