((मी सदस्य होणारच!))
आमची प्रेरणा: http://www.misalpav.com/node/20789
आमच्या एका मित्राला तुम्ही कुणीच ओळखत नाही. दरवेळी अडचणीत सापडला किंवा एखाद्या नवीन ध्येय धोरणाने पछाडला गेला की आमचा हा मित्र, हा सखा, सुहृद आमच्याकडे धाव घेत असतो. त्याच्या दृष्टीने तो म्हणजे सुदामा आणी मी म्हणजे कृष्ण, तो म्हणजे हृतीक आणि मी म्हणजे राकेश, तो म्हणजे ओमार अब्दुल्ला आणि मी म्हणजे शेख अब्दुल्ला, तो म्हणजे दीप दासगुप्ता आणि मी म्हणजे गांगुली असे बरेच काय काय आहे. त्यामुळे आज सकाळी सकाळी त्याने अवकाळी पावसासारखे पिंग केल्याचे आम्हाला मुळीच आश्चर्य वाटले नाही.
"झाली का प्लेसमेंट?" त्याचा सवाल
अस्मादिकः "नाही रे"
"छान! आधी असलेला जॉब सोडायचा, अन मग जरा कुठे प्रगती होतेय असं दाखवायचं अन २ वर्षांतच परत जॉबसाठी वणवण भटकायचं का?"
"अरे दादा, चालायचंच." मी स्पष्टीकरण द्यायचा फुटकळ प्रयत्नात. अजुन विषय वाढवायला नको म्हणून मीच पुढचा प्रश्न टाकला
"आज आमची कशी काय आठवण??"
"का ? पिंग करायलापण आता तुझी परवानगी घ्यायची का ? का मित्र काम असल्याबिगर कसे पिंग करत नाहीत, कसे मॅनरलेस असतात ह्यावर एक लेख पाडायचाय?"
"तसे नाही रे. पण तुझ्या बोलण्यावरुन काहीतरी निश्चय केल्यासारखे ठाम भाव वाटत आहेत, म्हणून विचारले." ह्या आमच्या वाक्याने मात्र त्याची कळी खुलली. (स्मायलीमुळे बरंच काय काय कळते, पण काही सदस्यांना त्यात काय खुपते कुणास ठावूक ;) )
"मिपाचा सभासद व्हायचे ठरवले आहे."
ठरवले आहे ? हा सगळे परस्पर ठरवून मोकळा होतच असतो म्हणा.
"अरे असा कसा थेट सदस्य होशील ? ग्रुपमध्ये तुझ्या कॉमेंट्सना कुणी भावसुद्धा देत नाही. तुझे लिखाण वाचायला शाळेत सायन्सचे सरदेखील घाबरायचे." अजुन काही गोष्टी त्याला स्पष्टपणे सांगितल्या असत्या, पण मुद्दामच अस्पष्ट राहिलो.
"अरे ढापण्या ! किती अकलेचे तारे तोडायचे ? अंपायर व्हायला, त्या खेळातले वर्ल्ड रेकॉर्ड नावावरती असण्याची गरज असते का? माइक बनवणार्याला गाणे गाता येण्याची गरज असते का ? किरवंताला आधी स्वतः लाकडावरती झोपायची सवय असावी लागते का? सदस्य होण्यासाठी भरभरून आणि वाचनीय प्रतिसाद लिहिण्याची, खूप सारे प्रतिसाद मिळण्याची गरज असते असे कोणी सांगितले तुला ? आणि प्रतिसाद काय, तुझ्या सारख्या फडतूस माणसाला देखील तुझ्या कंपूकडून मिळतातच की. "
"अरे पण सदस्य होण्यासाठी अंगात काही गुण असावे लागतात, स्वभाव सुद्धा एका ठरावीक वळणाचा हवा. अजून बरेच काय काय असते. कसे समजावू तुला?"
"ते समजवून घेण्यासाठीच आलो आहे तुझ्याकडे. तसेही रस्त्यावरचे काळे कुत्रे देखील तुला विचारत नाही. मीच एक आपला तुझ्यावरती दया करतो झाले. आता फालतूपणा बंद कर आणि काय काय आणि कसे कसे करावे लागेल ते चटचट बोल."
'आलीया भोगासी' ह्या न्यायाने आम्ही त्याला सल्ला द्यायला सिद्ध झालो.
"बाबा रे, तुला आधी कुठला सदस्य व्हायचे आहे ते तू ठरवले आहेस का? "
"हो ! पुरुष सदस्य" मित्राने मख्खपणे उत्तर दिले.
"अरे $^$%#^%$ ! मी तुला स्त्री का पुरुष सदस्य असे विचारलेले नाही. तुला कोणत्या प्रकारचा सदस्य व्हायचे आहे ? सदस्यांमध्ये अनेक प्रकार असतात. नुसते सदस्य, चाय शिग्रेट वाले सदस्य, खव/खफ सदस्य, हेकट सदस्य, कंपूबाज सदस्य, ज्ञानी सदस्य, एकोळी सदस्य, वकिल सदस्य इ.इ.."
"च्यायला, हे येवढे प्रकार असतात ? खुलासेवार डिट्टेल मध्ये सांग, म्हणजे मग तौलनिक अभ्यास करून ठरवता येईल की मी काय बनावे." सुहृदाने हुकूम सोडला.
"कसे आहे, चाय शिग्रेटवाले सदस्य असतात ते आपले रोज चाय शिग्रेट मिळाली की खूश असतात. आपण बरे आपले काम बरे अशी ह्यांची वृत्ती. हे सदस्य असतात ते चार टाळकी सोडली तर बाहेर कुणाला माहिती नसते. फक्त हपिसातून फुकटात मिपा उघडायला मिळाले की बास! कधीही प्रतिसाद द्यायचा नाही, खरडींना उत्तर द्यायचे नाही हे त्यांचे लक्षण. नेहमीच वाचनमात्र राहतात.
कंपूबाज सदस्य पूर्वी जनाधार वगैरे असे उदात्तीकरण करायचे म्हणे. हल्ली ट्रेंड बदललाय. हे नेहमीच संधीच्या शोधात असतात. पाकृ असो वा कविता; एखाद्या सदस्याला सळो की पळो करुन सोडायची किमया यांना साधलेली असते. त्यासाठी कधी कधी कंपूतल्याच एखाद्याचा बाजार उठवायला हे लोक मागे-पुढे बघत नाहीत.
"आणि बाकीच्या सदस्यांचे काय ?" आमच्या माजोरड्या मित्राने आता चक्क स्वतःच्या फोनवरुन आम्हाला कॉल केला होता. याचा अर्थ घ्यायचा तो घेतला मी.
"वत्सा.. आता आपण माहिती करून घेऊ पेश्शल सदस्य म्हणजे काय ते. ठरावीक विषयांतच त्यांचा हातखंडा असतो. त्याच व तेवढ्याच विषयांना वाहिलेल्या धाग्यांना प्रतिसाद देतात. यांची मते नेहमीच प्रस्थापित गृहितके वगैरे वगैरेला तडा देणारी असतात. कधीकधी परस्पर विसंगत विधाने करुनही त्यात संगती वगैरे असल्याचे भासवणे हे यांचे कौशल्य.
खव/खफ सदस्य जे असतात ते सहसा स्त्री आयडी किंवा स्त्री-सदृश पुरुष आयडी असतात. यांच्या खरडवह्या या अतिसामान्य लोकांच्या डायरी सारख्या असतात; "मागील पानावरुन पुढे चालू" टाईपच्या.ऑफिस अवर्सपैकी काही तास मिपावरील खव/खफसाठी देतात. इतर सदस्यांनी आज डब्यात काय आणलंय, खवतील चित्र कसे गोग्गोड आहे.... इ. इ. खरडी करत बसतात. प्रतिसाद द्यायला नेहमीच वेळ कमी असतो.
वकिल सदस्य, पेशाने वकिल आहेत काय? हा प्रश्न इतरांना पडतो. कारण कुठल्याही धाग्यावर कायद्याचे कुठलेसे कलम सांगत असतात. एकेकाळी अमेरिकेतील कायद्याच्या तरतूदीही सांगायचे. कालांतराने त्यांच्या मिपा सदस्यतेवर कोणी विरजण टाकले कुणास ज्यामुळे ते आता फ्रोयो होऊन बसलेत.
एकोळी धागा सदस्य म्हणजे ट्विटरचे बापच जणू! एक-दोन फारफार तर तीन ट्विट्सचा मजकूर टंकून हे लोक धागे काढत असतात. त्यावरुन नेहमीच पाण उतारा झाल्याने ही जमात सध्या आपले अस्तित्व गमावून बसली आहे.
हेकट सदस्य एखाद्या विषयाला वाहिलेले असूही शकतात किंवा नसूही शकतात. पण हेकटपणा हे त्यांच्या जालीय स्वभावाचे व्यवच्छेदक लक्षण. आपल्या मताशी सहमत असणार्या प्रतिक्रियांनाच 'धन्यवाद' 'थॅंक यू' अश्या उपप्रतिक्रिया देत सुटतात. विरोध करणार्या प्रतिक्रियांची दखल घेत नाहीत. कदाचित त्यांच्या तत्वातच बसत नसावे. सहृदयी (हे फक्त म्हणायलाच बरं का!) असतील दुसर्या संस्थळावर जातात व मिपावर वाचनमात्र राहतात. निबर असतील तर मात्र परत परत तसलेच धागे काढत राहतात. अश्या सदस्यांचे धागे हे विडंबकांसाठी उत्तम प्रतीचा कच्चा माल असतो.
आता वळूयात ज्ञानी सदस्यांकडे. जे अगदी जेन्युइन लोक असतात. जंटलमन टाईपचे. वाळवीसुद्धा जेवढी पाने+लाकूड खात नाही त्याच्या दसपट पुस्तके यांनी खाल्लेली असावीत. अफाट विचारशक्ति असते. सोशल असतात. एखादी लेखमाला पूर्ण करण्यासाठी यांच्या मागे पराकाष्ठेने लागावे लागते. या प्रकारच्या सदस्यांमुळेच मिपावर आल्याचे सार्थक होते."
'हम्म्म असे असते काय?' मित्रवर्य मोठे गहन विचारात गढलेले दिसले.
"आता मला सांग तुला कुठला सदस्य व्हायचे आहे?"
"पण मी काय म्हणतो... राहू दे, ह्यावर तुझ्याशी चर्चा करून फायदा नाही. मी ठेवतो आता." असे बोलून आणि त्याने फोन ठेवला.
दुसर्या दिवशी मेल अकाउंट उघडून बघतो तर आमच्या दुसर्या एका मित्राचा मेल आलेला. उघडून बघतो तर काल ज्याने मला कॉल केला होता त्याने त्याची सर्व अकाउंट्स (चेपु, जी+ इ. इ.) कायमची बंद करुन टाकल्याचा मजकूर खरडलेला!!!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मी सदस्य होणारच!
हा हा हा
(No subject)
चुका !!!
वपाडाव यांच्याशी सहमत
चांगल निरिक्शण आहे.
@ वपाडाव, असुर: योग्य तो बदल
धन्यवाद
हाहाहा!
अन्याभौ,
एक महत्त्वाचा प्रकार
पैसा ताइ एकदम राइट बोली
पिवशे हे राहिले की...
अरे व प्या एक राहील ना
नवोदितांना खच्ची करणारे
नाही, तो प्रकार कंपू या सदरात
नवोदितांना खच्ची करणारे
@लै लै प्रकार आहेत सदस्याचे
:)
हाण्ण तेजायला. भन्नाट विडंबन
दुसर्या दिवशी मेल अकाउंट
@अवांतर: नवनिर्मितीसाठी
प्रत्येक संकेतस्थळ नव्या
सुंदर.
अन्याभाऊ... बेफाम केलीत
छान जमलंय रे, ह्यामुळंच हल्ली
मला " शेणसार" चं
हुच्च सदस्य हा प्रकार आल्या
गडबड
दुर्दैवाने ती लिंक Beyond
भांडखोर आणि भांडकुदळ
@असे आयडी अकारान्ती आकारान्ती
व्यनि चेकवा
उदाहरणे (ह.घे.)
२५%
ख्या ख्या ख्या. आता भांडणं
नको.
आँ???
उरलेल्या २५% ईकारान्तात गणले जाऊ नये
"भांडखोर आणि भांडकुदळ"
प्रेरणा
हे असावं ????
जाऊ द्या...
(No subject)
श्रामोजी,
वयात येताना मुलाचा पाय डगमगतो
हां ना...
अरारारा !!!
खातंय
+१