Skip to main content

कॉकरोच जनता पार्टी आंदोलन- दिल्ली. (भाग दोन )

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी गुरुवार, 23/07/2026 06:56 या दिवशी प्रकाशित केले.

कॉकरोच जनता पार्टी आंदोलन- दिल्ली. पहिल्या भागात मिपाकरांनी शांततेच्या मार्गाने आपल्या भावना व्यक्त केल्या. नीट परीक्षेचे पेपर  लीक होणे आणि तत्त्सम घोटाळ्याविरुद्ध दिल्ली येथे जंतरमंतरवर सीजेपी अर्थात कॉक्रोच जनता पार्टी या युवकांच्या सामाजिक चळवळीने  केंद्रसरकारमधील शिक्षणमंत्र्याच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन त्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन सुरु  केले  आहे.  वीस तारखेला संसदेवर निघालेल्या मोर्चा अडवून विद्यार्थ्यांना, युवतींना महिला पालकांना जी अमानुष मारहाण केल्या गेली त्या क्र्रुरतेचे आणि कौर्याचे  असंख्य व्हीडीयो सामाजिक माध्यमांवर दिसत आहेत.   'बेटी बचाओ,बेटी पढावो' म्हणना-यांनी  लेकी बाळींचा केलेला अपमान, डोकी फोडणे,  जायबंदी करणे 'अमानुष मारहाण' असेच वर्णन वीस जुलैच्या  घटनेचे वर्णन करावे लागते.  संसदेवर जाणा-या या मोर्चाला लाठीमाराशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता ? प्रश्न विचारता येईल आणि चर्चाही करता येईल.  सोनम वांगचुंग यांना उपचाराच्या निमित्ताने  जबरदस्तीने उचलून आंदोलन मोडता येते काय, असा प्रयत्न सरकारने करुन पाहिला, मारहाण करुन युवकांना पळवून लावण्याचा प्रयत्न झाला. मुलं घाबरुन जातील आणि आंदोलन स्थळांवरुन पळून जातील असे सरकारला वाटले असावे, पण असे काही झाले नाही. उलट, आंदोलनाची तीव्रता वाढत चालली आहे. 

दुसरीकडे, मन की बाता कराव्यात तशा आणि त्या टाइपच्या गप्पा सुरुच आहेत. '' पेपरफुटी हे घोर पापआहे. तरुणांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात आली असून भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी केंद्र आणि सर्व राज्य सरकारांनी पक्षभेद बाजूला ठेवून एकत्र काम केले पाहिजे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी 'एनडीए' संसदीय पक्षाच्या बैठकीत व्यक्त केले''  मात्र, केंद्र सरकारच्या वतीने केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या आंदोलकांच्या मागणीबाबत कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली नव्हती.  सीजेपीच्या प्रतिनिधींनी केंद्रीय मंत्री नड्डा यांना मागण्यांचे लेखी निवेदन दिले असले तरी त्यावरही केंद्र सरकारने मंगळवारी मौन बाळगले.

आता सध्या कालच्या घडामोडीत जंतर-मंतरवरील आंदोलनाची तीव्रता कमालीची वाढलेली पाहता, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. आंदोलकांच्या या मागणीला पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र येऊ लागले आहेत. आज महाराष्ट्र बंदची हाकही देण्यात आली आहे. एकाच वेळी आंदोलन आणि विरोधकांचा चहूबाजूंचा हल्लाबोल, लोकसभा आणि राज्यसभेतला गोंधळ पाहता, केंद्र सरकारची बुधवारी कोंडी झाल्याचे चित्र निर्माण झाले. महिनाभर संवाद टाळणाऱ्या केंद्र सरकारने अखेर आंदोलकांशी गंभीर चर्चा सुरू केली असून, केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी आंदोलकांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. 

सरकारविरोधात आम्ही पुन्हा मोर्चा काढणार नाही आणि जंतर-मंतरवरून हलणार नाही. आता केंद्र सरकारने जंतर-मंतरवर येऊन चर्चा करावी किंवा तटस्थ स्थळी बैठक घ्यावी, असे  कॉक्रोच  जनता पार्टी'ने (सीजीपी) बुधवारी स्पष्ट केले. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना १ कोटी रुपयांची नुकसानभरपाई, आणि कोणतीही फौजदारी कारवाई केली जाऊ नये, या तीनही मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असे 'सीजीपी'च्या प्रतिनिधींनी केंद्र सरकारकडे स्पष्ट  केले. 

''गेल्या दहा वर्षांत देशभरात १५२ परीक्षा पेपरफुटीच्या घटना घडल्या असून, त्याचा जबरदस्त फटका सुमारे ७.५ कोटी विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबांना सहन करावा लागला आहे. मात्र, या प्रकरणांमध्ये एकाही आरोपीला शिक्षा झालेली नाही, असा गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बुधवारी इंदिरा भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केला''

लेखनातील माहिती कंटेंट  लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. सकाळ या छापील वृत्तपत्रातून चर्चेसाठी घेतले आहे. तर, मिपाकर हो शांततेच्या मार्गाने आपापली मतं मांडत राहू या..


 


वाचने 7966
प्रतिक्रिया 309

प्रतिक्रिया

कॉकरोच आंदोलनाच्या विषयापेक्षा वाढत्या आंदोलनाचा त्रास फॉलोअर्सला व्हायला लागला आहे.  गाव गल्लीतले सपोर्टर  आंदोलनाची  बदनामी करायला पुढे सरसावलेले दिसत आहेत. पण, भक्तांच्या दुर्दैवाने  काल '' जंतर मंतरमध्ये प्रवेश देण्यापूर्वी प्रत्येक विद्यार्थ्याच्या बॅगांची तपासणी केली जात होती. मग दगड आले कुठून ? दिल्ली पोलिसांनी उत्तर द्यावे'' असे आवाहन अभिजीत दिपके यांनी केली. 

दुस-या बातमीत,  दिल्लीमधे कॉकरोच पार्टीने काढलेल्या मोर्चावर पोलिसांनी केलेल्या  लाठीमाराच्या आणि कारवाईच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास आणि  चित्रफिती पाहण्यास नकार देत, आमचा वेळ वाया घालवू नका असे म्हणत तातडीने सुनावणी घेण्यास मा. सरन्यायधीश सूर्यकांत यांनी नकार दिला. तरीही,  माझ्याकडे पोलिसांच्या क्रुरतेच्या चित्रफिती आहेत परवानगी मिळाल्यास दाखवू इच्छितो असे याचिकर्त्याच्या वकिलांनी म्हणाल्यावर चित्रफिती पाहण्यात रस नाही ते पाहण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही, असे सरन्यायधीश म्हणाले.  ( संदर्भ लोकसत्ता ) बाय द वे, भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका सुनावणीदरम्यान काही बेरोजगार तरुण आणि टीकाकार झुरळासारखे असतात असे विधान केल्याचे वाचकांना स्मरत असेलच. 

अन्य एका याचिकेत दिल्लीत आंदोलकांवर पोलिसांकडून अति बळाचा वापर केल्याचा आरोप करणा-या दोन याचिकांवर दिल्ली उच्चन्यायालयाने शहर पोलिसांकडून उत्तर मागवले  संबंधित अधिका-यांना सीसीटीव्ही कॅमेरा फूटेज आणि चित्रफिती सुरक्षित ठेवण्याचे निर्देश दिले. 

एकूण सरकारची भूमिका पाहता आणि वाढते आंदोलन पाहता, आंदोलन आता एका निर्णायक वळणाकडे जात असल्याचे दिसत आहे. काय काय होते अपडेट देत राहीनच. 

-दिलीप बिरुटे

 


त्या प्रोफेसरांची हकालपट्टी करा युनिव्हर्सिटीच्या नोकरीतून.

पुढचे धडा घेतील.


In reply to by कंजूस

कंजूसकाका सत्तेत असलेले लोक अनपढ़ आहेत काही सातवी आठवी पास असतीलही उच्च शिक्षण आणि तत्सम गोष्टीचं गांभीर्य त्या लोकांना नाही. देवाळू श्रद्धाळु बाबा बुवा यावर भरवसा असणारे लोक देव सांभाळून घेईल असेच समजतात.

म्हणजे, परीक्षा घेण्याची, प्रश्नपत्रिकांची गुप्तता राखण्याची आणि ती सुरक्षित ठेवण्याची मुख्य जबाबदारी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) आणि केंद्र सरकारची होती. यंत्रणेतील ढिसाळपणा आणि सुरक्षेतील गंभीर त्रुटींमुळेच हा पेपर फुटला यांचं शिक्षण उच्च शिक्षणाचे फायदे वगैरे कळतच नाहीत.  

कुंभमेळा वगैरे विषय असला की त्यांचा उत्साह बीयरसारखा फसफसतो.

 

-दिलीप बिरुटे


In reply to by कंजूस

शिक्षा करावी असे तुमचे म्हणणे आहे ? काहीतरीच काय बोलताय? 

किती उदात्त हेतु होता त्यांचा!!  अगदी स्मरणशक्ती च्या जोरावर पेपर जसा च्या तसा लिहुन दिला. आणी त्यांना शिक्षा करायची ? काहीही हं तुमचे!! 

ह्याला सर्कार जबाब्दार आहे. मी तर म्हणतो सरकार बर्खास्त करुण टाकु हाय काय अन नाय काय !!


In reply to by कंजूस

बस, इतकीच शिक्षा?

 

त्यांना जेलमध्ये टाकून त्यांची संपत्ती जप्त केली पाहिजे.


मग ती कॉलेजेस, केंद्रे सावध राहतील.

किंवा मुंढेच्या हातात कारभार सोपवा.

फार पूर्वी युनिव्हर्सिटीच्या परीक्षांचे निकाल ठराविक तारखांना येत नसत तेव्हा तो कारभार सरकारने एका आइएएस अधिकाऱ्याकडे ( बहुतेक  अलेक्झांडर असे नाव होते) दिला होता. त्याने एका झटक्यात सगळ्यांना ताळ्यावर आणले होते. प्रोफेसरांकडून अधिकार काढून घेतले म्हणून त्यांनी आरडाओरड केलेली.  पण व्यवस्थापन सांभाळणे आणि काम करवून घेणे त्यांना जमत नाही. एकमेकांना पाण्यात पाहाणे आणि पोटदुखीने ग्रासलेले असतात.


विद्यापिठे आणि परिक्षा पद्धती यावर कोसला मधे मार्मीक टीका केली आहे.

दुर्दैवाने आज एकही विद्यापीठ विद्यार्थ्याना त्यांच्या ज्ञानाचा व्यावसायीक उपयोग कसा होईल हे शिकवत नाही.

पी एच डी चे प्रबंध लिहून नक्की काय केले जाते हा संशोधनाचा विषय होऊ शकतो.  गेल्या पन्नास वर्षात  भारतात सगळी मिळून दीड दोन लाख तरी पी एच डी धारक झाले असतील पण त्यांच्या संशोधनाचे /  प्रबंधांचे पुढे काय झाले या बद्दल विद्यापीठाना माहीत नसते.

त्या प्रबंधाचा समाजाला ( टेक्नीकल / सामाजीक / औद्योगीक / व्यावसायीक  ) उपयोग काय होतो हे समजत नाही.


In reply to by विजुभाऊ

माझा एक वर्गमित्र वरिष्ठ प्राध्यापक आहे. तो बऱ्याच पी एच डी च्या  विद्यार्थ्याना मार्गदर्शन करतो. तो मला सांगत होता की भारतात छोट्या छोट्या कॉलेजातुन केली जाणारी पी एच डी ही फक्त नोकरीतली पदोन्नती घेण्यासाठी असते. त्याचा संशोधनाशी काहीही संबंध नसतो.


In reply to by सुक्या

सहमत आहे.

मला पी एच डी करायची होती त्या वेळेस मला असे सांगण्यात आले की

"तुम्हाला कशाला हवी आहे पी एच डी. नुसते वाचन ज्ञान वाढवायचे असेल तर पुस्तके वाचा.

आम्ही सध्या  पी एच डी साठी ज्यांचे प्रमोशन अडकले आहे अशानाच प्राधान्य देतो आहोत".

 


विद्यापीठीय शिक्षण हे  विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा वेळ वाया घालवते असे मला वाटते.


In reply to by विजुभाऊ

खरं आहे, सद्य सरकारने नवीन शैक्षणिक धोरण 2020  आणले आणि शिक्षणाचा खेळखंडोबा करुन टाकला आहे.

 

-दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नवीन शैक्षणीक धोरणामुळे जुन्या धोरणातील चुका सुधारणार असतील तर  सुरवातीला बदल पचवायला थोडे कठीण जाईल.

तसेही इतिहासाच्या पुस्तकात आपल्याला फक्त कोंगलांचा इतिहास शिकवला गेलाय.

पूर्व आणि दक्षीण  भारताचा इतिहास शालेय विद्यार्थ्याना माहीतच नसतो.

भारतीयानी  केलेल्या संशोधनाबद्दलही कोणाला माहीत नसते.

दहावी बारावी म्हणजे फक्त गणीत शास्त्र इंग्रजी इतकेच काय ते माहीत असते मुलाना.

इंजिनीयरिंग मधेही अभ्यासक्रम नव्या तंत्रानुसार बदलायला हवेत. शिक्षक आणि मुले अजूनही बी एल थेरजा चे पन्नास वर्ष जुने पुस्तक वापरतात.

कॉमर्स मधे तर बी कॉम पास मुलाना  पी एन एल बनवता येत नाही.   बैंकेत चेक बाउन्स झाला ही एन्ट्री कशी करायची माहीत नसते. पाच वर्षे अकाउंट्स शिकुनही ही गत असेल तर  ते शिक्षंण म्हणजे टाईम पासच म्हणावे लागेल

 

 

 


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

+१

माझा मित्र बायोटेक अभ्यासक्रम २०२० नुसार तयार करायला होता. ज्यात बायोटेक कोर विषय सोडून इतर विषयांचा भरणा होत होता. भांडूण भांडूण दोन बायोटेक विषय सामील करायलाच लावले.

म्हणाला "बर झालं आपलं शिक्षण आधीच झाले आहे 😅"


In reply to by Bhakti

 

यातले कुठले दोन बायोटेक विषय सामील करायलाच लावले 🤔

https://www.aicte.gov.in/sites/default/files/biotechnology.pdf

 


In reply to by Bhakti

 पहिलीपासूनच अभ्यासक्रमात अनेक निरूपयोगी, कालबाह्य विषयांचा भरणा केला आहे.


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चूक. १९४७ पासून आजतागायत सर्व सरकारांनी, किंबहुना ब्रिटिश काळापासून, भारतात शिक्षणाचा खेळखडोबा झालाय व १९४७ नंतर सर्व सरकारांनी त्यात यथाशक्ती भर टाकलीये.


जाणकारांसाठी प्रश्न - समजा या आंदोलनाने नेपाळ, बांग्लादेश सारखी परिस्थिती आली, तर देशामध्ये राष्ट्रपती राजवट येऊन पुन्हा निवडणुका होतील ?


In reply to by श्वेता व्यास

तशी परिस्थिती येणारच नाही. भारतीय समाज अत्यंत दुभंगलेला आहे.  जेव्हा परकीय आक्रमण होते तेव्हाच बऱ्याच प्रमाणात जनता एकत्र येते. सध्याची परिस्थिती क्रांती होण्याइतकी पुढे गेलेली नाही. २०११ मध्ये  बऱ्याच प्रमाणात जनता अण्णा हजारेंच्या पाठीशी होती. आता तितकी टोकाची परिस्थिती नाही. २०११ मध्ये विरोधकही तितके दुर्बल नव्हते. २०२६ मध्ये विरोधक फारसे शिल्लक नाहीत व जे शिल्लक आहेत ते अत्यंत दुर्बल आहेत.‌

 

त्यामुळे काहीही होणार नाही. काही दिवसांनंतर परिस्थिती पूर्वपदावर येईल. 


In reply to by श्रीगुरुजी

तीच अपेक्षा आहे. प्रधानांनी राजीनामा देऊन किंवा सरकार बदलून प्रश्न सुटणार नाहीये, कीड व्यवस्थेमध्ये आहे हे न कळण्याइतके खरंच सहभागी हुशार विद्यार्थी भाबडे असतील? कदाचित दूरगामी परिणामांचा विचार न करता फक्त आत्ता मला हेच हवंय असा हट्ट असेल.


In reply to by श्वेता व्यास

कोणीही आले तरी प्रश्न सुटणार नाही, परिस्थिती बदलणार नाही, व्यवस्था किडलेलीच राहील हे विद्यार्थ्यांना माहिती आहे. ज्याप्रमाणे अत्यंत कडक शिक्षा देण्याचे नियम केले तरी लोकशाही व्यवस्थेत गुन्हे थांबत नाहीत कारण गुन्हेगारांना निसटण्यासाठी असंख्य पळवाटा व संधी लोकशाही व्यवस्थेत द्याव्याच लागतात. पण गुन्हे थांबत नाहीत म्हणून शिक्षाच द्यायची नाही असे करता येत नाही. तसेच प्रधानांनी पद सोडले तरी परिस्थिती आहे तशीच राहील ही वस्तुस्थिती असूनही प्रश्नपत्रिका सार्वजनिक झाली यासाठी संबंधित लोकांना कोणत्या तरी स्वरूपात शिक्षा मिळायला हवी व प्रधानांनी पद सोडणे हे त्यासाठीच आवश्यक आहे. 

 

मुळात वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर का परीक्षा घ्यायची? तसे केल्याने बहुसंख्य विद्यार्थ्यांना आपल्या गावात, शहरात प्रवेश मिळणे अवघड झाले आहे. बहुतेकांना परराज्यात जावे लागते व प्रश्नपत्रिका सार्वजनिक झाली तर देशातील सर्व विद्यार्थ्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतात. प्रत्येक राज्याने आपापल्या राज्यात वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देण्याची व्यवस्था पूर्वी होती. महाराष्ट्रातील बहुसंख्य विद्यार्थ्यांना आपापल्या राज्यात, शहरात प्रवेश मिळत होता. १२ वीत जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या विषयात मिळालेल्या गुणांवर प्रवेश मिळत असे. महाराष्ट्रात किमान ५-६ विभागीय उच्च माध्यमिक मंडळे आहेत. एखाद्या विभागात एखाद्या विषयाची प्रश्नपत्रिका सार्वजनिक झाली तरी त्याचा परिणाम संपूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांवर न होता केवळ त्याच विभागातील विद्यार्थ्यांवर होत असे. आता राष्ट्रीय पातळीवर वेगळी परीक्षा असल्याने संपूर्ण देशात गडबडीचा परिणाम होतो. राज्यांची स्वायत्तता सुद्धा या बाबतीत नष्ट झाली आहे. राज्यातील बहुसंख्य विद्यार्थ्यांना परराज्यात जावे लागते.  पण AIIMS साठी अजून वेगळी परीक्षा आहे. तेथे नीटमधून का कोणी जाऊ शकत नाही? 

