✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

((मी सदस्य होणारच!))

अ
अन्या दातार यांनी
गुरुवार, 02/23/2012 - 19:58  ·  लेख
लेख
आमची प्रेरणा: http://www.misalpav.com/node/20789 आमच्या एका मित्राला तुम्ही कुणीच ओळखत नाही. दरवेळी अडचणीत सापडला किंवा एखाद्या नवीन ध्येय धोरणाने पछाडला गेला की आमचा हा मित्र, हा सखा, सुहृद आमच्याकडे धाव घेत असतो. त्याच्या दृष्टीने तो म्हणजे सुदामा आणी मी म्हणजे कृष्ण, तो म्हणजे हृतीक आणि मी म्हणजे राकेश, तो म्हणजे ओमार अब्दुल्ला आणि मी म्हणजे शेख अब्दुल्ला, तो म्हणजे दीप दासगुप्ता आणि मी म्हणजे गांगुली असे बरेच काय काय आहे. त्यामुळे आज सकाळी सकाळी त्याने अवकाळी पावसासारखे पिंग केल्याचे आम्हाला मुळीच आश्चर्य वाटले नाही. "झाली का प्लेसमेंट?" त्याचा सवाल अस्मादिकः "नाही रे" "छान! आधी असलेला जॉब सोडायचा, अन मग जरा कुठे प्रगती होतेय असं दाखवायचं अन २ वर्षांतच परत जॉबसाठी वणवण भटकायचं का?" "अरे दादा, चालायचंच." मी स्पष्टीकरण द्यायचा फुटकळ प्रयत्नात. अजुन विषय वाढवायला नको म्हणून मीच पुढचा प्रश्न टाकला "आज आमची कशी काय आठवण??" "का ? पिंग करायलापण आता तुझी परवानगी घ्यायची का ? का मित्र काम असल्याबिगर कसे पिंग करत नाहीत, कसे मॅनरलेस असतात ह्यावर एक लेख पाडायचाय?" "तसे नाही रे. पण तुझ्या बोलण्यावरुन काहीतरी निश्चय केल्यासारखे ठाम भाव वाटत आहेत, म्हणून विचारले." ह्या आमच्या वाक्याने मात्र त्याची कळी खुलली. (स्मायलीमुळे बरंच काय काय कळते, पण काही सदस्यांना त्यात काय खुपते कुणास ठावूक ;) ) "मिपाचा सभासद व्हायचे ठरवले आहे." ठरवले आहे ? हा सगळे परस्पर ठरवून मोकळा होतच असतो म्हणा. "अरे असा कसा थेट सदस्य होशील ? ग्रुपमध्ये तुझ्या कॉमेंट्सना कुणी भावसुद्धा देत नाही. तुझे लिखाण वाचायला शाळेत सायन्सचे सरदेखील घाबरायचे." अजुन काही गोष्टी त्याला स्पष्टपणे सांगितल्या असत्या, पण मुद्दामच अस्पष्ट राहिलो. "अरे ढापण्या ! किती अकलेचे तारे तोडायचे ? अंपायर व्हायला, त्या खेळातले वर्ल्ड रेकॉर्ड नावावरती असण्याची गरज असते का? माइक बनवणार्‍याला गाणे गाता येण्याची गरज असते का ? किरवंताला आधी स्वतः लाकडावरती झोपायची सवय असावी लागते का? सदस्य होण्यासाठी भरभरून आणि वाचनीय प्रतिसाद लिहिण्याची, खूप सारे प्रतिसाद मिळण्याची गरज असते असे कोणी सांगितले तुला ? आणि प्रतिसाद काय, तुझ्या सारख्या फडतूस माणसाला देखील तुझ्या कंपूकडून मिळतातच की. " "अरे पण सदस्य होण्यासाठी अंगात काही गुण असावे लागतात, स्वभाव सुद्धा एका ठरावीक वळणाचा हवा. अजून बरेच काय काय असते. कसे समजावू तुला?" "ते समजवून घेण्यासाठीच आलो आहे तुझ्याकडे. तसेही रस्त्यावरचे काळे कुत्रे देखील तुला विचारत नाही. मीच एक आपला तुझ्यावरती दया करतो झाले. आता फालतूपणा बंद कर आणि काय काय आणि कसे कसे करावे लागेल ते चटचट बोल." 