✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

काही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे

प्र.१ ) अर्धवट राहिलेले लेखन कसे आणि कुठे दिसेल? उ. - अर्धवट राहिलेले लेखन मिपावर साठवता येत नाही. यासाठी कृपया जीमेल किंवा अन्य सोईंचा वापर करावा. प्र.२) त्रास देणार्‍या सदस्यांची तक्रार कुठे करावी? उ. - मिपावर सदस्यांना तक्रार करायची असल्यास सरपंच किंवा संपादक मंडळ या आयडीला किंवा नीलकांत यांना व्यक्तिगत निरोप पाठवावा. प्र.३) प्रवेश करण्यासाठी जशी जागा आहे तसे आपल्या खात्यातुन बाहेर (logout)जाण्यासाठी काय करावे ? उ. - खात्यातून बाहेर जाण्यासाठी गमन नावाचा दूवा आपल्या उजव्या समासात दिलेला आहे त्याचा वापर करावा. प्र.४) काही पानांवर "प्रवेश प्रतिबंधीत " असा संदेश दिसतो. उ.- बरेचदा काही वादग्रस्त किंवा त्रासदायक लेखन उडवायच्या आधी मिसळपावचे संपादक ते लेखन अप्रकाशित करतात व त्यानंतर एकत्रीत चर्चा करून तो उडवावा किंवा काय असा निर्णय होतो. तोपर्यंत तुम्ही त्या पानावर गेलात तर असा संदेश दिसतो. प्र.५)खरडफळा आणि खरडवही - या दोन्हींत फरक काय? उ. - खरडफळा हा सार्वजनीक आहे. तेथे सर्वांशी गप्पा मारता येतील. येथील खरडी तुम्ही काढून टाकू शकत नाही. खरडवही ही तुमची आहे. तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी त्याचा उपयोग लोक करतील. तुम्ही तुमच्या खरडवहीतील खरडी तुम्ही काढून टाकू शकता.

धन्यवाद एस. जी.

Duishen
Sat, 11/11/2017 - 06:36 नवीन
धन्यवाद एस. जी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

माझा प्रश्न सार्वजनिक झाला की काय?

Duishen
Wed, 11/08/2017 - 21:01 नवीन
माझा प्रश्न सार्वजनिक झाला की काय? असे झाल्यास क्षमस्व. मी मिपा अधिकाऱ्यांना कुठल्या लिंकवर प्रश्न विचारू?
  • Log in or register to post comments

तुम्ही तुमच्या खरडवहीतील खरडी

एमी
गुरुवार, 11/09/2017 - 00:57 नवीन
तुम्ही तुमच्या खरडवहीतील खरडी तुम्ही काढून टाकू शकता. >> कशा??
  • Log in or register to post comments

आता नाही काढता येत स्वतःला.

एस
गुरुवार, 11/09/2017 - 01:08 नवीन
आता नाही काढता येत स्वतःला. पूर्वी खरड डिलीट करता येत असे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी

खरडवही बंदपण करता येत नाहीय :

एमी
Sat, 11/11/2017 - 06:40 नवीन
खरडवही बंदपण करता येत नाहीय :-|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

चुकून दोन वेळा लेखन पोस्ट

चुकार
Tue, 03/20/2018 - 01:07 नवीन
चुकून दोन वेळा लेखन पोस्ट झाल्यास काय करावे? एक लेखन काढून कसे टाकायचे?
  • Log in or register to post comments

तेच लेखन चुकून दोनदा प्रसिद्ध

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 03/20/2018 - 01:38 नवीन
तेच लेखन चुकून दोनदा प्रसिद्ध केले गेल्यास संपादकांना त्यातील एक काढून टाकण्याची विनंती करता येते. हे व्यनीने किंवा लेखाला दिलेल्या एका प्रतिसादात केले तरी चालते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चुकार

कोणत्या हि पोस्ट वर दिल्या जाणाऱ्या कमेंट

Rajesh188
Wed, 06/26/2019 - 14:28 नवीन
Post var दिली जाणारी नवीन कमेंट ही सर्वात शेवटी दिसायला हवी म्हणजे जास्त शोध घ्यावा लागणार नाही
  • Log in or register to post comments

लिन्क जोड

स्मिता दत्ता
Mon, 08/19/2019 - 16:53 नवीन
मी ब्लॉग ची व अन्य लिंक जोडू शकते का ?
  • Log in or register to post comments

फोटो चढवणे

रिकामटेकडा
Sun, 09/22/2019 - 09:06 नवीन
फोटो अपलोड करण्यासाठी फ्लिकर पेक्षा कोणती सोपी वेबसाइट आहे का? फ्लिकर वरून शेअर लिंक करून इकडे टाकताना प्रत्येक वेळी एडिट करावी लागते.
  • Log in or register to post comments

फोटो अपलोड

सुमो
Sat, 10/12/2019 - 17:24 नवीन
पोस्ट इमेज आणि Imgbb हे पर्याय आहेत. तसंच एम्बेड फोटोज इथं तुमच्या फ्लिकर फोटोची लिंक दिल्यास त्या फोटोची एम्बेड लिंक आणि फोटोचा डायरेक्ट url मिळतो . उदा. फ्लिकरची ही शेयर लिंक https://flic.kr/p/hx4W8K आणि त्यावरुन घेतलेला हा फोटो. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रिकामटेकडा

नमस्कार,

अनिंद्य
Mon, 10/14/2019 - 11:55 नवीन
नमस्कार, मी मिपावर बऱ्यापैकी लिखाण केलेले आहे. माझे प्रोफाईल उघडल्यावर 'यांचे सर्व लेखन' ह्या शीर्षकाखाली मात्र माझे लेखन दिसत नाही, अन्य कुणी लिहिलेले ३ लेख दिसतात. हे कसे दुरुस्त करता येईल ?
  • Log in or register to post comments

दुरुस्ती

सुमो
Mon, 10/14/2019 - 18:52 नवीन
नीलकांत किंवा प्रशांत हेच करु शकतात.. मी एकही लेख लिहिला नसताना माझ्या प्रोफाईल मधे हे तीन लेख दिसताहेत. Image removed. तुमचं लेखन मात्र मला व्यवस्थीत बघता येतंय. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिंद्य

हायला

जॉनविक्क
Tue, 10/15/2019 - 22:07 नवीन
अगदी असेच माझ्या नावाखाली, गवी, मूवी, प्रचेतस, जव्हेरगन्ज , शिवकन्या, मृणालिनी, खिलजी यांचे काही लिखाण जोडता येईल का ;) बाकी मला माहित आहे काय टेक्निकल झोल असावा ते ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुमो

'माझे लेखन' आणि 'यांचे सर्व

कंजूस
Wed, 10/16/2019 - 11:31 नवीन
'माझे लेखन' आणि 'यांचे सर्व लेखन' वेगळे आहे. -------- याचे उत्तर मी तुम्हाला व्यक्तिगत संदेशात देईन. कारण तुमचा युजर आईडी नंबर मी सभासद नसलेल्यांसाठी उघड करू शकणार नाही. उघड करायला परवानगी नाही. ---------- माझा एखादा लेख कुणी सभासद नसलेल्याने वाचला आणि त्यास मी लिहिलेले इतर लेख वाचायचे असल्यास ते सापडणार नाहीत कारण माझा युजर आईडी त्यांना पाहता येत नाही. पण मी स्वत:च माझ्या लेखात मी लिहिलेल्या लेखाची लिंक देऊ शकतो. तशी काही लेखांत मी दिली आहे. ती सामान्य लिंक = http_misalpav_dot_com/user/युजरनंबर/authored या वरील लिंकमध्ये तुमचा यजरनंबर टाका.
  • Log in or register to post comments

कारण तुमचा युजर आईडी नंबर मी

जॉनविक्क
Wed, 10/16/2019 - 12:35 नवीन
कारण तुमचा युजर आईडी नंबर मी सभासद नसलेल्यांसाठी उघड करू शकणार नाही. उघड करायला परवानगी नाही.
असे काही नाही. हवे तर माझा युजर नंबर जाहीर करून बघा जर तुम्ही लॉगिन नसाल तर तसेही त्या युआरएल वर acces denied असेच उत्तर येते. युजर नंबर माहीत असूनही :) कारण जर तसे घडत नसेल तर मी 0 पासून सुरू करून मिपाच्या सर्व युजर्सना crawl करू शकेन :).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

युजरनेम पुरेसे आहे

सुमो
Wed, 10/16/2019 - 12:54 नवीन
माझा एखादा लेख कुणी सभासद नसलेल्याने वाचला आणि त्यास मी लिहिलेले इतर लेख वाचायचे असल्यास ते सापडणार नाहीत
इथे असहमत... लेखकाचे युजरनेम दिसतेच सभासद नसलेल्यांना. गूगलबाबाला असं विचारलं Image removed. तर आलेल्या सर्च रिझल्ट मधील पहिली लिंक तात्या अभ्यंकरांचे सर्व लेखन दाखवते. Image removed. गूगल सर्च मधे युजरनेम टाकले की सर्व लेखन दिसते सभासद नसलेल्यांना सुद्धा.
  • Log in or register to post comments

@जॉनविक्क, ब्राऊजरमध्ये

कंजूस
Wed, 10/16/2019 - 13:12 नवीन
@जॉनविक्क, ब्राऊजरमध्ये तुम्ही लॉगाउट करून खालील लिंक्स चालतात का पाहा. तुमची लिंक उघडेल पण तुमचे लेखच नसावेत. कंजूस यांचे लेखन इथे पाहा ------------------------ जॉनविक्क यांचे लेखन इथे पाहा -------------------------- अनिंदंय यांचे लेखन इथे पाहा
  • Log in or register to post comments

नवे लेखन कसे सुरु करत येइल याबददल मार्ग्दर्शन कसे मिळॅल?

स्वस्तिक
Sun, 01/07/2024 - 22:32 नवीन
नवे लेखन कसे सुरु करत येइल याबददल मार्ग्दर्शन कसे मिळॅल?
  • Log in or register to post comments

मदत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 01/08/2024 - 09:37 नवीन
उजव्या बाजूला मिसळपाववर स्वागत असे दिसत असेल. मग माऊली आणि संत तुकाराम दिसतात. मग त्याखाली मिपा दिवाली अंक २०२३ दिसेल. एक तरुण तरुणी हातात हात घेतलेले दिसती. मिसळपाव दिवाळी अंक २०२३ दिसेल. अनुक्रमणिका दिसेल. नंतर आवागमन दिसेल. नंतर, त्या खाली तुमचं लॉगीन केल्यामुळे नाव दिसेल. पुढे खरडवही, व्यक्तिगत संदेश, नवे लेखन, खरडायचा फळा आणि लेखन करा असे दिसेल. त्यावर क्लिक केलं की लेखनाचे पर्याय उघडतील. तिथे चौकटीत लेखन करुन लेखाचे शीर्षक टाकून सर्व टॅगचे पर्याय भरुन लेखन प्रकाशित करा. लेख कच्चे बच्चे प्रकाशित झाले तरी घाबरु नका. संपादक करतील अप्रकाशित. लेखन प्रकाशित करण्यापूर्वी पूर्वप्रकाशनाचीही सोय आहे. आपलं लेखन प्रकाशित होण्यापूर्वी कसे दिसते ते बघायचे आणि लेखन प्रकाशित करायचे. मदत लागली तर, नक्की सांगा आपण मिपावर कधी कधी पडिक असतो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वस्तिक

मिपा

सुजित जाधव
Sun, 01/14/2024 - 22:32 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

???

टर्मीनेटर
Sun, 01/14/2024 - 22:42 नवीन
???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुजित जाधव

मदत हवी होती

सुजित जाधव
Sun, 01/14/2024 - 22:51 नवीन
फोटो अपलोड करताना अडचणी येत आहेत. याआधी मी flicker किंवा imgbb.com यावरून लिंक मिळवून वापरायचो. पण तिकडून लिंक इथे कॉपी पेस्ट करुन फोटो अपलोड करण्याचा प्रयत्न केला पण अपलोड होत नाहीये.. हे अस काहीसं दिसतंय Image removed. हे अपलोड करत असताना width ८०% व height चा box रिकामा ठेवला होता.
  • Log in or register to post comments

फोटो गुगल फोटोज वरुन (शेअर्ड

टर्मीनेटर
Sun, 01/14/2024 - 23:08 नवीन
फोटो गुगल फोटोज वरुन (शेअर्ड अल्बम मधुन) शेअर करा, ते सोपे पडेल. आणि width व height चे रकाने रिकामे ठेवा म्हणजे मोबाइल आणि मोठ्या स्क्रीन अशा दोन्हीवर व्यवस्थीत दिसतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुजित जाधव

अनाहिता ह्या सदरात मी कोड

अनिता ठाकूर
Sun, 06/02/2024 - 07:20 नवीन
अनाहिता ह्या सदरात मी कोड मंत्र ह्या नाटकाबद्दल लिहिले होते. ती पोस्ट पुन्हा पहाता येईल का?
  • Log in or register to post comments

मी "अनाहिता अनिता ठाकूर

चौथा कोनाडा
Sun, 06/02/2024 - 17:41 नवीन
मी "अनाहिता अनिता ठाकूर मिसळपाव.कॉम" असा गुगल शोध घेतला, पण या प्रतिसादा व्यतिरिक्त काही सापडले नाही. एरवी सुद्धा अनाहिता सदर / विभाग कसा बघायचा ? का तो पुरूष मिपाकरांना बघायची अनुमती नाही ? अनाहिता निवडक लेखन सर्वांसाठी खुलं करायला हरकत नाही. की अनाहिता सदर / विभाग मिपावरून काढून टाकला आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिता ठाकूर

मिसळपाव वर एखाद्या विषयासंबंधी लेख कसा शोधायचा?

नपा
Tue, 02/17/2026 - 17:47 नवीन
यावर यापूर्वी ही चौकशी झालेली आहे पण शोध कसा करावा हे काही कळले नाही. "शोधा" असा पर्याय संकेतस्थळावर देता येऊ शकतो या बाबत तज्ञ मिपा तांत्रिक मंडळींनी योग्य ती उपाययोजना करावी असे वाटते. जर दुसऱ्या पद्धतीने शोध शक्य असेल तर त्याची लिंक कृपया मदतपान सदरात टाकावी म्हणजे सगळ्यांना शोध घेणे सोपे जाईल. धन्यवाद
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा