Skip to main content

लुटा 'लुत्फ' उर्दू गज़ल-अशयारांचा!

लेखक सुधीर काळे यांनी बुधवार, 21/10/2009 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
एका ’इजिप्शियन’ सभासदाने मला अशी सूचना केली कीं मी दर वेळेला नवीन ’धागा’ सुरु न करता एकच धागा सुरू ठेवावा व तिथेच नवीन-नवीन गझला, शेर (खरं तर शेरचे वचन आहे 'अशयार') यांची वेळो-वेळी भर घालत जावे व तिथेच प्रतिसाद येऊ द्यावेत. यामुळे वाचकांना एकच धाग्यामागे जाणे सोपे पडेल व आपोआप चांगल्या शेरांचे एक झकास संकलनही होईल. ही कल्पना मला आवडली व आता हा धागा लोकांना आवडेल तितके दिवस किंवा याहून जास्त चांगली व्यवहार्य कल्पना सुचेपर्यंत चालू राहील. एकच उणी गोष्ट आहे की हा धागा 'ब्रॉडवे'सारखा लांsssब होईल. बघू कसे जमते ते! सुरुवात करतो माझ्या सर्वात आवडत्या शाईरा मरहूम परवीन शाकीर या उर्दू कवियित्री पासून. कलेला सीमेचे बंधन नसते असे म्हटले जाते. जरी या विधानाशी मी १०० टक्के सहमत नसलो तरी एक अपवाद म्हणून मला त्यांचे शेर त्या पाकिस्तानी असूनही आवडतात. MA in English Literature अशा उच्चशिक्षित असलेल्या परवीनबाई पाकिस्तानी सरकारात सनदी नोकर होत्या. त्यांचा पहिलाच काव्य संग्रह त्यांच्या वयाच्या २४ वर्षी प्रसिद्ध झाला व त्यावर रसिकांच्या उड्या पडल्या. त्यानंतर त्यांचे अनेक इतर काव्य संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. त्यांना पाकिस्तानी राष्ट्रपतीकडून Pride of performance हे उच्च सन्माननिदर्शक पदक मिळाले आहे. केवळ ४२ वर्षाच्या असताना कामावर जाताना त्यांच्या गाडीला अपघात झाला व त्यात त्या निधन पावल्या. नाहीं तर त्याना आता मिळाला आहे त्याहून खूप जास्त मान-मरातब नक्कीच मिळाला असता. मला त्यांचे शेर खूप आवडतात, पण उर्दू लिपी अद्याप येत नसल्याने आतापर्यंत त्यांचे फुटकळ देवनागरीत वाचायला मिळालेले शेर वाचूनच मी "दुधाची तहान ताकावर" भागवली आहे. प्रणय-भावनांवर आधारित त्यांचे शेर जास्त करून शोकभावनेचे, प्रियकर-प्रेयसीच्या प्रेमभंगावर, ताटातुटीवर आधालेले असून फारच हृदयस्पर्शी आहेत. खाली दिलेले दोदिलेलेत्यांचे सर्वोत्तम शेर नाहींत पण छान आहेत. आपल्या प्रियकराबद्दल बाई म्हणतात..... हल हो गया है खूनमें कुछ ऐसे (हल होना=मिसळून जाणे, dissolved) रग-रगमें वो नाम बह रहा है| आणि या दुसर्‍या शेरात त्या म्हणतात की माझा प्रियकर कितीही निष्ठाहीन असो, कुठेही जावो, पण तो परत माझ्याकडे येतो ही त्याची चांगली गोष्ट आहे! वो कहीं भी गया, लौटा तो मेरे पास आया बस यही बात है अच्छी, मेरे हरजाई की| (हरजाई=निष्ठाहीन) एक विनोदी शेर शेवटी देऊन आजची पोस्ट संपवतो 'दाग़' नावाचा शायर म्हणतो कीं.... जिसमें लाखों बरसकी हूरें हो (हूर=अप्सरा) ऐसी जन्नतको क्या करें कोई? (जन्नत=स्वर्ग) असो. आरामात बसा आणि मजा लुटा. सुधीर

वाचने 71012
प्रतिक्रिया 220

प्रतिक्रिया

In reply to by क्रान्ति

खरं आहे. गझ़ल वाचतांना अशाही 'जागा' मला भेटल्या आहेत कीं जिथे 'ए/इ' चा अर्थ 'आणि' असाही होत असावा! आज शायर अदम यांचा एक गमतीदार शेर! मेरी और उसकी निगाहोंका तसादुम कुछ न पूछ (तसादुम=टक्कर, collision) बेखुदीमें आइनेसे आइना टकरा गया| (बेखुदी=निश्चेष्टता, senselessness, delirium) सुधीर ------------------------ कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे! (मयकदा=दारूचा गुत्ता)

