मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिपाकरांची ओळखपरेड ( नव्या-जुन्या सदस्यांची ओळख ) ...

छोटा डॉन · · जनातलं, मनातलं
नमस्कार मित्रांनो ( आणि मित्रांच्या मैत्रिणींनो ) ! मिसळपावच्या कट्ट्यावर दिवसेंदिवस नवनविन सदस्यांची भर पडते आहे.सर्व नविन सदस्यांचे मिपा परिवारातर्फे स्वागत ! मिपाचे रुपडे पालटले आहे. अनेक नवे, चांगले बदल होत आहेत. ह्या नव्या बदलाबरोबरच अनेक नवे सदस्य मिपावर डेरेदाखल होते आहेत, काही ओळखीचे आहेत तर काहींनी आंतरजालाच्या ह्या 'रोचक' जगतात नव्यानेच प्रवेश केला आहे. अनेकांसाठी हे वातावरण नवे आहे, जी जागा नवी आहे, माणसे नवी आहेत आणि त्यामुळे त्यांना ह्या एकुणच नव्या वातावरणाची 'नवलाई' नक्की वाटत असेल. इथल्या जुन्या आणि प्रस्थापित आयडी ( नपेक्षा आयडीमागच्या व्यक्ती ) आपापसात मौजमज्जा, चेष्टामस्करी करताना पाहुन नव्यांनाही ह्यात सामिल होण्याची इच्छा होणे स्वाभाविक आहे, पण इथे त्यांना अडचण वाटत असेल की "आपली अजुन कोणाशी ओळख नाही, मला कोणी ओळखत नाही, ओळख नसताना मी केलेली मस्करीची इथे कुस्करी तर होणार नाही ... इत्यादी इत्यादी" असे असंख्य प्रश्न असतील तर नव्या सदस्यांना हा धागा तुमच्यासाठीच आहे. चला, आपण सर्व एकमेकांची ओळख करुन घेऊयात. तुम्हाला नव्या सदस्यांना इथे काही तुरळक समस्या असतील तर त्या सोडवण्यासाठी इथले होणारे मित्रच तुम्हाला मदत करतील, पण त्यासाठी आधी ओळख तर व्हायला हवी ना ! द्या तर तुमची ओळख करुन ... ह्यासोबत माझी मिपाच्या 'जुन्या आणि प्रस्थापित सदस्यांना'ही विनंती आहे की त्यांनीही आपल्याबद्दल ४ शब्द लिहावेत. इथे असणार्‍या जुन्या-जाणत्यांचे कित्येक फॅन्स आहेत, त्यांना तुमच्याबद्दल वाचायला नक्की आवडेल. :) ओळख म्हणजे 'खरे नाव' आणि इतर डिटेल्सच सांगावे अशी अपेक्षा नाही, सांगितले तर हरकत नाही. मात्र तुमच्या आयडीबद्दल, आवडीनिवडीबद्दल, छंदाबद्दल अशीतशी अवांतर माहिती हवी आहे. तुम्ही काय करता, कुठे असता ह्यासंबंधी माहिती दिलीत तरीही हरकत नाही. तुम्ही स्वतःबद्दल काय हवे ते लिहु शकता ... ( मात्र शक्यतो संपर्क क्रमांक आणि इतर व्यक्तिगत डिटेल्स देणे टाळावे ) अवांतर : माझी ओळख मी ह्याच धाग्यावर एका सेप्रेट प्रतिसादातुन करुन देईन ... ( तसेही सर्वजण मला ओळखत असतीलच की ) ;) हॅ हॅ हॅ !!! ता.क. : १. ह्या धाग्याचा वापर केवळ उपरोक्त कारणापुरताच व्हावा अशी अपेक्षा आहे. इथे ओळखीतुन नव्या सदस्यांना थोडेसे हलकेफुलके वातावरण उपलब्ध करुन देण्याचा हेतु यशस्वी व्हावा व त्याला सर्वांकडुन साथ मिळावी अशी अपेक्षा. २. माफक थट्टामस्करी चालणार असली तर धागा भरकटु नये ह्याची काळजी घ्यायला 'संपादक मंडळ' समर्थ आहे.

वाचने 55145 वाचनखूण प्रतिक्रिया 304

एकतर मी मिपावर खुपच नईन आलोय किंव्वा मिपावर जनरेशन शिफ्ट झालाय ... वल्ली , मक , स्पा अन बुवा वगळता कोणालाच ओळखत नाहीये मी *unknw* कुणीतरी म्हणा रे आता "आमच्यावेळचं मिपा राहिलं नाही आता " *biggrin*

In reply to by अत्रुप्त आत्मा

तिमा Mon, 12/08/2014 - 20:07
आमाला तर गुर्जींचा नं. १४७६७ दिसतोय! आता चष्मा बदलला पाहिजे बहुदा! आमचं नांव तिमा. आमी बाई हाय का मानूस हे फक्त जुन्या लोकास्नीच ठावं हाय.

भाते Mon, 12/08/2014 - 20:36
सगळे प्रतिसाद वाचायच्या भानगडीत पडलो नाही पण सगळ्या आयडींवरून नजर फिरवली. यातले जेमतेम १५-२० आयडी सध्या मिपावर लेख/प्रतिसाद रुपात अस्तित्वात आहेत. कदाचित काही वाचनमात्र असतीलही!

@ भाते :- +१ सहमत मी मात्र सगळे प्रतिसाद वाचले आणि त्यात मिळालेल्या २००८ च्या http://www.misalpav.com/node/846 या धाग्याचे प्रतिसाद वाचण्यात काल माझा सगळा दिवस गेला. मिपावरच्या सर्व जुन्या लोकांपैकी काही लोकच आज हजर असतात हे बाकी खरे. या बाबतीत मला एका मिपास्नेहींनी मला सागितलेले आठवते की "मराठी आंतरजालावर साधारण २-२.५ वर्षांनी पिढी बदलते असं माझं एक निरिक्षण आहे" आणि ते खरच आहे. काही कार्यबाहुल्यामुळे येत नाहीत तर काही फक्त वाचनमात्र असतात कशातच भाग घेत नाहीत. अपवाद विजुभावु आणि पेठकरकाका...

टोपीवाला Tue, 12/09/2014 - 13:58
मी मिपा वर टोपीवाला मन्हून वावरतो. ना डोक्यावर केस ना टोपी, तरी " टोपीवाला " हे नाव का धारण केलं हे मलाही आठवत नाही. लोगिन करून फार कमी येत्तो. मिपा उघडून दणकन नवे लेखन वर जावून [ जुनी सवय ] आपल्या आवडीच्या लेखांचा आस्वाद घेतो. बऱ्याचदा लेखा पेक्षा प्रतिसादच आवडतात. माझ नाव दिलीप माथुलकर.माझ कालच, आजचं आणि me be उद्याच गाव सुद्धा चंद्रपूर.[ महाराष्ट्राच्या नकाशात सापडेल हो..] वय वर्ष ४६, नौकरी करतोय, घरी, आफिसात मिपा वर जाता येते [ चाणाक्ष मिपाकर नक्कीच सरकारी नौकरी अस समजले असतील.] पाककृती सौ ला सोबत घेवून वाचतो.[ हे तर मलाही करता येते/ माहित आहे- इति ; सौ ] परंतु अजून तोंडात काही पडल नाही. मिपा वरचे इतर सभासद एक्मेंकाना चांगले "ओळखून" आहेत याची प्रतीची प्रतिसाद वाच्णून येते. कॉम्पुटर/ मोबाईल या वरील लेख वाचायाला [ कधी-कधी काड्या करून पाहायला ] आवडतात. असाच लेख वाचून माझ्या samsung ६८०२ चा सुपर user बनायला गेलो आणि दोन दिवस व रु. २०० खर्च करूनही सुपर बनता आल नाही. दुसर्या लेखा प्रमाणे *९९# वापरून मोबाईल वरून बँक balance चेक करायला गेलो आणि mobile बँकिंग बंद करून घेतले. सुरु करण्यासाठी ३ दिवस sbi मध्ये खेटा घालाव्या लागल्या. सतत ३ दिवस ब्यांकेत गेल्यामुळे, ब्यान्केच तोंड न पाहता mobile बँकिंग कोणत्याही फोन वर कस सुरु करायचं याच ध्यान आलं. परंतु सतत तीन दिवस कार्यालयीन वेळेत बँकेत गेल्यामुळे " तुम्ही रिटायर्ड झालात काय " असा प्रश्न ब्यांकेतल्या बाबू ने विचारल्या मुले अकाली म्हातारपण येत आहे कि काय अस वाटून गेल. सबब थंडी असूनही [इच्छा नसूनही] पहाटे ६ किलोमीटर फिरावे लागत आहे. तूर्तास एवढेच.

निलीमा Wed, 12/10/2014 - 12:55
नमस्कार मीपकारहो, मी निलीमा *angel* मूळची औरंगबदची,पण सध्या वास्तव्य पुण्यात. तशी मी इकडे कुणाला प्रत्यक्ष भेटलेली नाही,पण बर्‍याच जनानचा पंखा आहे *yahoo* . माझी आवड म्हणाल तर खाणे ,झोपने , *music2* आणि फिरणे...काम करणे फारस आवडत नाही,तरी आपला वेळ जावा म्हणून एकाआयाटी कंपनीत कार्यरत.

In reply to by निलीमा

प्यारे१ Wed, 12/10/2014 - 14:17
>>> तरी आपला वेळ जावा म्हणून एकाआयाटी कंपनीत कार्यरत. सोडून द्या. एखाद्याचा संसार चालतो तेवढ्यात ;)

बोका-ए-आझम Wed, 12/10/2014 - 20:02
नमस्कार! मी बोका-ए-आझम! मुख्य काम मिशा साफ करणे,पलंगावर लोळणे आणि अगदीच नाविलाज झाला तर काम करण्याचा आव आणणे. मी प्रशिक्षण क्षेत्रात उंदीर मारत फिरत असतो. वास्तव्य बडी बाका नगरीत. मिपावर मला माझ्या एका मानवी मैत्रिणीने मासळीचं आमिष देऊन ढकलले (पण अजून मासळीचा पत्ता नाही! णिशेध!). इतिहास, राजकारण आणि अर्थशास्त्र हे प्रचंड आवडीचे विषय. आम्ही बोका असल्यामुळे कुठल्याही भांड्यात तोंड घालून फिस्कारत असतो!

In reply to by बोका-ए-आझम

पैसा Mon, 12/29/2014 - 15:07
भारी ओळख! मिपावर आधीच खादाड बोका, उपाशी बोका आहेत बहुतेक. मनिमौ पण आहे. तुमची म्यांव म्यांव लै आवडते!

शिद Wed, 12/10/2014 - 20:31
ह्या धाग्यात देखील अशीच चर्चा झाली होती. तिथलाच प्रतिसाद येथे देतोयः माझा आयडी हे माझ्या नावाचं व आडनावाचं प्रथम अक्षरं मिळवून बनला आहे. :)

मुक्त विहारि Fri, 12/12/2014 - 03:32
आधी माबो, मग मनोगत, मग उपक्रम, अशा एक एक पायर्‍या पार करत आधी वाचनमात्र मिपाकर झालो. आणि आता तर पक्का मिपाकर झालो. आय.डी. अद्याप सांभाळून आहे.बर्‍याच वेळा उडाला पण असता.पण संपादकांनी अद्याप सांभाळून घेतले आहे. आमचे अतिशय आवडते लेखक म्हणजे, जीवन भाऊ आणि पेशवे....ते आजकाल जास्त लिहीत नाहीत. बाकी अधिक जाणून घ्यायचे असेल तर, आमचे प्रोफाइल बघा...

टोपण नाव घ्यावे असे कधीही वाटले नव्हते.मिसळ पाव मध्ये थोडीशी बारीक शेव टाकण्याचा दोन चार वेळा प्रयत्न केला , पण कोणावरही आडवी/उभी/तिरकस/बोचरी टिका नसतांना,चार दिवस प्रकाशित झालेला साधा प्रतिसाद ,बरोब्बर नाहीसा होत असे ! ! कदाचित संपादक मंडळीस शेव जरा जास्तच तिखट लागत असावी ,अशी मीच माझी समजुत करुन घेतली आणि प्रतिसाद देणे बन्द केले , मात्र " मिसळपाव " दररोज चाखत असतो. एक कवन आठवले " रोज रोज नित्य नवा मेवा , तुम्ही खावा ! रेवडीचा हि स्वाद आम्ही का न चाखावा ? " लिहावेसे भरपूर आहे , पण वर उल्लेखिलेली खन्त मनात आहे

अस्सं ! ! हे अस्सं काही असतं ह्याची कल्पनाच नव्हती ब्बा !! आम्ही आपली ' साधी माणसं ' मला शम्मीकपूरने गायीलेले एक गाणे आठवले " जब चले हम , राह उल्टी , प्यार दुनियाने किया राह सीधी जब चले तो , सबने ठुकरा दिया "

विजय१९८१ Sun, 12/28/2014 - 19:55
मी विजय. रहानार कल्याण, सध्या पुणे फिरन्गि बैक मधे IT dept.मधे आहे. वाचायला आवडते.लेखन आवड्ल्यास प्रतिसाद देत असतो. आवडः- काम करता करता जालावर मिपावर भटकणे आणि सुट्टिच्या दिवशि लोळत पड्ने.