✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

((मी सदस्य होणारच!))

अ
अन्या दातार यांनी
गुरुवार, 02/23/2012 - 19:58  ·  लेख
लेख
आमची प्रेरणा: http://www.misalpav.com/node/20789 आमच्या एका मित्राला तुम्ही कुणीच ओळखत नाही. दरवेळी अडचणीत सापडला किंवा एखाद्या नवीन ध्येय धोरणाने पछाडला गेला की आमचा हा मित्र, हा सखा, सुहृद आमच्याकडे धाव घेत असतो. त्याच्या दृष्टीने तो म्हणजे सुदामा आणी मी म्हणजे कृष्ण, तो म्हणजे हृतीक आणि मी म्हणजे राकेश, तो म्हणजे ओमार अब्दुल्ला आणि मी म्हणजे शेख अब्दुल्ला, तो म्हणजे दीप दासगुप्ता आणि मी म्हणजे गांगुली असे बरेच काय काय आहे. त्यामुळे आज सकाळी सकाळी त्याने अवकाळी पावसासारखे पिंग केल्याचे आम्हाला मुळीच आश्चर्य वाटले नाही. "झाली का प्लेसमेंट?" त्याचा सवाल अस्मादिकः "नाही रे" "छान! आधी असलेला जॉब सोडायचा, अन मग जरा कुठे प्रगती होतेय असं दाखवायचं अन २ वर्षांतच परत जॉबसाठी वणवण भटकायचं का?" "अरे दादा, चालायचंच." मी स्पष्टीकरण द्यायचा फुटकळ प्रयत्नात. अजुन विषय वाढवायला नको म्हणून मीच पुढचा प्रश्न टाकला "आज आमची कशी काय आठवण??" "का ? पिंग करायलापण आता तुझी परवानगी घ्यायची का ? का मित्र काम असल्याबिगर कसे पिंग करत नाहीत, कसे मॅनरलेस असतात ह्यावर एक लेख पाडायचाय?" "तसे नाही रे. पण तुझ्या बोलण्यावरुन काहीतरी निश्चय केल्यासारखे ठाम भाव वाटत आहेत, म्हणून विचारले." ह्या आमच्या वाक्याने मात्र त्याची कळी खुलली. (स्मायलीमुळे बरंच काय काय कळते, पण काही सदस्यांना त्यात काय खुपते कुणास ठावूक ;) ) "मिपाचा सभासद व्हायचे ठरवले आहे." ठरवले आहे ? हा सगळे परस्पर ठरवून मोकळा होतच असतो म्हणा. "अरे असा कसा थेट सदस्य होशील ? ग्रुपमध्ये तुझ्या कॉमेंट्सना कुणी भावसुद्धा देत नाही. तुझे लिखाण वाचायला शाळेत सायन्सचे सरदेखील घाबरायचे." अजुन काही गोष्टी त्याला स्पष्टपणे सांगितल्या असत्या, पण मुद्दामच अस्पष्ट राहिलो. "अरे ढापण्या ! किती अकलेचे तारे तोडायचे ? अंपायर व्हायला, त्या खेळातले वर्ल्ड रेकॉर्ड नावावरती असण्याची गरज असते का? माइक बनवणार्‍याला गाणे गाता येण्याची गरज असते का ? किरवंताला आधी स्वतः लाकडावरती झोपायची सवय असावी लागते का? सदस्य होण्यासाठी भरभरून आणि वाचनीय प्रतिसाद लिहिण्याची, खूप सारे प्रतिसाद मिळण्याची गरज असते असे कोणी सांगितले तुला ? आणि प्रतिसाद काय, तुझ्या सारख्या फडतूस माणसाला देखील तुझ्या कंपूकडून मिळतातच की. " "अरे पण सदस्य होण्यासाठी अंगात काही गुण असावे लागतात, स्वभाव सुद्धा एका ठरावीक वळणाचा हवा. अजून बरेच काय काय असते. कसे समजावू तुला?" "ते समजवून घेण्यासाठीच आलो आहे तुझ्याकडे. तसेही रस्त्यावरचे काळे कुत्रे देखील तुला विचारत नाही. मीच एक आपला तुझ्यावरती दया करतो झाले. आता फालतूपणा बंद कर आणि काय काय आणि कसे कसे करावे लागेल ते चटचट बोल." 'आलीया भोगासी' ह्या न्यायाने आम्ही त्याला सल्ला द्यायला सिद्ध झालो. "बाबा रे, तुला आधी कुठला सदस्य व्हायचे आहे ते तू ठरवले आहेस का? " "हो ! पुरुष सदस्य" मित्राने मख्खपणे उत्तर दिले. "अरे $^$%#^%$ ! मी तुला स्त्री का पुरुष सदस्य असे विचारलेले नाही. तुला कोणत्या प्रकारचा सदस्य व्हायचे आहे ? सदस्यांमध्ये अनेक प्रकार असतात. नुसते सदस्य, चाय शिग्रेट वाले सदस्य, खव/खफ सदस्य, हेकट सदस्य, कंपूबाज सदस्य, ज्ञानी सदस्य, एकोळी सदस्य, वकिल सदस्य इ.इ.." "च्यायला, हे येवढे प्रकार असतात ? खुलासेवार डिट्टेल मध्ये सांग, म्हणजे मग तौलनिक अभ्यास करून ठरवता येईल की मी काय बनावे." सुहृदाने हुकूम सोडला. "कसे आहे, चाय शिग्रेटवाले सदस्य असतात ते आपले रोज चाय शिग्रेट मिळाली की खूश असतात. आपण बरे आपले काम बरे अशी ह्यांची वृत्ती. हे सदस्य असतात ते चार टाळकी सोडली तर बाहेर कुणाला माहिती नसते. फक्त हपिसातून फुकटात मिपा उघडायला मिळाले की बास! कधीही प्रतिसाद द्यायचा नाही, खरडींना उत्तर द्यायचे नाही हे त्यांचे लक्षण. नेहमीच वाचनमात्र राहतात. कंपूबाज सदस्य पूर्वी जनाधार वगैरे असे उदात्तीकरण करायचे म्हणे. हल्ली ट्रेंड बदललाय. हे नेहमीच संधीच्या शोधात असतात. पाकृ असो वा कविता; एखाद्या सदस्याला सळो की पळो करुन सोडायची किमया यांना साधलेली असते. त्यासाठी कधी कधी कंपूतल्याच एखाद्याचा बाजार उठवायला हे लोक मागे-पुढे बघत नाहीत. "आणि बाकीच्या सदस्यांचे काय ?" आमच्या माजोरड्या मित्राने आता चक्क स्वतःच्या फोनवरुन आम्हाला कॉल केला होता. याचा अर्थ घ्यायचा तो घेतला मी. "वत्सा.. आता आपण माहिती करून घेऊ पेश्शल सदस्य म्हणजे काय ते. ठरावीक विषयांतच त्यांचा हातखंडा असतो. त्याच व तेवढ्याच विषयांना वाहिलेल्या धाग्यांना प्रतिसाद देतात. यांची मते नेहमीच प्रस्थापित गृहितके वगैरे वगैरेला तडा देणारी असतात. कधीकधी परस्पर विसंगत विधाने करुनही त्यात संगती वगैरे असल्याचे भासवणे हे यांचे कौशल्य. खव/खफ सदस्य जे असतात ते सहसा स्त्री आयडी किंवा स्त्री-सदृश पुरुष आयडी असतात. यांच्या खरडवह्या या अतिसामान्य लोकांच्या डायरी सारख्या असतात; "मागील पानावरुन पुढे चालू" टाईपच्या.ऑफिस अवर्सपैकी काही तास मिपावरील खव/खफसाठी देतात. इतर सदस्यांनी आज डब्यात काय आणलंय, खवतील चित्र कसे गोग्गोड आहे.... इ. इ. खरडी करत बसतात. प्रतिसाद द्यायला नेहमीच वेळ कमी असतो. वकिल सदस्य, पेशाने वकिल आहेत काय? हा प्रश्न इतरांना पडतो. कारण कुठल्याही धाग्यावर कायद्याचे कुठलेसे कलम सांगत असतात. एकेकाळी अमेरिकेतील कायद्याच्या तरतूदीही सांगायचे. कालांतराने त्यांच्या मिपा सदस्यतेवर कोणी विरजण टाकले कुणास ज्यामुळे ते आता फ्रोयो होऊन बसलेत. एकोळी धागा सदस्य म्हणजे ट्विटरचे बापच जणू! एक-दोन फारफार तर तीन ट्विट्सचा मजकूर टंकून हे लोक धागे काढत असतात. त्यावरुन नेहमीच पाण उतारा झाल्याने ही जमात सध्या आपले अस्तित्व गमावून बसली आहे. हेकट सदस्य एखाद्या विषयाला वाहिलेले असूही शकतात किंवा नसूही शकतात. पण हेकटपणा हे त्यांच्या जालीय स्वभावाचे व्यवच्छेदक लक्षण. आपल्या मताशी सहमत असणार्‍या प्रतिक्रियांनाच 'धन्यवाद' 'थॅंक यू' अश्या उपप्रतिक्रिया देत सुटतात. विरोध करणार्‍या प्रतिक्रियांची दखल घेत नाहीत. कदाचित त्यांच्या तत्वातच बसत नसावे. सहृदयी (हे फक्त म्हणायलाच बरं का!) असतील दुसर्‍या संस्थळावर जातात व मिपावर वाचनमात्र राहतात. निबर असतील तर मात्र परत परत तसलेच धागे काढत राहतात. अश्या सदस्यांचे धागे हे विडंबकांसाठी उत्तम प्रतीचा कच्चा माल असतो. आता वळूयात ज्ञानी सदस्यांकडे. जे अगदी जेन्युइन लोक असतात. जंटलमन टाईपचे. वाळवीसुद्धा जेवढी पाने+लाकूड खात नाही त्याच्या दसपट पुस्तके यांनी खाल्लेली असावीत. अफाट विचारशक्ति असते. सोशल असतात. एखादी लेखमाला पूर्ण करण्यासाठी यांच्या मागे पराकाष्ठेने लागावे लागते. या प्रकारच्या सदस्यांमुळेच मिपावर आल्याचे सार्थक होते." 'हम्म्म असे असते काय?' मित्रवर्य मोठे गहन विचारात गढलेले दिसले. "आता मला सांग तुला कुठला सदस्य व्हायचे आहे?" "पण मी काय म्हणतो... राहू दे, ह्यावर तुझ्याशी चर्चा करून फायदा नाही. मी ठेवतो आता." असे बोलून आणि त्याने फोन ठेवला. दुसर्‍या दिवशी मेल अकाउंट उघडून बघतो तर आमच्या दुसर्‍या एका मित्राचा मेल आलेला. उघडून बघतो तर काल ज्याने मला कॉल केला होता त्याने त्याची सर्व अकाउंट्स (चेपु, जी+ इ. इ.) कायमची बंद करुन टाकल्याचा मजकूर खरडलेला!!!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
मांडणी
वावर
विनोद
मुक्तक
इतिहास
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
माध्यमवेध
माहिती
आस्वाद
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
12773 वाचन

💬 प्रतिसाद (77)

प्रतिक्रिया

मी सदस्य होणारच!

जेनी...
गुरुवार, 02/23/2012 - 20:20 नवीन
मी सदस्य होणारच! :D
  • Log in or register to post comments

हा हा हा

गेंडा
गुरुवार, 02/23/2012 - 20:22 नवीन
>>>सदस्यांमध्ये अनेक प्रकार असतात. नुसते सदस्य, चाय शिग्रेट वाले सदस्य, खव/खफ सदस्य, हेकट सदस्य, कंपूबाज सदस्य, ज्ञानी सदस्य, एकोळी सदस्य, वकिल सदस्य इ.इ.." एक प्रकार राहीला की हो. मंगळागौर करणारे सदस्य.
  • Log in or register to post comments

(No subject)

शुचि
गुरुवार, 02/23/2012 - 20:28 नवीन
:D
  • Log in or register to post comments

चुका !!!

वपाडाव
गुरुवार, 02/23/2012 - 20:36 नवीन
१.सदस्य होण्यासाठी भरभरून आणि वाचनीय प्रतिसाद लिहिण्याची, खूप सारे प्रतिसाद मिळण्याची गरज असते असे कोणी सांगितले तुला ? २."आणि बाकीच्या संपादकांचे काय ?" आमच्या माजोरड्या मित्राने आता चक्क स्वतःच्या फोनवरुन आम्हाला कॉल केला होता. याचा अर्थ घ्यायचा तो घेतला मी.
हे वाक्य जसेच्या तसे पर्‍याच्या लेखातुन आले आहे... याचा अर्थ चोप्य पस्ते लेखकांची/सदस्यांचीही मिपावर कमतरता नाही हे दिसुन येते... ;) बाकी, प्रयत्न उत्तम... जराशी कळ काढुन वेळ देउन लिहिला असता तर अजुन मस्त झाला असता... नीट वाचले असता चुका झाल्या आहेत असे दिसुन येते... हे आपला लेख चांगला व्हावा या हेतुने... सध्या चांगल्या चवीची जिल्बी वाटत आहे... अन हा प्रतिसाद अश्या सर्व मिपाकरांसाठी जे म्हणतात, की कंपुत काहीही छापुन आले तर त्याचे नेहमीच गोडवे गायले जातात.
  • Log in or register to post comments

वपाडाव यांच्याशी सहमत

असुर
गुरुवार, 02/23/2012 - 20:42 नवीन
आज फर्ष्ट टैम वपाडाव यांच्याशी सहमत व्हावं लागतंय. :-)
"आणि बाकीच्या संपादकांचे काय ?" आमच्या माजोरड्या मित्राने आता चक्क स्वतःच्या फोनवरुन आम्हाला कॉल केला होता. याचा अर्थ घ्यायचा तो घेतला मी.
बराच वेळ सदस्यत्वाची जिलबी वाचत होतो, मध्येच हा संपादकाचा खडा टोचला. आणि 'पिंग' चाही 'फोन' झालाय अचानक. धागाकर्ते, हे आपला लेख चांगला व्हावा या हेतुने... सध्या चांगल्या चवीची जिल्बी वाटत आहे... ;-) --असुर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

चांगल निरिक्शण आहे.

किचेन
Sat, 02/25/2012 - 00:23 नवीन
चांगल निरिक्शण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

@ वपाडाव, असुर: योग्य तो बदल

अन्या दातार
गुरुवार, 02/23/2012 - 21:05 नवीन
@ वपाडाव, असुर: योग्य तो बदल करण्यात आला आहे. असुर,
"आणि बाकीच्या सदस्यांचे काय ?" आमच्या माजोरड्या मित्राने आता चक्क स्वतःच्या फोनवरुन आम्हाला कॉल केला होता. याचा अर्थ घ्यायचा तो घेतला मी.
हे वाचायचे राहिलेले दिसते तुमचे बहुतेक
  • Log in or register to post comments

धन्यवाद

असुर
गुरुवार, 02/23/2012 - 21:17 नवीन
हेच लिहायला आलो होतो. टोचणारे खडे काढून टाकल्याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद. :-) विडंबनाचा विषयच विशेष असल्याने इथेच प्रतिसादांच्या शतकाबद्दल बेटींग घ्यायला हरकत नसावी. त्यासाठी आगाऊ शुभेच्छा! :-) --असुर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

हाहाहा!

पैसा
गुरुवार, 02/23/2012 - 21:05 नवीन
मस्त जमलाय लेख!
  • Log in or register to post comments

अन्याभौ,

प्रास
गुरुवार, 02/23/2012 - 21:37 नवीन
आयला, मस्तच विडंबन की! आवडलं आपल्याला!! सदस्यांचे प्रकार आणखी उलगडले असते तर अधिक मजा आली असती असं वाटून राहिलंय.... बाकी मला तर ब्वॉ कुठे काही चूक दिसली नै...... ;-)
  • Log in or register to post comments

एक महत्त्वाचा प्रकार

पैसा
गुरुवार, 02/23/2012 - 21:40 नवीन
स्री आयडीधारी पुरुष सदस्य आणि दुसरा म्हणजे स्त्री आयडी सदस्यांच्या खरडवह्यात "मज्याशी मय्यतरी कर्नार कं?" विचारत फिरणार्‍यांचा!
  • Log in or register to post comments

पैसा ताइ एकदम राइट बोली

पियुशा
Fri, 02/24/2012 - 16:35 नवीन
पैसा ताइ एकदम राइट बोली ;) मज्याशी मय्यतरी कर्नार कं अस विचारुन नाकात दम करणारे सदस्य ;) रोज रोज एकच प्रश्न विचारणारे सदस्य ;) एखादा नवा( दन्गा घालण्याजोगा ) धागा दिसला रे दिसला धाग्याची सुतळी करणारे सदस्य ;) नवकवि /लेखकाच्या धाग्याचे विड्म्बण पाडून त्याना सळो की पळो करुन सोडणारे सदस्य ;) क्रुपया ह्.घे या मथळ्याचे धागे काढुन " साले " काढ्णारे सदस्य ;) गमतीदार प्रतिसादाना सिरियसली घेणारे सदस्य ;) दुसर्याना डु आय डी चिड्वणारे सदस्य ;) बाल की खाल निकालनेवाले सदस्य ;) झैरात करणारे सदस्य ;) ( या लिस्टमध्ये मी ही आलेच ;) ) ( ब्बास आता पळ्ळा ) लै लै प्रकार आहेत सदस्याचे मि पा वर ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

पिवशे हे राहिले की...

वपाडाव
Fri, 02/24/2012 - 16:58 नवीन
कारण नसताना उगाच २ लिटर स्मायल्या वापरणारे सदस्य... शुद्धलेखन येत नसताना दुसर्‍यांना त्याबद्दल उपदेश देणारे सदस्य... खुप आठौलं आहे पण तुर्तास एवढ्यावरच समाधान मान बरं...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

अरे व प्या एक राहील ना

पियुशा
Fri, 02/24/2012 - 16:59 नवीन
अरे व प्या एक राहील ना ......... विनाकारण खुसपट काढ्णारे सदस्य ;) मलापण खुप आठौलं आहे पण तुर्तास एवढ्यावरच समाधान मान बरं... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

नवोदितांना खच्ची करणारे

किचेन
Sat, 02/25/2012 - 00:26 नवीन
नवोदितांना खच्ची करणारे सदस्य.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

नाही, तो प्रकार कंपू या सदरात

सूड
Sat, 02/25/2012 - 06:07 नवीन
नाही, तो प्रकार कंपू या सदरात मोडतो. आता त्यातही प्रकार उपप्रकार असतात. त्यावर एक वेगळा लेख होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

नवोदितांना खच्ची करणारे

५० फक्त
Sat, 02/25/2012 - 14:51 नवीन
नवोदितांना खच्ची करणारे सदस्य. - हो आणि अश्या सदस्यांना जुन्या पुराण्या प्राचीन काळातल्या तोफेच्या तोंडि देण्याची धमकी देणारे पण सदस्य असतात, त्यापासुन जपुन रहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

@लै लै प्रकार आहेत सदस्याचे

अत्रुप्त आत्मा
Fri, 02/24/2012 - 17:06 नवीन
@लै लै प्रकार आहेत सदस्याचे मि पा वर >>> ही> ;-) >एक-मेव स्माईली वापरणारे सदस्य भागो.... Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

:)

मन१
गुरुवार, 02/23/2012 - 22:48 नवीन
:) एक प्रकार राहिला की रे अजून एक म्हणजे "टेन्शन सदस्य " किंवा "डोंगराला आग लागली पळा पळा " छाप सदस्य. झांबियात हगवणीच्या पसलेल्या साथीच्या बातमीने "बाप रे भारताचे भवितव्य कसले धोक्यात आहे" असे म्ह्णत कपाळावर आठ्या घालणारे लेखन ह्यांचे. अजून एक म्हणजे "पानभर सदस्य" :- ह्यांना जर्रा कुठे स्कोप दिसला की चालले आपले पानच्या पानं भरायला. ह्यांना चुकुन जरी "कसा आहेस" हे विचारले तर स्वतःच्या व इतरांच्या आख्ख्या घराण्याची हिष्ट्री सांगतील. किंवा "लाल बहादूर शास्त्री युद्धानंतर ताश्कंदला गेले. " असे वाक्य दिसले की लगेच "सदर वाक्यात लालबहादूर शास्त्री हे ताश्कंदला विमानाने गेले " हे स्पष्ट न लिहिल्याचे सुचवतील, वर पुन्हा आख्ख्या विमानाची हिष्ट्री सांगतील. कोण वाचतय ह्यापेक्षा आप्ल्या नावाखाली पानभर प्रतिसादाचा झेंडा आहे ह्याच कल्पनेने ह्यांना गुदगुल्या होतात.
  • Log in or register to post comments

हाण्ण तेजायला. भन्नाट विडंबन

प्रचेतस
गुरुवार, 02/23/2012 - 22:53 नवीन
हाण्ण तेजायला. भन्नाट विडंबन जमलाय. नवसदस्य किंवा नवकवींवर टिप्पणी हवी होती.
  • Log in or register to post comments

दुसर्‍या दिवशी मेल अकाउंट

यकु
गुरुवार, 02/23/2012 - 23:04 नवीन
दुसर्‍या दिवशी मेल अकाउंट उघडून बघतो तर आमच्या दुसर्‍या एका मित्राचा मेल आलेला. उघडून बघतो तर काल ज्याने मला कॉल केला होता त्याने त्याची सर्व अकाउंट्स (चेपु, जी+ इ. इ.) कायमची बंद करुन टाकल्याचा मजकूर खरडलेला!!!
काय काय अन्या तुझा तो मित्र डुआय होता का रे? जालावर एवढे नग भरले आहेत सदस्यांचे किती प्रकार ते सांगण ब्रह्मदेवालाही शक्य नाही.. तरी बर्‍याच खूब्या आल्या आहेत.. ;-) पण थोडा अभ्यास कमी पडतो आहे ;-) अवांतर: नवनिर्मितीसाठी कुठल्या ना कुठल्या रुपात गर्भ आवश्‍यक असतो. गर्भनिर्मितीसाठी नेहमीच दोन एंटीटींची गरज असते असे नाही.. काहीवेळा एकच एंटीटी गर्भधारणा होण्यास समर्थ असते. तसेच काहीसे मराठी संकेतस्थळांचे आहे.. या अर्थाने प्रत्येक संकेतस्थळ नव्या संकेतस्थळाचा गर्भ वागवत असतेच.. काहीवेळा अशी गर्भधारणा झाली तरी ती फारकाळ टिकू शकत नाही नवे काही जन्मावे इतपत दिवस तिचे पोषणच होत नाही.. वगैरे वगैरे
  • Log in or register to post comments

@अवांतर: नवनिर्मितीसाठी

अत्रुप्त आत्मा
Fri, 02/24/2012 - 00:23 नवीन
@अवांतर: नवनिर्मितीसाठी कुठल्या ना कुठल्या रुपात गर्भ आवश्‍यक असतो. गर्भनिर्मितीसाठी नेहमीच दोन एंटीटींची गरज असते असे नाही.. काहीवेळा एकच एंटीटी गर्भधारणा होण्यास समर्थ असते. तसेच काहीसे मराठी संकेतस्थळांचे आहे.. या अर्थाने प्रत्येक संकेतस्थळ नव्या संकेतस्थळाचा गर्भ वागवत असतेच.. काहीवेळा अशी गर्भधारणा झाली तरी ती फारकाळ टिकू शकत नाही नवे काही जन्मावे इतपत दिवस तिचे पोषणच होत नाही.. वगैरे वगैरे Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

प्रत्येक संकेतस्थळ नव्या

गवि
Fri, 02/24/2012 - 14:37 नवीन
प्रत्येक संकेतस्थळ नव्या संकेतस्थळाचा गर्भ वागवत असतेच..
अगदी अगदी.. पुलं म्हणून गेलेत ना.. दोन मराठी माणसे एकत्र आली की आधी सुरु करतात ते गणेशोत्सव मंडळ आणि पुढच्या वर्षी दोन गणेशोत्सव मंडळे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

सुंदर.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 02/24/2012 - 16:30 नवीन
प्रत्येक संकेतस्थळ नव्या संकेतस्थळाचा गर्भ वागवत असतेच वॉव. वाक्य आवडलं. आंतरजालावर मराठी संकेतस्थळांना कोणत्याही काळात लागु होणारं एक उत्तम सत्य. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

