✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

तुम इक गोरख धंदा हो

य
यकु यांनी
गुरुवार, 06/07/2012 - 09:21  ·  लेख
लेख
नवरत्न नाथांनी दीक्षा दिलेल्या क्षणापासून त्यांचा देह सोडून झाल्यानंतर, दरम्यानच्या काळात केलेल्या जगावेगळ्या सर्जरीचं सार नुस़रत फतेह अली खान यांनी गायलेल्या या कव्वालीतून पोहोचलं, पोहोचवलं गेलं. नवरत्न नाथ या साध्याभोळ्या, छक्केपंजे समजू न शकणार्‍या, नव्हे तसल्या गोष्‍टींची गरजच नसलेल्या माणसाने, नव्हे नवरत्न नाथ नावाच्या गुपचूप नजरेआड झालेल्या जादुगाराने ही जादू करुन दाखवलीय. जटील संकल्पना, लंब्याचौड्या बाता वगैरे गोष्‍टी हा नाथांचा स्वभाव नव्हता. साधं, पण थेट बोलायचे. आम्ही रडारवर बसलो होतो, आता तुमचा वरचा कॉन्टॅक्ट सुरु झालाय (दीक्षा देऊन झाल्यानंतर), सीमकार्ड, तुम्ही रिचार्ज करा, बॅलन्स संपलंय, पेट्रोल भरु, कुठंही गेलात तरी कॉन्टॅक्टमध्ये रहा, असल्या वरवर सोप्या पण अत्यंत गूढ, गहन प्रक्रिया सूचित करणार्‍या भाषेत बोलायचे. त्यांना लिहिता वाचता येत होतं, कारण नाथ संप्रदायाच्या नित्योपासनेच्या पुस्तकातले अभंग ढोलकीच्या अतिशय मनोहर तालावर नाथ महेश्वरच्या त्यांच्या छोट्याशा मठीत म्हणत उभे असतानाच मी आणि विलासराव त्यांची वाट पहात बाहेर घाटावर बसून होतो. सांगायचा मुद्दा हा की भरभक्कम संकल्पना, लंबंचौडं भाषण वगैरे नाथांचे विषय नव्हते - होता फक्त थेट अनुभव, मी जिकडे तिकडे प्रॅक्टीकल प्रॅक्टीकल म्हणून ओरडत होतो ते समोरासमोरचं प्रॅक्टीकल. जे पिंडी ते ब्रह्मांडी हे थेट दाखवायचे - म्हणजे नुसती नजर टाकून थेट आजूबाजूची झाडं गदागदा हालवून दाखवायचे - तुफान आणून दाखवायचे आणि विचारायचे - चल बता ये क्या है? सांग मला हे समजून हे काय आहे ते. अर्थातच हे योगसाधनेच्या बळावर. मातृरुपी चामुंडा शक्तीच्या उपासनेच्या बळावर. महेश्वरचा त्यांचा रहाण्याचा एकूण गेटअप, ते करीत असलेले अचाट प्रकार पाहून मला मनात कुठेतरी हा माणूस वामाचारी आहे असं वाटत होतं. हो ना, आता एखादा माणूस अशा गोष्‍टी करत असतानाच पूर्ण करड्या रंगात रंगवलेलं शक्तीचं मंदीर, धड डॉबरमॅनही नाही आणि धड गावठीही नाही अशा कुत्र्यांना पाणथळ जागी डुंबताना दाखवून ते भैरव आहेत दर्शन घे, क्षणात तेच कुत्रे पुन्हा त्या शक्तीच्या मंदीराशेजारी आराम पडलेले दाखवून, गांजा वगैरे वरवरच्या गोष्‍टी पाहून आणखी वेगळं काय वाटणार? नाथांचे पाय पकडेपर्यंत आम्ही होतो युजीपंथीय - विचारांची साखळी, ती तोडा म्हणजे शरीराचा स्फोट होतो वगैरे गोष्‍टी युजींकडून ऐकलेल्या - म्हणजे 'मी' नावाचं 'Living Organism'कसं ऑपरेट होतं हे अनुभवता येईल वगैरे युजींचा अनुभव मी ताडून पहात होतो. डावं-उजवं होतंय ते तुटलं पाहिजे, म्हणजे स्फोट होतों, खरंय का असं मी विचारलं. तर डावं-उजवं ही नाथ पंथामधली ब्रह्मांडाचं संतुलन साधणारी विश्वव्यापक संकल्पना आहे - म्हणजे जगात सम आणि विषम आहे म्हणूनच विश्वाला गती आहे हे मज पामराला कसं ठावं असणार. नाथ पंथाची शिकवण अगदी साधी आणि थेट आहे - एका हाताने द्या आणि दुसर्‍या हाताने घ्या. वासना आहेत? तर आहेत! प्रेम आहे? तर आहे! द्वेष आहे? तर आहे! वाद आहे? तर आहे! या सगळ्या गोष्‍टींमध्‍ये संतुलन पाहिजे. म्हणजे द्वेष मिळाला - तर तो शून्य करण्यासाठी प्रेम वापरावं लागेल. मी स्वत:कडे एक विभक्त एंटीटी म्हणून पाहात होतो आणि जे काही होईल ते फक्त माझ्यात होईल असं मी समजत होतो. आणि नाथ तर कालभैरवाचंच रुप असल्याने मी शेवटी जागृत होऊनही कुठे पोहोचणार होतो? काळाच्या मुखातच ना? म्हणून महेश्वरच्या घाटावर कालभैरव बनून उभ्या असलेल्या नाथांना आधी सगळे चमत्कार दाखवावे लागले, मग मी नमस्कार केला. मग नाथांनी दीक्षा दिली. खरबूज कापून त्याचं अर्धं भक्कल न तोडता खायला लाऊन त्याद्वारे योगसाधनेच्या बळावर नाथांनी स्वत:चा डावा मेंदू माझ्या मेंदूत आरोपित केला, त्यांचा स्वत:चा देह महेश्वरहून अमरकंटकला जाऊन विसर्जीत केला. नाथांचा सगळं बोलणं कोड्यात. दीक्षा मिळाल्यानंतर दोन-चार दिवसांत एका सकाळी नाथांचा फोन आला - काय म्हणता यशवंत पाटील? हे असं वाट्टेल त्या नावाने कुणालाही हाक मारायचे. कधी म्हणायचे मी दगडधोंडे, लोखंडाचा डॉक्टर आहे, तु जीवाचा डॉक्टर आहेस - असं काहीही. तर मला त्या सकाळी ते फोनवर म्हणे, इंदूर स्टेशनवर या, अमरकंटकला निघालोय आणि मी काही खाल्लेलं नाही. येताना काहीतरी खायला घेऊन या. स्टेशनच्या उजव्या बाजूला असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली मी थांबलोय वगैरे. तो स्टेशनवरचा दृष्‍टांत मी लिहिला पण आहे. स्टेशनवर नाथांचं दर्शन होऊ शकलं नाही. जवळपास होते तेवढ्या पिंपळांखाली मी जाऊन आलो. पण अमरकंटकला निघालेत म्हणजे देह विसर्जीत करायला निघालेत हे मला त्यावेळी कळलं नव्हतं. नाथांनीच नंतर खाणाखूणांद्वारे त्यांनी देह विसर्जीत केल्याचं कळवलं. घराच्या बाहेर पडलो तेव्हापासूनच आजूबाजूची झाडे गदागदा हालायला सुरुवात झालीच होती. ही नाथ खरोखर त्यांच्या देहाने इंदूरमध्‍ये आल्याची खूण होती. मग पुढे बर्‍याच खाणाखूणा. काल सूर्यावरुन झालेल्या शुक्राच्या अधिक्रमणादरम्यान माझ्या डाव्या मेंदूत असलेल्या नाथांच्या चेतनेने ही कव्वाली निवडली - आणि मला अखेरीस कळलं मी एक गोरखधंदा बनलोय. ग्रह गती आणि मानवी जीवन यांचा संबंध असतोच असतो, जे पिंडी ते ब्रह्मांडी! या कव्वालीच्या अनेक आवृत्त्या उपलब्ध आहेत. पण नुस़रत फतह अली खानांनी जेवढी म्हटलीय तेवढीच इथे घेतलीय. आता पाकिस्तानात लिहिल्या गेलेल्या कव्वालीत 'गोरखधंदा', 'दर्शन', 'वादात काही नाही' (शंकराचार्यांचा संदर्भ, बृहदारण्यकोपनिषदात 'ये बुराई, ये भलाई, ये जहन्नुम, ये बहिश्त' हेच संस्कृतमध्‍ये आलंय, कारण सगळं एक आहे) हे असं सांगणारे शब्द कसे आले? नाथपंथ त्या काळच्या भारतात कुठेपर्यंत पोहोचला असेल देव जाणे. मग एक मुसलमान कव्वाल 'तुम इक गोरख धंदा हो' गाणारच. हे मूळचं सूफी गीत आहे. यात सगळं अगदी थेट सांगितलंय, समोर मांडलंय, तुम्ही नेमके कसे आहात हे विचारलंय, ज्यांनी 'अनल हक़', 'मीच ईश्वर आहे' म्हटलं त्या मन्सूरचं काय झालं हेही सांगितलंय, ईश्वर का दिसू शकत नाही हे विचारलंय, सांगितलंय - एकूण अगदी प्रचंड अर्थ, दिसतील तेवढे अर्थ. आनंद घ्या. कभी यहां तूने ढूंढा कभी वहां पहूंचा तुम्हारी दीद की खातीर कहां कहां पहुंचा गरीब मिट गये पामाल हो गये लेकीन किसी तलक न तेरा आजतक निशां पहुंचा हो भी नहीं और हर जा हो हो भी नहीं और हर जा हो तुम इक गोरख धंदा हो हर जर्रे में किस शान से तु जलवा नुमां है.. तु जलवा नुमां है हैरान है मगर अक्ल के कैसे है तु क्या है? तुम इक गोरख धंदा हो तुझे दैर-ओ-हरम मैं ने ढूंढा तु नहीं मिलता मगर तशरीफ फरमा तुझको अपने दिल में देखा है तुम इक गोरख धंदा हो जब बजूझ तीर कोई दुसरा मौजूद नहीं फिर समझ में नहीं आता तेरा परदा करना तुम इक गोरख धंदा हो कोई फत में तुम्हारी खो गया है उसी खोए हुए को कुछ मिला है न बुतखाने ना काबे में मिला है मगर टूटे हुए दिल में मिला है अदम बनकर कहीं तु छूप गया है कहीं तू हस्त बनकर आ गया है नहीं है तू तो फिर इनकार कैसा नफिली तेरे होने का पता है मै जिसको कह रहां हू अपनी हस्ती अगर वो तू नहीं है तो क्या है? नहीं आया खयालों में अगर तू तो फिर मैं कैसे समझा तू खुदा है तुम इक गोरख धंदा हो हैरान हूंऽऽऽ मै हैरान हूंऽऽऽ इस बात पे तुम कौन हो क्या हो? हाथ आओ तो बुत, हाथ ना आओ तो खुदा हो अक्ल में जो गिर गया लाइंतहा तु कर हूआ जो समझ में आ गया फिर वो खुदा क्यूं कर हुआ फलसफी को बहस के अंदर खुदा मिलता नहीं छोर को सुलझा रहा है और सिरा मिलता नहीं छुपते नहीं हो सामने आते नहीं हो तुम जलवा दिखाके जलवा दिखाते नहीं हो तुम बैरो हरम के झगडे मिटाते नहीं हो तुम जो अस्ल बात है वो बताते नहीं हो तुम हैरां हूं मेरे दिल में समाए हो किस तरहा हालां की दो जहां में समाते नहीं हो तुम ये मा बद ओ हरम हे कलीसा-ओ-दैर क्यूं हरजाई हो जभी तो बताते नहीं हो तुम तुम इक गोरख धंदा हो दिल पे हैरत ने अजब रंग जमा रक्खा है एक उलझी हुयी तस्वीर बना रक्खा है कुछ समझ में नहीं आता के ये चक्कर क्या है खेल क्या तुमने अजल से ये रचा रक्खा है रुह को जिस्म के पिंजरे का बनाकर कैदी उसपे फिर मौत का पेहरा भी बिठा रक्खा है दे के तदबीर के पंछी को उडाने तूने दाम-ए-तकदीर भी हर सम्त बिछा रक्खा है कर के अराइश क्वोनैन की बरसों तूने, खत्म करने का भी मनसूबा बना रक्खा है लामकानी का बहरहाल है दावा भी तु मे नाहनू अकरब का भी पैगाम भी सूना रक्खा है ये बुराई, वो भलाई, ये जहन्नुम, वो बहिश्त, इस उलटफेर में फरमाओ तो क्या रक्खा है? जुर्म आदम ने किया और सजा बेटों को अद्ल ओ इन्साफ़ मि'यार भी किया रक्खा है दे के इन्सान को दुनिया में ख़लाफत अपनी, इक तमाशा सा जमाने में बना रक्खा है अपनी पेहचान की खातीर है बनाया सबको, सब की नज़रों से मगर खुद को छुपा के रक्खा है तुम एक गोरख धंदा हो नीत नये नक्क्ष बनाते हो मिटा देते हो, जाने किस जुर्म-ए-तमन्ना की सजा देते हो कभी कंकड़ को बना देते हो हीरे की कनी, कभी हीरों को भी मिट्टी में मिला देते हो जिंदगी कीतने ही मुरदों को अता की जिसने, वो मसिहा को भी सलीबों पे सजा देते हो खाहिशे दी तो जो कर बैठे सरे तूर कोई, तूर ही बढके तजल्ली से जला देते हो नार-ए-नमरुद में डलवाते हो खुद अपना ख़लील खुद ही फीर नार को गुलज़ार बना देते हो चाहे किन आन में फेंको कभी माहे किन आं नूर याकूब की आंखो का बुझा देते हो दे के युसूफ को कभी मिस्र के बाजारों मे आखरे कार शह-ए मिस्र बना देते हो जज्ब़ो मस्ती की जो मंज़ील पे पहुंचता है कोई बैठकर दिल में अनल-हक़ की सज़ा देते हो खुद ही लगवाते हो फिर कुफ्ऱ के फ़तवे उसपर खुद ही मन्सूर को सूली पे चढा देते हो अपनी हस्ती भी इक रोज गवां बैठता है अपने दर्शन की लगन जिसको लगा देते हो कोई राँझा जो कभी खोज में निकले तेरी, तुम उसे झंग के बेले में रुला देते हो, जुस्तुजू लेके तुम्हारी जो चले क़ैस कोई, उसको मजनू किसी लैला का बना देते हो, जोत सस्सी के अगर मन में तुम्हारी जागे, तुम उसे तपते हुए थड़ में जला देते हो, सोहनी गर तुम्हे माहीवाल तस्सव्वुर कर ले, उसको बिफ़री हुई लहरों में बहा देते हो, ख़ुद जो चाहो तो सर-ए-अर्श बुला कर महबूब, एक ही रात में महराज करा देते हो! तुम इक गोरख धंदा हो जो कहता हूं माना तुम्हें लगता है बुरासा फिर भी है मुझे तुमसे बहरहाल गिला सा चुपचाप रहे देखते तुम अर्श-ए-बरी पर तपते हुये करबल में मुहम्मद का नवासा किस तरह़ पिलाता था लहू अपना वफ़ा को खुद तीन दिनों से वो अगरचे था प्यासा दुश्मन बहरतौर थे दुष्मन मगर अफसोस, तुमने भी फराहम ना किया पानी जरा सा हर जुल्म की तौफिक़ है जालीम की विरासत मज़लूम के हिस्से में तसल्ली ना दिलासा कल ताज सजा देखा था जिस शक्ख्स़ के सर पर है आज उसी शक्ख्स़ के हाथों मे हिक़ासा ये क्या है अगर पूछूं तो कहते हो जवाबन इस राज़ से हो सकता नहीं कोई श़नासा तुम इक गोरख धंदा हो राहे तहक़ीक में हर गाम पे उलझन देखूं वही हालात और खयालात में अनबन देखूं बनके रह जाता हूं तस्व़ीर परिशानी की ग़ौर से जब भी कभी दुनिया दरपन देखूं एक ही ख़ाक से फितरत के तजादाद़ इतने कितने हिस्सों मे बटा एक ही आँगन देखूं कहीं जह़मत की सुलगती हुयी पतझड का समां कहीं रह़मत के बरसते हुये सावन देखूं कहीं फुंकारते दरिया, कहीं खामोश पहाड़ कहीं जंगल, कहीं सेहरा, कहीं गुलश़न देखूं खून रुलाता है यह तक़सीम का अंदाज मुझे कोई धनवान यहांपर कोई निर्धन देखूं जिनके हाथों मे फकत एक सुलगता हुआ सूरज़ रात की मांग सितारों से मुज्जयन देखूं कहीं मुरझाये हुये फूल है सच्चाई के और कहीं झूठ के काटों पे भी जोबन देखूं रात क्या शय्है सवेरा क्या है, ये उज़ाला क्या, अंधेरा क्या है मै भी नाईब हूं तुम्हारा आखि़र तुम ये कहते हो तेरा क्या है? तुम इक गोरख धंदा हो
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
नृत्य
संगीत
धर्म
इतिहास
वाङ्मय
कथा
कविता
प्रेमकाव्य
भाषा
तंत्र
शिक्षण
रेखाटन
स्थिरचित्र
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
सद्भावना
शुभेच्छा
आस्वाद
अनुभव
माहिती
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
36431 वाचन

