एका ’इजिप्शियन’ सभासदाने मला अशी सूचना केली कीं मी दर वेळेला नवीन ’धागा’ सुरु न करता एकच धागा सुरू ठेवावा व तिथेच नवीन-नवीन गझला, शेर (खरं तर शेरचे वचन आहे 'अशयार') यांची वेळो-वेळी भर घालत जावे व तिथेच प्रतिसाद येऊ द्यावेत. यामुळे वाचकांना एकच धाग्यामागे जाणे सोपे पडेल व आपोआप चांगल्या शेरांचे एक झकास संकलनही होईल. ही कल्पना मला आवडली व आता हा धागा लोकांना आवडेल तितके दिवस किंवा याहून जास्त चांगली व्यवहार्य कल्पना सुचेपर्यंत चालू राहील. एकच उणी गोष्ट आहे की हा धागा 'ब्रॉडवे'सारखा लांsssब होईल. बघू कसे जमते ते!
सुरुवात करतो माझ्या सर्वात आवडत्या शाईरा मरहूम परवीन शाकीर या उर्दू कवियित्री पासून. कलेला सीमेचे बंधन नसते असे म्हटले जाते. जरी या विधानाशी मी १०० टक्के सहमत नसलो तरी एक अपवाद म्हणून मला त्यांचे शेर त्या पाकिस्तानी असूनही आवडतात. MA in English Literature अशा उच्चशिक्षित असलेल्या परवीनबाई पाकिस्तानी सरकारात सनदी नोकर होत्या.
त्यांचा पहिलाच काव्य संग्रह त्यांच्या वयाच्या २४ वर्षी प्रसिद्ध झाला व त्यावर रसिकांच्या उड्या पडल्या. त्यानंतर त्यांचे अनेक इतर काव्य संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. त्यांना पाकिस्तानी राष्ट्रपतीकडून Pride of performance हे उच्च सन्माननिदर्शक पदक मिळाले आहे. केवळ ४२ वर्षाच्या असताना कामावर जाताना त्यांच्या गाडीला अपघात झाला व त्यात त्या निधन पावल्या. नाहीं तर त्याना आता मिळाला आहे त्याहून खूप जास्त मान-मरातब नक्कीच मिळाला असता. मला त्यांचे शेर खूप आवडतात, पण उर्दू लिपी अद्याप येत नसल्याने आतापर्यंत त्यांचे फुटकळ देवनागरीत वाचायला मिळालेले शेर वाचूनच मी "दुधाची तहान ताकावर" भागवली आहे.
प्रणय-भावनांवर आधारित त्यांचे शेर जास्त करून शोकभावनेचे, प्रियकर-प्रेयसीच्या प्रेमभंगावर, ताटातुटीवर आधालेले असून फारच हृदयस्पर्शी आहेत. खाली दिलेले दोदिलेलेत्यांचे सर्वोत्तम शेर नाहींत पण छान आहेत.
आपल्या प्रियकराबद्दल बाई म्हणतात.....
हल हो गया है खूनमें कुछ ऐसे (हल होना=मिसळून जाणे, dissolved)
रग-रगमें वो नाम बह रहा है|
आणि या दुसर्या शेरात त्या म्हणतात की माझा प्रियकर कितीही निष्ठाहीन असो, कुठेही जावो, पण तो परत माझ्याकडे येतो ही त्याची चांगली गोष्ट आहे!
वो कहीं भी गया, लौटा तो मेरे पास आया
बस यही बात है अच्छी, मेरे हरजाई की| (हरजाई=निष्ठाहीन)
एक विनोदी शेर शेवटी देऊन आजची पोस्ट संपवतो
'दाग़' नावाचा शायर म्हणतो कीं....
जिसमें लाखों बरसकी हूरें हो (हूर=अप्सरा)
ऐसी जन्नतको क्या करें कोई? (जन्नत=स्वर्ग)
असो. आरामात बसा आणि मजा लुटा.
सुधीर
विशेष
वाचने
71012
प्रतिक्रिया
220
मिसळपाव
प्रतिक्रिया
असद
गुलाम अली यांनी गायलेली माझी एक आवडती गझल
ये कहानी
बहुदा बशीर बद्र यांचीच ही माझी आवडती गझल....
मस्त !
In reply to बहुदा बशीर बद्र यांचीच ही माझी आवडती गझल.... by सुधीर काळे
फस्ले बहारी
आजचे काही
चरागों को
शायर अक्रम क़मर यांचा हा सुंदर शेर वाचा!
कोणीच नाही ?
कोणीच नाहीं कसे? अरे, हम हैं ना!
In reply to कोणीच नाही ? by आवडाबाई
हा घ्या अजून एक
देवाची आठवण येणे हा तारुण्याचा अपमान आहे? हाहाहा
In reply to हा घ्या अजून एक by आवडाबाई
अजून एक
फिराक गोरखपुरी यांचा एक झकास शेर वाचा!
वक्त
वेळ आहे खरा असा ओंजळीच्या बोटांमधून गळून नाहींसा होणारा!
In reply to वक्त by क्रान्ति
प्रो. मंशा यांचा हा सुंदर शेर काय बहारदार आहे!
आज दोन
आवडाबाई, ऐत
दिलाय !!
In reply to आवडाबाई, ऐत by सुधीर काळे
माफ करा, माझं लक्षच गेलं नाहीं तुम्ही खाली दिलेल्या टिपेकडे!
In reply to दिलाय !! by आवडाबाई
एअतिराफ़
आंसू
गुलाम अली यांची एक गझल-
व्वा, ज्ञानेश-जी!
http://www.youtube.com/watch?v=IGqPpCleO1o
छोटे बहरकी गज़ल (पहर?)-अर्थ श्री. प्रमोद देव यांना माहीत असावा!
छान आहे!
In reply to छोटे बहरकी गज़ल (पहर?)-अर्थ श्री. प्रमोद देव यांना माहीत असावा! by सुधीर काळे
'बाद-ए-सबा' म्हणजे सकाळची वार्याची मंद झुळूक!
तस्वीर
फीका चाँद !
राह्त इन्दोरी
'ये एक छोटे बहरकी गज़ल है' असा परिचय करून देतात गुलाम अली स्वतः!
जहां पेड पर चार दाने लगे...
वा वाहीदा!
वा वाहीदा!
कत्थई
In reply to वा वाहीदा! by सुधीर काळे
आज के दौर में, ऐ खुदा यह मंजर क्यूं है ...
वर्ना हर आंख में, अश्कोंका समंदर क्यूं है
"टूटे सपने करते जाये नींदोंको बरबाद"
शायर चे नाव माहीत असेल तर ..
In reply to "टूटे सपने करते जाये नींदोंको बरबाद" by सुधीर काळे
दुर्दैवाने ते मला आठवत नाहीं
In reply to शायर चे नाव माहीत असेल तर .. by वाहीदा
माझ्या
परवीन शाकिरची एक शोख गझल
सगळेच शेर अर्थपूर्ण आहेत
वाह क्रांति,
'राहत इंदौरीं'चा एक मस्त शेर!
'जादू' या शब्दावर एक झकास शेर वाचा!
'आशिक' या शायरने लिहिलेला झकास शेर वाचा
परवीन शाकीर
परवीन शाकीर या माझ्याही अत्यंत आवडत्या शाईरा आहेत!
जोश मलिहाबादी
परवीन शाकीर या माझ्याही अत्यंत आवडत्या शाईरा आहेत!
क़ातिल शेर शुचिताई
हा शेर "आग़ा शाईर" यांचा आहे!
In reply to क़ातिल शेर शुचिताई by आवडाबाई
गमजा(नखरा)
'अदम' यवाचा!एक मस्त शेर वाचा!
'अदम' यांचा एक मस्त शेर वाचा!
पूरा दुख
सुरेख अशयार, शुचीताई!
In reply to पूरा दुख by शुचि
ये इनायते
मेरी खैरीयत भी पूछी किसी और की जुबानी
In reply to ये इनायते by शुचि
ओमर खय्याम च्या रुबायांचे मराठीत रुपांतर
प्रतिसादाला जरा उशीर झाला याबद्दल क्षमस्व!
In reply to ओमर खय्याम च्या रुबायांचे मराठीत रुपांतर by जयंत कुलकर्णी
ओमर खय्याम च्या रुबायांचे मराठीत रुपांतर
मस्त !
In reply to ओमर खय्याम च्या रुबायांचे मराठीत रुपांतर by जयंत कुलकर्णी
शकील बदायुनींचा एक छान शेर वाचा
यह इष्क
शुचीताई,
In reply to यह इष्क by शुचि