Skip to main content

लुटा 'लुत्फ' उर्दू गज़ल-अशयारांचा!

लेखक सुधीर काळे यांनी बुधवार, 21/10/2009 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
एका ’इजिप्शियन’ सभासदाने मला अशी सूचना केली कीं मी दर वेळेला नवीन ’धागा’ सुरु न करता एकच धागा सुरू ठेवावा व तिथेच नवीन-नवीन गझला, शेर (खरं तर शेरचे वचन आहे 'अशयार') यांची वेळो-वेळी भर घालत जावे व तिथेच प्रतिसाद येऊ द्यावेत. यामुळे वाचकांना एकच धाग्यामागे जाणे सोपे पडेल व आपोआप चांगल्या शेरांचे एक झकास संकलनही होईल. ही कल्पना मला आवडली व आता हा धागा लोकांना आवडेल तितके दिवस किंवा याहून जास्त चांगली व्यवहार्य कल्पना सुचेपर्यंत चालू राहील. एकच उणी गोष्ट आहे की हा धागा 'ब्रॉडवे'सारखा लांsssब होईल. बघू कसे जमते ते! सुरुवात करतो माझ्या सर्वात आवडत्या शाईरा मरहूम परवीन शाकीर या उर्दू कवियित्री पासून. कलेला सीमेचे बंधन नसते असे म्हटले जाते. जरी या विधानाशी मी १०० टक्के सहमत नसलो तरी एक अपवाद म्हणून मला त्यांचे शेर त्या पाकिस्तानी असूनही आवडतात. MA in English Literature अशा उच्चशिक्षित असलेल्या परवीनबाई पाकिस्तानी सरकारात सनदी नोकर होत्या. त्यांचा पहिलाच काव्य संग्रह त्यांच्या वयाच्या २४ वर्षी प्रसिद्ध झाला व त्यावर रसिकांच्या उड्या पडल्या. त्यानंतर त्यांचे अनेक इतर काव्य संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. त्यांना पाकिस्तानी राष्ट्रपतीकडून Pride of performance हे उच्च सन्माननिदर्शक पदक मिळाले आहे. केवळ ४२ वर्षाच्या असताना कामावर जाताना त्यांच्या गाडीला अपघात झाला व त्यात त्या निधन पावल्या. नाहीं तर त्याना आता मिळाला आहे त्याहून खूप जास्त मान-मरातब नक्कीच मिळाला असता. मला त्यांचे शेर खूप आवडतात, पण उर्दू लिपी अद्याप येत नसल्याने आतापर्यंत त्यांचे फुटकळ देवनागरीत वाचायला मिळालेले शेर वाचूनच मी "दुधाची तहान ताकावर" भागवली आहे. प्रणय-भावनांवर आधारित त्यांचे शेर जास्त करून शोकभावनेचे, प्रियकर-प्रेयसीच्या प्रेमभंगावर, ताटातुटीवर आधालेले असून फारच हृदयस्पर्शी आहेत. खाली दिलेले दोदिलेलेत्यांचे सर्वोत्तम शेर नाहींत पण छान आहेत. आपल्या प्रियकराबद्दल बाई म्हणतात..... हल हो गया है खूनमें कुछ ऐसे (हल होना=मिसळून जाणे, dissolved) रग-रगमें वो नाम बह रहा है| आणि या दुसर्‍या शेरात त्या म्हणतात की माझा प्रियकर कितीही निष्ठाहीन असो, कुठेही जावो, पण तो परत माझ्याकडे येतो ही त्याची चांगली गोष्ट आहे! वो कहीं भी गया, लौटा तो मेरे पास आया बस यही बात है अच्छी, मेरे हरजाई की| (हरजाई=निष्ठाहीन) एक विनोदी शेर शेवटी देऊन आजची पोस्ट संपवतो 'दाग़' नावाचा शायर म्हणतो कीं.... जिसमें लाखों बरसकी हूरें हो (हूर=अप्सरा) ऐसी जन्नतको क्या करें कोई? (जन्नत=स्वर्ग) असो. आरामात बसा आणि मजा लुटा. सुधीर

वाचने 71012
प्रतिक्रिया 220

प्रतिक्रिया

मुत्तसिल रोतेही रहिये तो बुझे आतिशे-दिल (मुत्तसिल=निरंतर; आतिशे-दिल=काळजातील आग) एक-दो आँसू तो और आग लगा जाते हैं! (अनामिक शायर) सुधीर काळे, जकार्ता ------------------------ दोन अत्यंत वाचनीय दुवे: http://www.dnaindia.com/opinion/main-article_dynasty-vs-government_1368… (DNA) व http://indiatoday.intoday.in/site/Story/89840/Inhuman+rights.html?compl… (India Today)

मुत्तसिल़ = जुळलेले मुस्तकील =निरंतर; मला वाटते असे असावे...

In reply to by अश्फाक

अश्फाक-जी, मी जे शेर इथे 'पोस्ट' करतो त्यातले बहुसंख्य "आईना-ए-गज़ल" या शब्दकोषातून निवडलेले असतात व त्या शब्दकोषात मी लिहिलेला मुत्तसिल़ हा शब्द बरोबर आहे (म्हणजे टंकन करताना चूक झालेली नाहीं). मी उर्दू लिपी लिहू-वाचू शकत नाहीं. अनेक गायक-गायिकांनी गायिलेल्या गज़ला (गज़लियात) ऐकून मी या भाषेच्या प्रेमात पडलो व जरासा व्यासंग केला एवढेच. आपणही "आईना-ए-गज़ल" हा मरहूम डॉ. ज़रीना सानी व डॉ. विनय वाईकर यांनी संकलन केलेला शब्दकोष घ्यावा असे मला वाटते. १०,००० शेर असलेला हा शब्दकोष मी गाडीत ठेवतो व मूड असला कीं वाचतो....कुठल्याही पानापासून. त्यातले कळलेले (सगळे कळत नाहींत...'ए' असलेले बरेच डोक्यावरून जातात!) व आवडलेले शेर मी अधोरेखित करतो व इथे टाकतो! या शब्दकोषात 'मुस्तकि़ल' या शब्दाचाही अर्थ 'निरंतर' असाच दिला आहे व शेर आहे: शिकस्ते-बेखुदीके मुस्तक़िल सामान तो होंगे न क्यों जी भरके पी लूँ, मैकदे वीराँ तो होंगे (शकील बदायूनी) सुधीर काळे, जकार्ता ------------------------ दोन अत्यंत वाचनीय दुवे: http://www.dnaindia.com/opinion/main-article_dynasty-vs-government_1368… (DNA) व http://indiatoday.intoday.in/site/Story/89840/Inhuman+rights.html?compl… (India Today)

बर्‍याच दिवसांनी आज माझी चिमूट - आगे हि बिन कहे, तू कही है नहीं, नहीं तुझसे अभी तो हमने वो बाते कही नहीं शायर - (बहुतेक) 'दर्द' मी काही बोलायच्या आधीच तू नाही-नाही म्हणते आहेस. अजून "त्या" गोष्टी तर मी बोललेलोच नाहीये एक हसरत मोहानी - इरादे थे कि उनसे हाल-ए-दिल सब मिल के कह देंगे मगर मिलने पे, हमसे आज होता है, न कल कहना

In reply to by आवडाबाई

व्वा आवडाबाई, सुरेख निवड. सुधीर काळे, जकार्ता ------------------------ 'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रस्तावना: http://tinyurl.com/36pvtbn; प्रकरण पहिले: http://tinyurl.com/24rlna9

ये तुम्हारी तल्ख़-ए-नवाइयां कोई और सहकर दिखाए तो ये जो हम में तुम में निबाह है, मेरे हौसले का कमाल है तल्ख़-ए-नवाइयां = कडवट बोलणे शायर - माहित नाही

फीके पड़ गए कपड़े वपड़े, ज़ेवर वेवर सब" उसकी कत्थई आंखों में हैं जंतर मंतर सब चाक़ू वाक़ू, छुरियां वुरियां, ख़ंजर वंजर सब.... -राहत इन्दौरी

चंद्रावर आधारित चांद सा चेहरा वगैरे बरेच शेर आहेत , हा एक वेगळा,चंद्राच्या डागांवर भाष्य करणारा पण कदाचित तुम्हालाही आवडेल असा किस कदर जख्म जख्म चेहरा है चांद भी आदमी सा लगता है || क ज ज याखाली नुक्ता. देऊन वाचावा

दुनिया जिसे कहते है जादू का खिलॊना है मिल जाये तो मिट्टी है खो जाये तो सोना है || निदा फाजली