💬 प्रतिसाद (97)

प्रतिक्रिया

कव्वाली आवडली!

ऋषिकेश
गुरुवार, 06/07/2012 - 09:26 नवीन
कव्वाली आवडली!

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 06/07/2012 - 10:19 नवीन
कव्वाली आवडली. अपनी पेहचान की खातीर है बनाया सबको, सब की नज़रों से मगर खुद को छुपा के रक्खा है तुम एक गोरख धंदा हो स्सही. -दिलीप बिरुटे
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

छान. गोरख - गोरख या नावाचा

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 06/07/2012 - 09:42 नवीन
छान. गोरख - गोरख या नावाचा अर्थ एका सत्पुरुषांनी असा सांगितला होता की गोरख हे नाव मूळ श्रीकृष्णाचे म्हणजे (गो म्हणजे धेनू त्या राखणारा गोरख हा एक लौकीक अर्थ झाला) गो म्हणजे इंद्रिये जो इंद्रियांवर नियंत्रण ठेऊन आहे तो म्हणजे जितेंद्रीय असा योगेश्वर श्रीकृष्ण. गोरखनाथांनाही हे नाव केवळ शेणातून जन्मलेला अशा अर्थापेक्षा इंद्रिय जिंकलेला अशाच अर्थाने जास्त लागू पडतो.

गोरख हे नाव मूळ श्रीकृष्णाचे

यकु
गुरुवार, 06/07/2012 - 09:59 नवीन
गोरख हे नाव मूळ श्रीकृष्णाचे
आणि गाईच्या पोटात 33 कोटी देव ! मग कृष्‍ण कन्हैय्या गाई राखणारच.
गोरखनाथांनाही हे नाव केवळ शेणातून जन्मलेला
फक्त तसं म्हणायची एक पद्धत, दृष्‍टांत - शेणातून आले म्हणजे कुठून आले? तर गाईच्या पोटातून. नाथपंथात कशाचंही काहीही होऊ शकतं. :) पुपे पण गोरखनाथांचा जन्म गाईच्या पोटातून झाला हे मात्र आत्ताच कळलं - मी अजून नवनाथ अवतारांबद्दलची पोथी (ही फक्त मराठी भाषेतच आहे असं कुठेतरी वाचलं) वाचलेली नाही, वडलांना अशात कुणीतरी वाचायला सांगितलीय म्हणे, त्यांना विचारावं लागेल वाचतायत की नाही आणि मलाही वाचावी लागणार आहे.

गाईच्या पोटातून नाही.

मन१
गुरुवार, 06/07/2012 - 11:16 नवीन
अंधुकशी आठवणारी कथा लिहितोयः- महागुरु, आदिनाथ शंकराचे थेट शिष्य मत्स्येंद्रनाथांना कुठल्याशा विवाहित जोडप्याने नवस केला मुलगा होउ दे, तुम्हाला अर्पण़ करिन वगैरे. त्यांनी तसे व्हावे म्हणून आशिर्वादरूपी / प्रसादरूपी एक विभूती/दिव्यभुकटी दिली. त्या स्त्रीस काय बुद्धी झाली कुणास ठाउक. तिने ती विभूती नाथ महाराज जाताच धाडकन शेणात टाकली. काही वर्षांनी आपल्या कृपेने झालेला पुत्र परत मागण्यास मच्छिंद्रनाथ/ मत्स्येंद्रनाथ आले. त्यांना विभूती शेणात टाकली गेल्याचे समजले. तत्क्षणी ते घरामागच्या शेणाने भरलेल्या गोठ्यात जाउन "चल बेटा गोरख, ऊठ मोठा झालायेस आता" असे म्हणताच गाईच्या शेणातून(की शेणाच्या/गोवर्‍यांच्या राखेतून?? ) एक तेजस्वी युवक बाहेर आला. ब्रम्हचर्याचे तेज** त्याच्या चेहर्‍यावर्,कांटीवर झळकत होते. मत्स्येंद्रनाथ त्याला घेउन निघून गेले. पुढे काही काळाने खुद्द मत्स्येंद्रनाथच एका स्त्रीराज्यात* भ्रमित होउन अडकले, मूळ नाथपंथी रूप विसरले. तेव्हा ह्याच त्यांच्या शिष्याने, गोरखनाथाने महत्प्रयासाने त्यांना परत आणले. लोककथा म्हणते त्यानुसार त्यांनी नर्तन्-वादन करणार्‍याच्या वेशात स्त्री राज्यात प्रवेश केला आणि तिथे ढोल्/ मृदुंग वाजवतानाच त्यातून "चल मच्छिंदर गोरख आया" असा ध्वनी उमटला. गुरु-शिष्य भेट होताच स्व-रूपाची जाणीव होउन मच्छिंद्र परतले. ह्या सगळ्या कथेचा आधार काय ठाउक नाही. मौखिक परंपरेत अगदि लहानपणी ऐकलेल्या गोष्टींपैकी एक आहे. ह्यातला आध्यात्मिक म्हटला जाणारा अर्थही समजलेला नाही. ह्याच कथेची पुढची व्हर्जन चोप्य पस्ते करतोय. http://mr.upakram.org/node/1372#comment-22279 प्रेषक विसुनाना (मंगळ, 08/05/2008 - 08:24) रा.चिं. ढेरेंच्या 'नाथ संप्रदायाचा इतिहास' मधून आठवेल तसे - मच्छिन्द्रनाथ मजल-दरमजल करीत देशाटन करत असता आंध्रप्रदेशातील श्रीशैलम येथे पोचले. तेथे तांत्रिक योगिनींचा एक मठ होता.या योगिनी सदासर्वकाळ विवस्त्र रहात असत. (त्यांचे केस इतके घनदाट आणि लांबसडक असत की त्यांची शरीरे झाकली जात.) या योगिनींनी मच्छिन्द्रांना हटयोगातील वेगवेगळ्या आसनांचे आव्हान दिले. त्यातील बरीच आसने त्यांनी केली. परंतु 'उर्ध्वरेता'(http://en.wikipedia.org/wiki/The_Perfect_Matrimony#cite_note-8) या प्रकारात स्त्रीसंग अपेक्षित असतो. तो करताना ते मायेच्या बंधनात अडकले. पुढे १२ वर्षे ते त्या योगिनींच्या जाळ्यात अडकले. तेंव्हा त्यांना सोडवण्यासाठी त्यांचा शिष्य गोरक्ष तिथे पोचला. त्यालाही त्याच आव्हानांना सामोरे जावे लागले. 'उर्ध्वरेता' सकट सर्व आसने करून त्यांनी मच्छिंद्रांची मुक्ती मिळवली. *स्त्री राज्य म्हणजे जिथे सर्व कारभार स्त्रिया करतात असे काहिसे. **ह्याचा नक्की अर्थ ठाउक नाही.
↩ प्रतिसाद: यकु

नाथपंथी म्हणजेच शाक्तपंथीय

प्रचेतस
गुरुवार, 06/07/2012 - 11:20 नवीन
नाथपंथी म्हणजेच शाक्तपंथीय का? तांत्रिक पूजेवर विश्वास असणारा हाच पंथ काय?
↩ प्रतिसाद: मन१

बहुतेक नाही.

मन१
गुरुवार, 06/07/2012 - 11:23 नवीन
बहुतेक नाही. ह्यांना शाक्तपंथासारखा स्वैराचार्,वामाचार किंवा व्य्भिचार मान्य नव्हता. शाक्त म्हणजे बहुतेक ते पाच "म" वाले. मदिरा,मथुन, मदिराक्षीचा तडकून उपभोग घ्यायचा असा काहितरी फंडा आहे.
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मै कहां हूं?

कापूसकोन्ड्या
गुरुवार, 06/07/2012 - 10:30 नवीन
..मै कहां हूं?

..मै कहां हूं? सौदी अरेबिया!

यकु
गुरुवार, 06/07/2012 - 11:11 नवीन
..मै कहां हूं?
सौदी अरेबिया! त्या मुक्त विहारींची आणि तुमची ओळख आहे की नाही? ते पण सऊदीमध्येच आहेत म्हणे ;-)

मै कहां हूं?

कापूसकोन्ड्या
गुरुवार, 06/07/2012 - 20:48 नवीन
मै कहां हूं? हे एक एक्स्प्रेशन आहे प्रश्न नव्हे. '' May I ask your name?'' सारखे वाक्य हे expression आहे असो. मला यातलं काहीही *ट किंवा *टा सुद्धा कळले नाही म्हणून मै कहां हूं? पुन्हा असो. -पुलेशु.
↩ प्रतिसाद: यकु

मै कहां हूं? हे एक

यकु
गुरुवार, 06/07/2012 - 21:26 नवीन
मै कहां हूं? हे एक एक्स्प्रेशन आहे प्रश्न नव्हे. '' May I ask your name?'' सारखे वाक्य हे expression आहे असो.
सो व्हॉट वॉज दी प्रॉब्लेम?
↩ प्रतिसाद: कापूसकोन्ड्या

शब्द

राजेश घासकडवी
गुरुवार, 06/07/2012 - 21:34 नवीन
प्रॉब्लेम हा की तुम्ही आत्तापर्यंत शब्द निरर्थक असतात; भावना, अनुभूती महत्त्वाच्या असतात असं म्हणत आला आहात. अशी विचारसरणी असताना भावना लक्षात न घेता निव्वळ शब्दांचा वरवरचा अर्थ घेऊन उत्तर देणं तुमच्याच विचारांशी विसंगत आहे. अशी विसंगती दिसली की प्रॉब्लेम जाणवतोच.
↩ प्रतिसाद: यकु

प्रॉब्लेम हा की तुम्ही

यकु
गुरुवार, 06/07/2012 - 22:15 नवीन
प्रॉब्लेम हा की तुम्ही आत्तापर्यंत शब्द निरर्थक असतात; भावना, अनुभूती महत्त्वाच्या असतात असं म्हणत आला आहात. अशी विचारसरणी असताना भावना लक्षात न घेता निव्वळ शब्दांचा वरवरचा अर्थ घेऊन उत्तर देणं तुमच्याच विचारांशी विसंगत आहे. अशी विसंगती दिसली की प्रॉब्लेम जाणवतोच.
हाऊ कॅन आय एंटर इन अदर पर्सन सर? इज देअर एनि वे टू गिव्ह अनुभूती टू अदर पर्सन? माय गुरु वॉज ए ग्रेट विझार्ड - ही हॅड दॅट स्कील टू एन्क्रोच अॅण्‍ड शो दी रिअल थिंग. आय अॅम हेल्पलेस. मग मला शब्द वापरून घुसावं लागतं - मी माझ्यात घुसण्याच्या प्रयत्न करतो - आय ले माय सेल्फ इन ओपन अँण्‍ड टॉर्चर इट टू सी इफ भावना लक्षात येतायत का? हुज धीज भावना आर?
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

ऑ?

राजेश घासकडवी
Fri, 06/08/2012 - 00:46 नवीन
शरीरात शिरणं, मनात शिरणं वगैरे कशाला लागतं? 'मै कहॉं हू?' या शब्दप्रयोगांचा उपयोग खरोखरच 'मी कुठे आहे' हे विचारण्यासाठी नाही हे स्वयंस्पष्ट आहे. इतकंच. तुम्ही त्या शब्दांमधले दाणे शोधण्याऐवजी फोलपटं निवडली. तुमचा चॉइस. विसंगती आहे इतकं मान्य करा एवढंच म्हणणं आहे. यु शुड फॉलो व्हॉट यू प्रीच.
↩ प्रतिसाद: यकु

राम कृष्ण हरी गोविंद मुरारी

कापूसकोन्ड्या
Fri, 06/08/2012 - 11:38 नवीन
हाऊ कॅन आय एंटर इन अदर पर्सन सर? इज देअर एनि वे टू गिव्ह अनुभूती टू अदर पर्सन? माय गुरु वॉज ए ग्रेट विझार्ड - ही हॅड दॅट स्कील टू एन्क्रोच अॅण्‍ड शो दी रिअल थिंग. आय अॅम हेल्पलेस. मग मला शब्द वापरून घुसावं लागतं - मी माझ्यात घुसण्याच्या प्रयत्न करतो - आय ले माय सेल्फ इन ओपन अँण्‍ड टॉर्चर इट टू सी इफ भावना लक्षात येतायत का? हुज धीज भावना आर?
काही वाक्प्रचार आठवले. एकच लक्षात येतो, बाकीचे विसरले. मै कहाँ हूं ?
भावना लक्षात न घेता निव्वळ शब्दांचा वरवरचा अर्थ घेऊन उत्तर देणं.
↩ प्रतिसाद: यकु

प्रथमच

मन१
गुरुवार, 06/07/2012 - 11:19 नवीन
प्रथमच यकुज लेख नीट,पूर्ण वाचला.

नर्मदे हर

सहज
गुरुवार, 06/07/2012 - 11:23 नवीन
खरबूज कापून त्याचं अर्धं भक्कल न तोडता खायला लाऊन त्याद्वारे योगसाधनेच्या बळावर नाथांनी स्वत:चा डावा मेंदू माझ्या मेंदूत आरोपित केला, त्यांचा स्वत:चा देह महेश्वरहून अमरकंटकला जाऊन विसर्जीत केला. मला कशातलं काही कळत नाही, आणि मी वाद घालत नाही. उगाच रोजचा टकुर्‍याला ताण नको. - श्री श्री साईविलास

म्हणजे नवरत्ननाथ गेले?

विसुनाना
गुरुवार, 06/07/2012 - 11:51 नवीन
म्हणजे नवरत्ननाथांनी (देहरूपाने) इहलोकीची यात्रा संपवली? अरेरे, असे कसे झाले? नक्की काय झाले? महाराजांचा मृतदेह सापडला काय? मप्रच्या पश्चिम टोकापासून ते पूर्व टोकापर्यंत (महेश्वर ते अमरकंटक) हा शेवटचा प्रवास त्यांनी का केला असावा? याचे गूढ वाटले.
↩ प्रतिसाद: सहज

मप्रच्या पश्चिम टोकापासून ते

यकु
गुरुवार, 06/07/2012 - 11:59 नवीन
अरेरे, असे कसे झाले? नक्की काय झाले? महाराजांचा मृतदेह सापडला काय?
नर्मदे हर ! मुर्दों को जो जिंदा कर दे अशा माणसाच्या मृत देहाचं काय झालं ही खरीतर गौण बाब आहे, त्यांनी मला कळवली नाही - फक्त खुंटीवर टांगलेल्या कपड्याकडे आणि वीजेच्या तारेकडे माझ्या नेत्रचेतनेला वळवून त्यांनी देह सोडलाय एवढंच माझ्यापर्यंत पोहोचवलं. वाईट वाटलं, शेवटी कितीही सिद्धपुरुष झाला तरी त्यांच्या देहाचं काय झालं हे मला कसं समजावं?
मप्रच्या पश्चिम टोकापासून ते पूर्व टोकापर्यंत (महेश्वर ते अमरकंटक) हा शेवटचा प्रवास त्यांनी का केला असावा?
पुनरपि जननं पुनरपि मरणं - पुनरपि माता उदरे शयनं. जातील कुठे?
↩ प्रतिसाद: विसुनाना

कदाचित तसे नसावे

विसुनाना
गुरुवार, 06/07/2012 - 12:14 नवीन
खुंटीवर टांगलेल्या कपड्याकडे आणि वीजेच्या तारेकडे माझ्या नेत्रचेतनेला वळवून त्यांनी देह सोडलाय एवढंच माझ्यापर्यंत पोहोचवलं
- याच अर्थ तुमच्या चेतनेला त्यांनी जाणीव करून दिली की यापुढे आपली देहरूपाने भेट नको. त्यांच्या मनात आले तर पुन्हा ते भेटतीलसुद्धा.
त्यांच्या देहाचं काय झालं हे मला कसं समजावं?
-म्हणजे तुम्हालाही त्यांच्या 'या जन्मातल्या' देहाच्या कायमस्वरूपी नष्ट होण्याची खात्री नाही.
पुनरपि जननं पुनरपि मरणं - पुनरपि माता उदरे शयनं.
-ते तर आहेच! शिवाय असा सिद्ध पुरुष 'माता-उदरे शयनं' न करताही आपला पडलेला देह उठवू शकतो. नाही का? बाकी मला तरी तुमच्या डोक्यात नक्की काय चाललंय ते कळत नाही. :(
↩ प्रतिसाद: यकु

- याच अर्थ तुमच्या चेतनेला

यकु
गुरुवार, 06/07/2012 - 12:27 नवीन
- याच अर्थ तुमच्या चेतनेला त्यांनी जाणीव करून दिली की यापुढे आपली देहरूपाने भेट नको. त्यांच्या मनात आले तर पुन्हा ते भेटतीलसुद्धा.
नक्कीच भेटतील.
-म्हणजे तुम्हालाही त्यांच्या 'या जन्मातल्या' देहाच्या कायमस्वरूपी नष्ट होण्याची खात्री नाही.
माझ्यासमोर दहन वगैरे झालेलं नाही, किंवा दहन झाल्याचं मला कुणी कळवलं नाही, म्हणून जे चेतनेद्वारे बुद्धीगम्य झालं ते मी मानलं. हे माझं इंटरप्रिटेशन चूक ठरावं आणि नाथांची त्यांच्या त्या सर्वहर देहातच भेट व्हावी असं मला वाटतंच.
-ते तर आहेच! शिवाय असा सिद्ध पुरुष 'माता-उदरे शयनं' न करताही आपला पडलेला देह उठवू शकतो. नाही का?
बिलकुल!
बाकी मला तरी तुमच्या डोक्यात नक्की काय चाललंय ते कळत नाही.
:(
↩ प्रतिसाद: विसुनाना

यकु मला कळल ते म्हणजे

jaypal
गुरुवार, 06/07/2012 - 13:30 नवीन
तुझ्या भेटीनंतरच त्यांनी देहत्याग केलाय. ( येवढा का रे शॉटदिलास त्यां पुण्यात्म्याच्या डोक्याला ? ;-))
↩ प्रतिसाद: यकु

बिवेअर !

यकु
गुरुवार, 06/07/2012 - 13:33 नवीन
बिवेअर ! :p
↩ प्रतिसाद: jaypal

या योगिनी सदासर्वकाळ विवस्त्र

यकु
गुरुवार, 06/07/2012 - 11:51 नवीन
मनोबा,
या योगिनी सदासर्वकाळ विवस्त्र रहात असत.(त्यांचे केस इतके घनदाट आणि लांबसडक असत की त्यांची शरीरे झाकली जात.)
असतील, अक्कमहादेवी आणि लल्लेश्वरी देखील वस्त्र वापरायच्या नाहीत असे वाचलेय. लल्लेश्वरी म्हणजेच जैनांच्या एका तीर्थंकरांपैकी एक असंही म्हटलं जातं. जैन तीर्थंकर नग्न असतात.
परंतु 'उर्ध्वरेता' या प्रकारात स्त्रीसंग अपेक्षित असतो.
झूठ है! म्हणजे एक पुरुष आणि स्त्री खरोखर संग करतात असे नव्हे, पुरुष आणि स्त्री हे द्वैत संपलं की ते जे Living Organism शिल्लक राहिल त्याला काय म्हणणार? इव्हन जो या मार्गावरुन चालतो त्याला तो पुरुष असला तरी त्याने स्वत:ला पुरुष मानणं अपेक्षित नसतं, तो मानत नसतोच. अशा अवलिया, फकीर माणसांनी खरोखरची स्त्री शोधायची कुठे? सो उर्ध्वरेतनात स्त्रीसंग अपेक्षित असतो इज ए बोगस फोकलोर. हां, मच्छिंद्रनाथ निश्चितच विवस्त्र योगीनींच्या राज्यात गेले असतील आणि योगीनींनी त्यांना हठयोगातील आसनांचे आव्हानही दिले असेल, बट नॉट इन दी सेन्स ऑफ मेल- फिमेल इंटरकोर्स. उर्ध्वरेतन करु शकतोस तर दाखव बरं मग ! असं काही झालं असेल. मच्छिंद्रनाथांची जस्ट एक सदिच्छा भेट दिली असेल योगीनींना. एरव्ही दिसायला स्त्री-पुरुष असले म्हणून काय त्यांनी भेटू पण नये का? मच्छिंद्रनाथ योगीनींच्या राज्यात रमले म्हणजे स्त्री-पुरुषांमध्ये शारीरिक संग वगळताही अख्ख्या जगभरातल्या गोष्‍टी असतातच की. योगीनींनी चांगला स्वयंपाक केला असेल, प्रेमानं खाऊ घातलं असेल - चर्चा केली असेल - म्हणून रमले असतील. आणि ज्या मच्छिंद्रनाथांनी ओज-तेज ही वस्तू उदीच्या रुपात देऊन, ती शेणात पडूनही गोरक्षनाथांचा जन्म झाला त्या मुलानेच बापाला काही शिकवावं हे असंभव. म्हणूनच लल्लेश्वरी जैनांचा एक पुरुष तीर्थंकर होऊ शकणं स्वाभाविक वाटतं, कट्टर जैनांना पटो न पटो. लल्लेश्वरीच जैनांच्या तीर्थंकरांपैकी आहेच असा बराच रेटा ओशोने लावलाय - हे ओशो मूळचे जातीने जैनच होते हे आणखी एक.

यकुजी

विसुनाना
गुरुवार, 06/07/2012 - 11:59 नवीन
माझ्याकडे फार पूर्वी प्रकाशित झालेले (म्हणजे १९४२ साली) 'पतंजली योगदर्शन' आहे. त्यातील मूळ शब्दात (असेल तर संस्कृत श्लोकासह) 'ऊर्ध्वरेता' म्हणजे नक्की काय ते इथे सांगतो. -->>आता आठवते त्याप्रमाणे, स्त्री योनीत सोडलेले वीर्य शिस्नाद्वारे परत खेचणे ही क्रिया 'ऊर्ध्वरेता' म्हणून ओळखली जाते. यात स्त्रीसंग अपेक्षित आहे असे वाटते. चुभूद्याघ्या <<--
↩ प्रतिसाद: यकु

हे असं पाहिजे - आता आठवते

यकु
गुरुवार, 06/07/2012 - 12:07 नवीन
हे असं पाहिजे - आता आठवते त्याप्रमाणे, स्त्री योनीत सोडलेले वीर्य शिस्नाद्वारे परत खेचणे ही क्रिया 'ऊर्ध्वरेता' म्हणून ओळखली जाते. यात स्त्रीसंग अपेक्षित आहे असे वाटते. चुभूद्याघ्या ;-) उर्ध्वरेतनात स्त्री योनीत वीर्य वगैरे शिस्नाद्वारे वीर्य सोडलं जात नाही, बाहेर ओढण्याचा प्रश्नच नाही. डोळ्यांतून जितक्या सहज अश्रू बाहेर पडतात तितक्याच सहज वीर्य, वीर्य कोशिकांमधून स्रवणे आणि उर्ध्व म्हणजे सहस्रारात जाणे हे उर्ध्वरेतन. अर्थातच यासाठी योग्यांना ध्यानसाधना करावी लागते - ट्रायल अॅण्‍ड एरर इथेही असेलच. नाथ भेटेपर्यंत माझ्याकडे ध्यान होतं, हे उर्ध्वरेतन वगैरे माझ्या साधनेचा भाग नाही - नाथांच्या दीक्षा कृपेचा आहे.
↩ प्रतिसाद: विसुनाना

माझ्या दृष्टीने

विसुनाना
गुरुवार, 06/07/2012 - 12:19 नवीन
तुम्ही ठळक केलेला ठशातला मजकूर माझ्या दृष्टीने तसा ठळक असू नये. तो मजकूर माझ्या दृष्टीने पांढर्‍या ठशातच हवा आहे. हे झाले माझे स्पष्टीकरण. बाकी तुम्हाला काय योग्य वाटते ते तुम्ही केलेच आहे. :)
↩ प्रतिसाद: यकु

हाहाहा काळं - आणि पांढरं सेमच

यकु
गुरुवार, 06/07/2012 - 12:32 नवीन
हाहाहा काळं - आणि पांढरं सेमच हो विसूनाना.
↩ प्रतिसाद: विसुनाना

सम्यक दृष्टी

विसुनाना
गुरुवार, 06/07/2012 - 13:56 नवीन
काळं आणि पांढरं एकच दिसतं ते तुम्हासारख्या सम्यक दृष्टीच्या महान योगी पुरुषांना. आम्हाला मात्र काळं ते काळं दिसतं आणि पांढरं ते पांढरंच! . ;)
↩ प्रतिसाद: यकु

माफ करा. आता राहवत नाही. एक

गवि
गुरुवार, 06/07/2012 - 12:46 नवीन
माफ करा. आता राहवत नाही. एक मूलभूत शंका विचारतो. हाय काँटेक्स्ट चर्चेत ती मूर्खपणाची ठरु शकते. योनीत सोडलेलं वीर्य शिश्नाद्वारे परत खेचणं किंवा सोडण्यापूर्वीच ते वीर्य उर्ध्व म्हणजे सहस्रारात धाडणे या दोन्ही गोष्टींना काय अर्थ आहे? असं कशाला करायचं? वीर्य जिथे आपोआप जातंय ती जागा टाळून पाटबंधारे विभागाप्रमाणे अन्यत्र वळवण्याचे हे प्रयत्न कशासाठी? त्यातून काय सिद्धी / साध्य होतं? धन्यवाद.
↩ प्रतिसाद: यकु

वीर्य जिथे आपोआप जातंय ती

यकु
गुरुवार, 06/07/2012 - 13:01 नवीन
वीर्य जिथे आपोआप जातंय ती जागा टाळून पाटबंधारे विभागाप्रमाणे अन्यत्र वळवण्याचे हे प्रयत्न कशासाठी? त्यातून काय सिद्धी / साध्य होतं?
संन्यास घेतल्यानंतर प्रत्यक्ष स्त्री संगाचा शास्‍त्राने निषेध केला आहे. पाटबंधारे विभागाप्रमाणे अन्यत्र वळविण्याचे प्रयत्न अशासाठी की त्यालाच पंथ, साधना (ऑनगोईंग प्रोसेस), रिअलायझेशन, ईश्वरप्रणिधान म्हटलं गेलंय.
वीर्य उर्ध्व म्हणजे सहस्रारात धाडणे या दोन्ही गोष्टींना काय अर्थ आहे? असं कशाला करायचं
करायचं नाही, आत्मा मुक्त झाला असला तरी तो देहामध्‍ये, देहधारी असतोच - मुक्त झालेल्या आत्म्याच्या देहातही निसर्गनियमाप्रमाणे वीर्य वगैरे सगळ्या गोष्‍टी निर्माण होतातच. म्हणून उर्ध्वरेतनाद्वारे ते सहस्रारात न्यायचं. आणि तपसंचय करुन माझ्यासारख्याला दीक्षा द्यायची, मुक्तीच्या मार्गाने अग्रसर करायचं.
↩ प्रतिसाद: गवि

आईच्या गावात

jaypal
गुरुवार, 06/07/2012 - 13:38 नवीन
या अश्या रेतन पध्द्तिने पुरुषांची पण डोहाळ जेवण घालावि लागतिल. ;-) तो निसर्ग चु* येड** आहे. त्याला आक्कलच नाही उगाचच त्याने प्रजनन अंगांची निर्मीती केली.
↩ प्रतिसाद: यकु

निसर्गाची माय कशाला

यकु
गुरुवार, 06/07/2012 - 13:50 नवीन
निसर्गाची माय कशाला उद्धरताय;-) प्रजनन अंगे नीट कामं करतायत तरी कशाला तापताय उगाच? निसर्ग आपला गप राहून सगळ्याच मार्गांनी सक्रिय असतो, गप पडून रहा.
↩ प्रतिसाद: jaypal

यशवंत्या,

पैसा
गुरुवार, 06/07/2012 - 14:10 नवीन
तू अजून संन्यास घेतलेला नाहीस. तुझ्या आईची परवानगी घेतलीस का कधी? साक्षात आदिशंकराचार्यांना सुद्धा आईची परवानगी मिळवावी लागली होती. सगळे आश्रम क्रमाने भोगून झाले की संन्यास घ्यायचा अशी खरी तर पद्धत. उड्या मारू नको. :P
↩ प्रतिसाद: यकु

हाहाहा बरं आईसाहेब

यकु
गुरुवार, 06/07/2012 - 14:12 नवीन
हाहाहा बरं आईसाहेब ;-)
↩ प्रतिसाद: पैसा

छानच. हे असे धागे अन त्यात

शिल्पा ब
गुरुवार, 06/07/2012 - 12:09 नवीन
छानच. हे असे धागे अन त्यात चेंगटांचा मृत्युचा धागा असं सगळं वाचुन एकदम संन्यास घ्यावासा वाटतोय. कदाचित घेतलाही असेल...शरीर घरीच ए पण आत्म्याने संन्यास घेतलाय. (आत्मा म्हणजे आत्मु नव्हे तर शरीरात वसणारा एक घटक असतो म्हणे..) असो. एक मात्र झालं..मिपावर अशा संन्यासी/ अध्यात्मिक वृत्तींच्या लेखांचा एकदम सुकाळु होउन गेलाय एवढं मात्र खरं!

हे असे धागे अन त्यात

यकु
गुरुवार, 06/07/2012 - 12:47 नवीन
हे असे धागे अन त्यात चेंगटांचा मृत्युचा धागा असं सगळं वाचुन एकदम संन्यास घ्यावासा वाटतोय
एकदम योग्य वाटतंय - भवानीला :p संन्यासच घ्‍यावा वाटणार!
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

मला वाटते आता यशवंत एक

जयंत कुलकर्णी
गुरुवार, 06/07/2012 - 12:15 नवीन
मला वाटते आता यशवंत एक काल्पनिक कथा लिहितोय.............:-)

एका मुलाला चित्र काढायला

५० फक्त
गुरुवार, 06/07/2012 - 12:40 नवीन
एका मुलाला चित्र काढायला सांगितलं, गवत खाणारी गाय, अर्धा तासानं बाईनी पाहिलं, कागद कोराच, विचारलं - गवत कुठंय मुलगा - खाल्लं गाईनी बाई - गाय कुठाय मुलगा - ती कशाला थांबतीय, ती गेली पळुन कधीच.
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

'उर्ध्वरेतन' या क्रियेबद्दल

कवितानागेश
गुरुवार, 06/07/2012 - 12:34 नवीन
'उर्ध्वरेतन' या क्रियेबद्दल मुक्तानंदांनी त्यांच्या कुंडलिनी जागृती साधनेबद्दलच्या पुस्तकात सविस्तर लिहिले आहे.

एक कॉपी मला पाहिजे माऊ -

यकु
गुरुवार, 06/07/2012 - 12:43 नवीन
एक कॉपी मला पाहिजे माऊ - माझ्यात प्रॅक्टीकल होतंय - डॉक्युमेंटेशन अजून वाचलेलं नाहीय मी.
↩ प्रतिसाद: कवितानागेश

:)

गणपा
गुरुवार, 06/07/2012 - 13:09 नवीन
गेट वेल सुन.
किंवा
येशवंता लोकांच्या विकेटी घेणं कधी थांबवणारे कोण जाणे?
Whichever is applicable. ;)

गणाधिश जो इश सर्वा गुणांचा

यकु
गुरुवार, 06/07/2012 - 13:12 नवीन
गणाधिश जो इश सर्वा गुणांचा ;-) मी कुठे विकेटा काढतोय आं?
↩ प्रतिसाद: गणपा

गणपा साहेबांच्या मताशी सहमत. यकुसाहेब लवकर बरे व्हा.

निश
गुरुवार, 06/07/2012 - 13:52 नवीन
गणपा साहेबांच्या मताशी सहमत. यकुसाहेब लवकर बरे व्हा.
↩ प्रतिसाद: गणपा

थँक्यू.

यकु
गुरुवार, 06/07/2012 - 14:00 नवीन
थँक्यू.
↩ प्रतिसाद: निश

ऊर्ध्वरेता यावर सचित्र

JAGOMOHANPYARE
गुरुवार, 06/07/2012 - 13:11 नवीन
ऊर्ध्वरेता यावर सचित्र चर्चा झालेली आहे.

हो. चर्चा झालीय.

यकु
गुरुवार, 06/07/2012 - 13:29 नवीन
हो. चर्चा झालीय.
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE

कव्वाली छान आहे. . मधमाद

JAGOMOHANPYARE
गुरुवार, 06/07/2012 - 13:30 नवीन
कव्वाली छान आहे. . मधमाद सारंग रागात आहे.

http://www.youtube.com/watch?

JAGOMOHANPYARE
गुरुवार, 06/07/2012 - 13:59 नवीन
http://www.youtube.com/watch?v=IvZrk6mqSY8&feature=fvsr इथे अर्थ आहे.. गोरख धंदा ट्रिकी बिजनेस

शंकराच्या काळ्याभोर

यकु
गुरुवार, 06/07/2012 - 14:13 नवीन
शंकराच्या काळ्याभोर पिंडीसारख्या रंगावर इथलीच अक्षरे विभूतीच्या पांढर्‍या रंगात - उमटताना दिसत आहेत.- शिवशंभोचं भस्मलेपन सुरु आहे.
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा