भोग
या जन्माची पापं या जन्मातच फेडायला लागतात म्हणे. आयुष्याचे भोग प्रत्येकाने भोगायलाच पाहिजेत असाही एक प्रवाद आहे. पण मी आयुष्यात अशी कुठली पापं केली आहेत की माझे भोग संपता संपत नाहीत हे कळेना झालय. नाही मी काही 'तसला' विचार मांडत नाही आहे किंवा माझी गार्हाणी गाण्याचा पण माझा विचार नाही. पण माझी दु:खभरी दास्तां ऐकुन तुमच्या डोळ्यात पण पाणी येइल. अजुन काही नाही तुमच्या कडुन फक्त थोड्या सहानुभुतीची अपेक्षा आहे.
मी सुरुवातीलाच मोकळेपणाने कबूल करु इच्छितो की माझ्या आयुष्यात हे जे काय घडले आहे न पेक्षा जे काही नेहेमीच घडते त्यात अंशतः चुक माझीच आहे. पण पुर्णपणे मी स्वत:ला दोष देउ इच्छित नाही. या आपत्तींसाठी इतरही काही असामी जबाबदार आहेत.
माझी ही आतडी पिळवटुन टाकणारी, हृदयाचा थरकाप उडवणारी दर्दभारी कहाणी नक्की कशाशी निगडीत आहे असा (तुम्ही अजुन वाचत असाल तर) प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर मी सस्पेंस अजुन लांबवत नाही. मी माझ्या हिंदी चित्रपट बघण्याच्या दैदीप्यमान कारकीर्दीबद्दल बोलतो आहे.
मी पोटात असताना आई बाबा पिक्चर पहायला गेले होते. त्याकाळी जोडप्या जोडप्याने चित्रपट पहायची पद्धत फारशी प्रचलित नसल्याने बरोबर आज्जी देखील होती. चित्रपट होता अब्दुल्ला. राज कपूर्, संजय खान, संजीव कपूर, झीनत अमान, परवीन बाबी, डॅनी, मेहमूद अशी भलीमोठी स्टारकास्ट होती त्याची. पण चित्रपट तद्दन राडा असणार कारण मध्यंतरात आज्जीने आईला अश्या वेळेस असले पिक्चर बघु नयेत, याला (म्हणजे पिताश्रींना) बसु देत बसायचे असेल तर असे सांगुन बाहेर काढले. आईने तो चित्रपट अर्धवट सोडला आणि बहुधा त्याची भरपाई मी अजुनही तसलेच किंवा त्यापेक्षाही रद्दड चित्रपट बघुन करतो आहे.
मी थेटरात जाउन, दिडक्या मोजुन मनस्ताप विकत घेतल्याची बरीच उदाहरणे आहेत. प्लॅटफॉर्म (अजय देवगण फेम), मृत्युदाता (अमिताभ बच्चन, करिष्मा कपूर), गायब (तुषार कपूर - अंतरा माळी), जानी दुष्मन (सोनु निगमचे "जावेद भाई सो रह्यले है" हे अतिशय श्रवणीय गीत असलेला चित्रपट), हाउसफुल्ल (अक्षय कुमार), अॅक्शन रिप्ले (परत अक्षय कुमार), तेहेलका (शक्तिमान, धरमपाजी, नसरुद्दीन शाह आणि पल्लवी जोशी फेम), एकलव्य (हा ऑस्करला गेला?), हम तुम्हारे है सनम (रुकरुक खान), होगी प्यार की जीत (अजय देवगण, अर्शद वारसी आणि बहुधा नेहा आणि मयुरी कांगो), इतिहास (अचको मचको का असेच काहीतरी गाणे होते या चित्रपटात. अभिनित (????) ट्विंकल खन्ना आणि अजय देवगण (आत्ता कळाले ना प्रश्नचिन्ह का होते ते), शपथ (जॅकी, मिथुन), सौगंध, घर घर की कहानी . यादी संपता संपत नाही.
यातले काही चित्रपट तर मला खात्री आहे की त्या चित्रपटात काम करणार्या सो कॉल्ड अभिनेत्यांनी देखील् बघितले नसतील. प्लॅटफॉर्म तर मी ऐकुन आहे की थेटरात जाउन संपुर्ण बघुन आजघडीला जिवंत असणारी लोकं हाताच्या बोटांवर मोजता येतील. यातले दोन अभागी महाभाग मला माहिती आहेत. एक मी आणि दुसरा माझ्याबरोबर् चित्रपट बघणारा माझा चुलत भाऊ. प्लॅटफॉर्म मला २०.५० रुपयांचा मनस्ताप देउन गेला (यात पिक्चर संपल्यानंतर खाल्लेल्या २ क्रोसिनच्या गोळ्यांचा हिशोब देखील धरला आहे). मृत्युदाता बघणारे देखील असे फार कमी लोक सापडतील. अमिताभ ला खात्री होती की किमान घरचे लोक तरी बघतील. त्यातला अभिषेक करिष्मा कपूरशी ताजे ताजे फाटलेले असल्यामुळे कटाप झाला. मी तो माझ्या मामेभावाच्या मामाबरोबर त्याच्या पैशाने बघितला (एकुण या पिक्चरने असाही बर्याच लोकांचा मामा केला आहे). गायब डोक्यात तिडीक जाण्याइतपत बोर होता. पण तिकिटं मी काढली होती आणि शेवटपर्यंत जर बसलो नाही तर मित्र त्यानंतर कधीही त्या तिकिटांचे पैसे देणार नाहीत हे माहिती असल्यामुळे मी मुकाट बसलो. मी आधी निघुन गेलो तर बरेच आहे पैसे वाचतील असा सुज्ञ विचार करुन मित्र सुद्धा बसुन राहिले. हाउसफुल्ल मी शेवटपर्यंत बघितला कारण शेवट होइपर्यंत हसता येइल असा एकतरी जेन्युइन विनोद असेल अशी मला वेडी आशा होती. नाही म्हणायला चित्रपटात दीपिका, जिया खान आणि लारा दत्ता यांनी दृष्ट लागेल असा परफॉर्मन्स दिला आहे. (म्हणजे काय हे डिटेलात विचारु नका. समझने वाले को इशारा काफी है). जानी दुष्मन डझनावारी हिरो नक्क्की काय करणार आहेत असा विचार करत करत पाहिला. हम तुम्हारे है सनम "गले मै लाल टाई" नावाचे अति भारी गाणे ऐकुन आणि बघुन देखील पुर्ण बघितला. शपथ मध्ये त्यातल्या २ हिरोईनी दर तिसर्या मिनिटाला कपडे काढत असुनही बघितला (म्हणुनच बघितलास असा टोमणा काही लोक मारतात त्यांना मी योग्य जागी मारतो). अॅक्शन रिप्ले ३७ व्या वर्षीदेखीले अॅश किती सुंदर दिसते हा विचार करता करता संपला.
या लिस्टमधले होगी प्यार की जीत, इतिहास, सौगंध, प्यार का मंदीर, घर घर की कहानी आणि तेहेलका हे सगळे पिक्चर थेटरात बघणारा या पृथ्वीतलावरचा मी एकमेव प्राणी आहे याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. पण ........ पण... मी हे सगळे चित्रपट पुर्ण बघितले. स्टार्ट टु एंड. दुनिया मै आये हे तो जीनाही पडेगाच्या धर्तीवर पैसे देके ति़कीट खरीद्या है तो पाहनाही पडेगा असा सुज्ञ विचार करुन असेल कदाचित. मात्र एक चित्रपट असा आहे की जो मी महत्प्रयासानेदेखील पुर्ण बघु शकलो नाही.
चित्रपटाचे नाव आहे सावरिया. रणबीर कपूर, सोनम कपूर, सलमान खान, रानी मुखर्जी असली तगडी स्टारकास्ट असुनदेखील, बॉलीवॉडच्या स्वयंघोषित स्टीवन स्पीलबर्ग संजय भन्साळी ने दिग्दर्शित केलेला असुनदेखील आणि पडेल चित्रपट सोशिकपणे आणि निमुटपणे पुर्ण बघण्याचा दैदीप्यमान इतिहास माझ्या पाठीशी असुनदेखील मी हा चित्रपट थेटरात पुर्णपणे बघितलेला नाही आहे. वास्तविक आम्ही जयपुरला होतो. तिथले राजमंदिर हे भारतातले सगळ्यात उत्तम चित्रपटगृह आहे. मोठा पडदा, उंची गालिचे, आरामदायक खुर्च्या असे सगळे असुनसुद्धा मी सावरिया अर्धा सोडुन परतलो.
सुरुवातीपासुनच सावरिया मध्ये अंधार अंधार असतो. रणबीर कपूर अचानकपणे एका गावात टपकतो. पुलावर (पुलाखाली नाही) सोनमला बघतो आणि तिच्या प्रेमात पडतो. मग पाठलाग करणे वगैरे ओघाने आलेच. हा सगळा वेळ निळा आणि काळा रंग अगदी डोक्यात जातो. दुसरा रंगच नाही. गाव तर असले भारी असते की तिथे सोनम होडीतुन ये जा करत असते (भारतातले कुठले गाव म्हणे हे). आजुबाजुला मोट्ठाले मुखवटे लावलेले असतात. १९५६ सालच्या चित्रपटांप्रमाणे सेट लावले आहेत हे जाणवुन येत असते. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर रणबीर, सोनम आणि राणि आलटुन पालटुन अगम्य भाषेत बडबड करत असतात. रणबीर अधुन मधुन चेहेर्यावर कमालीचे मंद भाव आणुन चेहेरा हलवत असतो. त्याच्या मनासारखे घडल्याचे ते द्योतक असते (हे आपण समजुन घ्यायचे). दुर्दैवाने आपल्या मनासारखे काहीच घडत नसते.
मी बराच वेळा सोसले.
रणबीर कपूर कधीतरी मध्येच टॉवेल गुंडाळुन नाचतो आणि तो टॉवेल खेळवत काहीतरी करायचा प्रयत्न करतो. ते मात्र मला असह्य झाले. अर्रे आम्ही काय तुला कपडे काढलेले पहायला आलोय का? तु म्हणजे काय जॉन अब्राहम आहेस का? म्हणजे जॉन अब्राहमने कपडे काढले तर मी बघायला जाइन असे नाही. पण त्याच्याकडे किमान बॉडी शॉडी आहे. याच्याकडे काय आहे . पिचपिचीत दंड? आणि काहीही कसेही असेल तरी आम्हाला काय उपयोग? मी आपली वेडी आशा बाळगुन होतो की रणबीर पासुन सोनम पण काही प्रेरणा घेइल. न पेक्षा किमान राणी मुखर्जी तिच्या भूमिकेला जागुन (चित्रपटात तिने वेश्येची भूमिका केली आहे) एकदा तरी टॉवेल नाचवेल. पण असे काहीही झाले नाही. क्षणाक्षणाला माझ्या संयमाचा बांध सुटत गेला. तो निळा काळा रंगा माझ्या डोळ्यात खुपत राहिला. सोनम आणि रणबीर अशक्य बोर मारत राहिले. त्यात कहर म्हणजे चित्रपटभर निवेदन राणी मुखर्जीचे होते. निवेदन - राणी मुखर्जीच्या आवाजात? अहो तिचा आवाज एरवीदेखील सहन होत नाही हो (तिच सहन होत नाही खरे म्हणजे). राणी मुखर्जी जर निवेदन करु शकत असेल तर कदाचित भन्साळीच्या पुढच्या चित्रपटात मी नायक असु शकतो याची सर्वांनी कृपया नोंद घ्यावी.
अखेर एका प्रसंगात रणबीर कपूर सोनमला घेउन सिटी टॉवर मध्ये जातो (दोस्तोव्हस्कीच्या मूळ कादंबरीत सिटी टॉवर आहे म्हणुन इथे पण असतो. कदाचित त्याच्या कादंबरीत नायिका होडी ने ये जा करत असते म्हणुन ती इथे पण करते.). आणि तिथे सोनम दुसर्याच कोणाच्या (म्हणजे सलमान खानच्या) प्रेमात पडली आहे आणि त्याचा ती रोज पुलावरं 'इंतजार' करत असते असे सांगुन त्याचा पचका करते (पर्यायाने आपला कारण आपण अंधार, एकांत, २ तरूण जीव या सगळ्याची गोळाबेरीज करुन काहीतरी 'वेगळेच' घडण्याची अपेक्षा करत असतो ना). प्रत्येक माणसाच्या सहनशीलतेचा एक ट्रिगर पॉइंट असतो. या विवक्षित क्षणी माझ्या सहनशीलतेच्या सर्व मर्यादा संपल्या. २००७ सालच्या नोव्हेंबर महिन्यात एक अघटीत घटना घडली आणि मी आयुष्यात पहिल्यांदा आजुबाजुला न बघता ताडकन उठुन चित्रपटगृहाबाहेर चालता झालो. त्याच्या आधी आणी त्याच्यानंतर अजुनपर्यंत हा योग आलेला नाही. मी जाण्या आधी अर्धे थेटर रिकामे झाले होते. काही महाभाग अजुनही बसले होते त्यांनी चित्रपट पुर्ण बघितला असण्याची काही शक्यता नाही. त्यातले बरेच जण ५० रुपयात (हो हो तिकीट दर खुपच कमी होते) ३ तास एसीत बसण्याच्या अपेक्षाने आले असावेत. त्यांनी निवांत झोप काढली असावी.
जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार नंतर प्रेक्षकांना असे बरेच बोर करुन झाल्यावर आणि सलमान खानची पुलावर बरेच दिवस वाट बघितल्यावर सोनमला रणबीर कपूरच्यी प्रेमाची साक्ष पटते आणि ती पण त्याच्यावरच्या प्रेमाचा इजहार करते. आणि सरतेशेवटी सलमान पुलावर टपकतो. सोनमची परत एकदा द्विधा मनस्थिती होते पण ती तरीही सलमान बरोबर निघुन जाते आणि आपला टॉवेल हीरो एकटा पडतो. कहानी खतम. मला खात्री आहे दोस्तोव्हस्की ने कथा एवढी खराब लिहिली नसावी. पण भन्साळीने त्याची पार वाट लावली आहे. सर्वाकलीन अंधारमय वातावरण, वास्तवाच्या पल्याडले सेट्स, भयाण प्रकाशयोजना, राणी मुखर्जीचे निवेदन, सलमानचे कधीही केव्हाही प्रकटणे आणि तो सोनमच्या बापाच्या वयाचा वाटत असतानाही तिला तो आवडणे वगैरे सगळ्याचे गोष्टी तिडीक आणतात.
चित्रपट बघितल्याव माझी अवस्था 'भय इथले संपत नाही' अशी झाली होती. त्यानंतरही असले भयाण अनुभव माझ्या वाट्याला आलेच. हाउसफुल्ल, अॅक्शन रिप्ले, सारखे चित्रपट मी नंतरही थेटरात जाउन बघितले. भोग सरता संपत नाही आहेत. मिपावर बरेच नाडीवाले, हस्तसामुद्रिक तज्ञ आहेत. कोणी माझी पत्रिका बघुन हे भोग कधी सरणार हे सांगु शकेल काय?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अहो ती तुमची चुकी आहे...आमिर
रोगापेक्षा उपाय भयंकर म्हणा की
>> एकामागून एक रद्दड, पडेल नि
गेल्या १० वर्षातला विचार करता
तीस मार खान मधील प्रसंग आठवला
हा हा हा. आजवर फक्त दोन
सध्या हेच म्हणतो.....
हा हा!! भोग आहेत ते भोगूनच
लेख मनाला भिडला! सावरियाबद्दल
त्यापेक्षा इमरान हश्मीचे चे
शिक्षा
त्यापेक्षा
सहमत
अभय , कभि अलविदा ना कहना
''दशावतारम ला काय बोलायचे
हा हा हा
त्यातलं ठा ठा ठा दूनीयाकी ठा ठा ठा गाण जाम आवडायच
आपण प्लॅटफॉर्मग्रस्त जीवांचा
माझी फिल्लमबाजी ....
हॅ हॅ हॅ . माझ्यासारखे
असे अति-भंकस पिक्चर...
हा हा हा ... एकेकाळी जेव्हा
चित्रपटांची नावेच भयानक आहेत.
छान
याक नम्बर चिरफाड .
येक लंबर...
सैफ, माधुरी आणि
तुम्ही 'भांडारकरांचा'
बास्का? बास्का?? बास्का???
राहूल देवचं नाव वाचून राहून
खीक्क्!
अवांतरः खलनायिकाचे काही सीन्स
स्वागत!
तुझी तिच्याबद्दलची मतं मी
धत लेका. तुझी तिच्याबद्दलची
हॅ हॅ हॅ. चित्रपटाचे नाव
राहुल रॉय - आशिकी, फिर तेरी
राहुल रॉय ह्याने माझ्या मते
हाय कंबख्त.. तुने 'नाकाबंदी'
या लिष्टेत एक नाव राहुन गेले.
मस्त चिरफाड...