कॉकरोच जनता पार्टी आंदोलन- दिल्ली. पहिल्या भागात मिपाकरांनी शांततेच्या मार्गाने आपल्या भावना व्यक्त केल्या. नीट परीक्षेचे पेपर लीक होणे आणि तत्त्सम घोटाळ्याविरुद्ध दिल्ली येथे जंतरमंतरवर सीजेपी अर्थात कॉक्रोच जनता पार्टी या युवकांच्या सामाजिक चळवळीने केंद्रसरकारमधील शिक्षणमंत्र्याच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन त्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन सुरु केले आहे. वीस तारखेला संसदेवर निघालेल्या मोर्चा अडवून विद्यार्थ्यांना, युवतींना महिला पालकांना जी अमानुष मारहाण केल्या गेली त्या क्र्रुरतेचे आणि कौर्याचे असंख्य व्हीडीयो सामाजिक माध्यमांवर दिसत आहेत. 'बेटी बचाओ,बेटी पढावो' म्हणना-यांनी लेकी बाळींचा केलेला अपमान, डोकी फोडणे, जायबंदी करणे 'अमानुष मारहाण' असेच वर्णन वीस जुलैच्या घटनेचे वर्णन करावे लागते. संसदेवर जाणा-या या मोर्चाला लाठीमाराशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता ? प्रश्न विचारता येईल आणि चर्चाही करता येईल. सोनम वांगचुंग यांना उपचाराच्या निमित्ताने जबरदस्तीने उचलून आंदोलन मोडता येते काय, असा प्रयत्न सरकारने करुन पाहिला, मारहाण करुन युवकांना पळवून लावण्याचा प्रयत्न झाला. मुलं घाबरुन जातील आणि आंदोलन स्थळांवरुन पळून जातील असे सरकारला वाटले असावे, पण असे काही झाले नाही. उलट, आंदोलनाची तीव्रता वाढत चालली आहे.
दुसरीकडे, मन की बाता कराव्यात तशा आणि त्या टाइपच्या गप्पा सुरुच आहेत. '' पेपरफुटी हे घोर पापआहे. तरुणांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात आली असून भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी केंद्र आणि सर्व राज्य सरकारांनी पक्षभेद बाजूला ठेवून एकत्र काम केले पाहिजे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी 'एनडीए' संसदीय पक्षाच्या बैठकीत व्यक्त केले'' मात्र, केंद्र सरकारच्या वतीने केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या आंदोलकांच्या मागणीबाबत कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली नव्हती. सीजेपीच्या प्रतिनिधींनी केंद्रीय मंत्री नड्डा यांना मागण्यांचे लेखी निवेदन दिले असले तरी त्यावरही केंद्र सरकारने मंगळवारी मौन बाळगले.
आता सध्या कालच्या घडामोडीत जंतर-मंतरवरील आंदोलनाची तीव्रता कमालीची वाढलेली पाहता, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. आंदोलकांच्या या मागणीला पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र येऊ लागले आहेत. आज महाराष्ट्र बंदची हाकही देण्यात आली आहे. एकाच वेळी आंदोलन आणि विरोधकांचा चहूबाजूंचा हल्लाबोल, लोकसभा आणि राज्यसभेतला गोंधळ पाहता, केंद्र सरकारची बुधवारी कोंडी झाल्याचे चित्र निर्माण झाले. महिनाभर संवाद टाळणाऱ्या केंद्र सरकारने अखेर आंदोलकांशी गंभीर चर्चा सुरू केली असून, केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी आंदोलकांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.
सरकारविरोधात आम्ही पुन्हा मोर्चा काढणार नाही आणि जंतर-मंतरवरून हलणार नाही. आता केंद्र सरकारने जंतर-मंतरवर येऊन चर्चा करावी किंवा तटस्थ स्थळी बैठक घ्यावी, असे कॉक्रोच जनता पार्टी'ने (सीजीपी) बुधवारी स्पष्ट केले. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना १ कोटी रुपयांची नुकसानभरपाई, आणि कोणतीही फौजदारी कारवाई केली जाऊ नये, या तीनही मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असे 'सीजीपी'च्या प्रतिनिधींनी केंद्र सरकारकडे स्पष्ट केले.
''गेल्या दहा वर्षांत देशभरात १५२ परीक्षा पेपरफुटीच्या घटना घडल्या असून, त्याचा जबरदस्त फटका सुमारे ७.५ कोटी विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबांना सहन करावा लागला आहे. मात्र, या प्रकरणांमध्ये एकाही आरोपीला शिक्षा झालेली नाही, असा गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बुधवारी इंदिरा भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केला''
लेखनातील माहिती कंटेंट लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. सकाळ या छापील वृत्तपत्रातून चर्चेसाठी घेतले आहे. तर, मिपाकर हो शांततेच्या मार्गाने आपापली मतं मांडत राहू या..
कॉकरोच जनता पार्टी आंदोलन- दिल्ली. (भाग दोन )
वाचने
2756
प्रतिक्रिया
152
मिसळपाव
प्रतिक्रिया
कोणाशी खेटले
झुरळ ते संसद...
कॉकरोच आंदोलनाच्या विषयापेक्षा वाढत्या आंदोलनाचा त्रास फॉलोअर्सला व्हायला लागला आहे. गाव गल्लीतले सपोर्टर आंदोलनाची बदनामी करायला पुढे सरसावलेले दिसत आहेत. पण, भक्तांच्या दुर्दैवाने काल '' जंतर मंतरमध्ये प्रवेश देण्यापूर्वी प्रत्येक विद्यार्थ्याच्या बॅगांची तपासणी केली जात होती. मग दगड आले कुठून ? दिल्ली पोलिसांनी उत्तर द्यावे'' असे आवाहन अभिजीत दिपके यांनी केली.
दुस-या बातमीत, दिल्लीमधे कॉकरोच पार्टीने काढलेल्या मोर्चावर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराच्या आणि कारवाईच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास आणि चित्रफिती पाहण्यास नकार देत, आमचा वेळ वाया घालवू नका असे म्हणत तातडीने सुनावणी घेण्यास मा. सरन्यायधीश सूर्यकांत यांनी नकार दिला. तरीही, माझ्याकडे पोलिसांच्या क्रुरतेच्या चित्रफिती आहेत परवानगी मिळाल्यास दाखवू इच्छितो असे याचिकर्त्याच्या वकिलांनी म्हणाल्यावर चित्रफिती पाहण्यात रस नाही ते पाहण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही, असे सरन्यायधीश म्हणाले. ( संदर्भ लोकसत्ता ) बाय द वे, भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका सुनावणीदरम्यान काही बेरोजगार तरुण आणि टीकाकार झुरळासारखे असतात असे विधान केल्याचे वाचकांना स्मरत असेलच.
अन्य एका याचिकेत दिल्लीत आंदोलकांवर पोलिसांकडून अति बळाचा वापर केल्याचा आरोप करणा-या दोन याचिकांवर दिल्ली उच्चन्यायालयाने शहर पोलिसांकडून उत्तर मागवले संबंधित अधिका-यांना सीसीटीव्ही कॅमेरा फूटेज आणि चित्रफिती सुरक्षित ठेवण्याचे निर्देश दिले.
एकूण सरकारची भूमिका पाहता आणि वाढते आंदोलन पाहता, आंदोलन आता एका निर्णायक वळणाकडे जात असल्याचे दिसत आहे. काय काय होते अपडेट देत राहीनच.
-दिलीप बिरुटे
ज्यांनी पेपर फोडले त्यांनाच कायम बंद करण्याचा उपाय काढावा.
त्या प्रोफेसरांची हकालपट्टी करा युनिव्हर्सिटीच्या नोकरीतून.
पुढचे धडा घेतील.
अनपढ़ लोक सत्तेत...
In reply to ज्यांनी पेपर फोडले त्यांनाच कायम बंद करण्याचा उपाय काढावा. by कंजूस
कंजूसकाका सत्तेत असलेले लोक अनपढ़ आहेत काही सातवी आठवी पास असतीलही उच्च शिक्षण आणि तत्सम गोष्टीचं गांभीर्य त्या लोकांना नाही. देवाळू श्रद्धाळु बाबा बुवा यावर भरवसा असणारे लोक देव सांभाळून घेईल असेच समजतात.
म्हणजे, परीक्षा घेण्याची, प्रश्नपत्रिकांची गुप्तता राखण्याची आणि ती सुरक्षित ठेवण्याची मुख्य जबाबदारी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) आणि केंद्र सरकारची होती. यंत्रणेतील ढिसाळपणा आणि सुरक्षेतील गंभीर त्रुटींमुळेच हा पेपर फुटला यांचं शिक्षण उच्च शिक्षणाचे फायदे वगैरे कळतच नाहीत.
कुंभमेळा वगैरे विषय असला की त्यांचा उत्साह बीयरसारखा फसफसतो.
-दिलीप बिरुटे
ज्यांनी पेपर फोडले त्यांनाच…
In reply to ज्यांनी पेपर फोडले त्यांनाच कायम बंद करण्याचा उपाय काढावा. by कंजूस
ज्यांनी पेपर फोडले त्यांनाच शिक्षा करावी असे तुमचे म्हणणे आहे ? काहीतरीच काय बोलताय?
किती उदात्त हेतु होता त्यांचा!! अगदी स्मरणशक्ती च्या जोरावर पेपर जसा च्या तसा लिहुन दिला. आणी त्यांना शिक्षा करायची ? काहीही हं तुमचे!!
ह्याला सर्कार जबाब्दार आहे. मी तर म्हणतो सरकार बर्खास्त करुण टाकु हाय काय अन नाय काय !!
बस, इतकीच शिक्षा?
In reply to ज्यांनी पेपर फोडले त्यांनाच कायम बंद करण्याचा उपाय काढावा. by कंजूस
बस, इतकीच शिक्षा?
त्यांना जेलमध्ये टाकून त्यांची संपत्ती जप्त केली पाहिजे.
ज्या केंद्रांतून कॉप्या होतात त्यांचे लायसन रद्द करा.
मग ती कॉलेजेस, केंद्रे सावध राहतील.
किंवा मुंढेच्या हातात कारभार सोपवा.
फार पूर्वी युनिव्हर्सिटीच्या परीक्षांचे निकाल ठराविक तारखांना येत नसत तेव्हा तो कारभार सरकारने एका आइएएस अधिकाऱ्याकडे ( बहुतेक अलेक्झांडर असे नाव होते) दिला होता. त्याने एका झटक्यात सगळ्यांना ताळ्यावर आणले होते. प्रोफेसरांकडून अधिकार काढून घेतले म्हणून त्यांनी आरडाओरड केलेली. पण व्यवस्थापन सांभाळणे आणि काम करवून घेणे त्यांना जमत नाही. एकमेकांना पाण्यात पाहाणे आणि पोटदुखीने ग्रासलेले असतात.
.
.
विद्यापिठे आणि परिक्षा…
विद्यापिठे आणि परिक्षा पद्धती यावर कोसला मधे मार्मीक टीका केली आहे.
दुर्दैवाने आज एकही विद्यापीठ विद्यार्थ्याना त्यांच्या ज्ञानाचा व्यावसायीक उपयोग कसा होईल हे शिकवत नाही.
पी एच डी चे प्रबंध लिहून नक्की काय केले जाते हा संशोधनाचा विषय होऊ शकतो. गेल्या पन्नास वर्षात भारतात सगळी मिळून दीड दोन लाख तरी पी एच डी धारक झाले असतील पण त्यांच्या संशोधनाचे / प्रबंधांचे पुढे काय झाले या बद्दल विद्यापीठाना माहीत नसते.
त्या प्रबंधाचा समाजाला ( टेक्नीकल / सामाजीक / औद्योगीक / व्यावसायीक ) उपयोग काय होतो हे समजत नाही.
माझा एक वर्गमित्र वरिष्ठ…
In reply to विद्यापिठे आणि परिक्षा… by विजुभाऊ
माझा एक वर्गमित्र वरिष्ठ प्राध्यापक आहे. तो बऱ्याच पी एच डी च्या विद्यार्थ्याना मार्गदर्शन करतो. तो मला सांगत होता की भारतात छोट्या छोट्या कॉलेजातुन केली जाणारी पी एच डी ही फक्त नोकरीतली पदोन्नती घेण्यासाठी असते. त्याचा संशोधनाशी काहीही संबंध नसतो.
सहमत आहे.मला पी एच डी करायची…
In reply to माझा एक वर्गमित्र वरिष्ठ… by सुक्या
सहमत आहे.
मला पी एच डी करायची होती त्या वेळेस मला असे सांगण्यात आले की
"तुम्हाला कशाला हवी आहे पी एच डी. नुसते वाचन ज्ञान वाढवायचे असेल तर पुस्तके वाचा.
आम्ही सध्या पी एच डी साठी ज्यांचे प्रमोशन अडकले आहे अशानाच प्राधान्य देतो आहोत".
विद्यापीठीय शिक्षण हे …
विद्यापीठीय शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा वेळ वाया घालवते असे मला वाटते.
खरं आहे...
In reply to विद्यापीठीय शिक्षण हे … by विजुभाऊ
खरं आहे, सद्य सरकारने नवीन शैक्षणिक धोरण 2020 आणले आणि शिक्षणाचा खेळखंडोबा करुन टाकला आहे.
-दिलीप बिरुटे
नवीन शैक्षणीक धोरणामुळे…
In reply to खरं आहे... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नवीन शैक्षणीक धोरणामुळे जुन्या धोरणातील चुका सुधारणार असतील तर सुरवातीला बदल पचवायला थोडे कठीण जाईल.
तसेही इतिहासाच्या पुस्तकात आपल्याला फक्त कोंगलांचा इतिहास शिकवला गेलाय.
पूर्व आणि दक्षीण भारताचा इतिहास शालेय विद्यार्थ्याना माहीतच नसतो.
भारतीयानी केलेल्या संशोधनाबद्दलही कोणाला माहीत नसते.
दहावी बारावी म्हणजे फक्त गणीत शास्त्र इंग्रजी इतकेच काय ते माहीत असते मुलाना.
इंजिनीयरिंग मधेही अभ्यासक्रम नव्या तंत्रानुसार बदलायला हवेत. शिक्षक आणि मुले अजूनही बी एल थेरजा चे पन्नास वर्ष जुने पुस्तक वापरतात.
कॉमर्स मधे तर बी कॉम पास मुलाना पी एन एल बनवता येत नाही. बैंकेत चेक बाउन्स झाला ही एन्ट्री कशी करायची माहीत नसते. पाच वर्षे अकाउंट्स शिकुनही ही गत असेल तर ते शिक्षंण म्हणजे टाईम पासच म्हणावे लागेल
+१माझा मित्र बायोटेक…
In reply to खरं आहे... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
माझा मित्र बायोटेक अभ्यासक्रम २०२० नुसार तयार करायला होता. ज्यात बायोटेक कोर विषय सोडून इतर विषयांचा भरणा होत होता. भांडूण भांडूण दोन बायोटेक विषय सामील करायलाच लावले.
म्हणाला "बर झालं आपलं शिक्षण आधीच झाले आहे 😅"
यातले कुठले दोन बायोटेक…
In reply to +१माझा मित्र बायोटेक… by Bhakti
यातले कुठले दोन बायोटेक विषय सामील करायलाच लावले 🤔
https://www.aicte.gov.in/sites/default/files/biotechnology.pdf
विचारून सांगते.
In reply to यातले कुठले दोन बायोटेक… by चेतन
विचारून सांगते.
पहिलीपासूनच अभ्यासक्रमात…
In reply to +१माझा मित्र बायोटेक… by Bhakti
पहिलीपासूनच अभ्यासक्रमात अनेक निरूपयोगी, कालबाह्य विषयांचा भरणा केला आहे.
चूक. १९४७ पासून आजतागायत…
In reply to खरं आहे... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चूक. १९४७ पासून आजतागायत सर्व सरकारांनी, किंबहुना ब्रिटिश काळापासून, भारतात शिक्षणाचा खेळखडोबा झालाय व १९४७ नंतर सर्व सरकारांनी त्यात यथाशक्ती भर टाकलीये.
खुशबु पतानी फौजेत आहे मग…
खुशबु पतानी फौजेत आहे मग आन्दोलनात कशी सह्भागी
जाणकारांसाठी प्रश्न - समजा…
जाणकारांसाठी प्रश्न - समजा या आंदोलनाने नेपाळ, बांग्लादेश सारखी परिस्थिती आली, तर देशामध्ये राष्ट्रपती राजवट येऊन पुन्हा निवडणुका होतील ?
तशी परिस्थिती येणारच नाही…
In reply to जाणकारांसाठी प्रश्न - समजा… by श्वेता व्यास
तशी परिस्थिती येणारच नाही. भारतीय समाज अत्यंत दुभंगलेला आहे. जेव्हा परकीय आक्रमण होते तेव्हाच बऱ्याच प्रमाणात जनता एकत्र येते. सध्याची परिस्थिती क्रांती होण्याइतकी पुढे गेलेली नाही. २०११ मध्ये बऱ्याच प्रमाणात जनता अण्णा हजारेंच्या पाठीशी होती. आता तितकी टोकाची परिस्थिती नाही. २०११ मध्ये विरोधकही तितके दुर्बल नव्हते. २०२६ मध्ये विरोधक फारसे शिल्लक नाहीत व जे शिल्लक आहेत ते अत्यंत दुर्बल आहेत.
त्यामुळे काहीही होणार नाही. काही दिवसांनंतर परिस्थिती पूर्वपदावर येईल.
तीच अपेक्षा आहे. प्रधानांनी…
In reply to तशी परिस्थिती येणारच नाही… by श्रीगुरुजी
तीच अपेक्षा आहे. प्रधानांनी राजीनामा देऊन किंवा सरकार बदलून प्रश्न सुटणार नाहीये, कीड व्यवस्थेमध्ये आहे हे न कळण्याइतके खरंच सहभागी हुशार विद्यार्थी भाबडे असतील? कदाचित दूरगामी परिणामांचा विचार न करता फक्त आत्ता मला हेच हवंय असा हट्ट असेल.
कोणीही आले तरी प्रश्न सुटणार…
In reply to तीच अपेक्षा आहे. प्रधानांनी… by श्वेता व्यास
कोणीही आले तरी प्रश्न सुटणार नाही, परिस्थिती बदलणार नाही, व्यवस्था किडलेलीच राहील हे विद्यार्थ्यांना माहिती आहे. ज्याप्रमाणे अत्यंत कडक शिक्षा देण्याचे नियम केले तरी लोकशाही व्यवस्थेत गुन्हे थांबत नाहीत कारण गुन्हेगारांना निसटण्यासाठी असंख्य पळवाटा व संधी लोकशाही व्यवस्थेत द्याव्याच लागतात. पण गुन्हे थांबत नाहीत म्हणून शिक्षाच द्यायची नाही असे करता येत नाही. तसेच प्रधानांनी पद सोडले तरी परिस्थिती आहे तशीच राहील ही वस्तुस्थिती असूनही प्रश्नपत्रिका सार्वजनिक झाली यासाठी संबंधित लोकांना कोणत्या तरी स्वरूपात शिक्षा मिळायला हवी व प्रधानांनी पद सोडणे हे त्यासाठीच आवश्यक आहे.
मुळात वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर का परीक्षा घ्यायची? तसे केल्याने बहुसंख्य विद्यार्थ्यांना आपल्या गावात, शहरात प्रवेश मिळणे अवघड झाले आहे. बहुतेकांना परराज्यात जावे लागते व प्रश्नपत्रिका सार्वजनिक झाली तर देशातील सर्व विद्यार्थ्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतात. प्रत्येक राज्याने आपापल्या राज्यात वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देण्याची व्यवस्था पूर्वी होती. महाराष्ट्रातील बहुसंख्य विद्यार्थ्यांना आपापल्या राज्यात, शहरात प्रवेश मिळत होता. १२ वीत जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या विषयात मिळालेल्या गुणांवर प्रवेश मिळत असे. महाराष्ट्रात किमान ५-६ विभागीय उच्च माध्यमिक मंडळे आहेत. एखाद्या विभागात एखाद्या विषयाची प्रश्नपत्रिका सार्वजनिक झाली तरी त्याचा परिणाम संपूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांवर न होता केवळ त्याच विभागातील विद्यार्थ्यांवर होत असे. आता राष्ट्रीय पातळीवर वेगळी परीक्षा असल्याने संपूर्ण देशात गडबडीचा परिणाम होतो. राज्यांची स्वायत्तता सुद्धा या बाबतीत नष्ट झाली आहे. राज्यातील बहुसंख्य विद्यार्थ्यांना परराज्यात जावे लागते. पण AIIMS साठी अजून वेगळी परीक्षा आहे. तेथे नीटमधून का कोणी जाऊ शकत नाही?
केंद्राने विनाकारण वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश पद्धतीत हस्तक्षेप केल्याने परिणामांची तीव्रता देशभर जाणवते व या गोंधळाचे उत्तरदायित्व केंद्रीय मंत्र्यानेच घ्यायला हवे.
राष्ट्रीय पातळीवर का परीक्षा घ्यायची? तसे केल्याने बहुसंख्य विद्
In reply to कोणीही आले तरी प्रश्न सुटणार… by श्रीगुरुजी
साधे गणित आहे. प्रांतीय किंवा विभागीय स्तरावर प्रवेश परीक्षा घेतल्याने त्या भागातील शिक्षण संस्थेत प्रवेश उपलब्ध असतो. राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत जास्त सीट उपलब्ध असल्याने प्रवेश मिळण्याची संभावना वाढते.
त्याही पेक्षा महत्वाचा मुद्दा हा की इच्छु विद्यार्थ्यांला तीन चार-पाच प्रवेश परीक्षेत बसावे लागायचे. भ्रष्टाचार मुद्दा वेगळाच. ए एफ एम सी,एम्स सारख्या ठिकाणी मेरीट वर प्रवेश आज मिळत आहे.
अहिल्यानगरची मुलगी एम्स मधून मेडिकल चे शिक्षण घेत आहे.
पुर्वी ए एफ एम सी,एम्स सारख्या काॅलेजेस करता वेगवेगळी परिक्षा द्यावी लागत होती.
>>> साधे गणित आहे. प्रांतीय…
In reply to राष्ट्रीय पातळीवर का परीक्षा घ्यायची? तसे केल्याने बहुसंख्य विद् by कर्नलतपस्वी
>>> साधे गणित आहे. प्रांतीय किंवा विभागीय स्तरावर प्रवेश परीक्षा घेतल्याने त्या भागातील शिक्षण संस्थेत प्रवेश उपलब्ध असतो. राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत जास्त सीट उपलब्ध असल्याने प्रवेश मिळण्याची संभावना वाढते.
राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत जास्त जागा उपलब्ध असल्याने स्पर्धक सुद्धा त्याच प्रमाणात वाढतात. राष्ट्रीय स्तावर परीक्षा असल्याने शेवटी प्रत्येकाला देशात कोठेतरी प्रवेश मिळेलच. परंतु बहुतेकांना परराज्यात जावे लागेल. महाराष्ट्रात १० टक्के लोकसंख्या राहते. म्हणजे सरासरी १० टक्केच मराठी इच्छुकांना महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळू शकतो, उर्वरित ९० टक्क्यांना परराज्यात जावे लागेल (चूभूद्याघ्या). पण राज्यपातळीवर प्रवेश व्यवस्था असेल तर सर्व मराठी इच्छुकांना महाराष्ट्रातच प्रवेश मिळेल.
एक एफ एम सी लष्करी वैद्यकीय महाविद्यालय असल्याने तेथील प्रवेशासाठी वेगळी व्यवस्था असणे समजू शकते. परंतु एम्ससाठी वेगळी व्यवस्था असण्याची अजिबात आवश्यकता नाही.
सहमत!
In reply to कोणीही आले तरी प्रश्न सुटणार… by श्रीगुरुजी
सहमत!
धर्मेंद्र प्रधानांनी पदत्याग…
धर्मेंद्र प्रधानांनी पदत्याग करून काहीच साध्य होणार नाही. त्यांच्या जागी दुसरा/दुसरी येईल तो/ती तितकाच/तितकीच बरावाईट/बरीवाईट असणार आहे. तस्मात् व्यवस्थेत शष्प बदल होणार नाही.
उद्या हे सरकार बदलून पूर्ण नवीन सरकार आले तरीही परिस्थितीत शष्प बदल होणार नाही. नवीन आलेले सरकार आताच्या सरकारपेक्षा कणभरही वेगळे नसेल.
जसे महाराष्ट्रात मविआ सरकार जाऊन मविआ-२ सरकार आले तसेच केंद्रातही संपुआ सरकार गेले तरी आताचे सरकार संपुआ-२ सरकार या स्वरूपात आहे.
नेपाळमध्ये आंदोलन होऊन नवीन…
In reply to धर्मेंद्र प्रधानांनी पदत्याग… by श्रीगुरुजी
नेपाळमध्ये आंदोलन होऊन नवीन सरकार येऊन आता काही महिन्यांतच नवीन सरकारविरोधात आंदोलने सुरु झाली आहेत.
ईसापनितीतील एक गोष्ट आठ्वली
In reply to धर्मेंद्र प्रधानांनी पदत्याग… by श्रीगुरुजी
एकदा एक कोल्हा नदी ओलान्डत असतो, त्यावेळी त्याच्या अंगावर असंख्य जळवा चीकटून त्याचे रक्त पिऊ लागल्या. तो अगदी अर्धमेला होउन गेला होता. त्याची ती दशा पाहुन नदीतील एक खेकडा त्याला म्हणाला, "मी तुझ्या अंगावरच्या जळवा काढून देऊ का?" त्यावर त्याला नकार देत कोल्हा म्हणाला, "नको, मला चिकटलेल्या जळवांचे रक्त पिऊन झाले आहे व त्या मला नुसत्या चिकटून आहेत. जर तु ह्याना काढलेस तर तेथे नविन जळवा येऊन चिकटतील व त्या माझे ऊरलेसुरले रक्त पिउन टाकतील व मी मरेन"
तात्पर्य - नवीन सरकार क्षमा, नवीन जळवा अजुन रक्त पितील.
सगळ्या दोषींना बडतर्फ करावे
नीट पेपर फुटीत जे जे सरकारी कर्मचारी दोषी असतील ( अगदी आरक्षणाचे जन्मजात कवचकुंडले घालून आलेले असतील तरी) त्यांच्या डांगीवर लाथा हाणून लगेच बडतर्फ करावे . PF / gratuity / पेन्शन काही ही देऊ नये त्यांना.. आणि पुढील ३ पिढ्यांना सरकारी नोकरीला apply सुद्धा करता येणार नाही याची तजवीज करावी. बघा मग भविष्यात कशी पेपरफुटी होते का ते ? सगळ्या सरकारी जावयांना माहित आहे...काही ही केलं तरी नोकरी जात नाही आपली म्हणून हे सगळं चालून जातं भारतात.
लहान बालिकांवर अत्याचार आणि पेपरफोडी
In reply to सगळ्या दोषींना बडतर्फ करावे by dadabhau
हे मोठे गुन्हे आहेत हा कायदा करा. मंत्र्यांच्या राजीनाम्यापेक्षा महत्त्वाचे आहे. हा मंत्री गेला तरी समाजातील प्रवृत्ती नष्ट होणे गरजेचं आहे.
आंदोलन करणे याला माझा विरोध नाही. सरकारविरोधी आवाज उठवाच पण गुन्ह्याच्या मूळ हेतूकडे लक्ष असू द्या.
शिक्षण व्यवस्था आधीही…
शिक्षण व्यवस्था आधीही परिपूर्ण नव्हती, हे आपण मान्य करू. पण गेल्या काही वर्षांत तिची वाटचाल वाईटाकडून आणखी वाईटकडे झाली आहे, हेही तितक्याच स्पष्टपणे बोलले पाहिजे.
गेल्या ८-१० वर्षांत शिक्षणाचा घसरलेला दर्जा, बंद पडत चाललेल्या शाळा, भाषा धोरणातील गोंधळ, इयत्ता ११वी - १२वीला मिळालेले दुय्यम स्थान, सातत्याने वाढणाऱ्या फी आणि अशा अनेक गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
मुद्दा हा नाही की कोण कोणाला पाठिंबा देतो. खरा मुद्दा हा आहे की व्यवस्थेतील भ्रष्टाचार, निष्क्रियता आणि असंवेदनशीलतेमुळे लोकांमध्ये प्रचंड असंतोष आणि फ्रस्ट्रेशन निर्माण झाले आहे. जेव्हा लोकांना वाटते की त्यांच्या प्रश्नांना कुठेच न्याय मिळत नाही, तेव्हा ते आवाज उठवण्यासाठी पर्यायी मार्ग शोधतात.
आज अशी परिस्थिती आहे की अनेक पत्रकारही छातीठोकपणे स्वतःला पूर्णपणे निष्पक्ष म्हणू शकत नाहीत, अशा वेळी लोक रस्त्यावर उतरतात, हे आश्चर्यकारक नाही.
कोणाला "गुंड" म्हणणे, किंवा व्यक्तींवर टीका करून मूळ प्रश्नांपासून लक्ष विचलित करणे, हा उपाय नाही. शिक्षण व्यवस्थेची झालेली अधोगती आणि त्यासाठी सरकारला जाब विचारणे हे प्रत्येक नागरिकाचा लोकशाहीतील अधिकार आहे.
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आंदोलन करणारे हे या देशाचेच नागरिक आहेत. त्यांच्या आंदोलनाशी मतभेद असू शकतात, पण त्यांच्यावर पोलिसांकडून अमानुष लाठीमार करणे कोणत्याही लोकशाहीला शोभणारे नाही. ते नीच कृत्य केले गेले आहे हे मान्य करावेच लागेल.
कायदा व सुव्यवस्था राखणे आवश्यक आहे, पण त्याचबरोबर आंदोलन करणाऱ्या नागरिकांच्या मानवी हक्कांचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाही सन्मान राखला गेला पाहिजे.
उद्या पुण्याच्या मोर्च्यात मी सामील होणार
- गणेश जगताप
मोर्चात सहभागी होणार असला तर…
In reply to शिक्षण व्यवस्था आधीही… by गणेशा
मोर्चात सहभागी होणार असला तर
एकही खिसा नसलेला सदरा परिधान करा.
१९९६ साली आपली लोकसंख्या ९८…
१९९६ साली आपली लोकसंख्या ९८ कोटी होती आणि २००८ साली १२१ कोटी म्हणजेच. या १२ वर्षात २३ कोटी मुलं जन्माला आली.
म्हणजेच २०१४ ते २०२६ या काळात २३ कोटी तरुण १८ वर्षांचें होऊन नोकरीच्या बाजारात आले.
सर्वच्या सर्व सरकारी निमसरकारी स्थानिक स्वराज्य संस्था लष्कर निमलष्करी दले यात मिळून २.३ कोटी सरकारी नोकऱ्या आहेत.
म्हणजेच सर्वांच्या सर्व सरकारी नोकरांना बडतर्फ केले तरी ९० % लोकांना सरकारी नोकरी मिळणें अशक्य आहे. त्यातून आपल्याकडे शिक्षणमहर्षी यांनी शिक्षणाचा जो काही अभूतपूर्व खेळ खंडोबा करून ठेवला आहे त्यामुळे मुलांना मिळणारे शिक्षण हे त्यांना नोकरी किंवा धंद्याच्या बाजारात निरुपयोगी आहे.
यातून हे तरुण केवळ वैफल्यग्रस्त आणि निराश होतात. प्रत्येकाला सरकारी नोकरीच हवी असते. ती मिळणे शक्य नाही. पण हे कोणीही सांगणार नाही.
सश्री मोदी यांनी मुलांना व्यवसायाभिमुख शिक्षण घेऊन व्यवसाय करा मग तो भाजी टाळण्याचा का असेने हे सांगितले तर त्याबद्दल केवढा गदारोळ झाला.
तरुणांची माथी भडकावणे सहज सोपे असते. आपल्या पेक्षा कमी बुद्धिमत्तेच्या पण आपल्या बरोबरच्या मागास वर्गीया ला आरक्षणातून आणि श्रीमंतांच्या मुलाला खाजगी मिळताना पाहून तरुण अधिकच वैफल्यग्रस्त होतात. यातून मग मराठा जाट धनगर वंजारी माळी अशा अनेक जातीचे पुढारी त्यांना आरक्षणाचे गाजर दाखवतात. त्यासाठी अनेक तरुण आपली डोकी फोडून घेतात.
मागच्या तीन दशकांत आय टी मध्ये आलेल्या लाटेत बी एस सी (आय टी) किंवा कोणत्याही शाखेतील अभियंत्यालाच काय हवशा नवश्या गवशाला पण ५० ते ७५ हजारांची नोकरी मिळत होती. आता कृत्रिम बुद्धिमत्ता आल्याने हा बुडबुडा फुटला आहे. पण झकपक कपडे घालून वातानुकूलित खोलीत आयटी ची नोकरी सर्वाना हवीहवीशी वाटते आहे ज्या नोकऱ्या फार कमी झाल्या आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेत महारथ असलेल्याना आजही भरपूर पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत. पण त्याला लागणारे उच्च कौशल्य किती तरुणांकडे आहे?
या वैफल्याचा फायदा उठवून सध्याचे आंदोलन चालू आहे.
सध्या परिस्थिती काय आहे? तंत्र शिक्षण घ्यायची कुणाची तयारी नाही. कारण हाताने काम करण्याची कुणाची तयारी नाही.
आज तुम्ही एसी, पाणी शुद्धीकरण यंत्र, इलेक्ट्रिशियन, प्लम्बर, गवंडी, इ क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर मुसलमान किंवा राजस्थान कडचे कारागीर दिसतात. कारण त्यांच्याकडे शिक्षण नाही म्हणून ते अशा क्षेत्रात येऊन काम करता करता शिकून तंत्रज्ञ होत आहेत आणि मुंबई सारख्या शहरात बऱ्यापैकी पैसा कमावत आहेत.
पण आपल्या मराठी तरुणांना त्यात रस नाही.
सरकरने आम्हाला शिक्षण दिले पाहिजे नोकऱ्या दिल्या पाहिजेत आम्हाला सगळं घर बसल्या मिळालं पाहिजे या वृत्तीतून बाहेर आलं पाहिजे. पण विरोधी पक्षात असलं कि अफाट आश्वासनं द्यायची आणि सत्तेत अली कि त्यांच्या तोंडाला पानं पुसायची हा आपल्या ७५ वर्षांचा इतिहास आहे.
जो नेता सांगतो कि आरक्षणातून तुम्हाला काहीही फायदा होणार नाही त्याला घरी बसवलं जातं आणि जो सांगतो आरक्षण हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे त्यासाठी तुम्ही लढा दिला पाहिजे त्याचा उदो उदो होतो.
आज या तरुणांनी असलेलं सरकार पाडलं आणि नवं सरकार आणलं तरी ते सरकारी नोकऱ्या कुठून निर्माण करणार आहेत? आपल्याला बाजारात आवश्यक असणारे कौशल्य आपणच मिळवले पाहिजे हे आईबापानी सांगितलं पाहिजे. सरकार आपल्याकडूनच घेतल्याशिवाय आपल्याला फार काही देऊ शकत नाही हि वस्तुस्थिती त्यांना कुणी सान्गु इच्छित नाही.
पण शासनाच्या सह सचिव( जॉईंट सेक्रेटरी) या उच्च पदावर कार्यरत असणाऱ्या बाईं जरांगे पाटील आपल्याला आरक्षण देतील या आशेवर होत्या. मला धक्काच बसला. अर्थात ते आरक्षण मिळाले नाही म्हणून त्या आता फडणवीस यांच्यावर खापर फोडताना दिसतात.
नेपाळ श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तान मध्ये या अराजका मुळे काय चालू आहे हे तरुणांना समजावण्याच्या ऐवजी येथे पण नेपाळ श्री लंकेसारखी क्रांती केली पाहिजे हे सांगणाऱ्या नेत्यांना अक्षरशः देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली पाहिजे.
झुरळांच्या नेत्यांकडे काही तरी ठोस कार्यक्रम आहे का?
नीट मधून १ लाख ३७ हजार जागा उपलब्ध आहेत यात ६३ हजार सरकारी महाविद्यालयात आहेत आणि २२ लाख इच्छुक आहेत
there are a total of 136,939 MBBS seats available across India for the 2026-27 academic session, which includes 63,296 government seats and 73,643 private seats.
मग बाकी २० लाख विद्यार्थी हे काय करणार आहेत? याबद्दल झुरळांकडे काही विचार आहे का?
परीक्षांत पेपर फुटणे हे वाईट आहेच. पण हे गेली ७५ वर्षे चालू आहे. माझ्या लहानपणापासून मी हे ऐकत आलो आहे.
आपल्याला एका परीक्षेत यश मिळाले नाही तर काय होईल याचा विचार आईबापांनी करून ठेवणे आवश्यक आहे. त्यात प्राधान्यक्रम ठरवून ठेवणे आवश्यक असते. अन्यथा विश्वास नांगरे पाटील यांच्या कहाण्या ऐकून तिशी पर्यंत यू पी एस सी च्या वाऱ्या करून झाल्यावर खाजगी कंपनीत चिकटून सरकारला शिव्या घालणारे लोक काही कमी नाहीत.
झुरळांकडून आशा ठेवणारे अतिउच्च शिक्षित लोक पाहिले कि हसावे कि रडावे हे कळत नाही.
मोदी सरकारच्या आत्यन्तिक द्वेषातून लोक आपली सारासार बुद्धी गहाण कशी ठेवतात याचे आश्चर्य वाटते.
.
In reply to १९९६ साली आपली लोकसंख्या ९८… by सुबोध खरे
झुरळं, कॉग्रेस,मोदी,भाजपा, आरक्षण, सरकारी नोकऱ्या - ह्यापलीकडे एक जग आहे खरे च(म)च्चा.
शिक्षण, accountability, process, क्वालिटी - साध्या सोप्या सरळ बाबी.
मला वाटतं तुमची वास्तवाशी नाळ पूर्ण तुटली आहे. पण लिहीत रहा. एक केस स्टडी म्हणून तुमचे प्रतिसाद उपयोगी पडतील.
जाता जाता - इथे कुणाला वेळ असेल तर LLM कडून खरेच(म)च्चांचे गेल्या दहा वर्षांतले प्रतिसाद निवडून analyze करायला सांगा.
आपोआपच कळून जाईल बुद्धीभ्रंश म्हणजे काय असतं ते.
फेकाफेकी...आणि पापावर पांघरुन
In reply to १९९६ साली आपली लोकसंख्या ९८… by सुबोध खरे
>>>परीक्षांत पेपर फुटणे हे वाईट आहेच. पण हे गेली ७५ वर्षे चालू आहे. माझ्या लहानपणापासून मी हे ऐकत आलो आहे.
डॉक्टर साहेब आत्ता सकाळी खूप हसलो बघा, लिहीते राहा. आपल्या आवडत्या सरकारचं xxxx धुवायच्या नादात आपण कशाचंही समर्थन करु लागतो त्याचं उत्तम उदाहरण वरील प्रतिसाद वाटला. बाय द वे ते चालू ठेवा. गेली पंच्याहत्तर वर्ष पेपर फूटी ऐकत होतो हे वाचून हसावे की रडावे कळत नाही. स्वातंत्र्यानंतर येथील शिक्षणाचं प्रमाण अगदी कमी होतं, पंधरा ते वीस टक्के शिक्षणाचं प्रमाण होतं. आठवी दहावी झाली की नोक-या होत्या, आमच्या मराठवाड्यात तर पुढील शिक्षणासाठी हैद्राबादेत जावे लागत असे. आमच्याकड़े तर विद्यापीठाची स्थापना 1958 ला झाली. शिक्षण, इतिहास वगैरे पण वाचत चला.
स्वातंत्र्या नंतरच्या काळातील शिक्षण पद्धतीमध्ये नैतिक मूल्ये, शिस्त आणि प्रामाणिकपणा याला सर्वोच्च स्थान होते. परीक्षा मंडळांचे अधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये एक उच्च पातळीवरील उत्तरदायित्व आणि आदर होता. अल्प व्यावसायिकरण व पैशाचा प्रभाव नसणे: आजच्यासारखे शिक्षण क्षेत्राचे प्रचंड व्यापारीकरण तेव्हा नव्हते. कोचिंग माफिया, रॅकेट किंवा आर्थिक गैरव्यवहारांद्वारे यंत्रणा विकत घेण्याची संस्कृती अस्तित्वातच नव्हती. अल्प नोक-या होत्या. आठवी दहावी झालं की की नोक-या लागायच्या, हं आता एखादा त्या काळातला झुरळ बंड्या रेलवे स्टेशनवर चहाचं दूकान चालवून पुढें राजकारणात आलाही असेल अपवाद असतातच ना !
तर डॉक्टर साहेब मी म्हणत होतो, सरकारं येतील, सरकारं जातील पण सरकारची जवाबदारी नावाची गोष्ट असते ती सरकारने पार पाडली पाहिजे. पहिल्यांदा नीट घोटाळा झाला विरोधी पक्षांनी नागरिकांनी टीका केली, गदारोळ झाला री-नीट घ्यावी लागली. री-नीट झाली आता पुन्हा गुणांचा गोंधळ झाला पुन्हा काल एक याचिका दाखल झाली. परीक्षा नीट झाल्या पाहिजेत अशी अपेक्षा गैर नाही. व्यवस्था सुधारावी म्हणून मूलं आंदोलन करीत असतील तर तो लोकशाहीचा भाग आहे तुमची क्रूरता आणि कौर्य देशाने पाहिले, वेदनादायी होतं. सरकारला लाज वाटली पाहिजे होती. संवादाच्या मार्गाने प्रश्न सोडवता आला असता.
सरकार म्हणून सरकार जर ती जवाबदारी नीट पार पाड़त नसेल तर ते भान देण्याचं काम विरोधी पक्ष, सजग नागरिक आणि टिकाकारांचे असते. ने नागडे होते मग आम्ही नागडे राहिलो तर काय होतं, असं म्हणने म्हणजे आपल्या सरकारच्या पापावर पांघरुन घालणे आहे.
सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं,
मेरी कोशिश है कि, ये सूरत बदलनी चाहिए
मेरे सीने में नहीं, तो तेरे सीने में सही,
हो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए।
-दिलीप बिरुटे
प्रॉडॉ,आधिच्या सरकारांनी…
In reply to फेकाफेकी...आणि पापावर पांघरुन by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रॉडॉ,
आधिच्या सरकारांनी मारलेली गाय तुम्ही चालवून घेतलीत तर आताच्या सरकारने मारलेलं वासरू तुम्ही चालवून घेतलंच पाहिजे.
ॲज सिम्पल ॲज दॅट!
- (निष्पक्ष) सोकाजी
भयंकर प्रकरण आहे हे तर!…
In reply to फेकाफेकी...आणि पापावर पांघरुन by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भयंकर प्रकरण आहे हे तर! पेपरफुटी आधीही होत होती त्यात एवढं बोंबलन्यासारखं काय आहे म्हणणं! :)
मागच्या तीन दशकांत आय टी…
In reply to १९९६ साली आपली लोकसंख्या ९८… by सुबोध खरे
तुम्ही स्वतः किती लाईन कोडिंग टेस्टिंग पॅकेज डिप्लोयमेंट केले आहे ? गेला बाजार काही वेब डिझाईन इत्यादी ? किमान जावा स्क्रिप्टींग वगैरे काहीतरी ? का आयुष्यात तुम्ही गाडलेल्या झेंड्याची कथा सोडून बाकी सगळे पाणी कम ?
श्रीयुत खरे आपल्याला कळत नाही त्या प्रोफेशन मधे काम करणाऱ्यांना त्यांचे पगार काढून हवशे गवशे म्हणायचा तुम्हाला कवडीचा हक्क नाही. धन्यवाद.
हे म्हणजे तुम्ही शेती केली…
In reply to मागच्या तीन दशकांत आय टी… by वृषभ खोंडे
हे म्हणजे तुम्ही शेती केली आहे का? मग तुम्हाला शेतकी तज्ज्ञ होताच येणार नाही
किंवा
तुम्ही स्त्री आहात का? मग तुम्ही स्त्रीरोग तज्ज्ञ कसे होऊ शकणार?
या तर्हेचा वाद आहे.
चालू द्या.
😂
In reply to हे म्हणजे तुम्ही शेती केली… by सुबोध खरे
किमान आमची माती आमची माणसे तरी पाहावे इतकी अपेक्षा आहे.
मग बाकी २० लाख विद्यार्थी हे…
मग बाकी २० लाख विद्यार्थी हे काय करणार आहेत? याबद्दल झुरळांकडे काही विचार आहे का?
मागच्या तीन दशकांत आय टी मध्ये आलेल्या लाटेत बी एस सी (आय टी) किंवा कोणत्याही शाखेतील अभियंत्यालाच काय हवशा नवश्या गवशाला पण ५० ते ७५ हजारांची नोकरी मिळत होती. आता कृत्रिम बुद्धिमत्ता आल्याने हा बुडबुडा फुटला आहे. पण झकपक कपडे घालून वातानुकूलित खोलीत आयटी ची नोकरी सर्वाना हवीहवीशी वाटते आहे ज्या नोकऱ्या फार कमी झाल्या आहेत.
सर्वांच्या सर्व सरकारी नोकरांना बडतर्फ केले तरी ९० % लोकांना सरकारी नोकरी मिळणें अशक्य आहे. त्यातून आपल्याकडे शिक्षणमहर्षी यांनी शिक्षणाचा जो काही अभूतपूर्व खेळ खंडोबा करून ठेवला आहे त्यामुळे मुलांना मिळणारे शिक्षण हे त्यांना नोकरी किंवा धंद्याच्या बाजारात निरुपयोगी आहे.
यातून हे तरुण केवळ वैफल्यग्रस्त आणि निराश होतात. प्रत्येकाला सरकारी नोकरीच हवी असते. ती मिळणे शक्य नाही. पण हे कोणीही सांगणार नाही.
सरकरने आम्हाला शिक्षण दिले पाहिजे नोकऱ्या दिल्या पाहिजेत आम्हाला सगळं घर बसल्या मिळालं पाहिजे या वृत्तीतून बाहेर आलं पाहिजे. पण विरोधी पक्षात असलं कि अफाट आश्वासनं द्यायची आणि सत्तेत अली कि त्यांच्या तोंडाला पानं पुसायची हा आपल्या ७५ वर्षांचा इतिहास आहे.
नेपाळ श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तान मध्ये या अराजका मुळे काय चालू आहे हे तरुणांना समजावण्याच्या ऐवजी येथे पण नेपाळ श्री लंकेसारखी क्रांती केली पाहिजे हे सांगणाऱ्या नेत्यांना अक्षरशः देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली पाहिजे.
झुरळांच्या नेत्यांकडे काही तरी ठोस कार्यक्रम आहे का?
या प्रश्नांची उत्तरे आहेत का आपल्याकडे?
याला उत्तर न देता
उत्तरदायित्व
आपल्या आवडत्या सरकारचं xxxx धुवायच्या नादात
खरे च(म)च्चा.
हे लिहून आपण केवळ आपली पातळी दाखवता आहात
असो
मला वाटतं तुमची वास्तवाशी नाळ पूर्ण तुटली आहे. ठीक आहे.
शिक्षण, accountability, process, क्वालिटी वगैरे कशा सुधारायच्या हे आपण सांगाल का जरा?
नाही म्हणजे नुसतं शिक्षणात सुधारणा हव्या आहेत सर्वाना नोकऱ्या मिळाल्याचं पाहिजेत वगैरे व्यासपीठावरून भाषणे देणे सोपे असते.
आपली फुगणारी प्रचंड लोकसंख्या असताना हे कसं करायचं तेही जरा सांगाल तर बरं होईल.
आमही सरकारला निवडून दिलंय. जे काही करायचं ते सरकारने करायला पाहिजे असं म्हणायचं असेल तर राहू च द्या.
आपण पाच वर्षात एक मत दिलं कि आपली जबाबदारी संपली. सरकार वर वाटेल ती टीका करायला मोकळे झालो.
चांगलं आहे.
परत परत तेच ते
In reply to मग बाकी २० लाख विद्यार्थी हे… by सुबोध खरे
मागच्या तीन दशकांत आय टी मध्ये आलेल्या लाटेत बी एस सी (आय टी) किंवा कोणत्याही शाखेतील अभियंत्यालाच काय हवशा नवश्या गवशाला पण ५० ते ७५ हजारांची नोकरी मिळत होती. आता कृत्रिम बुद्धिमत्ता आल्याने हा बुडबुडा फुटला आहे.
पहिले तर तुम्हाला इंडस्ट्री चार्ट रीड करता येत नसताना तुम्ही उगाच आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे बुडबुडा फुटला आहे इत्यादी मूर्खपणाचा कळस गाठत आहात ! म्हणजे तुम्हाला काय म्हणायचे आहे की स्वतःची कृत्रिम बुध्दिमत्ता पॉलिसी बनवणारे मोदी सरकार पढतमूर्ख आहे का ? काय फुकट वाटेल ते टंकत सुटले तुम्ही ! आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे नोकऱ्या कमी झालेल्या नाहीत तर ती स्किल शिकलेल्या लोकांसाठी भरपूर उपलब्ध आहेत. अर्थात ह्यासाठी थोडे इंडस्ट्री ट्रेंड माहिती असणे गरजेचे आहे.
पहिले तर तुम्हाला इंडस्ट्री…
In reply to परत परत तेच ते by वृषभ खोंडे
पहिले तर तुम्हाला इंडस्ट्री चार्ट रीड करता येत नसताना तुम्ही उगाच आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे बुडबुडा फुटला आहे इत्यादी मूर्खपणाचा कळस गाठत आहात
अरे वा म्हणजे आय टी उद्योगात सगळं आलबेल आहे म्हणायचं का ?
मग आता सगळ्या आय टी कंपन्यांचे समभाग का हो कोसळले?
बाजारातील सगळे लोक मूर्खच आहेत बहुधा.
The Nifty IT index recorded a loss of approximately 25.38% to 26.49% over the past six months, dropping from a level near 40,301.40 down to around 28,349.35
Persistent investor concerns over artificial intelligence (AI) structural disruptions, foreign fund outflows, and fears of delayed discretionary tech spending due to high US interest rates.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे नोकऱ्या कमी झालेल्या नाहीत तर ती स्किल शिकलेल्या लोकांसाठी भरपूर उपलब्ध आहेत.
अरे वा
मग हे त्या तरुणांना सांगा कि.
कशाला त्या नीट च्या फालतू परीक्षेसाठी दोन दोन वर्षे वाया घालवत आहेत? आणि आहे काय त्या डॉक्टरकीत?
ए आय वापरून सगळे रोग बरे होणारच आहेत.
TCS, Infosys, and Wipro together cut more than 63,000 jobs in the 2023-2024 fiscal year. IT hiring in India, which peaked at around 4.5 lakh in 2022, fell to just 1 lakh by 2024.
चालू द्या तुमचं
डॉक्टर, AI will not replace…
In reply to पहिले तर तुम्हाला इंडस्ट्री… by सुबोध खरे
डॉक्टर, AI will not replace you, it will replace those who don't embrace AI हे आणि अशा अर्थाची वीसेक वाक्ये आता जादुई आणि आकर्षक बनली आहेत. यात अनेक आदर्श गृहितके आहेत. पण अतिशय घातक आणि पोकळ बोर्डरूम दावे यापलीकडे त्यांची ग्राउंड व्हॅल्यू नाही. पण ते सर्वांना पटवत बसणे दमछाक करणारे आहे. त्यामुळे जे जे होईल ते ते पाहावे.
ता. क. आणि ॲड होमीनेम हल्ला येण्यापूर्वीच डिस्क्लेमर: मी आयुष्यात भरपूर पुरेश्या लाईन्स कोड लिहिले आहेत. नामशेष झालेल्या टेक्नोलॉजीज पासून सी शार्प, जावा पायथन आणि जे काही पडेल ते. डॉ खरे म्हणतात तसे कोणत्याही शाखेतल्या इंजिनियर पदवीधारकाला आय टी क्षेत्रात धडाधड नोकऱ्या मिळण्याच्या काळापासून (पंचवीस वर्षे) ते आजच्या AI ML क्षेत्रापर्यंत सलग माझं कार्यक्षेत्र राहिले आहे. मोठ्या टीम्स लीड केल्या आहेत. गेला बराच काळ AI मधेच आहे. त्यामुळे पुढे वाढून ठेवलेलं अत्यंत धोकादायक भविष्य आणि त्याबाबत सोनेरी मुलामा देऊन केली जाणारी धूळफेक बोर्डरूम वक्तव्ये याच्याशी पण जवळून संबंध आहेत. त्यामुळे कृपया हे मत व्यक्त करण्याचा काहीच अधिकार मला नाही असे म्हणू नये.
हे बघा
In reply to डॉक्टर, AI will not replace… by गवि
इंडस्ट्री मध्ये तुम्ही पण गोल्ड स्टँडर्ड नाही किंवा मी पण नाही अर्थात आपापले इकोसिस्टिम आहेत अन् त्यानुसार आपली मते तयार होतात. त्यामुळे तुम्ही तुमची क्रेड द्यायची गरज नाही माझी ती अपेक्षा नव्हती. किंवा जर तुम्ही कधी माझ्यावर वैयक्तिक हल्ला (ad hominem) केला नसेल तर मी तो आऊट ऑफ द ब्लू करेल अशातला पण भाग नाही, त्यामुळे माझ्यालेखी तो वाढीव ताजा कलम अप्रस्तुत आहे.
किंबहुना तुमचा माझ्याबद्दल झालेला ग्रह पाहता मीच माझे प्रतिसाद परत तपासले आणि अंती मला जाणवले की माझी प्रतिक्रिया अनाठायी प्रक्षोभक आणि वैयक्तिक अंगाने जाणारी होती. त्याबद्दल मी सुबोध खरेजींची बिनशर्त अन् सपशेल माफी मागतो आणि अपेक्षा करतो की ते उदारमनाने मला क्षमा करतील. राजकीय चर्चा/ वितंडवाद होत राहतील पण माणसे महत्वाची असतात. कायम.
touché 🤝
In reply to हे बघा by वृषभ खोंडे
touché
🤝
परीक्षांत पेपर फुटणे हे वाईट…
परीक्षांत पेपर फुटणे हे वाईट आहेच.
याचा अर्थ असा नाही कि ते चालवून घ्यायचे. त्यासाठी जे काही करायचे ते सरकार करत आहेच. त्यात तुमची मदत होणार आहे का?
पण सध्याचे आंदोलन हे पेपर फुटीसाठी नाहीच ते आहे केवळ मोदी सरकारला खाली खेचण्यासाठी. त्यासाठी तरुणांची माथी भडकावणे चालू आहे. जरांगे पाटील कशाला भेटायला गेले होते जंतर मंतर वर ?
विरोधी पक्ष आता वाहत्या गंगेत हात धुवून घेत आहेत. बाकी अरुंधती रॉय केजरीवाल सारखी मंडळी तेथे आली तेंव्हा हे स्पष्ट झालेले आहेच.
असो.
शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणा करण्याबद्दल काही नक्क्की माहिती आहे कि आणि हे शिक्षण घेतल्यावर रोजगार कसा उपलब्ध होऊ शकेल याबद्दल काही ठोस कार्यक्रम?
ती आमची जबाबदारी नाही. आम्ही फक्त श्री मोदी सरकारवर टीका करणार.
कारण आम्ही ५ वर्षात एकदा एक मत दिलंय.
लॉजिकशी पूर्ण काडी मोड !
In reply to परीक्षांत पेपर फुटणे हे वाईट… by सुबोध खरे
अहो जर सार्वत्रिक निवडणुकच पाच वर्षात एकदा होत असेल तर पाच वर्षात एकदाच मत दिले जाणार ना ? उगाच काय हुच्चपणा लावला आहे तुम्ही ! किमान लॉजिकल बोला हो !
मनोज जरांगे पाटलांवर संचारबंदी इत्यादी लागू केली आहे का सरकारने ? नसल्यास फडणवीसांना सांगा लागू करायला गृहमंत्री ते आहेत महाराष्ट्राचे. त्याहून महत्वाचे म्हणजे राईट टू मूव्हमेंट - संचारस्वातंत्र्य हक्काला प्रश्न करणारे तुम्ही कोणीच लागून गेले नाही. मोदी सरकार स्वतः स्वतःची वाट लावून घेते आहे ! पहिल्या दोन दिवसात तिथे डाव्या विद्यार्थी संघटना/ गुंड एलिमेंट इत्यादी काहीही नसताना जर एखाद वरिष्ठ मंत्र्याने जाऊन पोरांच्या डोक्यावर हात फिरवून (किंवा किमान तसे भासवून) वांगचुकच्या तोंडाला लिंबाचे सरबत लावले असते तर ही सरकार खाली खेचण्याची वेळ आली नसती ! दोन दिवस काही नाही तिसऱ्या दिवशी डायरेक्ट काठ्या डोक्यात ! अगदी आंदोलन आम आदमी पक्षात कंटेन झाले असते ! मोदी सरकारचे ह्या आंदोलनाचे रीडिंग सपशेल फसले आहे. पिरियड.
चान्स सत्ताधारी मंडळीने दिला, उगाच मग्रुरी मध्ये कचरा समजले पोरांना अन् पोरांनी खोलून मारली पाचर !
अच्छा म्हणजे लातुरात राहणाऱ्या माझ्या भाच्याला पेपरफुटीचा त्रास झाला, त्याला सरकारला जाब विचारायचा आहे तर त्याने शैक्षणिक सुधार विषयावर पीएचडी करून बोलावे ? सरकार समर्थकांचे डोके ठिकाणावर आहे का ?
त्याने शैक्षणिक सुधार…
In reply to लॉजिकशी पूर्ण काडी मोड ! by वृषभ खोंडे
त्याने शैक्षणिक सुधार विषयावर पीएचडी करून बोलावे ?
उगाच काही च्या काही?
त्यांनी नाही
इथे जे पापले मतप्रदर्शन करत आहेत त्यांनी सांगायचे आहे कि हे सुधार कसे करायचे ते?
नीट च्या विद्यार्थांनी आपला अभ्यास नीट करून परत परीक्षा देण्याशिवाय त्यांना पर्याय आहे का?
हां
In reply to त्याने शैक्षणिक सुधार… by सुबोध खरे
हे ठीक आहे करू दळण आपण त्याला पैसे लागत नाहीत अन् सरकार पण हिंग लावून विचारत नाही.
डॉ खरे, आणखी एक मुद्दा इथे…
In reply to परीक्षांत पेपर फुटणे हे वाईट… by सुबोध खरे
डॉ खरे, आणखी एक मुद्दा इथे मांडू इच्छितो. या विद्यार्थी आंदोलनात विद्यार्थ्यांचे सर्वच प्रश्न मांडले जात आहेत अशी जरी जनरल समजूत असली तरी NEET परीक्षा हाच मुद्दा मुख्य बॅनरवर आहे. म्हणजे मोस्ट इंपॉर्टन्ट किंवा लक्षवेधक मुद्दा जो सर्वांच्या बॅनरवर आहे. शिक्षण आणि विद्यार्थी यांचे भारतातले प्रॉब्लेम खरोखर लावून धरायचे तर नीट परीक्षेच्या अगोदर खेडेगावांत शाळाच नसणे, तिथे मुलींसाठी मुतारी नसणे (हे मुलींनी वयात आल्यावर शिक्षण सोडण्याचे एक महत्वाचे कारण आहे हे अनेकांना नवीन असेल), शिक्षक नसणे, ते क्वालिफाइड नसणे आणि इतर खूप मूलभूत मुद्दे आहेत. कोणी म्हणेल की हेही मुद्दे आहेतच.
पण आंदोलनात काय ठळक दिसते की एकच समस्या = नीट परीक्षा घोटाळा.
त्यात परीक्षा देणाऱ्या पोरपोरींचे अतोनात हाल झाले हे अगदी सत्य आहे.. आणि अगदी शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा इतकी ती घटना वाईट देखील असेल.
पण खूप व्यापक आणि मूलभूत मुद्दे खाली सारून नीट परीक्षेसारखा aspiring उच्च शिक्षणापर्यंत पोचलेल्या विद्यार्थ्यांना आपलासा वाटेल असा विषय शीर्षस्थानी घेतला आहे. त्यामुळेच तिथे आलेले किंवा कदाचित काही प्रमाणात आणलेले जे शाळकरी किंवा गावाकडचे विद्यार्थी आहेत त्यांना neet चा फुलफॉर्म विचारणं आणि त्यांना कसे काहीच माहीत नाही अशी रिल्स बनवणं अनेकांना सोपं होतं आहे. कारण त्यांचे खरे प्रोब्लेम वेगळेच आहेत. असो.
+१
In reply to डॉ खरे, आणखी एक मुद्दा इथे… by गवि
+१
जेन एक्सची आजची इपिक…
जेन एक्सची आजची इपिक घोषणा😂
हास्यजत्रा रिल्स बघणे बंद ;
वनिता खरात, प्रियदर्शनी इंदलकर, समीर चौघूले इत्यादी पांचटवीर,
हुल्लडबाजांच्या मोर्चात सहभागी !
काका आणि काकू आता तुम्ही कायम रडणार का???
आज सीजेपीचे देशव्यापी बंदची हाक
तर, 'नीट' पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतरमंतरवर सुरू असलेल्या 'कॉक्रोच जनता पक्षा'च्या (सीजेपी) आंदोलनाचे लोण देशभर पसरले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी 'एक्स'द्वारे तरुणांना मन की बात सांगितली.
'देशातील युवकांचे कल्याण आणि त्यांचे भविष्य यापेक्षा महत्त्वाचे काहीही नाही. युवकांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांना माफ करणार नाही. युवकांचे हित हेच केंद्र सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे,' असेही मोदी यांनी आंदोलनाच्या ३४ व्या दिवशी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
'धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारावा, अशी विनंती मी तुम्हाला करतो; अन्यथा हे प्रकरण तुमच्या राजीनाम्यापर्यंतही जाईल. एक अकार्यक्षम आणि अयशस्वी मंत्री लाखो विद्यार्थ्यांपेक्षा महत्त्वाचा असू शकत नाही.' - अभिजीत दिपके
एक तर काही पोरं अभ्यास, परिक्षेचा ताण, परीक्षा घोटाळे, राजकारण, मोबाईल गेम, ऑनलाइन कमाई, बेरोजगार, आई-वडिलांचे टोमणे, वैतागून गेलेले, व्यवस्थेचे फस्ट्रेशनवाले हे सगळे आन्दोलनाकडे वळले, यांना फटके पडले तरी नव्या उत्साहाने येतच आहेत. उद्या आंदोलन मिटले, तरी पोरं घरी जातील की नाही याची काळजी वाटायला लागली आहे.
पंजाबचे शेतकरी शंभू बोर्डरवर आलेले आहेत त्यांना अनुभवाच्या जोरावर ज्वाइन होतात की काय असे वाटत आहे. 🙆♀️
-दिलीप बिरुटे
सोनम वांगचुक यानी उपोषण…
सोनम वांगचुक यानी उपोषण संपले असे सांगितले आहे.
आता आंदोलनाचे पुढे काय होणार?
अरेरे, वाईट झालं.
In reply to सोनम वांगचुक यानी उपोषण… by विजुभाऊ
मला निरर्थक उपोषणाने मेलेला माणूस बघायचा होता. संधी हुकली. ब्येटर लक नेक्ष्टाईम!
जाताजाता : जी कोणी झुरळं मोदींच्या राजीनाम्याच्या कल्पनाविलासात मग्न होऊन नाचताहेत त्यांना एकंच इशारा द्यावा म्हणतो. त्याचं काये की मोदींच्या समर्थनार्थ एखादं आंदोलन उभारलं तर काय निकाल लागेल याचा अंदाज येतोय का?
-गा.पै.
आंदोलन सुरु आहे.
In reply to सोनम वांगचुक यानी उपोषण… by विजुभाऊ
आम्ही सरकारला सांगितलं आहे की, संपूर्ण देशभरात आंदोलन सुरु आहे. धर्मेंद्र यांचा राजीनामा झाला नाही तर हे आंदोलन आणखी व्यापक होईल. सरकार लवकरात लवकर धर्मेंद्र प्रधान यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करतील अशी आशा आहे. सरकारने धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत उद्या दुपारपर्यंतचा वेळ घेतला आहे. उद्या दुपारी साडेतीन वाजता पुन्हा बैठक होईल", असं आशुतोष रांका यांनी सांगितलं.
केंद्र सरकारमध्ये मोठ्या घडामोडी
जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह सीजेपीच्या शिष्टमंडळाचा निरोप घेऊन आपल्या मंत्रिमंडळाकडे गेले आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात बैठक झाल्याची माहिती काही माध्यमांनी दिली आहे. या बैठकीत सीजेपीच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय होतो का? ते पाहणं महत्त्वाचं आहे.
राजीनामा होऊन यापुढे सर्वच परीक्षा नीट घेऊ असे लिहून घेतील.
-दिलीप बिरुटे
आंदोलनातील युवक सत्तेतील…
In reply to आंदोलन सुरु आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आंदोलनातील युवक सत्तेतील कोणालाच घाबरत नाहीत. उघडपणे त्यांचे नाव घेऊन विनोद करतात. हा टर्निंग पॉईंट ठरू शकेल. आयटी सेल निष्प्रभ ठरली आहे आंदोलकांपुढे. मेन स्ट्रीम मिडीया चेष्टेचा विषय झालाय. त्यांचा वर्तमान TRP बघायला हवा.
दिल्ली पोलिसांकडून…
In reply to आंदोलनातील युवक सत्तेतील… by आग्या१९९०
दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर दररोज होणारा अन्यायकारक लाठीमार लक्षात घेऊन अखेर CJI सुनावणी घेण्यास तयार झाले. २७ तारखेला सुनावणी घेणार.
सोनम वांगचूक यांच्य…
In reply to दिल्ली पोलिसांकडून… by आग्या१९९०
सोनम वांगचूक यांच्य माघारांनंतर आता आंदोलनाची दिशा कशी असेल याची उत्सुकता आहे 👍यात आंदोलन करणाऱ्या मुलांना बळच कायदेशीर गोष्टीत अडकवल्यास त्यांच्या करियराचे नुकसान होईल का??
दिल्ली युनिव्हर्सिटी, jnu ने मुलांना आंदोलनात सहभागी झाल्यास कारवाई होईल अशी धमकी दिली आहे.
याबाबत मुलांबाबत चिंता आहे.
सोनम वांगचूक यांच्य…
In reply to दिल्ली पोलिसांकडून… by आग्या१९९०
सोनम वांगचूक यांच्य माघारांनंतर आता आंदोलनाची दिशा कशी असेल याची उत्सुकता आहे 👍यात आंदोलन करणाऱ्या मुलांना बळच कायदेशीर गोष्टीत अडकवल्यास त्यांच्या करियराचे नुकसान होईल का??
दिल्ली युनिव्हर्सिटी, jnu ने मुलांना आंदोलनात सहभागी झाल्यास कारवाई होईल अशी धमकी दिली आहे.
याबाबत मुलांबाबत चिंता आहे.
मला पहिल्यापासूनच याचा अंदाज…
In reply to सोनम वांगचुक यानी उपोषण… by विजुभाऊ
मला पहिल्यापासूनच याचा अंदाज होता. त्यामुळे हे आंदोलन फक्त सोनम किंवा दीपके यांचे नसून विद्यार्थ्यांचेही आहे, असेच मला सुरुवातीपासून वाटत होते.
ज्या दिवशी तो अमानुष लाठीचार्ज झाला, त्या क्षणापासून या संपूर्ण परिस्थितीबद्दल मनात प्रचंड वेदना आहेत.
अवांतर:
माझी वैयक्तिक भूमिका अशी का होती, यालाही एक पार्श्वभूमी आहे. अण्णा हजारे यांच्या आंदोलनाच्या काळात मी स्वतः रस्त्यावर उतरून सहभागी झालो होतो. नंतर हळूहळू असे वाटू लागले की त्या आंदोलनाचा वापर फक्त काँग्रेस सरकार पाडण्यासाठी झाला. त्यातून केजरीवाल यांचा उदय झाला. त्यांनाही मी मनापासून पाठिंबा दिला होता; त्याचे धागे आजही येथे सापडतील.
पण काळ जसजसा पुढे गेला, आताशा माझ्या लक्षात आले की सत्तेत असणारे आणि विरोधकांमध्ये फूट पाडण्याचे राजकारण हे अनेकदा एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. Bjp ते लिलया सांभाळते आहे.
कदाचित याच कारणामुळे राहुल गांधी CJP च्या स्टेजवर गेले नसावेत. कारण हे आंदोलन पुढे जाऊन दुसरे "अण्णा आंदोलन" ठरेल की काय, याचीही भीती किंवा राजकीय गणित असू शकते. विरोधातील space एकत्र राहू नये, अशीही एखादी चाल असू शकते, असे मला वाटत होते. मात्र, ठोस आधार नसताना अशा गोष्टी बोलण्यात अर्थ नसतो, म्हणून मी तेव्हा ते व्यक्त केले नाही.
परंतु आता एक गोष्ट स्पष्ट वाटते, जे झाले ते झाले. सोनम आणि दीपके यांच्या निमित्ताने हजारो तरुण रस्त्यावर आले. त्यांनी या आंदोलनाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. या तरुणाईला आज एखादा ठळक चेहरा नसला, तरी त्यांच्या विचारांची मशाल उद्याचा मार्ग नक्कीच उजळवेल, असा विश्वास आहे.
अती अवांतर:
रविवारच्या deployment मुळे आणि प्रचंड कामाच्या ताणामुळे मला आज आंदोलनात सहभागी होता आले नाही, याचे मनापासून दुःख आहे. मात्र माझे काही मित्र तिथे उपस्थित आहेत , ही गोष्ट समाधान देणारी आहे.
- गणेशा
संपादन :
In reply to मला पहिल्यापासूनच याचा अंदाज… by गणेशा
पुढे जाऊन हे आंदोलन, दुसरे "अण्णा आंदोलन" ठरेल हि भीती सरकार उलथवण्या साठी नाही, तर विरोधातील space हि नष्ट करण्यासाठी वापरले जाईल हि भीती होतीच..
असे लिहायचे आहे.. त्यामुळे हि दुरुस्ती..
अवांतर
बाकी हे सरकार उलथवण्याची ताकद सध्या कोणाच्यात आहे?
काँग्रेस मुक्त म्हणत म्हणत काँग्रेस युक्त झालेली मुजोर bjp कोणाला हि विकत घेऊ शकते हे अलीकडच्या राजकारणा वरुन दिसते आहे..
त्यामुळे तरुणाई हेच उत्तर आता तरी दिसू लागले आहे..
बघू काळाचा पडदा आपल्या ला काय काय चित्र दाखवतोय ते..
वा...
निरर्थक उपोषणाने मेलेला माणूस बघण्याची फेटीश असणाऱ्या सगळ्यांना...
दिसेल दिसेल. थोड्याच दिवसात तेही दिसणार आहे. उपोषण अन्न पाण्याचे नसेल, प्रसिध्दी आणि स्वस्तुतीचे असेल. त्याअभावी मेलेले दिसणारेत लौकरच.
.
बाकी सीजेपीला ना कधी सपोर्ट केला ना वांगचूकला पण सरकारविरुध्द बोलणारा प्रत्येकजण देशद्रोही अन कुटील हेतूचा आहे ह्या भावनेनेच केलेला प्रत्येक हल्ला भडवेगिरीचे लक्षण आहे. स्तुती करणारा सोनम अगदी भारी होता, जरा विरोधी बोलला की त्याची सगळी पाळेमुळे खणून काढायची प्रवृत्ती बेक्कार आहे. सीजेपीचा दीपके आपचा कार्यकर्ता होता म्हणून चालत नाही, राघव चढ्ढा मात्र प्रेमाने घेतला जातो. दिपके अमेरिकेत होता तर तिकडून फंडींग घेऊन आला मग सरकारातील मंत्र्यांची मुले अमेरिकेत शिकताना कुणासाठी फंडींग गोळा करतात? सुरुवातीला ऑनलाईन बिनलाईन आंदोलन काही नसते, नुसते लाईक ठोकून काही होत नसते, र्स्त्यावर कितीजण उतरणार असे हिणवणाऱ्यांना दिल्लीतले २० जुलै नंतरचे आंदोलन म्हणजे थोबाडीत मारणारा जेनझीचा प्रतिसाद होता.
परिस्थिती अंगावर शेकायली की सगळ्यांची आठवण येते. कायदा, सुव्यवस्था, संविधान, देश, संसद ह्यांचे पावित्र्य, महती गाणाऱ्यासाठी....
आंदोलन जरी जेनझींचे असले तरी आम्ही जवळपास त्यांच्या पालकांच्या वयातले....आम्हीही लहान असताना आंदोलने बघितली आहेत. गावोगावी फिरणाऱ्या रथयात्रा नंतर झालेली कारसेवा बघितली आहे. मुल्ला मुलायम सिंगाच्या मुघल सेनेने झाडलेल्या गोळ्या आणि त्यात म्रुत्युमुखी पडलेल्या कोठारी बंधूंच्या बलिदानाचे पोवाडे चौकाचौकात स्पीकरवर ऐकलेले आहेत. "व्यर्थ न हो बलिदान" "याद करो कुर्बानी" च्या घोषणा ऐकलेल्या आहेत. कोठारी बंधू कसे "पाठ दाखवऊन परत येणार नाही " म्हणत रामलल्लांच्या सेवेस गेले, अजून दोन मुले असती तर त्यांनाही रामासाठी अर्पण केले आहे हे त्यांच्या वडिलांचे गहिवर आणणारे भाषण कित्येकदा ऐकले आहे. आंदोलनात मृत्युमुखी पडणारे मेले नाहीत तर बलिदान, शहीद, अमर, रामकार्य, धर्मयुध्द, तपस्या, राष्ट्रयज्ञातक्या समिधा अशा शब्दावलींने गौरवले गेले आहेत. त्यांनंतर पाडलेली बाबरी मशीद अन गोध्राच्या दंगली ह्या सरकारविरुध्द जनक्षोभ होत्या अन त्या जनक्षोभातून सत्तेत आलेले, आण्णा हजारेंच्या उपोषणातून अन त्यांनी केलेल्या आरोपामुळे निर्माण झालेल्या जनक्षोभातून सत्तेत आलेल्या लोकांनी इतरांना कायदा, सुव्यवस्था अन संविधानाचे पवित्र्य लोकांना शिकवण्याची गरज नाही. सत्य, प्रामाणीकपणा, कायदा अन संविधान तुमच्या घरचे बटीक नाहियेत.
सीजेपीचे आंदोलन हे कशाही परिस्थीत सुरु झाले अन कसेही असले तरी सुरुवातीसच त्याची दखल घेऊन त्यांना थांबवण्यासाठी काहीतरी करायला हवे होते. त्याउलट त्यांच्या विषयीच अपप्रचार सुरु केला. त्यातूनच प्रसिध्दी मिळवत दिपकेचे भारतात आगमन, वांगचूकची अन त्याची भेट, त्यानंतर प्रमुख शहरात केली गेलेली आंदोलने आणि त्यांनतर त्या आंदोलनात सहभागी झालेले लोक पाहता जंतरमंतरवरील आंदोलनापर्यंत सर्वच ठिकाणी त्यांना सरकारकडून थांबवण्याचा कोणताही प्रभावी प्रयत्न झालेला नसल्याने कधीकधी सरकारचीच ही युवाविरोध विकेंद्रीत करण्याची चाल आहे की काय अशीही शंका येत होती. वांगचूकच्या उपोषणानंतरही मान्सून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काही हजार युवांच्या मोर्चाला हॅन्डल करुन एखाददुसरी मागणी मान्य करुन सगळेच थांबेल असेही वाटत होते परंतु प्रचंड संख्येने दिल्लीत दाखल झालेल्या जेन झी ने सगळेच अंदाज चुकवले. फक्त शिक्षणमंत्र्यांना अन त्यांनी राबवलेल्या परीक्षापध्दतीला असणारा विरोध, पूर्ण सरकारला विरोध ह्यात कधी बदलला हेच कळले नाही. आता वांगचूकना उपोषण स्थळावरुन उचलतानाही वापरलेली पध्दत अधिकच्या जनक्षोभाला कारण ठरलीये. त्यांनी आता उपोषण सोडले आहे, कदाचित मंत्रींमंडळाची चर्चा करुन धर्मेन्द्र प्रधानांचाही राजिनामा होईल उद्या परवा पण सीजेपी ला स्वत:च जेनझींचे नेतृत्व स्वीकारायची वेळ आणली गेली आहे. त्यांना आणि वांगचूकला अपेक्षित असणारी संसदीय मार्गाने लढाई हवी असेल तर राहुल गांधी हेच तर नाव शिल्लक राहते. नाहीतर दुसरा मार्ग हा पुन्हा आंदोलन हाच उरतो.
विद्यार्थ्यांवर, तरुणाईंवर केले गेलेले पोलीसी लाठीमार अन अत्याचार निघृण आहेतच पण पोलीसांवर आणि तरुणांवर ही वेळ कशी आणि का आणली गेली हेही बघितले पाहिजे. त्या कृतींचा अगदी मांजराला सुध्दा कोंडी केली की ते फिस्कारुन येते ह्याची माहिती नव्हती काय? आताही जंतरमंतर भागातले नेट, मेट्रो दुकाने बंद करवून काय साध्य करताहेत? की त्यामुळे आंदोलनात सहहागी नसणार्या लोकांनाही आंदोलन विरोधी मत बनवायला भाग पाडले जात आहे? आंदोलन हाच जर प्रोब्लेम असला तर सध्या राजीनामा द्यायला प्रधानाला किंवा सरकारला काय जड आहे? इअतकी स्गळी व्यवस्था राबवून, सर्वानाच त्यात व्यग्र ठेऊन प्रचंड गोंधळाची स्थिती निर्माण करण्यात सरकारचाही मोठा हात आहे. आपले मूल चॉकलेटसाठी रडत असले, आदळापट करत असले तर त्याला एक लहानसा तुकडा देऊन त्यावेळी गप्प करण्याची आईची पध्दत सरकारने राबवली असती तर फारसे काही बिघडले नसते. आज पोराला चॉकलेट दिले तर उद्या तो आक्खा बार मागेल, परवा दुकान मागेल, तेरवा फैक्टरी मागेल असले स्पेक्युलेशन्स मांडण्यापेक्षा अन पोरांवर संस्कार, त्याच्या सवयी, त्याचे जेनेटिक्स आदीविषयावर चर्चा करण्याची ही वेळ नाही हेही सरकारला कळायला हवे.
असो.. ह्यानिमित्ताने ऐक्टीव्ह जेन झी बघायला मिळाली, लहानपणी कसे पोलिसांना चुकवत कारसेवक अयोध्येत दाखल झाले आणी घुमटावर चढले ह्यांच्या गाथा ऐकल्या होत्या आता अशीच आजची तरुणाई पोलिसांना तुमचे उइनिफॉर्म, नेमप्लेटस वर प्रश्न विचारताहेत, धर्म, जात, वय, लिंग, शिक्षण, ठिकाण आदि न विचारता एकमेकांना मदत करत भारतातल्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणांहून एकत्र येत काही एका कारणासाठी बोलताहेत, लढताहेत, जखमी होताहेत अन पुन्हा येताहेत ते कारण त्यांच्या स्वत:च्या हक्काचे आहे, त्यांच्या भविष्यासाठी निगडीत आहे हेपण प्रचंड आशादायक आहे. एखाद्या मंदिरासाठी आंदोलन करणारी तरुणाई आज पालक झालीय, त्यांना आज त्यांच्या शिक्शःअणासाठी, हक्कासाठी लढणाऱ्या तरुणांना हतोत्साहीत करण्याचा, विरोध करण्याचा कोणताच अधिकार नाहिये हे जितके लवकर लक्षात येईल तितके चांगले.
फक्त मित्र म्हणून नाही.. पण…
In reply to वा... by अभ्या..
फक्त मित्र म्हणून नाही.. पण जे काही लिहिले आहे त्या बद्दल मला तुझा अभिमान आहे..
तू जस लिहितो इतके छान मला लिहिता येत नाही.. पण एकदम मनातले... सेम ह्याच भावना आहेत..
बाकी माझे इतर मित्र आज पुण्यात आंदोलनात आहेत त्याचा हि अभिमान आहेच..
कीबोर्ड बडवत costing काढत आजचा दिवस बोर गेला पण
धाग्यातली चर्चा आवडली..
भाई तोडलं तुम्ही !
In reply to वा... by अभ्या..
आण्णा हजारेंच्या उपोषणातून अन त्यांनी केलेल्या आरोपामुळे निर्माण झालेल्या जनक्षोभातून सत्तेत आलेल्या लोकांनी इतरांना कायदा, सुव्यवस्था अन संविधानाचे पवित्र्य लोकांना शिकवण्याची गरज नाही. सत्य, प्रामाणीकपणा, कायदा अन संविधान तुमच्या घरचे बटीक नाहियेत.
जाळ जाळ केला आहेत निस्ता एकदम अंगार ! 🔥🔥🔥🔥.
त्या निमित्ताने अण्णांच्या आंदोलनात फेर धरून नाचणाऱ्या सुषमा स्वराज बाई खास यूट्यूब वरून साभार ! यूट्यूब बडी नालायक चीज सगळ्यांचे सगळे कायम धरून ठेवते
+१ सतत मोबाईलवरच /इन्स्टावर…
In reply to वा... by अभ्या..
+१ सतत मोबाईलवरच /इन्स्टावर असते त्या जनरेशची सामाजिक बांधिलकी या निम्मिताने दिसली आहे.
खफवर मीही आधीच सांगितलं होते. Genz खतरनाक आहे. ते कोणालाच घाबरत नाही. आमच्याकडे genz gen alpha, gen beta सगळे आहेत.त्यांना पाहतोच आहे.पाहिजे ते घेतल्याशिवाय सोडत नाही ते 😅😅
जियो.
In reply to वा... by अभ्या..
नेमकं लिहिलंय.
इथे मुद्दाम प्रतिसाद द्यायचं कारण एवढंच की मिपावरचे बहुतेक लेखक "धर्म, हिंदू मुस्लिम, मंदिरं, पाकिस्तान इ.इ" कचऱ्यातच घोळ घालणारे असले तरीही बरेच वाचक अजूनही "संविधान, भारत, विविधतेत एकता" ह्या गोष्टींवर अढळ विश्वास आणि अभिमान असणारे आहेत. आणखीही कित्येक असतील.
-*-
जेन झी ने त्यांना नेमकं काय महत्त्वाचं आहे ते व्यवस्थित सांगितलं आहे.
लढत रहा जेनझी.