 

केंद्राने विनाकारण वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश पद्धतीत हस्तक्षेप केल्याने परिणामांची तीव्रता देशभर जाणवते व या गोंधळाचे उत्तरदायित्व केंद्रीय मंत्र्यानेच घ्यायला हवे. 


In reply to by श्रीगुरुजी

साधे गणित  आहे. प्रांतीय किंवा विभागीय स्तरावर प्रवेश परीक्षा घेतल्याने त्या भागातील शिक्षण संस्थेत प्रवेश उपलब्ध असतो. राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत जास्त सीट उपलब्ध असल्याने प्रवेश मिळण्याची संभावना वाढते. 

 

त्याही पेक्षा महत्वाचा मुद्दा हा की इच्छु विद्यार्थ्यांला तीन चार-पाच प्रवेश परीक्षेत बसावे लागायचे. भ्रष्टाचार मुद्दा वेगळाच.   ए एफ एम सी,एम्स सारख्या ठिकाणी मेरीट वर प्रवेश आज मिळत आहे.

 अहिल्यानगरची मुलगी एम्स  मधून  मेडिकल चे शिक्षण घेत आहे. 

पुर्वी ए एफ एम सी,एम्स  सारख्या काॅलेजेस करता वेगवेगळी परिक्षा द्यावी लागत होती.


In reply to by कर्नलतपस्वी

>>> साधे गणित  आहे. प्रांतीय किंवा विभागीय स्तरावर प्रवेश परीक्षा घेतल्याने त्या भागातील शिक्षण संस्थेत प्रवेश उपलब्ध असतो. राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत जास्त सीट उपलब्ध असल्याने प्रवेश मिळण्याची संभावना वाढते. 

 

राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत जास्त जागा उपलब्ध असल्याने स्पर्धक सुद्धा त्याच प्रमाणात वाढतात. राष्ट्रीय स्तावर परीक्षा असल्याने शेवटी प्रत्येकाला देशात कोठेतरी प्रवेश मिळेलच. परंतु बहुतेकांना परराज्यात जावे लागेल. महाराष्ट्रात १० टक्के लोकसंख्या राहते. म्हणजे सरासरी १० टक्केच मराठी इच्छुकांना महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळू शकतो, उर्वरित ९० टक्क्यांना परराज्यात जावे लागेल (चूभूद्याघ्या). पण राज्यपातळीवर प्रवेश व्यवस्था असेल तर सर्व मराठी इच्छुकांना महाराष्ट्रातच प्रवेश मिळेल.

 

एक एफ एम सी लष्करी वैद्यकीय महाविद्यालय असल्याने तेथील प्रवेशासाठी वेगळी व्यवस्था असणे समजू शकते. परंतु एम्ससाठी वेगळी व्यवस्था असण्याची अजिबात आवश्यकता नाही. 


धर्मेंद्र प्रधानांनी पदत्याग करून काहीच साध्य होणार नाही. त्यांच्या जागी दुसरा/दुसरी येईल तो/ती तितकाच/तितकीच बरावाईट/बरीवाईट असणार आहे. तस्मात् व्यवस्थेत शष्प बदल होणार नाही. 

 

उद्या हे सरकार बदलून पूर्ण नवीन सरकार आले तरीही परिस्थितीत शष्प बदल होणार नाही. नवीन आलेले सरकार आताच्या सरकारपेक्षा कणभरही वेगळे नसेल. 

 

जसे महाराष्ट्रात मविआ सरकार जाऊन मविआ-२ सरकार आले तसेच केंद्रातही संपुआ सरकार गेले तरी आताचे सरकार संपुआ-२ सरकार या स्वरूपात आहे. 


In reply to by श्रीगुरुजी

नेपाळमध्ये आंदोलन होऊन नवीन सरकार येऊन आता काही महिन्यांतच नवीन सरकारविरोधात आंदोलने सुरु झाली आहेत.


In reply to by श्रीगुरुजी

एकदा एक कोल्हा नदी ओलान्डत असतो, त्यावेळी त्याच्या अंगावर असंख्य जळवा चीकटून त्याचे रक्त पिऊ लागल्या.  तो अगदी अर्धमेला होउन गेला होता.  त्याची ती दशा पाहुन नदीतील एक खेकडा त्याला म्हणाला, "मी तुझ्या अंगावरच्या जळवा काढून देऊ का?"  त्यावर त्याला नकार देत कोल्हा म्हणाला, "नको, मला चिकटलेल्या जळवांचे रक्त पिऊन झाले आहे व त्या मला नुसत्या चिकटून आहेत.  जर तु ह्याना काढलेस तर तेथे नविन जळवा येऊन चिकटतील व त्या माझे ऊरलेसुरले रक्त पिउन टाकतील व मी मरेन"

तात्पर्य -  नवीन सरकार क्षमा, नवीन जळवा अजुन रक्त पितील.

 


नीट पेपर फुटीत जे जे  सरकारी कर्मचारी दोषी असतील ( अगदी आरक्षणाचे जन्मजात कवचकुंडले घालून आलेले असतील तरी) त्यांच्या डांगीवर लाथा हाणून लगेच बडतर्फ करावे . PF / gratuity / पेन्शन  काही ही देऊ नये त्यांना.. आणि पुढील ३ पिढ्यांना सरकारी नोकरीला apply  सुद्धा करता येणार नाही याची तजवीज करावी. बघा मग भविष्यात कशी पेपरफुटी होते का ते ? सगळ्या सरकारी जावयांना माहित आहे...काही ही केलं तरी नोकरी जात नाही आपली म्हणून हे सगळं चालून जातं  भारतात.


In reply to by dadabhau

हे मोठे गुन्हे आहेत हा कायदा करा. मंत्र्यांच्या राजीनाम्यापेक्षा महत्त्वाचे आहे. हा मंत्री गेला तरी समाजातील प्रवृत्ती नष्ट होणे गरजेचं आहे.

आंदोलन करणे याला माझा विरोध नाही. सरकारविरोधी आवाज उठवाच पण गुन्ह्याच्या मूळ हेतूकडे लक्ष असू द्या.


शिक्षण व्यवस्था आधीही परिपूर्ण नव्हती, हे आपण मान्य करू. पण गेल्या काही वर्षांत तिची वाटचाल वाईटाकडून आणखी वाईटकडे झाली आहे, हेही तितक्याच स्पष्टपणे बोलले पाहिजे.


गेल्या ८-१० वर्षांत शिक्षणाचा घसरलेला दर्जा, बंद पडत चाललेल्या शाळा, भाषा धोरणातील गोंधळ, इयत्ता ११वी - १२वीला मिळालेले दुय्यम स्थान, सातत्याने वाढणाऱ्या फी आणि अशा अनेक गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष करता येणार नाही.


मुद्दा हा नाही की कोण कोणाला पाठिंबा देतो. खरा मुद्दा हा आहे की व्यवस्थेतील भ्रष्टाचार, निष्क्रियता आणि असंवेदनशीलतेमुळे लोकांमध्ये प्रचंड असंतोष आणि फ्रस्ट्रेशन निर्माण झाले आहे. जेव्हा लोकांना वाटते की त्यांच्या प्रश्नांना कुठेच न्याय मिळत नाही, तेव्हा ते आवाज उठवण्यासाठी पर्यायी मार्ग शोधतात. 

 

आज अशी परिस्थिती आहे की अनेक पत्रकारही छातीठोकपणे स्वतःला पूर्णपणे निष्पक्ष म्हणू शकत नाहीत,  अशा वेळी लोक रस्त्यावर उतरतात, हे आश्चर्यकारक नाही.


कोणाला "गुंड" म्हणणे, किंवा व्यक्तींवर टीका करून मूळ प्रश्नांपासून लक्ष विचलित करणे, हा उपाय नाही. शिक्षण व्यवस्थेची झालेली अधोगती आणि त्यासाठी सरकारला जाब विचारणे हे प्रत्येक नागरिकाचा लोकशाहीतील अधिकार आहे.


आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आंदोलन करणारे हे या देशाचेच नागरिक आहेत. त्यांच्या आंदोलनाशी मतभेद असू शकतात, पण त्यांच्यावर पोलिसांकडून अमानुष लाठीमार करणे कोणत्याही लोकशाहीला शोभणारे नाही. ते नीच कृत्य केले गेले आहे हे मान्य करावेच लागेल.

कायदा व सुव्यवस्था राखणे आवश्यक आहे, पण त्याचबरोबर आंदोलन करणाऱ्या नागरिकांच्या मानवी हक्कांचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाही सन्मान राखला गेला पाहिजे.

उद्या पुण्याच्या मोर्च्यात मी सामील होणार  

- गणेश जगताप 


In reply to by गणेशा

मोर्चात सहभागी होणार असला तर 

एकही खिसा नसलेला सदरा परिधान करा. 


१९९६ साली आपली लोकसंख्या ९८ कोटी होती आणि २००८ साली १२१ कोटी म्हणजेच. या १२ वर्षात २३ कोटी मुलं जन्माला आली.

म्हणजेच २०१४  ते २०२६ या काळात २३ कोटी तरुण १८ वर्षांचें होऊन नोकरीच्या बाजारात आले.

सर्वच्या सर्व सरकारी निमसरकारी स्थानिक स्वराज्य संस्था लष्कर निमलष्करी दले यात मिळून २.३ कोटी सरकारी नोकऱ्या आहेत.

म्हणजेच सर्वांच्या सर्व सरकारी नोकरांना बडतर्फ केले तरी  ९० % लोकांना सरकारी नोकरी मिळणें अशक्य आहे.  त्यातून आपल्याकडे शिक्षणमहर्षी यांनी शिक्षणाचा जो काही अभूतपूर्व खेळ खंडोबा करून ठेवला आहे त्यामुळे मुलांना मिळणारे शिक्षण हे त्यांना नोकरी किंवा धंद्याच्या बाजारात निरुपयोगी आहे.

यातून हे तरुण केवळ वैफल्यग्रस्त आणि निराश होतात. प्रत्येकाला सरकारी नोकरीच हवी असते. ती मिळणे शक्य नाही. पण हे कोणीही सांगणार नाही.

सश्री मोदी यांनी मुलांना व्यवसायाभिमुख शिक्षण घेऊन व्यवसाय  करा मग तो भाजी टाळण्याचा का असेने हे सांगितले तर त्याबद्दल केवढा गदारोळ झाला.

तरुणांची माथी भडकावणे सहज सोपे असते. आपल्या पेक्षा कमी बुद्धिमत्तेच्या पण आपल्या  बरोबरच्या  मागास वर्गीया ला आरक्षणातून आणि श्रीमंतांच्या मुलाला खाजगी मिळताना पाहून तरुण अधिकच वैफल्यग्रस्त होतात. यातून मग मराठा जाट धनगर वंजारी माळी अशा अनेक जातीचे पुढारी त्यांना आरक्षणाचे गाजर दाखवतात.  त्यासाठी अनेक तरुण आपली डोकी फोडून घेतात.              

मागच्या तीन दशकांत आय टी मध्ये आलेल्या लाटेत बी एस सी (आय टी) किंवा कोणत्याही शाखेतील अभियंत्यालाच काय  हवशा नवश्या गवशाला पण ५० ते ७५ हजारांची नोकरी मिळत होती. आता कृत्रिम बुद्धिमत्ता आल्याने  हा बुडबुडा फुटला आहे. पण झकपक कपडे घालून वातानुकूलित खोलीत आयटी ची नोकरी सर्वाना हवीहवीशी वाटते आहे ज्या नोकऱ्या फार कमी झाल्या आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेत महारथ असलेल्याना आजही भरपूर पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत. पण त्याला लागणारे उच्च कौशल्य किती तरुणांकडे आहे?          

या वैफल्याचा फायदा उठवून सध्याचे आंदोलन चालू आहे.

सध्या परिस्थिती काय आहे? तंत्र शिक्षण घ्यायची कुणाची तयारी नाही. कारण हाताने काम करण्याची कुणाची तयारी नाही.

आज तुम्ही एसी, पाणी शुद्धीकरण यंत्र, इलेक्ट्रिशियन, प्लम्बर, गवंडी, इ क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर मुसलमान किंवा राजस्थान कडचे कारागीर दिसतात. कारण त्यांच्याकडे शिक्षण नाही म्हणून ते अशा क्षेत्रात येऊन काम करता करता शिकून तंत्रज्ञ होत आहेत आणि मुंबई सारख्या शहरात बऱ्यापैकी  पैसा कमावत आहेत. 
पण आपल्या मराठी तरुणांना त्यात रस नाही.

सरकरने आम्हाला शिक्षण दिले पाहिजे नोकऱ्या दिल्या पाहिजेत आम्हाला सगळं घर बसल्या मिळालं पाहिजे या वृत्तीतून बाहेर आलं पाहिजे. पण विरोधी पक्षात असलं कि अफाट आश्वासनं द्यायची आणि सत्तेत अली कि त्यांच्या तोंडाला पानं पुसायची हा आपल्या ७५ वर्षांचा इतिहास आहे.

जो नेता सांगतो कि आरक्षणातून तुम्हाला काहीही फायदा होणार नाही त्याला घरी बसवलं जातं आणि जो सांगतो आरक्षण हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे त्यासाठी तुम्ही लढा दिला पाहिजे त्याचा उदो उदो होतो.

आज या तरुणांनी असलेलं सरकार पाडलं आणि नवं  सरकार आणलं तरी ते सरकारी नोकऱ्या कुठून निर्माण करणार आहेत? आपल्याला बाजारात आवश्यक असणारे कौशल्य आपणच मिळवले पाहिजे हे आईबापानी  सांगितलं पाहिजे. सरकार आपल्याकडूनच घेतल्याशिवाय आपल्याला फार काही देऊ शकत नाही हि वस्तुस्थिती त्यांना कुणी सान्गु इच्छित नाही.    

पण शासनाच्या सह सचिव( जॉईंट सेक्रेटरी) या उच्च पदावर कार्यरत असणाऱ्या  बाईं जरांगे पाटील आपल्याला आरक्षण देतील या आशेवर होत्या. मला धक्काच बसला. अर्थात ते आरक्षण मिळाले नाही म्हणून त्या आता फडणवीस यांच्यावर खापर फोडताना दिसतात.  

नेपाळ श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तान मध्ये या अराजका मुळे काय चालू आहे हे तरुणांना समजावण्याच्या ऐवजी येथे पण नेपाळ श्री लंकेसारखी क्रांती केली पाहिजे हे सांगणाऱ्या नेत्यांना अक्षरशः देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली पाहिजे.

झुरळांच्या नेत्यांकडे काही तरी ठोस कार्यक्रम आहे का?        

नीट मधून १ लाख ३७ हजार जागा उपलब्ध आहेत यात ६३ हजार सरकारी महाविद्यालयात आहेत  आणि २२ लाख इच्छुक आहेत 
there are a total of 136,939 MBBS seats available across India for the 2026-27 academic session, which includes 63,296 government seats and 73,643 private seats.

मग बाकी २० लाख विद्यार्थी हे काय करणार आहेत? याबद्दल झुरळांकडे काही विचार आहे का?                             
        
परीक्षांत पेपर फुटणे हे वाईट आहेच. पण हे गेली ७५ वर्षे चालू आहे. माझ्या लहानपणापासून मी हे ऐकत आलो आहे.

आपल्याला एका परीक्षेत यश मिळाले नाही तर काय होईल याचा विचार आईबापांनी करून ठेवणे आवश्यक आहे. त्यात प्राधान्यक्रम ठरवून ठेवणे आवश्यक असते. अन्यथा विश्वास नांगरे पाटील यांच्या कहाण्या  ऐकून  तिशी पर्यंत यू पी एस सी च्या वाऱ्या करून झाल्यावर खाजगी कंपनीत चिकटून सरकारला शिव्या घालणारे लोक काही कमी नाहीत.        

झुरळांकडून आशा ठेवणारे अतिउच्च शिक्षित लोक पाहिले कि हसावे कि रडावे हे कळत नाही.  

मोदी सरकारच्या आत्यन्तिक द्वेषातून लोक आपली सारासार बुद्धी गहाण कशी ठेवतात याचे आश्चर्य वाटते.  


In reply to by सुबोध खरे

झुरळं, कॉग्रेस,मोदी,भाजपा, आरक्षण, सरकारी नोकऱ्या - ह्यापलीकडे एक जग आहे खरे च(म)च्चा.

शिक्षण, accountability, process, क्वालिटी - साध्या सोप्या सरळ बाबी.

मला वाटतं तुमची वास्तवाशी नाळ पूर्ण तुटली आहे. पण लिहीत रहा. एक केस स्टडी म्हणून तुमचे प्रतिसाद उपयोगी पडतील.

जाता जाता - इथे कुणाला वेळ असेल तर LLM कडून खरेच(म)च्चांचे गेल्या दहा वर्षांतले प्रतिसाद निवडून analyze करायला सांगा.

आपोआपच कळून जाईल बुद्धीभ्रंश म्हणजे काय असतं ते.

 


In reply to by सुबोध खरे

>>>परीक्षांत पेपर फुटणे हे वाईट आहेच. पण हे गेली ७५ वर्षे चालू आहे. माझ्या लहानपणापासून मी हे ऐकत आलो आहे.

 

डॉक्टर साहेब आत्ता सकाळी खूप हसलो बघा, लिहीते राहा. आपल्या आवडत्या सरकारचं  xxxx धुवायच्या नादात आपण कशाचंही समर्थन करु लागतो त्याचं उत्तम उदाहरण वरील प्रतिसाद वाटला. बाय द वे ते चालू ठेवा.  गेली पंच्याहत्तर वर्ष पेपर फूटी ऐकत होतो हे वाचून हसावे की रडावे कळत नाही. स्वातंत्र्यानंतर येथील शिक्षणाचं प्रमाण अगदी कमी होतं, पंधरा ते वीस टक्के शिक्षणाचं प्रमाण होतं. आठवी दहावी झाली की नोक-या होत्या, आमच्या मराठवाड्यात तर पुढील शिक्षणासाठी हैद्राबादेत जावे लागत असे.  आमच्याकड़े तर विद्यापीठाची स्थापना 1958 ला झाली. शिक्षण, इतिहास वगैरे पण वाचत चला.

स्वातंत्र्या नंतरच्या काळातील शिक्षण पद्धतीमध्ये नैतिक मूल्ये, शिस्त आणि प्रामाणिकपणा याला सर्वोच्च स्थान होते. परीक्षा मंडळांचे अधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये एक उच्च पातळीवरील उत्तरदायित्व आणि आदर होता. अल्प व्यावसायिकरण व पैशाचा प्रभाव नसणे: आजच्यासारखे शिक्षण क्षेत्राचे प्रचंड व्यापारीकरण  तेव्हा नव्हते. कोचिंग माफिया, रॅकेट किंवा आर्थिक गैरव्यवहारांद्वारे यंत्रणा विकत घेण्याची संस्कृती अस्तित्वातच नव्हती. अल्प नोक-या होत्या. आठवी दहावी झालं की   की नोक-या लागायच्या,  हं आता एखादा  त्या काळातला झुरळ बंड्या रेलवे स्टेशनवर चहाचं दूकान चालवून पुढें राजकारणात आलाही असेल अपवाद असतातच ना !

तर डॉक्टर साहेब मी म्हणत होतो,  सरकारं येतील, सरकारं जातील पण सरकारची जवाबदारी नावाची गोष्ट असते ती सरकारने पार पाडली पाहिजे. पहिल्यांदा नीट घोटाळा झाला विरोधी पक्षांनी नागरिकांनी टीका केली, गदारोळ झाला री-नीट घ्यावी लागली. री-नीट झाली आता पुन्हा गुणांचा गोंधळ  झाला पुन्हा काल एक याचिका दाखल झाली. परीक्षा  नीट झाल्या पाहिजेत अशी अपेक्षा गैर नाही.  व्यवस्था सुधारावी म्हणून मूलं आंदोलन करीत असतील तर तो लोकशाहीचा भाग आहे तुमची क्रूरता आणि कौर्य देशाने पाहिले, वेदनादायी होतं. सरकारला लाज वाटली पाहिजे होती. संवादाच्या मार्गाने प्रश्न सोडवता आला असता.

सरकार म्हणून सरकार जर ती जवाबदारी नीट पार   पाड़त  नसेल तर  ते भान देण्याचं काम विरोधी पक्ष, सजग नागरिक आणि टिकाकारांचे असते.  ने नागडे होते मग आम्ही नागडे राहिलो तर काय होतं,  असं म्हणने म्हणजे आपल्या  सरकारच्या पापावर पांघरुन  घालणे आहे.

 

सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, 

मेरी कोशिश है कि, ये सूरत बदलनी चाहिए
मेरे सीने में नहीं, तो तेरे सीने में सही, 

हो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए।

 

-दिलीप बिरुटे

 

 

 


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रॉडॉ,

आधिच्या सरकारांनी मारलेली गाय तुम्ही चालवून घेतलीत तर आताच्या सरकारने मारलेलं वासरू तुम्ही चालवून घेतलंच पाहिजे. 

ॲज सिम्पल ॲज दॅट!

- (निष्पक्ष) सोकाजी


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भयंकर प्रकरण आहे हे तर! पेपरफुटी आधीही होत होती त्यात एवढं बोंबलन्यासारखं काय आहे म्हणणं! :)


In reply to by सुबोध खरे

मागच्या तीन दशकांत आय टी मध्ये आलेल्या लाटेत बी एस सी (आय टी) किंवा कोणत्याही शाखेतील अभियंत्यालाच काय  हवशा नवश्या गवशाला पण ५० ते ७५ हजारांची नोकरी मिळत होती. 

 

 

तुम्ही स्वतः किती लाईन कोडिंग टेस्टिंग पॅकेज डिप्लोयमेंट केले आहे ? गेला बाजार काही वेब डिझाईन इत्यादी ? किमान जावा स्क्रिप्टींग वगैरे काहीतरी ? का आयुष्यात तुम्ही गाडलेल्या झेंड्याची कथा सोडून बाकी सगळे पाणी कम ?

 श्रीयुत खरे आपल्याला कळत नाही त्या प्रोफेशन मधे काम करणाऱ्यांना त्यांचे पगार काढून हवशे गवशे म्हणायचा तुम्हाला कवडीचा हक्क नाही. धन्यवाद.


In reply to by वृषभ खोंडे


हे म्हणजे तुम्ही शेती केली आहे का? मग तुम्हाला शेतकी तज्ज्ञ होताच येणार नाही 

 

किंवा 

 

तुम्ही स्त्री आहात का? मग तुम्ही स्त्रीरोग तज्ज्ञ कसे होऊ शकणार?

या तर्हेचा वाद आहे.

चालू द्या.           

 


मग बाकी २० लाख विद्यार्थी हे काय करणार आहेत? याबद्दल झुरळांकडे काही विचार आहे का?  

 

मागच्या तीन दशकांत आय टी मध्ये आलेल्या लाटेत बी एस सी (आय टी) किंवा कोणत्याही शाखेतील अभियंत्यालाच काय  हवशा नवश्या गवशाला पण ५० ते ७५ हजारांची नोकरी मिळत होती. आता कृत्रिम बुद्धिमत्ता आल्याने  हा बुडबुडा फुटला आहे. पण झकपक कपडे घालून वातानुकूलित खोलीत आयटी ची नोकरी सर्वाना हवीहवीशी वाटते आहे ज्या नोकऱ्या फार कमी झाल्या आहेत.     

 

सर्वांच्या सर्व सरकारी नोकरांना बडतर्फ केले तरी  ९० % लोकांना सरकारी नोकरी मिळणें अशक्य आहे.  त्यातून आपल्याकडे शिक्षणमहर्षी यांनी शिक्षणाचा जो काही अभूतपूर्व खेळ खंडोबा करून ठेवला आहे त्यामुळे मुलांना मिळणारे शिक्षण हे त्यांना नोकरी किंवा धंद्याच्या बाजारात निरुपयोगी आहे.

यातून हे तरुण केवळ वैफल्यग्रस्त आणि निराश होतात. प्रत्येकाला सरकारी नोकरीच हवी असते. ती मिळणे शक्य नाही. पण हे कोणीही सांगणार नाही.   

 

सरकरने आम्हाला शिक्षण दिले पाहिजे नोकऱ्या दिल्या पाहिजेत आम्हाला सगळं घर बसल्या मिळालं पाहिजे या वृत्तीतून बाहेर आलं पाहिजे. पण विरोधी पक्षात असलं कि अफाट आश्वासनं द्यायची आणि सत्तेत अली कि त्यांच्या तोंडाला पानं पुसायची हा आपल्या ७५ वर्षांचा इतिहास आहे.

 

नेपाळ श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तान मध्ये या अराजका मुळे काय चालू आहे हे तरुणांना समजावण्याच्या ऐवजी येथे पण नेपाळ श्री लंकेसारखी क्रांती केली पाहिजे हे सांगणाऱ्या नेत्यांना अक्षरशः देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली पाहिजे.

झुरळांच्या नेत्यांकडे काही तरी ठोस कार्यक्रम आहे का?   

या  प्रश्नांची उत्तरे आहेत का आपल्याकडे?       

 

याला उत्तर न देता

उत्तरदायित्व

आपल्या आवडत्या सरकारचं  xxxx धुवायच्या नादात

खरे च(म)च्चा.

हे लिहून आपण केवळ आपली पातळी दाखवता आहात  

असो

मला वाटतं तुमची वास्तवाशी नाळ पूर्ण तुटली आहे. ठीक आहे.  

शिक्षण, accountability, process, क्वालिटी  वगैरे कशा सुधारायच्या हे आपण सांगाल का जरा?  

नाही म्हणजे नुसतं शिक्षणात सुधारणा हव्या आहेत सर्वाना नोकऱ्या मिळाल्याचं पाहिजेत वगैरे व्यासपीठावरून भाषणे देणे सोपे असते.

आपली फुगणारी प्रचंड लोकसंख्या असताना हे कसं करायचं तेही जरा सांगाल तर बरं होईल. 

 आमही सरकारला निवडून दिलंय. जे काही करायचं ते सरकारने करायला पाहिजे असं म्हणायचं असेल तर राहू च द्या.

आपण पाच वर्षात एक मत दिलं कि आपली जबाबदारी संपली. सरकार वर वाटेल ती टीका करायला मोकळे झालो.

चांगलं आहे.       
   

 

 


In reply to by सुबोध खरे

मागच्या तीन दशकांत आय टी मध्ये आलेल्या लाटेत बी एस सी (आय टी) किंवा कोणत्याही शाखेतील अभियंत्यालाच काय  हवशा नवश्या गवशाला पण ५० ते ७५ हजारांची नोकरी मिळत होती. आता कृत्रिम बुद्धिमत्ता आल्याने  हा बुडबुडा फुटला आहे. 

पहिले तर तुम्हाला इंडस्ट्री चार्ट रीड करता येत नसताना तुम्ही उगाच आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे बुडबुडा फुटला आहे इत्यादी मूर्खपणाचा कळस गाठत आहात ! म्हणजे तुम्हाला काय म्हणायचे आहे की स्वतःची कृत्रिम बुध्दिमत्ता पॉलिसी बनवणारे मोदी सरकार पढतमूर्ख आहे का ? काय फुकट वाटेल ते टंकत सुटले तुम्ही ! आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे नोकऱ्या कमी झालेल्या नाहीत तर ती स्किल शिकलेल्या लोकांसाठी भरपूर उपलब्ध आहेत. अर्थात ह्यासाठी थोडे इंडस्ट्री ट्रेंड माहिती असणे गरजेचे आहे.


In reply to by वृषभ खोंडे

पहिले तर तुम्हाला इंडस्ट्री चार्ट रीड करता येत नसताना तुम्ही उगाच आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे बुडबुडा फुटला आहे इत्यादी मूर्खपणाचा कळस गाठत आहात 

 

अरे वा म्हणजे आय टी  उद्योगात सगळं आलबेल आहे म्हणायचं का ?

मग आता सगळ्या आय टी कंपन्यांचे समभाग का हो कोसळले?

बाजारातील सगळे लोक मूर्खच आहेत बहुधा.  

The Nifty IT index recorded a loss of approximately 25.38% to 26.49% over the past six months, dropping from a level near 40,301.40 down to around 28,349.35

 

Persistent investor concerns over artificial intelligence (AI) structural disruptions, foreign fund outflows, and fears of delayed discretionary tech spending due to high US interest rates.

 

आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे नोकऱ्या कमी झालेल्या नाहीत तर ती स्किल शिकलेल्या लोकांसाठी भरपूर उपलब्ध आहेत.

 

अरे वा  

मग हे त्या तरुणांना सांगा कि.

कशाला त्या नीट च्या फालतू परीक्षेसाठी  दोन दोन वर्षे वाया घालवत आहेत? आणि आहे काय त्या डॉक्टरकीत?

ए आय वापरून सगळे रोग बरे होणारच आहेत.

 

TCS, Infosys, and Wipro together cut more than 63,000 jobs in the 2023-2024 fiscal year. IT hiring in India, which peaked at around 4.5 lakh in 2022, fell to just 1 lakh by 2024.

 

चालू द्या तुमचं

 


In reply to by सुबोध खरे

डॉक्टर, AI will not replace you, it will replace those who don't embrace AI हे आणि अशा अर्थाची वीसेक वाक्ये आता जादुई आणि आकर्षक बनली आहेत. यात अनेक आदर्श गृहितके आहेत. पण अतिशय घातक आणि पोकळ बोर्डरूम दावे यापलीकडे त्यांची ग्राउंड व्हॅल्यू नाही. पण ते सर्वांना पटवत बसणे दमछाक करणारे आहे. त्यामुळे जे जे होईल ते ते पाहावे. 

 

ता. क. आणि ॲड होमीनेम हल्ला येण्यापूर्वीच डिस्क्लेमर: मी आयुष्यात भरपूर पुरेश्या लाईन्स कोड लिहिले आहेत. नामशेष झालेल्या टेक्नोलॉजीज पासून सी शार्प, जावा पायथन आणि जे काही पडेल ते. डॉ खरे म्हणतात तसे कोणत्याही शाखेतल्या इंजिनियर पदवीधारकाला आय टी क्षेत्रात धडाधड नोकऱ्या मिळण्याच्या काळापासून (पंचवीस वर्षे) ते आजच्या AI ML क्षेत्रापर्यंत सलग माझं कार्यक्षेत्र राहिले आहे. मोठ्या टीम्स लीड केल्या आहेत. गेला बराच काळ AI मधेच आहे. त्यामुळे पुढे वाढून ठेवलेलं अत्यंत धोकादायक भविष्य आणि त्याबाबत सोनेरी मुलामा देऊन केली जाणारी धूळफेक बोर्डरूम वक्तव्ये याच्याशी पण जवळून संबंध आहेत. त्यामुळे कृपया हे मत व्यक्त करण्याचा काहीच अधिकार मला नाही असे म्हणू नये.


In reply to by गवि

इंडस्ट्री मध्ये तुम्ही पण गोल्ड स्टँडर्ड नाही किंवा मी पण नाही अर्थात आपापले इकोसिस्टिम आहेत अन् त्यानुसार आपली मते तयार होतात. त्यामुळे तुम्ही तुमची क्रेड द्यायची गरज नाही माझी ती अपेक्षा नव्हती. किंवा जर तुम्ही कधी माझ्यावर वैयक्तिक हल्ला (ad hominem) केला नसेल तर मी तो आऊट ऑफ द ब्लू करेल अशातला पण भाग नाही, त्यामुळे माझ्यालेखी तो वाढीव ताजा कलम अप्रस्तुत आहे.

 

 

किंबहुना तुमचा माझ्याबद्दल झालेला ग्रह पाहता मीच माझे प्रतिसाद परत तपासले आणि अंती मला जाणवले की माझी प्रतिक्रिया अनाठायी प्रक्षोभक आणि वैयक्तिक अंगाने जाणारी होती. त्याबद्दल मी सुबोध खरेजींची बिनशर्त अन् सपशेल माफी मागतो आणि अपेक्षा करतो की ते उदारमनाने मला क्षमा करतील. राजकीय चर्चा/ वितंडवाद होत राहतील पण माणसे महत्वाची असतात. कायम.


परीक्षांत पेपर फुटणे हे वाईट आहेच.

 याचा अर्थ असा नाही कि ते चालवून घ्यायचे. त्यासाठी जे काही करायचे ते सरकार करत आहेच. त्यात तुमची मदत होणार आहे का?     

पण सध्याचे आंदोलन हे पेपर फुटीसाठी नाहीच ते आहे केवळ मोदी सरकारला खाली खेचण्यासाठी. त्यासाठी  तरुणांची माथी भडकावणे चालू आहे. जरांगे पाटील कशाला भेटायला गेले होते जंतर मंतर वर ?

विरोधी पक्ष आता वाहत्या गंगेत हात धुवून घेत आहेत. बाकी अरुंधती रॉय केजरीवाल सारखी मंडळी तेथे आली तेंव्हा हे स्पष्ट झालेले आहेच.

असो.

शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणा करण्याबद्दल काही नक्क्की माहिती आहे कि आणि हे शिक्षण घेतल्यावर रोजगार कसा उपलब्ध होऊ शकेल याबद्दल काही ठोस कार्यक्रम?

ती आमची जबाबदारी नाही. आम्ही फक्त श्री मोदी सरकारवर टीका करणार.

कारण आम्ही ५ वर्षात एकदा एक मत दिलंय.             


In reply to by सुबोध खरे

 

कारण आम्ही ५ वर्षात एकदा एक मत दिलंय.             

अहो जर सार्वत्रिक निवडणुकच पाच वर्षात एकदा होत असेल तर पाच वर्षात एकदाच मत दिले जाणार ना ? उगाच काय हुच्चपणा लावला आहे तुम्ही ! किमान लॉजिकल बोला हो ! 

 

पण सध्याचे आंदोलन हे पेपर फुटीसाठी नाहीच ते आहे केवळ मोदी सरकारला खाली खेचण्यासाठी. त्यासाठी तरुणांची माथी भडकावणे चालू आहे. जरांगे पाटील कशाला भेटायला गेले होते जंतर मंतर वर ? 

 

मनोज जरांगे पाटलांवर संचारबंदी इत्यादी लागू केली आहे का सरकारने ? नसल्यास फडणवीसांना सांगा लागू करायला गृहमंत्री ते आहेत महाराष्ट्राचे. त्याहून महत्वाचे म्हणजे राईट टू मूव्हमेंट - संचारस्वातंत्र्य हक्काला प्रश्न करणारे तुम्ही कोणीच लागून गेले नाही. मोदी सरकार स्वतः स्वतःची वाट लावून घेते आहे ! पहिल्या दोन दिवसात तिथे डाव्या विद्यार्थी संघटना/ गुंड एलिमेंट इत्यादी काहीही नसताना जर एखाद वरिष्ठ मंत्र्याने जाऊन पोरांच्या डोक्यावर हात फिरवून (किंवा किमान तसे भासवून) वांगचुकच्या तोंडाला लिंबाचे सरबत लावले असते तर ही सरकार खाली खेचण्याची वेळ आली नसती ! दोन दिवस काही नाही तिसऱ्या दिवशी डायरेक्ट काठ्या डोक्यात ! अगदी आंदोलन आम आदमी पक्षात कंटेन झाले असते ! मोदी सरकारचे ह्या आंदोलनाचे रीडिंग सपशेल फसले आहे. पिरियड

 

विरोधी पक्ष आता वाहत्या गंगेत हात धुवून घेत आहेत. बाकी अरुंधती रॉय केजरीवाल सारखी मंडळी तेथे आली तेंव्हा हे स्पष्ट झालेले आहेच. 

 

चान्स सत्ताधारी मंडळीने दिला, उगाच मग्रुरी मध्ये कचरा समजले पोरांना अन् पोरांनी खोलून मारली पाचर ! 

 

शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणा करण्याबद्दल काही नक्क्की माहिती आहे कि आणि हे शिक्षण घेतल्यावर रोजगार कसा उपलब्ध होऊ शकेल याबद्दल काही ठोस कार्यक्रम? 

 

अच्छा म्हणजे लातुरात राहणाऱ्या माझ्या भाच्याला पेपरफुटीचा त्रास झाला, त्याला सरकारला जाब विचारायचा आहे तर त्याने शैक्षणिक सुधार विषयावर पीएचडी करून बोलावे ? सरकार समर्थकांचे डोके ठिकाणावर आहे का ?


In reply to by वृषभ खोंडे

त्याने शैक्षणिक सुधार विषयावर पीएचडी करून बोलावे ?

 

उगाच काही च्या काही?

त्यांनी नाही

इथे जे पापले मतप्रदर्शन करत आहेत त्यांनी सांगायचे आहे कि हे सुधार कसे करायचे ते?

नीट च्या विद्यार्थांनी आपला अभ्यास नीट करून परत परीक्षा देण्याशिवाय त्यांना पर्याय आहे का?     


In reply to by सुबोध खरे

हे ठीक आहे करू दळण आपण त्याला पैसे लागत नाहीत अन् सरकार पण हिंग लावून विचारत नाही.


In reply to by सुबोध खरे

डॉ खरे, आणखी एक मुद्दा इथे मांडू इच्छितो. या विद्यार्थी आंदोलनात विद्यार्थ्यांचे सर्वच प्रश्न मांडले जात आहेत अशी जरी जनरल समजूत असली तरी NEET परीक्षा हाच मुद्दा मुख्य बॅनरवर आहे. म्हणजे मोस्ट इंपॉर्टन्ट किंवा लक्षवेधक मुद्दा जो सर्वांच्या बॅनरवर आहे. शिक्षण आणि विद्यार्थी यांचे भारतातले प्रॉब्लेम खरोखर लावून धरायचे तर नीट परीक्षेच्या अगोदर खेडेगावांत शाळाच नसणे, तिथे मुलींसाठी मुतारी नसणे (हे मुलींनी वयात आल्यावर शिक्षण सोडण्याचे एक महत्वाचे कारण आहे हे अनेकांना नवीन असेल), शिक्षक नसणे, ते क्वालिफाइड नसणे आणि इतर खूप मूलभूत मुद्दे आहेत. कोणी म्हणेल की हेही मुद्दे आहेतच. 

पण आंदोलनात काय ठळक दिसते की एकच समस्या = नीट परीक्षा घोटाळा. 

त्यात परीक्षा देणाऱ्या पोरपोरींचे अतोनात हाल झाले हे अगदी सत्य आहे.. आणि अगदी शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा इतकी ती घटना वाईट देखील असेल. 

 

पण खूप व्यापक आणि मूलभूत मुद्दे खाली सारून नीट परीक्षेसारखा aspiring उच्च शिक्षणापर्यंत पोचलेल्या विद्यार्थ्यांना आपलासा वाटेल असा विषय शीर्षस्थानी घेतला आहे. त्यामुळेच तिथे आलेले किंवा कदाचित काही प्रमाणात आणलेले जे शाळकरी किंवा गावाकडचे विद्यार्थी आहेत त्यांना neet चा फुलफॉर्म विचारणं आणि त्यांना कसे काहीच माहीत नाही अशी रिल्स बनवणं अनेकांना सोपं होतं आहे. कारण त्यांचे खरे प्रोब्लेम वेगळेच आहेत. असो.


जेन एक्सची आजची इपिक घोषणा😂

हास्यजत्रा रिल्स बघणे बंद ;
वनिता खरात, प्रियदर्शनी इंदलकर, समीर चौघूले इत्यादी पांचटवीर, 
हुल्लडबाजांच्या मोर्चात सहभागी !

 

काका आणि काकू आता तुम्ही कायम रडणार का???


तर, 'नीट' पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतरमंतरवर सुरू असलेल्या 'कॉक्रोच जनता पक्षा'च्या (सीजेपी) आंदोलनाचे लोण देशभर पसरले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी 'एक्स'द्वारे तरुणांना मन की बात सांगितली.

 

'देशातील युवकांचे कल्याण आणि त्यांचे भविष्य यापेक्षा महत्त्वाचे काहीही नाही. युवकांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांना माफ करणार नाही. युवकांचे हित हेच केंद्र सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे,' असेही मोदी यांनी आंदोलनाच्या ३४ व्या दिवशी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

 

'धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारावा, अशी विनंती मी तुम्हाला करतो; अन्यथा हे प्रकरण तुमच्या राजीनाम्यापर्यंतही जाईल. एक अकार्यक्षम आणि अयशस्वी मंत्री लाखो विद्यार्थ्यांपेक्षा महत्त्वाचा असू शकत नाही.' - अभिजीत दिपके

 

एक तर काही पोरं अभ्यास, परिक्षेचा ताण,  परीक्षा घोटाळे,  राजकारण,  मोबाईल गेम, ऑनलाइन कमाई, बेरोजगार, आई-वडिलांचे टोमणे, वैतागून गेलेले, व्यवस्थेचे फस्ट्रेशनवाले हे सगळे आन्दोलनाकडे वळले, यांना फटके पडले तरी नव्या उत्साहाने येतच आहेत.  उद्या आंदोलन मिटले,  तरी पोरं घरी जातील की नाही याची काळजी वाटायला लागली आहे.

पंजाबचे शेतकरी शंभू बोर्डरवर आलेले आहेत त्यांना अनुभवाच्या जोरावर ज्वाइन होतात की काय असे वाटत आहे. 🙆‍♀️

 

-दिलीप बिरुटे

 

 


In reply to by विजुभाऊ

मला निरर्थक उपोषणाने मेलेला माणूस बघायचा होता. संधी हुकली. ब्येटर लक नेक्ष्टाईम!

 

जाताजाता : जी कोणी झुरळं मोदींच्या राजीनाम्याच्या कल्पनाविलासात मग्न होऊन नाचताहेत त्यांना एकंच इशारा द्यावा म्हणतो. त्याचं काये की मोदींच्या समर्थनार्थ एखादं आंदोलन उभारलं तर काय निकाल लागेल याचा अंदाज येतोय का?

 

-गा.पै.


In reply to by विजुभाऊ

आम्ही सरकारला सांगितलं आहे की, संपूर्ण देशभरात आंदोलन सुरु आहे. धर्मेंद्र यांचा राजीनामा झाला नाही तर हे आंदोलन आणखी व्यापक होईल. सरकार लवकरात लवकर धर्मेंद्र प्रधान यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करतील अशी आशा आहे. सरकारने धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत उद्या दुपारपर्यंतचा वेळ घेतला आहे. उद्या दुपारी साडेतीन वाजता पुन्हा बैठक होईल", असं आशुतोष रांका यांनी सांगितलं.

केंद्र सरकारमध्ये मोठ्या घडामोडी

जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह सीजेपीच्या शिष्टमंडळाचा निरोप घेऊन आपल्या मंत्रिमंडळाकडे गेले आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात बैठक झाल्याची माहिती काही माध्यमांनी दिली आहे. या बैठकीत सीजेपीच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय होतो का? ते पाहणं महत्त्वाचं आहे.

 

राजीनामा होऊन यापुढे सर्वच परीक्षा नीट घेऊ असे लिहून घेतील. 

 

-दिलीप बिरुटे

 

 

 


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आंदोलनातील युवक सत्तेतील कोणालाच घाबरत नाहीत. उघडपणे त्यांचे नाव घेऊन विनोद करतात. हा टर्निंग पॉईंट ठरू शकेल. आयटी सेल निष्प्रभ ठरली आहे आंदोलकांपुढे. मेन स्ट्रीम मिडीया चेष्टेचा विषय झालाय. त्यांचा वर्तमान TRP बघायला हवा. 


In reply to by आग्या१९९०

दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर दररोज होणारा अन्यायकारक लाठीमार लक्षात घेऊन अखेर CJI सुनावणी घेण्यास तयार झाले. २७ तारखेला सुनावणी घेणार.   


In reply to by आग्या१९९०

सोनम वांगचूक यांच्य माघारांनंतर आता आंदोलनाची दिशा कशी असेल याची उत्सुकता आहे 👍यात आंदोलन करणाऱ्या मुलांना बळच कायदेशीर गोष्टीत अडकवल्यास त्यांच्या करियराचे नुकसान होईल का??

दिल्ली युनिव्हर्सिटी, jnu ने मुलांना आंदोलनात सहभागी झाल्यास कारवाई होईल अशी धमकी दिली आहे.

याबाबत मुलांबाबत चिंता आहे.


In reply to by आग्या१९९०

सोनम वांगचूक यांच्य माघारांनंतर आता आंदोलनाची दिशा कशी असेल याची उत्सुकता आहे 👍यात आंदोलन करणाऱ्या मुलांना बळच कायदेशीर गोष्टीत अडकवल्यास त्यांच्या करियराचे नुकसान होईल का??

दिल्ली युनिव्हर्सिटी, jnu ने मुलांना आंदोलनात सहभागी झाल्यास कारवाई होईल अशी धमकी दिली आहे.

याबाबत मुलांबाबत चिंता आहे.


In reply to by विजुभाऊ

मला पहिल्यापासूनच याचा अंदाज होता. त्यामुळे हे आंदोलन फक्त सोनम किंवा दीपके यांचे नसून विद्यार्थ्यांचेही आहे, असेच मला सुरुवातीपासून वाटत होते. 

ज्या दिवशी तो अमानुष लाठीचार्ज झाला, त्या क्षणापासून या संपूर्ण परिस्थितीबद्दल मनात प्रचंड वेदना आहेत.

 

अवांतर:

माझी वैयक्तिक भूमिका अशी का होती, यालाही एक पार्श्वभूमी आहे. अण्णा हजारे यांच्या आंदोलनाच्या काळात मी स्वतः रस्त्यावर उतरून सहभागी झालो होतो. नंतर हळूहळू असे वाटू लागले की त्या आंदोलनाचा वापर फक्त काँग्रेस सरकार पाडण्यासाठी झाला. त्यातून केजरीवाल यांचा उदय झाला. त्यांनाही मी मनापासून पाठिंबा दिला होता; त्याचे धागे आजही येथे सापडतील.

पण काळ जसजसा पुढे गेला, आताशा माझ्या लक्षात आले की सत्तेत असणारे आणि विरोधकांमध्ये फूट पाडण्याचे राजकारण हे अनेकदा एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. Bjp ते लिलया सांभाळते आहे.

कदाचित याच कारणामुळे राहुल गांधी CJP च्या स्टेजवर गेले नसावेत. कारण हे आंदोलन पुढे जाऊन दुसरे "अण्णा आंदोलन" ठरेल की काय, याचीही भीती किंवा राजकीय गणित असू शकते. विरोधातील space  एकत्र राहू नये, अशीही एखादी चाल असू शकते, असे मला वाटत होते. मात्र, ठोस आधार नसताना अशा गोष्टी बोलण्यात अर्थ नसतो, म्हणून मी तेव्हा ते व्यक्त केले नाही.

परंतु आता एक गोष्ट स्पष्ट वाटते, जे झाले ते झाले. सोनम आणि दीपके यांच्या निमित्ताने हजारो तरुण रस्त्यावर आले. त्यांनी या आंदोलनाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. या तरुणाईला आज एखादा ठळक चेहरा नसला, तरी त्यांच्या विचारांची मशाल उद्याचा मार्ग नक्कीच उजळवेल, असा विश्वास आहे.

 

अती अवांतर: 

रविवारच्या deployment मुळे आणि प्रचंड कामाच्या ताणामुळे मला आज आंदोलनात सहभागी होता आले नाही, याचे मनापासून दुःख आहे. मात्र माझे काही मित्र तिथे उपस्थित आहेत , ही गोष्ट समाधान देणारी आहे.

- गणेशा


In reply to by गणेशा

पुढे जाऊन हे आंदोलन, दुसरे  "अण्णा आंदोलन" ठरेल हि भीती सरकार उलथवण्या साठी नाही, तर विरोधातील space हि नष्ट करण्यासाठी वापरले जाईल हि भीती होतीच..

असे लिहायचे आहे.. त्यामुळे हि दुरुस्ती..

 

अवांतर 

बाकी हे सरकार उलथवण्याची ताकद सध्या कोणाच्यात आहे? 

काँग्रेस मुक्त म्हणत म्हणत काँग्रेस युक्त झालेली मुजोर bjp कोणाला हि विकत घेऊ शकते हे अलीकडच्या राजकारणा वरुन दिसते आहे..

त्यामुळे तरुणाई हेच उत्तर आता तरी दिसू लागले आहे..

 

बघू काळाचा पडदा आपल्या ला काय काय चित्र दाखवतोय ते..

 


निरर्थक उपोषणाने मेलेला माणूस बघण्याची फेटीश असणाऱ्या सगळ्यांना...

दिसेल दिसेल. थोड्याच दिवसात तेही दिसणार आहे. उपोषण अन्न पाण्याचे नसेल, प्रसिध्दी आणि स्वस्तुतीचे असेल. त्याअभावी मेलेले दिसणारेत लौकरच.

.

बाकी सीजेपीला ना कधी सपोर्ट केला ना वांगचूकला पण सरकारविरुध्द बोलणारा प्रत्येकजण देशद्रोही अन कुटील हेतूचा आहे ह्या भावनेनेच केलेला प्रत्येक हल्ला भडवेगिरीचे लक्षण आहे. स्तुती करणारा सोनम अगदी भारी होता, जरा विरोधी बोलला की त्याची सगळी पाळेमुळे खणून काढायची प्रवृत्ती बेक्कार आहे.  सीजेपीचा दीपके आपचा कार्यकर्ता होता म्हणून चालत नाही, राघव चढ्ढा मात्र प्रेमाने घेतला जातो. दिपके अमेरिकेत होता तर तिकडून फंडींग घेऊन आला मग सरकारातील मंत्र्यांची मुले अमेरिकेत शिकताना कुणासाठी फंडींग गोळा करतात? सुरुवातीला ऑनलाईन बिनलाईन आंदोलन काही नसते, नुसते लाईक ठोकून काही होत नसते, र्स्त्यावर कितीजण उतरणार असे हिणवणाऱ्यांना दिल्लीतले २० जुलै नंतरचे आंदोलन म्हणजे थोबाडीत मारणारा जेनझीचा प्रतिसाद होता. 

परिस्थिती अंगावर शेकायली की सगळ्यांची आठवण येते. कायदा, सुव्यवस्था, संविधान, देश, संसद ह्यांचे पावित्र्य, महती गाणाऱ्यासाठी....

आंदोलन जरी जेनझींचे असले तरी आम्ही जवळपास त्यांच्या पालकांच्या वयातले....आम्हीही लहान असताना आंदोलने बघितली आहेत. गावोगावी फिरणाऱ्या रथयात्रा नंतर झालेली कारसेवा बघितली आहे. मुल्ला मुलायम सिंगाच्या मुघल सेनेने झाडलेल्या गोळ्या आणि त्यात म्रुत्युमुखी पडलेल्या कोठारी बंधूंच्या बलिदानाचे पोवाडे चौकाचौकात स्पीकरवर ऐकलेले आहेत. "व्यर्थ न हो बलिदान" "याद करो कुर्बानी" च्या घोषणा ऐकलेल्या आहेत. कोठारी बंधू कसे "पाठ दाखवऊन परत येणार नाही " म्हणत रामलल्लांच्या सेवेस गेले, अजून दोन मुले असती तर त्यांनाही रामासाठी अर्पण केले आहे हे त्यांच्या वडिलांचे गहिवर आणणारे भाषण कित्येकदा ऐकले आहे. आंदोलनात मृत्युमुखी पडणारे मेले नाहीत तर बलिदान, शहीद, अमर, रामकार्य, धर्मयुध्द, तपस्या, राष्ट्रयज्ञातक्या समिधा अशा शब्दावलींने गौरवले गेले आहेत. त्यांनंतर पाडलेली बाबरी मशीद अन गोध्राच्या दंगली ह्या सरकारविरुध्द जनक्षोभ होत्या  अन त्या जनक्षोभातून सत्तेत आलेले, आण्णा हजारेंच्या उपोषणातून अन त्यांनी केलेल्या आरोपामुळे निर्माण झालेल्या जनक्षोभातून सत्तेत आलेल्या लोकांनी इतरांना कायदा, सुव्यवस्था अन संविधानाचे पवित्र्य लोकांना शिकवण्याची गरज नाही. सत्य, प्रामाणीकपणा, कायदा अन संविधान तुमच्या घरचे बटीक नाहियेत. 

सीजेपीचे आंदोलन हे कशाही परिस्थीत सुरु झाले अन कसेही असले तरी सुरुवातीसच त्याची दखल घेऊन त्यांना थांबवण्यासाठी काहीतरी करायला हवे होते. त्याउलट त्यांच्या विषयीच अपप्रचार सुरु केला. त्यातूनच प्रसिध्दी मिळवत दिपकेचे भारतात आगमन, वांगचूकची अन त्याची भेट, त्यानंतर प्रमुख शहरात केली गेलेली आंदोलने आणि त्यांनतर त्या आंदोलनात सहभागी झालेले लोक पाहता जंतरमंतरवरील आंदोलनापर्यंत सर्वच ठिकाणी त्यांना सरकारकडून थांबवण्याचा कोणताही प्रभावी प्रयत्न झालेला नसल्याने कधीकधी सरकारचीच ही युवाविरोध विकेंद्रीत करण्याची चाल आहे की काय अशीही शंका येत होती. वांगचूकच्या उपोषणानंतरही मान्सून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काही हजार युवांच्या मोर्चाला हॅन्डल करुन एखाददुसरी मागणी मान्य करुन सगळेच थांबेल असेही वाटत होते परंतु प्रचंड संख्येने दिल्लीत दाखल झालेल्या जेन झी ने सगळेच अंदाज चुकवले. फक्त शिक्षणमंत्र्यांना अन त्यांनी राबवलेल्या परीक्षापध्दतीला असणारा विरोध, पूर्ण सरकारला विरोध ह्यात कधी बदलला हेच कळले नाही. आता वांगचूकना उपोषण स्थळावरुन उचलतानाही वापरलेली पध्दत अधिकच्या जनक्षोभाला कारण ठरलीये. त्यांनी आता उपोषण सोडले आहे, कदाचित मंत्रींमंडळाची चर्चा करुन धर्मेन्द्र प्रधानांचाही राजिनामा होईल उद्या परवा पण सीजेपी ला स्वत:च जेनझींचे नेतृत्व स्वीकारायची वेळ आणली गेली आहे. त्यांना आणि वांगचूकला अपेक्षित असणारी संसदीय मार्गाने लढाई हवी असेल तर राहुल गांधी हेच तर नाव शिल्लक राहते. नाहीतर दुसरा मार्ग हा पुन्हा आंदोलन हाच उरतो. 

विद्यार्थ्यांवर, तरुणाईंवर केले गेलेले पोलीसी लाठीमार अन अत्याचार निघृण आहेतच पण पोलीसांवर आणि तरुणांवर ही वेळ कशी आणि का आणली गेली हेही बघितले पाहिजे. त्या कृतींचा अगदी मांजराला सुध्दा कोंडी केली की ते फिस्कारुन येते ह्याची माहिती नव्हती काय? आताही जंतरमंतर भागातले नेट, मेट्रो दुकाने बंद करवून काय साध्य करताहेत? की त्यामुळे आंदोलनात सहहागी नसणार्या लोकांनाही आंदोलन विरोधी मत बनवायला भाग पाडले जात आहे? आंदोलन हाच जर प्रोब्लेम असला तर सध्या राजीनामा द्यायला प्रधानाला किंवा सरकारला काय जड आहे? इअतकी स्गळी व्यवस्था राबवून, सर्वानाच त्यात व्यग्र ठेऊन प्रचंड गोंधळाची स्थिती निर्माण करण्यात सरकारचाही मोठा हात आहे. आपले मूल चॉकलेटसाठी रडत असले, आदळापट करत असले तर त्याला एक लहानसा तुकडा देऊन त्यावेळी गप्प करण्याची आईची पध्दत सरकारने राबवली असती तर फारसे काही बिघडले नसते. आज पोराला चॉकलेट दिले तर उद्या तो आक्खा बार मागेल, परवा दुकान मागेल, तेरवा फैक्टरी मागेल असले स्पेक्युलेशन्स मांडण्यापेक्षा अन पोरांवर संस्कार, त्याच्या सवयी, त्याचे जेनेटिक्स आदीविषयावर चर्चा करण्याची ही वेळ नाही हेही सरकारला कळायला हवे. 

असो.. ह्यानिमित्ताने ऐक्टीव्ह जेन झी बघायला मिळाली, लहानपणी कसे पोलिसांना चुकवत कारसेवक अयोध्येत दाखल झाले आणी घुमटावर चढले ह्यांच्या गाथा ऐकल्या होत्या आता अशीच आजची तरुणाई पोलिसांना तुमचे उइनिफॉर्म, नेमप्लेटस वर प्रश्न विचारताहेत, धर्म, जात, वय, लिंग, शिक्षण, ठिकाण आदि न विचारता एकमेकांना मदत करत भारतातल्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणांहून एकत्र येत काही एका कारणासाठी बोलताहेत, लढताहेत, जखमी होताहेत अन पुन्हा येताहेत ते कारण त्यांच्या स्वत:च्या हक्काचे आहे, त्यांच्या भविष्यासाठी निगडीत आहे हेपण प्रचंड आशादायक आहे. एखाद्या मंदिरासाठी आंदोलन करणारी तरुणाई आज पालक झालीय, त्यांना आज त्यांच्या शिक्शःअणासाठी, हक्कासाठी लढणाऱ्या तरुणांना हतोत्साहीत करण्याचा, विरोध करण्याचा कोणताच अधिकार नाहिये हे जितके लवकर लक्षात येईल तितके चांगले.

 

 


In reply to by अभ्या..

फक्त मित्र म्हणून नाही.. पण जे काही लिहिले आहे त्या बद्दल मला तुझा अभिमान आहे..

 

तू जस  लिहितो इतके छान मला लिहिता येत नाही.. पण एकदम मनातले... सेम ह्याच भावना आहेत..

बाकी माझे इतर मित्र आज पुण्यात आंदोलनात आहेत त्याचा हि अभिमान आहेच..

 

 कीबोर्ड बडवत costing काढत आजचा दिवस बोर गेला पण 

 

धाग्यातली चर्चा आवडली..

 


In reply to by अभ्या..

आण्णा हजारेंच्या उपोषणातून अन त्यांनी केलेल्या आरोपामुळे निर्माण झालेल्या जनक्षोभातून सत्तेत आलेल्या लोकांनी इतरांना कायदा, सुव्यवस्था अन संविधानाचे पवित्र्य लोकांना शिकवण्याची गरज नाही. सत्य, प्रामाणीकपणा, कायदा अन संविधान तुमच्या घरचे बटीक नाहियेत.

 

जाळ जाळ केला आहेत निस्ता एकदम अंगार ! 🔥🔥🔥🔥.

 

 

त्या निमित्ताने अण्णांच्या आंदोलनात फेर धरून नाचणाऱ्या सुषमा स्वराज बाई खास यूट्यूब वरून साभार ! यूट्यूब बडी नालायक चीज सगळ्यांचे सगळे कायम धरून ठेवते


In reply to by अभ्या..

+१ सतत मोबाईलवरच /इन्स्टावर असते त्या जनरेशची सामाजिक बांधिलकी या निम्मिताने दिसली आहे.

खफवर मीही आधीच सांगितलं होते. Genz खतरनाक आहे. ते कोणालाच घाबरत नाही. आमच्याकडे genz gen alpha, gen beta सगळे आहेत.त्यांना पाहतोच आहे.पाहिजे ते घेतल्याशिवाय सोडत नाही ते 😅😅

 


In reply to by अभ्या..

नेमकं लिहिलंय.

इथे मुद्दाम प्रतिसाद द्यायचं कारण एवढंच की मिपावरचे बहुतेक लेखक "धर्म, हिंदू मुस्लिम, मंदिरं, पाकिस्तान इ.इ" कचऱ्यातच घोळ घालणारे असले तरीही बरेच वाचक अजूनही  "संविधान, भारत, विविधतेत एकता" ह्या गोष्टींवर अढळ विश्वास आणि अभिमान असणारे आहेत. आणखीही कित्येक असतील.

-*-

जेन झी ने त्यांना नेमकं काय महत्त्वाचं आहे ते व्यवस्थित सांगितलं आहे.

लढत रहा जेनझी. 


In reply to by अभ्या..

सर्वच प्रतिसाद भारी आहे.  नंबर एक. 
 

बाकी ते  'परिस्थिती अंगावर शेकायली की सगळ्यांची आठवण येते. कायदा, सुव्यवस्था, संविधान, देश, संसद ह्यांचे पावित्र्य, महती गाणाऱ्यासाठी'  हेच  सध्या लय डोक्यात जात आहेत. 

लिहिते राहा. 

-दिलीप बिरुटे


शाहीनबाग आंदोलन, शेतकरी आंदोलन आणि आता विद्यार्थ्यांचे आंदोलन पाहिले तर केंद्र सरकारला म्हणजे मोदी/शहांना आंदोलने नीट हाताळता येत नाहीत असं दिसतंय. प्रारंभी संपूर्ण दुर्लक्ष, समाजमाध्यमातून आंदोलन देशविरोधी/परदेशी निधी घेऊन चालविले जात आहे असा सातत्याने भडिमार व शेवटी माघार अशी प्रमाणित कार्यपद्धती ते वापरतात. 

 

त्या तुलनेत विलासराव देशमुख व फडणवीस, अण्णा हजारे, शेतकरी आंदोलन, मराठा राखीव जागा आंदोलन इ. बऱ्यापैकी चांगले हाताळून आंदोलनकर्त्यांना काहीतरी किरकोळ देऊन थंड करायचे. 

 

पूर्वी इंदिरा गांधी प्रत्येक आंदोलनात सीआयए, संघ इ.चा हात आहे व त्यांना भारत अस्थिर करायचाय अशी हाकाटी करायच्या. आताही मोदी सरकार तेच करीत आहे, पण आंतरजाल व समाजमाध्यमांमुळे हे आरोप जनता मान्य करीत नाही.

 

 


मोदी हागला तरी गु छान लागतो म्हणणारी मंडळी आहेत,  त्यामुळे इथे वांझोटा चर्चा करून फरक पडत नाही.  देव करो यांच्यापैकी कोणावर वाईट वेळ न येवो. यातला भुर्जी तिकडे अडकला होता तेव्हा सरकारला शिव्या घालत होता, आता बुडाला स्थिरता आल्यावर पुन्हा चालू झालाय. असो. आयडी देवाला वाहिला आहे. उडाला तर उडाला. 


अभ्या..,

 

निरर्थक उपोषणाने मेलेला माणूस बघण्याची फेटीश असणाऱ्या सगळ्यांना...

तुम जिसे फेटीश कहते हो उसको पच्चास करोड हिंदू जनता सुकूनका छुटकारा ( = सुटकेचा नि:श्वास ) मानती है.

 

आ.न.,

-गा.पै.


In reply to by गामा पैलवान

पन्नास कोटी हिंदूंचे हे असले प्रतिनिधी असणे म्हणजे जरा लैच झाले !


In reply to by वृषभ खोंडे

करेक्ट. अहो, मी सुटकेचा नि:श्वास टाकणारे म्हणतोय. प्रतिनिधी नव्हे.

-आ.न.,

-गा.पै.


देशी शिक्षणाला महत्व द्यायचे तर हि आपल्या नेत्यांचे झाडून सगळे मुले परदेशी शिकायली जातात  का??

नक्की विचार करा मराठे काका रॉक्स 


नीट परीक्षा घोटाळा विषयावर आंदोलन करणा-या तरुण मुला मुलींवर अमानुष लाठीमारा नंतर या तरुण पीढ़ीने मात्र दुस-या दिवसापासुन सरकारला नागडं केलं. पूरा बदला घेतला. 

 

पोरींच्या हातातील बॅनर सोशियल मिडियावर बघायला मिळाले ते असे होते. 56 इंच छाती के लिये ब्रा कहा मिलेगी'  'झोला मैं खरीदके देती हूँ, आप बस निकल जाओ,  'यु फक्ड विथ दी wrong जनरेशन' 'बीवी नही है तो देश की मारोगे क्या'  'स्टूडेंट थे इसलिए पेल दिया, रेपिष्ट होते तो पार्टी में ले लेते'  पॅडचं चित्र आणि 'इसने भी लिक नही होने दिया' 

 

सरकारने पोरांच्या नादी एक तर नादी लागायला नको होतं. लागले तर, त्यांचे मन जिंकून घ्यायला पाहिजे होतं. लाठीमार केला आंदोलन दाबून पाहिलं नंतर या पोरांच्या नादी लागून  स्वत:ची चेष्टा करुन घेतली.  धर्मेन्द्र प्रधान यांचा राजीनामा होईल की नाही माहिती नाही. पण पोरांनी आंदोलन गाजवले हे मात्र खरं आहे.

 

-दिलीप बिरुटे

 

 

 

 


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जेनझी खूप प्रगल्भ आहेत. त्यांच्याशी बोलणी करण्यासाठी सरकारमध्ये एकही लायक व्यक्ती नाही.  


In reply to by आग्या१९९०

आजार म्हशीला आणि इंजेक्शन पखालीला' ही एक प्रसिद्ध मराठी म्हण आहे. मूळ समस्या किंवा त्रास एका ठिकाणी असताना, उपाय मात्र पूर्णपणे चुकीच्या किंवा वेगळ्याच ठिकाणी केला जाणे, या अर्थाने. सध्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर तोडगा काय आहे ? विद्यार्थी म्हणतात शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हवा आहे. सरकार काय करीत आहे, वेळ काढू धोरण अवलंबून दुसया मुद्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत आहे. आम्ही अशा परिक्षा लीक करणा-याविरुद्ध कडक कार्यवाही करु, काल नीट प्रकरणी ४७ अधिका-यांना बडतर्फ केले. पुढील आठवड्यात नीट आणि तत्त्सम परिक्षेतील गुन्हेगारांना व्यक्तीगत आणि सामुहिक घोळ केल्यास तुरुंगवास आणि आर्थिक दंड वगैरे विधेयक येणार आहे. हे सर्व आंदोलन सुरु झाल्यावर सरकारला हे शहाणपण सुचले तो वर आंदोलन दाबण्यासाठी पॅलेट गनचा वापर आणि मारहाण करायची महाराष्ट्र टाइम्सला पहिल्याच पानावर राहूल गांधी पॅलेटगनने दंडावर जखमा झालेल्या तरुणाचे छायाचित्र दाखवत आहे, असे चित्र आले आहे, अशा पद्धतीने आंदोलन हाताळतात ? जनतेला चीड येणार आणि लोक प्रश्न विचारतीलच ना ! आता सीजेपीच्या दोन मागण्या मान्य तत्त्वत: मान्य करण्यात आल्या. नीट आत्महत्त्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटूंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपये आणि चलो संसद मोर्चातील विद्यार्थ्यांवरील खटले मागे घ्यावेत या कॉक्रोच जनता पार्टीच्या दोन मागण्या केंद्र सरकारने शुक्रवारी तत्त्वत: मान्य केल्या. विद्यार्थ्यांच्या पाच प्रस्तावारही सरकारने सकारत्मकत दाखवली. मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या बाबतीत सरकारचं मौन आहे, त्याबाबत एक दिवसाचा वेळ मागून घेण्यात आला आहे. (संदर्भ- मटा) काल मुंबई आणि पुण्यात तरुणांचे मोठे वादळ घोंघावले आहे. आज आषाढी एकादशी, विठ्ठला सरकारला सुबुद्धी दे आणि हे विद्यार्थ्यांचे आंदोलन त्यांच्या मागण्यासहित मिटू दे, देशावरील अरिष्ट जाऊ दे एवढीच प्रार्थना.... -दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पोरींच्या हातातील बॅनर सोशियल मिडियावर बघायला मिळाले ते असे होते. 56 इंच छाती के लिये ब्रा कहा मिलेगी'  

 

'बीवी नही है तो देश की मारोगे क्या'  

 

पूर्वी पुरुषाचा कमाल अपमान करायचा असला की त्याला बाईसारखं म्हणायचे.  बांगड्या भर.. गरोदर आहेस का. वगैरे.. बाई म्हणजे सर्वात लागणारी शिवी..

 

आणि आता त्या ऐवजी  छातीला ब्रा मिळेल का असे म्हणत आहेत.  जेन झी स्मार्ट झाले तरी ही वृत्ती अजून मनातून बाहेर पडली नाही. जेंडर न्यूट्रल पिढी असे ऐकून होतो.

अजून एक. बांगड्या भर म्हणणाऱ्या बायकाच जास्त असत.  आताही जेन झी "पोरींच्या" हातात हे फलक आहेत असे दिसतेय.

त्यांनी एक नवीन पातळी गाठली आहे.  बीवी नही है तो  देश की मारोगे क्या?

 

म्हणजे हक्काची बायको असेल तर तिची हक्काने मारणे गृहीत आलेच.. ती नसली तर कोणाचीतरी मारलीच पाहिजे. हेही जेन झी पोरींच्या हाती.. 

याउपर सर्वात मोठी कडी म्हणजे जेन झी पिढीने एक मोठी क्षमता गमावलेली दिसते.. 

जोक इज ऑन व्हूम?? हे कळण्याची.

गर्दीत शिरून लुंगी वर केली की समोरचे अनेक जण डोळे बंद करून घेतात आणि उरलेले काही निर्लज्ज हसतात.

अशा वेळी लुंगी वर केलेल्याने समोरच्यांना कसा दणका दिला म्हणून स्वतःच हसणे.. जोक इज ऑन व्हूम?


In reply to by गवि

आमची आई  कोकणातली एक म्हण सांगायची.

हगत्याला लाज 
कि  
बघत्याला   

द्वेषाची पातळी किती खाली जाऊ शकते याचे नवेनवे आयाम पाहायला मिळत आहेत.  

चालायचंच 


In reply to by गवि

आपल्या मताचा आदर आहेच. सध्या, जुन्या वळणांच्या विचारांच्या माणसाला अशा पोरा पोरींच्या पोष्टरचा  त्रास होणे अगदी साहजिकच आहे, नवल वाटत नाही. कपडे कसे घातले, कशी बोलतेस,  संस्कारी राहीली पाहिजेस, चारचौघात खाली मान घालून चालली पाहिजे असे संस्काराची अपेक्षा असणारी जुनी खोडं आपल्या आजुबाजूला दिसत असतात. पण, जेव्हा त्या युवती आंदोलनासाठी रस्त्यावर उतरल्या तेव्हा  विनाकारण  युवतीस झापड मारणारा अधिकारी अशा लोकांना दिसत नाही, उचलून फरफटत नेणा-या मूली त्यांना  दिसल्या नाहीत, रडणा-या ओरडणा-या मुलींचा अक्रोश दिसत नाहीत, हीच माणसं अमानुष लाठीमाराचा निषेध करताना दिसत नाहीत. पण,  युवती कशा वागल्या  हे सांगणारे सध्या खूप दिसत आहेत. 

आधीच्या पिढ्यांनी 'सभ्यतेच्या' आणि 'मर्यादेच्या' चौकटीत राहून आंदोलने केली. पण जेन झी पिढीला हा खोटेपणा मान्य नाही.  जेव्हा देशात खऱ्या अर्थाने स्त्रियांवर अत्याचार होतात, तेव्हा समाज आणि प्रस्थापित गप्प बसतात. पण आंदोलकांनी संतापून दोन शब्द लिहिले की मात्र समाजाला 'संस्कृती' आणि 'सभ्यतेची' आठवण येते. या मुलींचा संताप त्यातून बाहेर आला आहे, त्यांना  माहीत आहे की गोड शब्दांत कोणीही त्यांचे ऐकणार नाही. सत्ताधाऱ्यांना आणि समाजाला अस्वस्थ करणे हाच त्यांच्या आंदोलनाचा मुख्य हेतू आहे.  आणि तो हेतू या बॅनर्सनी शंभर टक्के साध्य केला असावा असे वाटते. 

या मुली गर्दीत स्वतःचे हसे करून घेत नाहीत. त्या अत्यंत निर्भयपणे एका महाकाय आणि शक्तिशाली सत्तेच्या डोळ्यात डोळे घालून त्यांना सांगत आहेत की, "आम्ही तुम्हाला आणि तुमच्या खोट्या पुरुषार्थाला घाबरत नाही. आम्ही आपला आदर करतो पण आपण आमचा राग संताप जेव्हा बाहेर येतो तेव्हा आमची पिढी कोणाचेही ऐकणार नाही, आणि अभिव्यक्तीसाठी आम्हाला कशाचेही बंधन नाही, असा तो संदेश आहे असे वाटते, हे व्यक्तीगत मत आहे कोणाला पटले पाहिजे असा आग्रह नाही. 

-दिलीप बिरुटे
 


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

 

पण आंदोलकांनी संतापून दोन शब्द लिहिले की मात्र समाजाला 'संस्कृती' आणि 'सभ्यतेची' आठवण येते. या मुलींचा संताप त्यातून बाहेर आला आहे,

आंदोलन विरोधकांनापण संताप व्यक्त करण्याचा अधिकार आहे . आणि असे जागरुक " पुरुष " आपला संताप किती सभ्य भाषेत मांडतात ह्यासाठी  लिंक देत आहे. कोणत्या स्त्रियांना रेप करून घ्यायला आवडते ह्याबदद्ल जाणून घ्या.   

https://www.newindianexpress.com/states/kerala/2026/Jul/28/kerala-govt-orders-probe-into-rss-ideologue-t-g-mohandas-shoot-protesters-remarks

हे Satire आहे असे त्याचे म्हणणे आहे.   


In reply to by गवि

सहमत आहे. पुरुषाचा पोशाख स्त्रीने घातला तर ते स्त्रीवादी, पण स्त्रीचा पोशाख पुरुषाने घालणे म्हणजे त्याला खिजवणे. पुरुषाला स्त्रीयांच्या वस्तूंवरून चिडवून आपण स्त्री म्हणजे दुय्यम हेच नकळतपणे बिंबवतोय हे बोल्डपणाच्या नादात समजत नाहीये.


In reply to by श्वेता व्यास

आपल्या देशाच्या स्त्री राष्ट्रपतीला एखाद्या सरकारी सोहळ्याला दूर ठेवणे हा त्या स्त्रीचा सन्मान समजायचा का? 

संसदेत सत्ताधारी पक्षाचा खासदार एखाद्या  अल्पसंख्याक  खासदाराला अश्लील भाषेत शिवी देतो हे त्याच्या परिपकत्वेचे लक्षण मानायचे का? जेनझी जेव्हा हिच भाषा वापरतो तेव्हा त्यांना येथील अंकल अपरिपक्व समजतात. 

 

 


In reply to by आग्या१९९०

माझा मुद्दा स्त्रीला इतर पुरुष किंवा समाज काय वागणूक देतो हा नसून स्त्री स्वतःच स्वतःला दुय्यम कशी करून ठेवते हा आहे. आणि तो विषयाशी अवांतर असल्याने प्रतिसाद दिले नाहीत तरी चालेल. 


In reply to by श्वेता व्यास

प्रतिसाद तुम्हाला दिला नव्हता.

जेनझी हि ज्या मुद्यावर आंदोलन करत आहे ते सोडून त्यांच्याकडे काय उपाय आहेत ते कोणाबद्दल आणि कशी भाषा  वापरतात ह्यावर लिहीणाऱ्यांसाठी आहे.

संसदेत आणि बाहेर आपले नेते काय भाषा बोलतात ह्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर हे विद्यार्थी देत आहेत. " " दीदी ओ दीदी  " बोलणाऱ्याला इथे कोणी आणि किती विरोध केला आहे हे माहीत आहे. उगाच कोणाचे वकीलपत्र घेवून येवू नका. हो , नंतर सारवासारव करून विश्रांती घ्यावी लागते .  

 


In reply to by आग्या१९९०

हा प्रतिसाद तरी मलाच दिलाय का? तसा दिसत तर आहे, आणि आधीचाही तसाच दिसत आहे.


In reply to by श्वेता व्यास

हा प्रतिसाद तरी मलाच दिलाय का? तसा दिसत तर आहे, आणि आधीचाही तसाच दिसत आहे.

हो , हा प्रतिसाद तुम्हालाच दिलाय आणि अगोदरचा चुकून झाला . प्रतिसादाची खिडकी उघडली गेली आणि लिहिताना लक्षात आले नाही. माफ करा , गैरसमज नसावा .  

 

 


In reply to by आग्या१९९०

त्या स्त्रीचा सन्मान समजायचा का? 

परिपकत्वेचे लक्षण मानायचे का?

विषयाला फाटे कसे फोडायचे ते यांच्या कडून शिका.

गवि काय लिहीत आहेत ते सोडून उगाच बीटींग अराउंड  द बुश चालवलंय.

स्त्रीला दुय्यम दर्जा देण्याची चूक आंदोलनातील मुलीच करत आहेत त्याबद्दल लिहिलेले आहे.    


In reply to by गवि

याउपर सर्वात मोठी कडी म्हणजे जेन झी पिढीने एक मोठी क्षमता गमावलेली दिसते.. 

जोक इज ऑन व्हूम?? हे कळण्याची.

 

नेहमीप्रमाणेच हे आंदोलन सुद्धा मूळ मुद्दे सोडून असभ्य व्यक्तिगत हल्ले करून मोदींनाच सहानुभूती मिळवून देणार. 

 

यापूर्वी सुद्धा मोदींवर व्यक्तिगत हल्ले करून मूळ मुद्दे भरकटल्याची अनेक उदाहरणे आहेत. निश्चलनीकरण, देशर  संचारप्रतिबंध असे महत्त्वाचे मुद्दे हातात असूनही मोदींंची पत्नी, बायकोला सोडून पळालेला, चौथी नापास, निरक्षर, इंग्लिशचा गंध नाही, मोदींचे उच्चार, मोदींचा स्मृती इराणी, कंगना, मेलनी, सुषमा स्वराज यांच्याशी संबंध जोडून घाणेरडी टिंगल, १५ लाखांचे आश्वासन, मोदींचे लहानण .  .  .  . यातून मूळ मुद्दे केव्हाच मागे पडले व व्यक्तिगत वारांमुळे मोदींनाच सहानुभूती मिळून लाभ झाला. यातील बहुसंख्य व्यक्तिगत आरोपात शून्य तथ्य होते (उदा. त्यांची पदवी, त्यांचे इंग्लिश, १५ लाखांचे आश्वासन, महिलांशी लावलेले संबंध इ.) व बहुसंख्य जनतेचा या कोणत्याही आरोपांवर शष्प विश्वास बसला नाही.


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

56 इंच छाती के लिये ब्रा कहा मिलेगी' 

 'झोला मैं खरीदके देती हूँ, आप बस निकल जाओ,  

'यु फक्ड विथ दी wrong जनरेशन' 

'बीवी नही है तो देश की मारोगे क्या' 

 'स्टूडेंट थे इसलिए पेल दिया, रेपिष्ट होते तो पार्टी में ले लेते'  

पॅडचं चित्र आणि 'इसने भी लिक नही होने दिया' 

 

वरील स्लोगन ना तुमचा पाठींबा आहे?

कठीण आहे बाबा


In reply to by खटपट्या

Slogans of first election are taunts for next. हि वार्निंग अरुण शूरी ह्यांनी विश्वघबरूना आधीच दिली होती. त्याचीच येथे प्रचिती येत आहे.

> 56 इंच छाती के लिये ब्रा कहा मिलेगी'

५६ इंचांची छाती हा शब्दप्रयोग सदर व्यक्तीनेच आपल्या पौरुषाचे उदाहरण म्हणून केला होता. त्या पौरुषावरच आंदोलकांनी कोटी केली आहे. ह्या संपूर्ण घोषणेत "अश्लील" असे काहीच नाही. ब्रा ह्या शब्दांत "अश्लील" काहीच नाही.  आणि ह्याघोषणेत तर अत्यंत समर्पक आहे.

>  'झोला मैं खरीदके देती हूँ, आप बस निकल जाओ,  

ह्यांत तर आक्षेपार्ह काहीच नाही. मी फकीर आहे, झोळी उचलून कधीही जाईन अशी घोषणा सादर विश्वाघाबरू ने केली होती. त्यावर शाब्दिक कोटी छान आहे.

> 'यु फक्ड विथ दी wrong जनरेशन'

ह्यांत शब्द हा अश्लघ्य असला तरी, आदोलनाच्या संदर्भांत अयोग्य वाटत नाही. Fuck हा शब्दप्रयोग शारीरिक संबंध म्हणून प्रामुख्याने शिवीप्रकारे वापरला जात असला तरी अश्या संदर्भांत हा शब्दप्रयोग आक्षेपार्ह मला वाटत नाही.

> 'बीवी नही है तो देश की मारोगे क्या'

पूर्णतः चुकीचा. अश्लाघ्य अशी घोषणा आहे. विश्वघब्रु च्या धर्मपत्नी प्रामाणिकपणे आपले जीवन सर्व फोकस पासून दूर जगत आहेत. त्यांना त्यांच्या पळून गेलेल्या पतीच्या राजकारणात अश्या प्रकारे आणणे पूर्णतः चुकीचे आहे. त्याशिवाय कुठल्याही व्यक्तीचे लैगिक जीवन किंवा त्याचा अभाव हा पूर्णपणे खाजगी विषय आहे. त्यावर ह्या प्रकारची घोषणा चुकीची आहे.  


> 'स्टूडेंट थे इसलिए पेल दिया, रेपिष्ट होते तो पार्टी में ले लेते'  

हि घोषणा कमी आणि वस्तुस्थिती जास्त वाटते. त्यामुळे ह्यांत गैर तरी काहीच वाटत नाही.

> पॅडचं चित्र आणि 'इसने भी लिक नही होने दिया'

सर्वांत विनोदी घोषणा हि आहे. ह्याला अवॉर्ड दिले पाहिजे.

--

 


In reply to by साहना

मत्सरापायी एखादी व्यक्ती किती टोकाला जाउ शकते याचे उत्तम उदाहरण.

लवकर बरे व्हा.    


In reply to by सुबोध खरे

यात एक अत्यंत किळसवाण्या विकृत प्रकार म्हणजे जमिनीवर मोदींचे चित्र ठेवून काही तथाकथित विद्रोही निर्भीड जेन झी मुले त्या चित्रावर वाकून तालमीत जोर मारतात तशी हालचाल करीत होते. ही हालचाल म्हणजे काय हे वेगळे सांगायला नको. हे करण्यासाठी एक झाला की दुसरा, दुसरा झाला की तिसरा सुरू होता. यांच्यावर किती विकृत संस्कार झाले आहेत हे पाहून अत्यंत किळस आली व खंतही वाटली.

 

आता लगेच मिपावरील काही जण या प्रकाराचेही समर्थन करण्यासाठी पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. 


In reply to by श्रीगुरुजी

गुर्जी तुम्हाला जर "आमच्या गोबीच्या 'शान में तोहमत झाली' असे तुणतुणे वाजवायचे असेल तर खुशाल वाजवा. कुणाला काडीचा फरक पडत नाही. उलट अशी परिस्थिती का उद्भवली ह्यावर चिंतनशिबीर घेणे आवश्यक आहे नाही तर नंतर पक्षाचे चिता शिबीर ठेवावे लागेल."

अश्लील बोलणे आणि हावभाव करणे हे कुठल्याही देहाती अप्रगत समाजाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. हे घटक कुठल्याही समूहांत आले कि ह्या गोष्टी म्हणूनच येतात. त्यामुळे संपूर्ण आंदोलन काही चुकीचे ठरत नाही किंवा बहुसंख्य लोकांवर त्याचा आरोप योग्य ठरत नाही.

एकदा माणूस सार्वजनिक जीवनात आला कि त्याच्यावर कोणी ना कोणी गलिच्छ कमेंट करणारच. गांधीजी पासून नेहरू पर्यंत आणि मनमोहन सिंग पासून गोबी पर्यंत सर्वानाच हे सहन करावे लागते. तुमच्या भक्तीरूपी हृदयाला ठेच वगैरे पोचली तर कुरवाळत बसा. तुमची समस्या आहे. 


In reply to by श्रीगुरुजी

ते चित्र (रस्त्यावर खडूने काढलेले) मोदींचे नाही धर्मेंद्र प्रधानांचे होते. अर्थात ते अतिशय चूक आहे, आणि त्याला चूक आम्ही तरी म्हणू शकतो बुवा, कारण आम्ही मुक्तविचारी आहोत न. आता प्रश्न हा पडतो की आंदोलनात असले प्रकार झाल्याने पूर्ण जेन झी चळवळ बदनाम होते तर मग एकट्या बाबू बजरंगीच्या अपराधामुळे पूर्ण गोध्रा पश्चात झालेला हिंदूंचा आक्रोश बदनाम होईल का? उत्तर नाही असे असल्यास आपल्यासारखे उत्तुंग बुद्धिवादी विवेकी व्यक्तिमत्व नक्कीच असल्या फालतूपणाला (खडू चित्र) दुर्लक्षित करून मुद्द्यावर फोकस करेल अशी रास्त अपेक्षा आहे.

(निरीक्षक लवाद) खोंड्या 

 

आता लगेच मिपावरील काही जण या प्रकाराचेही समर्थन करण्यासाठी पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

गुरुजी किती कला आहेत तुमच्याठाई ? 

(नॉस्ट्रेडमस गुरुजींचा गरगर पंखा) खोंडे पंचाक्षरी.


In reply to by वृषभ खोंडे

> आता लगेच मिपावरील काही जण या प्रकाराचेही समर्थन करण्यासाठी पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

गुरुजी किती कला आहेत तुमच्याठाई ? 

ह्यान्च्या शाब्दिक भुर्जीच्या आधी एक maintained assumption आहे ते खालील प्रकारे आहे.

या प्रतिसादांतील सर्व पात्रे आणि घटना काल्पनिक आहेत. कोणत्याही वास्तवाशी असलेले साम्य केवळ योगायोग समजावा.

गुर्जी नि side hustle म्हणून राशिभविष्य लिहिण्यास हरकत नाही.

१. उद्या पाऊस पडेल पण ऊन सुद्धा पडण्याची शक्यता आहे. 
२. खर्च होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
३. परदेशप्रवासाचा योग आहे पण आरोग्याची काळजी घ्या. 
४. वाहन काळजीपूर्वक चालवा.

इत्यादी.

नमो नमः ।

 

 

 

 


In reply to by श्रीगुरुजी

आता लगेच मिपावरील काही जण या प्रकाराचेही समर्थन करण्यासाठी पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

 

तात्काळ प्रत्यंतर आले. 


In reply to by श्रीगुरुजी

फक्त थोडीशी व्हॉटअबाऊटरी उधार घेतली आहे. व्याज मिळेलच आपल्याला परत वेळोवेळी, पण मूळ मुद्दल तुमचे आहे जे कधीही विसरणार नाही, ग्वाही देतो !. मी फक्त समांतर रेषा ओढली आहे. माझे समर्थन धर्मेंद्र प्रधान खडू चित्राला पण नाही किंवा बाबू बजरंगीला सुद्धा नाही 

(सीबील स्कोअर संतुलित ऋणको) खोंड्या


In reply to by श्रीगुरुजी

आता लगेच मिपावरील काही जण या प्रकाराचेही समर्थन करण्यासाठी पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अगदी अगदी.

या किळसवाण्या प्रकारांचे मिपावरच्या हिंदूद्वेष्ट्यांकडून प्रचंड समर्थन झाले आहे. आणि हे असले मिपाकर लोक्स काही GenZ नाहीत, ते शिंगे मोडून वासरांत शिरत आहेत. सध्या त्यांना मजा वाटत आहे, पण ज्यांचे ते समर्थन करत आहेत ती निरागस वासरे नाहीत, कठाळे आहेत, ते त्यांच्याच गाडीत शिंगे घुसवतील तेंव्हा त्यांना कळेल. 


In reply to by कांदा लिंबू

यांच्या नसानसात मोदीद्वेष, हिंदूद्वेष इतका ठासून भरला आहे की कोणतेही निमित्त काढून तो द्वेष फसफसून बाहेर येतो. त्यातूनच अत्यंत किळसवाण्या विकृत कृत्यांचे समर्थन सुरू होते व त्यातून एक विकृत आनंद मिळतो.

 

 


In reply to by श्रीगुरुजी

> यांच्या नसानसात मोदीद्वेष, हिंदूद्वेष इतका ठासून भरला आहे की कोणतेही निमित्त काढून तो द्वेष फसफसून बाहेर येतो. त्यातूनच अत्यंत किळसवाण्या विकृत कृत्यांचे समर्थन सुरू होते व त्यातून एक विकृत आनंद मिळतो.

 

राशिभविष्य सोडून गृहशोभिका मध्ये पाकक्रिया सुद्धा लहिण्याचे सुप्त टॅलेंट सुद्धा असावे. चहा खदखदून घ्यावा. दूध फसफसून घ्यावे इत्यादी.

> मोदीद्वेष

मोदींचा "द्वेष" असावा असा कुठला कमेंट कुठल्या मेम्बर ने कला आहे ? पुरावा द्यावा नाहीतर आपण उगाच आरोप करत आहोत हे मान्य करावे.

> हिंदूद्वेष

मोदींची किमान टीका किंवा विडंबना असावी पण हिंदुद्वेष वाटावा असा एकही कमेंट मला तरी शोधून सापडला नाही. तुमच्या गोबी भक्तीची लोक थट्टा करतात म्हणून तो "हिंदू" धर्म ठरत नाही.  एक तर पुरावा द्यावा नाहीतर आपण उगाच काही बरळत आहोत हे मान्य करावे.


भाषेवरचे तुमची पकड पराकोटीच्या भक्तीने सैल झाली असावी म्हणून खालील विदा. पण हे सर्व तुम्हाला ठाऊक आहे, पण वेड पांघरून पेडगावला जायची सवय झाली आहे. आपल्या मतांशी सहमत नसलेल्या माणसाला हिंदुद्वेषी वगैरे संबोधित करण्याची सवय झाली आहे.

AI स्टार्ट

'द्वेष' (Dwesh) - अर्थ आणि व्याख्या
मराठी भाषेत 'द्वेष' म्हणजे एखाद्या व्यक्ती, गट, समाज किंवा विचाराबद्दल मनामध्ये असलेला तीव्र तिरस्कार, शत्रुत्व, रोष किंवा कोणाचेही वाईट चिंतण्याची भावना. ही एक अत्यंत नकारात्मक मानसिक अवस्था आहे, ज्यामध्ये समोरच्या व्यक्तीच्या अस्तित्वाचा, विचारांचा किंवा यशाचा राग असतो आणि त्याला हानी पोहोचवण्याची सुप्त किंवा स्पष्ट इच्छा असते.

द्वेष ची उदाहरणे (Examples of Dwesh)
जातीय किंवा धार्मिक तिरस्कार: केवळ एखादी व्यक्ती विशिष्ट जाती, धर्माची किंवा प्रांताची आहे म्हणून तिच्याबद्दल मनात अनामिक राग बाळगणे आणि तिला समाजात कमी लेखणे.

हेव्यापोटी नुकसान करणे: सहकाऱ्याच्या पदोन्नतीमुळे (Promotion) किंवा यशापयशावरून त्याच्याबद्दल जळफळाट होणे आणि त्याच्याबद्दल खोटी माहिती पसरवून त्याचे नुकसान करण्याचा प्रयत्न करणे.

टीका किंवा विडंबन हे 'द्वेष' का नाही? (Counter-examples)
प्रत्येक टीका किंवा विडंबन हे द्वेषापोटी केले जाते असे नाही. त्यांच्यामध्ये मूलभूत फरक असतो:

१. टीका (Criticism)
स्वरूप: एखाद्याच्या विचारांवर, कृतींवर किंवा धोरणांवर वैचारिक पातळीवर आक्षेप घेणे किंवा त्रुटी दाखवणे म्हणजे टीका.

द्वेष का नाही? टिकेचा उद्देश सुधारणा करणे, चुकीच्या गोष्टींवर प्रकाश टाकणे किंवा पर्यायी विचार मांडणे हा असतो.

उदाहरण: एखादा नागरिक किंवा पत्रकार सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणावर टीका करतो. यात त्या मंत्र्याबद्दल वैयक्तिक द्वेष नसून, त्या धोरणातील त्रुटींवर बोट ठेवलेले असते. त्यामुळे शास्त्रीय किंवा वैचारिक टीका ही द्वेष ठरत नाही.

२. विडंबन (Parody)
स्वरूप: मनोरंजनाच्या, व्यंग (Satire) किंवा प्रबोधनाच्या उद्देशाने एखाद्या कलाकृतीचे, घटनेचे किंवा व्यक्तीच्या शैलीचे हास्यविनोदी स्वरूपात अनुकरण करणे म्हणजे विडंबन.

द्वेष का नाही? विडंबनाचा उद्देश हसवणे किंवा सामाजिक-राजकीय वास्तवावर उपरोधिक मार्गाने प्रकाश टाकणे हा असतो. यात उपहास असतो पण वैयक्तिक पातळीवर कुणाचेही अहित करण्याचा किंवा द्वेष पसरवण्याचा भाव नसतो.

उदाहरण: एखाद्या लोकप्रिय सिनेमाची किंवा नेत्याच्या शैलीची स्टँड-अप कॉमेडीमध्ये किंवा व्यंगचित्रात केलेली खिल्ली. यात द्वेष नसून उपरोधिक विनोद असतो. त्यामुळे विडंबन हे द्वेष नव्हे.


AI एन्ड 


In reply to by श्रीगुरुजी

तुम्ही परत पनवेल म्हणून वांद्रे स्लो पकडली ! . 

 

रामभक्त हिंदू आम्ही, रामलला समोर कायम नतमस्तक, शनिवारी हनुमानाला तेल उडीद वाहणारे. घरचे सगळे कुलधर्म कुलाचार उपचारे निभावणारे, पोरांना रामरक्षा, भीमरूपी शिकवणारे. 

आता राजकीय आंदोलन झाले, पोरांनी केले, नेत्यांना (घाण) शिव्या बसल्या, एकाने राजीनामा दिला. ते आंदोलन होताना काही हिंदू विरोधी घोषणा बसल्या (त्रिवार निषेध) पण आमचा फोकस मुद्द्यावर होता आहे राहील (आम्हा हिंदूंच्या महाभारतातील अर्जुन आणि पक्ष्याचा डोळा मधून ही शिकवण घेतो देतो आम्ही पिढ्यानपिढ्या) 

आंदोलनाला समर्थन देणारे हिंदू विरोधी का ? 

फक्त सत्ताधारी पक्षाला विरोध केल्यामुळे का ?

 माझ्या आणि माझ्या रामाच्या मध्ये यायची परवानगी मी कोणालाच दिलेली नाही त्यामुळे आमच्यावर हा शिक्का का ? 

हिंदू धर्म वेगळा आणि हिंदुत्व वेगळे नाही का ? 

 

(नेशन वॉन्ट्स टू नो) अर्णब खोंडे


In reply to by कांदा लिंबू

ते त्यांच्याच गाडीत शिंगे घुसवतील तेंव्हा त्यांना कळेल. 

 

अनुस्वार विरहित शाब्दिक कोटी आवडली. पण तूर्तास आम्ही गाडीत घातलेले इथेनॉल ह्या विषयावर विचार करतोय. तुमच्या पण गाडीत असणार बरंका ते, बघा बुवा काय ते. शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे बैल खोंड इत्यादी पाळीव प्राणी आवरणे जमते म्हणून खोंडे आहे आम्ही. 

 

(फ्री विल रँच मिसळपाव काउंटी टेक्सास खुर्द मालक) जॅक खोंडे


In reply to by वृषभ खोंडे

अनुस्वार विरहित शाब्दिक कोटी आवडली. पण तूर्तास आम्ही गाडीत घातलेले इथेनॉल ह्या विषयावर विचार करतोय. तुमच्या पण गाडीत असणार बरंका ते, बघा बुवा काय ते. शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे बैल खोंड इत्यादी पाळीव प्राणी आवरणे जमते म्हणून खोंडे आहे आम्ही.

 

हा हा हा !!! काही ठिकाणी नियमांच्या कचाट्यातून वाचण्यासाठी अश्या कोट्या कराव्या लागतात, दादा; आता तुम्हाला हे मी सांगणे म्हणजे अगदीच ...

बाकी, आम्ही सुद्धा शेतकरीच बरं का. कागदावर स्केल ठेऊन पेन्सिलीने सरळ रेष ओढावी तशी (उजव्या हातात रुमनं धरून, डाव्या हातात कासरा धरून, नीट  तिफण चालवून) एकरांशी वावरात एकसारखी सरळ पेरणी करण्याचे कौशल्य आहे, पण यांत्रिक शेतीने त्याची काही गरज उरली नाहीय!  
 

- (शेतकरी) कांदा लिंबू 

 


In reply to by कांदा लिंबू

हाँंगआशा्शी ,

आता तुम्हाला कुणी म्हणाले, नाव विष्णू अवताराचे, काम बळी राजांचे. तर मला सांगा. 

अपमान झाला तर कुणाचा झाला? तुमचा? विष्णू चा? की बळी राजाचा ?

आणि कसा?

सीतापती हे संबोधन श्री रामाने ही मिरविले आहे अभिमानाने.

त्याचा अपमान वाटतो का?


In reply to by अभ्या..

आता तुम्हाला कुणी म्हणाले, नाव विष्णू अवताराचे, काम बळी राजांचे. तर मला सांगा. 

 

अवतार विष्णूचाच आहे, रूपेही त्याचीच आहेत. आणि हे पूर्ण विश्वाला माहित आहे. प्रत्यक्ष विष्णूचा अवतार असा लपून थोडीच राहणार? पण त्या गोष्टीचा विनाकारण बाऊ करून, विष्णूचा अवतार कार्यात खोडा घालण्याच्या हीन मनसुब्याने , तसेच कार्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी कार्यकर्त्याच्या रूपांची चर्चा करण्याने मध्यंतरी एका क्षुद्र जीवास त्या अवताराने आपले क्वचितच दिसणारे रौद्र रूपही दाखविले होते! 

 


In reply to by कांदा लिंबू

अपमान दोन्ही उदाहरणात कुणाचा कसा विचारले आहे.

.

लीला चरित्र नको...

ते माहिोती आहे..


In reply to by कांदा लिंबू

> या किळसवाण्या प्रकारांचे मिपावरच्या हिंदूद्वेष्ट्यांकडून प्रचंड समर्थन झाले आहे. आणि हे असले मिपाकर लोक्स काही GenZ नाहीत, ते शिंगे मोडून वासरांत शिरत आहेत. सध्या त्यांना मजा वाटत आहे, पण ज्यांचे ते समर्थन करत आहेत ती निरागस वासरे नाहीत, कठाळे आहेत, ते त्यांच्याच गाडीत शिंगे घुसवतील तेंव्हा त्यांना कळेल. 

 

पुरावे देऊन बोलावे.

नक्की कुठल्या "किळसवाण्या" गोष्टीचे कुणी कुठे समर्थन केले आहे ? नेहमीच्या मोदी विरोधकांनी सुद्धा इथे कुठल्याही किळसवाण्या गोष्टीचे समर्थन केले आहे असे दिसून येत नाही. उलट नसत्या गोष्टी सोडून "मुद्याचे बोला" हाच सूर लावून धरलेला आहे.

शहाणा माणूस बोटाने चंद्र दाखवत असताना मुर्खाला त्या बोटाच्या नखावर नजर रोखून धारावीशी वाटते. 


In reply to by साहना

सांप्रत काळी मी संघ / भाजप / मोदी समर्थक नाही. वेळोवेळी त्यांच्यावर (त्यांच्या समर्थकांना खोडून काढता न येणारी) टीका करतो. (एकेकाळी काही अंशी त्यांचा समर्थक होतो. त्यांची धोरणे बदलली तर त्यांचे पुढे समर्थन करीन. मी काँग्रेस समर्थक नाही. तरीही त्यांच्या काही बाबींचे मी समर्थन केले आहे. पुढेही करीन)

मिपावर मी वेळोवेळी मांडलेल्या मुद्द्यांमधून हे दृग्गोचर होते.


धर्मेंद प्रधान यांची कारकीर्द काही फारशी समाधानकारक नव्हती. विद्यापीठांतील सवर्णविरोधी नियमांमुळे तर ती पुरती डागाळली. मोदी सरकारचे शैक्षणिक धोरण, त्यांच्या शिक्षण खात्याचा कारभार, शिक्षण मंत्र्याची कारकीर्द याचे मी कधीही समर्थन केलेले नाही. वेळोवेळी त्यांवर टीकाच केली आहे.

सदर NEET आंदोलनासंदर्भात देखील मी सरकारचे / सरकारच्या धोरणांचे कधीही समर्थन केले नाही. न पटलेल्या बाबींवर टीकाच केली आहे. त्यामुळे मी मोदी समर्थक या भूमिकेतून इथे लिहितो असा आरोप माझ्यावर कुणी करू शकत नाही.


आता माझे हे वरचे विधान व त्यातील ठळक भाग  -

या किळसवाण्या प्रकारांचे मिपावरच्या हिंदूद्वेष्ट्यांकडून प्रचंड समर्थन झाले आहे. आणि हे असले मिपाकर लोक्स काही GenZ नाहीत, ते शिंगे मोडून वासरांत शिरत आहेत. सध्या त्यांना मजा वाटत आहे, पण ज्यांचे ते समर्थन करत आहेत ती निरागस वासरे नाहीत, कठाळे आहेत, ते त्यांच्याच गाडीत शिंगे घुसवतील तेंव्हा त्यांना कळेल.

 

जंतरमंतर वरील आंदोलनात प्रभू श्री रामांचा अवमान करण्यात आला. माझ्यासहित अनेकांनी त्याचा निषेध नोंदवला. GenZ च्या तथाकथित अभिव्यक्तीचे समर्थन करणाऱ्यांनी या घटनेचा निषेध केला का? मिपावर तरी मला तसे दिसले नाही. 
 

तेंव्हा हिंदूंच्या पूज्यस्थानाचा अवमान ही बाब समाजकंटकांसाठी अतिशय सुगंधी, सुवासिक असेल, पण प्रत्यक्षात मात्र तो अतीशय किळसवाणा प्रकार आहे. आणि या किळसवाण्या प्रकारांचे मिपावरच्या हिंदूद्वेष्ट्यांकडून प्रचंड समर्थन झाले आहे. 
 


In reply to by कांदा लिंबू

> या किळसवाण्या प्रकारांचे मिपावरच्या हिंदूद्वेष्ट्यांकडून प्रचंड समर्थन झाले आहे.

मिपावर कुठे समर्थन कुणी केले आहे ? साधा पुरावा मागितला आहे.

उगाच पैसे कधी देता हे विचारल्यावर गणपती बाप्पा मोरया म्हणून ओरड मारावी हा प्रकार चालू आहे.

 


In reply to by श्रीगुरुजी

२०२१ मधे एक केस झाली होती सुल्ली डील्स केस. त्यात मुसलमान समाजातील (बुरखा त्यागून शिक्षण घेऊन व्यावसायिक जीवनात यशस्वी इत्यादी) स्त्रियांचे फोटो पोस्ट करून त्यावर "लिलाव बोली" लावत ही मुल्ली माझी ती तुझी इत्यादी पोस्ट केले जात असे. 

त्याहून पुढे जाऊन २०२२ मधे ह्याच किळसवाण्या प्रकाराचे चक्क एक ऍप बनवूून ते GitHub वर होस्ट करण्यात आले होते. दिल्ली पोलिस स्पेशल सेल आणि मुंबई पोलिसांनी अर्थातच केस मधे नीट तपास करून आरोपींना न्यायालयापुढे हजर केले होते. तत्कालीन मिसळपाव वर तेव्हाही उच्चविद्याभूषित आणि सुशिक्षित भद्रजनांत त्याच्या विरुद्ध संतापाची लाट नक्की उसळली असेल फक्त ती दिसली नाही कुठे ! 

(इन्व्हेस्टिगेटिव पत्रकार) रामनाथ खोंडे 

 

आता लगेच मिपावरील काही जण या प्रकाराचेही समर्थन करण्यासाठी पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

(नवशिक्या नॉस्ट्रेडमस) खोंडे


In reply to by सुबोध खरे

> मत्सरापायी एखादी व्यक्ती किती टोकाला जाउ शकते याचे उत्तम उदाहरण.

उगाच काही तरी अल्पप्रयत्न कमेंट करून जाण्यापेक्षा व्यवस्थित उदाहरण द्या.

वरील घोषणांच्या विश्लेषणात कुठे मत्सर आहे किंवा टोकाची भूमिका आहे ? मत्सर कुणाचा  ? गोबीजींचा ? कश्यासाठी म्हणून ? ते ७५ वर्षांचे आहेत. जे काही त्यांना मिळवायचे होते ते मिळवले. आता त्यांची उतरती कळा आहे. त्यांचा मत्सर नक्की का म्हणून मला असेल ?  गोबी सरकारने अपेक्षेपेक्षा कमी काम केले. भारताचे LKY होण्याची त्यांची क्षमता होती ते नेहरू २.० झाले असे त्यांचेच समर्थक म्हणत आहेत. मला सुद्धा मान्य आहे. कदाचित तुम्हाला सुद्धा असेल.

ज्या व्यक्ती गोबीच्या भक्तीरसांत ओथंबून जात आहेत, "त्यांना अहो ती गंगा नाही, तुम्ही गटारांत लोळत आहात" एव्हडेच मी सांगत आहे. माझे नैतिक कर्तव्यच आहे. त्यांत काय मत्सर आहे. ? योग्य त्या वेळी गोबीसाहेबांचे समर्थन सुद्धा केले आहे, सदर विद्यार्थ्यांचा अंदोलनाची सुद्धा टीका केली आहे. पण कुणी अश्लील घोषणा दिल्या म्हणून नाही. शहाण्याने चंद्राकडे बोट दाखवले तर मूर्ख माणूस बोटांच्या नखांकडे लक्ष केंद्रीत करतो. हि तशी गोष्ट आहे.

सध्याच्या आंदोलनात युवा वर्गाचा प्रामुख्याने सहभाग आहे आणि त्यांच्यात प्रक्षोभ आहे. ह्या प्रक्षोभाचे रूपांतर ज्या आंदोलनात झाले आहे त्याला पाठिंबा नसला तरी त्यातील लोकांना राग येण्याचा अधिकार आहे कि नाही ह्यावर चर्चा होणे आवश्यक होते. ती चर्चाच बंद पडण्याचा प्रयत्न केला गेला. आता मूळ मुद्दा सोडून घोषणा अश्लील आहेत, मुलांनी आदोलनाच्या वेळी चिप्स खाऊन पाकीट जमिनीवर फेकले असल्या निरर्थक गोष्टी पुढे आणून भाजीपाव मंडळी जनतेची दीशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचा प्रतिवाद होणे आवश्यक आहे.

१. कुठल्याही आंदोलनात एकदा जनता एकत्र आली कि संधीसाधू मंडळी त्यांत घुसून आपले हाथ धुण्याचा प्रयत्न करतात. वांगचुक, अण्णा, केजरीवाल, राहुल गांधी आणि भूतकाळांत सुषमा स्वराज इत्यादी मंडळी ह्या वर्गांत मोडतात. ह्या संधीसाधू व्यक्ती घुसल्या म्हणून वेळ आणि पैसे दवडून येणारे सर्वच आंदोलनकर्ते हे संधीसाधू, मूर्ख किंवा व्ययैक्तिक फायद्यासाठी येतात असे नाही.

२. आंदोलनाची व्याप्ती वाढली कि भारतीय लोकशाहीला धोका उत्पन्न करणारे लोक आपोआप फायदा घेतात. ह्याचा अर्थ आंदोलन त्यांचेच आहे किंवा आंदोलनकर्ते हे ह्या दुष्ट लोकांचे समर्थक आहेत असेही होत नाही.

३. जिथे असंख्य लोक तिथे सर्व प्रकारचे लोक असतील. व्यसनी, अश्लील बोलणारे, अश्लील हावभाव करणारे, घाणेरडे बोलणारे इत्यादी पण हे आंदोलनाचे व्यवच्छेदक लक्षण होत नाही. भाजीपाव चे समर्थक जे स्वतः संस्कारी असण्याचा आव आणतात त्या प्रौढ व्यक्ती किती खालच्या स्तरावर जाऊन किती गलिच्छ भाषा ह्या संकेतस्थळावर करतात हे आम्ही पहिले आहे. भाजपच्या मिटींग्स मध्ये मी भूतकाळांत गेले आहे. तिथे मनमोहन सिंघांच्या विषयी काय काय बोलले जात होते, कसल्या प्रकारची भाषा आणि हावभाव केले जात होते हे सुद्धा पाहिले आहे. त्यामुळे ह्यांत नवीन काही नाही. ह्या गोष्टींवर फोकस करून मूळ मुद्याला बगल देणारी मंडळी इथे दिशाभूल करत आहेत हे स्पष्ट करणे आवश्यक आहे.

४. टोकाची भूमिका म्हणे. मी काळजीपूर्वक भाषेचे विश्लेषण केले आहे. हि भाषा गलिच्छ आहे त्याला गलिच्छ म्हटले आहे. पण इतर घोषणांत नक्की काय वाईट आहे हे तुम्हाला स्पष्ट करणे आवश्यक आहे. ह्यांत टोकाचे काय आहे ? ह्याच घोषणा कुणाच्याही विरोधांत असल्या तरी हेच म्हटले असते. मत्सराचा प्रश्नच नाही.

तुम्ही मला भजनमंडळीतले वाटत नाही त्यामुळे योग्य त्या वेळी ईश्वरीय प्रेरणेने डोळे उघडतील अशी आशा धरते !

 


In reply to by सुबोध खरे

मत्सरापायी एखादी व्यक्ती किती टोकाला जाउ शकते याचे उत्तम उदाहरण.

लवकर बरे व्हा.    

 

संपूर्ण सहमत. 


ज्ञानदेवे रचला पाया तुका झालासी कळस अशा भक्ती परंपरेने ज्या महाराष्ट्राला जातीधर्म पंथ प्रांत सगळ्या बंधनातून मुक्त करून विष्णुदास केले मेणासारखा मऊ स्वभाव आणि प्रसंगी वज्राचा निर्धार दिला त्याच परंपरेने सकल महाराष्ट्राला विठुराय बरोबर गोष्टीला बरोबर आणि चुकीच्या गोष्टीला चूक म्हणण्याची सुबुद्धी देऊ देत हीच प्रार्थना.

 

 

images (33)

जेन झीच्या फलकांविषयी:

"हे बोलायचं नाही, तसं वागायचं नाही" अशा भीतीच्या चौकटीला जेन झीने एका आठवड्यातच सुरुंग लावला. जे शब्द अश्लील किंवा अर्वाच्य म्हणून मागच्या पिढ्या दाबून ठेवत होत्या, त्याच पिढ्या अनेक कटू वास्तवांवर मात्र सोयीस्कर मौन बाळगत होत्या. जेन झीने हा दुटप्पीपणा उघडपणे नाकारला.

त्यांच्या फलकांची भाषा टोकदार, स्पष्ट आणि कोणताही आडपडदा न ठेवणारी आहे. त्यांनी कथित सभ्यतेचा आणि संस्कृतीच्या नावाखाली उभारलेल्या दिखाऊ मुखवट्याचा भंग केला आहे.

या सगळ्यातून एक गोष्ट ठळकपणे दिसते या पिढीची स्पष्टता हेवा वाटावी अशी आहे. आधीच्या अनेक पिढ्यांनी भावना, अन्याय आणि वेदना मनातच दडपून ठेवल्या; जेन झी तसं करत नाही. विशेषतः महिलांनी मुकाटपणे सहन करायचं, अन्याय गिळून गप्प राहायचं, यातच कर्तव्य समजायचं, ही अनेक पिढ्यांची मानसिकता या पिढीने मोडून काढ  आहे असे दिसले.

याचा अर्थ ही पिढी स्वैराचारी किंवा बेजबाबदार आहे असा नाही; उलट ती स्वतःचं म्हणणं निर्भीडपणे आणि स्पष्टपणे मांडणारी आहे. वरवर बेफाम वाटणारी ही पिढी प्रत्यक्षात अत्यंत जागरूक, प्रश्न विचारणारी आणि सत्तेला अस्वस्थ करणारी ठरू शकते.


In reply to by गणेशा

एक मजेशीर माहिती द्यायचा मोह टाळत नाही, इथे मोदींना गुप्तांग इत्यादी पोस्टर दाखवणारी ही पिढी शिव्या देणारी ही पिढी सेक्सुअली आजवरची सगळ्यात उदासीन पिढी आहे ! असे हल्लीच एका ठिकाणी वाचले होते ! त्यामुळे ही पोरे एखाद्याला xxड्या म्हणण्यात त्या अवयवाचा वर्णनोद्भाव अश्लील भाव आहे का फक्त एक टारगट नॉन कन्फर्मिस्ट अभिव्यक्ती आहे ही रेखा आपल्यासारख्या ढळलेल्या पिढीला कळण्यास खूपच पुसट आहे असे वाटते 


In reply to by गणेशा

+१ 

 

२०१२ मध्ये एक आंदोलन झाले ह्याला हिंसक वळण लागले आणि त्याचा एक कुप्रसिद्ध फोटो आहे. एक मुस्लिम मुलगा अमर जवान ज्योती ला लाथ मारत आहे असा. आता युवा वर्गाने ह्या प्रकारची हिंसा करावी कि अश्लील घोषणांचे फलक घेऊन आंदोलन करावे ? आम्हाला काय पाहिजे ?

युवा पिढी ज्या प्रकारे आपल्या खाजगी जीवनात बोलते, ज्या पद्धतीने राग व्यक्त करते त्याच पद्धतीने मुलांनी आपला राग आंदोलनात व्यक्त केला आहे असे दिसते. काही जुन्या वळणाच्या मंडळींना हे आवडत नाही हे स्वाभाविक असले तरी निव्वळ भाषाशुचितेचे नियम तोडले म्हणून आंदोलन आणि त्यांच्या मागण्या अनैतिक होत नाहीत. आंदोलनाच्या मागण्या आणि त्यातून ओढवलेली नामुष्की हे लपविण्यासाठी मंडळी ह्या गोष्टींचा विनाकारण बाऊ करत आहेत.

काही ठिकाणी तर निव्वळ थापा चालल्या आहेत.

उदाहरण पहा :

> 56 इंच छाती के लिये ब्रा कहा मिलेगी

ह्यांत अश्लील गलिच्छ किंवा शेलके असे काहीच नाही.  ज्या व्यक्तीच्या विरोधांत हि घोषणा आहे त्याच व्यक्तीने " आपली ५६ इंच ची छाती " हा विषय आपल्या शौर्याच्या विषयांत आपले पौरुष दाखविण्यासाठी वापरला होता. त्याचा फायदा करून घेतल्यावर त्यावर त्याच माणसाची भाषा वापरून कोटी करणे माझ्या मते अत्यंत क्रेयेटीव्ह आहे. 
भाषाशुचितेच्या दृष्टीने ब्रा ह्या शब्दांत काहीही अश्लील नाही. कुणाला तसे वाटते तर आपले डोके तपासून घेण्याची गरज आहे.


IT सेल ने आपले टूलकिट वापरून आंदोलनकर्त्यांना देशद्रोही, विदेशी ताकत के हात, हिंसक इत्यादी इत्यादी ठरविण्याचा प्रयत्न केला. हिंसाही झाली नाही आपले स्वतःचे हसे झाले. मागणी पूर्ण झाल्यानंतर आंदोलन आपोआप थंडावले.

आंदोलन थंडवण्यासाठी IT सेल ने जातीय फूट पाडण्यासाठी "आंदोलनाचा पुढील टप्पा आरक्षणाच्या विरोधांत असेल" अशी अफवा सुद्धा पसरवली आहे.

 


याचा अर्थ ही पिढी स्वैराचारी किंवा बेजबाबदार आहे असा नाही; उलट ती स्वतःचं म्हणणं निर्भीडपणे आणि स्पष्टपणे मांडणारी आहे. वरवर बेफाम वाटणारी ही पिढी प्रत्यक्षात अत्यंत जागरूक, प्रश्न विचारणारी आणि सत्तेला अस्वस्थ करणारी ठरू शकते.

अगदी बरोबर .

हि मुले अपेक्षेपेक्षा हुषार निघाली हे बऱ्याच  पालकांच्याही पचनी पडले  नाही. येथील अंकल पार्टीने तर सरकारपेक्षा अधिक धसका घेतला आहे. ह्या विद्यार्थ्यांनी आमच्याकडे प्रत्येक समस्थेकडे उत्तर आहे असा दावा केलेला नाही  हे अंकल पार्टीला माहीत नाही का? उगाच फाटे फोडत आहेत. 


अखेर धर्मेंद्र प्रधानांनी मंत्रीपदत्याग केला. खूप उशीर केला, पण मोदी-शहांना अंदाज आला की परिस्थिती हाताबाहेर जात आहे व त्यातून त्यांना मंत्रीपदत्याग करण्यास सांगितले असावे. योग्यवेळी माघार हे मोदींची कार्यपद्धती आहे व तीच पुन्हा एकदा त्यांनी वापरली.


In reply to by श्रीगुरुजी

योग्यवेळी माघार हे मोदींची कार्यपद्धती आहे व तीच पुन्हा एकदा त्यांनी वापरली.

 

ही योग्य वेळ आहे ? इतकी नाचक्की होऊन जगभरात ! ? पोरांची डोकी फोडून बदनामी होऊन ?? पहिल्या दोन दिवसात तिथे फक्त दिपके अन् वांगचुक असताना डाव्या विद्यार्थी संघटना पूर्ण ताकदीने तिथे जमा होण्याच्या अगोदर काही केले असते तर वेगळे, हे असे आठवडाभर आय माय शिव्या खाऊन स्वतःच्या अन् संलग्न व्यक्तींच्या अवयवांच्या (ह्यात इटालियन पीएम सुद्धा आल्या) चर्चा होऊन गेल्यावर राजीनामा घेतला अन् म्हणे योग्य वेळ ?  


In reply to by वृषभ खोंडे

दिल्ली सीमेवरील शेतकरी आंदोलन किंवा भूमी अधिग्रहण विधेयके यातून कधी माघार घेतली व त्याचा पुढे कसा लाभ मिळाला  तो इतिहास पहा. 


In reply to by श्रीगुरुजी

तथ्याधारित का तुम्ही मिसळपाव वर लिहून हौस पुरवून घेतलेला? 😂😂😂😂😂


In reply to by श्रीगुरुजी

प्रज्ञाचक्षु + तर्कचक्षु दोन्ही लावून शोधला , काहीच सापडले नाही ! 

 

भक्तिचक्षु नाहीयेत मोकळे, आमचे तरी भक्तीचक्षु आज अन् कायम पांडुरंगावर भिस्त ठेवून आहेत अन् त्याच्यापुढे काही बघत नाहीत, त्याच्यावर गंडांतर आले तर समाचार घ्यायला आम्ही पुरेसे खंबीर आहे त्यासाठी आम्हाला संस्थात्मक किंवा सरकारी ओंजळीने धर्माच्या गायीचे दूध प्यायची गरज नाही, शिक्षण नावाचे वाघिणीचे दूध पुरेसे आहे. 

 

रच्याकने , रामलला पुढील दानपेटीतील भक्तीच्या परिसीमेतून भोळ्या हिंदूंनी टाकलेल्या चवली पावलीच्या समुच्चयाचा अपहार करून भ्रष्टाचाराच्या कमाई ने बंगले बांधल्याबद्दल तर रामलला ने ही शिक्षा केली नाहीये ? ह्यावर पुढील बौद्धिकात एक सेशन घ्या !


In reply to by श्रीगुरुजी

मोदींनी कैक वेळा (तुमच्या अगम्य समजानुसार) योग्य वेळी कैक ठिकाणे/ मुद्दे आणि सिच्युएशन मधून घेतली आहे असाच आहे, ह्याचे तुम्हाला भान आहे ना ?

😂😂😂😂😂


In reply to by श्रीगुरुजी

आता " चंदा चोर गद्दी छोड़ " बाकी आहे. अर्थात हे आता भक्तच करतील .


In reply to by Bhakti

खरंच जिंकली का हे समजण्यासाठी थोडा काळ प्रतीक्षा करावी लागेल. Won a battle, but lost the war असेही होऊ शकते.‌


 जंतर मांतर येथे पोलिसांनी facial recognition system deploy केली आहे. 2000 लोकांना identify केले आहे असे अधिकाृत आकडा आहे.IMSI catcher device सुद्धा लावले आहे अशा बातमी होती खरे खोटे माहिती नाही. पण हे खरे असेल तर पोलिस कात्रजचा घाट दाखवतील. कारण हे device असेल तर फोन number, sim number आणि शेवटी address सगळे काढले जाईल. म्हणजे इकडे मागण्या मान्य झाल्या आणि तिकडे पारपत्र अर्ज फेटाळला,FIR दाखल झाली, खाजगी फर्म ने BV मधे हाकलून दिले तर आनंद साजरा करायचा की दुःख हे प्रत्येकाने आपल्या वकुबानुसार ठरवावे.दादरच्या दोन मूुलीना identify करून समज दिली आहे असे त्या मूुलीनी सांंगीतल्या चे व्हिडिओ होते. उत्तराखांडच्या गावातल्या काही जणांना सुद्धा  detain केले. राहत्य  ठिकाणी आजूबाजूला कुठेही गुंन्हा घडला,riot सदृश काही झाले की पोलिस ह्या रिेकॉर्ड वरच्या लोकांना आधी आत घेतात. त्यावेळी पोलिसांना आम्ही जेन झी आहोत, आम्ही कोणाला घाबरत नाही असे सांगायचे की आंदोलन करणाऱ्या नेत्यांना फोन करून आम्हाला सोडवा म्हणून विनवण्या कारायच्या हा विचार सुद्धा आंदोलकांनी आताच करून ठेवावा. राजकीय कार्यकर्ते सुद्धा हे प्रकार झेलतात, पाश्चात्ताप करतात पण त्यांना निदान  आयुष्यभर आंदोलने, पोलिस केस,माोर्चा हेच कारायचं असते. इथे आंदोलक स्वतः  विद्यार्थी म्हणूवून घेत आहेत त्यांना हे झेपेल का नाही माहिती नाही. कंदाचित ह्या समस्येवर सुद्धा जेन झी la काहीही जमू शकते असे सांगितले जाईल.


In reply to by अप्पा जोगळेकर

तुम्ही पोलिस स्टेशन वर भरपूर चकरा मारल्या असत्या तर हे असले तर्कट न लिहिते आप्पा ! ह्यात स्टेप बाय स्टेप चिरफाड होऊ शकते, पण ती थोड्या वेळाने !

 

तूर्तास गुरुजी काय ज्ञान पेटी उघडतात ते पाहतो.

 


In reply to by अप्पा जोगळेकर

ही भीती कोणालाच असणार नाही ! त्यासाठी सगळेच रेकॉर्डवर जाणे गरजेचे नसते, परत सांगतो fear mongering करू नये.


In reply to by अप्पा जोगळेकर

अरे बापरे! मग त्यातून केंद्रीय गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी याहूनही मोठं आंदोलन व्हायचं.


In reply to by अप्पा जोगळेकर

जंतर मांतर येथे पोलिसांनी facial recognition system deploy केली आहे. 2000 लोकांना identify केले आहे असे अधिकाृत आकडा आहे. 

 

FRS system कशी काम करते हे सांगा अगोदर. फेस मॅच करायला आधी फेस डेटाबेसेस मध्ये असायला हवा. तो असतो पोलिसांकडे हिस्टरी शीटर जनतेचा. त्यांना शा* काय फरक पडत नाही.

 

 IMSI catcher device सुद्धा लावले आहे अशा बातमी होती खरे खोटे माहिती नाही. 

 

माहिती नाही/ verified नाही ते मांडून भीती पसरवण्याचे पाप का डोक्यावर घेता ? किमान IMSI catcher काम कसे करते त्याची माहिती गुगलून तरी पाहायची राजे. IMSI खूप cliche तंत्रज्ञान असून ते असे लॉ अँड ऑर्डरला सुद्धा वाटेल तसे वापरत नाहीत. 

 

पण हे खरे असेल तर पोलिस कात्रजचा घाट दाखवतील. कारण हे device असेल तर फोन number, sim number आणि शेवटी address सगळे काढले जाईल. 

 

कसा ? तो सांगा , राजे तुमच्या आमच्या देशात फुटपाथ वर छत्र्या लावून सिमकार्ड विकणारी एअरटेल अन् जियोची पोरे बायोमेट्रिक verification करू शकतात पण पोलिसांना ते allowed नाहीये, आधार ऍक्टचा अभ्यास करा

 

म्हणजे इकडे मागण्या मान्य झाल्या आणि तिकडे पारपत्र अर्ज फेटाळला,FIR दाखल झाली, खाजगी फर्म ने BV मधे हाकलून दिले तर आनंद साजरा करायचा की दुःख हे प्रत्येकाने आपल्या वकुबानुसार ठरवावे. 

 

FIR, non-cognizable offence (अदखलपात्र गुन्हा), बाँड, स्टेटमेंट इतकी माहिती घ्या. तूर्तास तुमच्या वकुबात ह्याची गरज आहे 😂🙏🏾


In reply to by आग्या१९९०

तृणमूल (२०)  व शिल्लक शिउबाठा (६)  विभागातून आधीच तरतूद करून ठेवली आहे. गरज भासल्यास ट्रोजन अश्व (८) हाताशी आहेतच जे परवाच मोदींची भेट घेऊन आले. चंद्राबाबू व नितीशचे २८ गेले तर ३४ ची तरतूद आहे.


हार्दिक पटेल, कन्हैया कुमार प्रमाणे आता अभिजीत दिपकेला सुद्धा विविध पक्षांकडून आमंत्रण येईल. यातून रागा व प्रिव काहिसे मागे पडल्यासारखे भासतात. श्रीराम मंदिर देणग्या चौर्य प्रकरणही मागील शेगडीवर गेल्यासारखे भासतेय.