विदेशी चित्रपटात सकस कथा, स्पष्ट व्यक्तिचित्रण व अतिप्रगत छायालेखन यांचा संगम अनेक वेळा दिसून आलेला आहे. या सर्व व्यक्तिचित्रणात चार्ली चाप्लीन यांचा ट्रॅम्प, ब्रॅम स्टोकर यांचा काउंट ड्राक्युला , इयान फ्लेमिंग यांचा जेम्स बॉण्ड व स्टीव्हन स्पीलबर्ग यांचा इंडियाना जोन्स हे लोकप्रिय आहेत. ५० वर्षे टिकून जेम्स बॉन्ड याने त्यात आघाडी घेतली
आहे यात शंकाच नाही.
नुकताच प्रदर्शित झालेला "स्कायफॉल" हा॑ चित्रपट कथेत जरा कमी असला तरी फोटोग्राफी , अभिनय, व्यक्तिचित्रण यात सरस ठरलेला आहे. पूर्वी दुखावलेला एक ब्रिटिश गुप्तहेर आता सायबर टेररिस्ट झालेला आहे. व एम या
अधिकार्याच्या मौतीसाठी त्याने विडा उचललेला आहे. त्याची माणसे व एम आय ६ या गुप्तहेर खात्याच्या निष्टावंताचा हा॑ संघर्ष.
स्कायफॉल हे जेम्स बॉन्ड लहानपणी ज्या वास्तूत वाढला त्या स्कोटलंडमधील एकांत जागी असलेल्या एका तिमजली घराचे नाव आहे.त्या घरातच या आपल्या " घरातील शत्रूचा " शेवट व्हावा या उद्देशाने जेम्स बॉन्ड त्याला व त्याच्या टोळक्याला त्या घरा़कडे खेचून आणतो .
एका मह्त्वाच्या हार्ड ड्राईव्ह शोध घेत असता बॉन्ड एका इसमाचा पाठलाग करीत असतो.या चित्तथरारक प्रसंगाने चित्रपटाची सुरूवात होते. ( हा प्रसंग आपल्या भारतातील कॅसलरॉक या स्थानकानजिकच्या पुलावर चित्रित होणार होता.) या चित्रपटातील हे चित्रिकरण तुर्कस्तानात झाले आहे. इस्तम्बूल मधील मार्केटच्या छपरावरून केलेला मोटारसायकलचा
पाठलाग अंगावर शहारे आणतो.पुढे एका आणीबाणीच्या काळी एम ने घेतलेल्या निर्णयात चुकून बोंन्डला गोळी लागते .
बॉन्ड बेपत्ता किंवा मृत असा कयास काढला जातो. पण नाराज झालेला बॉन्ड काही काळ अज्ञात स्थळी रहातो.
एम याना मारण्यासाठी " एम आय ६ च्या कार्यालयावर बॉम्ब स्फोट घडवून आणला जातो व कार्यालय एका जुन्या तळघरात हलवले जाते. दरम्यान ही बातमी बॉन्डला टीव्ही वरून समजते व तो एम याना येऊन भेटतो.त्यावेळी त्याचा व एम यांचा झालेला संवाद उत्कृष्ट अभिनयाने डेनियल क्रेग व जुडी डेंन्च यानी रंगविला आहे. आपला एक इतर सहकारी मेलरी याच्या विरोधाला न जुमानता बोंण्डला नव्या कामगिरीवर धाडण्यात एम यशस्वी होतात .. बॉन्डला टर्कीत गुंगारा देऊन पळालेला इसम काही कामासाठी शांघाई त येणार असल्याची खब्रर मिळते. बोंन्ड तेथवर पोहोचतो . त्या इसमाला एका उंच इमारतीवर गाठतो पण त्याकडून हवी माहिती मिळयापूर्वीच तो इसम मरणाला कवटाळतो. तिथे मिळालेल्या वस्तूच्या साह्याने माहिती मिळवून बोण्ड त्या इसमाच्या बोलाविता धनी कोण आहे हे शोधण्यासाठी मकाउ येथे जातो. तेथे त्याची एका महिलेशी गाठ पडते. आपण ज्याकडे नोकरीस आहोत तोच हा सारा दहशतीचा मामला घडवून आणत आहे व बॉण्डने त्यास ठार करावे या अटीवर ती त्याला एका बेटावर घेऊन जाते. या बेटावर इमारती आहेत पण वस्ती नाही अशी अवस्था असते. खलनायक राउल सिल्व्हा या इंडोनेशेयन सारख्या दिसणार्या दुरात्म्याशी बोण्डची गाठ पडते. त्याला हस्तगत करून बॉन्ड लंडनला परततो. दरम्यान एम यांच्या कारभाराची चौकशी चालू होते. व कैदेतील सिल्वा पळून जातो. मग लंडनच्या मेट्रो मधून त्याचा माग काढीत बोण्ड त्याला गाठणार तोच सिल्व्हा आपल्या रिमोटने मेटो ची आक्खी गाडी उध्वस्त करतो. व गायब होतो.
सिल्व्हाला आपली प्रत्येक हालचाल अगोदरच कळते हे कळल्यावर बोण्ड एम ना घेऊन सुनसान अशा त्याच्या बालपणीच्या घरी जातो. तेथे मर्यादित बंदुका असतात पण एम उपलब्ध सामग्रीतून स्फोटके निर्माण करतात. सिल्वा माग काढीत तेथे येतो .मग भन्नाट गोळीबारी झडते. त्यात सिल्व्हाची अनेक माणसे मारली जातात.बॉन्डचे घर सांभाळणारा माणूस एम ना घेउन भुयारी मार्गाने निसटतो. मग मोठा घनघोर धमाका करून बॉन्डही भुयारातून पळतो.
सरतेशेवटी यातूनही वाचलेला सिल्व्हा बोंडच्या चाकूहल्यात मरण पावतो . पण "गड आला पण सिंह गेला" अशी अवस्था एम आय ६ या युनिटची होते. या सार्या धुमश्चक्रीत एम मारल्या जातात.
बोन्डपटांच्या परंपरेला साजेशी लोकेशन निर्मात्यानी निवडली आहेत. यात पाठलाग मारामारी वगैरे घडत असताना पार्श्वभूमीवर लंडन , व इस्तम्बूल शहरांचे रम्य दर्शन घडत असते. चित्रपटात पटकथेचा आवश्यक भाग म्हणून रात्रीचे
लंडन, रात्रीचे शांघाई, रात्रीचे मकाउ दाखविणारे शॉट्स आहेत ते डोळ्याचे पारणे फेडणारे. एका बेटावर लोकानी रिकामे केलेले एक शहर दाखविले आहे . त्यात आर्ट डायरेक्टरची प्रशंसाच करावयास हवी.ब्रिटनमधील सरे परगण्यात तीन मजली घर बनावट निर्माण करून ते खरे वाटावे याची ही काळजी घेण्यात आर्ट डायरेक्टर ची कामगिरी दिसून येते.
नेहमीप्रमाणे एका धुंदफुंद गीतासह श्रेयनामावली ग्राफिक्स नयनमनोहर दर्शन घडविते.एम आय ६ च्या इमारतीतील स्फोट व ज्वाला कम्ब्बशन सारख्या सोफ्टवेअरच्या साह्याने निर्माण करण्यात आले आहेत. बाकी धडाकेवाज स्टंटस बद्द्ल काय बोलणार ? ते रुपेरी पडद्यावर प्रत्यक्श पहाणेच श्रेयस्कर !
अभिनयात डेनियल क्रेग( जेम्स बोन्ड) जुडी डेन्च ( मिसेस एम ) जेवियर बारडेम ( सिल्वा) ,राल्फ फ्लेनेस ( मेलरी)
यानी आपापली कामे उत्तम केली आहेत. काही भावनिक प्रसंग ही जेम्स बोन्ड च्या वाट्याला आले आहेत.
थोमस न्यूमन यांचे संगीत ही वाखणण्याजोगे आहे, स्काय फॉल हे गीत मस्त.
या सर्वांची मोट बांधण्याचे काम समर्थपणे केले आहेच ते दिगदर्शक सॅम मेडीस यानी. ते प्रचंड कौतिकास पात्र आहेत.
सरते शेवटी बोंन्ड पटाचा ५० वा वधीपनदिन असल्याचा उल्लेख आहे व निर्माते बार्बरा ब्रोकोली व मिचेल विल्सन तसेच
वितरक मेट्रो गोल्डविन मेयर व कोलंबिया पिक्चर्स यानी " Bond will return " चे आश्वासन दिले आहे .जेम्स बोण्ड च्या चाहत्याना याहून काय हवे ?
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
6882
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
बाँड पटांचा पंखा असल्याने या
बॉन्ड (Pierce Brosnan)बदलल्या
एकदम सहमत !
In reply to बॉन्ड (Pierce Brosnan)बदलल्या by मदनबाण
मस्त परिक्षण.
त्यातल्या तातियाना
In reply to मस्त परिक्षण. by प्रचेतस
हं
In reply to त्यातल्या तातियाना by मदनबाण
फोटो अत्यंत देखणा आहे
In reply to त्यातल्या तातियाना by मदनबाण
कोई शक :)
In reply to त्यातल्या तातियाना by मदनबाण
आवडला !
चौरा,
सगळी कथाच लिहीली की??
सगळी कथा ?
In reply to सगळी कथाच लिहीली की?? by मैत्र
यू आर डिसग्रेस टू युअर स्टिरिओटाईप क्रेग ! :)
In reply to सगळी कथा ? by चौकटराजा
सहमत
In reply to सगळी कथाच लिहीली की?? by मैत्र
आपल्या आवडत्या बॉन्ड ला मिसकॉल देऊन मत नोंदवा !
इ माल्को
+११११११
निशेढ..
अमृतराव,
In reply to निशेढ.. by अमृत
इथे सगळंच आहे
In reply to निशेढ.. by अमृत
सहजरावांचा हा धागा आठवला.http
चित्रपट परिक्षणे वाचण्या आधी
In reply to सहजरावांचा हा धागा आठवला.http by गणपा
चोप्य पस्ते
In reply to चित्रपट परिक्षणे वाचण्या आधी by जेनी...
हा सिनेमा पारंपारिक बॉण्डपट
अआ,