लुटा 'लुत्फ' उर्दू गज़ल-अशयारांचा!
विशेष
एका ’इजिप्शियन’ सभासदाने मला अशी सूचना केली कीं मी दर वेळेला नवीन ’धागा’ सुरु न करता एकच धागा सुरू ठेवावा व तिथेच नवीन-नवीन गझला, शेर (खरं तर शेरचे वचन आहे 'अशयार') यांची वेळो-वेळी भर घालत जावे व तिथेच प्रतिसाद येऊ द्यावेत. यामुळे वाचकांना एकच धाग्यामागे जाणे सोपे पडेल व आपोआप चांगल्या शेरांचे एक झकास संकलनही होईल. ही कल्पना मला आवडली व आता हा धागा लोकांना आवडेल तितके दिवस किंवा याहून जास्त चांगली व्यवहार्य कल्पना सुचेपर्यंत चालू राहील. एकच उणी गोष्ट आहे की हा धागा 'ब्रॉडवे'सारखा लांsssब होईल. बघू कसे जमते ते!
सुरुवात करतो माझ्या सर्वात आवडत्या शाईरा मरहूम परवीन शाकीर या उर्दू कवियित्री पासून. कलेला सीमेचे बंधन नसते असे म्हटले जाते. जरी या विधानाशी मी १०० टक्के सहमत नसलो तरी एक अपवाद म्हणून मला त्यांचे शेर त्या पाकिस्तानी असूनही आवडतात. MA in English Literature अशा उच्चशिक्षित असलेल्या परवीनबाई पाकिस्तानी सरकारात सनदी नोकर होत्या.
त्यांचा पहिलाच काव्य संग्रह त्यांच्या वयाच्या २४ वर्षी प्रसिद्ध झाला व त्यावर रसिकांच्या उड्या पडल्या. त्यानंतर त्यांचे अनेक इतर काव्य संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. त्यांना पाकिस्तानी राष्ट्रपतीकडून Pride of performance हे उच्च सन्माननिदर्शक पदक मिळाले आहे. केवळ ४२ वर्षाच्या असताना कामावर जाताना त्यांच्या गाडीला अपघात झाला व त्यात त्या निधन पावल्या. नाहीं तर त्याना आता मिळाला आहे त्याहून खूप जास्त मान-मरातब नक्कीच मिळाला असता. मला त्यांचे शेर खूप आवडतात, पण उर्दू लिपी अद्याप येत नसल्याने आतापर्यंत त्यांचे फुटकळ देवनागरीत वाचायला मिळालेले शेर वाचूनच मी "दुधाची तहान ताकावर" भागवली आहे.
प्रणय-भावनांवर आधारित त्यांचे शेर जास्त करून शोकभावनेचे, प्रियकर-प्रेयसीच्या प्रेमभंगावर, ताटातुटीवर आधालेले असून फारच हृदयस्पर्शी आहेत. खाली दिलेले दोदिलेलेत्यांचे सर्वोत्तम शेर नाहींत पण छान आहेत.
आपल्या प्रियकराबद्दल बाई म्हणतात.....
हल हो गया है खूनमें कुछ ऐसे (हल होना=मिसळून जाणे, dissolved)
रग-रगमें वो नाम बह रहा है|
आणि या दुसर्या शेरात त्या म्हणतात की माझा प्रियकर कितीही निष्ठाहीन असो, कुठेही जावो, पण तो परत माझ्याकडे येतो ही त्याची चांगली गोष्ट आहे!
वो कहीं भी गया, लौटा तो मेरे पास आया
बस यही बात है अच्छी, मेरे हरजाई की| (हरजाई=निष्ठाहीन)
एक विनोदी शेर शेवटी देऊन आजची पोस्ट संपवतो
'दाग़' नावाचा शायर म्हणतो कीं....
जिसमें लाखों बरसकी हूरें हो (हूर=अप्सरा)
ऐसी जन्नतको क्या करें कोई? (जन्नत=स्वर्ग)
असो. आरामात बसा आणि मजा लुटा.
सुधीर
वाचन
70922
प्रतिक्रिया
220
अमा सुधीरमियाँ क्या खूब फरमाया!
इर्शाद!
माझी कशाला हरकत असेल?
वा भाऊ!
धन्यवाद
"काबे से सनमखाने"वाला भिडला!
फार छान
धागा आवडला
माझ्याकडून एक
लगे रहो ....
सुरेख
काळे साहेब
परवीन शाकीरचे दोन नवीन शेर
अतिसुंदर
झक्कास
लोग काटोंकी ..
कृपया शायर/शाइराचे नाव लिहावे
जिस्म!
तिसरा मस्त
सर्वसमावेशक सर्वकालीन सत्य ...
किती खरं
गजल-स्त्रीलिंगी
व्वा! अगदी 'देवीय' (divine) गझल आहे.
देवीय?
अहो
अच्छा अच्छा!
मला वाटतं...
झकास!
वाह
मस्त धागा!
तीनही अर्थपूर्ण शेर हृदयाला स्पर्शून जातात
गुलजा़र
ये शेर बडा है मस्त-मस्त!
बहुगुणी साहाब, बहोत बढीयाँ!
तरलता
क्रांतिजी, अतिशय सुंदर गजल!
विरोधाभास
सुंदर!
सुरेख!
वाह; जनाब!
आखिर क्यूँ
हे गाणे
हे गाणे
इथे पहा
इंदीवर शायर आहे
नाज़
ज्ञानेश-जी,
"जो मय से पिघल जाए, वो जाम नहीं होता" Wonderful!
अरे वा...
नुक्ता
माफ किजियेगा ...
व्वाह..
क्या ज़रुरत थी मुस्कुरानेकी?
धन्यवाद प्रमोड काका
मनिष-जी, शेर एकदम निवडक आहे. खूप आवडला.
'अब्रू'वरील एक गमतीदार शेर!
भ्रूधनु सरसावुनि
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
सईद राही
तमाम शहर में..
हर गीत को
नवा शेर नाहीं आला
खरंच
क्रांतिजी,
खरं तर 'इ' चा उपयोग मला कळलेलाच नाहीं!
इ म्हणजे ऑफ ?
त्या पाकिस्तानी बाईने मला अगदी हेच सांगितले होते!
मुघले आझम
मुघल-ए-आझम
मुघल-ए-आझम
धन्यवाद नंदू
ए/इ' चा अर्थ 'आणि' असाही होत असावा!
लतादिदींनी गायलेली एक सुंदर गजल..
हा धागा उर्दू भाषेच्या शब्दसौंदर्यांसाठी!
गाव्य?
चूक मान्य!
आजचा शेर "मंज़ूरेनजर"!
वा!
इल्तिजा
उफ्फ!
या गझलेतील इतर शेर असल्यास द्यावेत.
दोन परस्परविरोधी शेर
परवीन शाकिर
शकील बदायूनी
निकल जाये दम
मी 'गल्ली सोडून जा' म्हणाले होते, तर तू हा इहलोकच सोडून गेलास!
अश्रू
अहाहा....
व्वा क्रांतीताई! सुंदर शेर आहे तुम्ही आज दिलेला!
हा धागा मी
सुकूँपर्वर = शांतीपूर्ण, peaceful
शायर दाग़ यांचा हा सुरेख शेर वाचा!
शायर माहिरुल कादरी यांचा एक मस्त शेर
सीमाब अकबराबादी यांची रचना:
बर्याच दिवसांनी माझ्याझेरीज कुणी शेर टाकला त्यामुळं बरं वाटलं!
वा मजा आला
प्रेमाच्या त्रिकोनावरचा हा मस्त शेर वाचा!
बस इसी धुन
'आईना-ए-गझल'चा आणखी एक उपासक भेटल्याने माझी तबीयत खूष झाली एकदम!
गुलाम अलीने गायलेल्या एका ग़जलमधला रकीबचा उल्लेख वाचा!
कारण बासरीच्या अंगावर खूप भोकं (जखमा) असतात!
असाच एक
मस्तीत जगणार्या मनमौजींचे शेर
वा, मनिष-जी! मस्त.
छिद्र पाडणे
अर्थही फिट्ट बसतोय
माझी आवड-गालिब
या धाग्याने शतक ठोकले
+१०१ सहमत
मस्त!
उन्ही
बिमारका हाल अच्छा हैं..
माना कि इस
व्वा! परवीन शाकीरकी शायरीका जवाब नहीं!
कातिल तिल
कलभी तेरे रुखपे जिल था मगर कातिल न था
एका अज्ञात शायरचा शेर वाचा....
निदा फाजली
पेश है/
वाचा शायर हफी़ज़ मेरठी यांचा मस्त शेर!
चांद के साथ..
तामीर ...
हो..
आजचा शेर
Absolutely bad timing!
बडे धोके खाए
वा वा, शायर जयपाल!
पेश है/
पेश हैं
गुलाम
२६/११ हल्ल्यातील शहिदांना "आदरांजली"
अप्रतिम !
तुला इथे पहिल्यांदाच पाहून आनंद झाला.
या अज्ञात शायरला धन्यवाद
संगीन हकीक़त
एक आवडती गझल
ही गजल...
या माहितीबद्दल धन्यवाद, मनिष-जी
क्या बात
लाजवाब
मेहंदी हसन
असद
गुलाम अली यांनी गायलेली माझी एक आवडती गझल
ये कहानी
बहुदा बशीर बद्र यांचीच ही माझी आवडती गझल....
मस्त !
फस्ले बहारी
आजचे काही
चरागों को
शायर अक्रम क़मर यांचा हा सुंदर शेर वाचा!
कोणीच नाही ?
कोणीच नाहीं कसे? अरे, हम हैं ना!
हा घ्या अजून एक
देवाची आठवण येणे हा तारुण्याचा अपमान आहे? हाहाहा
अजून एक
फिराक गोरखपुरी यांचा एक झकास शेर वाचा!
वक्त
वेळ आहे खरा असा ओंजळीच्या बोटांमधून गळून नाहींसा होणारा!
प्रो. मंशा यांचा हा सुंदर शेर काय बहारदार आहे!
आज दोन
आवडाबाई, ऐत
दिलाय !!
माफ करा, माझं लक्षच गेलं नाहीं तुम्ही खाली दिलेल्या टिपेकडे!
एअतिराफ़
आंसू
गुलाम अली यांची एक गझल-
व्वा, ज्ञानेश-जी!
http://www.youtube.com/watch?v=IGqPpCleO1o
छोटे बहरकी गज़ल (पहर?)-अर्थ श्री. प्रमोद देव यांना माहीत असावा!
छान आहे!
'बाद-ए-सबा' म्हणजे सकाळची वार्याची मंद झुळूक!
तस्वीर
फीका चाँद !
राह्त इन्दोरी
'ये एक छोटे बहरकी गज़ल है' असा परिचय करून देतात गुलाम अली स्वतः!
जहां पेड पर चार दाने लगे...
वा वाहीदा!
वा वाहीदा!
कत्थई
आज के दौर में, ऐ खुदा यह मंजर क्यूं है ...
वर्ना हर आंख में, अश्कोंका समंदर क्यूं है
"टूटे सपने करते जाये नींदोंको बरबाद"
शायर चे नाव माहीत असेल तर ..
दुर्दैवाने ते मला आठवत नाहीं
माझ्या
परवीन शाकिरची एक शोख गझल
सगळेच शेर अर्थपूर्ण आहेत
वाह क्रांति,
'राहत इंदौरीं'चा एक मस्त शेर!
'जादू' या शब्दावर एक झकास शेर वाचा!
'आशिक' या शायरने लिहिलेला झकास शेर वाचा
परवीन शाकीर
परवीन शाकीर या माझ्याही अत्यंत आवडत्या शाईरा आहेत!
जोश मलिहाबादी
परवीन शाकीर या माझ्याही अत्यंत आवडत्या शाईरा आहेत!
क़ातिल शेर शुचिताई
हा शेर "आग़ा शाईर" यांचा आहे!
गमजा(नखरा)
'अदम' यवाचा!एक मस्त शेर वाचा!
'अदम' यांचा एक मस्त शेर वाचा!
पूरा दुख
सुरेख अशयार, शुचीताई!
ये इनायते
मेरी खैरीयत भी पूछी किसी और की जुबानी
ओमर खय्याम च्या रुबायांचे मराठीत रुपांतर
प्रतिसादाला जरा उशीर झाला याबद्दल क्षमस्व!
ओमर खय्याम च्या रुबायांचे मराठीत रुपांतर
मस्त !
शकील बदायुनींचा एक छान शेर वाचा
यह इष्क
शुचीताई,
एक-दो आँसू तो और आग लगा जाते हैं!
@ सुधीर काळे
जरासा व्यासंग आहे एवढेच!
माझी चिमूट
सुरेख निवड
आजचा शेर
फीके पड़ गए कपड़े वपड़े,
मस्त धागा.
लुटा 'लुत्फ' उर्दू गज़ल-अशयारांचा!
दुनिया