Skip to main content

लुटा 'लुत्फ' उर्दू गज़ल-अशयारांचा!

लेखक सुधीर काळे यांनी बुधवार, 21/10/2009 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
एका ’इजिप्शियन’ सभासदाने मला अशी सूचना केली कीं मी दर वेळेला नवीन ’धागा’ सुरु न करता एकच धागा सुरू ठेवावा व तिथेच नवीन-नवीन गझला, शेर (खरं तर शेरचे वचन आहे 'अशयार') यांची वेळो-वेळी भर घालत जावे व तिथेच प्रतिसाद येऊ द्यावेत. यामुळे वाचकांना एकच धाग्यामागे जाणे सोपे पडेल व आपोआप चांगल्या शेरांचे एक झकास संकलनही होईल. ही कल्पना मला आवडली व आता हा धागा लोकांना आवडेल तितके दिवस किंवा याहून जास्त चांगली व्यवहार्य कल्पना सुचेपर्यंत चालू राहील. एकच उणी गोष्ट आहे की हा धागा 'ब्रॉडवे'सारखा लांsssब होईल. बघू कसे जमते ते! सुरुवात करतो माझ्या सर्वात आवडत्या शाईरा मरहूम परवीन शाकीर या उर्दू कवियित्री पासून. कलेला सीमेचे बंधन नसते असे म्हटले जाते. जरी या विधानाशी मी १०० टक्के सहमत नसलो तरी एक अपवाद म्हणून मला त्यांचे शेर त्या पाकिस्तानी असूनही आवडतात. MA in English Literature अशा उच्चशिक्षित असलेल्या परवीनबाई पाकिस्तानी सरकारात सनदी नोकर होत्या. त्यांचा पहिलाच काव्य संग्रह त्यांच्या वयाच्या २४ वर्षी प्रसिद्ध झाला व त्यावर रसिकांच्या उड्या पडल्या. त्यानंतर त्यांचे अनेक इतर काव्य संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. त्यांना पाकिस्तानी राष्ट्रपतीकडून Pride of performance हे उच्च सन्माननिदर्शक पदक मिळाले आहे. केवळ ४२ वर्षाच्या असताना कामावर जाताना त्यांच्या गाडीला अपघात झाला व त्यात त्या निधन पावल्या. नाहीं तर त्याना आता मिळाला आहे त्याहून खूप जास्त मान-मरातब नक्कीच मिळाला असता. मला त्यांचे शेर खूप आवडतात, पण उर्दू लिपी अद्याप येत नसल्याने आतापर्यंत त्यांचे फुटकळ देवनागरीत वाचायला मिळालेले शेर वाचूनच मी "दुधाची तहान ताकावर" भागवली आहे. प्रणय-भावनांवर आधारित त्यांचे शेर जास्त करून शोकभावनेचे, प्रियकर-प्रेयसीच्या प्रेमभंगावर, ताटातुटीवर आधालेले असून फारच हृदयस्पर्शी आहेत. खाली दिलेले दोदिलेलेत्यांचे सर्वोत्तम शेर नाहींत पण छान आहेत. आपल्या प्रियकराबद्दल बाई म्हणतात..... हल हो गया है खूनमें कुछ ऐसे (हल होना=मिसळून जाणे, dissolved) रग-रगमें वो नाम बह रहा है| आणि या दुसर्‍या शेरात त्या म्हणतात की माझा प्रियकर कितीही निष्ठाहीन असो, कुठेही जावो, पण तो परत माझ्याकडे येतो ही त्याची चांगली गोष्ट आहे! वो कहीं भी गया, लौटा तो मेरे पास आया बस यही बात है अच्छी, मेरे हरजाई की| (हरजाई=निष्ठाहीन) एक विनोदी शेर शेवटी देऊन आजची पोस्ट संपवतो 'दाग़' नावाचा शायर म्हणतो कीं.... जिसमें लाखों बरसकी हूरें हो (हूर=अप्सरा) ऐसी जन्नतको क्या करें कोई? (जन्नत=स्वर्ग) असो. आरामात बसा आणि मजा लुटा. सुधीर

वाचने 71012
प्रतिक्रिया 220

प्रतिक्रिया

बदायुनी यांचा एक मस्त शेर बिछडके तुझसे किसी दूसरे पे मरना है ये तजर्बा भी इसी जिंदगी में करना है! आणि हा कुणाचा आहे, माहीत नाही, पण खासच आहे. ख्वाब ही ख्वाब कबतलक देखूं? काश तुझको भी इक झलक देखूं! क्रान्ति अग्निसखा

हमको किसके गमने मारा, ये कहानी फिर सही किसने तोडा दिल हमारा, ये कहानी फिर सही ॥ध्रु॥ नफरतोंके तीर खाकर दोस्तोंके शहरमें, हमने किसकिसको पुकारा, ये कहानी फिर सही ॥१॥ क्या बतायें प्यारकी बाजी वफाकी राहमें कौन जीता कौन हारा ये कहानी फिर सही ॥२॥ दिलके टुटनेका सबब पूछो न सबके सामने नाम आयेगा तुम्हारा, ये कहानी फिर सही ॥३॥ जवळच्या मित्र मंडळीत ही गझलही मी कधी-कधी गातो. ------------------------ सुधीर काळे, सध्या फ्रेंमाँट, कॅलिफोर्निया येथे मुक्काम

मला पण खूप आवडते. बशीर बद्र यांचा एक जबरदस्त शेर चमकती है कहीं सदियों से आंसुओं से जमीं ग़ज़ल के शेर कहां रोज रोज होते हैं? क्रान्ति अग्निसखा

गझलसम्राट गुलाम अली यांनी गायलेली ही गझल माझ्या माहितीच्या गझलियातमधली आवडली गझल आहे. तिचे शब्द आहेतः शायर: (नक्की माहीत नाहीं, पण बहुदा) बशीर बद्र साहिब ऐ हुस्न-ए-बेपरवा तुझे (हुस्न=लावण्य) शबनम कहूँ शोला कहूँ (शबनम=दंव, शोला=वणवा) फूलोंमेंभी शोखी तो है (शोखी=खट्याळपणा) किसको मगर तुझसा कहूँ गेसू उडे महकी फजा (गेसू=केस, महक=सुगंध, फजा=वातावरण) जादू करे ऑंखें तेरी सोया हुआ मंझर कहूँ (मंझर=दृश्य, देखावा) या जागता सपना कहूँ चंदाकी तू है चाँदनी लेहरोंकी तू है रागनी (रागनी=सुर, राग) जाने तमन्ना मैं तुझे क्या क्या कहूँ क्या ना कहूँ या दुव्यावर ऐकूही शकता. अनेक गझलियात तिथे आहेत पण ही पहिलीच गझल आहे तिथे. http://ekfankaar.wordpress.com/category/artist/ghulam-ali/ ------------------------ सुधीर काळे, सध्या फ्रेंमाँट, कॅलिफोर्निया येथे मुक्काम

वाचा फस्ले बहारीवरील (वसंत ऋतू) जलील माणिकपुरींचा एक सुंदर शेर. 'जलील' फस्लेबहारीकी देखिये तासीर! (तासीर=प्रभाव) गिरी जो बूँद घटासे, शराब हो के रही| ------------------------ सुधीर काळे, Back to Jakarta on 6th! जरा हटके, जरा बचके, ये जकार्ता मेरी जान!

अश्क से तर है फूल की हर एक पंखडी रोया है कौन थाम के दामन बहार का चरागों को आंखों में महफूज रखना बडी दूर तक रात ही रात होगी मुसाफिर हैं हम भी मुसाफिर हो तुम भी किसी मोडपर फिर मुलाकात होगी आणि माझा आवडता एक- जब मिली आंख होश खो बैठे कितने हाजिर जवाब हैं हम लोग -- जिगर

चरागों को आंखों में महफूज रखना बडी दूर तक रात ही रात होगी व्वा! मजा आली! जब मिली आंख होश खो बैठे कितने हाजिर जवाब हैं हम लोग हाही शेर भावला! ------------------------ सुधीर काळे, "जरा हटके, जरा बचके, ये जकार्ता मेरी जान!"

'कमर' जहाँ मेरा उस चाँदने किया रोशन (जहाँ मेरा=माझी दुनिया) जो सब हसीनोंमें फर्मांरवाँओ जैसा है! (फर्मांरवाँ=बादशहा) शायर म्हणतो कीं ज्या चंद्रमुखीने (चाँद) माझी दुनिया प्रकाशमान केली ती सर्व सुंदर स्त्रियांची राणी शोभते! ------------------------ सुधीर काळे, "जरा हटके, जरा बचके, ये जकार्ता मेरी जान!"

आजपण कोणीच नाही ? बरं , हा घ्या एक छोटासा देखियेगा संभल के आईना सामना आज है मुकाबिल का - रियाज खैराबादी

In reply to by आवडाबाई

व्वा आवडाबाई, तुमची शेरांची निवड व त्यामागची रसिकता आवडली मला! हा घ्या शाकिर बानकोटी यांचा एक नवा शेर माझ्याकडून: बेहतर ये है उठाये न चेहरेसे वो नकाब (नकाब=बुरखा, घूँघट) दुनिया फरोगे जल्वासे घबरा गयी, तो फिर? (फरोग=प्रकाश, जल्वा=तेज, brilliance) ------------------------ सुधीर काळे, "जरा हटके, जरा बचके, ये जकार्ता मेरी जान!"

ये बगावत है जुनूं से कि रहे पास्-ए-खिरद ये है तौहिन-ए-जवानी कि खुदा याद रहे जुनूं - madness, पास् - respect, खिरद - intelligence, तौहिन - insult शायर लक्षात नाही !!

In reply to by आवडाबाई

बुद्धीबद्दल आदर टिकून असणे ही वेडेपणा (उन्माद) बरोबरची बंडाळी आहे आणि देवाची आठवण येणे हा तारुण्याचा अपमान आहे. किती खरं आहे! व्वा आवडाबाई, आपले शेर छान असतात व आवडतात! ये बगावत है जुनूं से कि रहे पास-ए-खिरद ये है तौहिन-ए-जवानी कि खुदा याद रहे ------------------------ सुधीर काळे (जाम चलने लगे, दिल मचलने लगे, चेहरे-चेहरेपे रंग-ए-शराब आ गया!)

निंद आ रही है उनको, आंखें झपक रही हैं लो बंद हो रहा है मेरा शराबखाना शायर माहित नाही

फिराक गोरखपुरी यांचा एक झकास शेर वाचा! शरीके-बज्म होकर यूँ उचटके बैठना तेरा (शरीके-बज्म=महफिलीत हजर) खटकती है मौजूदगीमें भी कमी तेरी ------------------------ सुधीर काळे जाम चलने लगे, दिल मचलने लगे, चेहरे-चेहरेपे रंग-ए-शराब आ गया"

अजीब चीज है ये वक्त जिसको कहते हैं, कि आने पाता नहीं, और बीत जाता है! शायर शहरयार क्रान्ति अग्निसखा

In reply to by क्रान्ति

वा, मस्त! वेळ आहे खरा असा ओंजळीच्या बोटांमधून गळून नाहींसा होणारा! छान आहे शेर! ------------------------ सुधीर काळे जाम चलने लगे, दिल मचलने लगे, चेहरे-चेहरेपे रंग-ए-शराब आ गया"

प्रो. मंशा यांचा हा सुंदर शेर काय बहारदार आहे! हाल-ए-दिल पूछा किसीने कुछ इस अंदाज़के साथ| हम सभी बीते हुए जौरो-ज़फा भूल गये! (जौरो-ज़फा=अत्याचार, जुलूम) ------------------------ सुधीर काळे जाम चलने लगे, दिल मचलने लगे, चेहरे-चेहरेपे रंग-ए-शराब आ गया

वाह वाह वरचे दोन्ही , क्रांन्ति आणि सुधीर काळे यांचे शेर सुंदरच आज हा घ्या एक - फ़राज़ यांचा (नुक्ता टाकायला शिकले!!) तुम जमाने की राहे से निकले वरना सीधा था रास्ता दिल का अजून एक - शायर माहित नाही: बिछडते लम्हें बडी देर तक वो रोया था वो इस से बढ़कर मेरा ऐतराफ़ क्या करता ऐतराफ़ - to acknowledge

आवडाबाई, ऐतराफ़ म्हणजे काय? माझ्याकडे असलेल्या शब्दकोषात हा शब्द नाहींय्! शक्यतो कमी वापरातल्या शब्दांचे अर्थ दिल्यास बरे होईल. 'रोना'वरून माझ्या आवडत्या शाईरा मरहूम परवीन शाकीरचा रडण्यावरचा शेर वाचा. खरंच एक अनोखा शेर आहे: एक मुद्दतसे आँख रोयी नहीं झील पायाब हो गयी शायद! (झील=तलाव, पायाब=उथळ) तुम जमाने की राह से निकले वरना सीधा था रास्ता दिल का हा शेर आवडला! ------------------------ सुधीर काळे एकही वक्तमें उसके आनेसे था चाँदनीका समाँ रोशनीका धुआँ, कोई कहने लगा माहताब आ गया, कोई कहने लगा आफताब आ गया!

In reply to by सुधीर काळे

वर लिहिलाय हो अर्थ - to acknowledge तुमच्या शब्दकोषाची link मिळेल का ? झील पायाब हो गयी शायद !! ---वाह वाह, भिडला

In reply to by आवडाबाई

माफ करा, माझं लक्षच गेलं नाहीं तुम्ही खाली दिलेल्या टिपेकडे! ------------------------ सुधीर काळे एकही वक्तमें उसके आनेसे था चाँदनीका समाँ रोशनीका धुआँ, कोई कहने लगा माहताब आ गया, कोई कहने लगा आफताब आ गया!

असा तो शब्द दिलेला आहे, त्याचा अर्थ स्वीकृती, कबुली, मान्यता असा आहे. [संदर्भ - आंतरभारती मालिकेतील श्रीपाद जोशी आणि गोरेकर यांनी संपादित केलेला उर्दू-मराठी शब्दकोश] गुलजार यांचा एक छोटासा शेर - दिल अगर है तो दर्द भी होगा इसका कोई नहीं है हल शायद! हल- इलाज, उपाय क्रान्ति अग्निसखा

शक़ न कर मेरी खुष्क़ आंखोंपर यूं भी आंसू बहाये जाते हैं खुष्क विरान आंखोंमें अब तो आंसू भी नहीं कुछ तो होता जिसे इष्क का हासिल कहते विरान - उजाड, हासिल - achievement शायर - माहित नाही

"इतना टूटा हूं के छुनेसे बिखर जाऊंगा... अब अगर और दुवा दोगे, तो मर जाऊंगा ! हर तरफ धुंद है, जुगनू है.. न चिराग कोई.. कौन पहचानेगा, बस्तिमें अगर जाऊंगा? जिंदगी मै तो मुसाफिर हूं तेरी कश्तीका, तू जहां मुझसे कहेगी, मै उतर जाऊंगा !" (शायर- माहित नाही. :( )

व्वा, ज्ञानेश-जी! फारच अर्थपूर्ण गज़ल पाठविलीत! दुर्दैवाने मी ही गज़ल ऐकलेली नाहीं. तिचा 'यू-ट्यूब'वरचा दुवा दिलात तर ऐकेन! " अब अगर और दुवा दोगे, तो मर जाऊंगा!" व "तू जहां मुझसे कहेगी, मै उतर जाऊंगा!" या दोन ओळी एकदम 'कलिजा खलास झाला' प्रतीच्या आहेत. बर्‍याच दिवसांनी आलात! मनात आलं कीं "देर आये, दुरुस्त आये"! सुस्वागतम्! ------------------------ सुधीर काळे एकही वक्तमें उसके आनेसे था चाँदनीका समाँ रोशनीका धुआँ, कोई कहने लगा माहताब आ गया, कोई कहने लगा आफताब आ गया!

'इतना टूटा हूं के छुनेसे बिखर जाऊंगा'चा दुवा सापडला! http://www.youtube.com/watch?v=IGqPpCleO1o ------------------------ सुधीर काळे एकही वक्तमें उसके आनेसे था चाँदनीका समाँ रोशनीका धुआँ, कोई कहने लगा माहताब आ गया, कोई कहने लगा आफताब आ गया!

ही माझी अतीशय आवडती गज़ल आहे. दोन कारणांसाठी. पहिलं कारण म्हणजे या अर्थपूर्ण गज़लची चाल फारच छान आहे व दुसरं म्हणजे सर्वांसमोर गज़ल गायन मी सुरू केलं ते ही गज़ल म्हणून! इथे ही गज़ल ऐका! http://tinyurl.com/ybrjc4n किंवा http://ww.smashits.com/music/artists/play/songs/10432/ek-pyar-ka-nagma/… गुलाम अली या गज़लला "छोटे बहरकी (किंवा पहरकी) गज़ल" म्हणतो. 'बहर'चा अर्थ बहुदा श्री. प्रमोद देव यांना माहीत असावा कारण एकदा त्यांच्या लिखाणात हा शब्द आला होता! शब्द आहेतः कुछ दिन तो बसो मेरी ऑंखोंमें, फिर ख्वाब अगर हो जाओ तो क्या कोई रंग तो दो मेरे चेहरेको, फिर जख्म अगर महकाओ तो क्या ॥ध्रु॥ इक आइना सो टूट गया, अब खुदसे अगर शरमाओ तो क्या कुछ दिन तो बसो मेरी ऑंखोंमें..... ॥१॥ मैं तनहा था मैं तनहा हूं, तुम आओ तो क्या, ना आओ तो क्या कुछ दिन तो बसो मेरी ऑंखोंमें..... ॥२॥ जब हमही न महके फिर साहिब, तुम बाद-ए-सबा कहलाओ तो क्या कुछ दिन तो बसो मेरी ऑंखोंमें..... ॥३॥ जब देखनेवाला कोई नहीं, बुझ जाओ तो क्या, जल जाओ तो क्या कुछ दिन तो बसो मेरी ऑंखोंमें..... ॥४॥ ------------------------ सुधीर काळे एकही वक्तमें उसके आनेसे था चाँदनीका समाँ रोशनीका धुआँ, कोई कहने लगा माहताब आ गया, कोई कहने लगा आफताब आ गया!

In reply to by सुधीर काळे

'बहर' चा अर्थ 'वृत्त' असा घेतला जातो. गझलेची पहिली ओळ त्या गझलेची 'बहर' ठरवते. प्रस्तुत गझलेचा फक्त 'मतला' बघितला, तर ही एकंदर बरीच मोठी बहर आहे. मात्र पुढचे शेर त्यानुसार गझलच्या फॉर्ममधे नाहीत. त्यामुळे ही गझल आहे, असे म्हणता येणार नाही.

माफ करा! वरच्या गज़लमध्ये एक शब्दाचा अर्थ द्यायचा राहिलाच! 'बाद-ए-सबा' म्हणजे सकाळची वार्‍याची मंद झुळूक! ------------------------ सुधीर काळे एकही वक्तमें उसके आनेसे था चाँदनीका समाँ रोशनीका धुआँ, कोई कहने लगा माहताब आ गया, कोई कहने लगा आफताब आ गया!

तस्वीर तेरी मेरा दिल बेहेला न सकेगी यह तो तेरी तरह मुझसे शरमा ना सकेगी मै बात करून्गा तो यह खामोश रहेगी आराम वोह क्या देगी जो तडपा न सकेगी? आम्ही काय कुणाचे खातो तो र्आम अम्हाला देतो

जावेद अख्तर यांना आपण गीतकार आणि पटकथालेखक म्हणून ओळखतो. पण मुळात ते एक प्रतिभावंत शायर आहेत. त्यांच्या 'तरकश' या काव्यसंग्रहात त्यांच्या काही रचना प्रकाशित झालेल्या आहेत. त्यातलेच एका गझलेचे काही अशआर पहा- "सुखी टहनी, तनहा चिडीया, फीका चाँद.. आँखोकी गहराईमें नमी का चाँद उस माथेको चुमे कितने दिन बीते, जिस माथेकी खातिर था इक टीका चाँद आओ अब इसके भी टुकडे कर डालें ढाका, रावलपिंडी और दिल्ली का चाँद !" -----------------------------

काही दिवसानपूर्वी राह्त इन्दोरी यान्ची ही छोटीशी मस्त जमलेली गझल वाचली. आणि शेवटच्या कडव्यानी तर जीव खलास केला....... "फीके पड़ गए कपड़े वपड़े, ज़ेवर वेवर सब" :) उसकी कत्थई आंखों में हैं जंतर मंतर सब चाक़ू वाक़ू, छुरियां वुरियां, ख़ंजर वंजर सब जिस दिन से तुम रूठीं मुझ से रूठे रूठे हैं चादर वादर, तकिया वकिया, बिस्तर विस्तर सब मुझसे बिछड़ कर वह भी कहां अब पहले जैसी है फीके पड़ गए कपड़े वपड़े, ज़ेवर वेवर सब *************** आम्ही काय कुणाचे खातो तो र्आम अम्हाला देतो

ही गज़ल ज्या आल्बममध्ये आहे त्यात तिचा उल्लेख 'नगमा' असाच केला आहे, पण स्वतः गुलाम अली जेंव्हा सुरुवात करतात तेंव्हा 'ये एक छोटे बहरकी गज़ल है' असा परिचय करून देतात. खरं तर मी इतकं याकडं कधी लक्ष दिलं नाहीं. ------------------------ सुधीर काळे एकही वक्तमें उसके आनेसे था चाँदनीका समाँ रोशनीका धुआँ, कोई कहने लगा माहताब आ गया, कोई कहने लगा आफताब आ गया!

माझे अगदी अतिशय आवडते शायर .. Dr. Bashir Badr ! डॉ. बशिर यांची हि एक मला आवडलेली गजल .. जहां पेड पर चार दाने लगे... हजारों तरफ से निशाने लगे ! हुई शाम यादों के ईक गांव में, परिंदे उदासी के आने लगे ... घडी दो घडी मुझको पलकों पे रख , यहां आते जाते जमाने लगे ! कभी बस्तीयां दिल की यूं भी बसी, दुकाने खुलीं, कारखाने लगे ... वहीं जर्द पत्तों का कालीन है, गुलों के जहां शामीयाने लगे ! पढाई , लिखाई का मौसम कहां ? किताबों में खत आने-जाने लगे !! -- डॉ. बशिर बद्र ~ वाहीदा (मला आवडलेल्या ओळी मी डार्क केल्या आहेत )

वा वाहीदा! बशिर बद्र यांचे कांहीं शेर मी वाचले आहेत. छानच लिहितात. सापडले तर इथेही पोस्ट करेन. मला शेवटच्या या दोन ओळी जास्त आवडल्या! पढाई , लिखाई का मौसम कहां ? किताबों में खत आने-जाने लगे !! काका शुचीताई, तुम्ही पाठविलेली गज़लही छान आहे. पण कत्थई म्हणजे काय? 'कातिल आँखोंमें' तर नाहीं ना? उसकी कत्थई आंखों में हैं जंतर मंतर सब चाक़ू वाक़ू, छुरियां वुरियां, ख़ंजर वंजर सब पण ही गज़लही आवडली! सुधीर काळे ------------------------ सुधीर काळे Parkinson's Laws 1. Work expands so as to fill the time available for its completion. 2. An official wants to multiply subordinates, not rivals. 3. Officials make work for each other.

वा वाहीदा! बशिर बद्र यांचे कांहीं शेर मी वाचले आहेत. छानच लिहितात. सापडले तर इथेही पोस्ट करेन. मला शेवटच्या या दोन ओळी जास्त आवडल्या! पढाई , लिखाई का मौसम कहां ? किताबों में खत आने-जाने लगे !! काका शुचीताई, तुम्ही पाठविलेली गज़लही छान आहे. पण कत्थई म्हणजे काय? 'कातिल आँखोंमें' तर नाहीं ना? उसकी कत्थई आंखों में हैं जंतर मंतर सब चाक़ू वाक़ू, छुरियां वुरियां, ख़ंजर वंजर सब पण ही गज़लही आवडली! सुधीर काळे ------------------------ सुधीर काळे Parkinson's Laws 1. Work expands so as to fill the time available for its completion. 2. An official wants to multiply subordinates, not rivals. 3. Officials make work for each other.

In reply to by सुधीर काळे

कत्थई चा अर्थ brown असा आहे मला वाटते तो (विड्यात टाकतो त्या) काती वरून आला असावा कात ला हिंदीमध्ये कत्था म्हणतात असं वाचल्यासारखं आठवतं जावेद अख्तर ह्यांचं एक चित्रपट गीत आहे - कत्त्थई आंखोवाली एक लडकी (एक ही बाते पे रोज बिगडती है ???) ......... ह्याची प्रेरणा शबाना आझमीच आहे असंही त्यांनी एका मुलाखतीत सांगीतलं होतं तेव्हा

धन्यवाद काका, मला आणखिन एक आवडलेले शायर एस. फाकिर , त्यांची ही गजल तर अप्रतिम आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल ... आज के दौर में, ऐ खुदा यह मंजर क्यूं है ... जख्म हर सर पे, हर एक हाथ में पत्थर क्यूं है ?? जब हकीकत है, के हर जर्रे में तू रहता है ... फिर जमीं पर , कहीं मस्जिद - कहीं मंदिर पर, यह फसाद क्यूं हैं ?? अपना अंजाम तो मालूम है सब को , फिर भी ... अपनी नजरों में , हर ईन्सान सिकंदर क्यूं है ? जिंदगी, जीने के काबिल ही नहीं , अब "फाकिर" , वर्ना हर आंख में, अश्कोंका समंदर क्यूं है ?? - एस. फाकिर ~ वाहीदा

जिंदगी, जीने के काबिल ही नहीं , अब "फाकिर" , वर्ना हर आंख में, अश्कोंका समंदर क्यूं है ?? छान! ------------------------ सुधीर काळे Parkinson's Laws 1. Work expands to occupy time available. 2. Bureucrats add subordinates, not rivals. 3. In meetings, time spent on a point is inversely proprtional to its importance!

या धाग्यावर सक्रीय भाग घेणार्‍या गज़लप्रेमींनो, सुमारे २० वर्षांपूर्वी माझ्या संग्रहात एक गज़ल (किंवा तिला 'चीज' असेही म्हणता येईल) होती. तिचे शब्द आहेत "टूटे सपने करते जाये नींदोंको बरबाद". ही गायली होती "जयपुरवाले" या एक शास्त्रीय संगीताच्या गायकांनी. दुर्दैवाने ती गज़ल मी कुठेतरी हरवली आहे. जर आपणा गज़लप्रेमींपैकी कुणाकडे ही गज़ल असेल किंवा तिची लिंक असेल तर पाठवून द्यावी. मनःपूर्वक आभार ------------------------ सुधीर काळे Parkinson's Laws 1. Work expands to occupy time available. 2. Bureaucrats add subordinates, not rivals. 3. In meetings, time spent on a point is inversely proportional to its importance!

In reply to by वाहीदा

दुर्दैवाने ते मला आठवत नाहीं. आणखी एक गज़ल मी शोधतोय् अशोक खोसला यांनी म्हटलेली. गज़लची चाल वगैरे सुमारच आहे, पण अर्थ छान आहे. त्यात एका दारुड्याची दर्दभरी कहाणी अतीशय हलक्या-फुलक्या शब्दात मांडलेली आहे. उदा. त्या दारुड्याने "आजपासून दारू सोडली" असे जाहीर केलेले आहे पण मित्र त्याला चिडवतात कीं तोंडाला दारू प्याल्याचा वास तर येतोच आहे. तर तो म्हणतो कीं ती काल प्यालेली दारू आहे! ------------------------ सुधीर काळे बाद मुद्दत उन्हें देखकर यूँ लगा, जैसे बेकार दिलको करार आ गया! (जगजीत-चित्रा यांनी गायलेली एक अप्रतिम गज़ल)

माझ्या सर्वात आवडत्या शाइरा पै. परवीन शाकीर यांचा हा शेर फारच अर्थपूर्ण आहे. मैं सोचती हूँ कि मुझमें कमी थी किस शै की (शै=गोष्ट, वस्तु, पदार्थ) कि सबका होके रहा वो, बस इक मेरा न हुआ| ------------------------ सुधीर काळे बाद मुद्दत उन्हें देखकर यूँ लगा, जैसे बेकार दिलको करार आ गया!

चेहरा मेरा था, निगाहें उसकी खामोशी में भी वो बातें उसकी मेरे चेहरे पे गज़ल लिखती हुई शेर कहती हुई आंखे उसकी शोख लमहों का पता देने लगी तेज होती हुई सांसे उसकी ऐसे मोसम भी गुजारे हमने, सुबहें जब अपनी थी, शामें उसकी नींद इस सोच में टूटी अक्सर, किस तरह कटती हैं रातें उसकी दूर रहकर भी सदा रहती हैं मुझको थामे हुए बांहें उसकी क्रान्ति अग्निसखा

वाह क्रांति! काय सुंदर निवड आहे तुझी!! सगळेच शेर फारच हृदयाला स्पर्श करणारे व अर्थपूर्ण आहेत. खूप मजा आली. जिगर मुरादाबादी यांचा एक शेर खाली दिला आहे: कुछ इस अदासे आज वो पहलू नशीं रहे (वो पहलू नशीं रहे=ती जवळ बसली) जब तक हमारे पास रहे, हम नहीं रहे| ------------------------ सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)

नींद इस सोच में टूटी अक्सर, किस तरह कटती हैं रातें उसकी खूपच छान !! बर्‍याच दिवसांनी माझ्याकडून एक - जी भर के जुल्म कर, मगर इस शर्त-ए-खास पर जब लुत्फ हो, तो लुत्फ की भी इन्तेहा न हो लुत्फ = हा शब्द बर्‍याच वेळा pleasure/enjoyment या अर्थी वापरला जातो, येते मात्र तो favour या अर्थी आलाय

सध्या इतर लेखनात गुंतल्यामुळे शेरोशायरीकडे दुर्लक्ष झाले. पण आज 'राहत इंदौरीं'चा एक मस्त शेर वाचण्यात आला तो इथे देतोय्! चाँदको हमने कभी गौरसे देखाही नहीं| उससे कहिये कि कभी दिनके उजालोंमें मिले| ------------------------ सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)

एक झकास शेर वाचा. शायरसाहेबांचे नांव माहीत नाहीं. जादू है या तिलिस्म तुम्हारी जबानमें? (तिलिस्म=इंद्रजाल) तुम झूठ कह रहे थे मुझे एतिबार था! (एतिबार=विश्वास) ------------------------ सुधीर काळे (चाँदको हमने कभी गौरसे देखाही नहीं, उससे कहिये कि कभी दिनके उजालोंमें मिले|)

'आशिक' या शायरने लिहिलेला झकास शेर वाचा (हा शेर शुचीताईंच्या एका धाग्याला प्रतिसाद म्हणून लिहिला आहे व इथे पुन्हा लिहीत आहे.) कत्ल कर आ के, मेरे कत्लको समसाम न भेज| (समसाम=तलवार) कत्ल करना है तो फिर कत्लका पैगाम न भेज|| (पैगाम=संदेश, message) ------------------------ सुधीर काळे राष्ट्रपतींना निरोप लिहा presidentofindia@rb.nic.in या ई-मेल पत्त्यावर, प्रधानमंत्र्यांना निरोप लिहा http://pmindia.nic.in/write.htm या दुव्यावर)

यांचा शोख शेर - खुद फूल ने भी होंठ किये अपने नीमवा (अर्धवट उघडलेले) चोरी तमाम रंग की तितली के सर ना जाये - परवीन शाकीर

शुचीताई, (मरहूम) परवीन शाकीर या माझ्याही अत्यंत आवडत्या शाईरा आहेत. या धाग्याची सुरुवातही मी त्यांच्याच शेराने केली आहे. अत्यंत मृदू भावना सुरेख शब्दात त्या लिहितात! आपण पाठवलेला शेरही झकास आहे. धन्यवाद. ------------------------ सुधीर काळे राष्ट्रपतींना निरोप लिहा presidentofindia@rb.nic.in या ई-मेल पत्त्यावर, प्रधानमंत्र्यांना निरोप लिहा http://pmindia.nic.in/write.htm या दुव्यावर)

शेख - म्हणजे धर्मगुरू, याचे जीवन कसे असते हे सांगणारा हा शेर पहा: क्या शेखकी जिंदगानी गुजरी बेचारेकी इक शब न सुहानी गुजरी दोजखके तखय्युलमे बुढापा बीता जन्नतके दुआओंमे जवानी बीती दोजखः नरक तखय्युलः भीती, कोणत्याही प्रेमवीराच्या मनातील भिती कशी असते पहा: मर्जी हो तो सूलीपे चढाना या रब सौ बार जहन्नुममे जलाना या रब माशुक कहे 'आप बुजुर्ग हैं हमारे' नाचीज़को ये दिन न दिखाना या रब आपल्या प्रेयसीने आपल्याला दादा, काका म्हटलेले ~X( :''( कोणत्या प्रेमवीराला आवडेल? नितीन नितीन

शुचीताई, (मरहूम) परवीन शाकीर या माझ्याही अत्यंत आवडत्या शाईरा आहेत. या धाग्याची सुरुवातही मी त्यांच्याच शेराने केली आहे. अत्यंत मृदू भावना सुरेख शब्दात त्या लिहितात! आपण पाठवलेला शेरही झकास आहे. धन्यवाद. ------------------------ सुधीर काळे राष्ट्रपतींना निरोप लिहा presidentofindia@rb.nic.in या ई-मेल पत्त्यावर, प्रधानमंत्र्यांना निरोप लिहा http://pmindia.nic.in/write.htm या दुव्यावर)

वाह वाह मज़ा आ गया ! ही घ्या आमची चिमूट - लो हम बतलाएं गुंचा-ओ-गुल मे है फर्क क्या इक बात है कही हुई एक बेकही हुई गुंचा - कळी गुल - फूल शायर - माहित नाही :-(

In reply to by आवडाबाई

हा शेर "आग़ा शाईर" यांचा आहे! मूळ शेरात 'बेकही' हा शब्द 'बे कही' असा लिहिलेला दिसला! ------------------------ सुधीर काळे राष्ट्रपतींना निरोप लिहा presidentofindia@rb.nic.in या ई-मेल पत्त्यावर, प्रधानमंत्र्यांना निरोप लिहा http://pmindia.nic.in/write.htm या दुव्यावर)

गमजा(नखरा) नही होता की इशारा नही होता आंख उनसे जो मिलती है तो क्या क्या नही होता| अल्लाह बचाए मर्झ्-ए-इष्क से दिल को सुनते है के ये आरजा(रोग) अच्छा नही होता| तश्बीह्(मिसाल) तेरे चेहेरे को क्या दू? गुल्-ए-तर से होता है शगुफ्ता मगर इतना नही होता| हम आह भी भरते है तो हो जाते है बदनाम वोह कत्ल भी करते है और चर्चा नही होता|

तू हमें हासिल हो न हो ऐ परीवश (परीवश=परीसारखी दिसणारी सुंदर मुलगी) मगर हम तलबगार तेरे रहेंगे! (तलबगार=इच्छुक) शायर आहेत 'अदम' सुधीर काळे, जकार्ता ------------------------ हा दुवा उघडा: http://72.78.249.107/esakal/20100309/5306183452989196847.htm

तू हमें हासिल हो न हो ऐ परीवश (परीवश=परीसारखी दिसणारी सुंदर मुलगी) मगर हम तलबगार तेरे रहेंगे! (तलबगार=इच्छुक) शायर आहेत 'अदम' सुधीर काळे, जकार्ता ------------------------ हा दुवा उघडा: http://72.78.249.107/esakal/20100309/5306183452989196847.htm

पूरा दुख और आधा चान्द हिज्र की शब और ऐसा चान्द ||१|| इतने घने बादल के पीछे कितना तनहा होगा चान्द ||२|| मेरी करवट पर जाग उठ्ठे नीन्द का कितना कच्चा चान्द ||३|| सेहेर सेहेर भटक रहा है अपने इष्क मे सच्चा चान्द ||४|| रात के शायद एक बजे है सोता होगा मेरा चान्द ||५||

ये इनायते गजब की ये बला की मेहेरबानी मेरी खैरीयत भी पूछी किसी और की जुबानी मेरी बेजुबान अन्खोंसे गिरे है चंद कतरे वोह समझ सके तो आंसू ना समझ सके तो पानी ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Love is older than you but the light shining through makes me see your love is all new.

In reply to by शुचि

"मेरी खैरीयत भी पूछी किसी और की जुबानी" सुरेख! सुधीर काळे, जकार्ता ------------------------ हा दुवा उघडा: http://72.78.249.107/esakal/20100309/5306183452989196847.htm

नमस्कार ! इथे शेर्/गजल हे प्रकार आवडणारे रसिक जमा झालेले दिसतात. मजा आला. मी पण एक गजलची मजा घेणारा आहे. मी ओमर खय्यामच्या रुबायांचे मराठीत रुपांतर करायचा प्रयत्न केला आहे खालिल ब्लॉग वर. थोडा फिलॉसॉफीकल आहे, पण तुम्हाला आवडण्याची शक्यता आहे. www.omarkhayyaminmarathi.wordpress.com आपला, जयंत कुलकर्णी.

In reply to by जयंत कुलकर्णी

जयंतराव, प्रतिसादाला जरा उशीर झाला याबद्दल क्षमस्व! मी तुमचा ब्लॉग जरूर वाचेन. सध्या घर बदलल्यामुळे घरी 'नेट नाहींय् व "फसवणूक" प्रकल्प माझा खूपच वेळ घेतोय्. त्यामुळे तुमचा ब्लॉग 'रसिकपणे' वाचायला मला जरा वेळ लागेल! तरी गैरसमज नसावा! पण आपल्यासारख्या १०-१२ लोकांमुळे या धाग्याने द्विशतक ठोकले याचा आनंद मात्र जरूर आहे...... सुधीर काळे, जकार्ता ------------------------ हा दुवा उघडा: http://72.78.249.107/esakal/20100309/5306183452989196847.htm

नमस्कार ! काळेजी मस्त ! इथे शेर्/गजल हे प्रकार आवडणारे रसिक जमा झालेले दिसतात. मजा आला. मी पण एक गजलची मजा घेणारा आहे. मी ओमर खय्यामच्या रुबायांचे मराठीत रुपांतर करायचा प्रयत्न केला आहे खालिल ब्लॉग वर. थोडा फिलॉसॉफीकल आहे, पण तुम्हाला आवडण्याची शक्यता आहे. www.omarkhayyaminmarathi.wordpress.com आपला, जयंत कुलकर्णी.

In reply to by जयंत कुलकर्णी

कधी कधी ओमर खय्याम ला समजणे खुपच कठिण आहे अन त्यांच्या रुबायांचे मराठीत रुपांतर ??? अबब !! :O जयंत कुलकर्णी , तुमचे हार्दिक अभिनंदन !! =D> ~ वाहीदा

या धाग्याने द्विशतक ठोकले याचा खूप आनंद होत आहे. याचे श्रेय इथे नेमाने अशयारांचे पोस्टिंग करणार्‍या १०-१२ लोकांना आहे. या निमित्ताने शकील बदायुनींचा एक छान शेर पोस्ट करीत आहे: इस दर्जा मायूसी शुरू-ए-इशकमें कैसी? (मायूसी=निराशा, disappointment) अभी तो और होना है खराब, आहिस्ता आहिस्ता! सुधीर काळे, जकार्ता ------------------------ हा दुवा उघडा: http://72.78.249.107/esakal/20100309/5306183452989196847.htm

यह इष्क नही आसां हमने तो ये जाना है काजल की लकीरोंको आंखोंसे चुराना है ---सईद राही ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara

In reply to by शुचि

शुचीताई, व्वा! आवडला हा शेर. सुधीर काळे, जकार्ता ------------------------ दोन अत्यंत वाचनीय दुवे: http://www.dnaindia.com/opinion/main-article_dynasty-vs-government_1368… (DNA) व http://indiatoday.intoday.in/site/Story/89840/Inhuman+rights.html?compl… (India Today)