'आलीया भोगासी' ह्या न्यायाने आम्ही त्याला सल्ला द्यायला सिद्ध झालो. "बाबा रे, तुला आधी कुठला सदस्य व्हायचे आहे ते तू ठरवले आहेस का? " "हो ! पुरुष सदस्य" मित्राने मख्खपणे उत्तर दिले. "अरे $^$%#^%$ ! मी तुला स्त्री का पुरुष सदस्य असे विचारलेले नाही. तुला कोणत्या प्रकारचा सदस्य व्हायचे आहे ? सदस्यांमध्ये अनेक प्रकार असतात. नुसते सदस्य, चाय शिग्रेट वाले सदस्य, खव/खफ सदस्य, हेकट सदस्य, कंपूबाज सदस्य, ज्ञानी सदस्य, एकोळी सदस्य, वकिल सदस्य इ.इ.." "च्यायला, हे येवढे प्रकार असतात ? खुलासेवार डिट्टेल मध्ये सांग, म्हणजे मग तौलनिक अभ्यास करून ठरवता येईल की मी काय बनावे." सुहृदाने हुकूम सोडला. "कसे आहे, चाय शिग्रेटवाले सदस्य असतात ते आपले रोज चाय शिग्रेट मिळाली की खूश असतात. आपण बरे आपले काम बरे अशी ह्यांची वृत्ती. हे सदस्य असतात ते चार टाळकी सोडली तर बाहेर कुणाला माहिती नसते. फक्त हपिसातून फुकटात मिपा उघडायला मिळाले की बास! कधीही प्रतिसाद द्यायचा नाही, खरडींना उत्तर द्यायचे नाही हे त्यांचे लक्षण. नेहमीच वाचनमात्र राहतात. कंपूबाज सदस्य पूर्वी जनाधार वगैरे असे उदात्तीकरण करायचे म्हणे. हल्ली ट्रेंड बदललाय. हे नेहमीच संधीच्या शोधात असतात. पाकृ असो वा कविता; एखाद्या सदस्याला सळो की पळो करुन सोडायची किमया यांना साधलेली असते. त्यासाठी कधी कधी कंपूतल्याच एखाद्याचा बाजार उठवायला हे लोक मागे-पुढे बघत नाहीत. "आणि बाकीच्या सदस्यांचे काय ?" आमच्या माजोरड्या मित्राने आता चक्क स्वतःच्या फोनवरुन आम्हाला कॉल केला होता. याचा अर्थ घ्यायचा तो घेतला मी. "वत्सा.. आता आपण माहिती करून घेऊ पेश्शल सदस्य म्हणजे काय ते. ठरावीक विषयांतच त्यांचा हातखंडा असतो. त्याच व तेवढ्याच विषयांना वाहिलेल्या धाग्यांना प्रतिसाद देतात. यांची मते नेहमीच प्रस्थापित गृहितके वगैरे वगैरेला तडा देणारी असतात. कधीकधी परस्पर विसंगत विधाने करुनही त्यात संगती वगैरे असल्याचे भासवणे हे यांचे कौशल्य. खव/खफ सदस्य जे असतात ते सहसा स्त्री आयडी किंवा स्त्री-सदृश पुरुष आयडी असतात. यांच्या खरडवह्या या अतिसामान्य लोकांच्या डायरी सारख्या असतात; "मागील पानावरुन पुढे चालू" टाईपच्या.ऑफिस अवर्सपैकी काही तास मिपावरील खव/खफसाठी देतात. इतर सदस्यांनी आज डब्यात काय आणलंय, खवतील चित्र कसे गोग्गोड आहे.... इ. इ. खरडी करत बसतात. प्रतिसाद द्यायला नेहमीच वेळ कमी असतो. वकिल सदस्य, पेशाने वकिल आहेत काय? हा प्रश्न इतरांना पडतो. कारण कुठल्याही धाग्यावर कायद्याचे कुठलेसे कलम सांगत असतात. एकेकाळी अमेरिकेतील कायद्याच्या तरतूदीही सांगायचे. कालांतराने त्यांच्या मिपा सदस्यतेवर कोणी विरजण टाकले कुणास ज्यामुळे ते आता फ्रोयो होऊन बसलेत. एकोळी धागा सदस्य म्हणजे ट्विटरचे बापच जणू! एक-दोन फारफार तर तीन ट्विट्सचा मजकूर टंकून हे लोक धागे काढत असतात. त्यावरुन नेहमीच पाण उतारा झाल्याने ही जमात सध्या आपले अस्तित्व गमावून बसली आहे. हेकट सदस्य एखाद्या विषयाला वाहिलेले असूही शकतात किंवा नसूही शकतात. पण हेकटपणा हे त्यांच्या जालीय स्वभावाचे व्यवच्छेदक लक्षण. आपल्या मताशी सहमत असणार्‍या प्रतिक्रियांनाच 'धन्यवाद' 'थॅंक यू' अश्या उपप्रतिक्रिया देत सुटतात. विरोध करणार्‍या प्रतिक्रियांची दखल घेत नाहीत. कदाचित त्यांच्या तत्वातच बसत नसावे. सहृदयी (हे फक्त म्हणायलाच बरं का!) असतील दुसर्‍या संस्थळावर जातात व मिपावर वाचनमात्र राहतात. निबर असतील तर मात्र परत परत तसलेच धागे काढत राहतात. अश्या सदस्यांचे धागे हे विडंबकांसाठी उत्तम प्रतीचा कच्चा माल असतो. आता वळूयात ज्ञानी सदस्यांकडे. जे अगदी जेन्युइन लोक असतात. जंटलमन टाईपचे. वाळवीसुद्धा जेवढी पाने+लाकूड खात नाही त्याच्या दसपट पुस्तके यांनी खाल्लेली असावीत. अफाट विचारशक्ति असते. सोशल असतात. एखादी लेखमाला पूर्ण करण्यासाठी यांच्या मागे पराकाष्ठेने लागावे लागते. या प्रकारच्या सदस्यांमुळेच मिपावर आल्याचे सार्थक होते." 'हम्म्म असे असते काय?' मित्रवर्य मोठे गहन विचारात गढलेले दिसले. "आता मला सांग तुला कुठला सदस्य व्हायचे आहे?" "पण मी काय म्हणतो... राहू दे, ह्यावर तुझ्याशी चर्चा करून फायदा नाही. मी ठेवतो आता." असे बोलून आणि त्याने फोन ठेवला. दुसर्‍या दिवशी मेल अकाउंट उघडून बघतो तर आमच्या दुसर्‍या एका मित्राचा मेल आलेला. उघडून बघतो तर काल ज्याने मला कॉल केला होता त्याने त्याची सर्व अकाउंट्स (चेपु, जी+ इ. इ.) कायमची बंद करुन टाकल्याचा मजकूर खरडलेला!!!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
मांडणी
वावर
विनोद
मुक्तक
इतिहास
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
माध्यमवेध
माहिती
आस्वाद
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
12776 वाचन

