Skip to main content

हायटेक चितळे बंधू

लेखक आनंद भातखंडे यांनी शुक्रवार, 31/08/2012 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
एका शनिवारी भाच्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सहकुटुंब पुण्याला जायचा योग आला. पुण्याला गेलं की येताना काय खाऊ आणायचा असा प्रश्नच पडत नाही. चितळ्यांची बाकरवडी तर ठरलेली.मस्त कप भर चहा बरोबर १०-१२ बाकरवड्या कधी फस्त होतात तेच कळत नाही. माझी बहिण कोथरूडच्या Happy Colony मध्ये राहते.तिच्या घराजवळच चितळे बंधूंची शाखा आहे. संध्याकाळी ५ वाजता वाढदिवसाची सगळी तयारी झाली होती आणि वाढदिवस साजरा करण्यासाठी ६:३० वाजायच्या सुमारास सगळ्या बालगोपाळ मित्र मंडळीना बोलावले होते. संध्याकाळी ५:३० वाजता चितळ्यांच्या दुकानात ताजी बाकरवडी येते अशी ताजी बातमी कानावर पडली आणि दुकाना पर्यंत जायला पाऊले चळवळ करू लागली. अवघ्या ५ मिनिटात मी सपत्नीक चितळे बंधूच्या कोथरूड शाखे समोर येऊन थडकलो. या आधी पण तिथे गेलेलो असल्याने दुकान परिचयाचं होतं. पण त्या दिवशी मात्र बराच फरक/बदल जाणवत होता. दुकानात शिरण्यासाठी जो दरवाजा होता तिथे बरेच अडथळे ठेवलेले दिसले. किंबहुना फालतू, वेळकाढू किंवा उगीच “चवी पुरत्या” येणाऱ्या गिऱ्हाईकाला मज्जाव करण्यासाठी केलेली ही तरतूद असावी. ते अडथळे पार करून आत शिरणार तितक्यात दुकानाच्या बाजूला असलेल्या बोळकांडी वजा जागेतून आवाज आला ” अहो शुक् शुक्, इकडे या …प्रवेश इथून आहे”. त्यातच दुकानाच्या गल्ल्यावर बसलेल्या माणसाने आपली तर्जनी जमिनीला समांतर धरून वाटेकडे बोट दाखवले. मग लक्षात आलं पूर्वीचा मार्ग जो येण्या जाण्या साठी वापरला जायचा त्याचा आता एकदिशा मार्ग झाला होता. पुण्यातील शिस्तबद्ध वाहतुकीला अजून शिस्त लागावी म्हणून एखादा मार्ग अचानक पणे एकदिशा मार्ग घोषित करतात तेच सूत्र इथे पण लागू झालेले बघून मला जरा आश्चर्यच वाटले. कदाचित उगीच गिऱ्हाईकांची गर्दी वाढली असावी. मग परत त्या अडथळ्यातून बाहेर पडून त्या प्रवेश करण्याच्या जागे पर्यंत गेलो. “मग आधी नाही सांगता येत? जरा एक पाउल अजून पुढे पडले असते तर झालेला अपमान कुणी सहन केला असता? बाकरवडी विकत घ्यायला आलोय बाहेरून बरणीतले लाडू बघण्या साठी नाही” मी जरा तुसडेपणानेच विचारले. “इथे बरणीत लाडू ठेवत नाहीत. बरणीत सुकामेवा आहे” या त्याच्या थंड प्रतिक्रियेने मी सराईत पुणेकर आहे हे भासवण्याचा निरर्थक प्रयत्न फोल ठरला. आणि त्याच्या सकट सगळ्या दुकानाला कळले मी पुणेकर नसून ३/४ विजार घालून आलेला एक मुंबईकर आहे. आम्ही त्या प्रवेश दरवाज्यातून आत शिरणार तितक्यात या शुक् शुक् गृहस्थांनी परत थांबवले. मला वाटले इथे येणाऱ्या जाणाऱ्या गिऱ्हाईकाची झडती घेत असावेत असं समजून मी त्याच्या जवळ गेलो आणि कवायतीत करतात त्या प्रमाणे खांद्याच्या सरळ रेषेत हात करून उभा राहिलो. ते गृहस्थ तितक्याच थंडपणे म्हणाले “याची काही गरज नाही आणि अजून ही सिस्टीम चालू झालेली नाही” आणि त्याने माझ्या हातात चक्क एक पोस्टकार्डा किंवा शुभेच्छापत्रा पेक्षा थोडं मोठं प्याड वजा आयताकृती प्लायवूडचे फळकुट दिले. त्या वर कसली तरी स्क्रीन होती. तो जेंव्हा हीच अगम्य वस्तू माझ्या पत्नीला द्यायला लागला तेंव्हा मी म्हणालो “एकच पुरे आम्ही एकत्रच आहोत” परत कुणीही प्रतिप्रश्न करायचे धाडस करू नये अश्या ठसक्यात तो गृहस्थ म्हणाला “जो कुणी इथून आत जाईल त्याने हे बरोबर घेऊन जायचे आहे. आणि जाताना काउंटर वर परत द्या. काहीही खरेदी करताना आणि झाल्यावर हे बरोबर लागेल. तुम्हांला काहीही करायचे नाही फक्त मागितल्यावर हे कार्ड द्या”. एका हातात ते फळकुट ज्याला हे कार्ड म्हणतात ते घेऊन आम्ही उभयतांनी चितळे बंधूंच्या दुकानात एकदाचा प्रवेश केला. आमचा एक हात या फळकुटाने व्यापला होता त्यामुळे उरलेल्या एका हाताने जमेल इतकीच खरेदी करावी लागणार होती. गिऱ्हाईकांना कमीत कमी खरेदी करायला मिळावी, उगाच अनावश्यक वस्तू घेऊन पैश्याचा अपव्यय करू नये असा उदात्त हेतू केवळ पुण्यातच असू शकतो. दुकानात मस्त बाकरवडीचा घमघमाट सुटला होता. आत शिरल्या शिरल्या बाकरवडीच्या काउंटर जवळ गेलो. काउंटर वरचा माणूस एका मोठ्या क्रेट मधील बाकरवड्या पाव पाव किलो मोजून त्याचे हवाबंद पाकीट बनवत होता. मी पाव पाव किलोचे ४ पुडे बनवून देण्यास सांगितले आणि त्याने त्याचं तत्परतेने पुडे भरायला सुरुवात पण केली. मुंबईच्या सवयीने मी त्याला म्हणालो “आत्ता ५:३० ला जी ताजी येते तीच भर” हे वाक्य ऐकताच त्याने हातातले काम थांबवले आणि माझ्याकडे एकच पुणेरी कटाक्ष टाकला. मला वाटलं आता हा मला म्हणणार निघा …बाकरवड्या मिळणार नाहीत आणि वरून काहीतरी उपदेशाचे चार शब्द माझ्यावर फेकणार हे एखाद्या शेंबड्या पुणेकर पोराने देखील सांगितले असते. सौजन्य सप्ताह चालू आहे, कधी नव्हे ते येणाऱ्या गिऱ्हाईकाचा सन्मान करून त्याला दुर्मुख करू नये असा चेहेऱ्यावर सोज्वळ भाव आणून तो काउंटरवरचा पुणेरी दुकानदार मझी मंजुळवाणीने कानउघाडणी करू लागला “सकाळी आलेली बाकरवडी संध्याकाळी विकत नाही ….कारण ती विकण्यासाठी उरतंच नाही. इथे रोज सकाळ संध्याकाळी ताजा माल येतो. देऊ का? खात्री नसेल तर उद्या संध्याकाळी ५:३० वाजता क्रेट मोजायला या” सकाळच्या का संपतात म्हणजे कमी बनवता की विकल्या जातात असा खोडसाळ प्रश्न विचारण्याचे मुद्दाम टाळले आणि त्याला चार पुडे बांधून देण्याची विनवणी वजा आर्जव केलं. पटापट त्याने ४ पुडे भरले आणि म्हणाला “कार्ड द्या”. प्रवेश करताना दिलेल्या मोठ्या आयताकृती फळकुटाला कार्ड म्हणणं जरा हास्यास्पदच होतं. कार्ड कसलं ते कार्ड बोर्ड होता तो … तुमच्या दरवाज्यावरची पाटी लिहिता येईल इतका मोठा. “तुमच्या हातात आहे तेच कार्ड द्या. त्याच्या वर तुम्ही घेतलेल्या वस्तूंची नोंद होईल आणि पुढे याच कार्डचा उपयोग तुम्ही काय काय वस्तू घेतल्यात त्या प्रमाणे बिल बनवले जाईल. बिला प्रमाणे पैसे द्यावे लागतील.” मी परत एकदा त्या फळकुटाकडे बघितलं आणि ते “कार्ड” त्याला देता देता म्हणालो “अरे वा … एकदम अत्याधुनिक प्रणाली आहे तुमच्या कडे” त्याला बहुदा माझा खोचकपणा देखील कळला नाही किंवा माझं “प्रणाली” वगैरे पण त्याच्या डोक्यावरून गेलं. त्या सद्गृहस्थाने ते कार्ड माझ्याकडून खेचून घेतले आणि त्याच्याकडील मोजणी यंत्रावर ठेवले. त्यावर असलेली काही बटणे दाबून ते कार्ड मला परत दिले. मी त्या बाकरवडीच्या वासाने इतका अधीर झालो होतो की काउंटर सोडता सोडता मी बाकरवडीची एक पुडी फोडली. आणि त्यातली एक बाकरवडी उचलून तोंडात टाकणार इतक्यात बाकरवडी काउंटरवरचा इसम ओरडला “बिल बनवायच्या आगोदर इथे खाऊ नका.” आणि त्याच्या सुरात माझ्या बायकोने पण सूर मिसळला “तुला काही कळतं की नाही … लहान मुला सारखं इथेच काय पाकीट फोडून खायला सुरुवात केलीस?” दोन बोटांनी पकडलेली बाकरवडी तशीच पुडीत सोडून द्यावी लागली. पुढे लाडू, पेढे, बर्फी यांचा काउंटर होता. काय मस्त मस्त रंगांच्या बर्फ्या ठेवल्या होत्या … अगदी बघता क्षणी एक डिश भर घेऊन तिथेच फस्त कराव्याश्या वाटत होत्या. लाडूंची तर रेलचेल होती. मेथी लाडू, बुंदी लाडू, मोतीचूर लाडू, बेसन लाडू, रवा लाडू झालच तर डिंक लाडू … पण या सगळ्या लाडवांमधून “पौष्टिक” लाडूने माझे लक्ष वेधून घेतले. “हा पौष्टिक लाडू काय प्रकार आहे?” असे विचारताच त्या काउंटर वरील माणसाने पौष्टिक लाडू, त्याचे घटक, पौष्टीकतेचे परिमाण सविस्तर सांगितले. पाव किलो पौष्टीक लाडू घेतले आणि सराईतपणे कार्ड पुढे केले. परत ते कार्ड त्या मोजणी-नोंदणी यंत्रावर ठेवले गेले आणि त्या कार्डावर नोंद करून ते मला परत दिले. अजून बाकी काही चकणा आयटम नको ना असं विचारताच भर चितळ्यांच्या दुकानातच कुणाचाही मुलाहिजा नं ठेवता बायको म्हणाली “नको इथून नको. या पेक्षा चांगले आणि स्वस्त चकणे आपल्या डोंबिवलीला मिळतात तुझ्या त्या गुजराथ्याकडे मिळतात”. ती असं म्हणताच मी इकडे तिकडे बघायला लागलो आणि मेन काउंटर वरचा मालक माझ्या हावभावांकडे बघून मिश्किलपणे हसत होता. … अश्या काही प्रसंगावरून मला नेहेमी वाटतं की माझी बायको पूर्व जन्मीची पुणेकर असावी. ;) एका हातात सामान आणि दुसऱ्या हातात माझे आणि माझ्या बायकोचे कार्ड घेऊन मी सामानाचे पैसे देण्यासाठी शेवटच्या काउंटरवर आलो. कुठल्याही काउंटर वर गेलं की कार्ड पुढे करायचं हे माहीत झाल्यामुळे मी माझ्या हातातील दोन्ही कार्ड त्याच्या समोर धरली. त्याने त्यातले एक फळकुट घेतले आणि त्याच्या कडील मोजणी यंत्रावर ठेवले. ते बहुतेक बायकोच्या हातातले असल्याने त्या कार्डावर कुठलीही नोंद आढळली नाही. आधी मला वाटले वा …काहीच नोंद नाही म्हणजे काही तरी गल्लत झाली असणार आणि आता हा माल चकटफू मिळणार. “दुसरे कार्ड द्या” या मालकाच्या वाक्याने मी वास्तवात आलो. दुसऱ्या कार्डात सगळ्या नोंदी सापडल्या मालकाच्या चेहेऱ्यावर प्रसन्न भाव बघितले. किती झाले हे विचारायच्या आताच मालकाने त्याची तर्जनी संगणकाच्या पटलावर जिथे मोठ्या अक्षरात किंमत दिसत होती तिथे ठेवली. आणि त्याचं तर्जनीने बिल छापण्यासाठी असलेले बटन दाबले. छापील बिलाप्रमाणे रक्कम दिल्यावर मालक आदबीने म्हणाला “डोंबिवली मधून आलात का? बघा अजून काही नकोय ना?” मी म्हटलं “हो, डोंबिवलीहून आलोय. नको अजून काही नको” (आणि जरी हवं असेल तरी हा माणूस मला परत प्रवेश द्वारावर जाऊन फळकुट घेऊन यायला सांगेल”) “इथे प्लास्टिकच्या पिशव्या मिळणार नाहीत” अशी हुकुमावरून स्वरातील पाटी ठळकपणे दिसत असताना सुद्धा पिशवी आहे का? असे विचारले असते तर कदाचित त्याने बाकरवड्या काढून घेतल्या असत्या आणि मला रिकाम्या हाताने पाठवले असते या भीतीने मी पिशवी बद्दल विचारले नाही. पण काय आश्चर्य मालकांनी माझ्या कडून समान घेतले ते प्लास्टिकच्या पिशवीत भरले आणि ती पिशवी चेहेऱ्यावर स्मितहास्य ठेवून मला परत केली. मी परत एकदा ‘पिशवीचे किती झाले?’ हे विचारण्याच्या भानगडीत पडलो नाही कारण एकच भीती ….ताज्या बाकरवड्या हातून निसटल्या तर???

वाचने 30383
प्रतिक्रिया 203

प्रतिक्रिया

चितळेबंधूंच्या दुकानावर तुम्ही केलेल्या रोमहर्षक स्वारीचे वर्णन ठिकठाक जमले आहे. बाकरवडी आवडली की नाही ह्या बद्दल काहीच लिहिलेले नाही. ते लिहिले असते तर आणखी काही स्तुतीपर शब्द लिहिता आले असते. असो...

मला चितळे या संस्थेविषयी विलक्षण आदर आहे. लोक ज्याची टवाळी करतात तो तर्‍हेवाईकपणा वा कोणाला वाटत असलेला माज सहन करुनही लोक तिथेच का येतात हे विचार करण्यासारखे आहे. शुद्धता आणि गुणवत्तासातत्य हे चितळ्यांचे वैशिष्ठ्य आहे. नपेक्षा खंडोगणती हलवाई असताना आणि रांगेत उभे राहुन खरेदी करायला लोक इथेच का येतात? बाकरवडी आणि आंबा बर्फी खूप लोक बनवितात पण तरीही चितळ्यांच्या वस्तू त्या चितळ्यांच्या वस्तू. उगाच वजन भरल्यावरसुद्धा एखाद तुकडा पुड्यात टाकुन 'बघा आम्ही किती ग्राहकप्रेमी आणि दानशूर आहोत' असे भाव चेहेर्‍यावर आणायचे उद्योग चितळ्यांना करावे लागत नाहीत. किंबहुना जर तुमच्या मालाची गुणवत्ता उत्तम असेल तर तुम्हाला किंमत वा नाराजीची पर्वा करायला लागत नाही हे चितळ्यांनी सप्रमाण दाखवुन दिले आहे. त्यांची खरेदी नोंदपत्र पद्धत निदान भारतात व या क्षेत्रात तरी मी प्रथमच पाहिली - चोख व्यवहार. 'आणखी काय घेतलेत ?' असे अपमानकारक व अजागळ प्रश्न ग्राहकाला विचारण्यापेक्षा हे उत्तम. चितळ्यांचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे बासुंदीसारखा द्रवपदार्थ जर ग्राहकाने भांडे वा डबा नेला तरच दिला जातो. प्लास्टिकच्या पिशवीवर बंदी नसलेल्या काळातही तो तसा दिला जात नसे. कदाचित यामागे पिशवी अनवधानाने फुटुन अन्न वाया जाऊ नये असा विचार असावा. स्वतःच्या उत्पादनाईतका विश्वास कदाचित प्लास्टिकचे डबे पुरविणार्‍यांवर नसल्यामुळे असेल पण ते अशा पदार्थासाठी डबे ठेवत नाहीत हे खरे, नपेक्षा त्याचे वेगळे पैसे मोजायला ग्राहकाची ना नसावी. हा एक अपवास सोडता चितळे ग्राहकाभिमुख आहेत हे खरे. कुणाला 'रोख ठोक बोली पण चविष्ठ आणि चोख माला' पेक्षा 'मिठ्ठास बोली आणि सुमार माल' बरा वाटत असेल तर त्याने चितळ्यांकडे न जाणे बरे. बाकी लेखाविषयी बोलण्यासारखे काही नाही, अवांतराबद्दल क्षमस्व..

In reply to by सर्वसाक्षी

अतिशय टुकार लेख. चितळे हा आज एक यशस्वी ब्रँड आहे. चितळे म्हणाल्यावर पदार्थाची गुणवत्ता ही बरोबरीने येतेच. पण काय आहे ना, कि मोठ्या लोकांवर चिखलफेक केली की आसुरी आनंद होणारी एक कॅटेगरी असते. त्याला काहीच करु शकत नाही. जाता जाता एक उदाहरण म्हणुन सांगतो, चितळ्यांच्या आम्रखंडासारखी चव दुसरीकडे कुठेही पाहिली नाही. मुंबईत अनेक गुजराथी, मारवाडी आवर्जुन चितळ्यांचेच आम्रखंड घेतात. आज मुंबईतील अनेक दुकानदार चितळ्यांचे प्रॉडक्ट्स भरभरुन विकायला ठेवतात. चितळ्यांइतका टॅक्स किती हलवाई भरतात ? आ़णखीही ब-याच गोष्टी आहेत पण एकदा चितळ्यांवर डोकं बाजुला ठेवुन बिनबुडाचे आरोप करायचे म्हणाल्यावर बाकी सर्व स्पष्टीकरण व्यर्थ ठरते.

In reply to by अमोल खरे

सदर लेखात चितळे किंवा त्यांच्या दर्जावर कुठलेही आरोप केलेले नाहीत.

In reply to by अमोल खरे

बाकी चव वगैरे मुद्दे तसे ठीक पण
चितळ्यांइतका टॅक्स किती हलवाई भरतात ?
हे कुठून आलं मध्येच? की समर्थन करायचं म्हटल्यावर काहीही कैच्याकै मुद्दे उचलून धरायचे? या विधानाच्या पुष्ट्यर्थ काहीतरी विदा आहे की दिलं आपलं बिनबुडाचं ठोकून?

