नुकत्याच आम्ही केलेल्या पहाणीनुसार अनेक नवोदित मिपालेखक व त्याचबरोबर काही जुने माननीय पण लेखक म्हणुन दुर्लक्षीत असलेले जेष्ठ मिपासदस्य अनेक अडचणींना तोंड देत आहेत. सर्वात महत्वाची अडचण म्हणजे त्यांनी केलेले लेखन साधारण २०/२५ मिनिटातच दुसर्या पानाच्या दिशेने प्रवास चालु करते. अशावेळी सतत ऑफिसचे काम / बॉसची नजर / इतर कामे / प्रवास अशा अनंत अडचणीतुन मार्ग काढून त्यांना लॉग-इन होउन आपला धागा पुन्हा वर आणावा लागतो. बर्याचदा तर धाग्यावर एकही प्रतिक्रीया आलेली नसल्याने प्रतिक्रीयेला उत्तर म्हणुन अथवा धन्यवाद म्हणुन देखील धागा वर न काढता येण्याची अडचण उदभवते, प्रतिसादासाठी टाहो फोडावा लागतो. बर्याचदा स्वतःच्याच दुसर्या एखाद्या आयडीची मदत घ्यावी लागते. तर कधी आपल्यासारखाच एक आपदग्रस्त पकडून स्वतःच्या धाग्यावर एकमेकांचे मनोरंजन करावे लागते.* (ह्या वाक्याचे श्रेय मकी)
अशा सदस्यांना ह्या सर्व अडचणीतुन मुक्ती देण्यासाठी 'परा-नाना प्रोत्साहन मंडळातर्फे' 'शेड्युल प्रतिक्रीया' हे पॅकेज सादर करण्यात येत आहे. ह्या पॅकेजमुळे आपल्या अनेक अडचणी अगदी सहज सुटू शकतील आणि लेखनाला प्रतिक्रीयांचा पाऊस पडेल तो वेगळाच. म्हणजे अगदी 'एक दाम दो काम' असे झाले.
पॅकेजची वैशिष्ठे :-
१) ठरलेल्या शेड्युल नुसार आपल्या धाग्यावर एक अथवा लागोपाठ २ प्रतिक्रीया दिल्या जातील.
२) धाग्यावर प्रतिक्रीया देताना फोटु अथवा वर्तमानपत्रातील दुवे वापरल्यास त्याचे वेगळे चार्ज पडणार नाहीत.
३) आपला धागा दुसर्या पानावर गेल्यास रक्कम दुप्पटीने परत करण्यात येईल.
४) आपल्या धाग्यावर प्रतिक्रीया देताना आपल्याच जुन्या लेखांचे संदर्भ वारंवार देण्यात येतील. जेणेकरुन ते लेख देखील वर आणण्यास मदत होईल.
५) एकदम ५ धाग्यासाठी हे पॅकेज घेतल्यास २ कौले काढण्यास मोफत मदत पुरवली जाईल. व त्या कौलांवरील पहिल्या २ प्रतिक्रीया फुकट असतील.
६) चलचित्र (व्हिडो) प्रतिक्रीया उपलब्ध. (मागणी नोंदवताना सजहराव का मदनबाण ह्याचा योग्य निर्देश द्यावा)
७) धाग्यावर अतिरिक्त रक्कम आकारुन नाना-पुपे / धम्या-पुपे असे दुरंगी सामने तसेच नाना-परा-पुप्या-धम्या असा चतुरंगी सामना देखील खेळवता येईल.
८) मिभो,घासुगुर्जी,प्रभुगुर्जी,इंद्र पवार अशा अभ्यासु + गर्दीखेचु प्रतिक्रीया रास्त दरात उपलब्ध.
९) आपल्या धाग्यावर दंगा होउन पोपकॉर्नची दुप्पट विक्री झाल्यास नफ्यातील काही हिस्सा आपणास देण्यात येईल.
१०) Give and Take प्रतिक्रीया उपलब्ध.
काही अटी :-
१) धाग्याचे काश्मिर करावयाचे असल्यास स्वतंत्र चार्जेस पडतील.
२) तुमच्या धाग्यावर कायम तुमची खिल्ली उडवणार्या सदस्यास नडावयाचे असल्यास त्याचे दर सदस्याच्या मिपासदस्यकालावधीवर अवलंबुन असतील.
३) संपादकांशी वैर घेतले जाणार नाही.
४) स्त्रिया / धर्म / लता मंगेशकर / भिमसेन जोशी इत्यादी विषयावर टिपणी करावयाची असल्यास प्रत्येक ओळीला वेगळा दर पडेल.
५) धाग्यावर वैयक्तिक वाद-विवाद घडवायचे असल्यास समोरची पार्टी जे दर लावेल ते ग्राहकास बंधनकारक असतील.
६) मिभोकाका , इंद्र पवार ह्यांच्या प्रतिक्रीया हव्या असल्यास चार दिवस आगोदर मागणी नोंदवावी. डोन्रावांसाठी ८ दिवस आधी.
७) मिभोकाका व प्रभुगुर्जी ह्यांच्या प्रतिक्रीयांची जबाबदारी सर्वस्वी लेखकाची राहिल. धाग्यालाच विरजण लागल्यास अथवा धागा क्रिप्टिक बनल्यास आम्ही जबाबदार असणार नाही.
८) अवलिया यांच्या प्रतिक्रीयांना कायमच पंख लागत असल्याने त्या प्रतिक्रीयांचे स्क्रिन शॉट पुरावा म्हणुन पाठवले जातील.
९) कलंदर आणि विक्षिप्त प्रतिक्रीया हव्या असल्यास दोन दिवस आधी कळवावे. कलंदर प्रतिक्रीयेमध्ये स्वतःच्या उद्योगांचे फोटु देणे, माहिती देणे असे प्रकार घडून धागा हायजॅक झाल्यास आम्ही जबाबदार नाही. हेच नियम डॉन्रावांच्या प्रतिक्रीयेला देखील लागु.
१०) डॉन्राव आणि इंद्र पवार ह्यांच्या प्रतिक्रीया ह्या सहसा धाग्यापेक्षा मोठ्या असल्याने, त्यांच्या प्रतिक्रीया धाग्यावर हव्या असल्यास धाग्याचा कच्चा मजकुर ४ ते ८ दिवस आगोदर पाठवुन ठेवावा.
मग आता विचार कसला करताय ? उचला किबोर्ड आणि टंका नाना अथवा पराला व्यनी.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
28202
प्रतिक्रिया
139
मिसळपाव
प्रतिक्रिया
आम्ही idea दिली, आम्हाला किती
मस्त आहे! गुड!
दोन प्रश्न
सदर योजनेखाली सदस्यांकडून
In reply to दोन प्रश्न by नितिन थत्ते
+१
In reply to सदर योजनेखाली सदस्यांकडून by परिकथेतील राजकुमार
योजनेच्या मजकुरात पुढील
In reply to सदर योजनेखाली सदस्यांकडून by परिकथेतील राजकुमार
- 'एक दाम दो काम'
- आपला धागा दुसर्या पानावर गेल्यास रक्कम दुप्पटीने परत करण्यात येईल.
- एकदम ५ धाग्यासाठी हे पॅकेज घेतल्यास २ कौले काढण्यास मोफत मदत पुरवली जाईल. व त्या कौलांवरील पहिल्या २ प्रतिक्रीया फुकट असतील.
- धाग्यावर अतिरिक्त रक्कम आकारुन नाना-पुपे / धम्या-पुपे असे दुरंगी सामने तसेच
(स्वसंपादनाची सोय नसल्याने डीलकथेतील कॅशकुमार यांना मजकूर बदलता येणार नाही :) ) द केस रेस्टस् हिअर. अधिक माहितीसाठी न्यायलयाच्या अपमानाचा खटला केव्हाच डिसमिस झाला आहे. :) >>मराठी माणसाला व गांधी /नेहरु विरोधकांना सतत त्रास देणे यातील दुसरा भाग मान्य असला तरी पहिला भाग मान्य नाही सबब पूर्ण वाक्य रद्द समजण्यात येत आहे. (वकील)"मराठी माणसाचे पाय खेचायची वृत्ती"
In reply to योजनेच्या मजकुरात पुढील by नितिन थत्ते
इतिहास
In reply to "मराठी माणसाचे पाय खेचायची वृत्ती" by अवलिया
बरोबर आहे. तो प्रतिसाद आपण
In reply to इतिहास by नितिन थत्ते
आम्हीदेखील पूर्वी काही करू
In reply to इतिहास by नितिन थत्ते
योजनेच्या मजकुरात पुढील
In reply to योजनेच्या मजकुरात पुढील by नितिन थत्ते
>>>> येथे धागे वर राहतील याचे
In reply to दोन प्रश्न by नितिन थत्ते
ट्यार्पी वाढवण्यात
अरेरे
In reply to ट्यार्पी वाढवण्यात by Nile
थत्ते चाचा हे राण्यांसारखी
In reply to अरेरे by नितिन थत्ते
चेक ?
In reply to थत्ते चाचा हे राण्यांसारखी by परिकथेतील राजकुमार
असे चेक ने पेमेंट करत बसलास
In reply to चेक ? by छोटा डॉन
आता आलाच आहात पुण्यात तर
In reply to असे चेक ने पेमेंट करत बसलास by परिकथेतील राजकुमार
हरकत नाही
In reply to असे चेक ने पेमेंट करत बसलास by परिकथेतील राजकुमार
अड्ड्यात सामील केलेले
In reply to हरकत नाही by छोटा डॉन
कोण तुम्ही ?
In reply to अड्ड्यात सामील केलेले by Nile
बाकी संध्याकाळी चहा घ्यायला
In reply to हरकत नाही by छोटा डॉन
असे कोणाकडे जाताना मोकळ्या
In reply to बाकी संध्याकाळी चहा घ्यायला by परिकथेतील राजकुमार
चहाच्या बदल्यात बाटली हा आवळा
In reply to बाकी संध्याकाळी चहा घ्यायला by परिकथेतील राजकुमार
त्यांनी रिकामी बाटली आणली तर
In reply to चहाच्या बदल्यात बाटली हा आवळा by मृत्युन्जय
हॅ हॅ हॅ. मी पण मूळ
In reply to त्यांनी रिकामी बाटली आणली तर by सुहास..
अहो सदाशिवपेठेतली बाटली
In reply to चहाच्या बदल्यात बाटली हा आवळा by मृत्युन्जय
एक बाटली पुरायची का मग? आणि
In reply to अहो सदाशिवपेठेतली बाटली by Nile
कालपर्यंत तु बेंगलोरकर होतास
In reply to एक बाटली पुरायची का मग? आणि by मृत्युन्जय
नोबेल
In reply to चहाच्या बदल्यात बाटली हा आवळा by मृत्युन्जय
>>नाना, अरे थत्ते चाचांच्या
In reply to थत्ते चाचा हे राण्यांसारखी by परिकथेतील राजकुमार
वरील पॅकेजातील वै. १, ४, ८
In reply to अरेरे by नितिन थत्ते
निळ्या तुझा 'सत्कार' करु का
In reply to वरील पॅकेजातील वै. १, ४, ८ by Nile
वा, वा, चान, चान!
वा वा वा...
In reply to वा, वा, चान, चान! by नंदन
हॅ हॅ हॅ
हॅहॅहॅ
In reply to हॅ हॅ हॅ by ब्रिटिश टिंग्या
एक दुरूस्ती
In reply to हॅहॅहॅ by प्रकाश घाटपांडे
आयडीया चांगली आहे.
आयडीया चांगली आहे.
छान आयडिया! पूर्णवेळ गृहिणी
कॅफे बंद पडला का रे???
सौंदर्यफुफाट्याला कॅफे
In reply to कॅफे बंद पडला का रे??? by प्रभो
हॅहॅहॅ....सौंदयफुफाटा 'कॅफे'
In reply to सौंदर्यफुफाट्याला कॅफे by Nile
हान ! दोन पेग झाले की हि अशी
In reply to कॅफे बंद पडला का रे??? by प्रभो
सहमत आहे. प्रभोचा आगामी लेख
In reply to हान ! दोन पेग झाले की हि अशी by परिकथेतील राजकुमार
मग त्या किलोमीटरवाल्या
In reply to सहमत आहे. प्रभोचा आगामी लेख by अवलिया
कोणता हो? लिंक द्या
In reply to मग त्या किलोमीटरवाल्या by ३_१४ विक्षिप्त अदिती
म्हणजे ५० प्रतिसाद नक्की ना
In reply to सहमत आहे. प्रभोचा आगामी लेख by अवलिया
तु लेख तर टाक रे.. फक्त मी
In reply to म्हणजे ५० प्रतिसाद नक्की ना by प्रभो
अगदी अगदी सहमत आहे नाना आणी
टेबलाखाली किती पडतील ? हे
In reply to अगदी अगदी सहमत आहे नाना आणी by सुहास..
हे प्रश्न टेबलाभोवती बसुन न
In reply to टेबलाखाली किती पडतील ? हे by परिकथेतील राजकुमार
हे प्रश्न टेबलाभोवती बसुन न
In reply to हे प्रश्न टेबलाभोवती बसुन न by अवलिया
ज्ञान हे केवळ स्वानुभवावरच
In reply to हे प्रश्न टेबलाभोवती बसुन न by सुहास..
दोन डोळे, दोन कान उघडे ठेवुन
In reply to ज्ञान हे केवळ स्वानुभवावरच by अवलिया
>>> ज्ञान हे केवळ
In reply to ज्ञान हे केवळ स्वानुभवावरच by अवलिया
डोळे असल्यास /कान असल्यास (एक
In reply to >>> ज्ञान हे केवळ by असुर
काही एमएलएम स्किम असेल तर
योजनेला मिळणारा एकुण प्रतिसाद
In reply to काही एमएलएम स्किम असेल तर by पाषाणभेद
स्वतःला संपादक समजतोस का रे
In reply to योजनेला मिळणारा एकुण प्रतिसाद by परिकथेतील राजकुमार
हे प्रश्न टेबलाभोवती बसुन मग
परा शतकी धाग्याची ट्रिक कळली
घाऊक प्रतिक्रिया
हॅ हॅ
आज फोनवणार का?
मागच्या पानावर गेला होता.. वर
कितीत व्यवहार निपटला ?
In reply to मागच्या पानावर गेला होता.. वर by अवलिया
वैयक्तिक प्रश्न. पण बरेच
In reply to कितीत व्यवहार निपटला ? by गांधीवादी