💬 प्रतिसाद (77)

प्रतिक्रिया

बाय बाय...

वपाडाव
Fri, 02/24/2012 - 15:21 नवीन
चला मी लगेच सुमडी शोधुन घुसुन घेतो... लॉग आउट केलंय रे लगेच... मला शोधु नका...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

बुंगाट विडंबन.

स्वातीविशु
Fri, 02/24/2012 - 11:33 नवीन
बुंगाट विडंबन. :D
  • Log in or register to post comments

चक्कीत जाळच

धमाल मुलगा
Fri, 02/24/2012 - 12:02 नवीन
काढलास मर्दा! :) पण्णंऽऽ...बंदूक ठासणीची है, दारुकाम जोरदार व्हाया पायजे. म्होरचा बार उडिवताना आधी दारु नीट दाबून ठासून भरा! बार कसा, दसर्‍याला मंडपाशी वाजतो तसा वाजला पायजे, उगं पट्टणकोडोलीच्या जत्रेतल्या कवठी फटाक्यागत करुन भागनार न्हाई आता. क्काऽऽय?
  • Log in or register to post comments

मस्त जमलाय लेख ... मुळ लेख

गणेशा
Fri, 02/24/2012 - 13:45 नवीन
मस्त जमलाय लेख ... मुळ लेख ओपन होत नाहि.
  • Log in or register to post comments

गणेशा.

मी-सौरभ
Fri, 02/24/2012 - 14:31 नवीन
मुळ लेख ओपन होत नाहि.
अभ्यास कमी पडतोय तुझा....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

अं हं...

वपाडाव
Fri, 02/24/2012 - 15:03 नवीन
मुळ लेख ओपन होत नाहि.
अभ्यास कमी पडतोय तुझा....
कमी नाही रे, मागे पडतोय... रोजाने भेट देत नाही तो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

अ‍ॅडजस्ट होत नसेल रे अथवा तो

प्यारे१
Fri, 02/24/2012 - 15:24 नवीन
अ‍ॅडजस्ट होत नसेल रे अथवा तो वरच्या कुठल्याही 'कॅटॅगरीत' बसत नसेल बघ ! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

@तो वरच्या कुठल्याही

अत्रुप्त आत्मा
Fri, 02/24/2012 - 16:22 नवीन
@तो वरच्या कुठल्याही 'कॅटॅगरीत' बसत नसेल बघ !>>> अबाबाबाबा...पालखितच बशिवलान... ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

आजून एक क्याटेगरी - फोटू दिसत

प्रचेतस
Fri, 02/24/2012 - 16:51 नवीन
आजून एक क्याटेगरी - फोटू दिसत नसणारे सदस्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

होय, सध्या तरी तो एकसदस्यीय

५० फक्त
Fri, 02/24/2012 - 17:11 नवीन
होय, सध्या तरी तो एकसदस्यीय पक्ष आहे, होतील कार्यकर्ते जमा हळु हळू..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

५०राव,

वपाडाव
Fri, 02/24/2012 - 17:26 नवीन
ह्या ज्वराने साथ पसरवण्यास सुरुवात केली आहे... बर्‍याच जणांना ह्या रोगाने ग्रासलेले आहे... हवं असल्यास मा. सं. गंपाला विचारा... लौकरच यांची हपिशियल निशाणी जालावर येइल... Image removed. किंवा Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

त्यातही २ उपगट आहेत.एकात

प्रचेतस
Fri, 02/24/2012 - 18:32 नवीन
त्यातही २ उपगट आहेत. एकात फोटू न दिसणारे पण त्याविषयी फारशी वाच्यता न करणारे सदस्य. फोटू न दिसणार्‍या बहुतेक सदस्यांचा समावेश या गटात असतो. दुसर्‍या गटात फोटू न दिसण्याची सतत वाच्यता करणारे सदस्य असतात. जो सध्यातरी एकसदस्यीयच गट आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

शिवाय

पैसा
Fri, 02/24/2012 - 18:35 नवीन
इनो घ्यावं लागेल म्हणून फोटु दिसत नाहीत असा कांगावा करणारा आणखी एक उप उप गट आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

छान चाल्लंय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 02/24/2012 - 16:37 नवीन
सदस्य प्रकारात अजुन माल भरायला पाहिजे होता. लै नमुने बाकी आहे. :) -दिलीप बिरुटे (म.संस्थळावर असलेला कोणता तरी एक नमुना) :)
  • Log in or register to post comments

सर्व प्रतिसादकांचे

अन्या दातार
Fri, 02/24/2012 - 17:07 नवीन
सर्व प्रतिसादकांचे आभार. गेंडा म्हणाले की मंगळागौर करणारे सदस्य यात आलेले नाहीत. खरंतर ही कुठलीही सदस्य कॅटेगरी नाही. त्यात वेगवेगळे प्रकारचे सदस्य येऊ शकतात. काही सदस्यांनी (आता कै. झालेल्या) मूळ लेखातील वाक्ये जशीच्या तशी उचलल्याचे निदर्शनास आणून दिले. पण हे एक गद्य विडंबन असल्याने त्याचा मुख्य आकृतीबंध किंवा ढाचा तोच ठेवून कर्ता बदलला जातो. काव्य विडंबनात जरा वेगळा प्रकार असतो. तिथे कवितेचा छंद. किंवा मीटर तेच ठेवून विषय बदलला जातो. आता बघूयात काही गद्य विडंबनांची उदाहरणे, ज्यातून मला काय सांगायचे आहे ते स्पष्ट होईल. लेख क्र. १ ----> विडंबन क्र. १ लेख क्र. २ ---> विडंबन क्र. २ लेख क्र. ३ ---> विडंबन क्र. ३ मा. यकुशेठ येडे(बनव)कर म्हणतात कि अभ्यास कमी पडतोय, पण विडंबन करायची आत्यंतिक उबळ आल्याने शक्य तेवढे प्रकार लिहिण्यात आले. आणि म्हणूनच ह्या इतक्या सदस्यांच्या पसार्‍यातून फुटकळ सदस्यांना वगळण्यात आले आहे. वल्लीशेठ जोन्स यांनी हुच्चभ्रू हा प्रकार वगळल्याचे सांगितले. पण नुकतेच एक आख्खे काव्य त्या प्रकारच्या सदस्यांना अर्पण केल्याने मुद्दाम या लेखात स्थान दिले नाही.
  • Log in or register to post comments

मस्त चुरचुरीत ,खुसखुशीत

निनाद मुक्काम …
Sat, 02/25/2012 - 04:13 नवीन
मस्त चुरचुरीत ,खुसखुशीत विडंबन झाले आहे. पु ले शु
  • Log in or register to post comments

झकास मारलीत! उत्तम विडंबन

डॉ.श्रीराम दिवटे
Sat, 02/25/2012 - 08:56 नवीन
झकास मारलीत! उत्तम विडंबन झाले आहे. शाब्बास, सर्व सद्स्यांचा विजय असो.
  • Log in or register to post comments

हा हा हा !! आवडले , बाकी अजुन

सुहास..
Sat, 02/25/2012 - 13:43 नवीन
हा हा हा !! आवडले , बाकी अजुन सदस्य-प्रकार राहिले ;)
  • Log in or register to post comments

कुठले रे कुठले, अ‍ॅडव ना इथे.

प्रचेतस
Sat, 02/25/2012 - 13:49 नवीन
कुठले रे कुठले, अ‍ॅडव ना इथे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

बाकी अजुन सदस्य-प्रकार राहिले

अन्या दातार
Sat, 02/25/2012 - 14:02 नवीन
बाकी अजुन सदस्य-प्रकार राहिले
ते तर मी वरच्या प्रतिसादातही मान्य केलेच आहे की. अन वल्ली म्हणतो तसे अ‍ॅडव तु पण. वरती सूड, वप्या, पिवशी यांनीही मौलिक भर घातलीच आहे की. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

अन्या भौ , माझे टोमणे लोक्स '

सुहास..
Sat, 02/25/2012 - 16:47 नवीन
अन्या भौ , माझे टोमणे लोक्स ' विनोद-बुध्दी ' ने घेत नाहीत म्हणे, म्हणून सदस्य - प्रकार लिखाण आटोपते घेतो आहे, पण एक प्रकार मात्र सांगण्याचा मोह आवरत नाहीये ;) हे सदस्य म्हणजे ' आंतरजालीय सख्याहारी ' ( शब्द प्रयोग दुष्मन-ए-जान कडुन न सांगता उधार !! ) गूण विषेश : १ ) स्त्री - आय डी चा , मग तो एकोळी, फालतु का धागा असेना धावत-पळत जावुन प्रतिसाद देणे, मग त्या प्रतिसादाची लिंक खव/व्यनी मध्ये देणे , एकदा उत्तर आले की मग चर्चेला सुरूवात होते.. ( हे गुण- विशेष आमच्या देखील वाट्याला आलेले आहे. त्याचे कारण म्हणजे आमचे नाव, त्या महाभागाला असा गैर समज झाला की मालक माझ्याशी पार फ्लर्ट कराया लागल, शेवटी मला त्याला सांगाव लागल की बाळ मी स्त्री आयडी नसून पुरुष आय डी आहे. स्साला आंजावरूनच गायब झाल त्यानंतर ;) ) २ ) हजर सभासद मध्ये नाव पाहिले की मग खरड/ व्यनी मारणे. उत्तरा दाखल काही ही मिळाले की सरळ- सोट ओळख-पाळख वाढवायचा कार्यक्रम हाती घेणे, मग चेपू/नंबर/गबोल वर टिपी करत बसणे ...उद्देश . निरूद्देश ...काही का असेना ...चालायचेच ( आमच्या ओळखीतील एक चांगली प्रतिमा असलेले सदस्य सध्या या गोष्टीत बिझी आहेत, पण समोरचा जो स्त्री आयडी आहे, त्याची अडचण झाली आहे, तोंडावर सांगता येत नाही, आणि धड टाळता येत नाही, हे महाभाग, दिवस रात्र समस करत असतात...) असो हा प्रतिसाद असाच त्या सर्व स्त्री सदस्यांसाठी ......;) ( नाही म्हणजे, लडका ही लडकी के पिछे भागेगा हे मान्य !! पण काही लिमीट ;) )
  • Log in or register to post comments

च्या माय चा !!!

सुहास..
Sun, 02/26/2012 - 15:28 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

भाऊ

मी-सौरभ
Tue, 02/28/2012 - 13:06 नवीन
एकदम ठोकदार प्रतिसाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

सतत प्रकाटाआ करणारे सदस्य

प्रचेतस
Tue, 02/28/2012 - 13:20 नवीन
सतत प्रकाटाआ करणारे सदस्य हाही एक प्रकार आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

. स्साला आंजावरूनच गायब झाल

जेनी...
Tue, 02/28/2012 - 13:13 नवीन
. स्साला आंजावरूनच गायब झाल त्यानंतर :bigsmile:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

सध्या प्रवास संडासातूनच !

चौकटराजा
Tue, 02/28/2012 - 14:49 नवीन
एकदा मी ही पुणे ते मुम्बई असा पास काढला होता. पास असूनही छशिट ला पासाच्या डब्यात बसू देइनात . मायला कोणी दखल घ्यायला तयार नाही. एकाला विचारले का हो आम्हाला कधी घेणार ग्रूप मधे ? तर तो म्हणाला " तीन वर्षे संडासात प्रवास करण्याची तयारी ठेवा ! इथे बदली झाली, खपला किंवा रिटायर झाला की संडास सोडून साईडची जागा मग कालांतराने उलटी खिडकी व तात्या काका, बॉस अशी पदवी मिळाली की वारा देणारी खिडकी असे प्रमोशन मिळते. इथे आलो. दुनिया गोल आहे.
  • Log in or register to post comments

चोख तुलना. एकदम चाबूक

विश्वनाथ मेहेंदळे
Tue, 02/28/2012 - 17:25 नवीन
चोख तुलना. एकदम चाबूक !!! प्रतिसाद ऑफ द मंथ :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा