Skip to main content

आओ, कानसेन, पहेचानो...१,... २,...१६

लेखक बहुगुणी यांनी सोमवार, 05/07/2010 09:52 या दिवशी प्रकाशित केले.
कैफात काजव्यांची... परवा संध्याकाळी गाडीतून घरी जाताना मुलाने म्हंटलं, "बाबा, ए सी बंद करा, जरा खिडक्या उघडून नॅचरल हवा घेऊयात, नाहीतरी हायवेतून एक्झिट घेतलंय, तेंव्हा स्पीड कमी म्हणजे वाराही कमीच आहे." मी हो म्हणत काचा खाली केल्या. आठ वाजून गेले असल्याने आजूबाजूला गाड्या कमी असल्या तरी एकदम आवाजाची लेव्हल वाढली, आणि अचानक लक्षात आलं की आपण मेट्रो रेल च्या पूलाखालून चाललोय. स्टेशन जवळ येत असल्याने मेट्रोचा वेग कमी होत आलेला, आणि तिचा ठेक्यात असलेला चाकांचा आवाज ऐकून मन एकदम कित्येक वर्षं मागे गेलं: ***************** अशीच पावसाळ्याच्या दिवसांत मुंबईकडून खोपोली घाटातून खंडाळ्याकडे निघालेली सह्याद्री एक्स्प्रेस, असंच अंधारून आलेलं, आणि असाच मंकी हिल कडे जाताना वेग कमी होत असतांनाचा चाकांचा लयबद्द आवाज. मी आणि माझी पत्नी, उघड्या दारात पेपर खाली घालून बसलेले सोमवार-ते-शुक्रवार नेहेमीचे आम्ही दोघे प्रवासी, उजवीकडे बसलेल्या तिने माझा डावा हात आपल्या दोन्ही तळव्यांत धरलेला, आणि माझा उजवा हात मी protectively तिच्यापुढून दाराच्या खांबाला धरलेला. दरीत दूरवर साठलेल्या पाण्यात प्रतिबिंबीत झालेली खोपोलीच्या दिव्यांची दिवाळी... दूरवर पहात आम्ही भविष्याच्या अस्थिरतेविषयी बोलत होतो, आणि अचानक ती म्हणाली, "ते बघ, कितीतरी काजवे चमकतायत!" खरंच की, एकदम लक्षावधी इवल्याश्या दिव्यांची मनमोहक उघडझाप गाडीच्या बरोबरीने वाटचाल करीत होती! ते गाडीचं लयबद्द चालणं, ते काजवे, आणि सोबतीला सखी, ...सगळ्या काळज्या विसरून, मला आणि तिला एकदमच पाडगावकर आणि अरूण दात्यांचं गाणं आठवलं: दूरातल्या दिव्यांचे मणिहार मांडलेले पाण्यात चांदण्यांचे आभाळ सांडलेले कैफात काजव्यांची अन पालखी निघाली broken image ***** असं या ट्रॅक वरून त्या ट्रॅक वर घसरण्याची, seemingly unrelated गोष्टी जुळवण्याची, माझी सवय इथल्या माझ्या 'एअरपोर्ट' या कथेचं वाचन केलेल्या आणि गाण्यांविषयीच्या या लेखावरून काही वाचकांना माहिती असेल (अशा सवयीला काही जण 'सूतावरून स्वर्गाला जाण्याची सवय' म्हणतात, म्हणोत बापडे!) पण अशा associative memory चं अस्तित्व तुमच्यापैकीही बर्‍याच जणांना केंव्हा न केंव्हा नक्कीच जाणवलं असावं असं मला वाटतं. तर अशा associative memory चा अनुभव घेऊन आपण बरेचदा खूपश्या गाण्यांची ओळख केवळ मुखड्याच्या वाद्यमेळ्यातून (कधी कधी चुकून कानी पडलेल्या अंतर्‍यातल्या वाद्यरचनेवरूनही) पटवतो. आमच्याकडे तर लांबच्या सफरीला गाडीतून निघालो की असा खेळच चालतो कधीकधी, फक्त एक मुखड्याचा तुकडा सीडी वरून ऐकू द्यायचा, आणि मग शब्द सुरू व्हायच्या आत गाणं कोणतं आहे ते ओळखायचं. तर म्हंटलं आपण इथे असाच खेळ खेळू या: जुनी-नवी प्रसिद्ध मराठी आणि हिंदी गाणी निवडून त्यांचे मुखडे किंवा कधी कधी अंतरे मी पेश करीन, तुमच्यातील 'कानसेनां'नी ते गाणं ओळखायचंय, अट इतकीच, की नुसतंच गाणं न ओळखता कमीत कमी वेळात त्या मूळ गाण्याची ध्वनीफीत आणि चित्रपटातील असेल (आणि उपलब्ध असेल) तर त्याची ध्वनीचित्रफीत या दोन्हींचे दुवेही द्यायचे आहेत. माझा असा अंदाज आहे की इतके पट्टीचे कानसेन इथे आहेत (तात्या, देव साहेब, टारझन, धनंजय, विंजिनेर, नंदन, मुक्तसुनीत, अदिती, सहज, प्राजू, वगैरे वगैरे, just to name a very very few) की त्यामुळे उत्तरं बहुतेक पहिल्या आठ (८) तासांत सहज यावीत. या वेळात ती नाहीच आली तर मी शक्यतो स्वतः असे दुवे देईन. अर्थात्, अशी गाणी ओळखतांना त्यांमागील काही रोचक (आणि उघडपणे share करण्यासारख्या!) आठवणी सांगता आल्या तर दुधात साखर! *********************** कानसेन क्रमांक १: सहज कानसेन क्रमांक २: ----------- कानसेन क्रमांक ३: मराठी_माणूस कानसेन क्रमांक ४:मिलिंद कानसेन क्रमांक ५: मेघवेडा कानसेन क्रमांक ६: हुप्प्या कानसेन क्रमांक ७: पुन्हा एकदा: सहज कानसेन क्रमांक ८: डॉ. प्रसाद दाढे कानसेन क्रमांक ९: डॉ. प्रसाद दाढे कानसेन क्रमांक १०: मिसळपाव कानसेन क्रमांक ११: विसूनाना कानसेन क्रमांक १२: क्रान्ति कानसेन क्रमांक १३: प्रभो कानसेन क्रमांक १४: शुचि संयुक्त कानसेन क्रमांक १५: मिसळपाव आणि रेवती कानसेन क्रमांक १६: मिसळपाव ************************ चला तर, करू या सुरूवात, प्रथम या सोप्या सुरावटीने, [सवलतीसाठी एक ओळखीची खूण: मराठी गाणं आहे] broken image And your time starts, NOW!

वाचने 29806
प्रतिक्रिया 74

प्रतिक्रिया

In reply to by बहुगुणी

... त्यामूळे खरी कानसेन रेवती. आज जवळ जवळ बारा-पंधरा वर्षानी हे गाण परत ऐकायला मिळालं हे बक्षीस मला पुरेसं आहे! अवांतर - च्यायला, ईतक्या कालावधी नंतर ऐकलेलं गाणं, दोन क्षणात आपला मेंदू retrieve करतो तरी कसा??????

In reply to by मिसळपाव

हे घ्या गाणं! बाय द वे, मी या अशा "दीर्घ कालावधीनंतर मेंदूने retrieve" करण्यालाच associative memory म्हणतो, that is the whole point of this exercise! I am glad you are enjoying it!

In reply to by मिसळपाव

नाही हो! कानसेन तुम्हीच! मला गाणं अगदी आठवल्यासारखं वाटत होतं पण तुमचा प्रतिसाद आल्यावर मी फक्त दुवा शोधून दिला. रेवती

रेवतीताई म्हणजे "विहिरीतली परी" असं म्हणावं का;-) असो: मंडळी, इथून पुढे या धाग्यावर कृपया इथे प्रतिसाद देऊ नका, दुसर्‍या भागाचा धागा इथे आहे, तिथे टाका. धन्यवाद!