In reply to by सर्वसाक्षी

मी मुंबईचा असूनही चितळ्याचा आणि इतरही अनेक पुणेकर दुकानदारांचा माज मला आवडतो. कारण असा माज अनेक वर्षे मालाची खात्री असल्याशिवाय करता येत नाही. अनेक गुजराथी आणि मारवाडी दुकानदारांना दर्जाचे सातत्य टिकवता येत नाही हा माझा अनुभव. दुसरा नेहमी उल्लेखाला जाणारा मुद्दा म्हणजे १-४ दुकान बंद. आता दुपारी दुकान उघडे ठेवायला ते काय हॉस्पिटल आहे काय? डॉक्टरदेखील आपला दवाखाना दुपारी बंद ठेवतात. आपापल्या कार्यालयात work-life balance हवा, मग दुकानदाराने ३ तास ते बंद ठेवले तर एवढा काय कहर कोसळतो.

आम्ही दरवेळेस पुण्याला आलो की चितळ्यांच्या दुकानात जातो पण बाकरवडी खरेदी करत नाही. मोतीचुराचे अस्सल लाडु व लाडवाइतके मोठे केशरी पेढे !!! बाकरवडी का घेत नाही असे कधीही चितळ्यांनी आम्हास विचारले नाही.

उगाचच इतका मोठ्ठा पकाऊ लेख लिहिलाय!! खिल्ली उडवण्याच्या प्रयत्नात स्वतःचीच उडवून घेतलीये (पुणे १ - मुंबई ०)

एखाद्याने आपल्या मित्राची गंमतीत खेचावी इतपतच टीका, चेष्टा मूळ लेखकाने केलेली आहे. त्यात आकस वगैरे आढळला नाही. पण अनाहूतपणे चितळ्यांचा, सदाशिव पेठेचा आणि तमाम पुण्याचा मक्ता घेतलेले पुणेकर इतकी खुन्शी प्रतिक्रिया देताना बघून गंमत वाटली. बहुधा मुठेचे पाणी पिऊन असे आडमुठे लोक बनले असावेत. असो.

In reply to by हुप्प्या

@हुप्या, संपूर्ण प्रतिसादाशी सहमत. फक्त शेवटचे विधान अनावश्यक आणि भडकाऊ आहे.

नाही तरी "चितळे" काय मिपा वाचत नाहीत . ( मग द्या ठोकून "कल्पनाविलास " अनुभव) . आणि अतिशय महत्वाचे दुकानाची वेळ या बाबतचा सुधीर गाडगीळांचा लोकप्रभातला लेख वाचाच.

पुण्यातील लक्ष्मीनारायण बेस्ट चिवडा मला फार आवडतो. त्यासंबधी फोनवर चौकशी केल्यावर मालकांनी सांगितले कि हा चिवडा पुण्याबाहेर कुठेही विकला जात नाही आणि कुरिअरने पण पाठविला जात नाही. तरी चितळे यांचा चिवडा आणि लक्ष्मीनारायण चिवडा यांचा कुणी पुणेकराने तौलनिक अभ्यास केला असल्यास त्या संबंधी माहिती द्यावी. चितळे यांचा चिवडा लक्ष्मीनारायण इतकाच किंवा त्याहून चांगला असण्याची शक्यता आहे आणि चितळे यांचा माल पुण्याबाहेरही बर्याच ठिकाणी मिळतो असे वर वाचनात आले म्हणून हि चोकशी .

In reply to by रमेश आठवले

चितळ्यांचा चिवडा साधारण तसाच असतो. पण तरीही लक्ष्मीनारायण ला तोड नाही. मला वाटतं चितळ्यांचा थोडासा तेलकट असतो. त्यांचाही चांगलाच आहे पण लक्ष्मी नारायण तो लक्ष्मी नारायण! (आता पुण्याला आल्यावर शोधून लक्ष्मी नारायण चिवडा आणणं आलं! पुण्यातल्या पदार्थांची यादी वाढतेच आहे.) अवांतरः हा पुणेरी खाद्यसंस्कृती चा लेख मस्त आहे. काही थोड्या उत्तम जागा विसरल्या आहेत पण एकूण आढावा आणि विशेष भाग छान आहेत.)

आत्ता इतक्या उशीरा वाचले की हा लेख भातखंडे यांनी लिहीला आहे :(. मला त्यां लेख आवडतात. मोर्‍या बापट, मी आणी सुट्टी, डॉक्टर डॉक्टर हे लेख विशेष आवडले. पण हा विषय इतका ज्वलंत (पेटनशील) असल्याने , लेखकाचे नावच पहायला विसरले एकदम "डुक्करमुसंडी" मारून टीकात्मक प्रतिसादच देणे सुरु केले. असो ......... हा लेख आवडला नाही :( पण पुलेशु.

In reply to by शुचि

हा हा हा .... बऱ्याच जणांनी डुक्करमुसुंडी, धडक, चापट्या, चिमटे काढून झालेले आहेत. पण मज्जा वाटली असे टीकात्मक प्रतिसाद वाचून.

लेखनशैली आवडली. चितळे हे नाव न लिहिता लेख लिहिला असता तर वेगळ्या प्रतिक्रिया आल्या असत्या. मी एक पक्का पुणेकर असूनही सांगू शकतो की लेख चांगला जमला आहे. काही लोकांनी एकच दृष्टिकोन ठेवून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

काल प्रतिसाद टाकायचा होता तो टाकताना मिपा गंडलं....! आज प्रयत्न करतो. "नेहमीचा यशस्वी ट्यार्पी खेचक धागा विथ नेहमीचेच यशस्वी कलाकार नि नकलाकार!"

कुछ जम्या नही. विनोदी धाटणीचा लेख आहे आणि त्यातील मांडणी उत्तम आहे याबद्दल शंकाच नाही. पण मूळात प्लॉट थोडा कच्चा असल्याने एकुण अपेक्षित परिणाम साध्य झाला नाही. हेकट , तिरकस, कुजकट पुणेरी दुकानदार अशी प्रतिमा न तयार होता एका थोड्या सरकलेल्या, पुर्वग्रहदूषित, आगाऊ चिडचिड्या, अडाणी आणि किरकिर्‍या ग्राहकाशी सौजन्याने वागणारा दुकानदार अशी प्रतिमा डोळ्यासमोर तयार झाली. त्यामुळे मोठाच भ्रमनिरास झाला. बाकी लेखकाचे बाकीचे लेखन बघता ते याहुन चांगले लिहु शकतात याची खात्री आहे. अवांतरः हॅप्पी कॉलनीजवळील चितळेंच्या दुकानात बर्‍याचदा जाणे होते. दुकानाचे मालक अतिशय सौजन्यशील आहेत. ग्राहकांशी अतिशय व्यवस्थित आणि हसतमुखपणे बोलतात. इतका चांगला दुकानदार पुण्यात मिळणे हे संध्याकाकाळी ६.३० वाजता मुंबईत लोकलमध्ये घामट माणूस शेजारी उभा नसण्याइतकेच अवघड आहे असे नम्रपणे नमूद करु इच्छितो. माझा चितळ्यांशी आणि कर्व्यांशी काही संबंध नाही (एक ग्राहक - दुकानदार हा संबंध सोडुन ) परंतु केवळ लेखाचा लहेजा लक्षात घेउन (बरीच अनुकुल स्तुतिसुमने असुनदेखील) प्रतिकूल मत बनवु नये यासाठी हा प्रतिसाद(अवांतर)प्रपंच.

In reply to by मृत्युन्जय

हेकट , तिरकस, कुजकट पुणेरी दुकानदार अशी प्रतिमा न तयार होता....
आयला, म्हणून पुणेकर चिडले आहेत होय ? पुढील वेळेस बरोब्बर प्रतिमा तयार करायला सांगूया लेखकांना. काय म्हणता ? ;-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

व्हय ना राव. तेवढं वाइच जमवा म्होरच्या टायमाला. कस आहे ना की " माझा अनुभव " या सदरात काय पण वाट्टेल ते लिह्यलं तरी कोणाच्या बापाला कळतय? फेकुन द्यायच बिन्धास्त काहिही. थोडी करमणुक झाली म्हणजे झाले. काय? ;) बाकी पुणेकर चिडत नाहित हो. त्यांचा सात्विक संताप होतो.

थांबा. पुणे, मुंबई, अस्मिता, दुकानदारांचे औद्धत्य, टेक्नॉलॉजी वगैरे यांच्याशी अजिबात संबंध नसलेला प्रश्न विचारु इच्छितो. पुण्यात येऊन अमुक एक वेळ अजिबात न पाळताही इथेच बसल्याजागी (पक्षी मुंबई /ठाणे) या बाकरवड्या मिळू शकतात. (दोनतीन दिवसांपूर्वीच्या प्याकिंग डेटने). इथे दोन प्रकारच्या बाकरवड्या चितळे नावाने मिळतात. एक लांबट किंचित कमी खुटखुटीत खालीलप्रमाणे ट्रे टाईप पॅकमधे असते. चवीला ठीक. : याला चितळे बंधू असं नाव आहे. दुसरे पॅकेट म्हणजे साधे प्लॅस्टिक बॅगसारखे असते. त्याचा फोटो मिळत नाहीये. ती बाकरवडी लहान गोल आणि खुटखुटीत असते. वाळक्या पोळीसारखं कव्हर असतं. ही चवीला जरा कुरकुरीत. यावर नुसते "चितळे बाकरवडी" असं लिहिलेलं असतं. बंधू नव्हे. ही देखील तशी चांगली असते पण अनेक स्थानिक दुकानांतून मिळणार्‍या "बटर बाकरवडी", "मिनी बाकरवडी' यांच्या इतकीच.. पूर्वी कोणीतरी इथेच मिपावर मला "बंधू"वाली बाकरवडी हीच ओरिजिनल असं सांगितलं होतं. पण तरीही घोळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा कोणीतरी क्लॅरिफाय करावे. या दोन्हीतल्या नेमक्या कोणत्या बाकरवडीसाठी मूळ दुकानी रांगा लागतात आणि जीव टाकून लोक ती मिळवतात ते जाणून घ्यायचे आहे.

In reply to by गवि

तुम्ही चित्रात दाखवलेली बाकरवडी हिरव्या देशातही मिळते. त्यावर दिलेली 'इंस्त्रक्षणं' फॉलो करून मायक्रोवेव्हमध्ये गरम केल्यास बर्‍यापैकी खुटखुटीत लागतात. आमच्यायेथे पोहोचेपर्यंत त्या 'अँटीक'ही पदवीप्राप्त करत्या झालेल्या असतात. त्याच्या किंचित जुना वास जाण्यासाठी गरम केल्यास बरी चव येते. नुसतं 'चितळे' छापलेल्या प्याकिंगबद्दल शंका आहे.

In reply to by गवि

पण ताज्या पॅक केलेल्या बाकरवडीची सर या पॅकमधील बाकरवडीला नाही. ताजी बाकरवडीदेखिल त्याच दिवशी (उरली तर जास्तीत जास्त दुसर्‍या दिवशी खावी) कारण त्यानंतर तो खुसखुशीतपणा रहात नाही कितीही हवाबंद ठेवली तरी..

In reply to by गवि

सापडली दुसरी चितळे बाकरवडी. दुकानातून आणून आता फोटो काढला. ही वरिजनल आहे का हे कोणी सांगेल का? मी आजपर्य त हीच खरी अस्सल असं समजतोय. इथे प्याकिंगवर चितळे बंधू ऐवजी चितळे स्वीट होम लिहिलंय. बंधू ही वेगळी कंपनी असल्यास मू ळ जुने कोण?

In reply to by गवि

गवि, दुसर्‍या चित्रातील बाकरवडी ही केवळ नामसाधर्म्यामुळे खपणारी आहे. मूळ चितळे हे चितळे बंधू. मूळ चितळ्यांची मिनी बाकरवडी नव्हती कधी (गेल्या सहा आठ महिन्यात चालू केली असली तर माहित नाही). यंत्राने मोठ्या आकाराच्या वड्याच तयार करतात. पूर्वी त्यात भरपूर सुके खोबरे घालीत असत पण आजकाल शेवेचा वापर होतो.

In reply to by रेवती

धन्यवाद. आता काही निरिक्षणे. -चितळे स्वीट होम बाकरवडी (डुप्लिकेट)च्या पॅकेटवर सदाशिव पेठ पुणे ३० असा पत्ता आहे. -घरगुती उत्पादनांच्या सिलेक्टेड दुकानांमधे दोन्ही प्रकार एकत्र विकले जातात. -चितळे बंधू (ओरिजिनल) बाकरवडीपेक्षा चितळे स्वीट होम बाकरवडी अत्यंत जास्त कुरकुरीत, टेस्टदार आणि तोंडात विरघळणारी आहे. ओरिजिनल बाकरवडी कितीही ताजी (पॅकिंग दोनतीन दिवसांपूर्वीचं पण एकदम हायटेक असल्याने किमान कुरकुरीतपणा टिकून रहायला हरकत नसावी. तरीही ती मुळातच जरा मऊ असते असं दिसतंय.. ) -यापूर्वी कधी प्रत्यक्ष चितळेंच्या पुण्यातल्या दुकानात जाऊन बाकरवडी घेतलेली नसल्याने मूळ कशी असते माहीत नव्हतं म्हणून इतके प्रश्न विचारले. उत्तराबद्दल पुन्हा धन्यवाद. आता चवीला चांगली , कुरकुरीत अशी स्वीट होम बाकरवडी आणत जाईन.

In reply to by गवि

चितळे स्वीट होम शनिपाराच्या दुसर्‍या बाजूला छोटेसे दुकान आहे. इतर कुठल्याही हलवायांचे असते तेवढे. सदाशिव पेठ पत्ता बरोबर आहे. शनिपार बस स्टॉप / गणपती ते नागनाथ पार या पट्ट्यात कुठेतरी आहे ते. पराला माहित असेल नक्की जागा. एकूण दर्जा फार काही विशेष नाही. एके काळी त्यांच्या कडे आंबा बर्फी चांगली मिळायची. आता माहीत नाही. चितळे बंधू हेच वर्जिनल. आता स्टायलिश पॅकिंग आलं आहे. कित्येक वर्ष निळ्या पांढर्‍या रंगातल्या प्लॅस्टिक पिशव्या हेच पॅकिंग होतं. पण त्या पहिल्या फोटोत जसं नाव आहे लाल चौकोनात तो फॉर्मट सध्या त्यांच्या बहुतेक उत्पादनांवर वापरला जातो.

In reply to by गवि

याला म्हणतात हाडाचे प्रतिसादक आणि डुप्लिकेट बाकरवडी, गेला बाजार साता-यात राजपुरोहितमध्ये समोसे, बाकरवड्या आणि पेढे चांगले होते.

In reply to by ५० फक्त

सामोसे नक्कीच. पण एक-दोन चौक पुढे अशोक मोदी आणि लाटकर हे पिढीजात कंदी पेढ्यांचे हलवाई असताना राजपुरोहित चे मारवाडी पेढे इतके उत्तम वाटत नाहीत. विशेषतः मोदी..

जुन्या कढीला नवा ऊत आणण्याचा प्रचंड अयशस्वी प्रयत्न

In reply to by आदिजोशी

धागा इंचाइंचाने शतकाकडे चालला आहे आणि तुम्ही म्हणता "प्रचंड अयशस्वी प्रयत्न" ? बाकी, ऊत तरी नवा कुठे आहे, वरती उतलेली काही नावे पाहिली, बरीच तशी जुनीच होती ;-)

हिरव्या देशातही हिरवा देश म्हणजे कुठला ? 'हिरव्यांचा हैदोस' वाला नाही ना ?

In reply to by तिमा

नाही हो. उघड उघड हैदोसवाल्यांचा नाही तर छुप्या हैदोसवाल्यांचा. ;)

In reply to by रेवती

उघड उघड हैदोसवाल्यांचा नाही तर छुप्या हैदोसवाल्यांचा.
+१ :bigsmile:

मी ९५ नम्बर. आपल्या डोम्बिवलीत देशपान्डेन्च्या खाउघर मध्ये किन्वा बाजीप्रभु चौकातील कुलकर्णीन्च्या दुकानात जावे. खावे. फळकुट नाही की प्रणाली नाही. असो.

१०० वा मुबारका भै मुबारका

लेखकाने हा अनुभव पुण्यातल्या चितळेंऎवजी(चितळेच काय अगदी दुसरं कोणतंही दुकान) दुसर्या एखाद्या शहरातील नामवंत दुकानाचा लिहिला असता तर धागा कदाचित पन्नाशीही गाठू शकला नसता असे निरीक्शण नोंदवतो.

लेखन.. निरिक्षण.. मस्तच! फक्त दुकानदाराचे (आणि शहराचे) नाव लिहून रोष ओढवून घेतलात

In reply to by ऋषिकेश

पण दुकानदार आणि शहराचे नाव नसते तर कदाचित खऱ्या प्रतिक्रिया मिळाल्या नसत्या आणि तितकी मजा पण आली नसती. बाकी रोष वगैरे ठीक आहे.....;)

एकुण प्रतिसाद वाचताना पर्‍याचा एक मोठा नि आमच्यासारखे चार-पाच फुटकळ वगळता पुण्याच्या 'बाजूने' आलेले प्रतिसाद दिसले नाहीत. थोडेफार तटस्थ प्रतिसाद वगळता सुमारे ७५ विरुद्ध पाच असे असून 'पुणेकर उगाचच आरडाओरड करताहेत, गळू आले' वगैरे दावे वाचून गोबेल्स आठवला. अर्थात गोबेल्स बहुधा मिपावरूनच शिकून गेला असावा असा आम्हाला पूर्वीपासून दाट संशय आहेच. रच्याकने: हल्ली इनोचा तुटवडा आहे असे दिसते.

In reply to by रमताराम

नाय हो ररा, मीही पुण्याच्या बाजूनेच प्रतिसाद दिलाय पण नंतर तो प्रतिसाद मलाच तटस्थ वाटायला लागला. भाषा मनाला पुरेशी झोंबणारी वाटत नाही. असो, पुढीलवेळी काळजी घेते. ;) तसेही पुणे प्रेमाचे दुथडी भरून वाहणारे धागे येतच असतात. त्यांची कमतरता नाही.

In reply to by रेवती

आमच्यासारखे चार-पाच फुटकळ प्रतिसाद.... हे वाचलं नाय का? ता.क. प्रतिसादाला फुटकळ (म्हणजे जितक्या अहमहमिकेने पुणे विरोधी आपली जळजळ व्यक्त करताहेत तितके तीव्र नाहीत) म्हटले आहे, तुम्हाला नाही या.कृ. नों. घ्या. (उगाच तुमच्याशी पंगा घ्याय्ला येडाय का मी.) तसेही पुणे प्रेमाचे दुथडी भरून वाहणारे धागे येतच असतात. असा एखादा धागा दाखवल्यास आजन्म उपकृत होईन. जमाखर्च मांडून बघू या किती धागे पुण्याच्या प्रेमाची दुथडी भरून वाहणारे आहेत नि किती पुणे आणि पुणेकरांची टवाळी करणारे आहेत. ते होणारच नाही. 'गृहित-सत्य' असा एक शब्द आम्ही वापरला होता आमच्या 'जंगलवाटांवरचे कवडसे' मधे, तसेच हे. एकदा स्वतःलाच प्रचंड न्यूनगंड असलेले 'आम्ही लै शहाणे नि पुणेकर चूक' हे गृहितक धरून लोक जमा झाले की साप साप म्हणून भुई धोपटणे चालू होणारच. (म्हणून जीएंची 'कावळे, राजहंस नि मानससरोवर' ही उपकथा आम्हाला आवडणारी) साप केवळ आपल्या मनात आहे हे समजले तर पाहिजे. तेवढी समज असणारे चूप बसतात. इतरांना सापांबरोबर गळवांचेही भास होऊ लागतात्य

In reply to by रमताराम

तसेही पुणे प्रेमाचे दुथडी भरून वाहणारे धागे येतच असतात. असा एखादा धागा दाखवल्यास आजन्म उपकृत होईन.
उपरोधाने म्हणताहेत त्या. ( स्वगत:- जीएंनी उपरोधावर काही लिहिले नाही बहुतेक ;-) )

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

गळवांनी त्रस्त असलेल्यांच्या दोघांमधे निरोगी लोकांनी बोलायचे कारण नाही. आमचे दु:ख आम्हाला ठौक. स्वगतः धत्तेरे की रेवतीतैंनी सचिनप्रमाणे आपली दांडी उडवली की..... नाही नाही म्हणजे मी सचिन नि रेवतीतै टिम साउदी आहेत असे नाय म्हणायचे आपल्याला. ती स्मायली शेवटी टाकली असती तर घोळ झाला नसता.

In reply to by रमताराम

प्रथम म्हणजे मी पूर्ण लेख परत नीट वाचला. त्यात चितळ्यांवर अशी काही खास टीका केली नाही आहे. खरे तर लेखकाने थोडासा सेल्फ डीप्रीकेटींग पद्धतीने लेख लिहिला आहे, असे मला वाटले. काही ताशेरे आहेत, पण लेख विनोदी आहे हे लक्षात घेता ते असणारच. शिवाय लेखकाने आपल्याला चितळ्यांचे पदार्थ आवडतात असे अनेकदा दर्शवले आहे, म्हणजे त्यांचा चितळ्यांवर काहीं तसा फार राग नसावा. असो, तो तसा वेगळा मुद्दा आहे. आता महत्त्वाचा मुद्दा. समझा केली चितळ्यांवर टीका तर केली. चितळ्यांवर टीका म्हणजे त्यांचा अपमान, मग तो समस्त पुणेरी दुकानदारांचा अपमान आणि पर्यायाने समस्त पुणेकर आणि पुणे शहर यांचा अपमान असे समजायचे, त्याला शहराच्या आणि स्वतःच्या अस्मितेचा प्रश्न बनवायचा आणि मग लगेच आपले शहर आणि अस्मिता यांचा बचाव करण्यासाठी बोरू झिजवायला उतरायचे हा प्रकार मला प्रचंड विनोदी वाटतो. उद्या कुणी केली टीका डी दामोदर वर किंवा गौरीशंकर छीतरमल वर तर मी काही लगेच त्याला माझ्या अस्मितेशी जोडणार नाही. चितळेच कशाला, मागे पुण्यातील एका विशिष्ट प्रसंगाबद्दल कुणीतरी लिहिले होते. त्यातील पुणेरी घरमालकच्या विक्षिप्त वागण्यामुळे झालेले विनोदी प्रसंग लिहिले होते. येथील काही सव्यसाची लेखक लगेच धागालेखकच कसा गाढव आणि घरमालक कसा बरोबर हे पटवून द्यायला लागले होते. जणू तो घरमालक यांचा होणारा सासराच आहे आणि त्याची अब्रू यांनी नाही वाचवली तर मुलगी देणार नाही असे म्हणाला आहे. इथेही तसेच झाले आहे म्हणा. माझे अजून एक निरीक्षण आहे ते म्हणजे पुण्याबद्दल काहीही विधान केले, मग भले ते विधान तक्रारवाचक नसले तरीही पुणेकरांना त्यात टीका दिसते. (इथे पुणेकर म्हणजे मिसळपाव वरील पुणेकर म्हणवणाऱ्या काहीं आयडींना. माझे अनेक पुणेकर मित्र आहेत. त्यांच्याशी बोलताना वेगळा अनुभव येतो. जालावर पण मी मिसळपाव व्यतिरिक्त फार कुठे नसतो त्यामुळे तूर्तास मिसळपाव च्या संदर्भात बोलतो आहे) मग अशा तथाकथित टीकेला प्रत्युत्तर देताना शाब्दिक कसरती, समोरच्याचा अपमान करून पुणेरी स्टीरिओटाईप पक्का करणे अशा केविलवाण्या धडपडी सुरु होतात. आधी आश्चर्य वाटायचे. मग राग यायचा. आता मज्जा वाटते. पण आत्ता गंभीर पणे सांगतो आहे, प्रत्येक विधानात टीका शोधायची गरज नसते. "गळू" शब्द काहीं लोकांना चांगलाच झोम्बलेला दिसतो. कुणा महाभागाने तर चक्क मी असभ्य प्रतिसाद दिला अशी तक्रार केली. त्यात असभ्य काय आहे देव जाणे. गळू म्हणजे फोड. तो तळहाताला येऊ शकतो, कपाळाला येऊ शकतो. कुठेही येऊ शकतो. वाचकाच्या डोक्यात काय काय कल्पना विस्तार येतात त्याची जबाबदारी माझी नाही. माझ्या प्रतिसादाला गोबेल्सनीती म्हणण्यापूर्वी जरा विचार करायला हवा होता, की त्या मागे काय काय झाले आहे. दुसरे म्हणजे ब्याम्याने प्रेडीक्शन केले आणि मी त्यामागचे मला जे वाटले ते कारण लिहिले. फारसे "पुणेकरी" प्रतिसाद यायच्या आधी हे लिहिले आहे. सगळ्या तारखा आणि वेळा नीट पहा. शिवाय "एकदा स्वतःलाच प्रचंड न्यूनगंड असलेले 'आम्ही लै शहाणे नि पुणेकर चूक' हे गृहितक धरून लोक जमा झाले की साप साप म्हणून भुई धोपटणे चालू होणारच. साप केवळ आपल्या मनात आहे हे समजले तर पाहिजे." हेच वाक्य स्वत:लाही लागू होते हे ध्यानात आले तर उत्तम. आपल्यावर सतत उगाच टीका होते हा गंड कोण बाळगते, विधानांच्या (किंवा विनोदांच्या) भुईला टीकेचा साप समजून कोण धोपटते याचा एकदा विचार करा. आणि हो, नेहमी मी प्रतिवाद करतोच असे नाही पण माझ्या प्रतिसादाचा एकदा नव्हेत तर दोनदा उल्लेख केलात म्हणून उत्तर दिले आहे. आणि हो, मुख्य म्हणजे तुम्ही केलात म्हणून. इतर कुणी नेहमीचे पांचजन्यधारी असते तर तसदी नसती घेतली. यापुढे दर वेळेला इतके सविस्तर उत्तर देणार नाही (त्यापेक्षा एक काडी टाकून तमाशा बघणे सोपे जाईल :-) )

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

+१११ ^ (१११११११११११ ). वाक्यावाक्याशी सहस्रशः सहमत. विशेषतः
आता महत्त्वाचा मुद्दा. समझा केली चितळ्यांवर टीका तर केली. चितळ्यांवर टीका म्हणजे त्यांचा अपमान, मग तो समस्त पुणेरी दुकानदारांचा अपमान आणि पर्यायाने समस्त पुणेकर आणि पुणे शहर यांचा अपमान असे समजायचे, त्याला शहराच्या आणि स्वतःच्या अस्मितेचा प्रश्न बनवायचा आणि मग लगेच आपले शहर आणि अस्मिता यांचा बचाव करण्यासाठी बोरू झिजवायला उतरायचे हा प्रकार मला प्रचंड विनोदी वाटतो. उद्या कुणी केली टीका डी दामोदर वर किंवा गौरीशंकर छीतरमल वर तर मी काही लगेच त्याला माझ्या अस्मितेशी जोडणार नाही. चितळेच कशाला, मागे पुण्यातील एका विशिष्ट प्रसंगाबद्दल कुणीतरी लिहिले होते. त्यातील पुणेरी घरमालकच्या विक्षिप्त वागण्यामुळे झालेले विनोदी प्रसंग लिहिले होते. येथील काही सव्यसाची लेखक लगेच धागालेखकच कसा गाढव आणि घरमालक कसा बरोबर हे पटवून द्यायला लागले होते. जणू तो घरमालक यांचा होणारा सासराच आहे आणि त्याची अब्रू यांनी नाही वाचवली तर मुलगी देणार नाही असे म्हणाला आहे. इथेही तसेच झाले आहे म्हणा. माझे अजून एक निरीक्षण आहे ते म्हणजे पुण्याबद्दल काहीही विधान केले, मग भले ते विधान तक्रारवाचक नसले तरीही पुणेकरांना त्यात टीका दिसते. (इथे पुणेकर म्हणजे मिसळपाव वरील पुणेकर म्हणवणाऱ्या काहीं आयडींना. माझे अनेक पुणेकर मित्र आहेत. त्यांच्याशी बोलताना वेगळा अनुभव येतो. जालावर पण मी मिसळपाव व्यतिरिक्त फार कुठे नसतो त्यामुळे तूर्तास मिसळपाव च्या संदर्भात बोलतो आहे) मग अशा तथाकथित टीकेला प्रत्युत्तर देताना शाब्दिक कसरती, समोरच्याचा अपमान करून पुणेरी स्टीरिओटाईप पक्का करणे अशा केविलवाण्या धडपडी सुरु होतात. आधी आश्चर्य वाटायचे. मग राग यायचा. आता मज्जा वाटते. पण आत्ता गंभीर पणे सांगतो आहे, प्रत्येक विधानात टीका शोधायची गरज नसते.
इथे तर अभिनव बिंद्रास्टैल बैलांचे डोळे फोडलेत. उगीच नाही म्हणत बलीवर्दनेत्रभञ्जक विमे :) जियो!

In reply to by चिंतामणी

तुमच्या प्रतिसादाच्या शीर्षकाने उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तेव्हा दीर्घ प्रतिसादाची वाट वाट पाहत आहे.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

तुमच्या या प्रतिसादावरून तुम्ही एकंदरीत या मिपासंस्कृतीचा एकदम गाढा अभ्यास केलेला दिसतो. (या वाक्यात खोचक पणा नाही हे ध्यानात घ्यावे. ;) आता कुठलाही विनोदी लेख लिहिताना काही वाक्यांनंतर असं कंसात मला काय वाटते ते टाकावे लागेल.) आता हा माझा धागा (खरं तर सुंभ म्हणायला हवं इतका जाडा झालाय ... पण जाळला तरी पिळ जाणार नाही असा.) लवकरच द्विशतक पूर्ण करणार. :) जसं चितळे यांनी कधीच मला निमंत्रण दिलं नव्हतं (तसं ते इतर पुणेकरांना देत असतील का? हा शोधाचा मुद्दाच आहे) तरी पण चितळ्यांच्या दुकानात मिळणाऱ्या दर्जेदार उत्पादनांसाठी तिथे जायचा मोह आवरत नाही. असो. 5563 वाचने आणि १८०+ प्रतिक्रिया. (ही नोंद दि. ८ सप्टेंबर २०१२ रोजी १२ वाजून ५५ मिनिटे नोंदवली आहे) ते सुद्धा कुठल्याही प्रकारचे आमंत्रण न देता. खरच मजेशीर आणि अजब आहे.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

ही उपरती १७५+ पोस्ट झाल्यावर का झाली?? >>>त्याला शहराच्या आणि स्वतःच्या अस्मितेचा प्रश्न बनवायचा आणि मग लगेच आपले शहर आणि अस्मिता यांचा बचाव करण्यासाठी बोरू झिजवायला उतरायचे हा प्रकार मला प्रचंड विनोदी वाटतो. पुणेकरांची खिल्ली उडवण्यासाठीच असले लेख टाकले जातात हे उघड सत्य आहे. >> उद्या कुणी केली टीका डी दामोदर वर किंवा गौरीशंकर छीतरमल वर तर मी काही लगेच त्याला माझ्या अस्मितेशी जोडणार नाही. म्हणजे ते त्या दर्जाचे नाहीत हे तुम्हीच सिद्ध करीत आहात. >>>"गळू" शब्द काहीं लोकांना चांगलाच झोम्बलेला दिसतो. आणि हा गळवाचा उल्लेखसुद्धा कुत्सीतपणानेच केला आहे ना. ही व्याधी हा शब्द फारच चांगला आहे असे आपले म्हणणे आहे का? >>>(त्यापेक्षा एक काडी टाकून तमाशा बघणे सोपे जाईल Smile ) प्रस्तुत धागाकर्त्याने हेच तर केले आहे.

In reply to by चिंतामणी

हे तुमचे सविस्तर उत्तर ??? च्यामारी, डोंगर पोखरके उंदीर निकाल्या !!!