प्रिय कॅटरिना,
सर्वप्रथम म्हणजे तू सुरेख दिसतेस आणि माझ्यासारख्या बर्याच जणाना तुझं रुपडं आवडतं हे आवर्जून सांगतो. ते असो.
परवा बाकी बेटा (तुला बेटा म्हणू का? आता मी चाळीशी पार केली आहे त्यामुळे तेच मला शोभून दिसेल!) :) कुठल्याश्या वृत्तवहिनीशी बोलताना तू स्वत: जन्माने अर्धी एशियन व अर्धी युरोपियन आहेस हे तू अगदी बिनदिक्कत सांगितलंस. शिवाय त्यात काही लपवण्यासारखं नाही हेही मनमोकळेपणाने सांगितलंस. पण हे बोलताना उदाहरण म्हणून तू राहूल गांधीचं नाव घेतलंस ती मात्र एक मज्जाच केलीस. त्याकरता सर्वप्रथम तुझं मनापासून अभिनंदन..! :)

राहूल गांधीही जन्माने अर्धाच भारतीय आहे हे सत्यही तू अगदी निरागसपणे सांगितलंस त्याबद्दल तुझं खूप कौतुक वाटलं. परंतु जे लाचार काँग्रेसवाले भारताचा भावी पंतप्रधान म्हणून ज्याच्याकडे पाहात आहेत त्याच्याच जन्माला आणि पर्यायाने पंचाला तू हात घातलास, ही गोष्ट कुणा चाणाक्षाने तुझ्या लक्षात आणून दिली असावी; :) आणि भलतीच भानगड नको म्हणून तू राहूलबाबत केलेल्या विधानावर नंतर माफी मागून मोकळीही झालीस..!
पण मला सांग बेटा, तू काय चुकीचं बोललं होतीस? राहूलची माय जन्माने भारतीय नसून इटालियन आहे त्यामुळे राहूलही पूर्णत: भारतीय नाही हे सत्य आहे. मग तुला माफी मागायची गरज काय? झाला असता की जरा मस्तपैकी गह्जब! :)
आणि बेटा, उद्या तशीच जर वेळ आली असती तर आम्ही सारे भारतीय तुझ्या पाठीशी होतोच की..! :)
असो..
यातून मला वैयक्तिकरित्या इतकंच सांगायचं आहे की ज्या व्यक्ति आणि त्यांचे आईवडील हे जन्माने पूर्णत: भारतीय असतील त्याच व्यक्तिंना भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, लोकसभा विरोधीपक्ष नेता आणि तीनही सैन्यातील प्रमूखपद इत्यादी पदे भुषवता येतील..!
सबब, बेटा कॅट, तुला विनंती की तुझं विधान मागे घेऊ नकोस आणि त्याकरता कुणाची माफी वगैरेही मागू नकोस...
बाकी कसं चाल्लय बेटा? कुणाशी नव्याने काही सूतबीत जमवलंस की नाही?! :)
तुझा,
तात्या.
मिसळपाव
प्रतिक्रिया
काय तात्या, चक्क बेटा म्हणताय
काय तात्या, चक्क बेटा म्हणताय तुम्ही. जुने दिवस विसरलात काय? धमाल मजा यायची दररोज वेगवेगळी डिश खातांना.
सबब, बेटा कॅट, तुला विनंती की
सहमत, खोटं ते काय बोलली ? उलट तिला इतकेच म्हणायचे होते जस राहूलला भारतीय लोक राजपूत्र मानतात आपलंच समजतात, तसंच मलासूध्दा तितकच भारतीय समजावं भारताशी निगडीत समजावं.. यात चूक ते काय ? अनं माफी ती कसली मागायची ? जर सत्यच बोललं असेल तर ?
+१
In reply to सबब, बेटा कॅट, तुला विनंती की by आत्मशून्य
उलट तिला इतकेच म्हणायचे होते जस राहूलला भारतीय लोक राजपूत्र मानतात आपलंच समजतात, तसंच मलासूध्दा तितकच भारतीय समजावं भारताशी निगडीत समजावं
सहमत!
मग भले बॉलिवूडात इतकी वर्षे काढून हिंदीचा गंध का नसेना!
लॉजिक गंडलेय...
माफ करा, तात्यासाहेब, पण त्याच न्यायाने आपणही जन्माने अर्धेच पुरुष आहात असे म्हणावे लागेल.
पहा विचार करून.
माफ करा, तात्यासाहेब, पण
In reply to लॉजिक गंडलेय... by पंगा
सहमत आहे.
जगात पूर्णपुरुष फक्त दोनच होऊन गेले कृष्ण आणि अर्जुन.
अरे बापरे!
In reply to माफ करा, तात्यासाहेब, पण by परिकथेतील राजकुमार
वरील लॉजिकने या विधानास काही अत्यंत चमत्कारिक अशी इंप्लिकेशन्स आहेत, एवढेच सुचवू इच्छितो.
(समझने वाले को इशारा काफ़ी| ;))
गप्प बसा की पंगा शेठ
In reply to अरे बापरे! by पंगा
गप्प बसा की पंगा शेठ :P
पूर्णपुरुष :)
In reply to माफ करा, तात्यासाहेब, पण by परिकथेतील राजकुमार
ते हि जगात?
महापुरुष म्हणायचे आहे का?
.
.
.
.
.
.
.
.
उरलेले इतर कोण? :)
उरलेले इतर कोण? आपण खरंच इतके
In reply to पूर्णपुरुष :) by अजातशत्रु
आपण खरंच इतके ढ आहात का तसे दाखवता ?
दोनच होते असे सांगून वर त्यांची नावे दिल्यावर वरती पुन्हा 'उरलले कोण ?' हा मंद प्रश्न तुम्ही विचारुच कसे शकता ?
तुम्हाला पूर्णपुरुष आणि महापुरुष ह्यातला फरक निदान माहिती असावा अशी अपेक्षा होती.
असो...
@..टिंनपाटपत्रु..
अपेक्षाभंग?
In reply to उरलेले इतर कोण? आपण खरंच इतके by परिकथेतील राजकुमार
तुमचा अपेक्षाभंग झाल्याबद्दल दिलगिर आहोत.
©º°¨¨°º© भाकडकथेतील बालकुमार ©º°¨¨°º©
फरक सांगुनच टाका
In reply to अपेक्षाभंग? by अजातशत्रु
अर्जुनाला इतर सामान्य पुरुषां प्रमाणे स्तनाग्रे नव्हती म्हणुन त्यांस पूर्णपुरुष म्हणायचे.. अशी माझी माहीती आहे ..
भगवान कृष्णा बद्दल माहीती नाही ...कृपया असेल तर सांगावी
अर्जुनाला इतर सामान्य पुरुषां
In reply to फरक सांगुनच टाका by शाहिर
*याला पुरावा काय?
* याला म्हणजे या विधानाला शाहिरांना नव्हे.
शोभता का हे गणपा?
In reply to अर्जुनाला इतर सामान्य पुरुषां by गणपा
काय हे गणपाभौ? कशाला खाजगी प्रश्न विचारता आहात?
अर्जुनाला इतर सामान्य पुरुषां
In reply to अर्जुनाला इतर सामान्य पुरुषां by गणपा
अर्जुनाला असामान्य पुरुषां प्रमाणे स्तनाग्रे होती असं सरळ सरळ म्हणा ना राव लोकं कन्फ्यूज होत्याल. त्याचे हात लांबीला गूड्घ्यापर्यंत पोचत असही ऐकलं होतं. बाकी व्हाय सामान्य पूरूषा निड टिट्स इज येट अन स्वाल्ड मिस्ट्री होय ना ?
तुम्हाला हवं म्हणूनच तुम्हाला
In reply to अर्जुनाला इतर सामान्य पुरुषां by आत्मशून्य
तुम्हाला हवं म्हणूनच तुम्हाला अनेक अवयव असतात असं नाही. आता पर्यासारख्या काही लोकांना नाही का गरजेपेक्षा अधिक अक्कल असते, पण ती काढता येत नाही.
थोडं डार्विन, डॉकीन्स वगैरे वाचा म्हणजे ऑपॉप प्रश्नाचं उत्तर समजेल.
जीवशास्त्र आणि व्याकरणदृष्ट्या हेच वाक्य योग्य वाटत आहे. अर्जुनाचं काय ते माहित नाही. करणला विचारलं पाहिजे.
मुख्य विषयावर या लोकहो...
In reply to तुम्हाला हवं म्हणूनच तुम्हाला by ३_१४ विक्षिप्त अदिती
कॅटऐवजी लोक अर्जुनाची स्तनाग्रे बघायला का जाताहेत, हे समजत नाही.
(म्हणजे मला म्हणायचंय की, विषय कॅटचा चालला असताना एकदम वेगळी चर्चा कशासाठी?)
-एक भोळाभाबडा प्रश्न-
यो मॅन, ज्याची त्याची आवड हे
In reply to मुख्य विषयावर या लोकहो... by योगप्रभू
यो मॅन, ज्याची त्याची आवड हे विसरू नका.
अगं काय हे? हसून पुरेवाट. काय
In reply to यो मॅन, ज्याची त्याची आवड हे by ३_१४ विक्षिप्त अदिती
अगं काय हे?;)
हसून पुरेवाट.
काय रे बाबा! धागा कोणता, विषय भरकटत कुठे गेलाय....
कॅटने माफी मागून विषय संपवला तो याकरताच!;)
काय हे म्हणजे?
In reply to अगं काय हे? हसून पुरेवाट. काय by रेवती
काय हे म्हणजे? त्या कत्रिनाने काय दाखवलं, नाही दाखवलं आपल्याला कशाला फरक पडला पाहिजे? असेल तिची फिगर बरी, आपल्याला काय त्याचं, नाही का?
अदितीताई अवखळकर पाटील
संस्थापक, गर्ल कॉमरेडरी, मिसळपाव.कॉम
खी खी तिचा शीला की जवानी नाच
In reply to काय हे म्हणजे? by ३_१४ विक्षिप्त अदिती
खी खी
तिचा शीला की जवानी नाच पाहून मला काही वाटलं नाही हे नमूद करू इच्छिते.;)
हे नमुद करणं 'जाता जाता:' असं
In reply to खी खी तिचा शीला की जवानी नाच by रेवती
हे नमुद करणं 'जाता जाता:' असं करायचं असतं हो. ;)
ओह्हो! आले का महाराज
In reply to हे नमुद करणं 'जाता जाता:' असं by धमाल मुलगा
ओह्हो! आले का महाराज लुडबुडायला!
केळीच्या पानाची रेशिपी नसते हे तरी जाता जाता सांगते.;)
तू कत्रिनाकडे करतेस तसं
In reply to ओह्हो! आले का महाराज by रेवती
तू कत्रिनाकडे करतेस तसं दुर्लक्ष कर गं धम्याकडे! नुस्ता रेसिप्या मागतो आणि स्वतः काही करत नाही हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे.
हा हन्त हन्त!
In reply to ओह्हो! आले का महाराज by रेवती
ज्याचे करावे भले......
ह्हंऽऽ.. असो!
>>केळीच्या पानाची रेशिपी नसते हे तरी जाता जाता सांगते
असते. आमच्या इकडल्या इंडियन स्टोअरमध्ये मिळणार्या पा.कृ.च्या पुस्तकात मी स्वतः पाहिलीए. थ्यांक्सगिव्हिंगच्या वेळी करतात स्पेशली.
हो हो
In reply to हा हन्त हन्त! by धमाल मुलगा
हो हो त्यात धमु ने लिहीलेली सुरळीच्या वड्यांची रेसिपी पण होती.
काय छान लिहीलं होतं ....एक सुरळी घ्यायची आणि तिच्या वड्या पाडायच्या... हाकानाका..:D
आहेच आमचा धमु हुशार, वाटलं
In reply to हो हो by सूड
आहेच आमचा धमु हुशार, वाटलं काय तुम्हाला!
आला आता हाही! आत्ता प्रतिसाद
In reply to हो हो by सूड
आला आता हाही!
आत्ता प्रतिसाद देतानाचं धैर्य दाखवण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी कुठं जातं?
आता ठरलं.
पुढच्या अठवड्यात कॅटरिनाला (ही शिनेमातली नटी नव्हे.....कॅटवॉक करणारी रिना नावाची मुलगी आहे) बघण्याच्या कार्यक्रम ठरवलाय्.......तू सुरळीच्या वड्या करायच्यास.
धम्याच्या नादी लागू नकोस्.....त्याचं लग्न झालय.
तू तुझं भलं पहा बरं!
तीऽऽऽ !!
In reply to आला आता हाही! आत्ता प्रतिसाद by रेवती
तीऽऽऽ !! मंगळीऽऽ !! रेवतीआज्जी काय ते जपून ठरव, जी मला आवडल्ये ती परदेशस्थ नाही म्हणून तू नकार देत्येस. कसं होणार माझं.... :D
-जपून कार्य कर ते
श्या! हसून हसून दमले बुवा!
In reply to तीऽऽऽ !! by सूड
श्या! हसून हसून दमले बुवा!
जपुन कार्य करते =)) =)) =))
In reply to तीऽऽऽ !! by सूड
जपुन कार्य करते =)) =)) =))
तिचा शीला की जवानी नाच पाहून
In reply to खी खी तिचा शीला की जवानी नाच by रेवती
ओक्के !
रंगाकांकांचे काय ?
या या या महिला आघाडीचीच कमी
In reply to काय हे म्हणजे? by ३_१४ विक्षिप्त अदिती
या या या महिला आघाडीचीच कमी होती इथे.
अदिती और रेवती बस दोनोही काफि है.
आता डब्ब्ल शेंचुरी नक्की. ;)
याचाच अर्थ माझी बिघलेली
In reply to या या या महिला आघाडीचीच कमी by गणपा
याचाच अर्थ माझी बिघलेली रेशिपी येणार आहे लौकरच!
तुझा प्रतिसाद गृहित धरलाय हो गण्या!
तेवढी जरा केळीची पानं पाठवून दे बरं!
रेशिपी म्हटली की आपला
In reply to याचाच अर्थ माझी बिघलेली by रेवती
रेशिपी म्हटली की आपला प्रतिसाद आलाच समज. ( आपल काय ठरलय? मी तुझ्या धाग्याचा टिरापी वाढवायचा अन तु माझ्या. ) ;)
बाकी एकच पान काय आख्खी बाग पाठवतो. पत्ता व्यनी कर. :p
थ्यँक्स हा गण्स
In reply to या या या महिला आघाडीचीच कमी by गणपा
थ्यँक्स हा गण्स! ;-)
आता तू स्वयंपाकाची आघाडी सांभाळल्यावर डबल सेंच्युरीची आघाडी आम्हाला नको का सांभाळायला?
का बे गणपा.. पा़कृ सोडुन बाकी
In reply to थ्यँक्स हा गण्स by ३_१४ विक्षिप्त अदिती
का बे गणपा.. पा़कृ सोडुन बाकी धाग्यावर हल्ली अंमळ जास्ती वेळ घालवायला लागलाय जणू..
फोकस करा की जरा.. ;)
अहो अर्धवट, गणपा मिपावरचा
In reply to का बे गणपा.. पा़कृ सोडुन बाकी by अर्धवट
अहो अर्धवट, गणपा मिपावरचा बाब्या आहे. त्याने काही केलं तरी आम्ही ते उचलूनच धरतो.
अर्जुन vs एकलव्य
In reply to अर्जुनाला इतर सामान्य पुरुषां by आत्मशून्य
त्याचे हात कुठेही पोहोचोत, पण त्याच्या पेक्षा एकलव्यच श्रेष्ठ होता,
बिचार्याचा अंगठा कापुन घेण्यात आला..नाहितर..........
-अ बीटर ट्रुथ दॅट नो वन वॉन्ट्स टू स्पिक
अवांतरः या धाग्यावर अवांतर चर्चा नको, म्हणून इथेच थांबत आहे,
वर पुर्णपुरुष असा उल्लेख आला होता,
त्या बद्दलची तुकडा माहिती बाहेर आली,ते स्पष्ट व्हावे इतकेच त्या मागचा अंत्यस्थ हेतू होता,
बाकि चालू द्या...........
वेगळे वळण?
In reply to अर्जुन vs एकलव्य by अजातशत्रु
बिचार्याचा अंगठा कापुन घेण्यात आला
चर्चा आता वेगळे वळण घेणार काय?
>>चर्चा आता वेगळे वळण घेणार
In reply to वेगळे वळण? by सुनील
>>चर्चा आता वेगळे वळण घेणार काय?
अरे अता दुसरं वळण आलं, पहिलं राहिलं मागे.........
अरे अता दुसरं वळण आलं, पहिलं
In reply to >>चर्चा आता वेगळे वळण घेणार by मनराव
आले का आणले ?
अंगठा कापून घेतला म्हणणारे जाती पातीच्या राजकारणाने अंध झालेले असतात त्याला काय करायचे :)
द्रोणाचार्यांनी अंगठा मागितला ह्याचा अर्थ त्या अंगठ्याचा वापर धनुर्विद्येत न करण्याचे आश्वासन मागितले. पण द्रोणाचार्य पडले ब्राह्मण, आणि आम्ही तर आमचे आयुष्य ब्राह्मणद्वेषाला वाहून घेतले आहे :)
आमची लायकी नाही, सवलती-आरक्षण मिळून शिक्षणात गती नाही, नोकरीत कुत्रे विचारत नाही आणि गल्लीत मुली विचारत नाहीत मग आम्ही बामणांच्या नावानी खडे फोडतो आणि स्वतःचे कमीपण झाकून टाकतो. मग ब्राह्मण स्वकर्तूत्वा वरती वर गेला हे मान्य न करता आम्ही आमच्या डोक्यावर पाय देउन तो वर गेला असे गळे काढतो आणि आमचे अपयश झाकतो. मग मिळेल तिथे आम्ही आमची गरळ बाहेर काढतो.
काय हरकत हाय काय तुमची ?
बामणशत्रु
>>द्रोणाचार्यांनी अंगठा
In reply to अरे अता दुसरं वळण आलं, पहिलं by परिकथेतील राजकुमार
>>द्रोणाचार्यांनी अंगठा मागितला ह्याचा अर्थ त्या अंगठ्याचा वापर धनुर्विद्येत न करण्याचे आश्वासन मागितले.
हे इंटरप्रिटेशन नवीन (मी आधी न वाचलेले) आहे.
अर्थात असे इंटरप्रिटेशन केले तरी द्रोणाचार्य लगेच दोषमुक्त होत नाहीत. "अंगठा कापून मागणे" आणि "अंगठा धनुर्विद्येत न वापरण्याचे आश्वासन मागणे" यात फक्त तांत्रिक फरक आहे. आवडत्या (उच्चवर्णीय) शिष्याला वाचवण्याची (आणि त्यासाठी कनिष्ठ वर्णीयाचा बळी देण्याची) वृत्ती तशीच आहे.
इंटरप्रिटेशन नवीन (मी आधी न वाचलेले) आहे
In reply to >>द्रोणाचार्यांनी अंगठा by नितिन थत्ते
यात आश्चर्य ते काय थत्ते साहेब चालायचच, ;)
तरी मी हा असा तुमच्यासारखा उल्लेख केला नाही -
आवडत्या (उच्चवर्णीय) शिष्याला वाचवण्याची (आणि त्यासाठी कनिष्ठ वर्णीयाचा बळी देण्याची) वृत्ती आहे.
पण ते म्हणतात ना खाईल त्याला खवखवे,
ज्यांना जिकडे तीकडे द्वेषच दिसतो, त्यांना असे अकलेचे तारे तोडण्यात असूरी आनंद मिळत असतो,
.
.
{अंगठे बहाद्दर}
>>हे इंटरप्रिटेशन नवीन (मी
In reply to >>द्रोणाचार्यांनी अंगठा by नितिन थत्ते
>>हे इंटरप्रिटेशन नवीन (मी आधी न वाचलेले) आहे.
गो नि दांडेकरांचे महाभारत वाचा. त्यात असा स्पष्ट उल्लेख आहे.
अर्थात असे इंटरप्रिटेशन केले
In reply to >>द्रोणाचार्यांनी अंगठा by नितिन थत्ते
अर्थात असे इंटरप्रिटेशन केले तरी द्रोणाचार्य लगेच दोषमुक्त होत नाहीत.
आणि एकलव्यसुद्धा दोषमुक्त होत नाही. व्यवहारशून्य पढतमूर्ख आणि एकलव्य यांना एकाच तागडीत तोलायला हरकत नसावी. अर्थात एकलव्याने राजीखुशीने हे केले की जबरदस्तीने त्याचा अंगठा तोडला गेला (जे झालेले असणे परफेक्टली पॉसिबल आहे) हे ठाऊक नाही. तसे असल्यास एकलव्याला 'व्यवहारशून्य' ऐवजी 'असहाय्य' म्हणावे लागेल.
आवडत्या (उच्चवर्णीय) शिष्याला वाचवण्याची (आणि त्यासाठी कनिष्ठ वर्णीयाचा बळी देण्याची) वृत्ती तशीच आहे.
असेच म्हणतो.
अरे अता दुसरं वळण आलं, पहिलं
In reply to अरे अता दुसरं वळण आलं, पहिलं by परिकथेतील राजकुमार
तुम्हि स्वतःच्या अकलेचे तारे तोडण्यात लय हुशार आहात,
डबक्यात राहणार अन् विचारहि तसेच साजेसे करणार तुम्हि,
मि कोण आहे मला आरक्षण मिळते/घेतले का नाहि,
या गोष्टी माहित नाहित तुम्हाला,
त्या इथे सांगून उपयोगाचेहि नाही.
इतकच सांगतो मी वेलसेटेल्ड आहे.बाकिच्या गोष्टि जाणून घेण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांनी प्रत्यक्ष भेटच घ्या आणि आपआपले कंड शमवा.
{द्वेषकथेतिल खाजकुमार}
प्रत्यक्ष भेटच घ्या आणि
In reply to अरे अता दुसरं वळण आलं, पहिलं by अजातशत्रु
तुमच्या वेलसेटल्डचे रहस्य हे आहे होय ? चान चान
पण आम्हाला असले नवाबी शौक नाहीत.
प्रत्यक्ष भेटच घ्या आणि
In reply to प्रत्यक्ष भेटच घ्या आणि by परिकथेतील राजकुमार
इतक्या खालच्या पातळीवर आम्ही उतरत नाही,
आमच्या बोलण्याचा अर्थ असा काढलात यावरुन तुम्हालाच त्यात भारी रस दिसतोय हे स्पष्ट आहेच, :)
यासाठि एखादा पठान बघा, ;)
यासाठि एखादा पठान बघा तुम्ही
In reply to प्रत्यक्ष भेटच घ्या आणि by अजातशत्रु
तुम्ही बघितला आहेत तेवढा पुरे की.
आम्हाला काय असे उद्योग करुन वेलेसेटेल्ड व्हायचे नाहीये .
पर्या पर्या पर्या, यासाठी
In reply to यासाठि एखादा पठान बघा तुम्ही by परिकथेतील राजकुमार
पर्या पर्या पर्या, यासाठी आपल्याकडून एक ट्रीट तुला. :)
(पर्याला इतिहास रीरायटींगसाठी ओसरी देणारा) पेशवे
षटकार .............
In reply to प्रत्यक्ष भेटच घ्या आणि by परिकथेतील राजकुमार
प्रत्यक्ष भेटच घ्या आणि आपआपले कंड शमवा.

परा भौ ....खतरनाक टायमिंग !!
वेगळे वळण?
In reply to वेगळे वळण? by सुनील
काय राव अवांतर वाचा कि
{ द्वेषकथेतील खाजकुमार }
एकलव्या चा उल्लेख
In reply to वेगळे वळण? by अजातशत्रु
याला आमच्याकडे " सांगायला गेला कि टांगायला नेणे" अस वाक प्रचार आहे ...
इथे धनुर्विद्ये मधे श्रेष्ठ कोण हा प्रश्न नाही ..
पुराणा मधे पुर्ण पुरुष कोणास म्हणले आहे हा आहे ..
(कैच्या काय चाल्लय राव )
एकलव्या चा उल्लेख
In reply to एकलव्या चा उल्लेख by शाहिर
तुमच्या कडे म्हणजे नक्कि कुठे ?
हो नव्हताच,पुढे हे आल्यामुळे तो उल्लेख आला
अर्जुनाची वैयक्तिक माहिती,
*त्या माहिती बद्दल धन्यवाद.
जौ द्या स्तनाग्रा वरुन हे आठवले पहा आणि मजा घ्या, चील ;)
https://www.youtube.com/watch?v=GKia0LdQx1w&feature=player_detailpage
अवांतरः काहिंना म्हणे आता यावर स्वप्न पडू लागलीएत,
काय पण असतात एक एक :bigsmile:
पूर्ण पुरुष
In reply to अर्जुनाला इतर सामान्य पुरुषां by गणपा
अहो ..वरती पुर्ण पुरु षाची चर्चा चालली होति ... गुगलून बघितले ..तर "अर्जुनाला इतर सामान्य पुरुषां प्रमाणे स्तनाग्रे नव्हती" असा सन्दर्भ सापडला ... मि कशाला जावु पुरावा शोधायला ..
(आणि आपण नाही हां त्यातले ..दुसर्या पुरुषा कडे बघायला )
माफ करा, तात्यासाहेब, पण
In reply to लॉजिक गंडलेय... by पंगा
विचार करून पाहिला. परंतु आपले म्हणणे पटत नाही. असो..
तात्या.
:) :) :) :) ही ही
:) :) :) :) :) :) :) :) :)
ही ही
वेळोवेळी कथा सजवण्यासाठी
वेळोवेळी कथा सजवण्यासाठी वैग्रे असला; तरी 'बेटा' या शब्दाचा अतिरेकी दुरुपयोग खटकला. बेटा/ताई हे शब्द योग्य ठिकाणी आणि मनापासुन वापरले तरच ते शोभुन दिसतात. अन्य्था त्या शब्दांमागील पवित्र नात्यांचा अपमान होतो असे माझे स्पष्ट मत आहे. बाकी लेख सर्वसाधारण ठीक आहे.
तात्या या प्रतिसादामागील भावना समजुन घेउन स्पष्ट प्रतिसादाबद्दल रागवणार नाहीत अशी आशा आहे.
तात्या या प्रतिसादामागील
In reply to वेळोवेळी कथा सजवण्यासाठी by इंटरनेटस्नेही
त्यात रागवायचं काय साहेब? आपल्या मताचा निश्चितच आदर आहे.. :)
तात्या.
त्यात रागवायचं काय साहेब?
In reply to तात्या या प्रतिसादामागील by विसोबा खेचर
आम्ही आपले आभारी आहोत तात्या! :)
-
इंट्या.
अह,,, सोनिया गांधी ह्या
अह,,, सोनिया गांधी ह्या देशाच्या अप्रत्य़क्ष महाराणी आहेत... व इटालिअन वंशाचे राउल हे युवराज, त्यांच्याबद्द्ल अशी टिप्पणी ???? माफी मागितलीच गेली पाहिजे................
आत्मशून्य
इथे मिपावर खंडीभर निष्ठावान निघतील ज्यांना कॅट च्या टिपण्णी चा भयंकर राग आला असेल , व ह्या मागे भाजपच आहे असा त्यांचा दावा असेल....तत्काळ अशा राऊलप्रेमींनी इथे निषेध व्यक्त करावा...........
आहे.....अरे रे राऊल प्रेमीनी
आहे.....अरे रे राऊल प्रेमीनी येऊन इटलीप्रेम दाखवायला सुरुवातकेली सुध्दा ? ... वा वा काय स्पीड आहे...व काय देशनिष्ठा आहे ................आता काही मान्यवरांनी अडवाणी कसे फाळणीपूर्वी पाकिस्तानात जन्मलेले होते मग ते भारतीय कसे असा एक छान लेख टाकावा..... शिवाय भंकसछाप प्रतिसादांचा पाऊस पाडून मूळ मांडलेल्या विषयाची चेष्टा करावी व आपले इटलीप्रेम सिध्द करावे................
अरे हो हो!!
In reply to आहे.....अरे रे राऊल प्रेमीनी by ईश आपटे
राग आवरा आपटेसाहेब! शांत व्हा. हवे तर थंड (इटालियन) वाइन घ्या. (इनो बाळगत असालच!) तर तोही थंड पाण्यातून घ्या!
अरेरे राहुल प्रेमिनि
In reply to आहे.....अरे रे राऊल प्रेमीनी by ईश आपटे
एकदम सहमत. मुळ विशय कतरिना चा चालला होता.जे खरे आहे ते म्हटल्याबद्दल कोन्ग्रेस च्या नाकाला मिरच्या झोम्बल्या.
आत्ताच हाती आलेल्या
आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार, दिग्विजयसिंग यांनी कतरीना कैफ ही राष्ट्र सेविका समितीची सेविका असून, सलमान खान हा संघाचा कट्टर प्रचारक असल्याचे सुचित केले आहे. ;)
च्यायला. बेक्कार हसलो हे
In reply to आत्ताच हाती आलेल्या by प्यारे१
च्यायला. बेक्कार हसलो हे वाचुन.
दिग्गीराजाला मात्र अलिकडे
In reply to आत्ताच हाती आलेल्या by प्यारे१
दिग्गीराजाला मात्र अलिकडे अंमळ खूळच लागले आहे. परवा मुंबैत झालेल्या बाँबस्फोटात रा स्व संघाचा हात आहे असं तो म्हणाला.
रा स्व संघाचं कार्य, त्याच्या देशनिष्ठा या सार्या काय गोष्टी आहेत, किती खोल आहेत हे समजण्याइतकी बुद्धी दुर्दैवाने दिग्गीराजाला नाही त्याला तो तरी बापडा काय करणार..?! असो..
(कट्टर संघप्रेमी) तात्या.
तात्या, दिग्गीराजा बापडे की
In reply to दिग्गीराजाला मात्र अलिकडे by विसोबा खेचर
तात्या,
दिग्गीराजा बापडे की खुळे की आणखी कसे आहेत याची नक्की काही कल्पना नाही.
ते तसे असतील तर मीडियासमोर का बोलत असावेत?
काँग्रेस कल्चर मध्ये मॅडमच्या आज्ञेशिवाय 'अमुक'देखील करता येत नाही असे ऐकिवात आहे.
(अमुक करा पण नांदा या म्हणीतील शब्द असू शकतो, शकत नाही किंवा कसेही)
असे असल्यास हायकमांडची दिग्गी जे म्हणतात त्याला मान्यता असते का ? मान्यता असली तर कशाच्या आधारावर असते?
नसेल तर वारंवार 'तोंडघशी' पडणार्या या व्यक्तीचे तुटलेले नाक दुरुस्त करण्याच्या बहाण्याने काँग्रेस हायकमांड यांना इस्पितळात का पाठवित नाही?
असे अनेक प्रश्न उद्भवतात.
कोण बरे उत्तरे देईल??
माफी कसलि त्यात ?
काही एक गरज नाही कतरिनाला माफी मागायची. सत्य हे नेहमीच कटू असत न ते पचवण्याची ताकद ठेवलीच पाहिजे.
खरं बोल्लीस बघ चिमे! पण ते
In reply to माफी कसलि त्यात ? by चिमी
खरं बोल्लीस बघ चिमे!;)
पण ते कटू सत्य पचवणं ज्याच्यात्याच्या पचनशक्तीवर अवलंबून असतं
त्या कॅटरिनाअक्काकडे बघ एकदा. अजून टकाटक दिसत्येय.
चाराठ शिनेमे कुठे गेले नाहीत अजून. ती कश्याला पायावर धोंडा पाडून घील?
म्हणेल,"मरेनात का बाकीचे......मी वादात अडकणार नाही........माफी मागून हे प्रकरण संपवूया (म्हणजे नवे चालू करता यील)."
इश्श! तात्यांचं आपलं काहीतरीच...
प्रिय तात्या,
माझ्या सौंदर्याबद्दलच्या कॉम्प्लिमेंट्सबद्दल मेनी मेनी थँक्स.
मला 'बेटा' म्हणून तुम्ही अगदी लाजवलंत हं. अहो माझा जन्म १९८४ चा. सध्या मी २७ वर्षांची घोडी आहे. तुम्ही चाळीशी पार केलीत ठीक आहे. पण 'बेटा' म्हणू नका. तो 'सल्लू' ४६ वर्षांचा आहे. (त्याचा जन्म १९६५ चा). तरी इतके दिवस माझ्या मागे मागे फिरत होता. पण तुमच्यासारखं त्यानं नाही कधी मला 'बेटा' म्हणून हाक मारली. आता तुम्हीच मला 'बेटा' म्हणलंत तर त्याची अडचण नाही का होणार?
बाकी माफी मागितलेल्या विषयावर पुन्हा काही बोलत नाही. उगीच 'दबंग' लोक त्रास देत सुटतात. आणखी एक विनंती. तुम्ही सारे भारतीय माझ्या पाठीमागे कशाला उभे राहाता? तिथून माझा डान्स नीट नाही बघता येणार. त्यापेक्षा स्टेजसमोर बसा.
तुमची
शीला
(माय नेम इज शीला)
ख ल्ल्ला स ! प्रभू आपल्याकडून
In reply to इश्श! तात्यांचं आपलं काहीतरीच... by योगप्रभू
ख ल्ल्ला स !
प्रभू आपल्याकडून ह्या प्रतिसादाबद्दल एक 'स्ट्राँग' ची मानवंदना.
प्रतिसाद एक नंबर्
In reply to इश्श! तात्यांचं आपलं काहीतरीच... by योगप्रभू
प्रभू ची लीला (शीला ??) अगाध आहे
व्वा प्रभू..!
In reply to इश्श! तात्यांचं आपलं काहीतरीच... by योगप्रभू
व्वा प्रभू..! :)
_/\__/\__/\_
In reply to इश्श! तात्यांचं आपलं काहीतरीच... by योगप्रभू
प्रभु, मस्तच !
इश्य
In reply to इश्श! तात्यांचं आपलं काहीतरीच... by योगप्रभू
अफाट प्रतिसाद
छान दिसतेय कतरीना
छान दिसतेय कतरीना फोटोत.
लेखही तसाच छान.
येथे पहा
सुब्रमण्यम स्वामींनी त्यांच्या संकेत स्थळावर बरेच काही (दाखल्यांसकट) लिहून ठेवले आहे तिकडे नजर टाका.
https://www.janataparty.org/sonia.html
जनता पार्टीची लिंक वरवर
In reply to येथे पहा by रणजित चितळे
जनता पार्टीची लिंक वरवर वाचली. भयानक आहे ते. कुणीतरी अनुवादीत केले तर लवकर कळेल. (गुगल्या अनुवाद करतांना सरमिसळ करतो.)
छे बॉ ! ह्या मिपाकरांना
छे बॉ !
ह्या मिपाकरांना कुणाचे भले म्हणून झालेले बघवत नाही.
आता झाला तो राहूल गांधी पंतप्रधान तर असे काय मोठे आकाश कोसळणार आहे ? चांगला तरणाबांड, हाय फाय इंग्रजी बोलणारा, वेळेला झोपडीत राहणारा, लोकलमधून हिंडणारा माणूस आहे तो.
मोष्ट इलिजेबल ब्याचलर का काय ते पण आहे म्हणे.
जळतात मेले त्याच्यावर सगळे.
क्वालिफिकेशन
In reply to छे बॉ ! ह्या मिपाकरांना by परिकथेतील राजकुमार
चांगला तरणाबांड, हाय फाय इंग्रजी बोलणारा, वेळेला झोपडीत राहणारा, लोकलमधून हिंडणारा माणूस आहे तो.
पंतप्रधान होण्यास एवढेच क्वालिफिकेशन चालते का साहेब. मुंबईतली बरीच पोरं मग पात्र ठरतील की.
नसावे!
In reply to क्वालिफिकेशन by रणजित चितळे
नसावे. देवेगौडा ह्यापैकी एकाही निकषांवर उतरत नव्हते बहुधा!
मग
In reply to नसावे! by सुनील
काय क्वालिफीकेशन पाहिजे, कोणी सांगाल काय.
नागरीकशास्त्र
In reply to मग by रणजित चितळे
सातवीचे (सहावी किंवा आठवीदेखिल असू शकेल, आता निश्चित आठवत नाही) नागरीकशास्त्राचे पुस्तक वाचावे.
पंतप्रधान होण्यास एवढेच
In reply to क्वालिफिकेशन by रणजित चितळे
वा वा वा !
अहो गांधी घराण्याचे सुपुत्र आहेत ते. विसरलात का काय ? ह्यापेक्षा अजुन काय क्वालिफिकेशन हवे हो तुम्हाला ?
सामान्य मतदारानी आपली पायरी ओळखून रहावे. सांगून ठेवतोय !
पराविजयसिंग
कमाल आहे बॉ गांधी घराण्याची!!!
In reply to पंतप्रधान होण्यास एवढेच by परिकथेतील राजकुमार
काय म्हन्ता?
शास्त्री, मोरारजी, चरण सिंग, वि पी सिंग, चंद्रशेखर, नरसिंह राव, वाजपेयी, देवेगौडा, गुजराल आणि मनमोहन सिंग हे सगळे गांधी घराण्याचे होते?
कमाल आहे बॉ ह्या घराण्याची!!
अहो बरोबर आहे. घराणे
In reply to कमाल आहे बॉ गांधी घराण्याची!!! by सुनील
बरोबर आहे.
शास्त्री, मोरारजी, चंद्रशेखर,
In reply to कमाल आहे बॉ गांधी घराण्याची!!! by सुनील
शास्त्री, मोरारजी, चंद्रशेखर, नरसिंह राव आणि मनमोहन सिंग हे सगळे गांधी घराण्याच्या शब्दाबाहेर होते?
आडनावं तीच हवीत असे कुणी सांगितले काका???
वि पी सिंग मुळात काँग्रेस विरोधी पक्षात होते. (पंतप्रधान होताना)
शास्त्री, मोरारजी (नेहरु मृत्यू - इन्दिरा उदयापूर्वी) , देवेगौडा, गुजराल (राजीव मृत्यू- सोनिया उदयापूर्वी) यांच्या काळात काँग्रेसचे नेतृत्व कोणी गांधी करत नव्हते.
चंद्रशेखर राजीव गांधींच्या पाठिंब्यावर झालेले होते.
आज राहुल मी पंतप्रधान होणार म्हणताच एमेम सिंग बाजूला होतात की नाही पहा.
+१
In reply to शास्त्री, मोरारजी, चंद्रशेखर, by प्यारे१
सबब, गांधी आडनाव हेच क्वालिफिकेशन नाही, हे तुम्ही मान्य करताहेत तर!
झोपलेल्याला उठवता येते. सोंग
In reply to +१ by सुनील
झोपलेल्याला उठवता येते. सोंग घेतलेल्याला नाही.
आपल्या भक्तीला सलाम....!!!
तरीही १) जनतेचा कौल- चरण सिंग, व्हीपी सिंग, चंद्रशेखर, वाजपेयी
२)तत्कालिन प्राप्त परिस्थिती (चंद्रशेखर यांना पाठिंबा) ,
३)पदावर येण्याची पात्रता /शक्यता - मनमोहन सिंग ( अंतरात्मा की आवाज बद्दल अजूनही मतभेद आहेत).
आणि
४) व्यक्तीची उपलब्धता -नरसिंहराव. (गांधी घराण्यातील कोणीही उपलब्ध नव्हते/ स्वतःला करुन देत नव्हते)
(याबरोबरच बाकी गोष्टी असतीलच)
यावर बर्याच गोष्टी लोकशाही मध्ये अवलंबून असतात असे नाही वाटत?
का राजेशाही प्रमाणे प्रियांकाच्या ५ वर्षाच्या अपत्याला (नक्की वय आणि लिंग ठाऊक नाही, आपणच सांगा) आपण पंतप्रधान करु पाहताय....????