✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग ९)

च
चतुरंग यांनी
Fri, 08/22/2008 - 00:37  ·  लेख
लेख

Book traversal links for मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग ९)

  • ‹ मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग ८)
  • Up
  • मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग १०) ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9182 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

न
नंदन Fri, 08/22/2008 - 00:40 नवीन

वेलकम

ब्याक! (वाचून प्रतिक्रिया लिहितोच. त्याआधी वेलकम ब्याक लिहावेसे वाटले :))

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Fri, 08/22/2008 - 00:42 नवीन

+१

हेच म्हणतो. एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या वातावरणात काहीतरी सुरेख , नवे , दर्जेदार मिळावे या सारखी दुसरी उत्तम गोष्ट नाही ! रंगरावांनी या आपल्या मालिकेला यज्ञाची उपमा दिली ती मोठी समर्पक आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
न
नंदन Fri, 08/22/2008 - 00:50 नवीन

मस्त

टिप्पणी, वर्णन, अनुवाद - सारेच आवडले. घन श्यामल चे मेघसावळ्या, रक्तिम रक्ताचे लालबुंद रुधिर हा खास मराठमोळा भावानुवादही मस्त. फक्त पहिल्या कडव्यातील शेवटच्या ओळीचा अनुवाद - श्रोत्यांना स्वरपान करविते, झंकृत वीणा मधुशाला - असे केले तर चालेल का?

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 08/22/2008 - 01:08 नवीन

नंदन,

प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. श्रोत्यांना स्वरपान करविते, झंकृत वीणा मधुशाला हे नक्कीच चालेल. पण मी 'करी मग' ह्या शब्दांमुळे अनायासे झालेला श्लेष तसाच ठेवला होता! (करी मग = मग हातात आणि करी मग = मग करीतसे ह्यानुसार) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
ध
धनंजय Fri, 08/22/2008 - 01:04 नवीन

वाहावा

देर है म्हणजे अंधेर नाही! ब्राव्हो! ब्राव्हो! ब्राव्हो! ४२, ४४, ४५ अप्रतिम जमल्या आहेत. ४५वी रुबाई या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने कालानुरूपच आहे. छिद्रान्वेष : ४१: भरुनि तार्‍यांचा प्याला - तारांचा प्याला, असे असावे. वीणेच्या तारा, तारे नव्हे. हिंदीत विक्रेत्याच्या संकेतावर रागिण्या लयीत आणि आलापांत दौडत असाव्यात. रागिनियाँ ... लयों आलापों में दौड़ ... श्रोतागणको पान कराती । असा वाक्याचा अन्वय असावा. पण धावणारे लय आणि आलाप अशी तुमची कल्पनाही काही वाईट नाही. - ४३: मेघसावळ्या द्राक्षवेलीतुन खेचुन बनते बघ हाला कोमल-अरुण-किरण करांनी, भरती सुमनांचा प्याला, बनुनी साकी झुळुका येती पुन्हा पुन्हा मधु घेऊन तो, हंस मत्त मग पिऊनी होती मानसरोवर मधुशाला ॥४३॥ मराठीतले रूपक समजले नाही :-( हिंदीतले असे काही समजले. द्राक्षवेल = गडद रंगांचे ढग मदिरा = मानसरोवराचे पाणी प्याला = अरुण=लाल रंगाची कमळे साकी = मत्त झुळका ?लहरी मतवाला = हंस मधुशाला = मानसरोवर - ४३ मध्ये "द्राक्षवेलींतून", ४५ मध्ये "शूरवीरांच्या" १-१ मात्रा अधिक झाली आहे.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 08/22/2008 - 01:21 नवीन

धन्याशेठ,

नेहेमीप्रमाणेच चपखल! तारांचा प्याला, असे असावे. वीणेच्या तारा, तारे नव्हे येस, ही धडधडीत चूक आहे! अनुवाद करतांना अजिबात लक्षात आली नाही! धन्यवाद. मेघसावळ्या द्राक्षवेलीतुन खेचुन बनते बघ हाला कोमल-अरुण-किरण करांनी, भरती सुमनांचा प्याला, बनुनी साकी झुळुका येती पुन्हा पुन्हा मधु घेऊन तो, हंस मत्त मग पिऊनी होती मानसरोवर मधुशाला ॥४३॥ मराठीतले रूपक समजले नाही मी घेतलेला अर्थ असा - द्राक्षवेल = गडद रंगांचे ढग मदिरा = मानसरोवराचे पाणी प्याला = लाल रंगाची अरुणप्रभा घेणारी फुले साकी = मत्त झुळका, लहरी मतवाला = हंस मधुशाला = मानसरोवर 'प्याला' ची व्याख्या मी समजलो ती तुमच्यापेक्षा वेगळी आहे. चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
प
प्राजु Fri, 08/22/2008 - 01:12 नवीन

किती

किती बरं वाटलं.. म्हणून सांगू चतुरंग तुम्हाला!!! खूप वाट पहायला लावलीत. असो.. हा अनुवादही तितकाच सुंदर आणि तरल झाला आहे. मेघसावळ्या द्राक्षवेलीतुन खेचुन बनते बघ हाला कोमल-अरुण-किरण करांनी, भरती सुमनांचा प्याला, काय कल्पना आहे.. खास!! पण हिमश्रेणि... च्या जागी मेघ ठिक आहे का?? की, हिमरांगा किंवा हिमालय असे काहिसे?? शूरवीरांच्या रुधिराची त्या लालबुंद बनते हाला मृत्युंजय त्या शूरशिरांचा घेऊन हाती जणू प्याला दानशूर अन उदार साकी बनुनी मग भारतमाता तृषित कालिका स्वतंत्रदेवी, अन बलिवेदी मधुशाला ||४५|| अत्युच्च!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 08/22/2008 - 01:15 नवीन

चुकलं चुकलं..

तुमचं बरोबर आहे... हिमशिखरे.. आणि मेघ सावळा.. वाचताना चूक झाली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
व
विसोबा खेचर Fri, 08/22/2008 - 06:49 नवीन

शूरवीरांच

शूरवीरांच्या रुधिराची त्या लालबुंद बनते हाला मृत्युंजय त्या शूरशिरांचा घेऊन हाती जणू प्याला दानशूर अन उदार साकी बनुनी मग भारतमाता तृषित कालिका स्वतंत्रदेवी, अन बलिवेदी मधुशाला ||४५|| वा! सुरेख... 'वेलकमब्यॅक' असे नंदनसारखेच म्हणतो....! जियो चतुरंगा....! (मधुशालाप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
र
रामदास Fri, 08/22/2008 - 07:48 नवीन

सार्थकी

लागले वाट बघणे.आज सकाळीच हंस मत्त झालो. हा घाईत लिहीलेला प्रतिसाद आहे. संध्याकाळी ऑन द रॉक्स हंस मत्त होऊन परत वाचतो.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Fri, 08/22/2008 - 13:19 नवीन

वा..

वाट पहायला लावलीत चतुरंग.. पण त्याचे सार्थक झाले.. अनुवादाचा हा भागही सरस झाला आहे. स्वाती
  • Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे Fri, 08/22/2008 - 19:21 नवीन

क्या बात है

उत्तम भावानुवाद. सर्वच कडवी आवडली.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Fri, 08/22/2008 - 20:05 नवीन

वाहवा !

फार उत्तम भाग ! आनंद झाला. अवांतर : अचपल हा शब्द कसा काय बनला आहे? रामदासांनी सुद्धा करुणाष्टकात 'अचपल मन माझे । नावरे आवरिता ॥ असे म्हटले आहे ते अचपल = चंचल याच अर्थी. चपला म्हणजे वीज (?). अचपल म्हणजे निश्चल असा अर्थ न बनता चपळ / चंचल असा अर्थ कसा बनतो? जाणून घ्यायची अनेक दिवसांपासून उत्सुकता आहे. इथे तो शब्द पाहिला म्हणून विचारतो आहे. विषयांतर वाटल्यास क्षमा करा. आणि कृपया खरडवहित सांगा ही विनंती. -- (मत्त हंस) लिखाळ.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 08/22/2008 - 20:16 नवीन

लिखाळ आपण बारकाईने वाचन केले आहेत ह्याचा पुरावा!

धन्यवाद! मराठीत 'अ' हा उपसर्ग म्हणून वापरला जातो जसे अनर्थ, अभाव , अकारण , अनैतिक, अज्ञान इ. (ह्यात विरुद्ध अर्थ तयार होतो) ह्या खेरीज "अ" अति याअर्थानेसुद्धा वापरला जातो जसे आपण दिलेले उदाहरण "अचपल मन माझे।नावरे आवरीता"(करुणाष्टक) अगणित, असंख्य, अजय, अजेय इ. चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
ल
लिखाळ Fri, 08/22/2008 - 20:25 नवीन

आभार

चतुरंगराव, त्वरित उत्तरासाठी आभार. शंका अजून फिटली नाहीये. विषयांतर टाळण्यासाठी मी खरडवहित लिहितो. आपला, --लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
ध
धनंजय Fri, 08/22/2008 - 20:26 नवीन

सहमत, बारीक फरक

सहमत. "विरुद्ध" आणि "अति" हे संदर्भानुसार अर्थ आहेत. फरक : गणित, असंख्य, अजय, अजेय येथेही 'अ' चा उपयोग 'विरुद्ध' अर्थानेच होत आहे. अ-गणित म्हणजे ज्याचे गणित नाही, अ-जेय म्हणजे जेय नाही, वगैरे. "अति" या अर्थाने मला फक्त अचपळ हे एकच उदाहरण आता आठवते आहे. :-( कदाचित "अपरोक्ष" शब्दाची अति-परोक्ष अशी नवी मराठी व्युत्पत्ती देता येईल. 'अचपल' सारखा याही शब्दाचा मराठी अर्थ संस्कृत अर्थाच्या उलट आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
ल
लिखाळ Fri, 08/22/2008 - 20:32 नवीन

आभार.

धनंजय, आभार. वर चतुरंग म्हणतात त्यात अजय वगैरे उदाहरणे सुद्धा विरुद्ध अर्थीच आहेत हे आपण म्हटलेच आहे. अति या अर्थाने अजून कोणताच शब्द मला सापडलेला नाही. "अपरोक्ष" शब्दाची अति-परोक्ष अशी नवी मराठी व्युत्पत्ती देता येईल. खरे आहे.. नवी मराठी व्यत्पत्ती हा मार्ग चांगला आहे :) --लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
ऋ
ऋषिकेश Fri, 08/22/2008 - 20:20 नवीन

सलाम! -('मिसळ

सलाम! -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sat, 08/23/2008 - 03:01 नवीन

मधुशालेच्या मयखान्यात

रंगलेल्या सर्व रसिकांचे आभार! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
म
मनीषा Sat, 08/23/2008 - 13:24 नवीन

सुंदर!!!

--- बनुनी साकी रागिणि येती भरुनि तार्‍यांचा प्याला --- हंस मत्त मग पिऊनी होती मानसरोवर मधुशाला सुंदर..!! हरिवंशराय यांचे काव्य तर सुंदर आहे... पण भावनुवाद छानच
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा