Skip to main content

लुटा 'लुत्फ' उर्दू गज़ल-अशयारांचा!

लेखक सुधीर काळे यांनी बुधवार, 21/10/2009 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
एका ’इजिप्शियन’ सभासदाने मला अशी सूचना केली कीं मी दर वेळेला नवीन ’धागा’ सुरु न करता एकच धागा सुरू ठेवावा व तिथेच नवीन-नवीन गझला, शेर (खरं तर शेरचे वचन आहे 'अशयार') यांची वेळो-वेळी भर घालत जावे व तिथेच प्रतिसाद येऊ द्यावेत. यामुळे वाचकांना एकच धाग्यामागे जाणे सोपे पडेल व आपोआप चांगल्या शेरांचे एक झकास संकलनही होईल. ही कल्पना मला आवडली व आता हा धागा लोकांना आवडेल तितके दिवस किंवा याहून जास्त चांगली व्यवहार्य कल्पना सुचेपर्यंत चालू राहील. एकच उणी गोष्ट आहे की हा धागा 'ब्रॉडवे'सारखा लांsssब होईल. बघू कसे जमते ते! सुरुवात करतो माझ्या सर्वात आवडत्या शाईरा मरहूम परवीन शाकीर या उर्दू कवियित्री पासून. कलेला सीमेचे बंधन नसते असे म्हटले जाते. जरी या विधानाशी मी १०० टक्के सहमत नसलो तरी एक अपवाद म्हणून मला त्यांचे शेर त्या पाकिस्तानी असूनही आवडतात. MA in English Literature अशा उच्चशिक्षित असलेल्या परवीनबाई पाकिस्तानी सरकारात सनदी नोकर होत्या. त्यांचा पहिलाच काव्य संग्रह त्यांच्या वयाच्या २४ वर्षी प्रसिद्ध झाला व त्यावर रसिकांच्या उड्या पडल्या. त्यानंतर त्यांचे अनेक इतर काव्य संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. त्यांना पाकिस्तानी राष्ट्रपतीकडून Pride of performance हे उच्च सन्माननिदर्शक पदक मिळाले आहे. केवळ ४२ वर्षाच्या असताना कामावर जाताना त्यांच्या गाडीला अपघात झाला व त्यात त्या निधन पावल्या. नाहीं तर त्याना आता मिळाला आहे त्याहून खूप जास्त मान-मरातब नक्कीच मिळाला असता. मला त्यांचे शेर खूप आवडतात, पण उर्दू लिपी अद्याप येत नसल्याने आतापर्यंत त्यांचे फुटकळ देवनागरीत वाचायला मिळालेले शेर वाचूनच मी "दुधाची तहान ताकावर" भागवली आहे. प्रणय-भावनांवर आधारित त्यांचे शेर जास्त करून शोकभावनेचे, प्रियकर-प्रेयसीच्या प्रेमभंगावर, ताटातुटीवर आधालेले असून फारच हृदयस्पर्शी आहेत. खाली दिलेले दोदिलेलेत्यांचे सर्वोत्तम शेर नाहींत पण छान आहेत. आपल्या प्रियकराबद्दल बाई म्हणतात..... हल हो गया है खूनमें कुछ ऐसे (हल होना=मिसळून जाणे, dissolved) रग-रगमें वो नाम बह रहा है| आणि या दुसर्‍या शेरात त्या म्हणतात की माझा प्रियकर कितीही निष्ठाहीन असो, कुठेही जावो, पण तो परत माझ्याकडे येतो ही त्याची चांगली गोष्ट आहे! वो कहीं भी गया, लौटा तो मेरे पास आया बस यही बात है अच्छी, मेरे हरजाई की| (हरजाई=निष्ठाहीन) एक विनोदी शेर शेवटी देऊन आजची पोस्ट संपवतो 'दाग़' नावाचा शायर म्हणतो कीं.... जिसमें लाखों बरसकी हूरें हो (हूर=अप्सरा) ऐसी जन्नतको क्या करें कोई? (जन्नत=स्वर्ग) असो. आरामात बसा आणि मजा लुटा. सुधीर

वाचने 71012
प्रतिक्रिया 220

प्रतिक्रिया

या धाग्याची आतुरतेने वाट पहात होतो. आता ब्रॉडवे झालाच पाहिजे! ;) शेर आवडले. वो कहीं भी गया, लौटा तो मेरे पास आया बस यही बात है अच्छी, मेरे हरजाई की| यावरून पीनाझ मसानी यांनी गायलेल्या गझलेतील शेर आठवले(शायर आता आठवत नाही) कहां थे रातको? हमसे जरा निगाह मिले तलाश में हो के झुठा कोई गवाह मिले असा मतला असलेल्या या गझलेचा एक शेर याच अर्थाचा होता. असो. काळेसाहेबांची परवानगी असेल तर मीसुद्धा काही चीजा दाखवेन म्हणतो. :> "Great Power Comes With Great Responsibilities"

In reply to by ज्ञानेश...

माझी कशाला हरकत असेल? सुधीर ------------------------ हे भगवंता, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!

वा भाऊ. भन्नाट धागा बनताना दिसतो. पण अशे रसीक लोक आहेत का इथे? ते.रा.