हा धागा मी सुरू केला तो उर्दू भाषेतील शेर-शायरी व गज़लियातांच्या शब्दसौंदर्यांसाठी, गाव्यस्वरूपासाठी नव्हे. तरी माझी अशी विनंती आहे कीं गाणी न टाकता त्यातले शब्द लिहावेत. गाणी टाकायची असतील तर एक वेगळा गाव्य शायरीचा धागा सुरू करावा. ही एक नम्र विनंती आहे. सुधीर काळे ------------------------ कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे! (मयकदा=दारूचा गुत्ता)

In reply to by सुधीर काळे

'देवीय' प्रमाणेच हा शब्दही खटकला. यात काही श्लेष्/विनोद दडलाय का? अन्यथा स्वरबद्ध/संगीतबद्ध हे शब्द चालावेत.. "Great Power Comes With Great Responsibilities"

हा एक शायर हसरत मोहानी यांचा एक छान शेर आहे: थे पास तो मंज़ूरे-नज़र, राहते-दिल थे, अब जाने-तमन्ना हो,जो तुम हमसे जुदा हो! मंज़ूरे-नज़र=beloved, darling! सुधीर ------------------------ कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे! (मयकदा=दारूचा गुत्ता)

मस्त शेर! मज़हर इमाम यांची एक छोटीशी गझल एक गुजारिश है, बस इतना कीजिए जब कभी फुर्सत हो, आया कीजिए लोग इसका भी ग़लत मतलब न लें, अजनबी बनकर न देखा कीजिए खुद को अपनी आंख से देखा तो है, अब मेरी आंखॉ से देखा कीजिए इल्तिजा थी, एक सादा इल्तिजा, आप तनहाई में सोचा कीजिए ! क्रान्ति अग्निसखा

In reply to by क्रान्ति

क्रांतीताई, फारच सुंदर गज़ल आहे. "रंजिशही सही" या अजरामर गज़लची आठवण झाली! बर्‍याचदा एकाद्या शब्दाचा अर्थ माहीत नसतो. उदा. मलाही इल्तिजाचा (विनंती, प्रार्थना) हा अर्थ माहीत नव्हता. म्हणून मी देतो तसे "प्रथमदर्शनी" अवघड वाटणार्‍या शब्दांचा अर्थ देत जावे ही विनंती! इल्तिजाचा अर्थ डिक्शनरीत पहाताना हा शब्द वापरलेला फैज़ अहमद फैज़ यांचा एक शेर वाचनात आला.....! हिम्मते-इल्तिजा नहीं बाकी दर्दका हौसला नहीं बाकी ------------------------ कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे! (मयकदा=दारूचा गुत्ता)

In reply to by सुधीर काळे

हिम्मते-इल्तिजा नहीं बाकी दर्दका हौसला नहीं बाकी कातिल शेर आहे. या गझलेतील इतर शेर असल्यास द्यावेत. "Great Power Comes With Great Responsibilities"

In reply to by ज्ञानेश...

हे घ्या. हिम्मत ए इल्तिजा नहीं बाकी जब्त का हौसला नहीं बाकी । इक तेरी दीद छिन गई मुझसे वर्ना दुनिया में क्या नहीं बाकी । अपनी मश्क ए सितम से हाथ ना खेंच मैं नहीं या वफ़ा नहीं बाकी । तेरी चश्म ए आलम नवाज की खैर दिल में कोई गिला नहीं बाकी । हो चुका ख़त्म अहदे हिज्र ओ विसाल जिंदगी में मज़ा नहीं बाकी । -- फैज अहमद फैज.

दोन परस्परविरोधी व गमतीदार शेर देत आहे! पहिला शेर आहे शायर मजहर इमाम यांचा: छूके एक शक्सको देखा तो मुलम्मा निकला, उसको मैं कैसा समझता था, वो कैसा निकला! मुलम्मा=मुलामा, गिलिट, coating दुसरा आहे एका अज्ञात कवीचा! कुछ लोगोंसे जब तक न मुलाकात हुई थी मैंभी ये समझता था , खुदा सबसे बडा है! एक शेर आहे एकाद्या फालतू पण दिखाऊ माणसाचा व दुसरा आहे एकाद्या महान माणसाबद्दल! सुधीर ------------------------ कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे! (मयकदा=दारूचा गुत्ता)

यांचे काही शेर नुकतेच वाचनात आले. कांप उठती हूं मैं ये सोच के तनहाई में, मेरे चेहरे पे तेरा नाम न पढ़ ले कोई! उंगलियों को तराश दूं फिर भी आदतन् उसका नाम लिखेंगी! [तराशना - कापणे, आदतन् - सवयीने] अब तो इस राह से वो शख़्स गुजरता भी नहीं, अब किस उम्मीद पे दरवाजे से झांके कोई? क्रान्ति अग्निसखा

शकील बदायूनी यांचा एक झकास शेर वाचा! सुकूँ पाने लगा हूँ ग़मे-महब्बतमें कहाँ गयी मेरी बेताबियाँ, नहीं मालूम! सुकूँ = मनःशांती, संतोष, बेताबी = व्याकूळता, restlessness उपरोधिकपणे शायर म्हणतो: प्रेमभंगाच्या दु:खांतच मला मनःशांती मिळू लागली आहे माझ्या मनाची व्याकूळता कुठं गेली कुणास ठाऊक सुधीर ------------------------ कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे! (मयकदा=दारूचा गुत्ता)

In reply to by सुधीर काळे

जनाजा़ रोक के रोया,वो ईस अदा से बोले गली हमने कहीं थी , तुम तो दुनिया छोड जातें हो .. - सफी़ मुझे याद करनेसे ये बद्दुआ थी निकल जाये दम हिचाकियां आते आते ... कळस !! पूर्वी लोकांवर प्रेम केले जायचे , वस्तु वापरल्या जायच्या .. आता वस्तुंवर प्रेम केले जाते , लोक वापरले जातात ...

काय मस्त व अर्थपूर्ण शेर आहे! जनाजा़ रोक के रोया,वो ईस अदा से बोले (जनाजा=शवयात्रा) गली हमने कहीं थी , तुम तो दुनिया छोड जातें हो .. -------------------------- व्वा! एका पोरीनं तिच्यावर 'लाईन मारणार्‍या' तरुणाला "माझ्या गल्लीत पाऊल नाहीं टाकायचं" असा सज्जड दम मारल्यामुळे तो पोरगा हाय खाऊन मृत्यू पावला. त्यावर हा शेर आहे. ती बिचारी त्याच्या शवयात्रेत धाय मोकलून रडली व म्हणाली, "मी फक्त 'गल्ली सोडून जा' म्हणाले होते, तर तू या इहलोकालाच सोडून गेलास!" वा भाई वा! सुरेख!! सुधीर ------------------------ कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे!

बनून डोळ्यांत रहाणारा प्रियतम ही कल्पनाच किती वेगळी! इथे पहा ही कशी मांडली आहे. वो अश्क बनके मेरी चश्म-ए-तर में रहता है अजीब शख्स़ है, पानी के घर में रहता है! चश्म-ए-तर :- अश्रूभरले डोळे, शख्स़ :- व्यक्ती क्रान्ति अग्निसखा

In reply to by क्रान्ति

मस्तच आहे! :)
वो अश्क बनके मेरी चश्म-ए-तर में रहता है अजीब शख्स़ है, पानी के घर में रहता है!

In reply to by क्रान्ति

व्वा क्रांतीताई! सुंदर शेर आहे तुम्ही आज दिलेला! जय हो! सुधीर ------------------------ असेल हिंमत व आवड, तर ऐका हे मुळात पंकज उधासने गायलेले गीत! http://www.youtube.com/watch?v=4HUwuNk0Tc4

In reply to by सुधीर काळे

:T
हा धागा मी सुरू केला तो उर्दू भाषेतील शेर-शायरी व गज़लियातांच्या शब्दसौंदर्यांसाठी, गाव्यस्वरूपासाठी नव्हे. तरी माझी अशी विनंती आहे कीं गाणी न टाकता त्यातले शब्द लिहावेत. गाणी टाकायची असतील तर एक वेगळा गाव्य शायरीचा धागा सुरू करावा. ही एक नम्र विनंती आहे. सुधीर काळे
:?

शायर अजीज़ लिहितातः वो बज़्ममें थे तो हर साँस थी सुकूँपर्वर वो उठ गये तो उठी हैं कयामतें क्या क्या! बज़्म=महफिल, गाण्याची/काव्यगायनाची बैठक कयामत=प्रलय, doomsday शायर म्हणतातः ती (माझी प्रियतमा) बैठकीत हजर होती तोवर माझा प्रत्येक श्वास कसा शांतीपूर्ण होता. ती उठून गेली आणि जणू प्रलयच झाला! सुधीर ------------------------ असेल हिंमत व आवड, तर ऐका हे मुळात पंकज उधासने गायलेले गीत! http://www.youtube.com/watch?v=4HUwuNk0Tc4

शायर दाग़ यांचा हा सुरेख शेर वाचा! सारे शब्द सोपे आहेत!! (बंदगी म्हणजे प्रार्थना.) नाराज हो खुदा तो करें बंदगीसे खुश माशूक रूठ जाये तो क्यों कर मनाये हम! दाग़ सुधीर ------------------------ http://tinyurl.com/yg4oklu वर दिवाळीच्या निमित्ताने झालेल्या समारंभात मी गायलेले व की-बोर्डवर साथ दिलेले गीत ऐका!­

हा शायर माहिरुल कादरी यांचा एक मस्त शेर! उनके कूचेसे इक शाम गुजरा था मैं फिर यही रोजका मश्ग़ला बन गया! कूचा=गल्ली; मश्ग़ला=संवय एकदा मी तिच्या गल्लीतून एक चक्कर मारली आणि मग ती रोजची संवयच होऊन गेली सुधीर ------------------------ ही लिंक वाचा: http://tinyurl.com/yf7l59q

नामा गया कोई न कोई नामाबर गया तेरी ख़बर न आयी ज़माना गुजर गया [नामा = पत्र/संदेश, नामाबर= निरोप्या/संदेशवाहक] हंसता हुआ यूं की हिज्र की रातें गुजर गयीं रोता हुआ यूं की लुत्फ-ए-दुआ-ए-सहर गयीं [हिज्र- दुरावा, लुत्फ = आनंद, सहर = सकाळ] अब मुझको है करार तो सबको करार है दिल क्या ठहर गया के जमाना गुजर गया या रब नही मैं वाकिफ-ए-रुदाद-ए-जिंदगी इतना ही याद है की जिया और मर गया [वाकिफ = ओळख, रुदाद = गोष्ट]

व्वा, बहुगुणी-जी! शेवटचा शेर वाचून "खाया नहीं, पिया नहीं, खाली ग्लास तोडा, बारा आना"ची आठवण झाली! या रब नही मैं वाकिफ-ए-रुदाद-ए-जिंदगी इतना ही याद है की जिया और मर गया! बर्‍याच दिवसांनी माझ्याझेरीज कुणी शेर 'चढवला' त्यामुळं बरं वाटलं! सुधीर ------------------------ ही लिंक वाचा: http://tinyurl.com/yf7l59q

प्रेमाच्या त्रिकोनावरचा हा मस्त शेर वाचा! उस हूरवशका घर मुझे जन्नतसे है सिवा, लेकिन रकीब हो तो जहन्नमसे कम नहीं! (शायर: जौक) हूरवश=अप्सरेसमान सुंदर, सिवा= जास्त, जन्नत=स्वर्ग, रकीब=आपल्या प्रेयसीवर लाईन मारणारा ’तो दुसरा’! जहन्नम=नरक ------------------------ ही लिंक वाचा: http://tinyurl.com/yf7l59q

बस इसी धुन में रहा मर के मिलेगी जन्नत तुझको ऐ शैख़ न जीने का क़रीना आया/ (क़रीना= ढंग, रीत) अर्श मल्सियानी देखें क़रीब से भी तो अच्छा दिखाइ दे इक आदमी तो शहर में ऐसा दिखाइ दे/ ज़फ़र गोरखपुरी ज़रा मैं होश में आउं तो पूछूं अपने साकी़ से नज़र तौबाशिकन होती है या पैमाना होता है/ (तौबाशिकन= प्रतिज्ञा तोड्णारा) जलील माणिकपुरी सर्व शेर सौजन्य= आइना - ए- ग़ज़ल *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/ जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

In reply to by jaypal

पहिला व तिसरा असे दोन्ही शेर आवडले. आपल्या रूपात 'आईना-ए-गझल'चा आणखी एक उपासक भेटल्याने माझी तबीयत खूष झाली एकदम. सगळे जरी नसले तरी मी चढविलेले बरेचसे शेर त्या शब्दकोषातलेच आहेत! ते डॉ. विनय वाईकर व मरहूम सानी यांनी निवडून, गोळा करून संपादन केलेले आहेत. कांही थोडे त्यांचे स्वतःचेही आहेत. सुधीर ------------------------ ही लिंक वाचा: http://tinyurl.com/yf7l59q

कालच मी 'रकीब' या शब्दाचा अर्थ लिहिला होता (आपल्या प्रेयसीवर लाईन मारणारा "दुसरा"!) मुरली किंवा भज्जीचा "दूसरा" वेगळा. (The wrong'un)! त्याच्याशी या 'दूसरा'ची गल्लत नका करू! आज रकीबवरचा आणखी एक शेर वाचा! गुलाम अलीने गायलेल्या एका ग़जलमध्ये तो मी ऐकलेला आहे. तुम्हारे खतमें नया इक सलाम किसका था? न था रकीब तो आखिर वो नाम किसका था? प्रेयसीच्या पत्रात एकाद्या 'बापैगडी'च्या नावाचा वारंवार आलेला उल्लेख पाहून प्रियकर संशयाने विचारतोयः तुझ्या पत्रांत हा नवा सलाम कुणाचा आहे व तो जर 'दूसरा' नाहीं तर मग ते नाव कुणाचं आहे? काय 'सॉफ्ट' चौकशी आहे! सुधीर ------------------------ ही लिंक वाचा: http://tinyurl.com/yf7l59q

आज एक 'तुकडा' शेर वाचनात आला व आजपासून कांहीं दिवस मी त्या शेराला माझी 'सही' (सिग्नेचर) बनवणार आहे! सीना हो ज़ख्म ज़ख्म तो ढ़लते हैं कैसे गीत? फुर्सत अगर मिले तो कभी बाँसुरीसे पूछ! (ज़फ़र गोरखपुरी) छातीवर/हृदयावर जखमाच जखमा असतील तर कविता कशा सुचतील? कवी म्हणतो की कधी सवड झाली तर बासरीला विचार! (कारण तिच्या अंगावर खूप भोकं (जखमा) असतात तरी त्यातून सुरेल संगीत जसं बाहेर पडतं तशाच हृदय जखमी असलं तरी कविता सुचतातच!) सुधीर ------------------------ सीना हो ज़ख्म ज़ख्म तो ढलते हैं कैसे गीत? फुर्सत अगर मिले तो कभी बाँसुरीसे पूछ!

In reply to by सुधीर काळे

शेर कहा है, खून है दिलका; जो लब्जों मे बिखरा है दिलके जख्म दिखा कर हमने महफइल को बरमाया है| (फरहत शहजाद)

१: जिगर मुराराबादी यांचा एक गाजलेला व त्यामुळे गुळ्गुळीत झालेला हा शेर, तरीही स्वत्वाची भावना जपणारा म्हणून पुन्हा सांगावासा वाटतो : हमको मिटा सके ये जमानेंमें दम नहीं हमसे जमाना खुद है, जमानासे हम नहीं २: वो कौन हैं जिन्हे तौबा की मिल गयी फुर्सत हमें गुनाह भी करने को जिंदगी कम है शायर : पंडित आनंद नारायण 'मुल्ला' तौबा करना : (पाप न करण्याची) शपथ घेणे. गुनाह - शराब पिणे, सुंदर स्त्रियांच्या प्रेमात पडणे इत्यादी.

वा, मनिष-जी! मस्त. कुठे दडला होतात गेले कांहीं दिवस? पण 'बरमाया' या शब्दाचा बरोबर अर्थ सापडला नाहीं. सुधीर ------------------------ सीना हो ज़ख्म ज़ख्म तो ढलते हईं कैसे गीत? फुर्सत अगर मिले तो कभी बाँसुरीसे पूछ!

In reply to by सुधीर काळे

असा असावा, या माहितीवरून. त्या शेरात 'स्वतःची दु:खं दाखवून मैफिलीतल्या लोकांच्या हृदयाला घरं पाडली' असा अर्थ असावा काय?

In reply to by बहुगुणी

आपले म्हणणे तर्कशुद्ध वाटते. अर्थही फिट्ट बसतोय! सुधीर ------------------------ सीना हो ज़ख्म ज़ख्म तो ढलते हईं कैसे गीत? फुर्सत अगर मिले तो कभी बाँसुरीसे पूछ!

हुई जिनसे तवक्कू (expectation) खस्तगी (weakness)की दाद (justice) पाने की वो हमसे भी जियादा खस्ता-ए-तेग(sword)-ए-सितम निकले मुहब्बत मे नही है फर्क जीने और मरने का उसी को देखकर जीते हैं जिस काफिर पे दम निकले जरा कर जोर सीने पर, की तीर-ए-परसितम निकले जो वो निकले तो दिल निकले, जो दिल निकले तो दम निकले

या धाग्याने शतक ठोकले व प्रतिसाद आता तिसर्‍या पानावर गेले आहेत. त्यामुळे प्रतिसाद शोधायला आता दोन पाने ओलांडवे लागते आहे. सध्या मिपाच्या प्रतिसादांचे जे सेटिंग आहे त्यानुसार सगळ्यात शेवटचा (म्हणजेच नवा) प्रतिसाद सगळ्यात शेवटी येतो. एकाद्या धाग्याला प्रचंड प्रमाणावर प्रतिसाद असतील तर नूतनतम प्रतिसाद शोधायला दुसर्‍या किंवा तिसर्‍या पानावर जावे लागते. हे सेटिंग बदलून शेवटचा प्रतिसाद 'सर्व प्रथम' असे करता येईल का? येत असल्यास कसे करायचे हे सांगितल्यास खूप आभारी राहीन. तसेच New वर (क्लप्रतिसादावराअपला-an example of auto distortion. Can someone tell me why it happens with गमभन. मी हे इतर सभासदांनाही विचारले. त्यांनाही ही पीडा होतेच आहे.) तसेच New वर क्लिक केल्यास आपला संगणक आपल्याला थेट नव्या प्रतिसादावर नेत नाहीं. तसे झाल्यास लै बेश होईल. सुधीर काळे ------------------------ सीना हो ज़ख्म ज़ख्म तो ढलते हईं कैसे गीत? फुर्सत अगर मिले तो कभी बाँसुरीसे पूछ!

In reply to by सुधीर काळे

हे सेटिंग बदलून शेवटचा प्रतिसाद 'सर्व प्रथम' असे करता येईल का? येत असल्यास कसे करायचे हे सांगितल्यास खूप आभारी राहीन. तसेच New वर (क्लप्रतिसादावराअपला-an example of auto distortion. Can someone tell me why it happens with गमभन. मी हे इतर सभासदांनाही विचारले. त्यांनाही ही पीडा होतेच आहे.) तसेच New वर क्लिक केल्यास आपला संगणक आपल्याला थेट नव्या प्रतिसादावर नेत नाहीं. तसे झाल्यास लै बेश होईल. ~ वाहीदा

या रब नही मैं वाकिफ-ए-रुदाद-ए-जिंदगी इतना ही याद है की जिया और मर गया वा! क्या बात है! बशीर बद्र यांची एक गझल ये चराग बेनज़र है, ये सितारा बेजुबां है अभी तुझसे मिलता जुलता कोई दूसरा कहां है? वही शख़्स जिसपे अपने दिल-ओ-जां निसार कर दूं, वो अगर ख़फ़ा नहीं है, तो जरूर बदगुमां है! कभी पाके तुझको खोना, कभी खोके तुझको पाना, ये जनम जनम का रिश्ता तेरे मेरे दरमियां है उन्ही रास्तों ने जिनपर कभी तुम थे साथ मेरे, मुझे रोक रोक पूछा, "तेरा हमसफर कहां है?" बेनज़र :- आंधळा. [बेनझीर हा शब्दही कधी कधी बेनज़र असा देवनागरीमध्ये लिहिला जातो, पण त्याचा अर्थ अद्वितीय, अनुपम असा आहे. या शेरातला बेनज़र हा शब्द बे+नज़र म्हणजे दृष्टीहीन असा आहे.] बेजुबां :- मुका. बदगुमां :- संशयी, मनात गैरसमज बाळगणारा क्रान्ति अग्निसखा

उन्ही रास्तों ने जिनपर कभी तुम थे साथ मेरे, मुझे रोक रोक पूछा, "तेरा हमसफर कहां है?" छान! सुधीर ------------------------ सीना हो ज़ख्म ज़ख्म तो ढलते हईं कैसे गीत? फुर्सत अगर मिले तो कभी बाँसुरीसे पूछ!

In reply to by सुधीर काळे

उनके देखेंसे जो आती हैं मुँहपर रौनक, वो समझते हैं कि बिमारका हाल अच्छा हैं.. -गालिब वो दुश्मनीसे देखते , देखते तो हैं मै शाद हूं कि हूं तो किसी की निगाह में.. शाद = प्रसन्न नज़र फिर न की उस पें, दिल जिसका छिना मुहब्बत का ये भी हैं कोई करीना ? करीना = रीत ---------------------------------- कळस

माना कि इस ज़मीं को न गुलज़ार कर सके कुछ ख़ार कम तो कर गए, गुज़रे जिधर से हम/ ---------साहिर लुधियानवी (गुलज़ार=बगीचा, ख़ार=काटा/टे) हुस्न और इश्क़ में गर है तो मुश्किल एक है उस तरफ़ सारी खुदाइ है, इधर दिल एक है/ -------- अज़ीज़ लखनवी बडी़ मुद्दत से तनहा थे मेरे दुख खु़दाया मेरे आँसु रो गया कौन/---------- परवीन शाकिर (खु़दाया= हे देवा/भगवंता) *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/ जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

बडी़ मुद्दत से तनहा थे मेरे दुख खु़दाया मेरे आँसु रो गया कौन व्वा! परवीन शाकीरकी शायरीका जवाब नहीं! ------------------------ सीना हो ज़ख्म ज़ख्म तो ढलते हैं कैसे गीत? फुर्सत अगर मिले तो कभी बाँसुरीसे पूछ!

आपली बालमैत्रिण १६वा सालकी होतेही शायराचा अंदाज कसा बदलतो पहा. धन्यवाद सुधीरजी, घाईत टंकल्यामुळे चूक झाली, दुरुस्त करीत आहे. वो थे लडकपन के दिन और ये जवानी की बहार कलभी तेरे रुखपे तिल था मगर कातिल न था नितीन

शेर मस्त! पण चुकून 'ति'चा 'जि' झालेला दिसतोय! सुधीर ------------------------ सीना हो ज़ख्म ज़ख्म तो ढलते हैं कैसे गीत? फुर्सत अगर मिले तो कभी बाँसुरीसे पूछ!

एक अज्ञात शायर लिहितो: नाहक है गिला हमसे, बेजा ये शिकायत है, हम लौटके आ जाते, आवाज तो दी होती! नाहक=व्यर्थ, unjust. गिला=तक्रार, बेजा=अनुचित ------------------------ सुधीर काळे, जकार्ता

निदा फाजली यांचे काही अशआर (शेर चे बहुवचन) - (सोपे आहेत. म्हणून अर्थ देत नाही)
बच्चो के छोटे हाथों को चांद सितारे छुने दो, चार किताबें पढकर वो भी हम जैसे हो जायेंगे|
हा माझा अतिशय आवडता (माझ्या ब्लॉगवर दिलेला) -
धुप मे निकलो, घटाओं मे नहाकर देखो, जिंदगी क्या है, ये किताबों को हटाकर देखो|
अजून काही -
हर तरफ, हर जगह बेशुमार आदमी, फिर भी तनहाईयों का शिकार आदमी|
(अशक्य आहे हा!) हा त्यांचा एक अजून सुंदर शेर -
सबकी पुजा एकसी, अलग अलग हर रीत, मस्जिद जाये मौलवी, कोयल गायें गीत|
ह्यांचे पुस्तक देवनागिरीत शोधून थकलोय, पण मिळत नाही! :( पण जेवढे वाचले/ऐकले त्यावरून निदा फाजली खूप आवडलेत.

१. लोग, लोगों का खुन पीते है हमने तो सिर्फ़ मैकशी की है/-----नरेश कुमार शाद २. उसे भी देखा है खंजर ख़रीदते मैंने वो आदमी जो बहोत मोतबार सा लगता है/---- अह्सन निशात (मोतबार= विश्वास पात्र) ३. मोतरिज़ कौन जफ़ाओं पे तुम्हरी होगा हुस्न वालों का हर इक ऐब हुनर होता है/----- हाफ़िज अन्वर (मोतरिज़ = हरकत घेणारा) ४. मेरे मौला, मेरी आखों में समुंदर दे दे चार बुंदों से गुजारा नहीं होगा मुझसे /----- इश्रत किरतपुरी (मौला= स्वामी , इश्वर) ५. माझा आवडता शेर उजाले अपनी यादों के हमरे साथ रहने दो न जाने किस गली में ज़िंदगी की शाम हो जाए / ---- बशीर बद्र *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/ जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

वाचा शायर हफी़ज़ मेरठी यांचा मस्त शेर! शीशा टूटे ग़ुल मच जाये दिल टूटे आवाज न आये| ================= खालील शेर खास आवडले! मोतरिज़ कौन जफ़ाओं पे तुम्हरी होगा हुस्न वालों का हर इक ऐब हुनर होता है हर तरफ, हर जगह बेशुमार आदमी, फिर भी तनहाईयों का शिकार आदमी| सबकी पुजा एकसी, अलग अलग हर रीत, मस्जिद जाये मौलवी, कोयल गायें गीत| ------------------------ सुधीर काळे, जकार्ता

जगजित सिंगने गायलेली ही एक गझल- (शायर माहित नाही.) चांद के साथ कई दर्द पुराने निकले.. कितने गम थे जो तेरे गम के बहाने निकले.. दश्ते-तनहाई-ए हिज्रा में खडा सोचता हूं.. हाये क्या लोग मेरा साथ निभाने निकले! (दश्ते-तनहाई-ए हिज्रा= [विरहामुळे आलेल्या] एकटेपणाच्या अंगणात) दिल ने ईक इंट से तामिर किया ताजमहल.. तूने ईक बात कहीं.. लाख फसाने निकले ! (तामिर= प्लॅन करणे) "Great Power Comes With Great Responsibilities"

तामीर - निर्माण असा अर्थ आहे. एक शेर बघा...
चंद वहमो पर न रख्खो फिक्र-ओ-अमल की बुनियाद, सिर्फ बुनियाद बदलनेसे तामीर बदल जाती है!
बुनियाद - पाया फिक्र-ओ-अमल - जे अमलात आणले जाणार आहेत तामीर - निर्माण

In reply to by मनिष

हा अर्थही योग्य आहे. एकंदर तामीर करणे म्हणजे योजना आखणे, आराखडा बनवणे, एखाद्या निर्माणाच्या दृष्टीने जुळवाजुळव करणे.. असा काहीसा अर्थ असावा. स्वतः जगजित या गझलेत तामिर करना= प्लान करना से म्हणतो. (उर्दूत एका शब्दाच्या अनेक अर्थच्छटा असाव्यात, असे बर्‍याचदा वाटते.) "Great Power Comes With Great Responsibilities"

कहाँ मयख़ानेका दरवाजा और कहा वाईज़ मगर इतना जानते के वो जाताथा के हम निकले
मिर्ज़ा ग़ालिब

In reply to by नितीनमहाजन

Absolutely bad timing of the "वाइज"! ------------------------ सुधीर काळे, जकार्ता

बडे धोखे खाए अपनोंसे जयपाल सुनकर दास्तां दुश्मन भी फुंट पडे ------- जयपाल *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/ जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

दिल अभी पुरी तरह टुटा नही दोस्तों की मेहरबानी चाहीये/ ------- अदम न ठहरना ही मुनासीब न उठके जाना ही बुलाके घर में हमें मेज़बान भुल गया/ --------जमील युसुफ खुशी से आग लगाओ कि इस महल्ले में मेरा मकां ही नही है तुम्हारा घर भी है/------------ मज़हर इमाम __________________________________________________ दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/ जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

शेख़की क्या जिंदगानी गुजरी, बेचारेकी एक शाम न सुहानी गुजरी ज़न्नतकी दुआओमें जवानी बीती, दोज़ख़ के डरसे बुढ़ापा बीता
शेख़ : धर्मगुरू ज़न्नत : स्वर्ग दोज़ख़ : नरक ____________________ नितीन

गुलाम अलीने गायलेली एक गझल माझी आवडती गझल आहे त्यातला हा बहारदार शेर वाचा: इरादा था तरके मुहब्बतका लेकिन फरेब-ए-तबस्सुममें फिर आ गये हम अभी खाके ठोकर सम्हलने न पाये लो फिर खायी ठोकर सम्हलते सम्हलते तरके मुहब्बत= मुहब्बत न करनेका फरेब-ए-तबस्सुम=स्मित हास्याच्या फसवणुकीत ------------------------ सुधीर काळे, जकार्ता (सध्या पुणे)

कभी तिरंगे को सिने से लगा लेना/ कभि दो बुंद आसु धरती पे गीरा देना/ जिनकी कुर्बानियोंसे झिंदा हो, कभि उनकी तस्विर के सामने झुककर उन्हे भी याद करना/----------------------- मोबाईल वर आलेला एस.एम.एस. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

In reply to by jaypal

जिनकी कुर्बानियोंसे झिंदा हो, कभि उनकी तस्विर के सामने झुककर उन्हे भी याद करना सगळे शब्द संपले !! नि:शब्द ...स्तब्द !! ~ वाहीदा

In reply to by वाहीदा

वाहीदा, तुला इथे पहिल्यांदाच पाहून आनंद झाला. शुभाशिर्वाद. काका॑ ------------------------ सुधीर काळे, सध्या फेअरफॅक्स, व्हर्जीनिया येथे मुक्काम

In reply to by jaypal

जयपाल-जी, सुरेख! या अज्ञात शायरला धन्यवाद व हा SMS इथे लिहिल्याबद्दल आपल्याला! ------------------------ सुधीर काळे, सध्या फेअरफॅक्स, व्हर्जीनिया येथे मुक्काम

आसाँ नही इस जहाँ में ख्वाबोंके सहारे जीना संग़ीन हकीक़त है ये दुनिया ये कोई सुनहरा ख्वाब नही
नितीन

बर्‍याच दिवसांनी नेटवर आलोय्! जगजीत सिंग यांनी गायिलेली ही गझल मला खूप आवडते! (शायर आता आठवत नाहीं) चराग आफताब गुम बडी हसीन रात थी शबाबकी नकाब गुम (नकाब=बुरखा) बडी हसीन रात थी (ध्रु) मुझे पिला रहे थे वो कि खुदही शम्मा बुझ गयी गिलास गुम शराब गुम बडी हसीन रात थी (१) लिखा था जिस किताबमें कि इश्क तो हराम है हुई वही किताब गुम बडी हसीन रात थी (२) लबसे लब जो मिल गये (लब=ओठ) लबसे लब जो सिल गये सवाल गुम जवाब गुम बडी हसीन रात थी (३) ही गझल मी मित्रांच्या मेहफिलमध्ये म्हणतो व तिला बर्‍यापैकी रिस्पॉन्स मिळतो. ------------------------ सुधीर काळे, जकार्ता

In reply to by मनिष

ही गजल सुदर्शन फाकी'र ह्यांची आहे.>> या माहितीबद्दल धन्यवाद, मनिष-जी ------------------------ सुधीर काळे, सध्या फेअरफॅक्स, व्हर्जीनिया येथे मुक्काम

In reply to by सुधीर काळे

क्या बात है!!! वल्ला!! *********************************** हॅपीनेस चूझेस इट्स ओन टाइम.

लबसे लब जो मिल गये (लब=ओठ) लबसे लब जो सिल गये सवाल गुम जवाब गुम बडी हसीन रात थी
नितीन

मेहंदी हसन यांनी गायलेली एक गज़ल. याची सुरुवात अशी होते:
वो थके थके से हौसले, जो शबाब बनके मचल गये वो नज़र नज़रके गले मिले, के बुझे चिराग़ भी जल उठे.
शायर माहित नाही. सर्व ग़ज़ल अप्रतीमच आहे. पण अनेक दिवसांत न ऐकल्यामुळे मला आठवत नाही. नितीन