Skip to main content

मिपाकरांची ओळखपरेड ( नव्या-जुन्या सदस्यांची ओळख ) ...

लेखक छोटा डॉन यांनी मंगळवार, 10/08/2010 14:39 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रांनो ( आणि मित्रांच्या मैत्रिणींनो ) ! मिसळपावच्या कट्ट्यावर दिवसेंदिवस नवनविन सदस्यांची भर पडते आहे.सर्व नविन सदस्यांचे मिपा परिवारातर्फे स्वागत ! मिपाचे रुपडे पालटले आहे. अनेक नवे, चांगले बदल होत आहेत. ह्या नव्या बदलाबरोबरच अनेक नवे सदस्य मिपावर डेरेदाखल होते आहेत, काही ओळखीचे आहेत तर काहींनी आंतरजालाच्या ह्या 'रोचक' जगतात नव्यानेच प्रवेश केला आहे. अनेकांसाठी हे वातावरण नवे आहे, जी जागा नवी आहे, माणसे नवी आहेत आणि त्यामुळे त्यांना ह्या एकुणच नव्या वातावरणाची 'नवलाई' नक्की वाटत असेल. इथल्या जुन्या आणि प्रस्थापित आयडी ( नपेक्षा आयडीमागच्या व्यक्ती ) आपापसात मौजमज्जा, चेष्टामस्करी करताना पाहुन नव्यांनाही ह्यात सामिल होण्याची इच्छा होणे स्वाभाविक आहे, पण इथे त्यांना अडचण वाटत असेल की "आपली अजुन कोणाशी ओळख नाही, मला कोणी ओळखत नाही, ओळख नसताना मी केलेली मस्करीची इथे कुस्करी तर होणार नाही ... इत्यादी इत्यादी" असे असंख्य प्रश्न असतील तर नव्या सदस्यांना हा धागा तुमच्यासाठीच आहे. चला, आपण सर्व एकमेकांची ओळख करुन घेऊयात. तुम्हाला नव्या सदस्यांना इथे काही तुरळक समस्या असतील तर त्या सोडवण्यासाठी इथले होणारे मित्रच तुम्हाला मदत करतील, पण त्यासाठी आधी ओळख तर व्हायला हवी ना ! द्या तर तुमची ओळख करुन ... ह्यासोबत माझी मिपाच्या 'जुन्या आणि प्रस्थापित सदस्यांना'ही विनंती आहे की त्यांनीही आपल्याबद्दल ४ शब्द लिहावेत. इथे असणार्‍या जुन्या-जाणत्यांचे कित्येक फॅन्स आहेत, त्यांना तुमच्याबद्दल वाचायला नक्की आवडेल. :) ओळख म्हणजे 'खरे नाव' आणि इतर डिटेल्सच सांगावे अशी अपेक्षा नाही, सांगितले तर हरकत नाही. मात्र तुमच्या आयडीबद्दल, आवडीनिवडीबद्दल, छंदाबद्दल अशीतशी अवांतर माहिती हवी आहे. तुम्ही काय करता, कुठे असता ह्यासंबंधी माहिती दिलीत तरीही हरकत नाही. तुम्ही स्वतःबद्दल काय हवे ते लिहु शकता ... ( मात्र शक्यतो संपर्क क्रमांक आणि इतर व्यक्तिगत डिटेल्स देणे टाळावे ) अवांतर : माझी ओळख मी ह्याच धाग्यावर एका सेप्रेट प्रतिसादातुन करुन देईन ... ( तसेही सर्वजण मला ओळखत असतीलच की ) ;) हॅ हॅ हॅ !!! ता.क. : १. ह्या धाग्याचा वापर केवळ उपरोक्त कारणापुरताच व्हावा अशी अपेक्षा आहे. इथे ओळखीतुन नव्या सदस्यांना थोडेसे हलकेफुलके वातावरण उपलब्ध करुन देण्याचा हेतु यशस्वी व्हावा व त्याला सर्वांकडुन साथ मिळावी अशी अपेक्षा. २. माफक थट्टामस्करी चालणार असली तर धागा भरकटु नये ह्याची काळजी घ्यायला 'संपादक मंडळ' समर्थ आहे.

वाचने 55239
प्रतिक्रिया 304

प्रतिक्रिया

बिल्ला क्र १२. आळशी आहे. म्हणून "माझे खाते" मधली ओळख जवळजवळ जशीच्या तशी येथे चिकटवून देतो आहे. नाव : धनंजय राहायचे शहर/गाव : बॉल्टिमोर, अमेरिकेची संयुक्त राज्ये माझ्याविषयी : मराठी शालेय शिक्षण सुमार, घरगुती वापर बर्‍यापैकी. ललित आणि प्रगल्भ दोन्ही प्रकारे मराठीतून लिहायला शिकायचा प्रयत्न करतो आहे. आवडीनिवडी : मिसळपाव संकेतस्थळ! सध्या संक्रमणाच्या काळात विशेष कौतूक वाटते आहे. येथे लिहिलेल्या लेखांवरून माझ्या आवडीनिवडी अधिक कळतील. (लेखांच्या यादीचा दुवा)

नमस्कार मंडळी. ओळख सांगायला आपण काही मोठा माणुस नाही ब्वॉ. पण थोडसं लिहितोच आता धागा आलाच आहे तर.. :) लिहायची, वाचायची आवड लहानपणापासुनच होती. मधे बराच काळ शिक्षणामुळे (अभियांत्रिकी) व सोबत पार्ट टाईम नोकरी केल्याने वेळेअभावी हा छंद विरुन गेला. आयुष्यात जिद्द आणी जे हवे ते मिळवुन दाखवण्याची हिंम्मत कधी सोडली नाही. बँकींग, टेलीकॉम, ईंशुरंस, सॉफ्टवेअर यामधे सेल्स एक्जेक्युटीव पासुन सेल्स मॅनजर पर्यंतची पदे व नेटवर्कींग, कॉल सेंटर, टेलीकॉम सब्-डीलर अश्या नोकर्‍या वयाचा बावीस वयापर्यंत करुन झालेल्या, अधुन मधुन सेकंड हँड कार आणि फ्लॅट खरेदी-विक्री कमिशन एजंट अशीही कामे केली. आइ वडीलांच्या ईच्छेसाठी आयटीत नोकरी मिळवली ती सुद्धा त्यांना ज्या कंपनीत मुलाने असावे असे वाटत होते त्याच कंपनीत. पण एक गोष्ट नक्की माहिती आहे. जगात आपल्यासारखे आणि आपल्यापेक्षा खुप कष्ट घेतलेले यश मिळवलेले मोठे लोकं आहेत, त्यामुळे कधी स्वतःचा गर्व झाला नाही. आता आयटीत ४ वर्ष झालीत आणि मला स्वयंपाक येतो.. ;) काले मृदुर्यो भवती काले भवती दारुण! सः साध्नोती परमश्रेयं विघ्नांचाप्यधिष्टती!! - आणि "कुकर्मामधुन मिळालेले सोने चमकत नसते". "स्वतःवर विश्वास असेल तर जग जिंकता येतं." ही मुल्ये ही माझी मुख्य ओळख. :) असो, नोकरीतच एकदा राघवशी (पुर्वीचा मुमुक्षु) एकाच प्रोजेक्टमधे अस्ल्याने ओळख झाली आणि याच्यामुळे पहिल्यांदा मिपा पाहिलं, जुन्या वह्या पुन्हा उघडल्या घरी जाऊन. खुप बरं वाटलं. वर्तमानपत्राखेरीज मराठी वाचन माहित नव्हतं पन इथे येऊन पुन्हा चालना मिळाली, नवे जीव लावणारे मित्र मिळाले, मराठीची तहान मिटली आणि मग कधीतरी मनात येईल तसे लिहायला लागलो, अर्थात मी काही खुप चांगलं लिहितो अशातला भाग नाही, पण मनाला तेवढच समाधान. :) मिपामुळे दोन घटका स्वतःमधे, मराठीमधे रमायला मिळतं यासाठी मी मिपाचा आणि मराठी आंतरजालाचा नेहमी ऋणी राहील. आयला लै सिरियस झालं काय? :P

राम राम पावन आमि जगताप एकदम छ्योट्याशा गावात राहतो जेम तेम १७०० लोकसंख्या आसलेल गाव हाय आपल गावातच हुंदडत आस्तो आमि शिक्षान काय झाल नाय तवा महारास्ट्रा बाहेर कधि गेलो नाय परदेश लय लांब हाय बाकि मह्याबद्दल माझे खाते मधे समधि मायति साफ खरि लिवलि हाय.........राम राम डॉनराव इथपर्यंतच वळख ठिक हाय घरि च्या प्यायला कुनाला बोलवत नाय कारन गुळाचा च्या कुनि प्यत नाय

In reply to by ईन्टरफेल

गुळाचा च्या? :) पितळीतून देनार का? तसं आसंल तर मंग आमी येनार च्या पेयाला बी आन गप्पा मारायला बी. :)

In reply to by ईन्टरफेल

अवं बीडी भेटल का? ती बेटली तर काय काफी भी चाललं,चाय नकु,कसाला त्रास तुमासनी. तवा बोलवा जरुर्,पन बीडी ती 'सागर' बर्का!

In reply to by शानबा५१२

च्या मारि भेटल का कायम हात पुढच दे बिडि दे तंबाखु इथ काय दुकान मांडुन रायलोय व्हय कधितरि सवताच्या खिशात बि ठेवत जावा कि ............चाला दुध नाय रायलय लान्यानि सांडवलय आत्ताच कारभारिन वरडत व्हति तव्हा कोरा चा ढोसायचा आसल तर या..देतु चा अन..बिडि बि

जयपाल = जयेंद्र पाटील ,मु.पो.ठाणे मुळाताच भटक्या, खोडसाळ, उचापत्या, कंपुबाज (कंपुला मर्यादा नाहीत) :-) शक्यतो (उगाचच सर्व गोष्टीत) सिरीयस न होणारा ,व हौशी छायाचित्रकार मिपावर अनेक खरड मित्र / मैत्रीणी भेटले. काही जणांशी प्रत्यक्ष भेटी झाल्याने जिव्हाळा अजुन वाढला. लहान मुलांची अतिशय आवड. त्या मुळे तुम्हाला कोण व्हायला आवडल असतं किंवा आवडेल य प्रश्नाच उत्तर = धृतराष्ट्र माझी आयुष्या विषयी कोणतीही तक्रार नाही. :-)

In reply to by jaypal

>>त्या मुळे तुम्हाला कोण व्हायला आवडल असतं किंवा आवडेल य प्रश्नाच उत्तर = धृतराष्ट्र बाब्बोय..एव्हढी कर्तबगारी? =)) दाद्या, ती नाचणार्‍या बाबुरावाची स्मायली तुला कुठं मिळाली आधी सांग रे....दरवेळी पाहिलं की हसुन हसुन जीव जातो राव. =))

In reply to by jaypal

>>माझी आयुष्या विषयी कोणतीही तक्रार नाही. क्या बात है जैपालशेठ, एकदम खल्लास वाक्य की हो ! इथुनपुढे कुनीबी आम्हाला "सुखी मान्साचा सदरा" मागायला आले की आम्ही तुमचा अ‍ॅड्रेस देणार त्याचा :)

In reply to by छोटा डॉन

हां! आन तु हिंडिव जयप्यादाद्याला उघड्यानं.. सदरं देऊन देऊन सगळे संपले म्हंजे?

In reply to by jaypal

>>> धृतराष्ट्र =)) =)) =)) चित्रपाला नावच चुकीच सांगीतलयस तु ;) मिपावर केवळ चित्रांतुन प्रदिसाद देता येतो हे दाखवुन देणारा जयप्या माझा मित्रं आहे :)

आयला!!! किती नवीन नवीन लोकांची ओळख होत आहे. सगळ्यांना परत नमस्कार.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

>>किती नवीन नवीन लोकांची ओळख होत आहे. सगळ्यांना परत नमस्कार. +१, हेच म्हणतो. बिका, तुम्हालाही नमस्कार हो !

आम्ही कोण म्हणून काय पुसता दाताड वेंगाडूनी.. आम्हाला ओळखत नाही..आमच सुदैव अम्हाला ओळखता..तुमच दर्दैव.. (सर्व जालकवींचा चाहता)केशवसुमार

माझे सदस्यनाम क्रेमर असे आहे. मिपावरील लेखन वाचणे व जमल्यास प्रतिसाद देणे हा माझा छंद आहे.

कधीमधी कविता आणि गजलांची 'रंगभूषा' बदलून देतो ;) चौसष्ठघरातला आणि बत्तीस सोंगट्यांमधला खेळाडू म्हणून चतुरंग! ;)

नमस्कार! - मी सध्या परदेशात, पण मुंबई -पुणे-नासिक या त्रिकोणात प्रामुख्याने वावरलो आहे. - माझी मराठी, माझा देश यांचा रास्त (तेवढाच) अभिमान, पण त्या बरोबरच जगात इतरत्रही खूप काही घेण्यासारखं आहे असंही वाटतं. - प्रश्न वादाने वाढतात तर संवादाने सुटतात हे अनुभवाने शिकलो आहे. - 'मिपा'वरील माझी ओळख? - (गुलझार आणि भूपेंद्र यांची क्षमा मागून,) 'मेरा लिखना ही पहेचान है' असं म्हणेन. दोन वर्षांहून आधिक काळ इथे मिपावर आहे. काही लेखकांचं लिखाण आवर्जून वाचतो, रामदास, पुनेरी, श्रावण मोडक, हृषिकेश, बि. का. हे त्यात अग्रभागी. - कविता, कथा, जमेल तेंव्हा विडंबन या क्षेत्रांत वेळ मिळेल तसा हात मारायचा प्रयत्न करतो. कळत नसलं तरीही (निदान काही प्रकारचं तरी) संगीत आवडतं, ते सर्वांबरोबर वाटून घ्यायचा प्रयत्न करतो. - चार डिग्र्या आणि पाच नोकर्‍यांनंतर हीच समजूत ठाम आहे की समाजातील (वयाने) लहान-थोर मंडळींकडून शिकायला मिळतं ते ज्ञान पुस्तकी ज्ञानाहून आधिक उपयोगाचं असतं. त्यासाठीच, वेळात वेळ काढून, मिपा वर येतो. - मिपा वरच्या सभासदांपैकी १०-१२ जणांशी इ-मेल्स व फोन यांच्या मार्फत संपर्क, प्रत्यक्ष भेट एकाच सभासदाची झाली आहे (हे आपलं माझ्या अंदाजाप्रमाणे! हो! इथले कुठले आय डी मला प्रत्यक्षात भेटूनही गेले असतील काही सांगता येत नाही!)

नावः विकास रहाते गावः बॉस्टन भारतातः ठाणे-पुणे एक जुना मिपा सदस्य. आवडी-निवडी: राहूंदेत... लिहायला लागलो तर खालती मूळ धाग्यापेक्षा त्यालाच प्रतिसाद येऊन अवांतर होईल. ;)

In reply to by विकास

फक्त ५ ओळींत आवरते घेतलेत विकासराव? छ्या हे काही बरोबर नाही, अशाने आपले प्रतिसाद शिरोमणी डान्रावसुद्धा खचतील हो! ;) (अर्थातच ह.घ्या.)

In reply to by चतुरंग

प्रतिसाद शिरोमणी डान्रावसुद्धा खचतील हो!
हॅ हॅ हॅ!!! अंमळ गल्लत होते आहे रंगाकाका.... आजकाल डॉन्याच्या प्रतिसादाच्या लांबीशी 'पंगा' घेतला गेलाय हे लक्षात आले नाही वाटते!!! ;)

In reply to by चतुरंग

त्याचं काय आहे चतुरंग आणि प्रियाली... मला अजून खूप (म्हणजे खूप) लिहायची इच्छा होत होती, पण नक्की वरच्या कुठल्या प्रतिक्रियेसंदर्भात वाद घालयचा हेच समजले नाही. :-(

In reply to by विकास

ही विकासरावांची ड्युप्लिकेट आयडी दिसते. पाच ओळींत प्रतिसाद आटोपलाच कसा? बायदवे, आमच्या ओळखीसाठी शब्दांची गरज नाही. फोटो दिला आहे. बाकीची माहिती सदस्य पानावर मिळेल. satan

In reply to by प्रियाली

>>आमच्या ओळखीसाठी शब्दांची गरज नाही. सहमत आहे. >>फोटो दिला आहे. बेश्ट !!! अहो पन फोटुची ओळख कुठे आहे ? ;) ( पळालो मी, मारलयं लॉग्गाउट,गेलो गेलो .... )

In reply to by छोटा डॉन

फोटूची ओळख पानावर आहेच पण इथेही हवी असल्यास ती अशी - हा पंखधारी सैतान पुढचा गेम कोणाचा करावा या विचारात गढला आहे. ;)

In reply to by भारतीय

जगापासून स्वतःला लपवू पहाणारा मनुष्य आहे..
मला तर तो अतिशय दु:खी आणि दीनवाणा वाटला होता. त्याचे खाली झुकलेले खांदे, काहीसा विमनस्क दिसणारा चेहेरा, व एकंदरीत चिंतातूर भाव... पंखांनी त्याला शक्ती देण्याऐवजी त्याला जखडल्यासारखं वाटतं. एखादं भयाण भूत किंवा राक्षसी प्राणी त्याच्या पाठीत रुतला असून त्यानेच आपल्या पंखांनी त्याला काबीज करून ठेवल्यासारखा तो वाटतो. त्याचीच गेम झाली असावी अशी शंका येते.

In reply to by विकास

मी चित्रा, मीही अमेरिकेत बॉस्टनला असते. (अजून एक ओळख: विकासची पत्नी). गाणी ऐकायला आवडतात, आणि एनपीआर रेडिओवरील बरेचसे कार्यक्रम ऐकत असते. जमले की स्वत:साठी लहानसहान कामे तयार करत असते.

नमस्कार मित्रहो.. मी मुळचा नगरचा. साधारण १८ महिन्यांपासूनचा वाचक.रोज मि.पा.वाचल्याशिवाय राहावत नाही.मी येथिल सर्व लिखाण करनायांना त्यांच्या लिखानातून ओळखतो .खूप प्रतिभावान मंडळी येथे वावतात.मजा येते वाचायला. मी स्वतः मात्र लिहीत नाही.मराठी टाईप करायचा कंटाळा, त्यामुळे प्रतिसाद ही क्वचितच देतो. जवळपास सर्वच क्षेत्र आवडतात...वर्ज काहीच नाही.सध्या मुक्काम पूणे. नवीन सदस्यांचे मनःपूर्वक स्वागत.

मी पुष्कर. कोल्हापूर .. मग पुणे .. सध्या इतरत्र.. पूर्वी गावाची मापं काढायचो. आता विडंबन करतो.

द्या तर तुमची ओळख करुन ... इऽऽऽश्य!! ह्ये काय डानराव!!! आमी नायी ज्जा!!! मी फुलवंती, पिवळी शेवंती, तुजी नजर लागंल मला!!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

पिडाशेठ _/\_ (इन फॅक्ट... साष्टांग नमस्कार). >>मी फुलवंती, पिवळी शेवंती, हा हा हा !!!!

नाव : सुनील राहण्याचे ठिकाण : ठाणे. सध्या वास्तव्य संयुक्त संस्थाने. माझ्याविषयी : मिपाचा जुना सदस्य. कोणत्याही कंपूचा सदस्य नाही वा स्वतःचा कंपू नाही. फावल्या वेळातील छंद : स्वयंपाक (केवळ उदरभरण नोहे!) बागकाम (विशेष आवड - फुलझाडे) खाणे (शाकाहारी तसेच मांसाहारी. विशेष आवड - मत्स्याहार) पिणे (सर्व प्रकारची जहाल आणि मादक पेये - माफक प्रमाणात!) वाचन (ललित आणि गैरललित, मराठी आणि इंग्रजी) लिहिणे (माझे मिपावरील आत्तापर्यंतचे लिखाण - येथे) भटकंती (कोठेही!) इत्यादि इत्यादि.......

In reply to by वहिनी

... 'आई' म्हणून आयडी नाही घेतला. (अवांतरः हरयाणाच्या ग्रामीण भागात मुली एकमेकांच्या झिंज्या उपटताना शिवी म्हणून 'भाभी' या शब्दाचा सर्रास वापर करतात. मुलाला शिवी द्यायची असल्यास, 'भाई का साळा'. या अशा वापरामागील गर्भितार्थ फार गहन आहे. 'भाभी' हा शब्द अशा प्रकारे शिवी म्हणून वापरायचा असल्यास त्यावर विशेष आघात दिला जातो. (जसे, 'ओ मेरी भ्भाभ्भीऽऽऽऽऽऽ'.) शिवीऐवजी सामान्य शब्द म्हणून वापरायचा झाल्यास असा आघात दिला जात नाही. ही माहिती फारा वर्षांपूर्वी माझ्या महाविद्यालयीन दिवसांत माझ्या तत्कालीन हरयाणवी वसतिगृहमित्राकडून साभार मिळाली.)

In reply to by पंगा

बरंय ना, आपला भाऊ आणि वहिनी दोन्ही हरयाणवी नाहीत ते! बाकी वहिनी, तुम्ही आणि आमचे भाऊ आयटीतले का हो? आणि आमच्या भावाला कुकिंग जमतं का?

नमस्कार मी पल्लवी,आयडीतील पल्लवि मिपाची नियमित वाचक्.मिपानि बरेच काही शिकवले.सुरुवातिला टाईप करताना खुप वेळ लागायचा,पण आता बर्‍याच लवकर टाईप करायला जमायला लागले.सगळी मिपाचि क्रुपा.माझि आवड्-फिरणे ट्रेकी॑गला जाणे,जमल्यास मिपावर लिखाण करणे,मिपा वरिल वाद्-विवाद वाचणे.

मी ध्येयहीन. कारण मी "ध्येय"हीन. अ'नगरचा. आवड : वाचन, उंडारणे, कमेंट्स करणे, "मिसळपाव" आधी खाण्याचा; आणि आता वाचण्याचा छंद....

परेड मस्तच! डॉनचा धागा म्हंटला की शतक लागलेच. मी आमोद शिंदे. गप्पा हाणायला इथे येतो. इथले सदस्य एकमेकाचे काय भरभरुन कौतुक करतात. मला तर ते बघूनच आनंद झाला. मिसळपाव हे साइटचे नाव असले तरी सदस्यांचा हा गोडवा पाहून मला तर हा साखरपाकच आठवतो. माझ्यासारख्या गोडघाश्यासाठी परफेक्ट! बाकी संस्थापक तात्यांची ओळख कधी?

मला मिपाचा आयडी मिळून पाचेक महिनेच झाले त्यामुळे मी तसा नवखाच आहे. पण इतक्या थोड्या काळातच मिपाशी नातं घट्ट झालं आहे. माझ्या आवडीनिवडींच्या बाबतीत मी प्रचंड गोंधळलेलो आहे. कारण काहीतरी विधायक कार्य वगैरे करणं सोडलं तर मला सगळंच आवडतं. जमो न जमो, सगळंच थोडं थोडं करून बघायला आवडतं. मिपावर आल्यापासून इथे प्रतिसाद लिहिणं, वाचणं, लेख वाचणं यापलिकडे खरडवह्या उचकून बघणं वगैरे छंद लागले आहेत. कविता, रसग्रहणं या माझ्या विशेष आवडीच्या गोष्टी. माझ्याबद्दल, मिपाबद्दल, व इथल्या लोकांबद्दल मला काय वाटतं हे मी एका लेखात लिहिलं आहे. माझं लेखन इथे वाचायला मिळेल.

मी सुशांत,नावाप्रमाणे शांत आहे.पण जीवनात पाहीजे ती शांतता कधीच मिळाली नाही. 'वाल्याचा वाल्मीकी' झाला की जे सहन करावं लागत ते सर्व सहन करतोय. ईथे सर्वांना ह्या निमित्ताने एकच सांगीन......... "एकतर कधीच बिघडायच नाही,आणि एकदा बिघडलात की परत कधीच सुधरायचं नाही" ईतर सर्व गोष्टी आम्ही पिल्यावर बोलतो.माझ्या लिहण्यावरुन कळत त्याप्रमाणेच मी बावळट आहे,कधी कधी 'मंदबुद्धी' वगैरे विशेषण लावण्यासारखा वागतो. पण माझ्याबद्दल गैरसमज नाही करुन घेतलेत,तर आपल्यासारखा मित्र मिळणे अशक्य!! अणि हो,रसायनशास्त्र म्हणजे आपलं प्रेम!!! हे प्रेम अगदी तुम्ही तुमच्या आयटमवर्,बायकुवर करता त्याच्या हजारपट जास्त खरं!!!!

In reply to by शानबा५१२

'वाल्याचा वाल्मीकी' झाला की जे सहन करावं लागत ते सर्व सहन करतोय.
तुम्हाला, बाय एनी चान्स, 'होताना' असे म्हंणायचे आहे का हो? नाही म्हणजे, अजून पोहोचला नाहीत तिथे, म्हणून विचारले...

In reply to by पंगा

पंगाभाव, माझ्या वलखीच्या मानसानला इच्रा की! आवं म्या पियाय्च साम्गु की लफडीचं,लय नको त केल रं. आयबापसाना लय त्रास व्हयला लागला म्हणुन सर्वासनी रामराम केलया! दुनिया लय खराब रं मित्रा,मित्र च्यामारी कामापुरते मामे रे!! खराब टायमावर हात वरती करत्यात्,लय लंब्या टांगा देतात. आन हे प्रेम नी सर्व म्हण्जी बुलषीत!!(कोल्ह्याला द्राक्ष आमट!!) आता मी का सुधारलु ती आतली गोष्त हाय!

काय सांगु माझ्याबद्दल, मी मुळचा सोलापूरचा पदवी यांत्रीकी अभियांत्रीकी नंतर गेट व नंतर म. टेक... अगदी जॉब नसल्यापासुन ईथे येतो. आज एक दिड वर्ष झाले असेल... नोकरी शोधायला म्हणुन यावे अन मिसळपाव चापुन जावे असे दिवस मोजायचो... खुप वेळ वाचनमात्र राहुन मग प्रवेश घेतला... कधी लिखाणपण जमले नाही अन कंपुबाजीपण... म्हणायला चुचुतै अन क्रांतीतै अधुनमधुन बोलायच्या... काहीतरी फुटकळ लिखाण अन दुर्लक्षित प्रतिसाद आम्ही अजूनपण टंकतो कधीमधी... मध्ये मध्ये पुर्ण निराश होतो नोकरीसाठी... पण आता महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात परळी वैजनाथ (महानिर्मिती) इथे पाट्या टाकणे चालु आहे... नोकरी मिळाल्यामुळे मोबाईलवरच जास्तकरुन वाचनमात्र असतो... येथील सर्वजण खुप चांगले लिहतात. दोनघटका मनाला विरंगुळा मिळतो. अन खानावळीत खात असल्यामुळे प्राकृ बाबत बोलावयासच नको.

नाव सरळ सरळ लिहीले आहे त्यामुळे परत सांगायची गरज नसावी. मीसुध्दा तितकाच सरळ आणि साधाभोळा माणूस आहे. सदस्य कालावधी 1 वर्ष 29 आठवडे (मि.पा.च्या रेकॉर्डप्रमाणे) बराचकाळ वाचक होतो. आता थोडे थोडे लिहायला लागलो आहे (भीड चेपल्यामुळे. हाडाच गरिब आहे ना मी) चांगले खायला आणि प्यायला आवडते. (बोलावुन बघा. माझी कंपनी आवडेल नक्की. येथल्या मुरलेल्या काही "निवडक" सदस्यांना अनुभव आहे.)

माझे खरे नाव अश्विनी . ( मला पारूबाई हे टोपण नाव गमतीदार वाटले म्हणून घेतले.) राहणार बे एरिया ,कॅलिफोर्निया पण पक्की पुणेकर. पेरेनटिंग ,सेल्फ हेल्प या विषयावरची इंग्रजी मधील आणि मराठी मधील सगळ्या प्रकारची पुस्तके वाचणे हा छंद आहे. मिपाचे सदस्यत्व नुकतेच मिळाले आहे त्या आनंदात आहे.

नमस्कार, मी पुष्करिणी, नविन सदस्य. रहाण्याचे सध्याचे ठिकाण - इंग्लंड् ,जर्मनी एका अशाच चिडचिड्या , कंटाळवाण्या दिवशी गुगलवर मिसळीचे वेगवेगळे प्रकार पाहुया म्हणत केलेल्या उचकटीत मिपा सापडलं आणि महाराज, वाचलेलं पहिलंच लेखन 'मोकलाया दाही दिशा' आणि त्यावरचे प्रतिसाद...अहाहा. तेंव्हापासून नियमित वाचक होतेच आता लिहायचाही प्रयत्न करते अधून मधून.

एकाही संपादका/कीने ओळखीत मी संपादक आहे असे लिहलेले नाही (एक पुसट संदर्भयुक्त प्रतिसाद सोडुन =)) ) ही माहीती देणे नविन लोकांना फार उपयोगाचे आहे. ;-) (प्रॅक्टीकल)नविन मप्कर स्त्री सदस्यांनी वय अन वैवाहीक स्थिती लिहावी ही विनंती. (मदतगार) ए. एस. एल. स्त्री सदस्य असे लिहले आहे, स्त्री आयडीतील भामट्या पुरुषांनी लगेच प्रतिसाद टंकु नयेत -नुतन (सदस्य) (लगेच कुंडल्या व्यनीतुन धाडु नयेत, फोटो धाडलेत तर चालतील) (प्रतिसाद+)इच्छुक

In reply to by Nile

काही संपादका/कीने ओळखीत मी संपादक आहे असे लिहलेले नाही खरे आहे पण डॉन साहेबांनी काय म्हणले आहे? "ह्यासोबत माझी मिपाच्या 'जुन्या आणि प्रस्थापित सदस्यांना'ही विनंती आहे की त्यांनीही आपल्याबद्दल ४ शब्द लिहावेत. " अर्थात इथे केवळ सदस्य म्हणून लिहायला सांगितले आहे, ते ही चार शब्दच... तरी देखील चार शद्बाच्या ऐवजी माझ्या पाच ओळी झाल्या ;) आता याहून डॉनसाहेबांशी अधिक पंगा* कसा घेयचा? * ह्यातील सदस्यनामाशी असलेले साम्य केवळ योगायोग आहे.

In reply to by विकास

तुम्ही ओळखच चुकीची दिल्याने नविन सदस्यांच्या भविष्यात होणार्‍या गोंधळाने मी व्यथित झालो आहे. ;-) (नव्यांनो, कळले का एक संपादक कोण ते? ;-) ) -थोडा नवा थोडा जुना.

सध्याचे रहाते बे एरीया कॅलिफोर्निया. मुळची आहे दादर मुंबई येथील. IT मध्ये हमाल म्हणून काम करते. मिपावर नियमित वाचक आहे. सद्स्यत्व ५ महिन्यापुर्वीच घेतले आहे. सध्या सहभाग प्रतिक्रीया देण्यापुरताच असतो.

मी घाटावरचे भट. पुण्यास असतो. बिल्ला क्र. १३५९. मिपावर आल्यावर लै चांगले लोक भेटले. नंदन, पिडांकाका आणि भाग्यश्री यांच्याशी प्रत्यक्ष भेटीचा योग आलेला आहे. बाकी पब्लिकशी च्याट/बझ वगैरे माध्यमातून संपर्कात असतो. फारसे लिखाण केलेले नाही (कारण - अर्थातच 'जमत नाही'). सध्या केवळ वाचनमात्र असतो (किंवा वा, छान, महान, कडक अशा प्रतिक्रिया देतो). मिपावरील रामदास, बिका वगैरे फंडू लेखकांचा फ्यान आहे. बाकी छंद वाचन, शास्त्रीय संगीत वगैरे... कलोअ. - भट

माझे नाव आणि आडनाव हाच आय.डी. आहे त्यामुळे ओ़ळख पटणे हा प्रॉब्लेम नस्से ! पु.लंनी सांगितल्याप्रमाणे 'उप'जीविकेचे साधन म्हणून आय.टी. क्षेत्रात सध्या गुणवत्ता व्यवस्थापनात लुडबुड (आर तिच्यायला ! म्हंजी क्वालिटी म्यॅनेजमेंट म्हन की रे भौ !) 'मिपा'चा म्हटलं तर जुनाच सदस्य आहे. मिपावरचे मला प्रत्यक्ष भेटलेले / ना भेटलेले असे अनेक मित्र-मैत्रिणी जमले आहेत. 'वाचन हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे..' टाईप्स प्रत्येक दिवशी एखाद्या तरी पुस्तकातील काही ओळी वाचल्याशिवाय चैन पडतच नाही. अधूनमधून झटका आला की माझ्या ब्लॉगवरही काहीतरी लिहितो. बाकी बरेच छंद आहेत त्याबद्दल नंतर कधीतरी !

तर माझी ओळख अशी मिसळपाव चा जुना सदस्य पण वाचनमात्र .. (शक्यतो Positive प्रतिसादच द्यायचे असे ठरवले असल्याने ) लिहिणे वैगेरे आपल्याला जमत नाही अशी समजूत असलेला.. अजून एकाही सदस्याला प्रत्यक्ष भेटलेलो नाही indiat आलो कि भेटूच ज्यांना बसल्याशिवाय गप्पा मारायच्या नाहीत त्यांना प्राधान्य दिले जाईल :) ओळख होईल गप्पा होतील :) मुल गाव सातारा.. म्हणजे सातारा शहर.. सध्या वास्तव्य Land Of Opportunities ( मला खूप कमी मिळाल्या मला पण असो ) मध्ये .. नावाला BE MBA वैगेरेची certificates आहेत जवळ पण अजून उपयोग शून्य . छंद म्हणाल तर हेच आपले नेहमीचे वाचन , picture बघणे आणि जमतील तेवढी प्रेक्षणीय स्थळे बघणे आणि त्यांची स्तुती करणे

बिल्ला नंबर २०८. खरे नाव सांगणार नाय. आमच्यात पद्धत नाही तशी. IT मध्ये घाण्याला जुंपलोय. खानदेशी पण मुंबैत स्थायिक; ह.मु. अमेरिकेत (सिएटल). जास्त टायम नाही मिळत नाहीतर काहीबाही खरडले असते इथे. मिपा-वाचन सुद्धा होत नाही पुर्णपणे बरेच दिवस. सैपाक छान जमतो. पण ह्या गणपा आणि दिपालीतै ने मुस्कटदाबी केली हो आमच्यासारख्यांची.

मी अरुण मनोहर. स्थायिक- सिंगापूर. मूळ गाव- नागपूर. वाचन आणि लेखनाची प्रचंड आवड असल्यामुळे मिपा कडे ओढल्या गेलो. मिपाच्या आधीच्या वर्षांपासून मिपावर होणारे सगळे बदल अनुभवले आहेत. बिल्ला क्र. ८९३ लघु कथा लेखन हा माझा अतिशय आवडीचा विषय. "रोजाक- एक गोपाळकाला" हा विविध लघु कथांचा संग्रह नुकताच प्रसिद्ध झाला आहे. हटके- असे काही तरी लिहीण्याचा नेहमी प्रयत्न करतो. रुळलेल्या वाटांवर वाचना साठी जायचा देखील कंटाळा येतो. विनोदी, विज्ञान-काल्पनिका, गुढ, रहस्य, सामाजिक अशा विविध विषयांवर कथा लिहील्या आहेत. सिंगापूरला शब्दगंध हा कवितांना वाहिलेला उपक्रम आहे. त्यासाठी दरमहा कविता केल्या जातात. माझे मिपावरचे लेखन इथे मिळेल- http://misalpav.com/newtracker/893 इथे सगळ्यांची ओळख वाचून आनंद झाला. सर्व मिपाकरांना नमस्कार.

मिसळपावचा सर्वात जुना सदस्य ( सदस्य क्रमांक ७ - पहिले ६ मालकांकडे आहेत) :) माणसे मांजरी, बोके पाळतात, म्हणून मी १ माणूस पाळला आहे - त्याचे नाव बंड्या. अजून एकाही मिपाकराला भेटलो नाही आणि मलाही कोणी फारसे ओळखत असेल असं वाटत नाही. मी फारसे लिहित नाही, पण बहुतेक दररोज इथे वाचन करतो.

In reply to by उपाशी बोका

ओह! मी सदस्यत्व घेताना (बिल्ला क्रमांक ८) एक मांजर आडवी गेली होती, तो बोका होता तर! ;-) असो मी सहज, चोता दोनचा फॅन इतकी ओळख चोताच्या धाग्यात पुरेशी असावी. :P

In reply to by सहज

सहजरावांच्या अवघड विषयावर सहजतेने येणार्‍या लिखाणाचा मी पंखा आहे! आपला गुंडोपंत

नमस्कार! मी मिपाची नवी सदस्या आहे. मिपाबद्दल माहिती प्राजक्ताच्या काव्यसंग्रहाची बातमी सकाळमध्ये वाचताना समजली. तेव्हापासून नियमित वाचक आहे. सदस्यत्व एवढ्यातच मिळाले. त्यामुळे अजून बिल्ला क्रमांक वगैरे प्रकार कळले नाहीत. मिपावर टंकलेखन पण अजून जमत नाही. त्यामुळे इ-सकाळच्या प्रतिक्रियेच्या जागेत लिहून इकडे चिकटवते. अजून विशेष काही लेखन केले नाही. नाव वर दिले आहे, म्हणून 's' कळलेच असेल. विवाहित आहे, म्हणून 'a' पण देत नाही ;) संगणक अभियंती आहे. वाचन, पाककला असे सध्याचे छंद आहेत. मुळची अहमदनगरची , सध्या बे एरिया, कॅलिफोर्निया मध्ये आहे.