..काळेसाहेब! (मला वाटले तुम्ही इथे तुमचा संग्रह खुला करताय, तर आपण विनापरवानगी लुडबूड का करावी.. म्हणून विचारले.) असो. असेच एकदा कुठेतरी ऐकलेले शेर. दंगलीवर काही भाष्य करू पाहणारे! "घर मेरा जलता रहा जंगलकी तरह.. लोग देखा किये बारूदके बादल की तरह!" एखाद्या वणव्याप्रमाणे (त्या दंगलीत) माझे घर जळत राहिले.. आणि लोक मात्र त्याच्याकडे शोभेच्या दारूची आतषबाजी पहावी, तशा निर्वीकारपणे बघत होते. "क्या मिला उनको सुलगती हुई रातोंके सिवा, जिंदगीभर जो फरोजां रहे मशअल की तरह..!" जे लोक आपल्या आयुष्यभर एखाद्या मशालीप्रमाणे प्रदीप्त राहिले, त्यांना आपल्या आयुष्याच्या शेवटी एकाकी जाळणार्‍या रात्रीशिवाय काय बरे मिळाले. "एक सी धूप है काबे से सनमखाने तक, काश मिलता कोई साया तेरे आंचल की तरह!" मंदिरापासून मशिदीपर्यंत एकच एक उन्हाची रखरख/काहिली जाणवते आहे. अशा वेळी.. काश मिलता कोई साया तेरे आंचल की तरह! आह! कसा अनुवाद करणार या ओळीचा! "Great Power Comes With Great Responsibilities"

In reply to by ज्ञानेश...

तीन्ही शेर आवडले. तरउतामा (terutama-खास करून) "काबे से सनमखाने"वाला! [भाषा इंडोनेशियात उतामा (उत्तम) वरून तरउतामा (सर्वोत्तम, खास करून) असा शब्द आहे!] सुधीर ------------------------ हे भगवंता, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!

चांगला लेख, सर्वच शेर आवडले. धाग्याची कल्पना चांगली वाटतेय. एकंदरीत आपला उर्दु साहित्याचा दांडगा अभ्यास दिसतोय. नंदू

अजून उत्तमोत्तम शेर - शायरीची वाट बघतोय ! धन्यवाद सुधीरकाका आणि ज्ञानेश.

वर्ना क्या था सिर्फ तरतीब ए अनासिर के सिवा (तरतीब ए अनासिर: पंच महाभूतांचा समुच्चय) खास कुछ बेताबीआँका नाम इंसान हो गया याचा अर्थ असा की : या दुनियेमध्ये किड्या मुंग्यांसारखे अनेक प्राणी आहेत. त्यांमध्ये व मानवात फरक तो काय? फरक असा आहे की : आपल्या व्यथांच्या सौंदर्यावर मुग्ध होण्याचे सामर्थ्य ज्या प्राण्यामध्ये आहे, त्याला मानव असे म्हणतात. (खास कुछ बेताबीआँका नाम इंसान हो गया) नितीन

बहोत खूब ...मजा आया !! लगे रहो .. मिलनेका वादा तो उनके मूंहसे निकलही गया .. पूछीं जो जगह मैंने , हंसके कहेने लगे..ख्वाबमें .. कळस !!

In reply to by कळस

सुरेख! मस्त!! पोरी पोरांना अशीच 'शेंडी' लावतात, नाहीं का? सुधीर ------------------------ हे भगवंता, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!

काळे साहेब अश्या धाग्याची संकल्पना खरच छान आहे. आवडलं... होउन जाउदे शेरो शायरी.. जगजीत प्रेमी

परवीन शाकीरचे हे दोन शेर वाचा: उंगलियोंको तराश दूँ फिरभी (तराशना=तासणे) आदतसे उसका नाम लिख्खेंगी माझा (दुरावलेला) प्रियकर माझ्यात इतका भिनलेला आहे, कीं मी जरी माझी बोटें तासली तरी संवयीने ती (बोटें) त्याचेच नाव लिहीत रहातील जुस्तजू खोये हुओंकी उम्रभर करते रहे (जुस्तजू=शोध) चॉंदके हमराह हम, हर शब सफर करते रहे (हमराह=सहप्रवासी, शब=रात्र) याचा अर्थ सरळ आहे! प्रियकराच्या आठवणींत तिला रात्र-रात्र झोप लागली नाहीं, "वो रातभर करवटे बदलते रहे"| सुप्रसिद्ध अभिनेत्री मरहूम मीनाकुमारी 'गझला' लिहीत असत. त्यातली ही गझल माझ्या आवडीची आहे. मौतही इन्सानका दुष्मन नहीं जिन्दगीभी अक्सर जान ले जाती है! ------------------------ हे भगवंता, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!

In reply to by सुधीर काळे

मौतही इन्सानका दुष्मन नहीं जिन्दगीभी अक्सर जान ले जाती है!
व्व्व्वा !! मिपावर का कुठेतरी वाचला होता हा.. लोग काटोंकी बाते करतें है ! हमने तो फुलोंसे जख्म खायें है !! अर्थ सोपा आणि बर्‍याचश्यांनी अनुभवलेला असल्याने अधिक स्पष्टीकरणाची गरज नसावी ;-) बाकी धागा झक्कासच..

In reply to by शाहरुख

लोग काटोंकी .. हा जो शेर आहे, त्यावरच शांताबाईंनी "काटा रुते कुणाला .. आक्रंददात कोणी, मज फूल ही रुतावे, हा दैवयोग आहे" हे लिहिलं. बुवांनी (पं. जितेंद्र अभिषेकी) ते अजरामर केलं.

सर्व शेर चढविणार्‍यांना: जिथे शक्य असेल तिथे कृपया शायर/शाइराचे नाव लिहावे. सुधीर ------------------------ हे भगवंता, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!

'जिस्म' या जॉन- बिपाशाच्या (वेगळ्या कारणांनी! ;) ) गाजलेल्या चित्रपटातली ही लक्षात राहिलेली शायरी- "गर्मी-ए हसरते- नाकाम से जल जाते है, हम चिरागों ही तरह शाम से जल जाते है!" (दिवसभरातल्या) अपूर्ण असलेल्या इच्छा/आकांक्षांच्या धगीने माझे मन पोळले जाते, ज्याप्रमाणे संध्याकाळ झाल्यावर दिवे जळू लागतात, अगदी तसेच! "शमा जिस आग में जलती है नुमाईश के लिये, हम उसी आग में गुमनाम से जल जाते है!" शमा (ज्योत) प्रसिद्धीसाठी ज्या आगीत जळते (म्हणजे ज्या आगीत जळाल्यावर तिला प्रसिद्धी मिळते), अगदी तशाच आगीत मीदेखील जळतो/ते.. पण माझी कुणी दखल घेत नाही. "जब भी आता है मेरा नाम तुम्हारे नाम के साथ, जाने क्यों लोग मेरे नाम से जल जाते है..!" अर्थ स्पष्ट आहे! "Great Power Comes With Great Responsibilities"

In reply to by ज्ञानेश...

तिसरा शेर मस्त आहे. आवडला. सुधीर ------------------------ हे भगवंता, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!

सर्वसमावेशक सर्वकालीन सत्य ... शायर फक्त कभि कभि म्हणतोय , पण ज्याने त्याने स्वतःच खोलवर जाऊन विचार करावा ... कभि कभि हमनें अपनेको बहलाया हैं जिन बातोंको खुद नहीं समझें, औरोंको समझाया हैं... दुनिया ह्यामुळेच तर चालली आहे.जो तो दुसर्‍याला ज्ञान शिकवित असतो ...माध्यम काहीही असेल.नाव काहीही असेल.. कोणी आत्मचरीत्र लिहिल, कोणी ब्लॉग तर कोणी धागा चालवेल..तर कोणी प्रतिक्रिया देईल..कोणी फुकटचे सल्ले देईल.दुसर्‍याला शिकवण्यात धन्यता वाटत असते ... नाहीतरी मी आता काय करतोय ? कळस !!

In reply to by कळस

किती खरं आहे! परवीन शाकीरच्या कांहींशा गंभीर शेरांनंतर आज एक गमतीदार शेर देतोय! एक गोष्ट सांगितली पाहिजे कीं उर्दू शायरीत स्त्रियांना खूप भाव असतो. खरं तर बरेचसे शेर स्त्री-केंद्रितच असतात, पण भूमिका मात्र वेगवेगळ्या! त्यांना कधी अत्युच्च मान दिला जातो, तर कधी त्यांच्यावर निर्दयतेचा आरोप केला जातो. (कधी-कधी हा प्रकार जास्तच होतो.) सांगायचे कारण हे कीं 'मिपा'वरील स्त्रियांनी हे लक्षात ठेवावे कीं बायका हा उर्दू शायरांचा weak point आहे व त्यांच्या या कमजोरीकडे दुर्लक्ष करून स्त्रियांसह सर्वांनी या तर्‍हेच्या काव्यांचा आनंद लुटावा. आजचा शेर असा आहे: उस शोलारूने, ताकि पसेमर्गभी जलूँ जलवाये दुष्मनोंसे मेरे गोरपर चिराग| (शायरः मोमीन) शोला रू म्हणजे तेजस्वी सुंदरी, a dazzling beauty ((शोला म्हणजे वणवा/आग व रू म्हणजे चेहरा); पसेमर्ग म्हणजे 'मरणोत्तर', गोर म्हणजे थडगे, कबर! शायर मोमीन म्हणतो कीं माझ्या रूपवती प्रेयसीने (जिच्यावर कवी एकतर्फा प्रेम करत होता) मी मरणोत्तरही 'जळावे' या हेतूने माझ्या थडग्यावर माझ्या वैर्‍यांकरवी पेटवलेले दिवे ठेवविले! सुधीर ------------------------ हे भगवंता, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!

In reply to by सुधीर काळे

गजल मुळातच स्त्रीलिंगी आहे. त्यामुळे त्यात स्त्रियांचे वर्णन ओघानेच येणार. मात्र काही विचारगर्भ,आशयघन आणि सामाजिक जाणिवेच्या गजला/शेर देखिल असतात. त्याही इथे पेश केल्या तर हरकत नाही. उदा. ही मो. इब्राहिम ’जौ़क’ ह्यांची गजल पाहा. अब तो घबराके ये कहते हैं के मर जायेंगे मर के भी चैन न पाया, तो किधर जायेंगे?... हम नही वो जो करे खू़न का दावा तुम पर बल्की पूछेगा खु़दा भी तो मुकर जायेंगे... शोला-ए-आह को बिजली की तरह चमकाऊँ पर मुझे डर है के वो देख के डर जायेंगे... ’जौ़क’ जो मदरसे के, बिगडे़ हुए है मुल्ला उनको मयखाने में ले आओ सँवर जायेंगे ही गजल इथे ऐका... ग़ज़लनवाज़ भीमराव पांचाळे ह्यांच्या आवाजात.
Get this widget | Track details | eSnips Social DNA
कुणी निंदा,कुणी वंदा! आम्ही जोपासतो चाली लावण्याच्या छंदा!!

In reply to by प्रमोद देव

व्वा! अगदी 'देवीय' (divine) गझल आहे. सुधीर ------------------------ हे भगवंता, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!

In reply to by ज्ञानेश...

अहो ज्ञानेश-जी, ती पोस्ट देवसाहेबांनी (श्री प्रमोद देव) पाठविली होती म्हणून मी 'देवीय' म्हटलं व कंसात divine असं लिहून ती एक 'कोटी' आहे असंही सुचवलं! सुधीर ------------------------ हे भगवंता, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!

In reply to by सुधीर काळे

माफ करा. विनोद कळला नाही. :S "Great Power Comes With Great Responsibilities"

In reply to by कळस

इथे 'बहलाना' चा अर्थ 'रिझवणे' असा नसून 'फसवणे' असा असावा. तो म्हणतोय की ...मलाच न कळलेल्या गोष्टी इतरांना समजावून मी कधी कधी स्वतःचीच फसवणूक करत आलोय! बरोबर आहे का? ह्यावरून 'हम प्यारमें जलनेवालोंको' ही मदन मोहनचं एक गाणं आठवलं...त्यातलं 'बहलाए' आठवलं. बेहलाए जब दिल नां बेहले, तो ऐसे बेहलाए... गम ही तो है प्यारकी दौलत ये कहकर समझाए... अपना मन छलनेवालोंको...चैन कहाँ...

In reply to by सुबक ठेंगणी

सुबक, झकास! बरोबर!! तुझं म्हणणं "इथे 'बहलाना' चा अर्थ 'रिझवणे' असा नसून 'फसवणे' असा असावा. तो म्हणतोय की ...मलाच न कळलेल्या गोष्टी इतरांना समजावून मी कधी कधी स्वतःचीच फसवणूक करत आलोय!" तर्कसंगत वाटतं. सुधीर ------------------------ हे भगवंता, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!

वाह !! क्या बात है . हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

धागा खूपच आवडला काळेकाका. धाग्यातले आणि प्रतिसादातले सगळेच शेर एकसे बढकर एक आहेत. माझ्याकडच्या छोट्याशा खजिन्यातली काही रत्नं एकेक करून इथे ठेवतेय. ही आहे अदा बदायुनी या कवयित्रीची एक रचना. होटों पे कभी उनके मेरा नाम ही आए आए तो सही, बर-सर-ए-इल्जाम ही आए त्या प्रियतमाच्या ओठी माझं नाव कधीतरी यावं, भलेही ते आरोपाच्या अनुषंगानं का येईना! त्यानं कोणत्याही निमित्तानं माझं नाव घ्यावं, हेच माझ्यासाठी महत्वाचं आहे! हैरान हैं, लब-बस्तः हैं, दिलगीर हैं गुंचे, खुशबू की जुबानी तेरा पैगाम ही आए कळ्या त्रस्त, मूक, उदास आहेत. सुगंधाच्या सोबत तुझा संदेश तरी यावा, [म्हणजे कळ्या खुलतील!] लम्हात-ए-मसर्रत हैं तसव्वुर से गुरेजां याद आए हैं जब भी, गम-ओ-आलाम ही आए आनंदाचे क्षण कल्पनेपासूनही दूर आहेत. [कल्पनेतही आनंदाचे क्षण आठवत नाहीत!] जेव्हा कधी आठवणी आल्या, त्या सगळ्या दु:खद क्षणांच्याच! या छोट्याशा सुरेख गझलचा भावार्थ जसा जमला, तसा लिहिला आहे. आणखी नवं काही त्यातून उलगडत असेल, तर अवश्य लिहावं. क्रान्ति अग्निसखा

क्रांतीताई, तीनही दु:खी भावनांबद्दलचे शेर अर्थपूर्ण असून हृदयाला स्पर्शून जातात. "रंजिशही सही, दिलको दुखानेके लिये आ" या मेहदी हसनने अजरामर केलेल्या गझलची आठवण करून देतात. (ती गझल बहुतेक सर्वांना माहीत असेलच. नाहीं तर नंतर कधीतरी पोस्ट करेन). त्यातल्या त्यात तिसरा शेर फारच छान आहे. (जेव्हा कधी आठवणी आल्या, त्या सगळ्या दु:खद क्षणांच्याच!) सुधीर ------------------------ हे भगवंता, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!

खिड़कियां बंद हैं, दीवारोंके सीने ठंडे पीठ फेरे हुए दरवाजोंके चेहेरे चुप हैं मेज़ कुर्सी हैं, के खामोशीके धब्बे धब्बे फर्श में दफ्न हैं सब आहटें सारे दिन की सारे माहौलपे तालेसे पडे हैं चुप के सारे माहौलपे पथराई हुई चुपसी लगी है तेरे आवाज़ की इक बूंद जो मिल जाए कहींसे रात बच जायेगी, ये आख़री सासों पे पडी है

In reply to by बहुगुणी

ये शेर बडा है मस्त-मस्त! खरंच गुलजारसाहेबाचा "जवाब नहीं"! सूचना: मागे लिहिल्याप्रमाणे शायर/शाईराचे नाव माहीत असल्यास जरूर लिहावे ही पुनश्च विनंती. आजचा एक हलका-फुलका पण अगदी हळुवार अर्थाचा बेखुद देहलवींचा शेर! कुछ हया, कुछ हिजाब, कुछ शोखी नीची नजरोंमें क्या नहीं होता? हया=लज्जा, हिजाब= (नखरेल) संकोच (coyness, coquettish), शोखी=चंचलता, खोडकरपणा (mischievousness) कांहींशी लज्जा, कांहींसा संकोच, कांहींसा खोडकरपणा खाली झुकलेल्या डोळ्यात काय नसतं? (सगळं असतं!) सुधीर ------------------------ गमका तूफाँ तो गुजरही जायेगा, बस मुस्कुरा देनेकी आदत चाहिये|

गझलेच मला नेहमी भुरळ पाडणार वैशीष्ठ म्हणजे त्यात आढळणारा विरोधाभास. त्याच एक उदाहरण इक बार दोस्तोंपे ज़रा एतबार कर फिर देख तेरी पीठ पे खंजर भी आयेगा । ................. अजून कच्चाच आहे.

क्रांतीताई, सुरेख आहे गझल! 'अहमद फराज' या माझ्या आवडत्या शायराची एक सोपी गझल देतो. (सोपी म्हणजे, उर्दू शब्द फारसे नसलेली.) "तेरी बातें ही सुनाने आए, दोस्त भी दिल ही दुखाने आए.. फूल खिलते है तो हम सोचते है, तेरे आनेके जमाने आए.. इश्क तनहा है सरे-मंजिले गम कौन ये बोझ उठाने आए? अब तो रोनेसे भी दिल दुखता है.. शायद अब होश ठिकाने आए क्या कोई फिर कोई बस्ती उजडी? लोग क्यों जश्न मनाने आए? सो रही मौत के पहलू मे 'फराज' नींद किस वक्त न जाने आए..." "Great Power Comes With Great Responsibilities"

इक बार दोस्तोंपे ज़रा एतबार कर, फिर देख तेरी पीठ पे खंजर भी आयेगा । आणि क्या कोई फिर कोई बस्ती उजडी? ('कोई' शब्द चुकून दोनदा आला आहे की मूळ शेरातही दोनदा आहे?), लोग क्यों जश्न मनाने आए? वा, सुरेख! पंकज उधासने गायलेली अशीच एक झकास गझल आठवली (शायरचे नाव आहे कैसर) यादोंका इक झौका आया हमसे मिलने बरसों बाद पहेले इतना रोये नहीं थे, जितना रोये बरसों बाद लम्हा-लम्हा घर उजडा है, मुश्किलसे एहसास हुआ (लम्हा=क्षण) पत्थर आये बरसों पहले शीशे टूटें बरसों बाद आज हमारी खाकपे दुनिया रोने धोने बैठि है (खाक=थडगे, र्‍हस्व ठि 'वृत्ता'साठी आहे) फूल हुए हैं जाने कैसे सस्ते इतने बरसों बाद क्या सोचती हो किसने तोडा, कैसे तोडा, क्यूँ तोडा ढूँढ रही हो क्या गलियोंमें दिलके टुकडे बरसों बाद दस्तककी उम्मीद लगाकर कबतक 'कैसर' बैठे हम (दस्तक=दारावरची थाप, टकटक) कलका वादा करनेवाले, मिलने आये बरसों बाद सुधीर ------------------------ गमका तूफाँ तो गुजरही जायेगा, बस मुस्कुरा देनेकी आदत चाहिये|

In reply to by सुधीर काळे

आज हमारी खाकपे दुनिया रोने धोने बैठि है फूल हुए हैं जाने कैसे सस्ते इतने बरसों बाद क्या बात है! (क्या कहीं फिर कोई बस्ति उजडी.. असे आहे ते.) "Great Power Comes With Great Responsibilities"

In reply to by सुधीर काळे

या चित्रपटातले गाणे आठवले दुश्मन न करे दोस्तने जो काम किया है। उम्रभरका गम जो हमें ईनाम दिया है।। शायराचे नांव मला ठाऊक नाही. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://anandghan.blogspot.com/

In reply to by आनंद घारे

हे गाणे 'देवर'मधले आहे का? "बहारोंने मेरा चमन लूटकर खिझाँको ये इल्जाम क्यूँ दे दिया?" अशी सुरुवात होणारे? सुधीर ------------------------ कटी रात सारी मेरी मयकदेमें खुदा याद आया सवेरे सवेरे!

In reply to by आनंद घारे

हे गाणे 'देवर'मधले आहे का? "बहारोंने मेरा चमन लूटकर खिझाँको ये इल्जाम क्यूँ दे दिया?" अशी सुरुवात होणारे? सुधीर ------------------------ कटी रात सारी मेरी मयकदेमें खुदा याद आया सवेरे सवेरे!

In reply to by सुधीर काळे

हे गाणे आखिर क्यूँ मधलेच आहे. यू ट्यूबवर इथे पहा पूर्ण गाणे असे आहे स्मिता पाटीलः दुश्मन न करे दोस्तने जो काम किया है। उम्रभरका गम हमें ईनाम दिया है।। तूफाँमें हमको छोडके साहिलपे आ गये । नाखुदाका हमने जिन्हे नाम दिया है।। पहले तो होश छीन लिये जुल्मोसितमसे । दीवानगीका फिर हमें इल्जाम दियाहै ।। राजेश खन्नाः अपनेही गिराते हैं नशेमनपे बिजलियाँ । गैरोंने आके फिरभी उसे थाम दिया है।। गाण्यातली यमके आणि प्रत्येक कडव्यातील दोन ओळीतला विरोधाभास पहाता मला तरी ही गजल असावी असे वाटते. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://anandghan.blogspot.com/

अर्थात मीनाकुमारीची ही एक गझल. आगाज़ तो होता है, अंजाम नहीं होता जब मेरी कहानी में वो नाम नहीं होता जब जुल्फ की कालिख में घुल जाए कोई राही, बदनाम सही लेकिन गुमनाम नहीं होता हंसहंसके जवां दिल के हम क्यों न चुने टुकडे? हर शख्स की किस्मत में ईनाम नहीं होता बहते हुए आंसू ने आंखों से कहा थमकर जो मय से पिघल जाए, वो जाम नहीं होता दिन डूबे हैं या डूबी बारात लिये कश्ती साहिल पे मगर कोई कोहराम नहीं होता! क्रान्ति अग्निसखा

ज्ञानेश-जी, सगळ्यात चांगला शेर निवडलात. पण "कलका वादा करनेवाले, मिलने आये बरसों बाद" ही ओळही मस्त आहे! एक चूक दुरुस्त करतो! क्या सोचती हो किसने तोडा, कैसे तोडा, क्यूँ तोडा ढूँढ रही हो क्या गलियोंमें दिलके टुकडे बरसों बाद हा शेर असा आहे भूल भी जाओ किसने तोडा, कैसे तोडा, क्यूँ तोडा ढूँढ रही हो क्या गलियोंमें दिलके टुकडे बरसों बाद चुकीबद्दल क्षमस्व! सुधीर ------------------------ गमका तूफाँ तो गुजरही जायेगा, बस मुस्कुरा देनेकी आदत चाहिये|

क्रांती-जी, जब जुल्फ की कालिख में घुल जाए कोई राही, बदनाम सही लेकिन गुमनाम नहीं होता आणि बहते हुए आंसू ने आंखों से कहा थमकर जो मय से पिघल जाए, वो जाम नहीं होता हे दोन शेर लाजवाब आहेत. सुधीर ------------------------ गमका तूफाँ तो गुजरही जायेगा, बस मुस्कुरा देनेकी आदत चाहिये|

इतका सुंदर धागा कसा 'मिस' केला? मी पण एकेका शेर वर लिहायचा विचार करत होतो, पण इतर कित्येक गोष्टींप्रमाणे ते राहूनच गेले. सध्या मला आठवणारे काही अहमद फराज ह्यांचे अशआर -
अब के हम बिछडे तो शायद कभी ख्बाबों मे मिले, जिस तरह सुखे हुए फूल किताबों मे मिले|
मी प्रेमात पडलो होतो पहिल्यांदा ह्या कल्पनेच्या. ह्या गजल मधले इतर अशआरही अती सुंदर आहेत.
अब न वो मै हूँ, न वो तू है; न वो माज़ी है ‘फराज़’, जैसे दो शख्स तमन्नाओं के सराबों मे मिले।
(माज़ी - भूतकाळ, सराब - भास) #२ सारखाच कतिल शिफाई ह्यांचा हा शेर -
दिल था इक शोला मगर बीत गयें दिन वो 'कतिल', अब कुरेदो न इसे, राख मे क्या रख्खा है|
अहमद फराज ह्यांचा अजून एक -
तुम तकल्लूफ को ही इकलाख समझते हो 'फराज', दोस्त होता नहीं हर हाथ मिलानेवाला|
(तकल्लूफ - औपचारीकता, इकलाख - सद्गुण, चांगिलपणा असा ठोबळ अर्थ घेता येईल) - मनिष (नुक्ता, अर्धचंद्र कसे करायचे?)

ग़=gaJ ज़=jaJ अर्धचंद्र कँ=kEM काँ=kOM बाकी चर्चा इथे वाचा. कुणी निंदा,कुणी वंदा! आम्ही जोपासतो चाली लावण्याच्या छंदा!!

माफ किजियेगा , काही शेर कोणाचे आहेत हे माहिती नाही. आठवले तसे लिहीले आहेत.पूरानीं यादें ताजा़ कर दी आप लोगोंने .. शिकायत किस जुबां से मैं करुं ,उनके न आने की यही एहसान क्या कम हैं कि मेरे दिलमें रहते हैं .. जुल्फ बिखरकें न आना तुम ज़नाजे पे मेरें रुह तडपेगी मेरी जुल्फें परेशां देखकर .. देखा किये वो मस्त निगाहोंसे बार -बार जब तक शराब न आए, कई दौर हो गए .. -शाद अजी़माबादी जान लेनी थी, साफ कह देते क्या ज़रुरत थी मुस्कुराने की .. - अनवर कळस !! मुस्कराना कली की आदत हैं, खून हो कर भी मुस्करायेगी ..

In reply to by कळस

जान लेनी थी, साफ कह देते क्या ज़रुरत थी मुस्कुराने की ..
क्या बात है.. बहोत खुब..

जान लेनी थी, साफ कह देते क्या ज़रुरत थी मुस्कुरानेकी? सुरेख! सुधीर ------------------------ गमका तूफाँ तो गुजरही जायेगा, बस मुस्कुरा देनेकी आदत चाहिये|

फराज़ चा अजून एक -
जिंदगी अपनेही कदमों पे चलती है फराज़, औरो के सहारे तो ज़नाजे़ उठा करते है|

In reply to by मनिष

मनिष-जी, शेर एकदम निवडक आहे. खूप आवडला. सुधीर ------------------------ गमका तूफाँ तो गुजरही जायेगा, बस मुस्कुरा देनेकी आदत चाहिये|

अब्रू न संवारो कहीं कट न जाये उंगली, (अब्रू=भिवई) नादान हो, तलवारसे खेला नहीं करते| (निजाम रामपुरी) शायर आपल्या प्रेमिकेच्या तलवारीसारख्या रेखीव भिवईकडे बघून म्हणतो: बोट फिरवून रेखू नकोस भिवई. बोट कापलं जाईल ना! अजून अजाण आहेस. कुणी असं तलवारीबरोबर खेळतं का? वाचकांनी 'अब्रू' (भिवई) आणि 'आबरू' (इज्जत) यामधील फरक लक्षात घ्यावा! सुधीर ------------------------ कटी रात सारी मेरी मयकदेमें खुदा याद आया सवेरे सवेरे!

In reply to by सुधीर काळे

मस्त शेर. सुकांत चंद्रानना पातली भ्रूधनु सरसावुनि... आठवले. भ्रू (संस्कृत), अब्रू (उर्दू) आणि brow (इंग्रजी) या साम्यामागचा कोणी उलगडा केल्यास फारच उत्तम.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी


सईद राही यांची खालील गझल सदाहरित प्रतीची आहे. 'ललत' रागात सुरावट बांधलेली ही गझल जगजीत सिंग गातात. ही माझी आवडती गझल असून ती मी खासगी बैठकींत बर्‍याचदा 'गातो'! माझं गायन 'भयंकर' असले तरी हे शेर इतके सुंदर आहेत कीं खूपदा श्रोते (त्या शेरांना) दाद देतात! वाचा तर ती गझल. कोई पास आया सवेरे सवेरे मुझे आजमाया सवेरे सवेरे.....धृ मेरी दास्ताँको जरासा बदलकर मुझेही सुनाया सवेरे सवेरे....१ जो कहता था कल शब सम्हलना सम्हलना (शब=रात्र) वही लडखडाया सवेरे सवेरे....२ कटी रात सारी मेरी मयकदेमें खुदा याद आया सवेरे सवेरे....३ यातील पहिल्या कडव्यातल्या बाबीचा अनुभव आपल्याला आपल्या व्यवसायिक आयुष्यात कधी-कधी येतो. आपली एकादी चांगली कल्पना आपण आपल्या (खडूस) बॉसला किंवा (खडूस) सहकार्‍याला सांगतो व ती कल्पना ढापून स्वतःची असं दडपून एकाद्या मीटिंगमध्ये त्यांच्याकडूनच आपल्यालाच ऐकायला मिळते तेंव्हां कसं "धन्य-धन्य" वाटते! सुधीर ------------------------ कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे! (मयकदा=दारूचा गुत्ता)

नसीम रिफ़अत ची ही अजून एक मस्त गज़ल. तमाम शहर में तनहा दिखाई देता है ये शख्स़ कितना अधुरा दिखाई देता है अब उसकी प्यास पानीसे बुझ नही सकती वो अपने खु़न का प्यासा दिखाई देता है जलाओ और जलाओ अभी लहू के च़राग अभी फ़जा मे अंधेरा दिखाई देता है मिटा दो दहर से ऐसी बलंदियो के निशां जहां से आदमी छोटा दिखाई देता है भीमरावांच्या आवाजात ही गजल ऐका.
Get this widget | Track details | eSnips Social DNA
कुणी निंदा,कुणी वंदा! आम्ही जोपासतो चाली लावण्याच्या छंदा!!

हर गीत को कह दो वो साज ना दे हर साज को कह दो वह राग ना दे दुनियावलो मुझे जीना आता है मौत से कह दो वह आवाज ना दे

काय भाऊ, कामात आहात जणू? दोन दिवस झाले. नवा शेर नाहीं आला म्हणुन विचारतोय! आता जरा चटक लागलीय! भापू

कितीतरी नवे, तर काही विस्मरणात गेलेले शेर, गझला या निमित्तानं वाचायला मिळताहेत! "ही एक सुरेख गझल. स्व. जयदेव यांनी संगीतबद्ध केलेली आणि आशाजींनी गायिलेली ही "ग़ालिब" यांची अजरामर गझल भैरवी रागात बांधलेली आहे. पर्शियन संगीताची झलक असलेल्या या गझलची अलौकिक गोडी ऐकूनच अनुभवावी! कभी नेकी भी उसके जी में गर आ जाए है मुझसे जफाएं करके अपनी याद शरमा जाए है मुझसे ख़ुदाया जज़्बा-ए-दिलकी मगर तासीर उल्टी है कि जितना खींचता हूं और खींचता जाए है मुझसे वो बदख़ू और मेरी दास्तान-ए-इश्क़ तूलानी इबारत मुख़्तसर, क़ासिद भी घबरा जाये है मुझसे उधर वो बदगुमानी है, इधर ये नातवानी है ना पूछा जाये है उससे, न बोला जाये है मुझसे सम्हलने दे मुझे ऐ नाउम्मीदी, क्या क़यामत है? कि दामान-ए-ख़याल-ए-यार छूटा जाए है मुझसे हुए हैं पाँव ही पहले नवर्द-ए-इश्क़ में ज़ख़्मी न भागा जाये है मुझसे, न ठहरा जाये है मुझसे क़यामत है कि होवे मुद्दई का हमसफ़र "ग़ालिब" वो काफिर जो ख़ुदा को भी न सौंपा जाए है मुझसे जफाएं :- जुलूम, अत्याचार. बदख़ू :- वाईट स्वभावाचा. तूलानी :- लांबलचक, कंटाळवाणी. इबारत :-मजकूर. मुख़्तसर :- थोडा, संक्षिप्त. बदगुमानी :-दुराग्रह. नातवानी :- दुर्बळपणा. नवर्द-ए-इश्क़ :- प्रेमातील मार्गक्रमण. मुद्दई :- शत्रू. क्रान्ति अग्निसखा

In reply to by क्रान्ति

क्रांतिजी, लतादिदींनी पण ही गझल गायली आहे. मला वाटतं दिदींनी गायलेली, आणि हृदयनाथांनी संगीत दिलेली ही चाल फारच छान आहे. अल्बमः 'लता सिंग्ज गालिब' गझलेच्या अर्थानुरूप गायलेल्या भावपूर्ण गझल्स. प्रत्येक गझलप्रेमीच्या संग्रहात असलाच पाहिजे असा अल्बम. My all time favourite. लता भक्त, नंदू

I must admit that I find Ghalib too difficult to understand because of his overuse of 'e' like in "दामान-ए-ख़याल-ए-यार"! मी तर गालिब वाचताना डिक्शनरी असूनही घामाघूम होऊन जातो! ज्या गझलियातांत किंवा अशियारांत खूप 'इ' किंवा 'ए' असतात त्या मी 'ऑप्शन'ला टाकतो! खरं तर 'इ' चा उपयोग मला कळलेलाच नाहीं. मुघल-ए-आझम मध्ये ए काय दर्शवतो? खरं तर त्याचा अर्थ "न्यायाचे मुघल" कीं "मुघलांचा न्याय" हेच कळत्र नाहीं. एका पाकिस्तानी मित्राच्या आईला मी हा प्रश्न विचारला. तीही घोटाळून गेली! कुणी जर उलगडून सांगितलं तर आभारी होईन! सुधीर ------------------------ कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे! (मयकदा=दारूचा गुत्ता)

In reply to by सुधीर काळे

माझ्या अंदाजाप्रमाणे इंग्रजीत लिहितात तसा (दर्देदिल म्हणजे दर्द ऑफ दिल म्हणजेच दिलाचा दर्द) असा नेहमी होतो, पण मुघलेआजमचा घोळ समजत नाही. कदाचित दोन्ही बाजूंनी विचार करून जो योग्य वाटेल तो घ्यायचा असेल. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://anandghan.blogspot.com/

In reply to by आनंद घारे

त्या पाकिस्तानी बाईने मला अगदी हेच सांगितले. मी तिच्याशी तिच्या मुलाच्या (माझ्या मित्राच्या) फोनवरून बोलत होतो. मग ती म्हणाली, "कभी घर आ जाना तो सामने-सामने जादा ठीकसे समझा पाऊंगी". त्यानंतर ते कुटुंब पाकिस्तानला परत गेले व हा मुद्दा तसाच राहिला! असो. माझ्यासारखाच गोंधळ इतरांनाही आहे हे वाचून अंमळ बरे वाटले हे मात्र खरे! आज शायर सीमाब यांचा एक छान शेर देत आहे. हम उस निगाहे-नाज़को समझे थे नेशतर (निगाहे-नाज़=चंचल नजर, नेशतर=टोचणारा) तुमने तो मुस्कुराके रगे-जाँ बना दिया! (रगे-जाँ= aorta, मुख्य रक्तवाहिनी) ------------------------ कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे! (मयकदा=दारूचा गुत्ता)

In reply to by सुधीर काळे

नमस्कार, आझमचा अर्थ महान. मुघल-ए-आझम म्हणजे मुघलांमधला सर्वात महान. चुकले असल्यास क्षमा असावी. जयंत कुलकर्णी.

In reply to by सुधीर काळे

मुघल - ए- आझम चा अर्थ. सबसे बेहतरीन मुघल संदर्भ : नॉट गॉन विथ द विंड विश्वास पाटील पृष्ठ २४०

In reply to by सुधीर काळे

मुघल - ए- आझम चा अर्थ. सबसे बेहतरीन मुघल संदर्भ : नॉट गॉन विथ द विंड विश्वास पाटील पृष्ठ २४०

दुवा आवडला. :) काळेकाका, खरंच गालिब वाचणं आणि समजणं कठीण आहे! त्यांचे बरेच शब्द डिक्शनरीच्या कक्षा ओलांडून जातात!! मला तर वाटतं, गालिबच्या गझल संगीतामुळे जास्त गाजल्या असाव्यात. तमाम संगीतकार, गायक, गायिका यांना त्या गझलांनी इतकी भुरळ घातली आहे, की एकेक गझल कित्येक वेळा वेगवेगळ्या तर्‍हांनी गायिली गेली आहे! ए किंवा ई हा प्रत्यय पण शब्दांच्या अर्थानुरूप जवळजवळ सगळ्या विभक्तींसाठी असतो, असं बरेचदा वाटतं! क्रान्ति अग्निसखा