Skip to main content

काही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे

लेखक नीलकांत यांनी मंगळवार, 22/02/2011 16:53 या दिवशी प्रकाशित केले.
प्र.१ ) अर्धवट राहिलेले लेखन कसे आणि कुठे दिसेल? उ. - अर्धवट राहिलेले लेखन मिपावर साठवता येत नाही. यासाठी कृपया जीमेल किंवा अन्य सोईंचा वापर करावा. प्र.२) त्रास देणार्‍या सदस्यांची तक्रार कुठे करावी? उ. - मिपावर सदस्यांना तक्रार करायची असल्यास सरपंच किंवा संपादक मंडळ या आयडीला किंवा नीलकांत यांना व्यक्तिगत निरोप पाठवावा. प्र.३) प्रवेश करण्यासाठी जशी जागा आहे तसे आपल्या खात्यातुन बाहेर (logout)जाण्यासाठी काय करावे ? उ. - खात्यातून बाहेर जाण्यासाठी गमन नावाचा दूवा आपल्या उजव्या समासात दिलेला आहे त्याचा वापर करावा. प्र.४) काही पानांवर "प्रवेश प्रतिबंधीत " असा संदेश दिसतो. उ.- बरेचदा काही वादग्रस्त किंवा त्रासदायक लेखन उडवायच्या आधी मिसळपावचे संपादक ते लेखन अप्रकाशित करतात व त्यानंतर एकत्रीत चर्चा करून तो उडवावा किंवा काय असा निर्णय होतो. तोपर्यंत तुम्ही त्या पानावर गेलात तर असा संदेश दिसतो. प्र.५)खरडफळा आणि खरडवही - या दोन्हींत फरक काय? उ. - खरडफळा हा सार्वजनीक आहे. तेथे सर्वांशी गप्पा मारता येतील. येथील खरडी तुम्ही काढून टाकू शकत नाही. खरडवही ही तुमची आहे. तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी त्याचा उपयोग लोक करतील. तुम्ही तुमच्या खरडवहीतील खरडी तुम्ही काढून टाकू शकता.

वाचने 133979
प्रतिक्रिया 77

प्रतिक्रिया

In reply to by सुजित जाधव

???

फोटो अपलोड करताना अडचणी येत आहेत. याआधी मी flicker किंवा imgbb.com यावरून लिंक मिळवून वापरायचो. पण तिकडून लिंक इथे कॉपी पेस्ट करुन फोटो अपलोड करण्याचा प्रयत्न केला पण अपलोड होत नाहीये.. हे अस काहीसं दिसतंय mipa हे अपलोड करत असताना width ८०% व height चा box रिकामा ठेवला होता.

In reply to by सुजित जाधव

फोटो गुगल फोटोज वरुन (शेअर्ड अल्बम मधुन) शेअर करा, ते सोपे पडेल. आणि width व height चे रकाने रिकामे ठेवा म्हणजे मोबाइल आणि मोठ्या स्क्रीन अशा दोन्हीवर व्यवस्थीत दिसतील.

अनाहिता ह्या सदरात मी कोड मंत्र ह्या नाटकाबद्दल लिहिले होते. ती पोस्ट पुन्हा पहाता येईल का?

In reply to by अनिता ठाकूर

मी "अनाहिता अनिता ठाकूर मिसळपाव.कॉम" असा गुगल शोध घेतला, पण या प्रतिसादा व्यतिरिक्त काही सापडले नाही. एरवी सुद्धा अनाहिता सदर / विभाग कसा बघायचा ? का तो पुरूष मिपाकरांना बघायची अनुमती नाही ? अनाहिता निवडक लेखन सर्वांसाठी खुलं करायला हरकत नाही. की अनाहिता सदर / विभाग मिपावरून काढून टाकला आहे ?

यावर यापूर्वी ही चौकशी झालेली आहे पण शोध कसा करावा हे काही कळले नाही. "शोधा" असा पर्याय संकेतस्थळावर देता येऊ शकतो या बाबत तज्ञ मिपा तांत्रिक मंडळींनी योग्य ती उपाययोजना करावी असे वाटते. जर दुसऱ्या पद्धतीने शोध शक्य असेल तर त्याची लिंक कृपया मदतपान सदरात टाकावी म्हणजे सगळ्यांना शोध घेणे सोपे जाईल. धन्यवाद