अगदी सविस्तर ओळख करून दिल्ये. आमच्या माहितीत फक्त रामदास आणि अपर्णा पाध्ये हेच होते बाहुल्यांचे खेळ करणारे आणि शब्दभ्रमकार. अर्थात याखेळांचं तंत्र वेगळं आहे. बाहुल्या हा एकच धागा समान! वेगवेगळे मानधनाबद्दलचे इ. अनुभवही आवडले.
मुलाखत आवडली. वर पैसा म्हणतात त्याप्रमाणे बाहुल्यांचा खेळ म्हटला की केवळ रामदास आणि अपर्णा पाध्ये हेच आठवतात. मनोरंजनासाठी काही पारंपरिक जमाती बाहुल्यांचा वापर करुन आपला उदरनिर्वाह करत असायचे त्या सांस्कृतिक कलांचा उपयोग व्यावसायिक स्वरुपासाठीही करता येऊ शकतो असेही मुलाखतीवरून वाटले. अर्थात कोणतीही कला शिकणे, शिकवणे त्यासाठी मेहनत घ्यावी लागते. खूप वेळ द्यावा लागतो. घरकाम, कुटुंब, विविध जवाबदार्या सांभाळून बाहुली नाट्य सादर करणार्या सुषमा दातार आणि त्यांच्या मैत्रिणींचे कौतुकच आहे. कालच विकास यांचा सांस्कृतिक समन्वय साधणार्या संस्थेचा परीचय लेख वाचत होतो तेव्हाच एक असे जाणवले की, सांस्कृतिक कला परंपरांची जोपासना करणार्या अशा उपक्रमांना, कलांना प्रोत्साहित केले पाहिजे. नाही तर भविष्यात अशा कलाप्रकारांना आपण विसरुनही जाऊ. अशा कलाप्रकारातील कलाकारांना मानाची वागणूक मिळाली पाहिजे. बाकी, मनोरुग्णालयातील स्त्रीचा अनुभव कालवाकालव करणारा. बाहुली नाट्यांच्या परंपरेबद्दल अधिक माहिती मिळाली असती तर वाचायला अजून आवडलेच असते.
सुषमा दातार यांच्या कार्याचा परिचय करुन दिल्याबद्दल अरुंधती यांचे आभार..!!!
-दिलीप बिरुटे
धन्यवाद!
स्वाती२, पैसा, स्वाती दिनेश, शुचि, डॉ बिरुटे, जागू, श्रावण मोडक... सर्वांचे प्रतिसादाबद्दल आभार! :-)
पैसा, मलाही बोलक्या बाहुल्या, कठपुतळ्या म्हणजे एक तर राजस्थानी कठपुतळ्या आणि रामदास पाध्येंच्या बाहुल्या एवढंच माहीत होतं. ह्या मुलाखतीच्या निमित्तानं माझ्याही ज्ञानात थोडीफार भर पडली. मला सर्वात छान वाटलं ते त्यांनी आपली कला शेअर करणं गेली वीस वर्षे चालू ठेवलंय. सहकलाकार मैत्रिणींनी ठरवून वेगवेगळ्या सामाजिक, शैक्षणिक किंवा मनोरंजक विषयांवर मिळून केलेले हे बाहुलीनाट्याचे खेळ कितीतरी चिमुकल्यांना आणि मोठ्यांना मनमुराद हसवून गेले आहेत!
डॉ बिरुटे : << मनोरंजनासाठी काही पारंपरिक जमाती बाहुल्यांचा वापर करुन आपला उदरनिर्वाह करत असायचे त्या सांस्कृतिक कलांचा उपयोग व्यावसायिक स्वरुपासाठीही करता येऊ शकतो असेही मुलाखतीवरून वाटले.>> हो, पुण्यात चोखीदानी, संस्कृती सारख्या ठिकाणी रोज कठपुतळ्यांचे खेळ होणे म्हणजे ह्या कलेचे व्यावसायिक रूपच म्हणता येईल. टूरिझम इंडस्ट्रीत वेगवेगळ्या ठिकाणी, सांस्कृतिक महोत्सवांत, बालरंजन कार्यक्रमांमध्ये किंवा अॅम्युझमेन्ट पार्क्स मध्ये अशा कलेचा खेळ करता येऊ शकतो.
<< बाहुली नाट्यांच्या परंपरेबद्दल अधिक माहिती मिळाली असती तर वाचायला अजून आवडलेच असते. >> तुमचा हा निरोप मी सुषमाताईंना नक्की देते. :-)
श्रामो, त्यांच्या अनेक ओळखींमधील एक ओळख आहे ही! :-)
खरंय. सहमत. त्यांचे माध्यमाविषयीचे एक पुस्तक मी वाचले आहे. त्यानंतर दुसरे पुस्तक बहुदा सतीश बहादुरांच्या संदर्भातील चित्रपट या विषयाशी संबंधित आहे. बाहुल्यांचा छंद मात्र मला अजिबात माहिती नव्हता. आधी सुषमा दातार म्हटल्यावर मला त्या वेगळ्या छंदांच्या माणसांची कुंडली ठेवणाऱ्या सुषमा दातार वाटल्या. मग फोटो पाहिल्यावर कळलं या वेगळ्या. छंदवाल्या सिंहगड रोडच्या तर या प्रभात रोडच्या अशा ओळखी मी सांगायचो याची आठवण झाली.
प्रतिक्रिया
छान ! मस्त सफर !!
चांगला उपक्रम ! अन अनुभव
धन्यवाद अवलिया आणि
छान माहिती
मस्त!
छान मुलाखत.
सांस्कृतिक कला परंपराची जोपासना
वा..
खुपच छान.
भर
धन्यवाद! स्वाती२, पैसा,
खरंय