अन्याभाऊ... बेफाम केलीत

अत्रुप्त आत्मा
Fri, 02/24/2012 - 00:27 नवीन
अन्याभाऊ... बेफाम Image removed. केलीत हां...
  • Log in or register to post comments

छान जमलंय रे, ह्यामुळंच हल्ली

५० फक्त
Fri, 02/24/2012 - 07:42 नवीन
छान जमलंय रे, ह्यामुळंच हल्ली सदस्य संख्या भयानक वाढते आहे.
  • Log in or register to post comments

मला " शेणसार" चं

चौकटराजा
Fri, 02/24/2012 - 08:31 नवीन
म्या सदश्य त झालू हायेच पर म्या कन्च्या परकारचा सदस्य हाये त्ये कुनी सांगल का ? पर त्ये जाव द्या ! म्या सरपंच , नीलकांत कुनी बी बोल्ल्ले तरी बी म्या कंदीचत्ये काटछाटीचं काम करनार नाय . आपल्याला " शेणसार " च आवडत नाय !
  • Log in or register to post comments

हुच्च सदस्य हा प्रकार आल्या

प्रचेतस
Fri, 02/24/2012 - 09:17 नवीन
हुच्च सदस्य हा प्रकार आल्या नसल्याबद्दल निषेध.
  • Log in or register to post comments

गडबड

बंडा मामा
Fri, 02/24/2012 - 10:08 नवीन
प्रेरणाची लिंक गंडली आहे. तीही दुरुस्त करा. प्रवेश प्रतिबंधीत असे दिसत आहे.
  • Log in or register to post comments

दुर्दैवाने ती लिंक Beyond

अन्या दातार
Fri, 02/24/2012 - 10:12 नवीन
दुर्दैवाने ती लिंक Beyond repair गेली आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बंडा मामा

भांडखोर आणि भांडकुदळ

सूड
Fri, 02/24/2012 - 10:29 नवीन
भांडखोर आणि भांडकुदळ सदस्य राह्यलं की. तर या प्रकारचे सदस्य ७५ टक्के वेळा स्त्री सदस्य किंवा तसे आयडी घेऊन लिहीत असतात. भांडखोर म्हणजे भांडण खोर्‍याने ओढल्यागत आपल्याकडे ओढून घेतात. भांडकुदळ म्हणजे नसलेलं भांडण उकरून अथवा खणून काढतात. अशा सदस्यांमुळे धागा शंभरी तरी गाठतो किंवा त्याला पंख लागतात. किमान प्रतिसादांना तरी पंख लागतातच. असे आयडी अकारान्ती आकारान्ती , ईकारान्ती असतात.
  • Log in or register to post comments

@असे आयडी अकारान्ती आकारान्ती

अत्रुप्त आत्मा
Fri, 02/24/2012 - 11:46 नवीन
@असे आयडी अकारान्ती आकारान्ती , ईकारान्ती असतात.>>> एक/दोन उदाहरण दिली असती तर बरं झालं असतं ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

व्यनि चेकवा

अन्या दातार
Fri, 02/24/2012 - 11:48 नवीन
व्यनि चेकवा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

उदाहरणे (ह.घे.)

चिंतामणी
Fri, 02/24/2012 - 12:10 नवीन
>>>@असे आयडी अकारान्ती आकारान्ती , ईकारान्ती असतात.>>> एक/दोन उदाहरण दिली असती तर बरं झालं असतं उदाहरणार्थ अकारान्ती = सूड आकारान्ती = अत्रुप्त आत्मा ईकारान्ती = वल्ली (ह.घे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

२५%

अन्या दातार
Fri, 02/24/2012 - 12:16 नवीन
तर या प्रकारचे सदस्य ७५ टक्के वेळा स्त्री सदस्य किंवा तसे आयडी घेऊन लिहीत असतात.
हे विसरलात की हो काका!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

ख्या ख्या ख्या. आता भांडणं

प्रचेतस
Fri, 02/24/2012 - 12:21 नवीन
ख्या ख्या ख्या. आता भांडणं उकरून काढायला पाहिजेत मग. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

नको.

चिंतामणी
Fri, 02/24/2012 - 12:26 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

आँ???

अन्या दातार
Fri, 02/24/2012 - 12:28 नवीन
तुमच्यासारख्या स्पोर्ट्समनकडून अश्या 'बाय' ची अपेक्षा नव्हती काका :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

उरलेल्या २५% ईकारान्तात गणले जाऊ नये

सूड
Fri, 02/24/2012 - 17:00 नवीन
अरे बरोबर, ते उरलेल्या २५% ईकारान्तात गणले जाऊ नये अशी माफक इच्छा असेल त्यांची. वल्ली दिसला पण चिंतामणीतला ईकार सोईस्कररित्या विसरले. ;) (आता तुम्ही ह घ्या हो चिंतूकाका)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

"भांडखोर आणि भांडकुदळ"

चिंतामणी
Sat, 02/25/2012 - 15:16 नवीन
आयडी अकारान्ती आकारान्ती , ईकारान्ती आहे अश्या "भांडखोर आणि भांडकुदळ" सदस्यांबद्दल तुच प्रतिसाद टंकला आहे ना.मी फक्त योग्य नावे दिली. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

प्रेरणा

श्रावण मोडक
Fri, 02/24/2012 - 10:53 नवीन
प्रेरणा हरपली. आता? बादवे, प्रेरणेचा धागा का उडाला हे कळलंच नाही. संपादकीय कात्री लागलेली दिसते. इंटरेस्टिंग. वयात येताना मुलाचा पाय डगमगतो तसंच हे असावं अशी आशा.
  • Log in or register to post comments

हे असावं ????

चिंतामणी
Fri, 02/24/2012 - 11:25 नवीन
>>>वयात येताना मुलाचा पाय डगमगतो तसंच हे असावं अशी आशा. म्हणजे नक्की काय?? प्रेरणेचा धागा की तो उडवणे??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

जाऊ द्या...

श्रावण मोडक
Fri, 02/24/2012 - 12:05 नवीन
जाऊ द्या राव... शहाण्यांना... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

(No subject)

चिंतामणी
Fri, 02/24/2012 - 12:15 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

श्रामोजी,

वपाडाव
Fri, 02/24/2012 - 13:54 नवीन
वयात येताना मुलाचा पाय डगमगतो तसंच हे असावं...
माझं नालेज तोकडं असेल कदाचित पण, यातुन 'रिडिंग बिटवीन द लाइन्स' अपेक्षित आहे की काय? तसं असेल तर या अडाण्यासाठी टॉर्च मारा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

वयात येताना मुलाचा पाय डगमगतो

यकु
Fri, 02/24/2012 - 13:56 नवीन
वयात येताना मुलाचा पाय डगमगतो तसंच हे असावं...
माझं नालेज तोकडं असेल कदाचित पण, यातुन 'रिडिंग बिटवीन द लाइन्स' अपेक्षित आहे की काय? तसं असेल तर या अडाण्यासाठी टॉर्च मारा...
काय येडबिड लागलंय का वप्या तुला? अंधारात चाललेल्या गोष्‍टींवर टॉर्च मारायला सांगतोस. आं? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

हां ना...

श्रावण मोडक
Fri, 02/24/2012 - 14:04 नवीन
हां ना राव... काहीही सांगतो हा वप्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

अरारारा !!!

वपाडाव
Fri, 02/24/2012 - 15:01 नवीन
हे तर लैच-वाइच भलतीकडे चाल्लंय की... अहो मी वेगळ्या अंधाराची गोष्ट करत होतो...
वयात येताना मुलाचा पाय डगमगतो तसंच हे असावं...
ह्या संदर्भात मी हे म्हणत होतो, की पर्‍याचा पाय तरुणपणी वाकडा न पडता बालपणीच वाकडा पडला होता... संदर्भ :: पर्‍याची मंदाकिनी... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

खातंय

श्रावण मोडक
Fri, 02/24/2012 - 15:14 नवीन
खातंय आता पऱ्याचा मार. आधी धागा उडाला, त्यात आता आवडत्या मंदाकिनीची आठवण देत मारलेले टोले... काही खरं नाही तुझं. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

+१

यकु
Fri, 02/24/2012 - 15:17 नवीन
वप्या तुझ्या पत्रिकेत आज मृत्यू षडाष्‍टक योग आहे का बघ रे.. बुडत्याचे पाय खोलाकडेच म्हणे ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा