✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

घरगुती सावरकर

भ
भोचक यांनी
Fri, 05/28/2010 - 17:06  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
39952 वाचन

💬 प्रतिसाद (139)

प्रतिक्रिया

नितिन, ही

बिपिन कार्यकर्ते
Tue, 06/01/2010 - 16:03 नवीन
नितिन, ही एक शक्यता लक्षात घेऊन बघ...
०१. उपोषण त्याच दिवशी सुटले नाही. किंबहुना १६ जाने ल पैसे दिले गेले तरीही ते सुटले नाही. ते १८ जाने ला सुटले. ०२. मी नेहरू-पटेल यांच्याशी बोलतो वगैरे जे कॅम्पबेल यांच्या नोंदीतील म्हणणे आहे ते कोणत्या तारखेचे हे स्पष्ट होत नाही. ०३. तुमच्या टाइम्सच्या नोंदीप्रमाणे १ जाने ला पैसे न देण्याचा निर्णय झाला. उपोषण १३ जाने ला चालू झाले. कँपबेल यांची नोंद कधीची? ते जाणणे महत्त्वाचे.
१ जानेवारी : पैसे न देण्याचा निर्णय. २ जानेवारी ते साधारण १२-१३ जानेवारी : राजनैतिक पातळीवरून, पैसे दिले जावेत यासाठी प्रयत्न. यात आधी पाकिस्तानी कनिष्ठ पातळी ते वरिष्ठ पातळी प्रयत्न झाले असावेत. त्यात ३-४ दिवस गेले. मग अजून वरिष्ठ पातळीवर बोलाचाली. त्यात ३-४ दिवस. मग लॉर्ड माउंटबॅटन, नेहरू, गांधीजी वगैरे... त्यात ३-४ दिवस. गांधीजींचा उपोषणाचा निर्णय... ब्रह्मास्त्र. गांधीजींच्या उपोषणाला आणि हट्टीपणाला सगळेच घाबरून असत. आणि सहसा ब्रह्मास्त्राच्या आधी इतर अस्त्रे वापरून बघितली जातात. तसेच हे. १३ जानेवारी : उपोषण सुरू. १३ जानेवारी ते १६ जानेवारी : नेहरूंची चलबिचल --> घबराट --> शरणागती --> पैसे दिले गेले. १७ जानेवारी / १८ जानेवारी : पैसे पाकिस्तानला मिळाले. उपोषणाची समाप्ती. कँपबेल यांची नोंद कोणत्या तारखेची हे महत्वाचे आहेच. पण त्यात एकूण सूर असाच आहे की उपोषणाचा आणि ५५ कोटीचा संबंध असावा. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

शक्यता

नितिन थत्ते
Tue, 06/01/2010 - 16:23 नवीन
शक्यता रोचक आहे. पण तो रोचकपणा गृहीतकाला सोयीचा म्हणून आहे. मी वर १२ जानेचे गांधींचे उद्यापासून उपोषणाला सुरुवात असे भाषण दिले आहे (दुवा दिला आहे) त्या भाषणात ५५ कोटींविषयी चकार शब्द कसा नाही? मणिभवनच्या दुव्यावर आणखीही काही एव्हेण्ट दिले आहेत त्या इव्हेण्ट मध्ये सुद्धा ५५ कोटींचा उल्लेख झाला नव्हता असे म्हटले आहे. पवार यांनी 'हा घ्या पुरावा' म्हणून टाइम्स मधल्य ज्या बातम्या दिल्या आहेत त्यातही कुठल्याही प्रकारे (नेहरूंचे निवेदनासह) उपोषण ५५ कोटींसाठी होते असे सूचित होत नाही हे मी दाखवलेच आहे. (५५ कोटी पाकिस्तानला द्यावेत असे गांधींचे म्हणणे होते याविषयी दुमत नाही. फक्त उपोषण त्यासाठी नव्हते असे माझे म्हणणे आहे). पैसे दिले गेल्यावर ते २ दिवसांनी पाकिस्तानला पोचले (म्हणजे ब्यागा भरून ५५ कोटी रुपये नेले होते की काय?) यासाठी गांधी उपोषण सोडायचे थांबले हे पटत नाही. नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

पवारसाहेब

Dipankar
Tue, 06/01/2010 - 14:55 नवीन
पवारसाहेब आपल्या अभ्यासाला साष्टांग नमस्कार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

पवारसाहेब

आनंद
Tue, 06/01/2010 - 15:36 नवीन
पवारसाहेब आपल्या अभ्यासाला साष्टांग नमस्कार असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments

धागा

नितिन थत्ते
Tue, 06/01/2010 - 15:52 नवीन
धागा सावरकरांवर आणि चर्चा मात्र गांधी नेहरूंवर. गांधी नेहरू विषयाच्या चर्चेची सुरुवातसुद्धा 'नेहरू-पटेलांनी आकसाने सावरकरांना अडकवले' या बिनबुडाच्या विधानाने झाली. आणि घसरत घसरत ५५ कोटींवर आली. एकूण सावरकर वगैरे निमित्त.... गांधी नेहरूंना ठोकण्याचे साधनमात्र या माझ्या सिद्धांताला हे पूरकच आहे. नितिन थत्ते
  • Log in or register to post comments

सहमत

ऋषिकेश
Tue, 06/01/2010 - 16:11 नवीन
गांधी नेहरूंना ठोकण्याचे साधनमात्र
सहमत विषय कुठलाही असो, क्रांतीकारक कुठलाही असो, कुठलाही नेता, कोणतीही घटना (प्रसंगी अशी घटना जेव्हा उपरोल्लेखित कोणी जिवंतही नव्हते).. शेवट नेहमी याच नावांपाशी येऊन थांबतो.. उद्या एखाद्या पाककृतीवरही गांधी-नेहरुंना ठोकण्याचा प्रयत्न दिसल्यास आश्चर्य वाटणार नाहि ;) ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

किंवा,

बिपिन कार्यकर्ते
Tue, 06/01/2010 - 16:20 नवीन
किंवा, गांधी नेहरूंना ठोकण्याची पाककृती असा एखादा धागा यायची शक्यताही आहे. ;) बाकी नितिन / ऋ यांनी केलेला आरोप मी माझ्यापुरता नाकारतो आहे. :) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

असहमत

चेतन
Tue, 06/01/2010 - 17:32 नवीन
गांधी नेहरूंना ठोकण्याचे साधन हा आरोप मी सावरकरांना ठोकण्याचे साधन म्हणुन गांधीहत्येतले आरोप दाखवायचे असाही करु शकतो. चेतन अवांतरः मणिशंकर अय्यरने आणि काँग्रेसने जे केले त्यावर मी मणिशंकरला नक्कीच अंदमानातल्या कोठडित १०-१२ वर्षे टाकलं असतं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

हो ना!

पंगा
Tue, 06/01/2010 - 17:35 नवीन
एकूण सावरकर वगैरे निमित्त.... गांधी नेहरूंना ठोकण्याचे साधनमात्र
काही सावरकरांच्या निमित्ताने गांधी-नेहरूंना ठोकतात, तर काही हिंदुत्ववादी-यज्ञोपवीत"वादीं"ना ठोकतात... चालायचेच. बिच्चारे सावरकर! केवळ निमित्तमात्र! - पंडित गागाभट्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

अहो पण

विकास
Tue, 06/01/2010 - 17:45 नवीन
उद्या एखाद्या पाककृतीवरही गांधी-नेहरुंना ठोकण्याचा प्रयत्न दिसल्यास आश्चर्य वाटणार नाहि अहो पण गांधी-नेहरूंना त्यांच्या "पाक"कृतीवरूनच तर ठोकण्यात येते ना ;) बाकी बाहेर असल्याने हा धागा आत्ताच वाचत आहे आणि पचवत आहे. खूपच चांगली आणि नवीन माहीती या निमित्ताने मिळत आहे. बाकी राहीले नेहरू-गांधींना ठोकण्याचे... ते नशीब बर्‍याचदा ऐतिहासीक व्यक्तींच्या बाबतीत असतेच असे म्हणावेसे वाटते. सावरकरांच्या बाबतीतच त्यांच्या भाषेनिमित्त हा धागा दोन वर्षांपूर्वी लिहीला होता त्यात नंतर कशी चर्चा झाली ती पण या संदर्भात पहाता येईल. -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

फ्लॅशबॅक...

भारद्वाज
Tue, 06/01/2010 - 17:18 नवीन
धागा सावरकरांवर आणि चर्चा मात्र गांधी नेहरूंवर.
हेच म्हणतो. वेगळा धागा घेणे योग्य ठरले असते. मात्र घडलेल्या घटनेचे सर्व सामान्यांना माहित नसलेले वेगवेगळे कंगोरे उलगडले जातायत (पण हे वेगळ्या धाग्यावर घेणे उचित ठरले असते असे पुन्हा नमूद करतो). गांधीहत्या आणि सावरकर या वादात गांधी,नेहरू (तसेच पटेल) येणारच. जर या महान नेत्यांच्या भव्य कामगिरीचा उदोउदो होतो(हे सावरकरांनासुद्धा लागू आहेच)तर त्यांच्या प्रकाशात न आलेल्या (किंवा लपवून ठेवलेल्या) बाबींचा उलगडा होणेही महत्वाचे !! जे मिपावर तपशीलवार होत आहे. थत्तेकाका व पवारकाका दोघेही संयमित व तपशीलवार माहिती देतायत. दोघांनाही मनःपूर्वक धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

तुमचा

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 06/01/2010 - 17:39 नवीन
तुमचा सिद्धांत काही अंशी मान्य आहे, पण त्यातले (ठोकणं वगैरे) शब्द नाहीत.
  • सावरकरांचं कार्य त्यांच्या संपर्कात असलेल्या किंवा त्यांच्या समकालीन लोकांना वगळून मांडता येईल का? गांधीजींच्या कार्याबद्दल बोलताना जिना किंवा नेहरूंना वगळून चालेल का? जर गांधी-सावरकर किंवा नेहरू-सावरकर संबंध अतिशय सलोख्याचे असते तर त्यांचा उल्लेख टाळून जाणं चाललं असतं का?
  • अर्थात धागा "घरगुती सावरकर" असा असल्याने तरीही हे सर्व अवांतर ठरलं असतंही; पण गांधीजींनी काही चुका केल्या आणि त्याचे हे-हे पुरावे मी देतो/ते असं लिहीणं (जे इंद्र लिहीत आहे) म्हणजे गांधी-नेहरूंना ठोकणं आहे का?
  • अगदी चर्चा धाग्याशी अवांतर असेल तरीही ती (मी धरून) अनेकांसाठी माहितीपूर्ण आहे, तर अशावेळी सर्कारी बाबूगिरी दाखवून सुरू असलेली चर्चा बंद पडणं योग्य आहे का?
अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

आदिती

नील_गंधार
Tue, 06/01/2010 - 17:44 नवीन
आदिती ताईंशी सहमत. चर्चा चांगली चालु आहे व बरीचशी नवीन माहिती मिळते आहे. नील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

सावरकरांच

ऋषिकेश
Tue, 06/01/2010 - 23:00 नवीन
सावरकरांचं कार्य त्यांच्या संपर्कात असलेल्या किंवा...................चाललं असतं का?
यात विषय काय आहे त्यावर अवलंबून आहे. जर गांधीजींच्या स्वच्छता मोहीमेवर किंवा हरिजनांच्या कार्यामधे उगाच इतरांची नावे घेणं टाळावं असं वाटतं तसंच सावरकरांची भाषाशुद्धी (इथे घरगुती आचार) वगैरेमधे उगाच नेहरु-गांधी आणणं टाळण्याजोगे आहे
अर्थात धागा "घरगुती सावरकर" असा असल्याने तरीही हे सर्व अवांतर ठरलं असतंही; ..... म्हणजे गांधी-नेहरूंना ठोकणं आहे का?
वेगळा धागा काढावा ही सुचना बर्‍याच जणांनी केली आहे.. ती डावलून याच धाग्यावर ही चर्चा करण्याचा अट्टाहास समजला नाहि. बाकी ठोकणं / न ठोकणं वैयक्तीक मत झालं.. तेव्हा माझ्यामते इंद्र जे करत आहेत ते मुद्देसुद आहे.. अभ्यासपूर्ण आहेच आणि एक बाजू(च) व्यवस्थित दाखवणार आहे.. याला ठोकणं म्हणता येऊ नये.. मात्र त्या निमित्ताने इतर बरेच संदर्भरहित प्रतिसाद, आरोप, वाक्ये संप्पुर्ण चर्चाभर पसरली आहेत त्याला ठोकणेच म्हणावे लागेल.
अगदी चर्चा धाग्याशी अवांतर असेल तरीही ती (मी धरून) अनेकांसाठी माहितीपूर्ण आहे, तर अशावेळी सर्कारी बाबूगिरी दाखवून सुरू असलेली चर्चा बंद पडणं योग्य आहे का?
नाहि योग्य नाहि. चर्चा बंद करा असे माझेही मत नाहि.. या धाग्यावर होणारी चर्चा ही खरोखर रोचक आहे. इंद्रराव व नितीनपुरती मुद्देसूद व ससंदर्भही आहे. तेव्हा ती केवळ सर्कारी बाबुगिरी दाखवून थांबवू नये अशी दोघांना विनंती ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

लेखी, तोंडी.... रे़कॉर्ड...!!!

इन्द्र्राज पवार
Tue, 06/01/2010 - 17:29 नवीन
"...१३ जानेवारी : उपोषण सुरू. १३ जानेवारी ते १६ जानेवारी : नेहरूंची चलबिचल --> घबराट --> शरणागती --> पैसे दिले गेले. १७ जानेवारी / १८ जानेवारी : पैसे पाकिस्तानला मिळाले. उपोषणाची समाप्ती. दोन देशातील (१५ ऑगस्ट १९४७ नंतरचे) व्यवहार एखादी दुधाची बाटली या घरातून त्या घरात जावी अशा सहज रितीने होत नसतात. ज्यावेळी एका देशाचा पंतप्रधान "५५ कोटी पाकिस्तानला देण्याची घोषणा" जागतिक पातळीवरील मिडियाच्या प्रतिनिधीसमोर व ती ही लेखी स्वरुपात करतो, त्यावेळी असे कोणी म्हणत नाही..."असं का... मग काढा बघु त्या ५५ कोटींच्या नोटा, दाखवा आम्हाला... मगच आमचा विश्वास...". नेहरुंची ५५ कोटीची कबुली झाली दुपारी १.३० वा... पण ती झाली म्हणजे त्या निर्णंयाची "सरकारी प्रत..." मिळेपर्यंत वृत्तवाहिन्या वा त्यांचे प्रतिनिधी सेक्रेटेरीयटमध्ये थांबून राहतात. हे होईपर्यन्त संध्याकाळ आणि लोकांची बिर्ला हाऊसकडे पावले वळतात.... ते गांधींचे मुक्कामाचे ठिकाण...काही हिन्दी वृत्तप्रतिनिधी घाईघाईने श्री.प्यारेलाल यांना नेहरुंच्या त्या घोषणेची माहिती देतात. प्यारेलाल यांना समाधान वाटते (तसे ते तिथे हजर असलेल्या सुशिला नय्यर यांनाही सांगतात). पण तो पर्यन्त गांधींच्या प्रार्थनेची वेळ, म्हणून त्या वेळी ती बातमी त्यांना देता येत नाही. रात्री त्यांना याबाबत सविस्तर सांगितले जाते व त्यांचा उपोषण सोडण्याचा निर्णय होतो. (आता मी जरी वरील प्रतिसादात गांधींनी उपोषण सोडले असे जरी म्हटले असले तरी त्यांनी दि.१७ जानेवारी रोजी सर्व व्यवहार लेखी स्वरूपात मागीतला होता व त्यावर संबंधितांच्या सह्या...या सर्व व्यवहारामधील दुसरा उद्देश "दिल्लीत शांतता रक्षणाची हमी" असे झाले तरच "मी उपोषण सोडले" असा अर्थ....) राजभवनात परत गडबड... कारण तो पर्यंत गांधींची प्रकृती खालावली असे बातमीपत्र. आता ५५ कोटी तर पाकिस्तानला दिले हे कागदोपत्री नेहरु-पटेल यांनी मान्य केलेच... राह्ता राहिले शांतता ऱक्षणाची हमी. "गांधी वाचले पाहिजेत" या पटेलांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन काँग्रेस, हिंदु महासभा, मुस्लिम लीग, रा.स्व.संघ, शीख प्रातिनिधीक संस्था यांनी त्या हमीपत्रावर दि.१७ जानेवारीला सह्या केल्या व ती सर्व कागदपत्रे त्याच रात्री गांधींना देण्यासाठी श्री.प्यारेलाल यांच्याकडे सुपूर्द केली गेली. हमीपत्रातील कलमे ~~ १. दिल्लीतील मुसलमानांचे जीवन व मालमत्ता सुरक्षित राहील. २. ख्वाजा कुतुबुद्दीन दर्ग्याचा उरूस नेहमीप्रमाणे होईल. ३. सब्जीमंडी, करोलबाग आणि पहाडगंज या भागात मुसलमानांना मुक्तपणे फिरू दिले जाईल. ४. हिन्दुंनी व्यापलेल्या मशिदी मुसलमानांना परत केल्या जातील आणि दिल्लीत मुसलमानांना म्हणून ठेवलेला जो भाग मोकळा आहे त्याचा हिन्दु कब्जा करणार नाहीत. ५. दिल्लीतुन बाहेर गेलेले मुसलमान परत येऊ शकतील असे वातावरण तयार केले जाईल.... आता हे हमीपत्र व तीवर वर उल्लेख केलेल्या संघटनेंचे प्रतिनिधी यांच्या मान्यतादर्शक सह्या यासह "इतर" कागद्पत्रे असा जो उल्लेख खुद्द प्यारेलाल यांच्याकडे देण्यात आला....यामध्ये ५५ कोटीची "ट्रान्स्फर डॉ़क्युमेंट्स" नाहीत असे आपण समजणे याला काही अर्थ आहे काय? शेवटी ~~~ श्री. बिपिन आणि श्री. नितिन जी.... "आकाशवाणी" मुंबई केन्द्रात आपले कुणी ओळखीचे आहेत का? असतील तर त्यांच्याशी संपर्क साधुन "भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील आकाशवाणी ~ १९४२ ते १९५०" असा एक मोठा ध्वनीसंग्रह त्यांच्याकडे आहे; तो ऐकणे तुम्हा दोघांना शक्य आहे का? शक्यतो महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी अभ्यासकांना त्या पध्द्तीच्या टेप्स उपल्ब्धतेनुसार ऐकण्यासाठी दिल्या जातात. तीमध्ये "दिनांक १३ जानेवारी १९४८" चे बातमी संकलन आहे. "करारानुसार पाकिस्तानसमवेतच्या सर्व बाबी पूर्ण व्हाव्यात यासाठी महात्मा गांधी यांनी बेमुदत उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे."..... ही बातमी त्या दिवशी संपूर्ण देशात १४ भाषेत ध्वनीक्षेपीत झाली होती. अजुनही आपण असे म्हणायचे का की गांधींच्या उपोषणाचा आणि ५५ कोटीचा काहीही संबंध नव्हता? ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments

धन्यवाद.. चर्चा चालूदे .. वाचतोय

भडकमकर मास्तर
Tue, 06/01/2010 - 17:46 नवीन
सध्या हे एवढेच... __/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

ही

समंजस
Tue, 06/01/2010 - 17:51 नवीन
"करारानुसार पाकिस्तानसमवेतच्या सर्व बाबी पूर्ण व्हाव्यात यासाठी महात्मा गांधी यांनी बेमुदत उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे."..... ही बातमी त्या दिवशी संपूर्ण देशात १४ भाषेत ध्वनीक्षेपीत झाली होती. -------------------------------------------------------------------- जर हे सत्य असेल तर(त्या जुन्या टेप्स उपलब्ध असतील तर) मला वाटतं उपोषणाचं एकच कारण(हिंदू-मुस्लीम एकता) देणार्‍यांनी या गोष्टींचा नक्कीच पडताळा करून बघावा आणि काय खरं ते पुढे आणावे. नाहीतर सावरकर विरोधकांनी गांधी हत्येचं निमीत्त करून सावरकर-हिंदू महासभा यांना ठोकणे तसेच ५५ कोटीचं निमीत्त करून गांधी विरोधकांनी महात्मा गाधींना ठोकणे हे अव्याहत चालूच राहणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

धन्यवाद!

स्वाती२
Tue, 06/01/2010 - 17:30 नवीन
धागा आणि त्या वरील चर्चा वाचून बरीच नविन माहिती मिळाली.
  • Log in or register to post comments

बातमी

नितिन थत्ते
Tue, 06/01/2010 - 18:57 नवीन
>>"करारानुसार पाकिस्तानसमवेतच्या सर्व बाबी पूर्ण व्हाव्यात यासाठी महात्मा गांधी यांनी बेमुदत उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. ही बातमी अशीच प्रसिद्ध झाली होती याचा काही संदर्भ देता आला तर द्यावा. तरीही १२ जानेवारीच्या भाषणात गांधींनी उपासाचे कारण म्हणून ५५ कोटीचा उल्लेख केला नाही. (भाषणाचा दुवा मी दिला आहे). ती बातमी चुकीच्या माहितीवर आधारलेली असू शकते- आकाशवाणीवरची असली तरीही. (कटात सामील असलेल्यांच्या हस्तकांनी तर ती अशा प्रकारे दिली नसेल?- ह. घेणे) (हे इंद्रराज पवार इतक्या झटपट नवनवे संदर्भ-निरुपयोगी का होईना- देत आहेत. सगळे संदर्भ तयारच ठेवले आहेत की काय?) नितिन थत्ते
  • Log in or register to post comments

मणिभवन, वगैरे वगैरे ...

sagarparadkar
Tue, 06/01/2010 - 20:16 नवीन
अहो थत्ते साहेब, तुम्ही परत परत 'मणिभवन' च संदर्भ देत आहात. पण मला सांगा ती संस्था गांधी परिवाराचीच ना? मग ते कसं काय त्यांच्याच अडचणीचं वाण्ङ्मय संभाळ्णार ... आता आपण वकिली बुद्धीने 'परीवार' या शब्दाचा कीस काढत बसाल, तर त्या परिवारात सर्वच कोन्ग्रेजी लोक आलेच हे आधीच स्पष्ट करतो. मला भारत्-पाक फाळणी आणि 'प्रिटोरिया' राजवटीने सत्ता सोडावी लागणार म्हटल्यावर द. आफ्रिकेत खेळलेली खेळी यात बरंच साम्य जाणवतंय. त्यांनीपण 'झुलु इंकाथा मुव्हमेन्ट' च्या मंगोसुथु बुथलेझी ला डॉ. नेल्सन मंडेलांविरुद्ध भडकवले. त्याने स्वतंत्र 'झुलुलँड' ची मागणी सुरू केली. पण डॉ. मंडेला (जरी म. गांधींचे अनुयायी मानले जातात तरी) ह्यांनी मुत्सद्दीपणाने मंगोसुथुशी चर्चा करून प्रिटोरियाचा हा डाव उधळून लावला व द. आफ्रिका ह देश अखंड ठेवण्यात ते यशस्वी झाले. म. गांधी फाळणी टाळण्यात यशस्वी झाले का? बरं आता तुम्ही म्हणणार की हे अवांतर झाले. तुमचीच खेळी ओळखून मी आत्ताच म्हणतो कि " आता हे पुरे झाले असे वाटते" ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

मी फक्त

नितिन थत्ते
Tue, 06/01/2010 - 20:59 नवीन
मी फक्त मणिभवनचीच साईट सांगत नाहीये. ती साईट गांधी परिवाराचीच आहे यात काही संशय नाही. इंद्रराज पवार यांनी टाइम्स मधल्या ज्या बातम्या उद्धृत केल्या आहेत त्यातून उपोषणाचा आणि ५५ कोटींचा काही संबंध दिसत नाही हे मी दाखवून दिले आहे. १२ जानेवारीच्या गांधींच्या भाषणाचा दुवा दिला आहे ते हिंदुस्तान टाइम्स मध्ये १३ जानेवारी रोजी छापून आलेले आहे. आणि ते गोषवारा म्हणून आलेले नसून फुल टेक्स्ट म्हणून आलेले आहे. गांधींनी खरोखरच ५५ कोटीसाठी उपोषण केले असते तर त्यांनी आपल्या भाषणात नक्की तसा उल्लेख केला असता. (आकाशवाणीची बातमी आणि गांधींच्या स्वतःच्या भाषणाचे टेक्स्ट वेगवेगळ्या गोष्टी बोलत असतील तर गांधींचे स्वतःचे भाषण अधिक विश्वासार्ह हे उघड आहे. या भाषणाचे टेक्स्ट असे नव्हते- तसे होते- हे कुणी दाखवले तर तेही तपासून घेऊन मान्य करायला हरकत नाही). राहता राहिली आकाशवाणीची बातमी. ती प्रत्यक्ष ऐकायला मिळाल्यावर त्यावर मत व्यक्त करू शकेन. तेवढा एकच वाजवी पुरावा आत्तापर्यंतच्या चर्चेतून पुढे आला आहे. त्या बातमीची ट्रान्सस्क्रिप्ट पवार शेजारीच घेऊन बसलेले असावेत. ती त्यांनी स्कॅन करून येथे चढवायला हरकत नाही. तोपर्यंत पुढे काही बोलणे नाही. चालू द्या. नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarparadkar

संदर्भ....!!

इन्द्र्राज पवार
Tue, 06/01/2010 - 20:24 नवीन
"....(हे इंद्रराज पवार इतक्या झटपट नवनवे संदर्भ-निरुपयोगी का होईना- देत आहेत. सगळे संदर्भ तयारच ठेवले आहेत की काय?)...." चला...."निरुपयोगी" का होईना.... ते नवनवे संदर्भ आहेत हे तुम्ही मानता याचा मला आनंदच होतो. याच नव्हे तर आपल्या देशातील पहिल्या स्वातंत्र्य उठावाच्या (१८५७) तारखेपासून २६ जानेवारी १९५० पर्यंतच्या कालखंडावर मी भरपूर अभ्यास केला आहे....(वैयक्तिक ग्रंथालयदेखील आहे... शिवाय अशा काही ओळखी आहेत की, अशा माहिती संदर्भात एखाद्याच्या दारावर मध्यरात्री जरी खटखट केले तरी ती व्यक्ती स्वागतच करते.... याचा फार उपयोग होतो.. शिवाय माहिती मिळविण्यासाठी आपल्या भाषेत विनम्रता आहे असे समोरच्याला समजले तरी निम्मे काम होऊन जाते).... किंवा तुमच्यासारख्या अशाच प्रकारच्या गंभीर वाचकाला हे देखील माहित असेल की, अशा अभ्यासाची भूख कधीही शमत नाही...त्यासाठी निमित्त मात्र हवे असते, जे अशा प्रकारच्या चर्चेतून मिळत असते. वाईट इतकेच वाटते की, अशा चर्चेला तुमच्यासारख्या ज्येष्ठ सदस्याने "आकाशवाणीवरची असली तरीही. (कटात सामील असलेल्यांच्या हस्तकांनी तर ती अशा प्रकारे दिली नसेल?"... असे ~ लाईटली का होईना ~ म्हणणे. इतके चीप करू नका सरकारच्या त्या यंत्रणेला... "हस्तक" जरी असले तरी ते १४ भाषेतील तर्जुमा करणारे होते असे म्हणणे धाडसाचे होईल. (मला अनुभव आहे मुंबई आकाशवाणीचा.... किती नाकदुर्‍या काढाव्या लागतात काही माहितीसाठी त्याची....प्रसंगी अपमानदेखील सहन केला आहे.... असो). ऑल इंडिया रेडिओ ही संस्था म्हणते आमिर खानच्या "रंग दे बसंती....." धर्तीचा बाजार होता काय...जिथे पिस्तूल घेऊन जावे... केंद्राधिकारीला वेठीस धरून स्वतः ब्रॉडकॉस्ट करून देशाचे "तारक" आम्हीच आहोत असे सांगायला? तुमचा हा आक्षेप मी विनातक्रार मान्य करतो की, ही चर्चा "घरगुती" वरून एकदम सार्वजनीक पातळीवर आली. पण याचा अर्थ असा बिलकुल नाही की, गांधी-नेहरू-पटेल यांना दूषणे देण्यासाठी (मी "ठोकणे" शब्द कधीच वापरणार नाही, कारण माझी ती पात्रताच नाही.... कुठे ते महामानव आणि कुठे आमच्यासारखे चिल्लरखुर्दा. काजव्याइतपतदेखील आमची लायकी नाही त्या सूर्यांची महती गायला !) या संस्थळाचा उपयोग मी अथवा अन्य कुणी करत असेल. शेवटी "भारताचे स्वातंत्र्य" हा एक इतिहास आहे आणि ज्याला त्याल्या त्या विहिरीत आपआपल्या मोटीने उतरण्याचा विधीयुक्त हक्क आहे... जो तुम्हाला अन् मलाही आहे. असो. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

सन्दर्भ ...

sagarparadkar
Tue, 06/01/2010 - 22:06 नवीन
श्री. इन्द्रराज पवार ह्यांनी उत्तर दिलेलेच आहे. मला तरी त्यांचे एकूण विवेचन हे "अभ्यासोनि प्रकटावे ..." ह्या समर्थ वचनाप्रमाणेच वाटतेय. हां आता हे काही लोकांना अडचणीचं ठरतंय त्याला कोण काय करणार? गांधिजींचंच खरं मानायचं ह्या मताशी सहमत होणं अवघडच. मला तर त्यांची अनेक वक्तव्यं आणि क्रूती ह्यात बरंच पाणी मुरतंय असं नेहेमीच वाटतं. अनेकदा सत्य, अर्धसत्य आणि पूर्णसत्य हे सोयीनुसार (ब्रिटिशान्च्या) सांगितलं किंवा दडवलं गेलंय असं वाटतंय. इतिहासात अनेकदा तपशिलापेक्षा 'घटनाक्रम' हा जास्तं काही सांगून जातो. कारण आपण ज्यांच्यबद्दल बोल्तोय ते सर्व राजकारणी होते हे लक्षात घेतलेलं बरं. एकदा तटस्थपणे गांधिजींची तुरुंगातील खोली आणि सावरकरांची अन्दमानमधील सेल्युलर जेल्मधील 'कोठडी' (खोली मुद्दम्हूनच म्हणत नाहीये) हे दोन्ही डोळ्यांपुढे आणा, आणि नि:पक्षपणे तुलना करून बघा. अनेक उत्तरं आपोआपच मिळून जातील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

नवा

नितिन थत्ते
Tue, 06/01/2010 - 22:35 नवीन
>>गांधिजींची तुरुंगातील खोली आणि सावरकरांची अन्दमानमधील सेल्युलर जेल्मधील 'कोठडी.... नवा (जुनाच) मुद्दा. नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarparadkar

पवारांच्य

सोम्यागोम्या
Wed, 06/02/2010 - 00:29 नवीन
पवारांच्या अभ्यासाबद्दल त्यांना सा.न. मला तरी त्यांचं म्हणणं पटतय. ते योग्य दाखले देत आहेत. थत्ते यांनी त्यांचे मुद्दे मान्य करायचेच नाहीत असं टोकाचं ठरवून ठेवल्यामुळे त्यांच्या प्रतिक्रियांचा समतोल सुटत चालला आहे असे वाटते. छान चर्चा. माहितीपूर्ण विवेचन. आणखी वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

अभ्यास....!!!

इन्द्र्राज पवार
गुरुवार, 06/03/2010 - 00:09 नवीन
"....पवारांच्या अभ्यासाबद्दल त्यांना सा.न...." तुमचे हे वाक्य मी केवळ आभार प्रदर्शनासाठी घेत आहे... सा.न. करावा एवढा का माझा अभ्यास नाही.... बस्स एस.टी. प्रवासात शेजारी बसलेल्या माणसापेक्षा एखादे दुसरे ज्यादाचे पुस्तक वाचलेले असते, इतपतच. पण अशा चर्चेमुळे अभ्यासाला दिशा मिळते हेही नसे थोडके !! आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोम्यागोम्या

जुनाच मुद्दा असणार कारण आपण 'इति'हासाबद्दल बोलतोय ना?

sagarparadkar
Tue, 06/01/2010 - 22:44 नवीन
शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरु आणि इतर अनेक क्रांतिकारकांनी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली, पण हे सर्वजण 'त्यां'च्या लेखी महत्वाचे नव्हते कारण त्यांनी केली ती 'हिंसा'. ... मग ब्रिटिशांनी 'जालियनवाला बाग' मधे काय 'वैष्णव जन तो ' गायलं का? मग चौरिचुरा मधे १९४२ च्या आंदोलनात केवळ ४ पोलिस मारले गेले म्हणून अक्ख्या देशभरातलं आंदोलन का मागे घेतलं. त्यामुळे फायदा कोणाचा झाला? ब्रिटिशांचा कि भारतीय स्वातन्त्र्यं चळवळीचा? प्रचंड बहुमताने 'निवडून' आलेल्या सुभाषचंद्र बोस यांना डावलून पट्टाभि सीतारामय्या ह्यान्ची कॉन्ग्रेसच्या अध्य़क्षपदी 'नियुक्ति' क केली गेली? तेव्हा तत्त्वाग्रह, सत्याग्रह ह्यांची आआठवण का झाली नाही? परत म्हणा कि हे विषयांतर होतंय म्हणून ...
  • Log in or register to post comments

भोचकजी

पक्या
Tue, 06/01/2010 - 22:56 नवीन
भोचकजी सावरकरांविषयी घरगुती माहिती दिल्याबद्द्ल धन्यावाद. इंद्रराज छान माहिती पुरवलीत. धन्यवाद. आपल्या दांडग्या अभ्यासाला सलाम. सावरकरांविषयी , गांधी नेहरू , आंबेड्करांविषयी, भारतीय स्वातंत्र्याविषयी अजून उजेडात नसलेली माहिती वाचायला आवडेल. आपणास नम्र विनंती करतो की नवीन धागे उघडून हे कृपया लिहा . ज्यायोगे माहित नसलेला इतिहास समजेल, चर्चा घडेल आणि नवीन विचार ही समोर येतील. नितीन थत्ते जी , 'आता पुरे , हे इथेच थांबवतो ' असे म्हणून कृपया चर्चा थांबवू नका. या धाग्यावर पुढे घडलेली चर्चा अवांतर वाटली तर नवीन धागा सुरू करण्याची सोय आहेच ना. 'माझ्याकडे मुद्दे आहेत , माहिती आहे' असे सांगायचे आणि 'पण मी सांगणार नाही' ह्याला काय अर्थ आहे. असेच म्हणायचे असेल तर चर्चेत उतरूच नका ना. जय महाराष्ट्र , जय मराठी !
  • Log in or register to post comments

लढ बाप्पू ...

sagarparadkar
Tue, 06/01/2010 - 23:03 नवीन
>> 'माझ्याकडे मुद्दे आहेत , माहिती आहे' असे सांगायचे आणि 'पण मी सांगणार नाही' ह्याला काय अर्थ आहे. असेच म्हणायचे असेल तर चर्चेत उतरूच नका ना. असेच म्हणतो ... लढ बाप्पू =)) इथे कोणी य. दि. फडके ह्यांचे नातेवाईक आहे का? असलात तरी तुम्हाला त्यांच्यापेक्षा वेगळे मत मांडायचा अधिकार आहे. ... कोणी त्यांचीच री ओढायची अशी सक्ती केलीय का? तसं असेल तर ते 'गांधीवादा'शी प्रतारणा करणारं ठरेल :))
  • Log in or register to post comments

हुश्श...

श्रावण मोडक
Tue, 06/01/2010 - 23:19 नवीन
दमलो!!! परंपरेला साजेशी चर्चा (सुरू आहे). स्वगत: प्रत्येक गोष्टीवर कृष्ण-धवल उत्तरंच हवीत हा आग्रह कधी सुटायचा कुणास ठाऊक! माणसं इतकी तर्कदुष्ट नसतात. त्यांच्या वागण्या-बोलण्यात ग्रे एरिया असतातच. मग ते सावरकर असोत वा गांधी. नेहरू वगैरेही. पटेलही. अगदी गेलाबाजार आजचे नेते-पुढारीही. एखादी करडी रंगसंगती दिसली म्हणजे लगेच तो माणूस काळा किंवा म्हणून त्याचा श्वेतवर्ण कसा भ्रष्ट आहे वगैरेचा सोस किती असावा! या माणसांनीसुद्धा आपण परफेक्ट आहोत असा दावा केला नसावा (नाही, असे म्हणत नाही. कारण ती माणसं परफेक्ट नाहीत). गांधी गांधीवादी नव्हते आणि बहुदा सावरकरही सावरकरवादी नसावेत (अगदी मार्क्सच्या नावे म्हणतात तसं या नेत्यांनीही असं कुठं म्हटलं आहे का हे पहावं लागेल एकदा). हे 'वादी' असतो आपणच. 'संवादी' क्वचितच असतो बहुदा. असतोच, तर काळाच्या प्रवासात आजच्या बिंदूवर उभे राहून इतिहासाचे मूल्यांकन करताना त्या-त्या व्यक्तींच्या वर्तनासाठी फक्त आजचेच मापदंड आजच्याच चष्म्यातून लावून पाहिले नसते हे मात्र खचित. हे स्वगत आहे. त्यामुळे ते बहुतेक इतरांना पटणे शक्य नाही. अशांनी त्यास खुश्शाल फाट्यावर मारावे, ही विनंती.
  • Log in or register to post comments

सहमत... अवां

भडकमकर मास्तर
Wed, 06/02/2010 - 09:38 नवीन
सहमत... अवांतर : या प्रतिसादातच इतका करडा रंग दिसतोय , :P ग्रे एरिया फार आहे... :W
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

ग्रे...

बिपिन कार्यकर्ते
Wed, 06/02/2010 - 11:54 नवीन
ग्रे एरिया फार आहे... त्या पेक्षा ग्रे मॅटर असते तर!!! ;) खुद के साथ बातां: पुढचे चार पाच कट्टे टाळावेत म्हणतोय. :D बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

संपादकांच्या

श्रावण मोडक
Wed, 06/02/2010 - 11:59 नवीन
संपादकांच्या खुदके साथ बातांशी सहमत; :) बाकी अर्थातच असहमत. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

लेख

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 06/02/2010 - 12:05 नवीन
"संपादकांचे ग्रे मॅटर ठिकाणावर आहे काय?" असा लेखच लिहायला हवा. 'ग्रे एरिया'बद्दल श्रामोंशी सहमत. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

इतिहास...विभूतिपूजा....!!

इन्द्र्राज पवार
Tue, 06/01/2010 - 23:07 नवीन
"इतिहासात अनेकदा तपशिलापेक्षा 'घटनाक्रम' हा जास्तं काही सांगून जातो. कारण आपण ज्यांच्यबद्दल बोल्तोय ते सर्व राजकारणी होते हे लक्षात घेतलेलं बरं...." श्री.सागर पराडकर यांचा हा मुद्दा बरेच काही सांगून जातो. "चरित्रलेखन" हा प्रकार फार धोकादायक असू शकतो, कारण लिहिणारा विषयव्यक्तीबाबत भक्तीभावानेच लिहिणार, त्याला देवत्व अर्पण करणार... त्याच्या जीवनपटातील काही डाग काळवंडलेले असले तर खुबीने ते झाकणार... आदी गोष्टी होत असतातच. त्यामुळे अभ्यासकाच्या दृष्टीने अशी चरित्रलेखने ही "फॅक्ट्फुल" न होता "फॅन्सीफुल" होऊन जातात. त्यामुळे निरपेक्ष वृत्तीने काही गोष्टींचा आपणास मागोवा घ्यायचा असेल तर जास्तीतजास्त घटनाक्रम आणि त्या अनुषंगाने विविध माध्यमातून झालेल्या चर्चा यावर लक्ष केन्द्रीत करणे केव्हाही हितकर असते. विभूतिपूजा हा आपल्याकडील लेखकांचा असाध्य असा आजार आहे आणि अशा प्रकारच्या वाचनाचा एक निश्चित असा वाचकवर्गही समाजात असतोच, त्यामुळे असे एकतर्फी मार्ग स्वीकारले जातात.... दुर्दैवाने इतिहासाच्या नजरेतून याला संतुलित सादरीकरण असे म्हटले जात नाही. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments

इतिहासाकडे पाहणे...!!!

इन्द्र्राज पवार
Tue, 06/01/2010 - 23:51 नवीन
"....एखादी करडी रंगसंगती दिसली म्हणजे लगेच तो माणूस काळा किंवा म्हणून त्याचा श्वेतवर्ण कसा भ्रष्ट आहे वगैरेचा सोस किती असावा!...." श्रामो जी... तुमचे हे वाक्य तुम्ही माझ्या मनातील वाचून लिहिला की काय असा प्रश्न मला पडला आहे. तुमच्यासारखेच मी म्हणतो की कोणतीही व्यक्ती (अगदी रामकृष्णापासून घेतले तरी....) शंभर टक्के सदगुणी तसेच दुर्गुणीही नसते. परिस्थितीनुसार त्यांचे वर्तन झालेले असते पण असा एखादा प्रसंग त्या व्यक्तीच्या जीवनाचा ल.सा.वि. ठरू नये इतपत भान आपण ठेवले तर इतिहासाकडे पाहण्याची आपली दृष्टी बरीचशी शुध्द होईल. संताप येतो तो पक्षीय पातळीवर जाऊन क्षुद्र मनाचे राजकारण खेळणार्‍या दीड दमडीच्या पुढारी लोकांचा ! काय मिळविले त्या मणीशंकर अय्यरने आणि त्याच्या अंदमानमधील त्या घृणास्पद कृतीला पाठी घालणार्‍या काँग्रेस आघाडी सरकारने? मनामनातील तेढ वाढत जाते ते या राजकारणी लोकांकडून..! ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments

सुंदर चर्चा.

ज्ञानेश...
Wed, 06/02/2010 - 11:27 नवीन
एकंदर चर्चा खूप सुरेख चालली आहे. काही नव्या गोष्टी कळल्या, काही जुनी मते तपासून घेता आली... खराटा आणि इन्द्रा द टायगर यांचा आभारी आहे. बराच अभ्यास आहे दोघांचाही.
  • Log in or register to post comments

चर्चा....जुनी मते !!!

इन्द्र्राज पवार
Wed, 06/02/2010 - 20:49 नवीन
धन्यवाद ज्ञानेश.... "जुनी मते तपासून घेता आली" असे आपण म्हणता.. पण मी सांगतो ती मते तुमच्या वाचनाची कक्षा वाढवुन तयार करा व नंतरच त्यांना विराम द्या... केवळ इथल्या चर्चेवर समाधान मानू नका.... फार मोठा इतिहास आहे आपल्या देशाला.... जो कुठल्याही महविद्यालयात वा विद्यापीठात समतोलरितीने शिकविला जात नाही... तिथेही विविध विषयाचा अभ्यासक्रम निश्चित करणे ही बाब "डीन्स" आणि "बोर्ड ऑफ स्टडिज" नावाचे जे संस्थान आहे त्यावर वर्षानुवर्षे चिकटून बसलेल्या धेंडाच्या विचारसरणीवर आणि त्यांचा कल ज्या राजकारणावर असतो त्या प्रवाहाशी निगडीत असते...त्यामुळे आपला खरा अभ्यास हा विद्यापीठाची ती पदवीची सुरळी घेऊन बाहेर पडल्यावरच सुरू होतो. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानेश...

सावरकरांच्या जयंतीनिमित्त एक

मृत्युन्जय
Sat, 05/28/2011 - 11:46 नवीन
सावरकरांच्या जयंतीनिमित्त एक चांगला धागा वर आणावा म्हणतो.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा