✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

22 जानेवारीचा ऐतिहासिक दिवस: राम मंदिर प्राण प्रतिष्ठा

व
वेडा बेडूक यांनी
Tue, 01/02/2024 - 15:56  ·  लेख
लेख
भारताच्या इतिहासामध्ये 22 जानेवारी 2024 चा दिवस सुवर्ण अक्षरात नोंदवला जाईल, कारण या दिवशी अनेक वर्षांनी रामलल्ला अयोध्येतील भव्य राम मंदिरात निवास करतील. अयोध्येत आता श्रीरामाच्या अभिषेकाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. संपूर्ण जग या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार आहे. वाल्मिकी रामायणानुसार अयोध्येत प्रभू रामाचा जन्म झाला. अनेक वर्ष अयोध्येत रामाचं राज्य होतं. त्यानंतर प्रभू रामाने जल समाधी घेतल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर अनेक वर्षानंतर उज्जयिनीचा राजा विक्रमादित्य अयोध्येत आला होता. त्याने या ठिकाणी खोदकाम सुरू केलं. या ठिकाणी श्री रामाचं अस्तित्व असल्याचं दिसून आलं. त्यानंतर विक्रमादित्याने या ठिकाणी रामाचं मंदिर बांधलं. या मंदिरात नियमितपणे प्रभू रामाची पूजा होत होती. त्यानंतर अनेक राजे आले आणि गेले. 14व्या शतकात मुघलांची सत्ता आली. 1525मध्ये मुघल शासक बाबरचा सेनापती मीर बांकीने राम जन्मभूमीवरील मंदिर उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी मशीद बांधली. तीच बाबरी मशीद. तेव्हापासून मंदिर आणि मशिदीचा वाद सुरू होता. १८५३ साली पहिल्यांदा हिंदू समुदायातील लोकांनी बाबरी मशीद आहे ती जागा राम मंदिराची होती आणि तिथे बाबरी मशीद पाडून राम मंदिर बांधले जावे अशी मागणी ब्रिटिश सरकारकडे केली आणि त्याबाबत खटला देखील कोर्टात दाखल केला. तेंव्हा पहिल्यांदा अयोध्येत राम मंदिर आणि बाबरी मशीद या वादावरून दोन समुदायात दंगल झाली. १८५९ साली ब्रिटिश सरकारने अयोध्येतील वादग्रस्त जागेला कुंपण घातले आणि मशिदीत मुस्लिम लोकांना तर बाहेर रिकाम्या जागेत चौथऱ्यावर हिंदूंना पूजा करण्याची परवानगी आली. फेब्रुवारी १८८५ मध्ये महंत रघुवर दास यांनी फैजाबाद उपजिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर याचिका दाखल करून वादग्रस्त जागेवर मंदिर उभारण्याची परवानगी मागितली. पण बांधण्यासाठी अनुमती देण्यास कोर्टाने नकार दिला. २३ डिसेंबर १९४९ रोजी वादग्रस्त जागेवर प्रभू राम आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती आढळून आल्याने या वादाने नवे वळण घेतले. अयोध्येत राम प्रकट झाले असा दावा हिंदूंनी केला तर मुस्लिम लोकांनी यावर आक्षेप घेत कोणी तरी रात्रीच्या अंधारात मूर्ती आणून तिथे ठेवल्याचा दावा केला. तो वाद वाढू लागला म्हणून तत्कालीन सरकारने ‘वादग्रस्त वास्तू’ म्हणून शिक्का लावला आणि मशिदीला टाळे लावले. १६ जानेवारी १९५० रोजी गोपालसिंह विशारद यांच्याकडून मशिदीतून मुर्त्या हटवण्यात येऊ नयेत तसेच कोणत्या ही अडथळ्या शिवाय मुर्त्यांची पूजा सुरू ठेवण्यात यावी, अशी फैजाबाद दिवाणी न्यायालयात मागणी करण्यात आली. न्यायालयाने मुर्त्या हटवण्यात येऊ नयेत परंतु त्या टाळेबंदीत राहतील आणि केवळ पुजाऱ्याकडून पूजा सुरू राहील. जनता बाहेरून दर्शन घेईल, असे आदेश दिले. सन १९५९ मध्ये निर्मोही आखाड्याने कोर्टात मंदिर उभारणीसाठी दावा दाखल केला तर सन १९६१ मध्ये सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाने ही कोर्टात मशिदीचा दावा दाखल केला. सन १९८४ मध्ये विश्व हिंदू परिषदेने मंदिर निर्मितीसाठी एका समितीची स्थापना केली. १ फेब्रुवारी १९८६ रोजी फैजाबाद न्यायालयात वादग्रस्त ठिकाणी लावण्यात आलेले टाळे उघडून हिंदूंना पूजा करण्याचा अधिकार बहाल करण्याचे आदेश देण्यात आले. या निर्णयाला विरोध करत बाबरी मशीद संघर्ष समिती स्थापन करण्यात आली. तेंव्हा केंद्रात काँग्रेसचे सरकार होते आणि राजीव गांधी पंतप्रधान होते. १९८९ मध्ये विश्व हिंदू परिषदेचे नेते देवकीनंदन अग्रवाल यांनी मंदिराच्या दाव्या विषयक आणखीन एक खटला न्यायालयात दाखल केला आणि नोव्हेंबर १९८९ मध्ये केंद्र सरकार म्हणजेच तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या परवानगीने बाबरी मशिदीच्या काही अंतर दूर राम मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. सन १९९० साली भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा सुरू केली. त्यामुळे देशातील वातावरण ढवळून निघाले. लालू प्रसाद यादव यांच्या सरकारने बिहारमध्ये ही रथरात्रा रोखली आणि लाल कृष्ण अडवाणी यांना अटक केली. सन १९९१ मध्ये रथयात्रेचा भाजपला मोठा फायदा झाला. उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे सरकार आले आणि देश भरातून राम मंदिर उभारणीसाठी विटांची मोहीम सुरू झाली. ३० ते ३१ ऑक्टोंबर १९९२ रोजी धर्म संसदेत कारसेवेची घोषणा करण्यात आली आणि नोव्हेंबरमध्ये उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी मशिदीच्या संरक्षणाबाबत प्रतिज्ञापत्र सोपवलं. ६ डिसेंबर १९९२ रोजी लाखो कारसेवक अयोध्येत दाखल झाले ते ११:५० वाजता मशिदीच्या घुमटावर चढले जवळ पास ४:३० वाजेपर्यंत मशीद उदध्वस्त करण्यात आली. घाईघाईत एक लहान मंदिर तिथे उभारण्यात आले. बाबरी मशीद पाडली आणि त्याचे पडसाद देशभरात उमटले. गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि मुंबईत मोठ्या प्रमाणात जातीय दंगली झाल्या. या दंगलीत दोन हजार पेक्षा जास्त लोकांना आपले प्राण गमवावे लागले. तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही नरसिंह राव यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एम.एस लिब्रहान आयोगाची नियुक्ती केली. १ जानेवारी २००२ रोजी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी अयोध्या विभागाची स्थापना केली. हिंदू मुस्लिम या दोन्ही पक्षकारांशी संवाद साधण्याची व वाद मिटवण्याची जबाबदारी अयोध्या विभागावर सोपवली. वादग्रस्त जागेवर मंदिर कधी अस्तित्वात होते का? याच्या पडताळणीसाठी अलाहाबाद न्यायालयाने पुरातत्व विभागाला सन २००३ मध्ये उत्खनन करण्याचे आदेश दिले. बाबरी मशीद पाडली तिथे उत्खनन करण्यात आले, जिथे मशीद पाडली तिथे दहाव्या शतकातील राम मंदिराचे अवशेष आढळून आले व तेथे राम मंदिर होते हे पुराव्या साहित सिद्ध झाले आणि तसा अहवाल भारतीय पुरातत्व खात्याने कोर्टात सादर केला. ३० सप्टेंबर २०१० रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने अयोध्येतील वादग्रस्त जमीन राम मंदिर, निर्मोही आखाडा आणि सुन्नी वक्फ बोर्ड यांच्यात समसमान वाटण्याचा निर्णय दिला. या निर्णयाला सर्वांनीच सर्वोच्च न्यायालयात आवाहन दिले. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च सर्वोच्च न्यायालयाने ९ मे २०११ रोजी स्थगिती दिली. सन २०१७ लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्या सह भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक नेते यांच्यावर खटला चालवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. ८ फेब्रुवारी रोजी सुन्नी वक्फ बोर्डा तर्फे बाजू मांडताना ज्येष्ठ वकील राजीव धवन यांनी सुप्रीम कोर्टात या प्रकरणाची सुनावणी नियमित व्हावी अशी विनंती केली. ती विनंती कोर्टाने फेटाळली. १९९४ मध्ये इस्माईल फारुखी विरुद्ध भारतीय संघ यांच्यातील खटल्यात दिलेल्या निकलाचा फेरविचार व्हावा व हे प्रकरण घटनापीठाकडे पाठवण्यात यावे अशी मागणी राजीव धवन यांनी केली. ती मागणी देखील सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली. सर्वोच्च न्यायालयाच्या संविधानिक पीठाने हिंदू पक्षाच्या बाजूने निकाल देत संपूर्ण वादग्रस्त जमीन राम मंदिरासाठी दिली. सोबतच मुस्लिम पक्षाला वादग्रस्त जमिनीपासून दूर पाच एकर जमीन मशीद उभारणीसाठी देण्याचा निर्णय दिला. ५ ऑगस्ट रोजी राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साहित १७५ जणांना सोहळ्यासाठी आमंत्रण देण्यात आले होते. अशा प्रकारे प्रदीर्घ संघर्षानंतर शेवटी प्रभू श्रीराम यांच्या जन्मभूमीत त्यांचे मंदिर उभारले जात आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारी रोजी घरोघरी श्री राम ज्योती प्रज्वलित करून दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. "हा ऐतिहासिक क्षण सुदैवाने आपल्या सर्वांच्या जीवनात आला आहे. या निमित्ताने सर्व 140 कोटी देशवासीयांनी 22 जानेवारी रोजी आपल्या घरी श्री राम ज्योती प्रज्वलित करून दिवाळी साजरी करावी", असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. प्रभु श्रीरामाच्या आशीर्वादाने आपणा सर्वांच्या आयुष्यातील अंधःकार दूर होवो आणि लौकरच रामराज्य येवो ही प्रार्थना! ||जय श्रीराम||
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
59953 वाचन

💬 प्रतिसाद (199)

प्रतिक्रिया

हायला

सुबोध खरे
गुरुवार, 01/18/2024 - 20:51 नवीन
हायला चाचा नेहरुंकडे आय आय टी , एम्स बांधायला पैसे होते का? मग नेहमी तुम्ही कशाची दुहाई देत आला आहात? तुम्ही बांधा आणखी एक भव्य मंदिर मूळ जागेवर तुम्हाला कुणी थांबवलंय
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

चाचा नेहरुंकडे आय आय टी ,

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 01/18/2024 - 21:39 नवीन
चाचा नेहरुंकडे आय आय टी , एम्स बांधायला पैसे होते का?
चाचा नेहरूंनी आय आयटी आय आय एम्स बांधले असा दावा मी कधीही केला नाही. बाकी चाचा नेहरूंकडे तेवढे पैसे होते बांधण्यासारखे. पण तुम्ही मोदी मंदिर बांधताहेत असा दावा केला ही अपेक्षा नव्हती तुमच्याकडून. तुम्ही बांधा आणखी एक भव्य मंदिर मूळ जागेवर तुम्हाला कुणी थांबवलंय जागा ताब्यात द्या हिंदूंच्या. आम्ही हिंदू समर्थ आहोत ममूळ जागेवर मंदिर बांधायला भव्य नसलं तरी छोटसं बांधू कारण आमची आस्था त्या जागेशी आहे. जिथे मस्जीद तिथेच मंदिर बांधून दाखवल्याने आम्हा हिंदूंचा अहंकार सुखावेल. पण कोणाच्या भितीने मूळ बाबरीच्या जागी मंदिर न बांधता तिसरीकडेच बांधण्यात आलंय?? आम्हा हिंदूंची एवढी मोठी फसवणूक का करण्यात आली?? मीर बांकीनेही न घाबरता मंदिर पाडून बरोबक त्या जागीच मशीद बनवली पण आज असं काय घडलं की हिंदूंची फसवणूक करून मंदिर दुसरीकडे बांधण्यात आलंय??
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

मंदिर दुसरीकडे बांधण्यात आलंय

वामन देशमुख
गुरुवार, 01/18/2024 - 21:54 नवीन
मंदिर दुसरीकडे बांधण्यात आलंय??
पुरावे? लिंका? दुवे? की नेहमीप्रमाणे हवेत बाण?
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

भयंकर मुर्खपणा चालु आहे.

Trump
गुरुवार, 01/18/2024 - 23:40 नवीन
चाचा नेहरूंनी आय आयटी आय आय एम्स बांधले असा दावा मी कधीही केला नाही. बाकी चाचा नेहरूंकडे तेवढे पैसे होते बांधण्यासारखे. पण तुम्ही मोदी मंदिर बांधताहेत असा दावा केला ही अपेक्षा नव्हती तुमच्याकडून.
भयंकर मुर्खपणा चालु आहे. श्री नेहरु यांनी स्वत:चे खाजगी पैसे वापरले होते का? सरकारी काम करण्यासाठी खाजगी पैसे वापरणे अपेक्षित आहे का?
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

हिंदूंची फसवणूक करून मंदिर

सुबोध खरे
Fri, 01/19/2024 - 09:47 नवीन
हिंदूंची फसवणूक करून मंदिर दुसरीकडे बांधण्यात आलंय भुजबळ बुवा अचाट अफाट आणि भंपक लिहिण्यात तुमचा हात कुणी धरू शकणार नाही तुम्ही जाऊन पाहिलंय का किंवा खात्री केली आहे का ? मंदिर कुठे बांधलंय ते ? बिनबुडाचे लेखन लिहिण्यापूर्वी थोडा~सा तरी विचार करत जा
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

मी आधीच सांगीतलंय की संशोधन

अमरेंद्र बाहुबली
Fri, 01/19/2024 - 09:51 नवीन
मी आधीच सांगीतलंय की संशोधन चाललंय, लवकरच सत्य बाहेर येईल. नी “हे खरं असेल तर “ असंही बोललोय. तुम्हीच मला मूळ जागेवर जाऊन मंदिर बांधा असं सांगीतलं ह्याचा अर्थ तुम्हाला खात्री आहे की मंदिर मूळ जागेवर नाही.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

श्री मोदी जर दुसरीकडेच मंदिर

सुबोध खरे
Fri, 01/19/2024 - 10:24 नवीन
श्री मोदी जर दुसरीकडेच मंदिर बांधत असतील तर तुम्ही बांधा आणखी एक भव्य मंदिर मूळ जागेवर.
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

फेक न्युज आहे.

कॉमी
गुरुवार, 01/18/2024 - 12:58 नवीन
फेक न्युज आहे.
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

फेक न्युज आहे.

वामन देशमुख
Fri, 01/19/2024 - 10:08 नवीन
फेक न्युज आहे. सहमत. मंदिराचा जागाबदल ही खरंच फेक न्युज आहे. --- रच्याक, अमरेंद्र बाहुबली साहेब, तुम्ही कॉमी या ऐडीचे डुआयडी आहेत हे खरे असेल तर तुमचा हा प्रतिसाद आणि इतर प्रतिसाद्स यांत विसंगती आहे. मी आधीच सांगतो आहे की संशोधन चाललंय, लवकरच सत्य बाहेर येईल. नी “हे खरं असेल तर “ असंही बोलतोय.
↩ प्रतिसाद: कॉमी

?

कॉमी
Fri, 01/19/2024 - 11:29 नवीन
?
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

:)

कॉमी
Fri, 01/19/2024 - 11:52 नवीन
तुमचे संशोधन चालू दे, पण बेसिक गल्लत दिसती आहे. बघितले तर दिसते माझा आयडी २ वर्ष जुना आहे, आणि बाहुबली हा आयडी ६ वर्षे. असलाच तर माझा ड्यु आयडी असणार. तुमच्या शोधाच्या पहिल्या पब्लिक स्टेटमेंट मध्ये गल्लत असावी ? काळजीपूर्वक करा हो. मलाच माझ्यावरचा रिपोर्ट फॅक्ट चेक करायला लागतोय.
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

अमरेंद्र बाहुबली साहेब,

Trump
Fri, 01/19/2024 - 12:45 नवीन
अमरेंद्र बाहुबली साहेब, तुम्ही कॉमी या ऐडीचे डुआयडी आहेत हे खरे असेल तर तुमचा हा प्रतिसाद आणि इतर प्रतिसाद्स यांत विसंगती आहे. मी आधीच सांगतो आहे की संशोधन चाललंय, लवकरच सत्य बाहेर येईल. नी “हे खरं असेल तर “ असंही बोलतोय.
अमरेंद्र बाहुबली =|= कॉमी कशाला श्री अमरेंद्र बाहुबली यांना इतकी किंमत देताय !! गेल्याजन्मी त्यांना अशाच उद्योगांमुळे हाकलले होते. ह्या जन्मी सुधारतील अशी अपेक्षा होती, पण तीही फोल ठरली आहे.
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

अर्धवट मंदिराच्या

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 01/18/2024 - 22:02 नवीन
अर्धवट मंदिराच्या ऊद्घाटनासाठी अर्धवट दिवस सूटी दिलीय. https://www.tv9marathi.com/national/ram-mandir-half-day-holiday-announced-by-central-government-on-january-22-1119861.html/amp

दुपारी अडीच वाजेपर्यंतच्या सुट्टी कल्पना बघुन हसु आले.

Trump
गुरुवार, 01/18/2024 - 23:42 नवीन
22 जानेवारी 2024 रोजी दुपारी 2:30 वाजेपर्यंत आस्थापनेला सुट्टी असेल. देशभरात २२ जानेवारीला दिवाळी साजरी केली जाणार आहे. लोकांमध्ये मोठा उत्साह आहे.
दुपारी अडीच वाजेपर्यंतच्या सुट्टी कल्पना बघुन हसु आले. आधीच सरकारी लोक काम करत नाहीत. त्यात दुपारी अडीच नंतर काम कशाला करतील !!!
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

आधीच ऊल्हास त्यात फाल्गून मास

अमरेंद्र बाहुबली
Fri, 01/19/2024 - 12:57 नवीन
आधीच ऊल्हास त्यात फाल्गून मास. काहींचा लाच घ्यायचा वेळ बूडाला असेल.
↩ प्रतिसाद: Trump

'सकलांग देवता म्हणजे

अमरेंद्र बाहुबली
Fri, 01/19/2024 - 00:05 नवीन
'सकलांग देवता म्हणजे ज्यांच्या शरीराचे सकल (सर्व) अवयव आहेत, त्यांची दिव्यांग मंदिरात प्रतिष्ठापना कशी होऊ शकते?' असा प्रश्न शंकराचार्यांनी उपस्थित केला आहे.

असा प्रश्न शंकराचार्यांनी

वामन देशमुख
Fri, 01/19/2024 - 06:12 नवीन
असा प्रश्न शंकराचार्यांनी उपस्थित केला आहे.
भाऊ तोरसेकर: https://youtu.be/tAoDrumEcdU?si=OLG-knoXseOrANLz
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

भाऊ तोचतोचरेकर आहेत का अजून

अमरेंद्र बाहुबली
Fri, 01/19/2024 - 09:20 नवीन
भाऊ तोचतोचरेकर आहेत का अजून मला वाटलं गेले असतील. हे विकले गेलेले पत्रकार आहेत असे वाटते. सरकारच्या अनेक चूकीच्या गोष्टी आहेत पण त्यावर हे काहीही बोलत नाही अश्या लोकांच्या विडीओ ऐकणे म्हणजे वेळ वाया घालवणे. शंकराचार्यांना जाब विचारताहेत ह्यांची लायकी आहे का एवढी?? कुठे शंकराचार्य नी कुठे भाऊ? कुठे राजा भोज नी कुठे गंगू तेली??
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

2014नंतर प्रधानमंत्री 40जागी

विवेकपटाईत
Sun, 01/21/2024 - 18:18 नवीन
2014नंतर प्रधानमंत्री 40जागी 0 पत्रकार सोबत घेऊन जातात. विकलेले पत्रकार अत्यंत दुःखी आहे.
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

पंतप्रधानांनी विकलेल्या एका

आग्या१९९०
Sun, 01/21/2024 - 19:21 नवीन
पंतप्रधानांनी विकलेल्या एका तरी पत्रकाराचे नाव सांगता येईल का? पंतप्रधानांनी विकत घेतलेले पत्रकार किंवा चॅनेल म्हणायचे आहे का आपल्याला?
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

तुम्हाला त्याना काय म्हणायचं

सुबोध खरे
Mon, 01/22/2024 - 10:00 नवीन
तुम्हाला त्याना काय म्हणायचं ते स्पष्ट समजलेले आहे मग असं वेड पांघरून पेडगावला कशाला जाताय?
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

हा शंभरावा प्रतिसाद

वामन देशमुख
Fri, 01/19/2024 - 08:10 नवीन
' सारे वाद सोडून प्रभू श्री रामचंद्राला वंदन करू या. जय श्रीराम ।। जय जय श्रीराम ।। _/\_ '

जय श्रीराम! सारे वाद सोडून

अमरेंद्र बाहुबली
Fri, 01/19/2024 - 09:33 नवीन
जय श्रीराम! सारे वाद सोडून हिंदू म्हणून एकत्र येऊयात. शंकराचार्यांच्या मागे ऊभे राहुयात नी हा जो माकडखेळ चाललाय हिंदूंच्या भावना दुखावनारा त्याला विरोध करूयात, नी करनार्यांना त्यांची जागा दाखवूयात. जय श्रीराम.
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

|| जय श्रीराम ||

वामन देशमुख
Fri, 01/19/2024 - 09:40 नवीन
|| जय श्रीराम ||
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

जय शंबूक. जय वामनावतार.

अमरेंद्र बाहुबली
Fri, 01/19/2024 - 12:56 नवीन
जय शंबूक. जय वामनावतार.
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

अरे रे आता काय करायचं

जेपी
Sun, 01/21/2024 - 22:17 नवीन
https://youtu.be/--wljK-jDzM?si=sbr-KjtA62rpeQot
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

भुजबळ बुवा

सुबोध खरे
Mon, 01/22/2024 - 10:04 नवीन
भुजबळ बुवा तुमच्या अविमुक्तेश्वर शंकराचार्यानी आता घुमजाव करून श्री मोदींना पाठिंबा दिलाय. आता तुम्ही कुणाच्या तोंडाकडे पाहणार?
↩ प्रतिसाद: जेपी

कदाचित इंडिक गटबंधन जिंकेल.

विवेकपटाईत
Fri, 01/19/2024 - 21:28 नवीन
कदाचित इंडिक गटबंधन जिंकेल. तिथे मूर्ती नसेल तर काही न काही आरोप लावून उदा. ६५ एकरच्या जागेवर विवाद उपस्थित करून, इत्यादी इत्यादी, न्यायालयातून स्टे आणून राम मंदिराचे काम बंद करु शकतो. यासाठी नाना युक्त्या केल्या. आधी चार शंकराचार्य. शारदा आणि शृंगेरी पीठ ने तत्काळ खंडन केले. एक शंकराचार्य. पुरी ने ही विरोध नसल्याचे सांगितले. उरले फक्त घोर मोदी विरोधी स्वरूपानंद चे उत्तराधिकारी. मग मुहुर्त अर्धवट निर्माण इत्यादी. बाकी आपल्या देशात अधिकांश जागी आधी मूर्ती स्थापना होते मग मंदिर निर्माण होते. सोमनाथ मंदिर ही १९६५ मध्ये पूर्ण झाले होते. दक्षिणेतील मंदिरे पूर्ण व्हायला दोनशे वर्ष ही लागण्याचे उदाहरण आहे. बाकी आता रामलला स्थापित झाले आहे। दीडशे परंपरे चे ४००० साधू संत, बौद्ध जैन सिख सहित इतर धर्मीय ही येनार। बाकी 22 ताटखेला आम्ही फटाके फोड़ू, मिठाई वाटू, कालोनित भंडारा होणार. बर्णाल खपत ही वाढेल.

ते ठिकाय. पण कार्यक्रम “ऊरकला

अमरेंद्र बाहुबली
Fri, 01/19/2024 - 21:38 नवीन
ते ठिकाय. पण कार्यक्रम “ऊरकला” जातोय असाच फिल येतोय. हिंदूंतून ऊत्साह मावळलाय. इतक्या विरोधी बातम्या येताहेत. कार्यक्रम हिंदूंचा राहीलाच नाहीये.
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

कार्यक्रम फक्त हिंदूंचा नाही

विवेकपटाईत
Sun, 01/21/2024 - 18:17 नवीन
कार्यक्रम फक्त हिंदूंचा नाही.जो व्यक्ती या देशाला मातृभूमी मानतो.त्या सर्वांचा हा स्वाभिमानी सोहळा आहे.
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

राममंदिर उदघाटनामुळे गावातील

आग्या१९९०
Fri, 01/19/2024 - 22:03 नवीन
राममंदिर उदघाटनामुळे गावातील (देशातील म्हणा हवं tar) शेम्बडी पोरं सुद्धा शंकराचाऱ्यांना विरोध करू लागली आहेत. नक्कीच रामराज्य अवतरणार.

खिक्क.

अमरेंद्र बाहुबली
Fri, 01/19/2024 - 22:15 नवीन
खिक्क.
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

धाग्याने शतक गाठलाय. त्यामुळे

जेपी
Fri, 01/19/2024 - 23:27 नवीन
धाग्याने शतक गाठलाय. त्यामुळे सर्वांचा सत्कार मंगल अक्षता देऊन करण्यात येत आहे जय श्रीराम.!

अक्षता केव्हा वाटतात?

अमरेंद्र बाहुबली
Sat, 01/20/2024 - 00:44 नवीन
अक्षता केव्हा वाटतात?
↩ प्रतिसाद: जेपी

अक्षता?

सर टोबी
Sat, 01/20/2024 - 14:25 नवीन
सत्तरच्या दशकात वि आ बुवा वगैरे लेखक रतिब घालायचे. अशाच त्यांच्या किंवा दुसऱ्या कुणाच्या तरी लेखात कल्पना केली होती कि ब्रह्मवृंद घटस्फोट घडवून आणण्याचा पण विधी शोधून काढतील. आज त्याची आठवण होतीय. मुर्तीच्या प्रतिष्ठापणा करतांना अक्षता? पण झाली ना चांदी ज्या लोकांनी हि शक्कल शोधून काढली त्यांची. सचिन तेंडुलकर, माधुरी दीक्षित भरात असतांना त्यांच्या पाडवा सेलेब्रेशनचे फोटो, निव्वळ चटपटीत वाचण्यासाठी असणाऱ्या, पुरवण्यांमध्ये यायचे. त्यात हि मंडळी गुढीची पुजा करायची. गुढीची पूजा? कोणत्याही शुभकार्यात तोरण उभारतो पण त्यांची फुलं-अक्षता यांनी पुजा करतो का आपण? तोच न्याय गुढीचा. तोरणाबरोबरीने सज्ज्यामध्ये उभारली जाते ती गुढी. तिची कशी काय "पूजा" होऊ शकते? हे पाहून बायकोला गमतीने म्हटले आता बघ काही दिवसांनी गुढीची आरतीपण तयार होईल. आणि काय आश्चर्य? मागच्या काही वर्षांपासून पाडव्याच्या अंकात व्यवस्थित गुढीच्या षोडपोचार पूजेचा विधी येतो. त्यात कधीतरी "घराला घरपण देणारे" किंवा "नात्यांचा गोडवा वाढवणाऱ्या" मंडळींनी आरती पण टाकली होती असं आठवतंय. गुढी उभारण्यासाठी किट येईल तेव्हा कडुलिंबाच्या आणि आंब्यांच्या झाडांची काही खैर नाही. नुकताच येऊ घातलेला पाला, कडुलिंबाचा फुलोरा, आणि आंब्याच्या डहाळ्या यांची सुसाट कत्तल होईल.
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

लई झ्याक ....

नठ्यारा
Sat, 01/20/2024 - 16:36 नवीन
येकदम झ्याक. आता बादशाह आलमगीर औरंगजेबाने दिलेल्या खिलतींवर लेख येउद्या. आणि नंतर बादशहा-ए-आलम अकबर यांनी फुंकर मारून पवित्र केलेल्या पाण्यावरही असाच रंजक मजकूर टाका. -नाठाळ नठ्या
↩ प्रतिसाद: सर टोबी

गापै, तुम्ही फर टोपी आयडीला सिरिअसली घेता काय?

रंगीला रतन
Sat, 01/20/2024 - 17:40 नवीन
गापै, तुम्ही फर टोपी आयडीला सिरिअसली घेता काय? आम्ही तुम्हाला पण सिरिअसली घेत नाही :=)
↩ प्रतिसाद: नठ्यारा

शब्द रुपी, अक्षदा मिळाल्या...

मुक्त विहारि
Sat, 01/20/2024 - 13:13 नवीन
धन्यवाद.. जय श्रीराम....
↩ प्रतिसाद: जेपी

अभ्यास बुडाला तर रामलल्लाही

अमरेंद्र बाहुबली
Sat, 01/20/2024 - 16:45 नवीन
अभ्यास बुडाला तर रामलल्लाही खुश होणार नाही, सावित्रीच्या लेकींनी नाकारली प्राणप्रतिष्ठेची सुट्टी. - बातमी. केंद्रीय कर्मचार्यांनी काहीतरी शिकावं लहानग्यांकडून. जरा जनाची नाहीतर मनाची तरी वाटू द्यावी.

अभ्यासासाठी नाही असुर प्रभाव

विवेकपटाईत
Sun, 01/21/2024 - 18:15 नवीन
अभ्यासासाठी नाही असुर प्रभाव असल्याने नाकारली सुट्टी.पण मुली उत्सव सोहळा साजरा करणारच.
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

काल...

वेडा बेडूक
Tue, 01/23/2024 - 15:51 नवीन
रामबाळाच्या (राम लल्ला) मूर्तीची रामजन्मभूमी वरच्या मंदिरात विधीवत प्राणप्रतिष्ठा झाली... स्वप्नपूर्ती झाल्यासारखे वाटले! आमच्या परिसरात सर्वांचा उत्साह ओसंडून वाहत होता. शंकराचार्य यांचा विरोध कुणी मनावर घेतलेला दिसला नाही. इथली चर्चा वाचल्यानंतर मी माझ्या काही शेजार्यांशी बोललो. त्या सर्वांचं म्हणणं, लौकरात लौकर मंदिरात राम लल्ला ची स्थापना करा, उशीर करु नका. लोक तर नातेवाईकांच्या लग्नात पण मानापमानावरुन खुस्पट काढतात. तिक्डे लक्ष न देता आप्ल्या मंगल कार्या कडे लक्ष द्यायचं. मला पटलं. जय श्रीराम!

ते शेजारी मुहूर्त पाहतात की

अमरेंद्र बाहुबली
Tue, 01/23/2024 - 15:57 नवीन
ते शेजारी मुहूर्त पाहतात की असंच ऊठसूठ केव्हाही मंगलकार्य करत सूटतात??
↩ प्रतिसाद: वेडा बेडूक

लोक तर नातेवाईकांच्या लग्नात पण मानापमानावरुन खुस्पट काढतात.

मुक्त विहारि
Tue, 01/23/2024 - 17:29 नवीन
सहमत आहे... त्यामुळेच, माझ्या मोठ्या मुलाच्या लग्नात, अशा असुर वृत्तींना, दूरच ठेवले होते....आमंत्रण दिले नाही... शूभ कार्यात विघ्न आणणे, ह्या पलीकडे, अशा लोकांना काही दिसत नाही...
↩ प्रतिसाद: वेडा बेडूक

आमच्या गावातील आराम हा राम

आग्या१९९०
Tue, 01/23/2024 - 18:06 नवीन
आमच्या गावातील आराम हा राम आहे असे मानणाऱ्या गावकऱ्यांनी रामप्रतिष्ठतेचा सोहळा दिवसभर साजरा केला. मी सकाळी लवकर उठून गव्हाला पाणी भरले. एकदाही वीज गेली नाही. रामाची कृपा! संध्याकाळी घराच्या गॅलरीत म्युजिक सिस्टिम लावली. एकच गाणे रिपीट मोडवर मोठ्या आवाजात लावले. गाणे ऐकून रस्त्यावरील सगळे भावुकपणे माझ्याकडे बघत होते, काहीजण बेस्ट चॉईस म्हणून अंगठे दाखवत होते. ( त्यात उच्चशिक्षित, अशिक्षित, पुरुष, महिला सगळे आले ). गाणे होते. रामचंद्र कह गए सिया से ऐसा कलयुग आएगा हंस चुगेगा दाना दूनका कौआ मोती खाएगा हे राम!
↩ प्रतिसाद: वेडा बेडूक

खिक्क.

अमरेंद्र बाहुबली
Tue, 01/23/2024 - 20:37 नवीन
खिक्क.
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

राममंदिर कसे चुकीचे आहे

रानरेडा
Tue, 01/23/2024 - 19:54 नवीन
खरे तर मंदिरात बऱ्याच चुका आहेत. इंजिनिअरिंग मध्ये नोबेल मिळालेल्या प्रोफेसर अँजेला व्हाईट यांचे नाव तुम्ही ऐकले असेलच. त्यांनी हिंदू धर्म आणि मंदिर शास्त्र याचा सखोल अभ्यास केला. मंदिर निर्माण साठी क्षाज्ञवल्क्य स्मृती प्रमाण मानतात हे माहीत असेलच - तर अँजेला व्हाईट यांनी या आणि इतर ग्रंथाद्वारे राममंदिर कसे चुकीचे आहे ते सप्रमाण दाखवून दिले, दुर्दैवाने उन्मादात आंधळे झालेल्या मोदी सरकारने हे नाकारले!

खिक

अहिरावण
Tue, 01/23/2024 - 20:06 नवीन
खिक अन्जेला व्हाईट सर्च केले तर काय आले पहा... Angela Gabrielle White is an Australian pornographic film actress and director. She has been inducted into the AVN Hall of Fame and the XRCO Hall of Fame, and in 2020 became AVN's first three-time Female Performer of the Year winner. Wikipedia
↩ प्रतिसाद: रानरेडा

वाट्सअपवर आलेली प्रत्येक

अमरेंद्र बाहुबली
Tue, 01/23/2024 - 20:40 नवीन
वाट्सअपवर आलेली प्रत्येक गोष्ट खरी मानून लोक ढकलत सूटतात नी स्वतचे हसे करून घेतात. तसं झालंय ह्यांचं. ॲंजेला व्हाईट कोण हे जाणून न घेता दिलं ढकलून. :)
↩ प्रतिसाद: अहिरावण

खरे तर मंदिरात बऱ्याच चुका

वामन देशमुख
Wed, 01/24/2024 - 06:40 नवीन
खरे तर मंदिरात बऱ्याच चुका आहेत. इंजिनिअरिंग मध्ये नोबेल मिळालेल्या प्रोफेसर अँजेला व्हाईट यांचे नाव तुम्ही ऐकले असेलच. त्यांनी हिंदू धर्म आणि मंदिर शास्त्र याचा सखोल अभ्यास केला. मंदिर निर्माण साठी क्षाज्ञवल्क्य स्मृती प्रमाण मानतात हे माहीत असेलच - तर अँजेला व्हाईट यांनी या आणि इतर ग्रंथाद्वारे राममंदिर कसे चुकीचे आहे ते सप्रमाण दाखवून दिले, दुर्दैवाने उन्मादात आंधळे झालेल्या मोदी सरकारने हे नाकारले!
->
वाट्सअपवर आलेली प्रत्येक गोष्ट खरी मानून लोक ढकलत सूटतात नी स्वतचे हसे करून घेतात. तसं झालंय ह्यांचं. ॲंजेला व्हाईट कोण हे जाणून न घेता दिलं ढकलून. :)
सहमत
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

इंजिनीयरींगमधे नोबेल या

अहिरावण
Tue, 01/23/2024 - 20:07 नवीन
इंजिनीयरींगमधे नोबेल या वर्षीपासून सुरु केले का?
↩ प्रतिसाद: रानरेडा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा