✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

प्रकरण पाचवे: फसवणूक-पाकिस्तान, अमेरिका व अण्वस्त्रांचा गुप्त व्यापार

स
सुधीर काळे यांनी
Sun, 03/14/2010 - 13:06  ·  लेख
लेख

Book traversal links for प्रकरण पाचवे: फसवणूक-पाकिस्तान, अमेरिका व अण्वस्त्रांचा गुप्त व्यापार

  • ‹ फसवणूक-प्रकरण चौथे: "कवड्या!"
  • Up
  • 'फसवणूक'-प्रकरण सहावे-ज्यूंचा कल्पनाविलास ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
32559 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

हे प्रकरण

मदनबाण
Mon, 03/15/2010 - 06:11 नवीन
हे प्रकरण सुद्धा वाचनीय आहे. :) मदनबाण..... मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ. www.mazeyoutube.blogspot.com
  • Log in or register to post comments

छान.

प्रमोद देव
Mon, 03/15/2010 - 10:38 नवीन
त्यांचे वरिष्ठही चाटच पडले कारण रेगन जनतेला एक सांगत होते तर करत होते उलटेच! ह्यालाच म्हणतात... खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असतात. सगळे राजकारणी असेच असतात.
  • Log in or register to post comments

सगळे राजकारणी एका माळेचे मणी!

सुधीर काळे
Wed, 03/17/2010 - 07:41 नवीन
देवसाहेब, हे मात्र 'सही' बोललात. कुठलाही देश असो, कुठलाही पक्ष असो, कुठलाही धर्म वा भाषा असो, सगळे राजकीय नेते असतात एका माळेचे मणी! ------------------------ सुधीर काळे राष्ट्रपतींना निरोप लिहा presidentofindia@rb.nic.in या ई-मेल पत्त्यावर, प्रधानमंत्र्यांना निरोप लिहा pmosb@pmo.nic.in या ई-मेल पत्त्यावर)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव

उत्तम

Dhananjay Borgaonkar
Mon, 03/15/2010 - 11:43 नवीन
उत्तम लेखमाला. प्रकरण ६ च्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments

वाचकांनी दुरुस्त्या सुचवल्या त्या करून हे प्रकरण पोस्ट केले

सुधीर काळे
Mon, 03/15/2010 - 22:19 नवीन
Image removed. कांही वाचकांनी दुरुस्त्या सुचवल्या त्या करून पाचवे प्रकरण पुन्हा पोस्ट केले आहे. तसेच मुखपृष्ठाचे मोठे चित्रही इथे टाकले आहे. ------------------------ सुधीर काळे राष्ट्रपतींना निरोप लिहा presidentofindia@rb.nic.in या ई-मेल पत्त्यावर, प्रधानमंत्र्यांना निरोप लिहा pmosb@pmo.nic.in या ई-मेल पत्त्यावर)
  • Log in or register to post comments

उत्तम लेखमाला

चिरोटा
Mon, 03/15/2010 - 23:22 नवीन
हा ही भाग वाचनिय.जरा फास्ट फॉर्वर्ड- सात वर्षांनी ,१९८८ साली झियांचे विमान अपघातात निधन झाले. हा घातपात होता असे म्हंटले जाते.अमेरिका,पाकिस्तानची मैत्री ,झियांचा वाढता प्रभाव इस्त्रायला खुपत असल्याने मोसादने काटा काढला असे म्हणतात.(इतरही अनेक शक्यता आहेत) आपण वर उल्लेखलेले प्रसंग बघता झियांच्या मृत्युमागे निश्चित घातपात असावा असे म्हणायला वाव आहे. आपले काय मत आहे? भेंडी P = NP
  • Log in or register to post comments

पण नेमके कुणी कारस्थान केले याचा पत्ता पूर्णपणे लागलेला नाहीं

सुधीर काळे
Tue, 03/16/2010 - 07:30 नवीन
हा भाग नंतरच्या प्रकरणात येणार आहे. पण माझ्या वाचनानुसार झिया ज्या विमानाने गेले त्यात शेवटच्या क्षणी आंब्यांची करंडी चढविण्यात आली व त्यात बॉम्ब होता (कदाचित आंब्याच्याच आकाराचा). त्या विमानात त्यावेळचे अमेरिकेचे राजदूत होते तेही मारले गेले. संशय बर्‍याच लोकांवर होता. एक लष्करी अधिकारी त्या विमानाने न येता वेगळा आला म्हणून त्याच्यावरही संशय होता. पण नेमके कुणी कारस्थान केले याचा पत्ता पूर्णपणे लागलेला नाहीं ------------------------ सुधीर काळे राष्ट्रपतींना निरोप लिहा presidentofindia@rb.nic.in या ई-मेल पत्त्यावर, प्रधानमंत्र्यांना निरोप लिहा pmosb@pmo.nic.in या ई-मेल पत्त्यावर)
  • Log in or register to post comments

हा लेखही आवडला....

पारंबीचा भापू
Wed, 03/17/2010 - 09:46 नवीन
बर्‍याच दिवसांनी 'मिपा'वर आलो व तुमचा लेख वाचला. खूप नवी-नवी माहिती मिळते आहे. धन्यवाद. पुढच्या भागाची वाट पहात आहे. धन्यवाद. भापू
  • Log in or register to post comments

मस्त लेख

सायबा
Fri, 03/19/2010 - 08:09 नवीन
सुधीरभाऊ, हा लेखही मस्त आहे. पुढच्या लेखाची वाट पहातो. सायबा
  • Log in or register to post comments

न्यूनगंडाचे नवनिर्माण

सुधीर काळे
Fri, 03/19/2010 - 11:11 नवीन
आज भोचक-जींचा "न्यूनगंडाचे नवनिर्माण" हा लेख वाचल्यावर खालील टिप्पणी करावी असे वाटले. पाचव्या प्रकरणातील शेवटचे परिच्छेद खानसाहेबांच्या स्वभावाचा एक नवा पैलू दाखवितात तो म्हणजे न्यूनगंड! लहानपणी हिंदुस्तानातून कफल्लक परिस्थितीत पाकिस्तानात पोचलेल्या खानसाहेबांना न्यूनगंड वाटायचे कारण नव्हते, कारण त्यांच्यासारखे लाखों लोक सरहद्दीच्या दोन्ही बाजूला होते. पण आधी पोस्टात साधी नोकरी केलेल्या या तरुणाला चांगली नोकरी मिळाली नाहीं म्हणून तो परदेशी शिकायला गेला. तिथेही कुठल्याच कॉलेजात सहज प्रवेश मिळाला नाहीं. कसाबसा प्रवेश मिळाला पण युरोपात नोकरी मिळेना. गोरी बायको म्हणून शेवटी नोकरी मिळाली, तिथे लांड्या-लबाड्या करून गुपिते मिळविली, भुत्तोंना पत्र लिहिले इथपर्यंतचा प्रवास खडतरच झाला होता. मग नशीबाने हात दिला व कीर्ती पायाशी लोळू लागली. अशी माणसे बर्‍याचदा जास्त उद्धट होतात. मग जुने अपयश ते आपल्या अशा उद्धटपणामागे लपवू पहातात किंवा आधी झालेल्या अन्यायाचा अशा तर्‍हेने सूड उगवायला बघतात. Corporate World मध्ये अशी उदाहरणे मी पाहिली आहेत तशी इथल्या वाचकांनीही पाहिली असतील. खानसाहेबांची महत्वाकांक्षा अशाने इतकी वाढली असावी व "सगळं मलाच मिळालं पाहिजे" अशी त्यांची मनोवृत्ती झाली असावी. हॉलंडमध्ये खटला होऊन शिक्षाही झाली. अशा परिस्थितीत त्यांचा जुना न्यूनगंड उफाळून आला असावा. म्हणूनच "मला रेसिंग कार चालवायची आहे, पेट्रोलपंपावरचा पोर्‍या नाहीं बनायचेय्" अशी भावना मनात जागृत झाली असावी! आपल्या पत्नीची व मुलींची युरोपवर जास्त निष्ठा आहे हे त्यांचे मत किंवा आपल्या कुटुंबियांना अमेरिका किंवा इस्रायल पळवून नेऊन ओलीस म्हणून वापरेल ही भीति खानसाहेबांच्या paranoia चे निदर्शक वाटते, नाहीं का? म्हणूनच "तेच त्यांचे सर्वात मोठे शत्रू होते" असे लेखकद्वयीने लिहिले असावे! सुधीर काळे, जकार्ता ------------------------ Write to President: presidentofindia@rb.nic.in; Write to PM: pmosb@pmo.nic.in
  • Log in or register to post comments

जबरदस्त ...

संग्राम
Fri, 03/19/2010 - 14:48 नवीन
हे ही प्रकरण जबरा ... पुढच्या भागाची वाट पहात आहे.
  • Log in or register to post comments

आवर्जुन

गणपा
Fri, 03/19/2010 - 15:05 नवीन
आवर्जुन वाचतोय..
  • Log in or register to post comments

इंदिरा गांधीनंतर आपले नेतृत्व (काँग्रेस वा भाजप) अगदीच बुळे आहे

सुधीर काळे
Wed, 03/24/2010 - 08:20 नवीन
गेल्या दोन-तीन दिवसात 'टाइम्स ऑफ इंडिया' या वृत्तपत्रातील कांहीं बातम्या वाचून मन खिन्न झाले व वॉशिंग्टनला बदलायचा विडा उचलून राष्ट्राध्यक्षपदावर निवडून आलेल्या ओबामांना वॉशिंग्टननेच 'अमूलाग्र' बदलेले दिसते. "Yes, Minister" ही 'बीबीसी'वरील मालिका ज्यांनी पाहिली आहे त्यांना आठवत असेल कीं राज्यावर कुठलाही पक्ष येवो वा कुठलाही नेता राष्ट्राध्यक्ष/प्रधानमंत्री बनो, शेवटी राज्याचा शकट हाकतात ते सनदी नोकरच. कारण हे सनदी नोकर त्यांना जे हवे असते ते चातुर्याने नेत्याच्या तोंडून वदवतात. ओबामा आले तेंव्हा वाटले होते कीं एक ताज्या हवेची झुळूक आली. त्यांनी (आलीसुरुवातत्यांनी-Example of unintended distortion) सुरुवातच केली "most dangerous place on earth" असे पाकिस्तानचे वर्णन करून. जरदारींच्या पहिल्या अमेरिकाभेटीत मी तिथे होतो व अमेरिकन चित्रवाणीवर पहिल्या शंभर दिवसानंतरच्या मुलाखतीत ओबामा म्हणाले होते कीं पाकिस्तान सरकार जनतेला प्राथमिक सुविधा देण्यातही अपयशी ठरले आहे, पाकिस्तानला जी मदत दिली जाईल तिचे बारकाईने audit केले जाईल, तिचा नको तिथे दुरुपयोग करू दिला जाणार नाहीं वगैरे वगैरे! घोषणा छान होत्या पण प्रत्यक्षात जे दिसतंय् ते अगदी उलटेच. आजपासून अमेरिका-पाकिस्तानमध्ये strategic co-operation/alliance या नावाखाली चर्चा सुरू होत आहे. त्याबाबत अमेरिकेची राजदूता (मॅडम) अ‍ॅन पॅटरसन (Anne Patterson) यांनी लॉस एंजेलेस येथून प्रसिद्ध होणार्‍या एका पाकिस्तानी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले कीं जसा अमेरिका-भारत यांच्यात मुलकी परमाणू करार झाला तसा पाकिस्तानबरोबरही करण्याबाबत चर्चा होणार आहे. त्याचीच री थोड्याशा फरकाने AFPAK साठी नेमेलेले खास राजदूत रिचर्ड होलब्रूक यांनी ओढली. देखाव्यासाठी डॉ. खान यांच्यावरील अवैध अण्वस्त्रप्रसार केल्याबद्दलचा 'लुटपुटी'चा खटला (जो मुशर्रफने डॉ. खान यांच्या खुल्या माफीनंतरची 'गरम' हवा थंड झाल्यावर बंद केला होता) पुन्हा सुरू केला जाईल अशीही बातमी वाचली. म्हणजे आधीच अण्वस्त्रे बनवण्यात पाकिस्तानला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहाय्य तर अमेरिकेने केले आहेच पण जणू ते पुरेसे नाहीं म्हणून आता हे नवे संकट उभे करण्यात येत आहे! सगळीच नाटकं! पण या सगळ्यात मला तरी आपल्या सरकारचा नाकर्तेपणा दिसून येतो. आपल्या नाराजीला अमेरिकेच्या लेखी कांहींच किंमत नाहीं असे असूच शकत नाहीं. फक्त आपण आपले फासे "भोळा सांब ष्टाईल"ने टाकतोय् हे उघड आहे. Our pound of flesh मिळविण्यात आपण अपयशी ठरत आहोत! कुणी 'चाणक्या'सारखा धूर्त नेता आपल्याला मिळायला हवा! सध्याच्या केंद्रीय राज्यकर्त्यात तरी मला कुणी असा धूर्त व खमक्या नेता दिसत नाहीं. इंदिरा गांधीनंतर आपले नेतृत्व (काँग्रेस वा भाजप) अगदीच बुळे झाले आहे. काय हे दुर्दैव? आपण काय करू शकतो? सुधीर काळे, जकार्ता ------------------------ हा दुवा उघडा: http://72.78.249.107/esakal/20100309/5306183452989196847.htm
  • Log in or register to post comments

सहमत

पारंबीचा भापू
Wed, 03/24/2010 - 13:45 नवीन
सुधीरभाऊ, तुमचे म्हणणे खरे आहे. भापू
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा