✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अ‍ॅटमबॉम्ब, खिमा पॅटिस नि चाय

ब
बेसनलाडू यांनी
Wed, 04/21/2010 - 12:39  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9816 वाचन

💬 प्रतिसाद (39)

प्रतिक्रिया

पुढेमागे

विसोबा खेचर
Wed, 04/21/2010 - 12:57 नवीन
पुढेमागे काही स्फोट व्हायचाच असेल तर तो अशा सर्वदूर संस्कृतीप्रसाराचाच व्हावा, म्हणजे अमेरिकेत बसूनही आम्हांला भायखळ्याच्या रिगल किंवा ग्रान्ट रोडच्या मेरवानच्या सुखाला पारखे झाल्याची चुटपुट लागून रहायची नाही.
वा! खरं आहे.. एक खूप छान लेख, अनेक संदर्भ असलेला! आपला, (मेरवान, कयानी आणि बास्तानीप्रेमी मुंबैकर) तात्या.
  • Log in or register to post comments

लेख

निखिल देशपांडे
Wed, 04/21/2010 - 12:59 नवीन
लेख आवडला.. कोपर्‍या वरचा ईराणी... ब्रुन मस्का, बन मस्का... निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
  • Log in or register to post comments

उत्कृष्ट

बिपिन कार्यकर्ते
Wed, 04/21/2010 - 13:26 नवीन
उत्कृष्ट लेखन. बेलाशेठने बर्‍याच दिवसांनी लिहिले काही. मस्त आहे. :) इराण हा असाच मला नेहमी खुणावणारा देश. प्राचीन इतिहास असलेला... धर्माच्या लाटेत पूर्णपणे संस्कृतीपालट झालेला... तरीही आपल्या प्राचीन संस्कृतीला न विसरलेला... त्या काळाला 'जाहिलियत' न म्हणणारा... पण तरीही वर्तमानात धर्माचाच पगडा असणारा... नेहमीच खुणावणारा. दुबईत असताना एक दोन इराणी सहकारी होते. त्यांच्याकडून सद्य इराण बद्दल बरेच काही कळले. मुल्लांचा पगडा असला तरी आधुनिक विचारांचा आणि सुशिक्षित असाही बराच मोठा वर्ग तिथे आहे. आजूबाजूच्या इतर मुस्लिम देशांपेक्षा स्त्रियांना बरेच जास्त मोकळेपण आहे. शिक्षणाचे प्रमाणही लक्षणिय आहे. मला जाणवलेले अजून एक. 'अरबांनी आमच्यावर विजय मिळवला, त्यांचा धर्म आमच्यावर लादला पण तरीही आम्हीच अरबांपेक्षा श्रेष्ठ आहोत' ही एक सुप्त भावना मला तरी जाणवली. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

क्या बात है!

एक
Wed, 04/21/2010 - 22:58 नवीन
अतिशय सुंदर लेख!! चेलोकबाबी ची उगाच आठवण करून दिलीस..खूप दिवस तिकडे जायच-जायचं असं म्हणत आहे पण साला योगच येत नाही आहे.
  • Log in or register to post comments

क्या बात !

टारझन
Wed, 04/21/2010 - 23:10 नवीन
क्या बात ! क्या बात !! क्या बात !!! फॉर्मात काय बेला ? - वेसणघालु
  • Log in or register to post comments

मस्त

आनंदयात्री
गुरुवार, 04/22/2010 - 00:22 नवीन
मस्त लेख रे बेला. आणी छान सविस्तर लिहल्याने वाचायला आवडला. तु लिहता झालास पाहुन आनंद झाला. असेच वरचेवर लेख आणी मुख्य म्हणजे कविता येउ दे.
  • Log in or register to post comments

वाचनीय आणि चविष्टही लेख

संदीप चित्रे
गुरुवार, 04/22/2010 - 01:36 नवीन
कोपर्‍यावरच्या इराण्याची आठवण काढून अंमळ हेलावलो महाराजा ! कॉलेजच्या जमान्यात इराण्याच्या हॉटेलात बसून समोसे/चहा खात - पीत, किशोरची गाणी ऐकत, अभ्यास करतानाच रस्त्यावरची कुठलीही 'प्रेक्षणीय' हालचाल नजरेतून सुटू न देण्याचे मल्टिटास्किंग केलेले आठवलं :) --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments

छान

भाग्यश्री
गुरुवार, 04/22/2010 - 01:41 नवीन
छान लेख! गाथा इराणी अलिकडेच वाचल्याने काही संदर्भ आठवत आहेत. तसेच एका इराणी बाईचे "फनी इन फारसी" हे (तसे बोअरिंगच, परंतू) इराण व इराणीलोकांबद्दल थोडीफार माहिती देणारे असल्याने आवडले होते. इराणी लोकं शिक्षणाबद्दल खूप उत्साही असतात व त्यासाठी बाहेरदेशी जातात हे ऐकले होते व पाहीलेही होते. इंजिनिअरिंग करताना कॉलेजमध्ये बरीच इराणी मुलं पाहील्याचे आठवतंय. पूर्वीचा इराण बराच प्रगत व सद्ध्याचा दबावामुळे अप्रगत अशी विचित्र परिस्थिती असल्याने, सद्ध्याच्या तरूण मुलींच्या आयांनी मनसोक्त स्वातंत्र्य उपभोगलेले व त्या मुली मात्र हिजाब,मुलींनी गाऊ नये वगैरे दबावाखाली कोमेजलेली.. ! दुर्दैवाने मी कधीच इराण्याकडे खाल्ले नाहीये. त्यामुळे तो एक भाग मला अनोळखीच..
  • Log in or register to post comments

वा वा!! बेला, सुंदर स्फुट!!

चतुरंग
गुरुवार, 04/22/2010 - 02:26 नवीन
पूर्वी मुंबईत कामानिमित्त येणेजाणे हमखास असे त्यावेळी दादर स्टेशनच्या बाहेरच्या इराण्याकडे डब्बल ऑम्लेट, बन्-मस्का आणि फक्कड चहा असा मजबूत आधार घेऊनच मी पुढे जाई त्याची आठवण झाली! तसा आमचा आवडता खेळसुद्धा भारतातून पर्शिया (इराण) मार्गे सर्वदूर पसरलाय त्यामुळे जिव्हाळ्याचे संबंध आहेत! (शतरंज का खिलाडी)चतुरंग
  • Log in or register to post comments

रसिक

सन्जोप राव
गुरुवार, 04/22/2010 - 05:18 नवीन
रसिकतेने लिहिलेला लेख आवडला. यात आता 'बुर्ज दुबई' नाही, 'बुर्ज खलिफा' आहे अशा तांत्रिक सुधारणा सुचवणे म्हणजे या रसिकतेचा अपमान करण्यासारखे आहे, असे वाटते. सन्जोप राव इसे रोकिये महिंदरबाबू, क्या आप अपने तमाशे के लिये एक आदमी की जान ले लेंगे? शेरसिंग, राजू आदमी नही, जोकर है. ये जियेगा भी यही, मरेगा भी यही. मरेगा भी यही, जियेगा भी यही.
  • Log in or register to post comments

बर्‍याच

प्रभो
गुरुवार, 04/22/2010 - 05:25 नवीन
बर्‍याच दिवसांनी बेला चा लेख...मस्त... आवडला.. MG Road पुण्याच्या नाझ ची आठवण झाली.. काय ते गोबी समोसे आणी पानी कम चाय..आहाहा.. फक्त लेखाचं नाव वाचून बेला काय, सुदुर पुर्वेला चक्कर टाकून आला की काय?? (केक झाला आता अ‍ॅटमबॉम्ब, खिमा पॅटिस नि चाय) :)
  • Log in or register to post comments

मी इराणी

रेवती
गुरुवार, 04/22/2010 - 06:36 नवीन
मी इराणी हाटेलात कधीच गेले नाही त्यामुळे पदार्थांच्या चवीचा अनुभव नाही पण आपले लेखन मात्र आवडले व चवीने वाचले. रेवती
  • Log in or register to post comments

छान

चित्रा
गुरुवार, 04/22/2010 - 06:56 नवीन
अमेरिकेतील मी जवळून पाहिलेले इराणी लोक स्वतःला बर्‍याच अंशी 'पर्शियन' समजतात, मुस्लिम नाही असे दिसले आहे. नुसते "इराणी" नाहीत, "पर्शियन". इराणमधले स्थापत्य प्रसिद्ध आहे (उदा. एस्फाहान) त्यांच्यापैकी अमेरिकेत आलेले अनेक लोक सध्याच्या राजकिय परिस्थितीवर अजिबात संतुष्ट नाहीत, त्यांच्याकडील सत्तेवर अंकुश असलेल्या मुल्लामौलवींच्या धार्मिक दबावावरून बोलताना जराही घाबरत नाहीत, शब्द मोजून अचूक वापरतात असे पाहिले आहे. निदान तीन इराणी लोकांना जवळून पाहिले आहे. एकंदरीत इराणी लोक मला रोचक वाटतात. (तसे कुठचे नसतात म्हणा?).
  • Log in or register to post comments

+१ लेख आवडला.

Nile
गुरुवार, 04/22/2010 - 07:16 नवीन
अमेरिकेतील मी जवळून पाहिलेले इराणी लोक स्वतःला बर्‍याच अंशी 'पर्शियन' समजतात,
त्यांच्यापैकी अमेरिकेत आलेले अनेक लोक सध्याच्या राजकिय परिस्थितीवर अजिबात संतुष्ट नाहीत
माझ्या ग्रुपमध्ये बरेच इराणी आहेत. वरील निरिक्षणाशी मी सहमत आहे. मला तरी ही मंडळी बर्‍यापैकी (मुस्लीमांपैकी, भारतातील काही अनुभवांनुसार) 'शहाणी' वाटली. (मुल्ला मुर्खासारखे बडबडबडतोय, धर्मांधांनी नसती बंधने लादली आहेत, आधुनिक विचार-आचारांचे पालन इत्यादी बाबतीत त्यांची आणि माझी मते अगदी जुळतात हे कळल्यावर मला थोडे (सुखद)आश्चर्यच वाटले) आपल्यात आणि त्यांच्यात बरीच साम्यं ही आढळली (एक इराणी मित्र तर संतुरसुद्धा वाजवतो).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

सहमत आहे

बेसनलाडू
गुरुवार, 04/22/2010 - 07:35 नवीन
लेखात उल्लेख केलेल्या इराणी स्त्री सहकार्‍यांच्या बाबतीत हाच अनुभव आला आहे. (अनुभवी)बेसनलाडू येथील विद्यापिठात शिकताना एका इराणी विद्यार्थ्याशी ओळख झाली होती आणि काही तास त्याच्यासोबत गप्पा मारता आल्या होत्या. लेखात उल्लेखलेल्याप्रमाणे तोही इराणी स्थापत्यशास्त्राबद्दल भरभरून सांगत होता (अमेरिकेत स्थापत्यशास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी आला होता), त्याची आठवण झाली. (स्मरणशील)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

पर्शियन

नंदन
गुरुवार, 04/22/2010 - 12:41 नवीन
>>> अमेरिकेतील मी जवळून पाहिलेले इराणी लोक स्वतःला बर्‍याच अंशी 'पर्शियन' समजतात, मुस्लिम नाही असे दिसले आहे. नुसते "इराणी" नाहीत, "पर्शियन". --- सहमत आहे. एका पश्तुन माणसाचं 'आम्ही गेली ५००० वर्षं पश्तुन, १३३० वर्षं मुसलमान आणि ६३ वर्षं पाकिस्तानी आहोत' हे विधान आठवलं. असंच काहीसं पर्शियन अस्मितेबद्दलही वाचलं होतं. प्राचीन संस्कृतीबरोबरच अरब वंशीय - बिन अरब वंशीय, सुन्नी - शिया इ. भेदांमुळेही थोडी अलगतेची भावना निर्माण होत असावी. अवांतर - इस्लामपूर्व काळातले 'मित्र' देवतेचे अग्निमंदिर

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

इराणी हॉटेल्स, लोक

अक्षय पुर्णपात्रे
गुरुवार, 04/22/2010 - 07:14 नवीन
इराणी हॉटेल्सचा चांगलाच अनुभव आहे. पुण्यातल्या गुडलक, लकी आणखी कित्येक ठिकाणी बराचवेळ घालवला आहे. इराणी हॉटेलातल्या चहाचे तसेच काही पदार्थांचे उगीच कौतुक होते असे वाटते. (इकडचे हे आणि तिकडचे ते खाऊन पहा असे सल्ले कृपया देऊ नयेत.) काही पदार्थ ठीकच असतात. (पुण्यातल्या कॅफे सनराइजला चांगला नाश्टा मिळायचा. नव्या चित्रकारांची चित्रेही लावलेली असत.) काउंटरवर सिगरेट मिळण्याची सोय आणि वाट्टेल तितका वेळ बसता येते म्हणून अनेकांना या जागा आवडतात व नॉस्तॅल्जिक करतात. त्यात काही (कॉर्नरच्या) हॉटेलात उघड्या खिडक्या आणि आरसे असल्याने अनेकांना मौज वाटते. एक-दोन वर्षांपुर्वी काही मित्रांसकट गुडलकला गेलो तेव्हा सेल्स रिप्रेजेंटेटिव्जच्या अड्ड्यात गेल्यासारखे वाटले. अनेक इराणी लोकांशी जवळून संबंध आला आहे. पुण्यात असतांना इराण-इराक युद्धात लढलेला एक मित्र होता. त्याचे कुटूंबिय उच्चपदस्थ असल्याने अमेरिकेविरुद्ध कायम नाके मुरडण्यास त्याला खूप आवडत असे. अमेरिकेत आल्यावर एक-दोन डावे कार्यकर्ते (तेव्हा आता नाही. आता अमेरिकन नागरिक) भेटले. त्यांचे एकूणातच मत इतर डाव्यांप्रमाणेच होते. (त्यांच्या देशातील (अमेरिकेचे रहिवासी असलेले) राष्ट्रवादी त्यांना झोडतात हेही नेहमीचेच.) इतर काहीजण आहेत त्यांना इराणमध्येच संस्कृतीचा उगम (एकाचे शेवटचे नाव अझरबैजानी आहे) झाला आहे, असे वाटते. हेही नेहमीप्रमाणेच. इराणमध्ये होत असलेल्या निदर्शनांत (उच्च मध्यमवर्गीय सोडून) सामान्य माणसांचा कितपत सहभाग असतो याविषयी साशंक आहे. काही वर्षांपुर्वी पाहिलेला 'द विंड विल कॅरी अस' हा सिनेमा खूप आवडला होता. बरेचसे इतर सिनेमे मात्र ओवरहाइप्ड वाटले.
  • Log in or register to post comments

सनराईज

नितिन थत्ते
गुरुवार, 04/22/2010 - 12:04 नवीन
>>पुण्यातल्या कॅफे सनराइजला चांगला नाश्टा मिळायचा.. आपण बहुधा जुने वरीजनल सनराईज -१९८२ आधीचे- पाहिले नसणार. गोल मार्बल टॉपची टेबले आणि गोल बुडाच्या हलक्या खुर्च्या असलेले. नंतर तर सनराईज ऐवजी डोसा डायनर की काहीतरी झाले होते. इराण्याच्या हाटेलाची खासियत म्हणजे सात आठ जणांत ४ चहा मागवून २ तास बसता येणारे हाटेल. तसेच स्वस्त नाश्ता मिळण्याचे ठिकाण. महिनाअखेरीस ब्याचलरांसाठी चांगले ;) नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षय पुर्णपात्रे

डोसा डायनर

अक्षय पुर्णपात्रे
गुरुवार, 04/22/2010 - 18:48 नवीन
मी पुण्यात असतांनाच झाले होते. ८२च्या आधीचे सनराइज पाहिलेले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

इतिहास

नितिन थत्ते
गुरुवार, 04/22/2010 - 19:10 नवीन
१९८२ (की १९८३?) मध्ये तळजाईच्या पठारावर (अरण्येश्वराच्या पुढे) संघपरिवाराचे जनजागरण अभियान झाले होते. २ की ३ दिवसांच्या शिबिरानंतर एक 'शिस्तबद्ध' मिरवणूक निघाली होती. ती मिरवणूक लकी रेस्टॉरंट, सनराईज मार्गे जं म रस्त्यावरून शिवाजी नगर कडे गेली त्या मिरवणूकीतील जमावाने लकी चे थोडे नुकसान केले आणि सनराईज जाळून टाकले (असे म्हटले जाते. सनराईज जळले ही वस्तुस्थिती). त्यानंतर ते पुन्हा सुरू झाले तेव्हा त्याचे स्वरूप टिपिकल इराणी नव्हते. नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षय पुर्णपात्रे

व्वा!!

प्राजु
गुरुवार, 04/22/2010 - 07:52 नवीन
व्वा!! बेला.. अतिशय सुरेख लेख!! उत्कृष्ट!! बर्‍याच मुद्यांना स्पर्श करणारा आणि बरीच माहीती नव्याने सांगणारा. खूप दिवसांनी लेखणी हाती घेतलीस आणि एक सुंदर मेजवानीच मिळाली अगदी त्या ब्रून्-मस्का सारखीच.. :) - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/
  • Log in or register to post comments

छान

श्रावण मोडक
गुरुवार, 04/22/2010 - 11:34 नवीन
छान लेख. आवडला!
  • Log in or register to post comments

बरेच

बापु देवकर
गुरुवार, 04/22/2010 - 12:32 नवीन
बरेच दिवसानी तुझा लेख वाचला...अजून एक "बेला के फूल" आवडले.
  • Log in or register to post comments

मस्त

नंदन
गुरुवार, 04/22/2010 - 12:33 नवीन
लेख. ब्रिटानिया आणि मेरवानमध्ये केलेल्या खादाडीच्या आठवणी पुन्हा चाळवल्या गेल्या :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

वा..

स्वाती दिनेश
गुरुवार, 04/22/2010 - 17:32 नवीन
बरेच दिवसांनी लिहिलंस बेला, छानच लेख, आवडला... स्वाती
  • Log in or register to post comments

मस्त लेख!

यशोधरा
गुरुवार, 04/22/2010 - 17:55 नवीन
मस्त लेख! अतिशय आवडला!
  • Log in or register to post comments

इराण्याच्

अरुंधती
गुरुवार, 04/22/2010 - 18:40 नवीन
इराण्याच्या हाटेलात बसून किती वेळ टीपी केलाय, किती वेळा तेथील बन-मस्का आणि जेव्हा सामिषाहार करायचे तेव्हा अजून बर्‍याच पदार्थांची खुमारी अनुभवली आहे त्याला गणतीच नाही. डेक्कनवरचे गुडलक, लकी, सनराईझ आणि खूप पूर्वी टिळक रोडला एस.पी. कॉलेजजवळही एक इराण्याचे हाटेल होते तिथे माझे वडील मला कायम घेऊन जायचे त्यांच्याबरोबर! गुडलकमध्ये वय वर्षे साडेतीन असताना टेबलाच्या वर बसून सामिषाहाराचा आनंद घेत गणपती अथर्वशीर्ष जोरजोरात म्हटल्याचेही आठवतंय!!!!!! एक कप चहा, खारी किंवा टोस्टच्या जोरावर तिथे वडीलांबरोबर बराच काळ वर्तमानपत्रातील मला त्या वयात अगम्य मजकूर वाचण्यात घालवलाय. अलका टॉकीजसमोरच्या इराण्याकडे तेव्हा ज्यूक बॉक्स सारखेही काहीतरी होते. तरुण मुले येऊन त्यावर आवडती गाणी वाजवत असत. आजूबाजूला सिगरेटचा धूर, सोबत चहाचा प्याला आणि तेच ते इराण्याच्या हाटेलातले नेहमीचे रिलॅक्स्ड वातावरण! कॉलेजात असतानाही खिशात कडकी असली की उदरभरण करायला इराणी ब्येष्ट असायचा. गेल्या अनेक वर्षांत इराण्याच्या हाटेलात जाणे झाले नाही. ढोले पाटील रोडला असलेल्या ''झामूज'' नामक पारशी रेस्टॉरंटमध्येही कॉलेजात असताना पडीक असायचो. पारशी समाजात माझे बरेच मित्र मैत्रिणी आहेत. दादरच्या पारसी कॉलनीत कधी काळी इतके येणे-जाणे होते की तिथले फुलवाले, दुकानदार मला पैसे सुट्टे नसले तर सरळ माल उधार देऊ लागले होते! त्या रस्त्यावर नेहमी फिरायला येणारे बावा बावीदेखील मान हालवून ओळख द्यायचे तेव्हा तर फार मजा यायची. माझ्या तीन-चार पारशी मित्रमैत्रिणींची लग्नेही मला बघायला मिळाली. अगदी पारसी अग्यारीत जाऊन! खूपसे विधी हिंदूंसारखेच असतात. जाम धमाल असते लग्न-समारंभात! आणि आजूबाजूला सगळे पारसीच पारसी! त्यांच्या ''केम छो डिक्रो'' मध्येही इतका गोडवा असतो की काही विचारू नका! खूप जीव लावणारी माणसं! मी लहान असताना पुण्याच्या के.ई.एम. हॉस्पिटलचे तेव्हाचे डीन असलेले डॉ. भरुचा (हार्ट सर्जन) ह्यांनी माझे अगदी किरकोळीतले पायाचे फुटकळ ऑपरेशन केवळ एका सहकारी डॉक्टरच्या शब्दाखातर केले होते! डॉक्टर भरुचाही एकदम टिपिकल पारसी होते!! वयाने आणि हुद्द्याने तेव्हा ते बरेच सिनियर होते. पण माझ्याशी बोलताना अतिशय खट्याळपणे, मला चिडवत बोलत असत. ऑपरेशन झाल्यावर मी त्यांच्या कँपातल्या डिस्पेन्सरीमध्ये ड्रेसिंग बदलून घ्यायला जायचे. डिस्पेन्सरीतले वातावरण अगदी टिपिकल पारसी! त्यांची नर्सही खूप छान, आकाराने अवाढव्य अशी प्रेमळ पारशीण होती. मला त्यामुळे ''ब्रेव्ह गर्ल'' करत गोळ्या चारल्या जायच्या. आणि डॉक्टर??? त्यांनी एकदा सुनावले मला, ''डिक्रा, तू माझा फी नाय दिला. नेक्स्ट टायमाला मला माझा फी पायजेल.'' आणि मी खरेच त्यांच्या चिडवण्याला फशी पडून माझी अख्खी पिगी बँक [पावडरचा रिकामा डबा] त्यांच्यासमोर उपडी केली होती, ज्यात १ पैसा, ५ पैसे व १० पैशाची बरीच नाणी होती. ते पाहून डॉक्टरला खरोखरी भरून आले आणि त्यांनी प्रेमाने माझ्या डोक्यावरून हात फिरवल्याचे अजून स्मरते! :-) अशा पारशी बावांच्या, बाविणींच्या आणि इराणी हाटेलांच्या बर्‍याच आठवणी लेख वाचून जाग्या झाल्या! धन्यवाद!! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments

चांगला प्रतिसाद

श्रावण मोडक
गुरुवार, 04/22/2010 - 19:26 नवीन
चांगला प्रतिसाद. आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुंधती

अरुंधती,

यशोधरा
गुरुवार, 04/22/2010 - 19:19 नवीन
अरुंधती, छान लिहिलं आहेस :)
  • Log in or register to post comments

बेला,

भोचक
गुरुवार, 04/22/2010 - 19:33 नवीन
बेला, भयंकर आवडला लेख. वर्तमान राजकीय, सामाजिक संदर्भांसह नॉस्टॅल्जियाही छान जागलाय. शिवाय माहिती देतानाची लालित्यपूर्ण बेला शैलीही खास. बाकी आमच्या नाशिकमध्येही अशोकस्तंभाजवळ 'मेहेर' नावाचं इराण्याचं हॉटेल होतं. आता ते पाडून टॉवर उभारलाय. तरीही ती जागा मेहेर याच नावाने ओळखली जातेय. त्यावेळी आमचा दादा त्या हॉटेलविषयी असेच 'नॉस्टॅल्जिक' होऊन सांगायचा. तुम्ही वर्णन केल्याप्रमाणेच ते हॉटेल होतं. अरूंधती ताईंची प्रतिक्रियाही मस्त. (भोचक) हा आहे आमचा स्वभाव
  • Log in or register to post comments

मेहेर

श्रावण मोडक
गुरुवार, 04/22/2010 - 19:40 नवीन
मेहेर... क्या बात है! जुन्या आठवणी जाग्या झाल्या. नंतरच्या काळात मेहेरच्या शेजारी एका कॉम्प्लेक्समध्ये एका हाटेलात चवदार मिसळीसोबत केलेल्या गप्पाष्टकही आठवलं. मेहेरच्या इथंच त्या काळात मिटिंग पॉईंटही होतं. तिथं मित्रांना भेटून रंगवलेली (कधी शक्य न होणाऱ्या) स्वप्नांची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भोचक

मेहेर

अक्षय पुर्णपात्रे
गुरुवार, 04/22/2010 - 20:25 नवीन
हॉटेल कधी पाहीले नसावे.किंवा पाहीले असावे पण लक्षात नसावे. जुन्या मुंबई आग्रा रस्त्यावर (त्र्यंबक रस्त्याच्या समोरचा कॉर्नर, टीळक वाचनालयासमोर) एक इराणी हॉटेल आठवते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

मेहेर

टिउ
Sat, 04/24/2010 - 21:38 नवीन
कधीची गोष्ट आहे? मेहेर नावाच्या हॉटेल मधे कधी गेल्याचं आठवत नाही. पण तिथेच विश्वा की विश्वा पॉंईंट नावाचं एक हॉटेल होतं. काय पाव भाजी मिळायची तिथे! मला वाटतं आता तिथे पण शॉपींग काँप्लेक्स उभारलाय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भोचक

त्या

भोचक
Sat, 04/24/2010 - 22:29 नवीन
त्या विश्वा पॉईंटच्या शेजारी सिंदेकर प्लाझा नावाची बिल्डिंग उभारलीय. त्याच जागी मेहेर हॉटेल होतं. त्या जागेला आजही मेहेर म्हणूनच ओळखलं जातं. बसही त्याच्या अलीकडे-पलीकडे मेहेर म्हणूनच थांबायच्या. आता बस स्टॉप पुढे गेला आहे. (भोचक) हा आहे आमचा स्वभाव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टिउ

१९८०

नितिन थत्ते
Sat, 04/24/2010 - 22:30 नवीन
१९८० मध्ये तरी मेहेर हॉटेल होतंच. मी पाहिलं होतं. नंतरचं माहिती नाही. १९८८ मध्ये गेलो होतो तेव्हाही बहुधा होतं. नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टिउ

९५-९६ च्या

भोचक
Sat, 04/24/2010 - 22:50 नवीन
९५-९६ च्या सुमारास ते पाडलं. त्या जागी वामनराव लोखंडे नावाच्या बिल्डरने बिल्डिंग बांधली. एकेकाळी मेहेरलगत असलेल्या प्रधान पार्कमध्ये रहाणारा (भोचक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

मस्त

शुचि
Sat, 04/24/2010 - 03:38 नवीन
मस्त लेख. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Music and poetry only reach the ears of those in anguish.
  • Log in or register to post comments

कोलाज...

राजेश घासकडवी
Sat, 04/24/2010 - 04:07 नवीन
इराण या शब्दांत दडलेल्या अनेक कल्पनाचित्रांचं समर्थ कोलाज. आवडलं.
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो

सहज
गुरुवार, 05/27/2010 - 15:01 नवीन
सुंदर लेख. बेला अजुन येउ दे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा