कॉकरोच जनता पार्टी आंदोलन- दिल्ली. पहिल्या भागात मिपाकरांनी शांततेच्या मार्गाने आपल्या भावना व्यक्त केल्या. नीट परीक्षेचे पेपर लीक होणे आणि तत्त्सम घोटाळ्याविरुद्ध दिल्ली येथे जंतरमंतरवर सीजेपी अर्थात कॉक्रोच जनता पार्टी या युवकांच्या सामाजिक चळवळीने केंद्रसरकारमधील शिक्षणमंत्र्याच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन त्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन सुरु केले आहे. वीस तारखेला संसदेवर निघालेल्या मोर्चा अडवून विद्यार्थ्यांना, युवतींना महिला पालकांना जी अमानुष मारहाण केल्या गेली त्या क्र्रुरतेचे आणि कौर्याचे असंख्य व्हीडीयो सामाजिक माध्यमांवर दिसत आहेत. 'बेटी बचाओ,बेटी पढावो' म्हणना-यांनी लेकी बाळींचा केलेला अपमान, डोकी फोडणे, जायबंदी करणे 'अमानुष मारहाण' असेच वर्णन वीस जुलैच्या घटनेचे वर्णन करावे लागते. संसदेवर जाणा-या या मोर्चाला लाठीमाराशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता ? प्रश्न विचारता येईल आणि चर्चाही करता येईल. सोनम वांगचुंग यांना उपचाराच्या निमित्ताने जबरदस्तीने उचलून आंदोलन मोडता येते काय, असा प्रयत्न सरकारने करुन पाहिला, मारहाण करुन युवकांना पळवून लावण्याचा प्रयत्न झाला. मुलं घाबरुन जातील आणि आंदोलन स्थळांवरुन पळून जातील असे सरकारला वाटले असावे, पण असे काही झाले नाही. उलट, आंदोलनाची तीव्रता वाढत चालली आहे.
दुसरीकडे, मन की बाता कराव्यात तशा आणि त्या टाइपच्या गप्पा सुरुच आहेत. '' पेपरफुटी हे घोर पापआहे. तरुणांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात आली असून भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी केंद्र आणि सर्व राज्य सरकारांनी पक्षभेद बाजूला ठेवून एकत्र काम केले पाहिजे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी 'एनडीए' संसदीय पक्षाच्या बैठकीत व्यक्त केले'' मात्र, केंद्र सरकारच्या वतीने केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या आंदोलकांच्या मागणीबाबत कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली नव्हती. सीजेपीच्या प्रतिनिधींनी केंद्रीय मंत्री नड्डा यांना मागण्यांचे लेखी निवेदन दिले असले तरी त्यावरही केंद्र सरकारने मंगळवारी मौन बाळगले.
आता सध्या कालच्या घडामोडीत जंतर-मंतरवरील आंदोलनाची तीव्रता कमालीची वाढलेली पाहता, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. आंदोलकांच्या या मागणीला पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र येऊ लागले आहेत. आज महाराष्ट्र बंदची हाकही देण्यात आली आहे. एकाच वेळी आंदोलन आणि विरोधकांचा चहूबाजूंचा हल्लाबोल, लोकसभा आणि राज्यसभेतला गोंधळ पाहता, केंद्र सरकारची बुधवारी कोंडी झाल्याचे चित्र निर्माण झाले. महिनाभर संवाद टाळणाऱ्या केंद्र सरकारने अखेर आंदोलकांशी गंभीर चर्चा सुरू केली असून, केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी आंदोलकांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.
सरकारविरोधात आम्ही पुन्हा मोर्चा काढणार नाही आणि जंतर-मंतरवरून हलणार नाही. आता केंद्र सरकारने जंतर-मंतरवर येऊन चर्चा करावी किंवा तटस्थ स्थळी बैठक घ्यावी, असे कॉक्रोच जनता पार्टी'ने (सीजीपी) बुधवारी स्पष्ट केले. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना १ कोटी रुपयांची नुकसानभरपाई, आणि कोणतीही फौजदारी कारवाई केली जाऊ नये, या तीनही मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असे 'सीजीपी'च्या प्रतिनिधींनी केंद्र सरकारकडे स्पष्ट केले.
''गेल्या दहा वर्षांत देशभरात १५२ परीक्षा पेपरफुटीच्या घटना घडल्या असून, त्याचा जबरदस्त फटका सुमारे ७.५ कोटी विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबांना सहन करावा लागला आहे. मात्र, या प्रकरणांमध्ये एकाही आरोपीला शिक्षा झालेली नाही, असा गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बुधवारी इंदिरा भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केला''
लेखनातील माहिती कंटेंट लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. सकाळ या छापील वृत्तपत्रातून चर्चेसाठी घेतले आहे. तर, मिपाकर हो शांततेच्या मार्गाने आपापली मतं मांडत राहू या..
कॉकरोच जनता पार्टी आंदोलन- दिल्ली. (भाग दोन )
वाचने
7771
प्रतिक्रिया
309
मिसळपाव
प्रतिक्रिया
अभ्याशेठ भारी.
In reply to वा... by अभ्या..
सर्वच प्रतिसाद भारी आहे. नंबर एक.
बाकी ते 'परिस्थिती अंगावर शेकायली की सगळ्यांची आठवण येते. कायदा, सुव्यवस्था, संविधान, देश, संसद ह्यांचे पावित्र्य, महती गाणाऱ्यासाठी' हेच सध्या लय डोक्यात जात आहेत.
लिहिते राहा.
-दिलीप बिरुटे
🔥👍🔥
In reply to वा... by अभ्या..
🔥👍🔥
शाहीनबाग आंदोलन, शेतकरी…
शाहीनबाग आंदोलन, शेतकरी आंदोलन आणि आता विद्यार्थ्यांचे आंदोलन पाहिले तर केंद्र सरकारला म्हणजे मोदी/शहांना आंदोलने नीट हाताळता येत नाहीत असं दिसतंय. प्रारंभी संपूर्ण दुर्लक्ष, समाजमाध्यमातून आंदोलन देशविरोधी/परदेशी निधी घेऊन चालविले जात आहे असा सातत्याने भडिमार व शेवटी माघार अशी प्रमाणित कार्यपद्धती ते वापरतात.
त्या तुलनेत विलासराव देशमुख व फडणवीस, अण्णा हजारे, शेतकरी आंदोलन, मराठा राखीव जागा आंदोलन इ. बऱ्यापैकी चांगले हाताळून आंदोलनकर्त्यांना काहीतरी किरकोळ देऊन थंड करायचे.
पूर्वी इंदिरा गांधी प्रत्येक आंदोलनात सीआयए, संघ इ.चा हात आहे व त्यांना भारत अस्थिर करायचाय अशी हाकाटी करायच्या. आताही मोदी सरकार तेच करीत आहे, पण आंतरजाल व समाजमाध्यमांमुळे हे आरोप जनता मान्य करीत नाही.
मोदी हागला तरी गु छान लागतो…
मोदी हागला तरी गु छान लागतो म्हणणारी मंडळी आहेत, त्यामुळे इथे वांझोटा चर्चा करून फरक पडत नाही. देव करो यांच्यापैकी कोणावर वाईट वेळ न येवो. यातला भुर्जी तिकडे अडकला होता तेव्हा सरकारला शिव्या घालत होता, आता बुडाला स्थिरता आल्यावर पुन्हा चालू झालाय. असो. आयडी देवाला वाहिला आहे. उडाला तर उडाला.
गपा ओ
In reply to मोदी हागला तरी गु छान लागतो… by कपिलमुनी
अजुन खूप पाने उरलीत सैरभैर डायरीची
फेटीश ? हाहाहा ....
अभ्या..,
तुम जिसे फेटीश कहते हो उसको पच्चास करोड हिंदू जनता सुकूनका छुटकारा ( = सुटकेचा नि:श्वास ) मानती है.
आ.न.,
-गा.पै.
पन्नास कोटी हिंदूंचे हे असले…
In reply to फेटीश ? हाहाहा .... by गामा पैलवान
पन्नास कोटी हिंदूंचे हे असले प्रतिनिधी असणे म्हणजे जरा लैच झाले !
प्रतिनिधी कशाला हवेत !
In reply to पन्नास कोटी हिंदूंचे हे असले… by वृषभ खोंडे
करेक्ट. अहो, मी सुटकेचा नि:श्वास टाकणारे म्हणतोय. प्रतिनिधी नव्हे.
-आ.न.,
-गा.पै.
देशी शिक्षणाला महत्व द्यायचे…
देशी शिक्षणाला महत्व द्यायचे तर हि आपल्या नेत्यांचे झाडून सगळे मुले परदेशी शिकायली जातात का??
नक्की विचार करा मराठे काका रॉक्स
सरकारला जेनझी ने नागडं केलं.
नीट परीक्षा घोटाळा विषयावर आंदोलन करणा-या तरुण मुला मुलींवर अमानुष लाठीमारा नंतर या तरुण पीढ़ीने मात्र दुस-या दिवसापासुन सरकारला नागडं केलं. पूरा बदला घेतला.
पोरींच्या हातातील बॅनर सोशियल मिडियावर बघायला मिळाले ते असे होते. 56 इंच छाती के लिये ब्रा कहा मिलेगी' 'झोला मैं खरीदके देती हूँ, आप बस निकल जाओ, 'यु फक्ड विथ दी wrong जनरेशन' 'बीवी नही है तो देश की मारोगे क्या' 'स्टूडेंट थे इसलिए पेल दिया, रेपिष्ट होते तो पार्टी में ले लेते' पॅडचं चित्र आणि 'इसने भी लिक नही होने दिया'
सरकारने पोरांच्या नादी एक तर नादी लागायला नको होतं. लागले तर, त्यांचे मन जिंकून घ्यायला पाहिजे होतं. लाठीमार केला आंदोलन दाबून पाहिलं नंतर या पोरांच्या नादी लागून स्वत:ची चेष्टा करुन घेतली. धर्मेन्द्र प्रधान यांचा राजीनामा होईल की नाही माहिती नाही. पण पोरांनी आंदोलन गाजवले हे मात्र खरं आहे.
-दिलीप बिरुटे
जेनझी खूप प्रगल्भ आहेत…
In reply to सरकारला जेनझी ने नागडं केलं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जेनझी खूप प्रगल्भ आहेत. त्यांच्याशी बोलणी करण्यासाठी सरकारमध्ये एकही लायक व्यक्ती नाही.
करावं काय ? हे कळत नाही.
In reply to जेनझी खूप प्रगल्भ आहेत… by आग्या१९९०
आजार म्हशीला आणि इंजेक्शन पखालीला' ही एक प्रसिद्ध मराठी म्हण आहे. मूळ समस्या किंवा त्रास एका ठिकाणी असताना, उपाय मात्र पूर्णपणे चुकीच्या किंवा वेगळ्याच ठिकाणी केला जाणे, या अर्थाने. सध्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर तोडगा काय आहे ? विद्यार्थी म्हणतात शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हवा आहे. सरकार काय करीत आहे, वेळ काढू धोरण अवलंबून दुसया मुद्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत आहे. आम्ही अशा परिक्षा लीक करणा-याविरुद्ध कडक कार्यवाही करु, काल नीट प्रकरणी ४७ अधिका-यांना बडतर्फ केले. पुढील आठवड्यात नीट आणि तत्त्सम परिक्षेतील गुन्हेगारांना व्यक्तीगत आणि सामुहिक घोळ केल्यास तुरुंगवास आणि आर्थिक दंड वगैरे विधेयक येणार आहे. हे सर्व आंदोलन सुरु झाल्यावर सरकारला हे शहाणपण सुचले तो वर आंदोलन दाबण्यासाठी पॅलेट गनचा वापर आणि मारहाण करायची महाराष्ट्र टाइम्सला पहिल्याच पानावर राहूल गांधी पॅलेटगनने दंडावर जखमा झालेल्या तरुणाचे छायाचित्र दाखवत आहे, असे चित्र आले आहे, अशा पद्धतीने आंदोलन हाताळतात ? जनतेला चीड येणार आणि लोक प्रश्न विचारतीलच ना ! आता सीजेपीच्या दोन मागण्या मान्य तत्त्वत: मान्य करण्यात आल्या. नीट आत्महत्त्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटूंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपये आणि चलो संसद मोर्चातील विद्यार्थ्यांवरील खटले मागे घ्यावेत या कॉक्रोच जनता पार्टीच्या दोन मागण्या केंद्र सरकारने शुक्रवारी तत्त्वत: मान्य केल्या. विद्यार्थ्यांच्या पाच प्रस्तावारही सरकारने सकारत्मकत दाखवली. मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या बाबतीत सरकारचं मौन आहे, त्याबाबत एक दिवसाचा वेळ मागून घेण्यात आला आहे. (संदर्भ- मटा) काल मुंबई आणि पुण्यात तरुणांचे मोठे वादळ घोंघावले आहे. आज आषाढी एकादशी, विठ्ठला सरकारला सुबुद्धी दे आणि हे विद्यार्थ्यांचे आंदोलन त्यांच्या मागण्यासहित मिटू दे, देशावरील अरिष्ट जाऊ दे एवढीच प्रार्थना.... -दिलीप बिरुटे
पोरींच्या हातातील बॅनर…
In reply to सरकारला जेनझी ने नागडं केलं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पोरींच्या हातातील बॅनर सोशियल मिडियावर बघायला मिळाले ते असे होते. 56 इंच छाती के लिये ब्रा कहा मिलेगी'
'बीवी नही है तो देश की मारोगे क्या'
पूर्वी पुरुषाचा कमाल अपमान करायचा असला की त्याला बाईसारखं म्हणायचे. बांगड्या भर.. गरोदर आहेस का. वगैरे.. बाई म्हणजे सर्वात लागणारी शिवी..
आणि आता त्या ऐवजी छातीला ब्रा मिळेल का असे म्हणत आहेत. जेन झी स्मार्ट झाले तरी ही वृत्ती अजून मनातून बाहेर पडली नाही. जेंडर न्यूट्रल पिढी असे ऐकून होतो.
अजून एक. बांगड्या भर म्हणणाऱ्या बायकाच जास्त असत. आताही जेन झी "पोरींच्या" हातात हे फलक आहेत असे दिसतेय.
त्यांनी एक नवीन पातळी गाठली आहे. बीवी नही है तो देश की मारोगे क्या?
म्हणजे हक्काची बायको असेल तर तिची हक्काने मारणे गृहीत आलेच.. ती नसली तर कोणाचीतरी मारलीच पाहिजे. हेही जेन झी पोरींच्या हाती..
याउपर सर्वात मोठी कडी म्हणजे जेन झी पिढीने एक मोठी क्षमता गमावलेली दिसते..
जोक इज ऑन व्हूम?? हे कळण्याची.
गर्दीत शिरून लुंगी वर केली की समोरचे अनेक जण डोळे बंद करून घेतात आणि उरलेले काही निर्लज्ज हसतात.
अशा वेळी लुंगी वर केलेल्याने समोरच्यांना कसा दणका दिला म्हणून स्वतःच हसणे.. जोक इज ऑन व्हूम?
आमची आई कोकणातली एक म्हण…
In reply to पोरींच्या हातातील बॅनर… by गवि
आमची आई कोकणातली एक म्हण सांगायची.
हगत्याला लाज
कि
बघत्याला
द्वेषाची पातळी किती खाली जाऊ शकते याचे नवेनवे आयाम पाहायला मिळत आहेत.
चालायचंच
हा हा
In reply to पोरींच्या हातातील बॅनर… by गवि
आपल्या मताचा आदर आहेच. सध्या, जुन्या वळणांच्या विचारांच्या माणसाला अशा पोरा पोरींच्या पोष्टरचा त्रास होणे अगदी साहजिकच आहे, नवल वाटत नाही. कपडे कसे घातले, कशी बोलतेस, संस्कारी राहीली पाहिजेस, चारचौघात खाली मान घालून चालली पाहिजे असे संस्काराची अपेक्षा असणारी जुनी खोडं आपल्या आजुबाजूला दिसत असतात. पण, जेव्हा त्या युवती आंदोलनासाठी रस्त्यावर उतरल्या तेव्हा विनाकारण युवतीस झापड मारणारा अधिकारी अशा लोकांना दिसत नाही, उचलून फरफटत नेणा-या मूली त्यांना दिसल्या नाहीत, रडणा-या ओरडणा-या मुलींचा अक्रोश दिसत नाहीत, हीच माणसं अमानुष लाठीमाराचा निषेध करताना दिसत नाहीत. पण, युवती कशा वागल्या हे सांगणारे सध्या खूप दिसत आहेत.
आधीच्या पिढ्यांनी 'सभ्यतेच्या' आणि 'मर्यादेच्या' चौकटीत राहून आंदोलने केली. पण जेन झी पिढीला हा खोटेपणा मान्य नाही. जेव्हा देशात खऱ्या अर्थाने स्त्रियांवर अत्याचार होतात, तेव्हा समाज आणि प्रस्थापित गप्प बसतात. पण आंदोलकांनी संतापून दोन शब्द लिहिले की मात्र समाजाला 'संस्कृती' आणि 'सभ्यतेची' आठवण येते. या मुलींचा संताप त्यातून बाहेर आला आहे, त्यांना माहीत आहे की गोड शब्दांत कोणीही त्यांचे ऐकणार नाही. सत्ताधाऱ्यांना आणि समाजाला अस्वस्थ करणे हाच त्यांच्या आंदोलनाचा मुख्य हेतू आहे. आणि तो हेतू या बॅनर्सनी शंभर टक्के साध्य केला असावा असे वाटते.
या मुली गर्दीत स्वतःचे हसे करून घेत नाहीत. त्या अत्यंत निर्भयपणे एका महाकाय आणि शक्तिशाली सत्तेच्या डोळ्यात डोळे घालून त्यांना सांगत आहेत की, "आम्ही तुम्हाला आणि तुमच्या खोट्या पुरुषार्थाला घाबरत नाही. आम्ही आपला आदर करतो पण आपण आमचा राग संताप जेव्हा बाहेर येतो तेव्हा आमची पिढी कोणाचेही ऐकणार नाही, आणि अभिव्यक्तीसाठी आम्हाला कशाचेही बंधन नाही, असा तो संदेश आहे असे वाटते, हे व्यक्तीगत मत आहे कोणाला पटले पाहिजे असा आग्रह नाही.
-दिलीप बिरुटे
पण आंदोलकांनी संतापून दोन…
In reply to हा हा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पण आंदोलकांनी संतापून दोन शब्द लिहिले की मात्र समाजाला 'संस्कृती' आणि 'सभ्यतेची' आठवण येते. या मुलींचा संताप त्यातून बाहेर आला आहे,
आंदोलन विरोधकांनापण संताप व्यक्त करण्याचा अधिकार आहे . आणि असे जागरुक " पुरुष " आपला संताप किती सभ्य भाषेत मांडतात ह्यासाठी लिंक देत आहे. कोणत्या स्त्रियांना रेप करून घ्यायला आवडते ह्याबदद्ल जाणून घ्या.
https://www.newindianexpress.com/states/kerala/2026/Jul/28/kerala-govt-orders-probe-into-rss-ideologue-t-g-mohandas-shoot-protesters-remarks
हे Satire आहे असे त्याचे म्हणणे आहे.
सहमत आहे. पुरुषाचा पोशाख…
In reply to पोरींच्या हातातील बॅनर… by गवि
सहमत आहे. पुरुषाचा पोशाख स्त्रीने घातला तर ते स्त्रीवादी, पण स्त्रीचा पोशाख पुरुषाने घालणे म्हणजे त्याला खिजवणे. पुरुषाला स्त्रीयांच्या वस्तूंवरून चिडवून आपण स्त्री म्हणजे दुय्यम हेच नकळतपणे बिंबवतोय हे बोल्डपणाच्या नादात समजत नाहीये.
आपल्या देशाच्या स्त्री…
In reply to सहमत आहे. पुरुषाचा पोशाख… by श्वेता व्यास
आपल्या देशाच्या स्त्री राष्ट्रपतीला एखाद्या सरकारी सोहळ्याला दूर ठेवणे हा त्या स्त्रीचा सन्मान समजायचा का?
संसदेत सत्ताधारी पक्षाचा खासदार एखाद्या अल्पसंख्याक खासदाराला अश्लील भाषेत शिवी देतो हे त्याच्या परिपकत्वेचे लक्षण मानायचे का? जेनझी जेव्हा हिच भाषा वापरतो तेव्हा त्यांना येथील अंकल अपरिपक्व समजतात.
माझा मुद्दा स्त्रीला इतर…
In reply to आपल्या देशाच्या स्त्री… by आग्या१९९०
माझा मुद्दा स्त्रीला इतर पुरुष किंवा समाज काय वागणूक देतो हा नसून स्त्री स्वतःच स्वतःला दुय्यम कशी करून ठेवते हा आहे. आणि तो विषयाशी अवांतर असल्याने प्रतिसाद दिले नाहीत तरी चालेल.
प्रतिसाद तुम्हाला दिला…
In reply to माझा मुद्दा स्त्रीला इतर… by श्वेता व्यास
प्रतिसाद तुम्हाला दिला नव्हता.
जेनझी हि ज्या मुद्यावर आंदोलन करत आहे ते सोडून त्यांच्याकडे काय उपाय आहेत ते कोणाबद्दल आणि कशी भाषा वापरतात ह्यावर लिहीणाऱ्यांसाठी आहे.
संसदेत आणि बाहेर आपले नेते काय भाषा बोलतात ह्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर हे विद्यार्थी देत आहेत. " " दीदी ओ दीदी " बोलणाऱ्याला इथे कोणी आणि किती विरोध केला आहे हे माहीत आहे. उगाच कोणाचे वकीलपत्र घेवून येवू नका. हो , नंतर सारवासारव करून विश्रांती घ्यावी लागते .
हा प्रतिसाद तरी मलाच दिलाय…
In reply to प्रतिसाद तुम्हाला दिला… by आग्या१९९०
हा प्रतिसाद तरी मलाच दिलाय का? तसा दिसत तर आहे, आणि आधीचाही तसाच दिसत आहे.
हा प्रतिसाद तरी मलाच दिलाय…
In reply to हा प्रतिसाद तरी मलाच दिलाय… by श्वेता व्यास
हा प्रतिसाद तरी मलाच दिलाय का? तसा दिसत तर आहे, आणि आधीचाही तसाच दिसत आहे.
हो , हा प्रतिसाद तुम्हालाच दिलाय आणि अगोदरचा चुकून झाला . प्रतिसादाची खिडकी उघडली गेली आणि लिहिताना लक्षात आले नाही. माफ करा , गैरसमज नसावा .
त्या स्त्रीचा सन्मान समजायचा…
In reply to आपल्या देशाच्या स्त्री… by आग्या१९९०
त्या स्त्रीचा सन्मान समजायचा का?
परिपकत्वेचे लक्षण मानायचे का?
विषयाला फाटे कसे फोडायचे ते यांच्या कडून शिका.
गवि काय लिहीत आहेत ते सोडून उगाच बीटींग अराउंड द बुश चालवलंय.
स्त्रीला दुय्यम दर्जा देण्याची चूक आंदोलनातील मुलीच करत आहेत त्याबद्दल लिहिलेले आहे.
याउपर सर्वात मोठी कडी म्हणजे…
In reply to पोरींच्या हातातील बॅनर… by गवि
याउपर सर्वात मोठी कडी म्हणजे जेन झी पिढीने एक मोठी क्षमता गमावलेली दिसते..
जोक इज ऑन व्हूम?? हे कळण्याची.
नेहमीप्रमाणेच हे आंदोलन सुद्धा मूळ मुद्दे सोडून असभ्य व्यक्तिगत हल्ले करून मोदींनाच सहानुभूती मिळवून देणार.
यापूर्वी सुद्धा मोदींवर व्यक्तिगत हल्ले करून मूळ मुद्दे भरकटल्याची अनेक उदाहरणे आहेत. निश्चलनीकरण, देशर संचारप्रतिबंध असे महत्त्वाचे मुद्दे हातात असूनही मोदींंची पत्नी, बायकोला सोडून पळालेला, चौथी नापास, निरक्षर, इंग्लिशचा गंध नाही, मोदींचे उच्चार, मोदींचा स्मृती इराणी, कंगना, मेलनी, सुषमा स्वराज यांच्याशी संबंध जोडून घाणेरडी टिंगल, १५ लाखांचे आश्वासन, मोदींचे लहानण . . . . यातून मूळ मुद्दे केव्हाच मागे पडले व व्यक्तिगत वारांमुळे मोदींनाच सहानुभूती मिळून लाभ झाला. यातील बहुसंख्य व्यक्तिगत आरोपात शून्य तथ्य होते (उदा. त्यांची पदवी, त्यांचे इंग्लिश, १५ लाखांचे आश्वासन, महिलांशी लावलेले संबंध इ.) व बहुसंख्य जनतेचा या कोणत्याही आरोपांवर शष्प विश्वास बसला नाही.
56 इंच छाती के लिये ब्रा कहा…
In reply to सरकारला जेनझी ने नागडं केलं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
56 इंच छाती के लिये ब्रा कहा मिलेगी'
'झोला मैं खरीदके देती हूँ, आप बस निकल जाओ,
'यु फक्ड विथ दी wrong जनरेशन'
'बीवी नही है तो देश की मारोगे क्या'
'स्टूडेंट थे इसलिए पेल दिया, रेपिष्ट होते तो पार्टी में ले लेते'
पॅडचं चित्र आणि 'इसने भी लिक नही होने दिया'
वरील स्लोगन ना तुमचा पाठींबा आहे?
कठीण आहे बाबा
Slogans of first election…
In reply to 56 इंच छाती के लिये ब्रा कहा… by खटपट्या
Slogans of first election are taunts for next. हि वार्निंग अरुण शूरी ह्यांनी विश्वघबरूना आधीच दिली होती. त्याचीच येथे प्रचिती येत आहे.
> 56 इंच छाती के लिये ब्रा कहा मिलेगी'
५६ इंचांची छाती हा शब्दप्रयोग सदर व्यक्तीनेच आपल्या पौरुषाचे उदाहरण म्हणून केला होता. त्या पौरुषावरच आंदोलकांनी कोटी केली आहे. ह्या संपूर्ण घोषणेत "अश्लील" असे काहीच नाही. ब्रा ह्या शब्दांत "अश्लील" काहीच नाही. आणि ह्याघोषणेत तर अत्यंत समर्पक आहे.
> 'झोला मैं खरीदके देती हूँ, आप बस निकल जाओ,
ह्यांत तर आक्षेपार्ह काहीच नाही. मी फकीर आहे, झोळी उचलून कधीही जाईन अशी घोषणा सादर विश्वाघाबरू ने केली होती. त्यावर शाब्दिक कोटी छान आहे.
> 'यु फक्ड विथ दी wrong जनरेशन'
ह्यांत शब्द हा अश्लघ्य असला तरी, आदोलनाच्या संदर्भांत अयोग्य वाटत नाही. Fuck हा शब्दप्रयोग शारीरिक संबंध म्हणून प्रामुख्याने शिवीप्रकारे वापरला जात असला तरी अश्या संदर्भांत हा शब्दप्रयोग आक्षेपार्ह मला वाटत नाही.
> 'बीवी नही है तो देश की मारोगे क्या'
पूर्णतः चुकीचा. अश्लाघ्य अशी घोषणा आहे. विश्वघब्रु च्या धर्मपत्नी प्रामाणिकपणे आपले जीवन सर्व फोकस पासून दूर जगत आहेत. त्यांना त्यांच्या पळून गेलेल्या पतीच्या राजकारणात अश्या प्रकारे आणणे पूर्णतः चुकीचे आहे. त्याशिवाय कुठल्याही व्यक्तीचे लैगिक जीवन किंवा त्याचा अभाव हा पूर्णपणे खाजगी विषय आहे. त्यावर ह्या प्रकारची घोषणा चुकीची आहे.
> 'स्टूडेंट थे इसलिए पेल दिया, रेपिष्ट होते तो पार्टी में ले लेते'
हि घोषणा कमी आणि वस्तुस्थिती जास्त वाटते. त्यामुळे ह्यांत गैर तरी काहीच वाटत नाही.
> पॅडचं चित्र आणि 'इसने भी लिक नही होने दिया'
सर्वांत विनोदी घोषणा हि आहे. ह्याला अवॉर्ड दिले पाहिजे.
--
मत्सरापायी एखादी व्यक्ती…
In reply to Slogans of first election… by साहना
मत्सरापायी एखादी व्यक्ती किती टोकाला जाउ शकते याचे उत्तम उदाहरण.
लवकर बरे व्हा.
यात एक अत्यंत किळसवाण्या…
In reply to मत्सरापायी एखादी व्यक्ती… by सुबोध खरे
यात एक अत्यंत किळसवाण्या विकृत प्रकार म्हणजे जमिनीवर मोदींचे चित्र ठेवून काही तथाकथित विद्रोही निर्भीड जेन झी मुले त्या चित्रावर वाकून तालमीत जोर मारतात तशी हालचाल करीत होते. ही हालचाल म्हणजे काय हे वेगळे सांगायला नको. हे करण्यासाठी एक झाला की दुसरा, दुसरा झाला की तिसरा सुरू होता. यांच्यावर किती विकृत संस्कार झाले आहेत हे पाहून अत्यंत किळस आली व खंतही वाटली.
आता लगेच मिपावरील काही जण या प्रकाराचेही समर्थन करण्यासाठी पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गुर्जी तुम्हाला जर "आमच्या…
In reply to यात एक अत्यंत किळसवाण्या… by श्रीगुरुजी
गुर्जी तुम्हाला जर "आमच्या गोबीच्या 'शान में तोहमत झाली' असे तुणतुणे वाजवायचे असेल तर खुशाल वाजवा. कुणाला काडीचा फरक पडत नाही. उलट अशी परिस्थिती का उद्भवली ह्यावर चिंतनशिबीर घेणे आवश्यक आहे नाही तर नंतर पक्षाचे चिता शिबीर ठेवावे लागेल."
अश्लील बोलणे आणि हावभाव करणे हे कुठल्याही देहाती अप्रगत समाजाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. हे घटक कुठल्याही समूहांत आले कि ह्या गोष्टी म्हणूनच येतात. त्यामुळे संपूर्ण आंदोलन काही चुकीचे ठरत नाही किंवा बहुसंख्य लोकांवर त्याचा आरोप योग्य ठरत नाही.
एकदा माणूस सार्वजनिक जीवनात आला कि त्याच्यावर कोणी ना कोणी गलिच्छ कमेंट करणारच. गांधीजी पासून नेहरू पर्यंत आणि मनमोहन सिंग पासून गोबी पर्यंत सर्वानाच हे सहन करावे लागते. तुमच्या भक्तीरूपी हृदयाला ठेच वगैरे पोचली तर कुरवाळत बसा. तुमची समस्या आहे.
एक दुरुस्ती
In reply to यात एक अत्यंत किळसवाण्या… by श्रीगुरुजी
ते चित्र (रस्त्यावर खडूने काढलेले) मोदींचे नाही धर्मेंद्र प्रधानांचे होते. अर्थात ते अतिशय चूक आहे, आणि त्याला चूक आम्ही तरी म्हणू शकतो बुवा, कारण आम्ही मुक्तविचारी आहोत न. आता प्रश्न हा पडतो की आंदोलनात असले प्रकार झाल्याने पूर्ण जेन झी चळवळ बदनाम होते तर मग एकट्या बाबू बजरंगीच्या अपराधामुळे पूर्ण गोध्रा पश्चात झालेला हिंदूंचा आक्रोश बदनाम होईल का? उत्तर नाही असे असल्यास आपल्यासारखे उत्तुंग बुद्धिवादी विवेकी व्यक्तिमत्व नक्कीच असल्या फालतूपणाला (खडू चित्र) दुर्लक्षित करून मुद्द्यावर फोकस करेल अशी रास्त अपेक्षा आहे.
(निरीक्षक लवाद) खोंड्या
आता लगेच मिपावरील काही जण या प्रकाराचेही समर्थन करण्यासाठी पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गुरुजी किती कला आहेत तुमच्याठाई ?
(नॉस्ट्रेडमस गुरुजींचा गरगर पंखा) खोंडे पंचाक्षरी.
> आता लगेच मिपावरील काही जण…
In reply to एक दुरुस्ती by वृषभ खोंडे
ह्यान्च्या शाब्दिक भुर्जीच्या आधी एक maintained assumption आहे ते खालील प्रकारे आहे.
या प्रतिसादांतील सर्व पात्रे आणि घटना काल्पनिक आहेत. कोणत्याही वास्तवाशी असलेले साम्य केवळ योगायोग समजावा.
गुर्जी नि side hustle म्हणून राशिभविष्य लिहिण्यास हरकत नाही.
१. उद्या पाऊस पडेल पण ऊन सुद्धा पडण्याची शक्यता आहे.
२. खर्च होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
३. परदेशप्रवासाचा योग आहे पण आरोग्याची काळजी घ्या.
४. वाहन काळजीपूर्वक चालवा.
इत्यादी.
नमो नमः ।
आता लगेच मिपावरील काही जण या…
In reply to यात एक अत्यंत किळसवाण्या… by श्रीगुरुजी
आता लगेच मिपावरील काही जण या प्रकाराचेही समर्थन करण्यासाठी पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तात्काळ प्रत्यंतर आले.
अहो नाय हो गुरुजी
In reply to आता लगेच मिपावरील काही जण या… by श्रीगुरुजी
फक्त थोडीशी व्हॉटअबाऊटरी उधार घेतली आहे. व्याज मिळेलच आपल्याला परत वेळोवेळी, पण मूळ मुद्दल तुमचे आहे जे कधीही विसरणार नाही, ग्वाही देतो !. मी फक्त समांतर रेषा ओढली आहे. माझे समर्थन धर्मेंद्र प्रधान खडू चित्राला पण नाही किंवा बाबू बजरंगीला सुद्धा नाही
(सीबील स्कोअर संतुलित ऋणको) खोंड्या
आता लगेच मिपावरील काही जण या…
In reply to यात एक अत्यंत किळसवाण्या… by श्रीगुरुजी
आता लगेच मिपावरील काही जण या प्रकाराचेही समर्थन करण्यासाठी पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अगदी अगदी.
या किळसवाण्या प्रकारांचे मिपावरच्या हिंदूद्वेष्ट्यांकडून प्रचंड समर्थन झाले आहे. आणि हे असले मिपाकर लोक्स काही GenZ नाहीत, ते शिंगे मोडून वासरांत शिरत आहेत. सध्या त्यांना मजा वाटत आहे, पण ज्यांचे ते समर्थन करत आहेत ती निरागस वासरे नाहीत, कठाळे आहेत, ते त्यांच्याच गाडीत शिंगे घुसवतील तेंव्हा त्यांना कळेल.
यांच्या नसानसात मोदीद्वेष,…
In reply to आता लगेच मिपावरील काही जण या… by कांदा लिंबू
यांच्या नसानसात मोदीद्वेष, हिंदूद्वेष इतका ठासून भरला आहे की कोणतेही निमित्त काढून तो द्वेष फसफसून बाहेर येतो. त्यातूनच अत्यंत किळसवाण्या विकृत कृत्यांचे समर्थन सुरू होते व त्यातून एक विकृत आनंद मिळतो.
> यांच्या नसानसात मोदीद्वेष,…
In reply to यांच्या नसानसात मोदीद्वेष,… by श्रीगुरुजी
राशिभविष्य सोडून गृहशोभिका मध्ये पाकक्रिया सुद्धा लहिण्याचे सुप्त टॅलेंट सुद्धा असावे. चहा खदखदून घ्यावा. दूध फसफसून घ्यावे इत्यादी.
> मोदीद्वेष
मोदींचा "द्वेष" असावा असा कुठला कमेंट कुठल्या मेम्बर ने कला आहे ? पुरावा द्यावा नाहीतर आपण उगाच आरोप करत आहोत हे मान्य करावे.
> हिंदूद्वेष
मोदींची किमान टीका किंवा विडंबना असावी पण हिंदुद्वेष वाटावा असा एकही कमेंट मला तरी शोधून सापडला नाही. तुमच्या गोबी भक्तीची लोक थट्टा करतात म्हणून तो "हिंदू" धर्म ठरत नाही. एक तर पुरावा द्यावा नाहीतर आपण उगाच काही बरळत आहोत हे मान्य करावे.
भाषेवरचे तुमची पकड पराकोटीच्या भक्तीने सैल झाली असावी म्हणून खालील विदा. पण हे सर्व तुम्हाला ठाऊक आहे, पण वेड पांघरून पेडगावला जायची सवय झाली आहे. आपल्या मतांशी सहमत नसलेल्या माणसाला हिंदुद्वेषी वगैरे संबोधित करण्याची सवय झाली आहे.
AI स्टार्ट
'द्वेष' (Dwesh) - अर्थ आणि व्याख्या
मराठी भाषेत 'द्वेष' म्हणजे एखाद्या व्यक्ती, गट, समाज किंवा विचाराबद्दल मनामध्ये असलेला तीव्र तिरस्कार, शत्रुत्व, रोष किंवा कोणाचेही वाईट चिंतण्याची भावना. ही एक अत्यंत नकारात्मक मानसिक अवस्था आहे, ज्यामध्ये समोरच्या व्यक्तीच्या अस्तित्वाचा, विचारांचा किंवा यशाचा राग असतो आणि त्याला हानी पोहोचवण्याची सुप्त किंवा स्पष्ट इच्छा असते.
द्वेष ची उदाहरणे (Examples of Dwesh)
जातीय किंवा धार्मिक तिरस्कार: केवळ एखादी व्यक्ती विशिष्ट जाती, धर्माची किंवा प्रांताची आहे म्हणून तिच्याबद्दल मनात अनामिक राग बाळगणे आणि तिला समाजात कमी लेखणे.
हेव्यापोटी नुकसान करणे: सहकाऱ्याच्या पदोन्नतीमुळे (Promotion) किंवा यशापयशावरून त्याच्याबद्दल जळफळाट होणे आणि त्याच्याबद्दल खोटी माहिती पसरवून त्याचे नुकसान करण्याचा प्रयत्न करणे.
टीका किंवा विडंबन हे 'द्वेष' का नाही? (Counter-examples)
प्रत्येक टीका किंवा विडंबन हे द्वेषापोटी केले जाते असे नाही. त्यांच्यामध्ये मूलभूत फरक असतो:
१. टीका (Criticism)
स्वरूप: एखाद्याच्या विचारांवर, कृतींवर किंवा धोरणांवर वैचारिक पातळीवर आक्षेप घेणे किंवा त्रुटी दाखवणे म्हणजे टीका.
द्वेष का नाही? टिकेचा उद्देश सुधारणा करणे, चुकीच्या गोष्टींवर प्रकाश टाकणे किंवा पर्यायी विचार मांडणे हा असतो.
उदाहरण: एखादा नागरिक किंवा पत्रकार सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणावर टीका करतो. यात त्या मंत्र्याबद्दल वैयक्तिक द्वेष नसून, त्या धोरणातील त्रुटींवर बोट ठेवलेले असते. त्यामुळे शास्त्रीय किंवा वैचारिक टीका ही द्वेष ठरत नाही.
२. विडंबन (Parody)
स्वरूप: मनोरंजनाच्या, व्यंग (Satire) किंवा प्रबोधनाच्या उद्देशाने एखाद्या कलाकृतीचे, घटनेचे किंवा व्यक्तीच्या शैलीचे हास्यविनोदी स्वरूपात अनुकरण करणे म्हणजे विडंबन.
द्वेष का नाही? विडंबनाचा उद्देश हसवणे किंवा सामाजिक-राजकीय वास्तवावर उपरोधिक मार्गाने प्रकाश टाकणे हा असतो. यात उपहास असतो पण वैयक्तिक पातळीवर कुणाचेही अहित करण्याचा किंवा द्वेष पसरवण्याचा भाव नसतो.
उदाहरण: एखाद्या लोकप्रिय सिनेमाची किंवा नेत्याच्या शैलीची स्टँड-अप कॉमेडीमध्ये किंवा व्यंगचित्रात केलेली खिल्ली. यात द्वेष नसून उपरोधिक विनोद असतो. त्यामुळे विडंबन हे द्वेष नव्हे.
AI एन्ड
नाही हो गुरुजी !
In reply to यांच्या नसानसात मोदीद्वेष,… by श्रीगुरुजी
तुम्ही परत पनवेल म्हणून वांद्रे स्लो पकडली ! .
रामभक्त हिंदू आम्ही, रामलला समोर कायम नतमस्तक, शनिवारी हनुमानाला तेल उडीद वाहणारे. घरचे सगळे कुलधर्म कुलाचार उपचारे निभावणारे, पोरांना रामरक्षा, भीमरूपी शिकवणारे.
आता राजकीय आंदोलन झाले, पोरांनी केले, नेत्यांना (घाण) शिव्या बसल्या, एकाने राजीनामा दिला. ते आंदोलन होताना काही हिंदू विरोधी घोषणा बसल्या (त्रिवार निषेध) पण आमचा फोकस मुद्द्यावर होता आहे राहील (आम्हा हिंदूंच्या महाभारतातील अर्जुन आणि पक्ष्याचा डोळा मधून ही शिकवण घेतो देतो आम्ही पिढ्यानपिढ्या)
आंदोलनाला समर्थन देणारे हिंदू विरोधी का ?
फक्त सत्ताधारी पक्षाला विरोध केल्यामुळे का ?
माझ्या आणि माझ्या रामाच्या मध्ये यायची परवानगी मी कोणालाच दिलेली नाही त्यामुळे आमच्यावर हा शिक्का का ?
हिंदू धर्म वेगळा आणि हिंदुत्व वेगळे नाही का ?
(नेशन वॉन्ट्स टू नो) अर्णब खोंडे
वाह! मानले बुवा!
In reply to आता लगेच मिपावरील काही जण या… by कांदा लिंबू
अनुस्वार विरहित शाब्दिक कोटी आवडली. पण तूर्तास आम्ही गाडीत घातलेले इथेनॉल ह्या विषयावर विचार करतोय. तुमच्या पण गाडीत असणार बरंका ते, बघा बुवा काय ते. शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे बैल खोंड इत्यादी पाळीव प्राणी आवरणे जमते म्हणून खोंडे आहे आम्ही.
(फ्री विल रँच मिसळपाव काउंटी टेक्सास खुर्द मालक) जॅक खोंडे
हा हा हा !!!
In reply to वाह! मानले बुवा! by वृषभ खोंडे
अनुस्वार विरहित शाब्दिक कोटी आवडली. पण तूर्तास आम्ही गाडीत घातलेले इथेनॉल ह्या विषयावर विचार करतोय. तुमच्या पण गाडीत असणार बरंका ते, बघा बुवा काय ते. शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे बैल खोंड इत्यादी पाळीव प्राणी आवरणे जमते म्हणून खोंडे आहे आम्ही.
हा हा हा !!! काही ठिकाणी नियमांच्या कचाट्यातून वाचण्यासाठी अश्या कोट्या कराव्या लागतात, दादा; आता तुम्हाला हे मी सांगणे म्हणजे अगदीच ...
बाकी, आम्ही सुद्धा शेतकरीच बरं का. कागदावर स्केल ठेऊन पेन्सिलीने सरळ रेष ओढावी तशी (उजव्या हातात रुमनं धरून, डाव्या हातात कासरा धरून, नीट तिफण चालवून) एकरांशी वावरात एकसारखी सरळ पेरणी करण्याचे कौशल्य आहे, पण यांत्रिक शेतीने त्याची काही गरज उरली नाहीय!
- (शेतकरी) कांदा लिंबू
अवतार
In reply to हा हा हा !!! by कांदा लिंबू
हाँंगआशा्शी ,
आता तुम्हाला कुणी म्हणाले, नाव विष्णू अवताराचे, काम बळी राजांचे. तर मला सांगा.
अपमान झाला तर कुणाचा झाला? तुमचा? विष्णू चा? की बळी राजाचा ?
आणि कसा?
सीतापती हे संबोधन श्री रामाने ही मिरविले आहे अभिमानाने.
त्याचा अपमान वाटतो का?
आता तुम्हाला कुणी म्हणाले,…
In reply to अवतार by अभ्या..
आता तुम्हाला कुणी म्हणाले, नाव विष्णू अवताराचे, काम बळी राजांचे. तर मला सांगा.
अवतार विष्णूचाच आहे, रूपेही त्याचीच आहेत. आणि हे पूर्ण विश्वाला माहित आहे. प्रत्यक्ष विष्णूचा अवतार असा लपून थोडीच राहणार? पण त्या गोष्टीचा विनाकारण बाऊ करून, विष्णूचा अवतार कार्यात खोडा घालण्याच्या हीन मनसुब्याने , तसेच कार्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी कार्यकर्त्याच्या रूपांची चर्चा करण्याने मध्यंतरी एका क्षुद्र जीवास त्या अवताराने आपले क्वचितच दिसणारे रौद्र रूपही दाखविले होते!
प्रश्न काय?
In reply to आता तुम्हाला कुणी म्हणाले,… by कांदा लिंबू
अपमान दोन्ही उदाहरणात कुणाचा कसा विचारले आहे.
.
लीला चरित्र नको...
ते माहिोती आहे..
> या किळसवाण्या प्रकारांचे…
In reply to आता लगेच मिपावरील काही जण या… by कांदा लिंबू
> या किळसवाण्या प्रकारांचे मिपावरच्या हिंदूद्वेष्ट्यांकडून प्रचंड समर्थन झाले आहे. आणि हे असले मिपाकर लोक्स काही GenZ नाहीत, ते शिंगे मोडून वासरांत शिरत आहेत. सध्या त्यांना मजा वाटत आहे, पण ज्यांचे ते समर्थन करत आहेत ती निरागस वासरे नाहीत, कठाळे आहेत, ते त्यांच्याच गाडीत शिंगे घुसवतील तेंव्हा त्यांना कळेल.
पुरावे देऊन बोलावे.
नक्की कुठल्या "किळसवाण्या" गोष्टीचे कुणी कुठे समर्थन केले आहे ? नेहमीच्या मोदी विरोधकांनी सुद्धा इथे कुठल्याही किळसवाण्या गोष्टीचे समर्थन केले आहे असे दिसून येत नाही. उलट नसत्या गोष्टी सोडून "मुद्याचे बोला" हाच सूर लावून धरलेला आहे.
शहाणा माणूस बोटाने चंद्र दाखवत असताना मुर्खाला त्या बोटाच्या नखावर नजर रोखून धारावीशी वाटते.
सांप्रत काळी मी संघ / भाजप /…
In reply to > या किळसवाण्या प्रकारांचे… by साहना
सांप्रत काळी मी संघ / भाजप / मोदी समर्थक नाही. वेळोवेळी त्यांच्यावर (त्यांच्या समर्थकांना खोडून काढता न येणारी) टीका करतो. (एकेकाळी काही अंशी त्यांचा समर्थक होतो. त्यांची धोरणे बदलली तर त्यांचे पुढे समर्थन करीन. मी काँग्रेस समर्थक नाही. तरीही त्यांच्या काही बाबींचे मी समर्थन केले आहे. पुढेही करीन)
मिपावर मी वेळोवेळी मांडलेल्या मुद्द्यांमधून हे दृग्गोचर होते.
धर्मेंद प्रधान यांची कारकीर्द काही फारशी समाधानकारक नव्हती. विद्यापीठांतील सवर्णविरोधी नियमांमुळे तर ती पुरती डागाळली. मोदी सरकारचे शैक्षणिक धोरण, त्यांच्या शिक्षण खात्याचा कारभार, शिक्षण मंत्र्याची कारकीर्द याचे मी कधीही समर्थन केलेले नाही. वेळोवेळी त्यांवर टीकाच केली आहे.
सदर NEET आंदोलनासंदर्भात देखील मी सरकारचे / सरकारच्या धोरणांचे कधीही समर्थन केले नाही. न पटलेल्या बाबींवर टीकाच केली आहे. त्यामुळे मी मोदी समर्थक या भूमिकेतून इथे लिहितो असा आरोप माझ्यावर कुणी करू शकत नाही.
आता माझे हे वरचे विधान व त्यातील ठळक भाग -
या किळसवाण्या प्रकारांचे मिपावरच्या हिंदूद्वेष्ट्यांकडून प्रचंड समर्थन झाले आहे. आणि हे असले मिपाकर लोक्स काही GenZ नाहीत, ते शिंगे मोडून वासरांत शिरत आहेत. सध्या त्यांना मजा वाटत आहे, पण ज्यांचे ते समर्थन करत आहेत ती निरागस वासरे नाहीत, कठाळे आहेत, ते त्यांच्याच गाडीत शिंगे घुसवतील तेंव्हा त्यांना कळेल.
जंतरमंतर वरील आंदोलनात प्रभू श्री रामांचा अवमान करण्यात आला. माझ्यासहित अनेकांनी त्याचा निषेध नोंदवला. GenZ च्या तथाकथित अभिव्यक्तीचे समर्थन करणाऱ्यांनी या घटनेचा निषेध केला का? मिपावर तरी मला तसे दिसले नाही.
तेंव्हा हिंदूंच्या पूज्यस्थानाचा अवमान ही बाब समाजकंटकांसाठी अतिशय सुगंधी, सुवासिक असेल, पण प्रत्यक्षात मात्र तो अतीशय किळसवाणा प्रकार आहे. आणि या किळसवाण्या प्रकारांचे मिपावरच्या हिंदूद्वेष्ट्यांकडून प्रचंड समर्थन झाले आहे.
> या किळसवाण्या प्रकारांचे…
In reply to सांप्रत काळी मी संघ / भाजप /… by कांदा लिंबू
> या किळसवाण्या प्रकारांचे मिपावरच्या हिंदूद्वेष्ट्यांकडून प्रचंड समर्थन झाले आहे.
मिपावर कुठे समर्थन कुणी केले आहे ? साधा पुरावा मागितला आहे.
उगाच पैसे कधी देता हे विचारल्यावर गणपती बाप्पा मोरया म्हणून ओरड मारावी हा प्रकार चालू आहे.
अजून एक स्पेशल सायंदैनिक पुरवणी
In reply to यात एक अत्यंत किळसवाण्या… by श्रीगुरुजी
२०२१ मधे एक केस झाली होती सुल्ली डील्स केस. त्यात मुसलमान समाजातील (बुरखा त्यागून शिक्षण घेऊन व्यावसायिक जीवनात यशस्वी इत्यादी) स्त्रियांचे फोटो पोस्ट करून त्यावर "लिलाव बोली" लावत ही मुल्ली माझी ती तुझी इत्यादी पोस्ट केले जात असे.
त्याहून पुढे जाऊन २०२२ मधे ह्याच किळसवाण्या प्रकाराचे चक्क एक ऍप बनवूून ते GitHub वर होस्ट करण्यात आले होते. दिल्ली पोलिस स्पेशल सेल आणि मुंबई पोलिसांनी अर्थातच केस मधे नीट तपास करून आरोपींना न्यायालयापुढे हजर केले होते. तत्कालीन मिसळपाव वर तेव्हाही उच्चविद्याभूषित आणि सुशिक्षित भद्रजनांत त्याच्या विरुद्ध संतापाची लाट नक्की उसळली असेल फक्त ती दिसली नाही कुठे !
(इन्व्हेस्टिगेटिव पत्रकार) रामनाथ खोंडे
आता लगेच मिपावरील काही जण या प्रकाराचेही समर्थन करण्यासाठी पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
(नवशिक्या नॉस्ट्रेडमस) खोंडे
> मत्सरापायी एखादी व्यक्ती…
In reply to मत्सरापायी एखादी व्यक्ती… by सुबोध खरे
> मत्सरापायी एखादी व्यक्ती किती टोकाला जाउ शकते याचे उत्तम उदाहरण.
उगाच काही तरी अल्पप्रयत्न कमेंट करून जाण्यापेक्षा व्यवस्थित उदाहरण द्या.
वरील घोषणांच्या विश्लेषणात कुठे मत्सर आहे किंवा टोकाची भूमिका आहे ? मत्सर कुणाचा ? गोबीजींचा ? कश्यासाठी म्हणून ? ते ७५ वर्षांचे आहेत. जे काही त्यांना मिळवायचे होते ते मिळवले. आता त्यांची उतरती कळा आहे. त्यांचा मत्सर नक्की का म्हणून मला असेल ? गोबी सरकारने अपेक्षेपेक्षा कमी काम केले. भारताचे LKY होण्याची त्यांची क्षमता होती ते नेहरू २.० झाले असे त्यांचेच समर्थक म्हणत आहेत. मला सुद्धा मान्य आहे. कदाचित तुम्हाला सुद्धा असेल.
ज्या व्यक्ती गोबीच्या भक्तीरसांत ओथंबून जात आहेत, "त्यांना अहो ती गंगा नाही, तुम्ही गटारांत लोळत आहात" एव्हडेच मी सांगत आहे. माझे नैतिक कर्तव्यच आहे. त्यांत काय मत्सर आहे. ? योग्य त्या वेळी गोबीसाहेबांचे समर्थन सुद्धा केले आहे, सदर विद्यार्थ्यांचा अंदोलनाची सुद्धा टीका केली आहे. पण कुणी अश्लील घोषणा दिल्या म्हणून नाही. शहाण्याने चंद्राकडे बोट दाखवले तर मूर्ख माणूस बोटांच्या नखांकडे लक्ष केंद्रीत करतो. हि तशी गोष्ट आहे.
सध्याच्या आंदोलनात युवा वर्गाचा प्रामुख्याने सहभाग आहे आणि त्यांच्यात प्रक्षोभ आहे. ह्या प्रक्षोभाचे रूपांतर ज्या आंदोलनात झाले आहे त्याला पाठिंबा नसला तरी त्यातील लोकांना राग येण्याचा अधिकार आहे कि नाही ह्यावर चर्चा होणे आवश्यक होते. ती चर्चाच बंद पडण्याचा प्रयत्न केला गेला. आता मूळ मुद्दा सोडून घोषणा अश्लील आहेत, मुलांनी आदोलनाच्या वेळी चिप्स खाऊन पाकीट जमिनीवर फेकले असल्या निरर्थक गोष्टी पुढे आणून भाजीपाव मंडळी जनतेची दीशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचा प्रतिवाद होणे आवश्यक आहे.
१. कुठल्याही आंदोलनात एकदा जनता एकत्र आली कि संधीसाधू मंडळी त्यांत घुसून आपले हाथ धुण्याचा प्रयत्न करतात. वांगचुक, अण्णा, केजरीवाल, राहुल गांधी आणि भूतकाळांत सुषमा स्वराज इत्यादी मंडळी ह्या वर्गांत मोडतात. ह्या संधीसाधू व्यक्ती घुसल्या म्हणून वेळ आणि पैसे दवडून येणारे सर्वच आंदोलनकर्ते हे संधीसाधू, मूर्ख किंवा व्ययैक्तिक फायद्यासाठी येतात असे नाही.
२. आंदोलनाची व्याप्ती वाढली कि भारतीय लोकशाहीला धोका उत्पन्न करणारे लोक आपोआप फायदा घेतात. ह्याचा अर्थ आंदोलन त्यांचेच आहे किंवा आंदोलनकर्ते हे ह्या दुष्ट लोकांचे समर्थक आहेत असेही होत नाही.
३. जिथे असंख्य लोक तिथे सर्व प्रकारचे लोक असतील. व्यसनी, अश्लील बोलणारे, अश्लील हावभाव करणारे, घाणेरडे बोलणारे इत्यादी पण हे आंदोलनाचे व्यवच्छेदक लक्षण होत नाही. भाजीपाव चे समर्थक जे स्वतः संस्कारी असण्याचा आव आणतात त्या प्रौढ व्यक्ती किती खालच्या स्तरावर जाऊन किती गलिच्छ भाषा ह्या संकेतस्थळावर करतात हे आम्ही पहिले आहे. भाजपच्या मिटींग्स मध्ये मी भूतकाळांत गेले आहे. तिथे मनमोहन सिंघांच्या विषयी काय काय बोलले जात होते, कसल्या प्रकारची भाषा आणि हावभाव केले जात होते हे सुद्धा पाहिले आहे. त्यामुळे ह्यांत नवीन काही नाही. ह्या गोष्टींवर फोकस करून मूळ मुद्याला बगल देणारी मंडळी इथे दिशाभूल करत आहेत हे स्पष्ट करणे आवश्यक आहे.
४. टोकाची भूमिका म्हणे. मी काळजीपूर्वक भाषेचे विश्लेषण केले आहे. हि भाषा गलिच्छ आहे त्याला गलिच्छ म्हटले आहे. पण इतर घोषणांत नक्की काय वाईट आहे हे तुम्हाला स्पष्ट करणे आवश्यक आहे. ह्यांत टोकाचे काय आहे ? ह्याच घोषणा कुणाच्याही विरोधांत असल्या तरी हेच म्हटले असते. मत्सराचा प्रश्नच नाही.
तुम्ही मला भजनमंडळीतले वाटत नाही त्यामुळे योग्य त्या वेळी ईश्वरीय प्रेरणेने डोळे उघडतील अशी आशा धरते !
मत्सरापायी एखादी व्यक्ती…
In reply to मत्सरापायी एखादी व्यक्ती… by सुबोध खरे
मत्सरापायी एखादी व्यक्ती किती टोकाला जाउ शकते याचे उत्तम उदाहरण.
लवकर बरे व्हा.
संपूर्ण सहमत.
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा !
ज्ञानदेवे रचला पाया तुका झालासी कळस अशा भक्ती परंपरेने ज्या महाराष्ट्राला जातीधर्म पंथ प्रांत सगळ्या बंधनातून मुक्त करून विष्णुदास केले मेणासारखा मऊ स्वभाव आणि प्रसंगी वज्राचा निर्धार दिला त्याच परंपरेने सकल महाराष्ट्राला विठुराय बरोबर गोष्टीला बरोबर आणि चुकीच्या गोष्टीला चूक म्हणण्याची सुबुद्धी देऊ देत हीच प्रार्थना.
जेन झीच्या फलकांविषयी:"हे…
जेन झीच्या फलकांविषयी:
"हे बोलायचं नाही, तसं वागायचं नाही" अशा भीतीच्या चौकटीला जेन झीने एका आठवड्यातच सुरुंग लावला. जे शब्द अश्लील किंवा अर्वाच्य म्हणून मागच्या पिढ्या दाबून ठेवत होत्या, त्याच पिढ्या अनेक कटू वास्तवांवर मात्र सोयीस्कर मौन बाळगत होत्या. जेन झीने हा दुटप्पीपणा उघडपणे नाकारला.
त्यांच्या फलकांची भाषा टोकदार, स्पष्ट आणि कोणताही आडपडदा न ठेवणारी आहे. त्यांनी कथित सभ्यतेचा आणि संस्कृतीच्या नावाखाली उभारलेल्या दिखाऊ मुखवट्याचा भंग केला आहे.
या सगळ्यातून एक गोष्ट ठळकपणे दिसते या पिढीची स्पष्टता हेवा वाटावी अशी आहे. आधीच्या अनेक पिढ्यांनी भावना, अन्याय आणि वेदना मनातच दडपून ठेवल्या; जेन झी तसं करत नाही. विशेषतः महिलांनी मुकाटपणे सहन करायचं, अन्याय गिळून गप्प राहायचं, यातच कर्तव्य समजायचं, ही अनेक पिढ्यांची मानसिकता या पिढीने मोडून काढ आहे असे दिसले.
याचा अर्थ ही पिढी स्वैराचारी किंवा बेजबाबदार आहे असा नाही; उलट ती स्वतःचं म्हणणं निर्भीडपणे आणि स्पष्टपणे मांडणारी आहे. वरवर बेफाम वाटणारी ही पिढी प्रत्यक्षात अत्यंत जागरूक, प्रश्न विचारणारी आणि सत्तेला अस्वस्थ करणारी ठरू शकते.
तुम्ही स्वैराचार शब्द वापरला म्हणून
In reply to जेन झीच्या फलकांविषयी:"हे… by गणेशा
एक मजेशीर माहिती द्यायचा मोह टाळत नाही, इथे मोदींना गुप्तांग इत्यादी पोस्टर दाखवणारी ही पिढी शिव्या देणारी ही पिढी सेक्सुअली आजवरची सगळ्यात उदासीन पिढी आहे ! असे हल्लीच एका ठिकाणी वाचले होते ! त्यामुळे ही पोरे एखाद्याला xxड्या म्हणण्यात त्या अवयवाचा वर्णनोद्भाव अश्लील भाव आहे का फक्त एक टारगट नॉन कन्फर्मिस्ट अभिव्यक्ती आहे ही रेखा आपल्यासारख्या ढळलेल्या पिढीला कळण्यास खूपच पुसट आहे असे वाटते
+१ २०१२ मध्ये एक आंदोलन…
In reply to जेन झीच्या फलकांविषयी:"हे… by गणेशा
+१
२०१२ मध्ये एक आंदोलन झाले ह्याला हिंसक वळण लागले आणि त्याचा एक कुप्रसिद्ध फोटो आहे. एक मुस्लिम मुलगा अमर जवान ज्योती ला लाथ मारत आहे असा. आता युवा वर्गाने ह्या प्रकारची हिंसा करावी कि अश्लील घोषणांचे फलक घेऊन आंदोलन करावे ? आम्हाला काय पाहिजे ?
युवा पिढी ज्या प्रकारे आपल्या खाजगी जीवनात बोलते, ज्या पद्धतीने राग व्यक्त करते त्याच पद्धतीने मुलांनी आपला राग आंदोलनात व्यक्त केला आहे असे दिसते. काही जुन्या वळणाच्या मंडळींना हे आवडत नाही हे स्वाभाविक असले तरी निव्वळ भाषाशुचितेचे नियम तोडले म्हणून आंदोलन आणि त्यांच्या मागण्या अनैतिक होत नाहीत. आंदोलनाच्या मागण्या आणि त्यातून ओढवलेली नामुष्की हे लपविण्यासाठी मंडळी ह्या गोष्टींचा विनाकारण बाऊ करत आहेत.
काही ठिकाणी तर निव्वळ थापा चालल्या आहेत.
उदाहरण पहा :
> 56 इंच छाती के लिये ब्रा कहा मिलेगी
ह्यांत अश्लील गलिच्छ किंवा शेलके असे काहीच नाही. ज्या व्यक्तीच्या विरोधांत हि घोषणा आहे त्याच व्यक्तीने " आपली ५६ इंच ची छाती " हा विषय आपल्या शौर्याच्या विषयांत आपले पौरुष दाखविण्यासाठी वापरला होता. त्याचा फायदा करून घेतल्यावर त्यावर त्याच माणसाची भाषा वापरून कोटी करणे माझ्या मते अत्यंत क्रेयेटीव्ह आहे.
भाषाशुचितेच्या दृष्टीने ब्रा ह्या शब्दांत काहीही अश्लील नाही. कुणाला तसे वाटते तर आपले डोके तपासून घेण्याची गरज आहे.
IT सेल ने आपले टूलकिट वापरून आंदोलनकर्त्यांना देशद्रोही, विदेशी ताकत के हात, हिंसक इत्यादी इत्यादी ठरविण्याचा प्रयत्न केला. हिंसाही झाली नाही आपले स्वतःचे हसे झाले. मागणी पूर्ण झाल्यानंतर आंदोलन आपोआप थंडावले.
आंदोलन थंडवण्यासाठी IT सेल ने जातीय फूट पाडण्यासाठी "आंदोलनाचा पुढील टप्पा आरक्षणाच्या विरोधांत असेल" अशी अफवा सुद्धा पसरवली आहे.
याचा अर्थ ही पिढी स्वैराचारी…
याचा अर्थ ही पिढी स्वैराचारी किंवा बेजबाबदार आहे असा नाही; उलट ती स्वतःचं म्हणणं निर्भीडपणे आणि स्पष्टपणे मांडणारी आहे. वरवर बेफाम वाटणारी ही पिढी प्रत्यक्षात अत्यंत जागरूक, प्रश्न विचारणारी आणि सत्तेला अस्वस्थ करणारी ठरू शकते.
अगदी बरोबर .
हि मुले अपेक्षेपेक्षा हुषार निघाली हे बऱ्याच पालकांच्याही पचनी पडले नाही. येथील अंकल पार्टीने तर सरकारपेक्षा अधिक धसका घेतला आहे. ह्या विद्यार्थ्यांनी आमच्याकडे प्रत्येक समस्थेकडे उत्तर आहे असा दावा केलेला नाही हे अंकल पार्टीला माहीत नाही का? उगाच फाटे फोडत आहेत.
अखेर धर्मेंद्र प्रधानांनी…
अखेर धर्मेंद्र प्रधानांनी मंत्रीपदत्याग केला. खूप उशीर केला, पण मोदी-शहांना अंदाज आला की परिस्थिती हाताबाहेर जात आहे व त्यातून त्यांना मंत्रीपदत्याग करण्यास सांगितले असावे. योग्यवेळी माघार हे मोदींची कार्यपद्धती आहे व तीच पुन्हा एकदा त्यांनी वापरली.
ओ काय पण काय ?
In reply to अखेर धर्मेंद्र प्रधानांनी… by श्रीगुरुजी
योग्यवेळी माघार हे मोदींची कार्यपद्धती आहे व तीच पुन्हा एकदा त्यांनी वापरली.
ही योग्य वेळ आहे ? इतकी नाचक्की होऊन जगभरात ! ? पोरांची डोकी फोडून बदनामी होऊन ?? पहिल्या दोन दिवसात तिथे फक्त दिपके अन् वांगचुक असताना डाव्या विद्यार्थी संघटना पूर्ण ताकदीने तिथे जमा होण्याच्या अगोदर काही केले असते तर वेगळे, हे असे आठवडाभर आय माय शिव्या खाऊन स्वतःच्या अन् संलग्न व्यक्तींच्या अवयवांच्या (ह्यात इटालियन पीएम सुद्धा आल्या) चर्चा होऊन गेल्यावर राजीनामा घेतला अन् म्हणे योग्य वेळ ?
दिल्ली सीमेवरील शेतकरी…
In reply to ओ काय पण काय ? by वृषभ खोंडे
दिल्ली सीमेवरील शेतकरी आंदोलन किंवा भूमी अधिग्रहण विधेयके यातून कधी माघार घेतली व त्याचा पुढे कसा लाभ मिळाला तो इतिहास पहा.
कोणी लिहिलेला ?
In reply to दिल्ली सीमेवरील शेतकरी… by श्रीगुरुजी
तथ्याधारित का तुम्ही मिसळपाव वर लिहून हौस पुरवून घेतलेला? 😂😂😂😂😂
स्वतः शोध घ्या.
In reply to कोणी लिहिलेला ? by वृषभ खोंडे
स्वतः शोध घ्या.
जसा विकास सापडत नाही तसा
In reply to स्वतः शोध घ्या. by श्रीगुरुजी
जसा विकास सापडत नाही तसा
घेतला की !
In reply to स्वतः शोध घ्या. by श्रीगुरुजी
प्रज्ञाचक्षु + तर्कचक्षु दोन्ही लावून शोधला , काहीच सापडले नाही !
भक्तिचक्षु नाहीयेत मोकळे, आमचे तरी भक्तीचक्षु आज अन् कायम पांडुरंगावर भिस्त ठेवून आहेत अन् त्याच्यापुढे काही बघत नाहीत, त्याच्यावर गंडांतर आले तर समाचार घ्यायला आम्ही पुरेसे खंबीर आहे त्यासाठी आम्हाला संस्थात्मक किंवा सरकारी ओंजळीने धर्माच्या गायीचे दूध प्यायची गरज नाही, शिक्षण नावाचे वाघिणीचे दूध पुरेसे आहे.
रच्याकने , रामलला पुढील दानपेटीतील भक्तीच्या परिसीमेतून भोळ्या हिंदूंनी टाकलेल्या चवली पावलीच्या समुच्चयाचा अपहार करून भ्रष्टाचाराच्या कमाई ने बंगले बांधल्याबद्दल तर रामलला ने ही शिक्षा केली नाहीये ? ह्यावर पुढील बौद्धिकात एक सेशन घ्या !
आणि तुमच्या प्रतिसादाचा एकंदरीत सूर
In reply to अखेर धर्मेंद्र प्रधानांनी… by श्रीगुरुजी
😂😂😂😂😂
सेल बी लाईक
In reply to अखेर धर्मेंद्र प्रधानांनी… by श्रीगुरुजी
पांडू तुम्हारी एक महिने की तनखा कट.
अर्थात यातून मूळ समस्या…
अर्थात यातून मूळ समस्या सुटलेली नाही, परंतु आंदोलन आता थंड होईल असे वाटते.
आता " चंदा चोर गद्दी छोड़ "…
In reply to अर्थात यातून मूळ समस्या… by श्रीगुरुजी
आता " चंदा चोर गद्दी छोड़ " बाकी आहे. अर्थात हे आता भक्तच करतील .
आंदोलन थंड झाले.
In reply to अर्थात यातून मूळ समस्या… by श्रीगुरुजी
आंदोलन थंड झाले.
राजकारण रीड करणे शिका
In reply to आंदोलन थंड झाले. by श्रीगुरुजी
जमेल तुम्हाला नीटच !
पोरं जिंकली, genz रॉक्स 👍
पोरं जिंकली, genz रॉक्स 👍
"विठ्ठल पावला हो genz ला"…
In reply to पोरं जिंकली, genz रॉक्स 👍 by Bhakti
"विठ्ठल पावला हो genz ला"
-इति Genx
खरंच जिंकली का हे…
In reply to पोरं जिंकली, genz रॉक्स 👍 by Bhakti
खरंच जिंकली का हे समजण्यासाठी थोडा काळ प्रतीक्षा करावी लागेल. Won a battle, but lost the war असेही होऊ शकते.
गेल्या बारा वर्षांत…
गेल्या बारा वर्षांत सरकारकडून एकतरी काम नीट झाले.