नमस्कार मंडळी,
मिसळपाव बरेच दिवस वाचत होते. सदस्यत्व मिळाल्याची मेल काहीशी उशीर करून मिळाली. (म्हणजे पाहिलीच नव्हती!) आता मराठी वाचण्याची आणि लिहिण्याची हौस पुरी करून घेते. प्रतिसादांचे जंगी सामने मला खूप आवडतात, त्यात आपलेही २/४ खडे मारायला आवडतात.
माझ्या आयडी बद्दल म्हणाल तर, सर्कारी ब्यांकेच्या नोकरीमुळे हातात लाखो रुपये येतात आणि जातात. महागाईमुळे खात्यात फारसं काही उरत नाही. निदान नावात तरी पैसा असावा म्हणून हा आयडी घेतला. गावापासून दूर गोव्यात अर्थात "पैस" रहाते हेही एक कारण आहे.
बाकी ओळख काय सांगणार? इतर १०० जणांसारखीच मी एक!
असेच चकाट्या पिटत आणि मतांचे खडे मारत राहूच!
मी भडकमकर मास्तर...
मिपावरती काही काळ करियर गायडन्स वर्ग चालवले....
नाटक सिनेमांवरती काही लेख लिहिले...
जालिंदर जलालाबादी आणि शरदिनी अशा काही विशिष्ट व्यक्तिमत्त्वांचा जनक.....
पोटापाण्यासाठी डेन्टिस्ट म्हणून काम करतो....
ओळखपरेड ( नव्या-जुन्या सदस्यांची ओळख )अतिशय स्तुत्य उपक्रम
सध्या माझा सहभाग फक्त वाचन आणी कधीतरी प्रतीक्रीया देणे एवढाच आहे
धागा सुरू करण्यासाठी छोटा डॉन यांचे मनापासून आभार!
हा एक जुना फोटो मिळाला.
डावीकडून - तात्या, अस्मादिक, प्रभूमास्तर, सर्वसाक्षी, रामदास आणि दांडीवाले विकास(स्थळ - महेश लंच होम, ठाणे. काळ - जानेवारी २००९)
>>स्थळ - महेश लंच होम, ठाणे. काळ - जानेवारी २००९)
आयला, महेश लंच होम का ? मास्तरांचीच चॉइस असणार, त्यांचे लै आवडते रेस्टोंरंट आहे हे. :)
सह्ही है !
काळ- जानेवारी २०१० ला आम्ही पण काही थोरं आंतरजालीय व्यक्तिमत्वांसोबत तिथेच बसलो होतो.
प्रभुमास्तर, रामदासकाका, संपादक निखिल देशपांडे आणि अस्मादिक !!!
मस्त कट्टा झाला होता ;)
( फोटु काढला नव्हता, हाच फॉर्म करुन टाकावा काय ? ) ;)
- छोटा डॉन
मी अविनाश कुलकर्णी..पुण्याहुन ईजेनर झालो आहे..कारखानदारी करायचो..आता काहि नाहि...
मला एक ओळीचे धागे टाकायला आवडतात...बाकि विषेश असे काहि नाहि..फुकट प्राण वायु मिळतो म्हणुन जिवंत आहे...
बाकि..लाईफ म्हणजे Eat ..Drink and Be Merry.
ह्यातले १५ आने (तुमच्या भासेत सुमारे ९५ %) वाचनमात्र हायेत. ना ते काही लिवीत ना कोनाला भेटत. काय उपेग त्याचा.
त्या सुनीलभौनी येक फटु टाकला. तेच्यावर काय बी नाही कोनी बी लिवल. पण सोकाजीरावाने चांगल्या हस्तींचा परीचल्य दिला तर एक से एक शेरेबाजी.
असा न्याय नका करूसा.
मी अत्रुप्त आत्मा...
व्यवसाय-भटजिगिरी... म्हणजे रोज लोकांचे आत्मे त्रुप्त करत फिरतो ;-)
बिल्ला नं- अजुन माहित नाही,,,,,(किंवा हाच असावा ;-) )
माझ्या विषयी माहिती-इथले बाकिचे लोक सांगतील,कारण तीच खरी असते असं म्हणतात.
विशेष-अंतरजालावर खेळता खेळता मिपावर आलो..आणी मी,,,पा...चाच झालो
सगळे प्रतिसाद वाचायच्या भानगडीत पडलो नाही पण सगळ्या आयडींवरून नजर फिरवली.
यातले जेमतेम १५-२० आयडी सध्या मिपावर लेख/प्रतिसाद रुपात अस्तित्वात आहेत. कदाचित काही वाचनमात्र असतीलही!
@ भाते :- +१ सहमत
मी मात्र सगळे प्रतिसाद वाचले आणि त्यात मिळालेल्या २००८ च्या http://www.misalpav.com/node/846 या धाग्याचे प्रतिसाद वाचण्यात काल माझा सगळा दिवस गेला.
मिपावरच्या सर्व जुन्या लोकांपैकी काही लोकच आज हजर असतात हे बाकी खरे.
या बाबतीत मला एका मिपास्नेहींनी मला सागितलेले आठवते की
"मराठी आंतरजालावर साधारण २-२.५ वर्षांनी पिढी बदलते असं माझं एक निरिक्षण आहे"
आणि ते खरच आहे. काही कार्यबाहुल्यामुळे येत नाहीत तर काही फक्त वाचनमात्र असतात कशातच भाग घेत नाहीत. अपवाद विजुभावु आणि पेठकरकाका...
मी मिपा वर टोपीवाला मन्हून वावरतो. ना डोक्यावर केस ना टोपी, तरी " टोपीवाला " हे नाव का धारण केलं हे मलाही आठवत नाही. लोगिन करून फार कमी येत्तो. मिपा उघडून दणकन नवे लेखन वर जावून [ जुनी सवय ] आपल्या आवडीच्या लेखांचा आस्वाद घेतो. बऱ्याचदा लेखा पेक्षा प्रतिसादच आवडतात.
माझ नाव दिलीप माथुलकर.माझ कालच, आजचं आणि me be उद्याच गाव सुद्धा चंद्रपूर.[ महाराष्ट्राच्या नकाशात सापडेल हो..] वय वर्ष ४६, नौकरी करतोय, घरी, आफिसात मिपा वर जाता येते [ चाणाक्ष मिपाकर नक्कीच सरकारी नौकरी अस समजले असतील.] पाककृती सौ ला सोबत घेवून वाचतो.[ हे तर मलाही करता येते/ माहित आहे- इति ; सौ ] परंतु अजून तोंडात काही पडल नाही.
मिपा वरचे इतर सभासद एक्मेंकाना चांगले "ओळखून" आहेत याची प्रतीची प्रतिसाद वाच्णून येते.
कॉम्पुटर/ मोबाईल या वरील लेख वाचायाला [ कधी-कधी काड्या करून पाहायला ] आवडतात. असाच लेख वाचून माझ्या samsung ६८०२ चा सुपर user बनायला गेलो आणि दोन दिवस व रु. २०० खर्च करूनही सुपर बनता आल नाही. दुसर्या लेखा प्रमाणे *९९# वापरून मोबाईल वरून बँक balance चेक करायला गेलो आणि mobile बँकिंग बंद करून घेतले. सुरु करण्यासाठी ३ दिवस sbi मध्ये खेटा घालाव्या लागल्या. सतत ३ दिवस ब्यांकेत गेल्यामुळे, ब्यान्केच तोंड न पाहता mobile बँकिंग कोणत्याही फोन वर कस सुरु करायचं याच ध्यान आलं. परंतु सतत तीन दिवस कार्यालयीन वेळेत बँकेत गेल्यामुळे " तुम्ही रिटायर्ड झालात काय " असा प्रश्न ब्यांकेतल्या बाबू ने विचारल्या मुले अकाली म्हातारपण येत आहे कि काय अस वाटून गेल. सबब थंडी असूनही [इच्छा नसूनही] पहाटे ६ किलोमीटर फिरावे लागत आहे. तूर्तास एवढेच.
नमस्कार मीपकारहो,
मी निलीमा *angel*
मूळची औरंगबदची,पण सध्या वास्तव्य पुण्यात. तशी मी इकडे कुणाला प्रत्यक्ष भेटलेली नाही,पण बर्याच जनानचा पंखा आहे *yahoo* . माझी आवड म्हणाल तर खाणे ,झोपने , *music2* आणि फिरणे...काम करणे फारस आवडत नाही,तरी आपला वेळ जावा म्हणून एकाआयाटी कंपनीत कार्यरत.
नमस्कार! मी बोका-ए-आझम! मुख्य काम मिशा साफ करणे,पलंगावर लोळणे आणि अगदीच नाविलाज झाला तर काम करण्याचा आव आणणे. मी प्रशिक्षण क्षेत्रात उंदीर मारत फिरत असतो. वास्तव्य बडी बाका नगरीत. मिपावर मला माझ्या एका मानवी मैत्रिणीने मासळीचं आमिष देऊन ढकलले (पण अजून मासळीचा पत्ता नाही! णिशेध!). इतिहास, राजकारण आणि अर्थशास्त्र हे प्रचंड आवडीचे विषय. आम्ही बोका असल्यामुळे कुठल्याही भांड्यात तोंड घालून फिस्कारत असतो!
आधी माबो, मग मनोगत, मग उपक्रम, अशा एक एक पायर्या पार करत आधी वाचनमात्र मिपाकर झालो.
आणि
आता तर पक्का मिपाकर झालो.
आय.डी. अद्याप सांभाळून आहे.बर्याच वेळा उडाला पण असता.पण संपादकांनी अद्याप सांभाळून घेतले आहे.
आमचे अतिशय आवडते लेखक म्हणजे, जीवन भाऊ आणि पेशवे....ते आजकाल जास्त लिहीत नाहीत.
बाकी अधिक जाणून घ्यायचे असेल तर, आमचे प्रोफाइल बघा...
टोपण नाव घ्यावे असे कधीही वाटले नव्हते.मिसळ पाव मध्ये थोडीशी बारीक शेव टाकण्याचा दोन चार वेळा प्रयत्न केला , पण कोणावरही आडवी/उभी/तिरकस/बोचरी टिका नसतांना,चार दिवस प्रकाशित झालेला साधा प्रतिसाद ,बरोब्बर नाहीसा होत असे ! ! कदाचित संपादक मंडळीस शेव जरा जास्तच तिखट लागत असावी ,अशी मीच माझी समजुत करुन घेतली आणि प्रतिसाद देणे बन्द केले , मात्र " मिसळपाव " दररोज चाखत असतो.
एक कवन आठवले " रोज रोज नित्य नवा मेवा , तुम्ही खावा ! रेवडीचा हि स्वाद आम्ही का न चाखावा ? "
लिहावेसे भरपूर आहे , पण वर उल्लेखिलेली खन्त मनात आहे
प्रतिक्रिया
नाडी
ओळख
मी भडकमकर मास्तर... मिपावरती
ओळखपरेड ( नव्या-जुन्या
काही जुने आणि काही (फारच) जुने!
महेश लंच होम ?
थितं
बडिशेप
बिल
आईशप्पथ! किती जुना फोटो!!!!
जुना फोटो
मी अविनाश कुलकर्णी..पुण्याहुन
आई शप्पत.....
लिंक चुकलीये..
दुवा सुधरवला आहे. आता टिचका
संपादकांना
छ्या. ह्यो धागा कशापाई वरती आनला हाय.
मी प्राजक्ता. इथे 'प्राजु'
नमस्कार मी स्पा इथे स्पावड्या
मी अत्रुप्त आत्मा...
जनरेशन शिफ्ट
मलाही ओळखत नाहीस ना????
मै हूं ना!
गुर्जी तुमचा बिल्ला नंबर
थांकू!
आँ
रैट्ट! 14767 येच है।
तिरशिंगराव माणुसघाणे, मी
तिरशिंगराव माणुसघाणे,
तुम्ही बरी "नजर" ठेवता
खुपच जुना धागा!
आपूनको लोगां बॅट्याभाई का
उगाच बोलत नाहीत लोक!!
आयला सच्ची?
@ भाते :- +१ सहमत
माझी "ओळख" जागु तै च्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Is the U.S. Losing Saudi Arabia to China?स्वतची ओळख
मी दिपक.कुवेत
धन्यवाद हा धागा काढल्याबद्दल
जनान
जनान
(No subject)
>>> तरी आपला वेळ जावा म्हणून
प्यारे१
हम्म.
म्यांव म्यांव
हाहाहा!
ह्या धाग्यात देखील अशीच चर्चा
असेच आंतरजालावर इकडे-तिकडे भटकत असतांना...
मिपाकरांची ओळख