✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मिपाकरांची ओळखपरेड ( नव्या-जुन्या सदस्यांची ओळख ) ...

छ
छोटा डॉन यांनी
Tue, 08/10/2010 - 14:39  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
55069 वाचन

💬 प्रतिसाद (304)

प्रतिक्रिया

नमस्कार

घाटावरचे भट
Wed, 08/11/2010 - 01:58 नवीन
मी घाटावरचे भट. पुण्यास असतो. बिल्ला क्र. १३५९. मिपावर आल्यावर लै चांगले लोक भेटले. नंदन, पिडांकाका आणि भाग्यश्री यांच्याशी प्रत्यक्ष भेटीचा योग आलेला आहे. बाकी पब्लिकशी च्याट/बझ वगैरे माध्यमातून संपर्कात असतो. फारसे लिखाण केलेले नाही (कारण - अर्थातच 'जमत नाही'). सध्या केवळ वाचनमात्र असतो (किंवा वा, छान, महान, कडक अशा प्रतिक्रिया देतो). मिपावरील रामदास, बिका वगैरे फंडू लेखकांचा फ्यान आहे. बाकी छंद वाचन, शास्त्रीय संगीत वगैरे... कलोअ. - भट
  • Log in or register to post comments

नमस्कार !

संदीप चित्रे
Wed, 08/11/2010 - 02:03 नवीन
माझे नाव आणि आडनाव हाच आय.डी. आहे त्यामुळे ओ़ळख पटणे हा प्रॉब्लेम नस्से ! पु.लंनी सांगितल्याप्रमाणे 'उप'जीविकेचे साधन म्हणून आय.टी. क्षेत्रात सध्या गुणवत्ता व्यवस्थापनात लुडबुड (आर तिच्यायला ! म्हंजी क्वालिटी म्यॅनेजमेंट म्हन की रे भौ !) 'मिपा'चा म्हटलं तर जुनाच सदस्य आहे. मिपावरचे मला प्रत्यक्ष भेटलेले / ना भेटलेले असे अनेक मित्र-मैत्रिणी जमले आहेत. 'वाचन हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे..' टाईप्स प्रत्येक दिवशी एखाद्या तरी पुस्तकातील काही ओळी वाचल्याशिवाय चैन पडतच नाही. अधूनमधून झटका आला की माझ्या ब्लॉगवरही काहीतरी लिहितो. बाकी बरेच छंद आहेत त्याबद्दल नंतर कधीतरी !
  • Log in or register to post comments

राम राम

वात्रट
Wed, 08/11/2010 - 02:52 नवीन
तर माझी ओळख अशी मिसळपाव चा जुना सदस्य पण वाचनमात्र .. (शक्यतो Positive प्रतिसादच द्यायचे असे ठरवले असल्याने ) लिहिणे वैगेरे आपल्याला जमत नाही अशी समजूत असलेला.. अजून एकाही सदस्याला प्रत्यक्ष भेटलेलो नाही indiat आलो कि भेटूच ज्यांना बसल्याशिवाय गप्पा मारायच्या नाहीत त्यांना प्राधान्य दिले जाईल :) ओळख होईल गप्पा होतील :) मुल गाव सातारा.. म्हणजे सातारा शहर.. सध्या वास्तव्य Land Of Opportunities ( मला खूप कमी मिळाल्या मला पण असो ) मध्ये .. नावाला BE MBA वैगेरेची certificates आहेत जवळ पण अजून उपयोग शून्य . छंद म्हणाल तर हेच आपले नेहमीचे वाचन , picture बघणे आणि जमतील तेवढी प्रेक्षणीय स्थळे बघणे आणि त्यांची स्तुती करणे
  • Log in or register to post comments

नमस्कार!!!

वेदनयन
गुरुवार, 08/12/2010 - 04:38 नवीन
बिल्ला नंबर २०८. खरे नाव सांगणार नाय. आमच्यात पद्धत नाही तशी. IT मध्ये घाण्याला जुंपलोय. खानदेशी पण मुंबैत स्थायिक; ह.मु. अमेरिकेत (सिएटल). जास्त टायम नाही मिळत नाहीतर काहीबाही खरडले असते इथे. मिपा-वाचन सुद्धा होत नाही पुर्णपणे बरेच दिवस. सैपाक छान जमतो. पण ह्या गणपा आणि दिपालीतै ने मुस्कटदाबी केली हो आमच्यासारख्यांची.
  • Log in or register to post comments

नमस्कार! मी स्वाती देशपांडे.

स्वाती२
Wed, 08/11/2010 - 05:35 नवीन
नमस्कार! मी स्वाती देशपांडे. मुक्काम शेल्बिविल, इंडियाना.
  • Log in or register to post comments

मी अरुण मनोहर. स्थायिक-

अरुण मनोहर
Wed, 08/11/2010 - 06:03 नवीन
मी अरुण मनोहर. स्थायिक- सिंगापूर. मूळ गाव- नागपूर. वाचन आणि लेखनाची प्रचंड आवड असल्यामुळे मिपा कडे ओढल्या गेलो. मिपाच्या आधीच्या वर्षांपासून मिपावर होणारे सगळे बदल अनुभवले आहेत. बिल्ला क्र. ८९३ लघु कथा लेखन हा माझा अतिशय आवडीचा विषय. "रोजाक- एक गोपाळकाला" हा विविध लघु कथांचा संग्रह नुकताच प्रसिद्ध झाला आहे. हटके- असे काही तरी लिहीण्याचा नेहमी प्रयत्न करतो. रुळलेल्या वाटांवर वाचना साठी जायचा देखील कंटाळा येतो. विनोदी, विज्ञान-काल्पनिका, गुढ, रहस्य, सामाजिक अशा विविध विषयांवर कथा लिहील्या आहेत. सिंगापूरला शब्दगंध हा कवितांना वाहिलेला उपक्रम आहे. त्यासाठी दरमहा कविता केल्या जातात. माझे मिपावरचे लेखन इथे मिळेल- http://misalpav.com/newtracker/893 इथे सगळ्यांची ओळख वाचून आनंद झाला. सर्व मिपाकरांना नमस्कार.
  • Log in or register to post comments

माझी ओळख

उपाशी बोका
Wed, 08/11/2010 - 07:27 नवीन
मिसळपावचा सर्वात जुना सदस्य ( सदस्य क्रमांक ७ - पहिले ६ मालकांकडे आहेत) :) माणसे मांजरी, बोके पाळतात, म्हणून मी १ माणूस पाळला आहे - त्याचे नाव बंड्या. अजून एकाही मिपाकराला भेटलो नाही आणि मलाही कोणी फारसे ओळखत असेल असं वाटत नाही. मी फारसे लिहित नाही, पण बहुतेक दररोज इथे वाचन करतो.
  • Log in or register to post comments

:-)

सहज
Wed, 08/11/2010 - 07:44 नवीन
ओह! मी सदस्यत्व घेताना (बिल्ला क्रमांक ८) एक मांजर आडवी गेली होती, तो बोका होता तर! ;-) असो मी सहज, चोता दोनचा फॅन इतकी ओळख चोताच्या धाग्यात पुरेशी असावी. :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपाशी बोका

यांच्या

गुंडोपंत
Wed, 08/11/2010 - 11:39 नवीन
सहजरावांच्या अवघड विषयावर सहजतेने येणार्‍या लिखाणाचा मी पंखा आहे! आपला गुंडोपंत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

मी रुपाली

रुपी
Wed, 08/11/2010 - 10:10 नवीन
नमस्कार! मी मिपाची नवी सदस्या आहे. मिपाबद्दल माहिती प्राजक्ताच्या काव्यसंग्रहाची बातमी सकाळमध्ये वाचताना समजली. तेव्हापासून नियमित वाचक आहे. सदस्यत्व एवढ्यातच मिळाले. त्यामुळे अजून बिल्ला क्रमांक वगैरे प्रकार कळले नाहीत. मिपावर टंकलेखन पण अजून जमत नाही. त्यामुळे इ-सकाळच्या प्रतिक्रियेच्या जागेत लिहून इकडे चिकटवते. अजून विशेष काही लेखन केले नाही. नाव वर दिले आहे, म्हणून 's' कळलेच असेल. विवाहित आहे, म्हणून 'a' पण देत नाही ;) संगणक अभियंती आहे. वाचन, पाककला असे सध्याचे छंद आहेत. मुळची अहमदनगरची , सध्या बे एरिया, कॅलिफोर्निया मध्ये आहे.
  • Log in or register to post comments

रूपी, बिल्ला नंबर म्हणजे

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 08/11/2010 - 10:25 नवीन
रूपी, बिल्ला नंबर म्हणजे सदस्य क्रमांक. माझा बिल्ला नंबर ३०५, तुमचा ११११७!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुपी

दिसला

रुपी
Wed, 08/11/2010 - 10:36 नवीन
ग बाई दिसला ! धन्यवाद!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

माझा बिल्ला क्रमांक काय ? का

जोशी 'ले'
Wed, 08/11/2010 - 12:35 नवीन
माझा बिल्ला क्रमांक काय ? का अजून अंडर ट्रायल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

११४७९

बहुगुणी
Wed, 08/11/2010 - 21:24 नवीन
तुमच्या 'नावा'वर cursor hover केलात की सदस्य क्रमांक तळाशी डावीकडे दिसतो.[www.misalpav.com/user/....]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जोशी 'ले'

मला नाही सापडत .

निलीमा
Tue, 12/16/2014 - 15:44 नवीन
मला नाही सापडत *sad* .माझा बिल्ला क्रमा. काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

15651

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 12/16/2014 - 15:54 नवीन
15651 १. स्वतःच्या नावावर माऊस पॉईंटर ठेऊन राईट क्लिक करा ---> "कॉपी लिंक अ‍ॅड्रेस वर क्लिक करा" ---> पेस्ट करा ---> तुमचा बिल्ला क्रमा़क दिसेल : http://www.misalpav.com/user/15651 किंवा २. तुमच्या नावावर लेफ्ट क्लिक करा ---> नविन उघडलेल्या तुमच्या वैयक्तिक माहितीच्या खिडकिच्या वरच्या अ‍ॅड्रेसबार मध्ये तुमचा बिल्ला क्रमा़क दिसेल : http://www.misalpav.com/user/15651
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निलीमा

सापडला एकदाचा

निलीमा
Tue, 12/16/2014 - 15:59 नवीन
सापडला एकदाचा.. आभारी आहे ..हा भारी ये..भारी ये *i-m_so_happy* इस्पीकचा एक्का
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

आणि माझा

भिंगरी
Tue, 12/16/2014 - 16:01 नवीन
आणि माझा पण मला माहीत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निलीमा

भिंगरी

निलीमा
Tue, 12/16/2014 - 16:09 नवीन
24701
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भिंगरी

हो

भिंगरी
Tue, 12/16/2014 - 16:14 नवीन
सापडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निलीमा

काय केले बिल्ला क्रमांक घेउन

टवाळ कार्टा
Tue, 12/16/2014 - 16:40 नवीन
काय केले बिल्ला क्रमांक घेउन ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भिंगरी

काय करायचं आस्तं ?

खटपट्या
Tue, 12/16/2014 - 22:53 नवीन
काय करायचं आस्तं ? माझ्याकडंबी हाय - 17929
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

मी धुमकेतू !!

धुमकेतू
Wed, 08/11/2010 - 10:12 नवीन
जय महाराष्ट्र मंडळी ! नाव : मी धुमकेतू , नावाप्रमाणे अधून मधून हजेरी लावणार आहे ! सध्या तरी मि.पा. वर एक वाचक म्हणून वावरणार आहे पण लवकरच लेखनाची सुद्धा हौस पुरवण्यास सुरवात करणार आहे ! आणि बहुतांश मि.पा. करा प्रमाणे मी पण संगणक प्रणाली मध्ये काहीतरी घडवेन - बिघडवणे चे काम करत असतो :) धन्यवाद डॉनराव हा धागा काढल्या बद्दल !!! -- ------------------------------------------------------------------ !!! शिवराजांनी महाराष्ट्राला जगायचं कसं शिकवलं असेन , तर शंभूराजांनी महाराष्ट्राला मरायचं कसं हे शिकवलं !!! देव, देश आणि धर्मासाठी ... -- ------------------------------------------------------------------
  • Log in or register to post comments

राम राम मंडळी मी विदुषक ..

विदुषक
Wed, 08/11/2010 - 10:56 नवीन
राम राम मंडळी मी विदुषक .. कायम लोकांना हसत ठेवणारा विदुषक आपली स्तुस्ती संगे तो येक मुर्ख ! . असे मोठे लोक सांगून गेले आहेत पण प्रत्यक्ष 'डॉन' ने धमकी दिली असल्यामुळे सांगतो आता .. सदस्य तसा एक दीड वर्षापासून आहे पण काही फुटकळ प्रतिसाद सोडले तर लेखन शून्य 'रामदास' , 'बिका' ,'श्रावण मोडक','क्लिंटन',,'प्रभू मास्तर' आणि हो धनंजय,विकास, असे रथी महारथी असताना आपन आपले वाचनानंद घ्यावा ..(हल्लीचे काही धागे बघता आपण हात धुवून घ्यावा असे वाटते आहे !!!) तर आम्ही तसे बारा गावाचे पाणी पिऊन सध्या पुण्यनगरी मुक्कामी .. मिपा चे बल्लवाचार्य पेठकर काकांच्या 'यज्ञकर्म' जवळ वास्तव्य !! पोटापाण्यासाठी संगणक क्षेत्र मध्ये हमालांचा मुकादम म्हणून काम करतो (कोना ला हि 'मुका' किंवा 'दम' न देता !!) संगीत आणि वाचनाची प्रचंड आवड . जन्माने भारतीय असल्यामुळे क्रिकेट आणि राजकारण ह्यात रस आहे हे सांगायला नकोच इतिहास हा छंद !! घराचे जरा कमी करून लष्कराच्या भाकरया भाजायला मना पासून आवडते ... बस झाले किती लिहायचे ...
  • Log in or register to post comments

हॅहॅहॅ

प्रकाश घाटपांडे
Wed, 08/11/2010 - 11:01 नवीन
आमची वळख काय सांगायची? आजुन सोतालाच नीट वळखल नाई. बक्कल नं २७. तसा आळशी व अल्पसंतुष्ट. कापड घाल्तो ती बी सोताच उन थंडी वारा पाउस या पासुन संरक्षन व इतरांच लज्जारक्षन या हेतुनी. जो देगा उसका भला जो नही देगा उसका भी भला. हे तत्व आपण काय करता? असा प्रश्न विचारला तर आमचे उत्तर निरोद्योग! पोलिस बिनतारी विभागातुन इ.स.२०२० ऐवजी आत्ताच स्वेच्छानिवृत्ती घेतलीय. सध्या चिंतन (हॅ हॅ)
  • Log in or register to post comments

यांचा

गुंडोपंत
Wed, 08/11/2010 - 11:43 नवीन
आणि मी घाडपांडे साहेबांचा भांडकुदळ मित्र! आपला गुंडोपंत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

नमस्कार !

भीमसेन
Wed, 08/11/2010 - 11:05 नवीन
आम्हाला सदस्य होऊन आठवड्याचाच कालावधी लोटला आहे. ओळख खालीलप्रमाणे.. नाव: भीमसेन (खरं नाव नाहीये.. पण हे आमचे आवडते गायक + आमचे पाळण्यातले नाव आहे ) पत्ता: सध्या विदेशात. मुळचा औरंगाबादचा पण बरीच वर्षे पुण्यात वास्तव्य (वाण नाही पण गुण लागला हे सांगणे नलगे. पुण्याच्या बाबतीत आम्ही एकही अवाक्षर खपवून घेणार नाही.. :) ) वय: नावावर जाऊ नये..तसा अजून लहान आहे. दोनाचे चार सुद्धा अजून झालेले नाहीयेत ! शिक्षण: शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे, नुकतंच पदव्युत्तर शिक्षण कसेबसे पास झालो आहे. व्यवसाय: सध्या पोटा-पाण्याच्या व्यवस्थेच्या (अर्थात नोकरी) शोधात. आवडी-निवडी : चित्रपटांचा दर्दी (अगदी कुठचेही चित्रपट आवडीने पाहतो ), नवी-जुनी हिंदी/मराठी गाणी , वाचन, भटकणे इत्यादी. सध्या मिपा वरील लेखांचा फडशा पाडणे सुरु आहे. इति लेखनसीमा. सावकाशीने काही साहित्य प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. तूर्तास वाचनमात्र. मंडळ आभारी आहे !
  • Log in or register to post comments

नमस्कार

sandeepn
Wed, 08/11/2010 - 11:46 नवीन
मि संदीप. नगरी आहे. सध्या पुण्यात असतो. पोटा साठी आयटी मधे हमाली करतोय. दुसरे काही करु शकत नसल्यामुळे बहुतेक ! भटकायला आवडते, वाचन पन थोडे फ़ार, तसे रिकामे उद्योग पन भरपुर करतो. शुध्धलेखनाची पहिल्यापासूनच बोंब आहे त्यामुळे जरा समजुन घ्या हिच माफ़क अपेक्षा.
  • Log in or register to post comments

मी

समंजस
Wed, 08/11/2010 - 11:54 नवीन
मी समंजस. स्वभावानी आणि वागण्यात सुद्धा :) पुर्वी वैदर्भीयन आणि आता मुंबईकर :) चर्चा/वाद आवडतात[राजकारण/ईतिहास विशेषकरून] व्यक्तीवर हल्ला न करता त्यांच्या विचारांवर/प्रवृत्तीवर हल्ला करायलं आवडतं :) दोन्ही बाजूंचे विचार समजून घेण्याचा प्रयत्न असतो. शक्यतोवर कुठल्याही टोकाचे विचार घेउन फिरत नाही. जे आहे जसं आहे तसं स्विकारायचं हा स्वभाव(अटी लागू :)) लेखन अत्यल्प, वाचन खुप. जेव्हा पासुन मिपाचा शोध लागला(मला) तेव्हा पासून नियमीत वाचक. रोज मिपा वर आल्या शिवाय राहवत नाही ;) मिपाचा शोध लागण्याचं श्रेय जातं ते गणपाला आणि गणपाच्या चिकन पाकृ ला. गुगलवर चिकन पाकृ शोधत असताना मिपा मिळाली आणि नंतर मिपाचा रसिक :) मिपावर बरेच चांगले लेखक आहेत. त्यामुळे चांगलं लेखन वाचायलं मिळतं तसेच चर्चेच्या निमीत्ताने सुद्धा बरीच नविन माहिती मिळते आणि उत्तम बल्लवाचार्य सुद्धा असल्यामुळे चांगल्या पाकृ सुद्धा उपलब्ध होतात [रविवारचा हौशी स्वयंपाकी ;) ]. मिपाला कुठल्याही विषयाचे वावडे नसल्यामुळे सगळ्याच विषयांवर सतत काही ना काही तरी वाचायला मिळतं. गंभीर/विनोदी/हिणकस/हलकंफुलकं सगळ्याच विषयांची इथे सरमिसळ झाल्यामुळे ही मिसळ खुपच चवदार आहे :) नविन सदस्यांचे स्वागत आणि अभिनंदन मिपावर आल्याबद्दल, जुन्या सदस्यांचे आभार मिपाला चैतन्यशील ठेवल्याबद्दल, संस्थापकांचे आभार मिसळपावासारखी चवदार सर्वसमावेशक जालीय संस्था निर्माण केल्याबद्दल, चालकांचे आभार सतत कष्ट घेउन मिपा वरचा माझ्या सारख्या सदस्यांचा वावर सुसह्य केल्याबद्दल, संपादक मंडळाचे आभार सतत लक्ष ठेउन मिपा ही सर्व सदस्यांना सांभाळून घेत राहील ही काळजी घेतल्याबद्दल [एवढे दोन शब्द बोलून मी माझी ओळख आणि आभार प्रदर्शन संपवतो :) ]
  • Log in or register to post comments

मी निनाद

निनाद
Wed, 08/11/2010 - 11:57 नवीन
मी निनाद बिल्ला नं. १९ - पण फारसे लिखाण केले नाही, घडले नाही - वाचक आहे. सध्या वास्तव्य मेलबर्न, मुळचा नाशिकचा. सर्व नवीन सदस्यांचे मनापासून स्वागत! - निनाद
  • Log in or register to post comments

मी

दिपक
Wed, 08/11/2010 - 12:00 नवीन
मी दिपक बिल्ला क्रं. Image removed. मुंबैत राहतो. सध्या ऍक्टीव्ह डिरेक्टरीशी खेळत आहे कामावर. मिपाप्रेमी. मिपाच्या जन्मापासुनचा सोबती. :-) अधीमधी खरडतो. वाचण्यास खुप आवडते.
  • Log in or register to post comments

मी ऋचा.. नागपूरची आहे. सदस्य

मी ऋचा
Wed, 08/11/2010 - 13:10 नवीन
मी ऋचा.. नागपूरची आहे. सदस्य कालावधी २३ आठवडे ४ दिवस...(बिल्ला नं. कसा कळतो ब्वॉ) प्रतिसादांव्यतिरिक्त काहीही अजुन तरी लिहिले नाही..पुढचं माहित नाही..म्हणजे इच्छा आहे पण हिम्मत आणि विषय नाही.:) मिपावर कुणालाही प्रत्यक्ष ओळखत नाही पण लेखन बहुतेक सगळ्यांचच आवडतं (अर्थातच काही अपवाद आहेत). वाचनाची आवड आणि टिवल्या बावल्या करण्यात विशेष गती.. म्हणण्यासारखी मैत्री कुणाशीच नाही.पण सगळ्यांशीच व्हावी अशी इच्छा आहे आणि ती होईल याची खात्री आहे... (पॉपकॉर्न घेउन झाडावर बसणे हाही एक प्रमुख छंद) तरीही मैत्रीची ग्यारंटी ;) आताच गणपा आणि मनिशी मैत्री झालीए...
  • Log in or register to post comments

८७८८

रुपी
गुरुवार, 08/12/2010 - 00:18 नवीन
रुचा, तुमचा बिल्ला नं. ८७८८ आहे. तुमच्या नावावर mouse न्या. Browser मध्ये डाव्या कोपर्यात खाली दिसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी ऋचा

मित्र

विनायक प्रभू
Wed, 08/11/2010 - 13:21 नवीन
मी विनायक प्रभू माझी संपुर्ण ओळख खव च्या फोटो मधे. मी मिपा वरील सर्व हलकटाचार्यंचा मित्र
  • Log in or register to post comments

नावातकायआहे

नावातकायआहे
Wed, 08/11/2010 - 16:05 नवीन
नमस्कार! मी गायभने!! (आडनाव नीट वाचा) माझ्या id वरुन ते खोटे आहे ते कळाले असेच! एका ढकल पत्रातुन मिसळपाव भेटले आणि प्रेमातच पडलो. ४-५ आठवड्यानी तात्या क्रुपा झाली आणि सभासद झालो. जन्म, शिक्षण, पुण्यातच. सध्या मुक्काम: पुणे-अबुधाबी-पुणे. मी व्यवसायानी प्रक्रिया नियंत्रण अभियंता आहे. मिपा वर अजुन तरि कुणालाही प्रत्यक्षात भेटलो नाही. 'बसुन' गप्पा मारणारे नक्कि कोण हे अजुन नीट लक्षात आलेले नाही.
  • Log in or register to post comments

इंटरनेटप्रेमी

इंटरनेटस्नेही
गुरुवार, 08/12/2010 - 02:03 नवीन
माझे नाव 'इंटरनेटप्रेमी' अर्थात 'इंटरनेट वर प्रेम असणारा'. आणि खरंच आहे ते माझ्या बाबतीत, माझा दिवस सुरु होतो तो ओपेरा मिनी वर मिसळपाव ओपन करून, दुपारी मी एफबी वर टीपी करतो आणि रात्र पुन्हा मिपावर. एका अर्थाने मिसळपाव हा माझा परिवारच आहे असे मी मानतो. राहणारः मुंबई प्रोफेशन: विद्यार्थी. केव्हाही या, माझ्या खरडवहीत आपले स्वागत आहे. परिचय क्रमांक: ९०२२
  • Log in or register to post comments

परिचय

सोम्यागोम्या
गुरुवार, 08/12/2010 - 07:44 नवीन
परिचय या नावाचा चित्रपट होवून गेला असे वाटते. तो पहावा. असो. आमचा परिचय शास्त्रीय संगीताचा नि:सीम चाहता एवढाच काय तो खरा आहे असे वाटते. बाकी डिग्र्या, नोक-या आणि देश ही फक्त पोटं बडवायची साधनं आहेत. बोटं बडवायला मिपावर येतो. प्रतिक्रियारूपेण संचित: सोम्यागोम्या
  • Log in or register to post comments

नमस्कार मंडळी

दिवा
Fri, 08/13/2010 - 10:21 नवीन
मी "दिवा"- म्हणजे माझ्या नावाला समानअर्थी प्रती शब्द. बिल्ला क्रमांक: २४८ तसा मी ईथे मिपा च्या जन्मापासुनच, पण आमचा फक्त "Read only" मध्येच वावर असल्याने कोणी मिपा सदस्य आजुन तरी मित्र नाहित. सध्या पुण्यात, विदेशात असतांना मिपावर पडिक असायचो, सध्याही जेंव्हा वेळ मिळतो तेंव्हा आवर्जुन भेत देत असतो. मुळचा नाशिक जवळचा, पण बरीच वर्षे शि़क्षणानिमित्त पुण्याच्या संपर्कात. आय टी मध्ये नोकरीला मुंबई मधुन सुरुवात केली (पोटापुरता सैपाक येतो बरका ;) ) आणि जवळ जवळ ६ वर्षे मुंबई होतो, त्यामुळे मुंबई ही खास प्रिय आहे. नवी-जुनी हिंदी, मराठी गाणी ऐकणे, नेटावरती वाचन, थोडेफार भटकणे, विनोदी चित्रपटांचा खास चाहता (अगदी कुठचेही चित्रपट आवडीने पाहतो), इत्यादी. - दिवा
  • Log in or register to post comments

नाव: बोलघेवडा ('घ'

बोलघेवडा
गुरुवार, 08/12/2010 - 10:05 नवीन
नाव: बोलघेवडा ('घ' घोड्यातला) वय: आता गरिबाला काय वय असता का? राहणार: पुणे व्यवसाय: लष्करच्या भाकरया भाजणे छंद: आपल्या मालकीच्या प्रत्येक वस्तू वर पाट्या लावून दुसरयांना सतत उपदेशाचा डोस पाजणे. अड्ड्यावर कोंडाळे जमवून आपल्या जिभेची धार वाढवण्याचा सराव करणे. प्रत्येक व्यक्तीचे दर आठवड्याला बारसे करणे. ( दर आठवड्याला नवीन टोपण नाव ठेवणे) सिंहगडा वर जाणे. ( फक्त गाडीने!!) टोमणे मारणे. "आपले ठेवायच झाकून आणि दुसर्‍याच पाहायाच वाकून" या उक्तिचे कटाक्षाने पालन करणे. फोन वर कधीही हेलो चा वापर न करणे. दुसर्‍याच्या पार्ट्याना आधी दिवसभर न जेवता जाणे. स्वता: च्या पार्टीला पाकीट अशक्त आहे म्हणून आयत्या वेळी टांग मारणे. घरच्या घरी पतंगाचा मांजा बनवणे. सायकल वरुन जाताना वृद्ध इसमास "ए बाळ बाजूला हो", अश्या आपल्या वयास न शोभणार्‍या हाका मारत जाणे. सायकल वरुन जाताना केळिवाल्याला केळ्यांचा भाव विचारत जाणे. दुपारी एक ते चार दुकान बन्द ठेवणे. मिठाईच्या दुकानात देखील "इथे हवा भरून मिळेल का?" अशी निरागस चेहर्याने चौकशी करणे. घरात झुरळे मारायची उदबत्ती लावून बाहेर पसार होणे, आणि शेजार्यांची गम्मत बघण्यासाठी संध्याकाळी उशिरा उगवणे. वरच्या मजल्यावर ठोका ठोक चालू असल्यास खालून काठीने ठोकून वरच्या मजल्यावरच्या लोकाना इशारा देणे. मित्रांमध्ये एकमेकाला वडिलांच्या नावाने संबोधणे. http://bolghevada.blogspot.com/
  • Log in or register to post comments

नमस्कार सर्व नवी-जुनी सदस्य

अरुंधती
गुरुवार, 08/12/2010 - 12:57 नवीन
नमस्कार सर्व नवी-जुनी सदस्य मंडळी! माझं मिपावरचं नाव अरुंधती. पक्की पुणेकर. अगदी स.पे.! ;-) फक्त स. पे. सोडून बरेच दिवस झालेत! इथे निरनिराळ्या साहित्य-पाक-कलाकृती वाचायला आवर्जून येते. स्वतःही जमेल तसे काही-बाही लिहिते. तुमचे प्रतिसाद वाचल्यावर अजून उत्साहाने पुढील लेखन काय करावे हे विचार करायला लागते. मला छंद आहे लष्कराच्या भाकर्‍या भाजण्याचा, समाजोपयोगी कामात आपला खारीचा वाटा उचलायचा, गाण्याचा व गाणी ऐकण्याचा, वाचनाचा, लेखनाचा व उत्तमोत्तम पाकृ खादडायचा! (आणि त्यांविषयी वाचायचाही!) असो. तर ही माझी अल्पशी ओळख! :-)
  • Log in or register to post comments

अगदी स.पे.! फक्त स. पे.

बिपिन कार्यकर्ते
Fri, 08/13/2010 - 18:09 नवीन
अगदी स.पे.! फक्त स. पे. सोडून बरेच दिवस झालेत!
यु कॅन टेक अ पर्सन आउट ऑफ स.पे. बट यु कॅन नॉट टेक स.पे. आउट ऑफ अ पर्सन. ;) (ह. घ्या. रे सगळ्या स.पे. प्रेमींनो... नाही तर वाळत घालाल मला इथेच. ;) ) - कधी कधी स.पे. मधे येणारा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुंधती

नमस्कार मंडळी !

निरन्जन वहालेकर
गुरुवार, 08/12/2010 - 13:23 नवीन
नमस्कार मंडळी ! मी निरंजन वहाळेकर ! मराठी साईट शोधतांना अचानक मिपा चा शोध लागला आणि मिपाच्या प्रेमात पडलो व लगेच सदस्य झालो ते आजतागत. सदस्य कालावधी 23 आठवडे 3 दिवस. मुळंचा विदर्भातला अकोला व खामगाव येथील. पण आता अलिबाग रायगड येथे स्थायिक.थोडाफार प्रयत्न करतो काहीबाही कविता मिपा वर लिहिण्याचा जे मायबाप मिपाकर खपवून घेतात प्रसन्गी योग्य मार्गदर्शन पण करतात.मिपा कुटुंब खूप आवडते पण नवीन असल्यामुळे अजून खूप ओळखी नाहीत त्यामुळे खूप जवळीकीने अभिप्राय देण्यास धजत नाही.बाकी माहिती मिपावर आहेच. मिपाकरांची ओळखपरेड ( नव्या-जुन्या सदस्यांची ओळख )अतिशय स्तुत्य उपक्रम
  • Log in or register to post comments

संपादक महाशय, माझा प्रतिसाद

बोलघेवडा
गुरुवार, 08/12/2010 - 13:46 नवीन
संपादक महाशय, माझा प्रतिसाद का उडविण्यात आला आहे? कृपायां कारण कळेल का? -बोलघेवडा
  • Log in or register to post comments

संपादक महाशय, तसदी बद्दल

बोलघेवडा
गुरुवार, 08/12/2010 - 13:48 नवीन
संपादक महाशय, तसदी बद्दल दिलगीर आहे. आता माझा प्रतिसाद दिसत आहे. - बोलघेवडा
  • Log in or register to post comments

राम राम

पाटिल-माने
गुरुवार, 08/12/2010 - 18:42 नवीन
मी तृप्ति, मी मिपा वर वाचक म्हनुन जास्त असते. आताच खाते उघड्ले. मी पन IT wife . वास्तव्य - पुणे (मुळची कोल्हापुर्ची) जास्त काहि लिहित नाही. पन एका व्यक्तिच कवतिक करावच लागेल ते म्हण़जे "गणपा" चे. का ते तुम्हाला महितीच आहे? न चुकता त्याच्या रेसिपि चेक करतो आम्ही हपिसातले लोक. दमले मी टायप करुन --- तृप्ति
  • Log in or register to post comments

नमस्कार मिपाकर

प्राजक्ता पवार
Fri, 08/13/2010 - 16:48 नवीन
मी प्राजक्ता पवार. सध्या ठाणेकर . मुळची विदर्भातली. वाचन , पाककला , बागकाम , गाणी ऐकणे, नाटक अश्या अनेक आवडी आहेत. त्यापैकीच एक मिपाला दररोज भेट देणे. जालावर पाकृ शोधताना मिपाचा शोध लागला . सध्या माझा सहभाग फक्त वाचन आणी कधीतरी प्रतीक्रीया देणे एवढाच आहे ( मराठी टाईप करायची सवय नसल्याने ). हा धागा टाकल्याबद्दल छोटा डॉनला धन्यु. मिपाकरांशी व्यक्तिगत ओळख व्हावी अशी ईच्छा आहे. हळु हळु होईल.:smile:
  • Log in or register to post comments

सांगण्या सारख काही खास

अनाम
Fri, 08/13/2010 - 18:56 नवीन
सांगण्या सारख काही खास नाही. नाव वर दिलय तेच. जालावर गुगलताना मिसळीची तर्री सापडली. काही दिवस वाचनमात्र राहुन आनंद घेतला. मग वाटलं चला लिहिता येत नाही पण काही चांगली वाटल तर निदान प्रतिसादाची पिंक तरी टाकता येईल. म्हणुन सदस्य नामासाठी साकडं घातल. आणि आश्चर्याचा धक्काच बसला. अवघ्या १-२ तासाच्या आत मंजुरी मिळाली तिही चक्क खव आणि व्यनीच्या सुविधेसह. सरपंचांचा आभारी आहे.
  • Log in or register to post comments

नशीब लई जोरदार की हो तुमचं

मी-सौरभ
Sat, 08/14/2010 - 17:41 नवीन
:) हाबिणंदन..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनाम

मी अण्णा

येडा अण्णा
Tue, 08/17/2010 - 23:15 नवीन
नमस्कार मन्डळी _/\_, मी प्रदीप शिंदे. बिल्ला न. १३८६. मूळचा श्रीगोंद्याचा पण पुण्यात स्थायीक आहे. सध्या कामानिमित्त न्युयॉर्क मध्ये आहे. जालावर भटकताना एक दिवस मिपा ची लींक दिसली. लगेच सभासद होवुन गेलो. मिपा वर लिखाणापेक्षा प्रतिक्रिया द्यायला जास्त आवडते :) विशाल कुलकर्णी, गणपा ह्यांचा पंखा. नवी-जुनी हिंदी, मराठी गाणी ऐकणे, फिरायला जाणे, झोपणे हे आमचे छंद. - अण्णा
  • Log in or register to post comments

मी ती प्रीती....

अथांग
Wed, 08/18/2010 - 04:44 नवीन
नमस्कार ! मी प्रीती. मूळ गाव नाशिक आणि सध्या वास्तव्य अमेरिकेत. माझे मराठी वाङ्मयाबद्दलचे प्रेम पाहून एका सहृदाने 'मिसळपाव' चा पत्ता दिला आणि मग 'अथांग' या नावाने सदस्यत्वासाठी अर्ज केला. बर्‍याच कालावधीच्या प्रतिक्षेनंतर सदस्यत्व मान्य करण्यात आल्याची मेल मिळाली, व हायसे वाटले. अर्थात मधल्या काळात मिपावर 'पाहुणी' म्हणून वावर होताच. शिवाय हा ओळख करून देण्या-घेण्याचा धागा पण आनयसे गवसला..अगदी योग्य वेळी! हा धागा सुरू करण्यासाठी छोटा डॉन यांचे मनापासून आभार! मध्यंतरी 'करा कविता- स्पर्धा' नावाचा धागा बघितला आणि मी पण एक प्रयास केला. कविता मात्र पोस्ट करता येईना, तेंव्हा परत 'तोच' मित्र मदतीला आला व माझ्या वतीने त्याने कविता पोस्ट केली. या धाग्याचे पुढे काय झाले याची कल्पना मात्र नाही. येथील जाणकारांना एव्हाना हे नक्कीच समजले असेल की ही प्रीती 'जे न देखे रवी' या प्रकारात मोडत असावी. अर्थात मी स्वत:ला कवी वगैरे म्हणण्याच्या फंदात पडत नाही कारण अजून बर्‍याच गोष्टींचा 'थांग' लागायचाय. 'निसर्ग' हा कायमच जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे. तसेच सर्व प्रकारचे भारतीय संगीत हे हृदयाच्या खूप जवळ आहे. आयुष्य अर्थपूर्ण बनवणार्‍या सगळ्याच लहान-लहान गोष्टींचा ध्यास आहे. मला वाटते तूर्तास माझी एवढी ओळख पुरे, नाही का? यथावकाश मिपाकर-कुटुंबियांना समजून घेण्याची संधी पण मिळेलच. धन्यवाद !
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा