✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

22 जानेवारीचा ऐतिहासिक दिवस: राम मंदिर प्राण प्रतिष्ठा

व
वेडा बेडूक यांनी
Tue, 01/02/2024 - 15:56  ·  लेख
लेख
भारताच्या इतिहासामध्ये 22 जानेवारी 2024 चा दिवस सुवर्ण अक्षरात नोंदवला जाईल, कारण या दिवशी अनेक वर्षांनी रामलल्ला अयोध्येतील भव्य राम मंदिरात निवास करतील. अयोध्येत आता श्रीरामाच्या अभिषेकाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. संपूर्ण जग या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार आहे. वाल्मिकी रामायणानुसार अयोध्येत प्रभू रामाचा जन्म झाला. अनेक वर्ष अयोध्येत रामाचं राज्य होतं. त्यानंतर प्रभू रामाने जल समाधी घेतल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर अनेक वर्षानंतर उज्जयिनीचा राजा विक्रमादित्य अयोध्येत आला होता. त्याने या ठिकाणी खोदकाम सुरू केलं. या ठिकाणी श्री रामाचं अस्तित्व असल्याचं दिसून आलं. त्यानंतर विक्रमादित्याने या ठिकाणी रामाचं मंदिर बांधलं. या मंदिरात नियमितपणे प्रभू रामाची पूजा होत होती. त्यानंतर अनेक राजे आले आणि गेले. 14व्या शतकात मुघलांची सत्ता आली. 1525मध्ये मुघल शासक बाबरचा सेनापती मीर बांकीने राम जन्मभूमीवरील मंदिर उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी मशीद बांधली. तीच बाबरी मशीद. तेव्हापासून मंदिर आणि मशिदीचा वाद सुरू होता. १८५३ साली पहिल्यांदा हिंदू समुदायातील लोकांनी बाबरी मशीद आहे ती जागा राम मंदिराची होती आणि तिथे बाबरी मशीद पाडून राम मंदिर बांधले जावे अशी मागणी ब्रिटिश सरकारकडे केली आणि त्याबाबत खटला देखील कोर्टात दाखल केला. तेंव्हा पहिल्यांदा अयोध्येत राम मंदिर आणि बाबरी मशीद या वादावरून दोन समुदायात दंगल झाली. १८५९ साली ब्रिटिश सरकारने अयोध्येतील वादग्रस्त जागेला कुंपण घातले आणि मशिदीत मुस्लिम लोकांना तर बाहेर रिकाम्या जागेत चौथऱ्यावर हिंदूंना पूजा करण्याची परवानगी आली. फेब्रुवारी १८८५ मध्ये महंत रघुवर दास यांनी फैजाबाद उपजिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर याचिका दाखल करून वादग्रस्त जागेवर मंदिर उभारण्याची परवानगी मागितली. पण बांधण्यासाठी अनुमती देण्यास कोर्टाने नकार दिला. २३ डिसेंबर १९४९ रोजी वादग्रस्त जागेवर प्रभू राम आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती आढळून आल्याने या वादाने नवे वळण घेतले. अयोध्येत राम प्रकट झाले असा दावा हिंदूंनी केला तर मुस्लिम लोकांनी यावर आक्षेप घेत कोणी तरी रात्रीच्या अंधारात मूर्ती आणून तिथे ठेवल्याचा दावा केला. तो वाद वाढू लागला म्हणून तत्कालीन सरकारने ‘वादग्रस्त वास्तू’ म्हणून शिक्का लावला आणि मशिदीला टाळे लावले. १६ जानेवारी १९५० रोजी गोपालसिंह विशारद यांच्याकडून मशिदीतून मुर्त्या हटवण्यात येऊ नयेत तसेच कोणत्या ही अडथळ्या शिवाय मुर्त्यांची पूजा सुरू ठेवण्यात यावी, अशी फैजाबाद दिवाणी न्यायालयात मागणी करण्यात आली. न्यायालयाने मुर्त्या हटवण्यात येऊ नयेत परंतु त्या टाळेबंदीत राहतील आणि केवळ पुजाऱ्याकडून पूजा सुरू राहील. जनता बाहेरून दर्शन घेईल, असे आदेश दिले. सन १९५९ मध्ये निर्मोही आखाड्याने कोर्टात मंदिर उभारणीसाठी दावा दाखल केला तर सन १९६१ मध्ये सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाने ही कोर्टात मशिदीचा दावा दाखल केला. सन १९८४ मध्ये विश्व हिंदू परिषदेने मंदिर निर्मितीसाठी एका समितीची स्थापना केली. १ फेब्रुवारी १९८६ रोजी फैजाबाद न्यायालयात वादग्रस्त ठिकाणी लावण्यात आलेले टाळे उघडून हिंदूंना पूजा करण्याचा अधिकार बहाल करण्याचे आदेश देण्यात आले. या निर्णयाला विरोध करत बाबरी मशीद संघर्ष समिती स्थापन करण्यात आली. तेंव्हा केंद्रात काँग्रेसचे सरकार होते आणि राजीव गांधी पंतप्रधान होते. १९८९ मध्ये विश्व हिंदू परिषदेचे नेते देवकीनंदन अग्रवाल यांनी मंदिराच्या दाव्या विषयक आणखीन एक खटला न्यायालयात दाखल केला आणि नोव्हेंबर १९८९ मध्ये केंद्र सरकार म्हणजेच तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या परवानगीने बाबरी मशिदीच्या काही अंतर दूर राम मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. सन १९९० साली भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा सुरू केली. त्यामुळे देशातील वातावरण ढवळून निघाले. लालू प्रसाद यादव यांच्या सरकारने बिहारमध्ये ही रथरात्रा रोखली आणि लाल कृष्ण अडवाणी यांना अटक केली. सन १९९१ मध्ये रथयात्रेचा भाजपला मोठा फायदा झाला. उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे सरकार आले आणि देश भरातून राम मंदिर उभारणीसाठी विटांची मोहीम सुरू झाली. ३० ते ३१ ऑक्टोंबर १९९२ रोजी धर्म संसदेत कारसेवेची घोषणा करण्यात आली आणि नोव्हेंबरमध्ये उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी मशिदीच्या संरक्षणाबाबत प्रतिज्ञापत्र सोपवलं. ६ डिसेंबर १९९२ रोजी लाखो कारसेवक अयोध्येत दाखल झाले ते ११:५० वाजता मशिदीच्या घुमटावर चढले जवळ पास ४:३० वाजेपर्यंत मशीद उदध्वस्त करण्यात आली. घाईघाईत एक लहान मंदिर तिथे उभारण्यात आले. बाबरी मशीद पाडली आणि त्याचे पडसाद देशभरात उमटले. गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि मुंबईत मोठ्या प्रमाणात जातीय दंगली झाल्या. या दंगलीत दोन हजार पेक्षा जास्त लोकांना आपले प्राण गमवावे लागले. तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही नरसिंह राव यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एम.एस लिब्रहान आयोगाची नियुक्ती केली. १ जानेवारी २००२ रोजी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी अयोध्या विभागाची स्थापना केली. हिंदू मुस्लिम या दोन्ही पक्षकारांशी संवाद साधण्याची व वाद मिटवण्याची जबाबदारी अयोध्या विभागावर सोपवली. वादग्रस्त जागेवर मंदिर कधी अस्तित्वात होते का? याच्या पडताळणीसाठी अलाहाबाद न्यायालयाने पुरातत्व विभागाला सन २००३ मध्ये उत्खनन करण्याचे आदेश दिले. बाबरी मशीद पाडली तिथे उत्खनन करण्यात आले, जिथे मशीद पाडली तिथे दहाव्या शतकातील राम मंदिराचे अवशेष आढळून आले व तेथे राम मंदिर होते हे पुराव्या साहित सिद्ध झाले आणि तसा अहवाल भारतीय पुरातत्व खात्याने कोर्टात सादर केला. ३० सप्टेंबर २०१० रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने अयोध्येतील वादग्रस्त जमीन राम मंदिर, निर्मोही आखाडा आणि सुन्नी वक्फ बोर्ड यांच्यात समसमान वाटण्याचा निर्णय दिला. या निर्णयाला सर्वांनीच सर्वोच्च न्यायालयात आवाहन दिले. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च सर्वोच्च न्यायालयाने ९ मे २०११ रोजी स्थगिती दिली. सन २०१७ लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्या सह भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक नेते यांच्यावर खटला चालवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. ८ फेब्रुवारी रोजी सुन्नी वक्फ बोर्डा तर्फे बाजू मांडताना ज्येष्ठ वकील राजीव धवन यांनी सुप्रीम कोर्टात या प्रकरणाची सुनावणी नियमित व्हावी अशी विनंती केली. ती विनंती कोर्टाने फेटाळली. १९९४ मध्ये इस्माईल फारुखी विरुद्ध भारतीय संघ यांच्यातील खटल्यात दिलेल्या निकलाचा फेरविचार व्हावा व हे प्रकरण घटनापीठाकडे पाठवण्यात यावे अशी मागणी राजीव धवन यांनी केली. ती मागणी देखील सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली. सर्वोच्च न्यायालयाच्या संविधानिक पीठाने हिंदू पक्षाच्या बाजूने निकाल देत संपूर्ण वादग्रस्त जमीन राम मंदिरासाठी दिली. सोबतच मुस्लिम पक्षाला वादग्रस्त जमिनीपासून दूर पाच एकर जमीन मशीद उभारणीसाठी देण्याचा निर्णय दिला. ५ ऑगस्ट रोजी राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साहित १७५ जणांना सोहळ्यासाठी आमंत्रण देण्यात आले होते. अशा प्रकारे प्रदीर्घ संघर्षानंतर शेवटी प्रभू श्रीराम यांच्या जन्मभूमीत त्यांचे मंदिर उभारले जात आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारी रोजी घरोघरी श्री राम ज्योती प्रज्वलित करून दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. "हा ऐतिहासिक क्षण सुदैवाने आपल्या सर्वांच्या जीवनात आला आहे. या निमित्ताने सर्व 140 कोटी देशवासीयांनी 22 जानेवारी रोजी आपल्या घरी श्री राम ज्योती प्रज्वलित करून दिवाळी साजरी करावी", असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. प्रभु श्रीरामाच्या आशीर्वादाने आपणा सर्वांच्या आयुष्यातील अंधःकार दूर होवो आणि लौकरच रामराज्य येवो ही प्रार्थना! ||जय श्रीराम||
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
59953 वाचन

💬 प्रतिसाद (199)

प्रतिक्रिया

तेच तर म्हणतोय. श्रीराम

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 01/11/2024 - 11:11 नवीन
तेच तर म्हणतोय. श्रीराम मंदिर समीतीने माती खाल्लीय. आलिया रणबिर ला निमंत्रण पण राष्ट्रपती नी शंकराचार्य नाहीत. कुणाच्या ईशार्यावर नाचतेय समीती काय माहीत ? आलीया भट आल्याने कार्यक्रम ऐतिहासीक होणार?? ख्या ख्या.
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

अपुर्ण मंदिरात प्राणप्रतिष्ठा

अमरेंद्र बाहुबली
Fri, 01/12/2024 - 10:03 नवीन
अपुर्ण मंदिरात प्राणप्रतिष्ठा करणे अयोग्य. - शंकराचारिय स्वामी अविमुक्त्श्वरानंद महाराज.

आतापर्यंत चुकीच्या पद्धतीने

अमरेंद्र बाहुबली
Fri, 01/12/2024 - 18:00 नवीन
आतापर्यंत चुकीच्या पद्धतीने आपल्याला राम फोटोमध्ये दाखवले गेले. निदान अयोध्येमध्ये उभारल्या जाणाऱ्या रामाच्या मंदिराच्या मूर्तीमध्ये तर मिशा असाव्यात, अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी अयोध्येमधील राममंदिर समितीला केली आहे.

आबा पुरावा द्या.

कर्नलतपस्वी
Mon, 01/15/2024 - 10:41 नवीन
रामाच्या मंदिराच्या मूर्तीमध्ये तर मिशा असाव्यात, अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी अयोध्येमधील राममंदिर समितीला केली आहे. प्रसार माध्यमातून कुठे प्रसारीत केलेले दिसत नाही. नाहीतर आतापर्यंत गदारोळ माजला असता. पुरावा दिला तर पुढे बोलेन.
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

https://marathi.abplive.com

अमरेंद्र बाहुबली
Mon, 01/15/2024 - 10:50 नवीन
https://marathi.abplive.com/news/maharashtra/lord-rama-in-the-ram-temple-should-have-a-mustache-sambhaji-bhide-says-795842/amp सांगली : प्रभू राम अतुलनीय, पूज्यनीय पुरुष दैवत होते. पण आतापर्यंतच्या फोटोंमध्ये राम-लक्ष्मणाला मिशा नव्हत्या. आतापर्यंत चुकीच्या पद्धतीने आपल्याला राम फोटोमध्ये दाखवले गेले. निदान अयोध्येमध्ये उभारल्या जाणाऱ्या रामाच्या मंदिराच्या मूर्तीमध्ये तर मिशा असाव्यात, अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी अयोध्येमधील राममंदिर समितीला केली आहे.
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

हा पुरावा विश्वसनीय नाही.

वामन देशमुख
Mon, 01/15/2024 - 11:03 नवीन
हा पुरावा विश्वसनीय नाही. त्यांची अनेकदा खोट्या बातम्या छापण्याची परंपरा आहे. एक - https://www.newsbharati.com/Encyc/2021/4/8/ABP-Maza-fake-news-.html दोन - https://www.facebook.com/Infonews24India/posts/morning-abp-majha-spreads-fake-news-that-govt-is-considering-reopening-railwaysd/116343026695460/?locale=hi_IN&paipv=0&eav=AfbZfB979oQGWFiiSOx11_I-vRQPVzkfXYOg5vWIAv5qbQV87Yd_tkuUO5eCui749vs&_rdr अर्थात, हा दावा इथे करणाऱ्याची तरी कुठे विश्वासार्हता आहे म्हणा!
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

मराठी ...

कर्नलतपस्वी
Mon, 01/15/2024 - 11:38 नवीन
मराठी बातमी चॅनल मधे फक्त प्रसाद काथे यांचा जय महाराष्ट्र कधी कधी बघतो. बाकीचे फक्त "उदो उदो ",करता आहेत.
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

अती बावचळलेले प्रोग्राम (एबीपी)

कर्नलतपस्वी
Mon, 01/15/2024 - 11:43 नवीन
बघत नाही.
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

नाशिकपासून मोदींनी जोरदार

अहिरावण
Sat, 01/13/2024 - 13:59 नवीन
नाशिकपासून मोदींनी जोरदार सुरवात केली. सर्व लोक खुश आहेत. राम नाम घेतले की राक्शस सोडल्यास सर्व जण खुश आनंदी होतात ह्याचा पुरावा मिळाला. श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम ! श्रीराम जय राम जय जय राम !

सर्व लोक खुश आहेत नक्की

अमरेंद्र बाहुबली
Sat, 01/13/2024 - 14:38 नवीन
सर्व लोक खुश आहेत नक्की कुणावर??
↩ प्रतिसाद: अहिरावण

मंदिर मूळ बाबरीच्या जागेपासून

अमरेंद्र बाहुबली
Sat, 01/13/2024 - 16:31 नवीन
मंदिर मूळ बाबरीच्या जागेपासून ५०० मीटर अंतर दुरवर बनतंय असं कळालं. खर की काय??

ब्रेकिंग न्यूज

विवेकपटाईत
Sat, 01/13/2024 - 16:44 नवीन
ब्रेकिंग न्यूज असुरांचे रुदान आणि थयथयाट सर्वत्र सुरू आहे. सोशल मीडियावर बर्णालचा खप प्रचंड वाढत आहे. २२ तारखेला भारतात दिवाळी साजरी होणार. देशात रामराज्य येण्याची चिन्ह दिसू लागले आहे.

शंकराचार्य असुरात मोडतात का?

अमरेंद्र बाहुबली
Sat, 01/13/2024 - 16:57 नवीन
शंकराचार्य असुरात मोडतात का? :)
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

तीन शंकराचार्यांनी आशीर्वाद

विवेकपटाईत
Sat, 01/13/2024 - 18:39 नवीन
तीन शंकराचार्यांनी आशीर्वाद दिला आहे. एक स्वरुपानंदचे उत्तराधिकारी, ज्यांनी मोदी विरोधात २०१४ मध्ये वाराणसीत तळ ठोकला होता, फक्त द्वेषपायी मोदी आणि आरएसएसच्या लोकांचा विरोध करत आहे, मंदिराचा नाही. त्यांच्या हस्ते स्थापना व्हावी अशी त्यांची इच्छा त्यांच्या व्हिडिओत दिसून येते. बाकी श्रीरामांचे एक पूर्वज ही असुर प्रवृत्तीच्या अधीन होऊन राक्षस झाले होते.
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

शंकराचार्य का थयथयाट करताहेत?

अमरेंद्र बाहुबली
Sat, 01/13/2024 - 20:35 नवीन
शंकराचार्य का थयथयाट करताहेत? किती खोटं लिहीनार??
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

तीन शंकराचार्यांनी आशीर्वाद

अमरेंद्र बाहुबली
Sat, 01/13/2024 - 20:35 नवीन
तीन शंकराचार्यांनी आशीर्वाद दिला आहे. किती खोटं लिहीनार?
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

शंकराचार्याबद्दल प्रेम आताच

धनावडे
Sat, 01/13/2024 - 18:44 नवीन
शंकराचार्याबद्दल प्रेम आताच का उफाळून आलाय लोकांचं कळत नाही, काँग्रेसच्या काळात त्यांना खोट्या आरोपाखाली अटक केलेली तेव्हा कुठ गेला होता राधासुता तुझा धर्म.
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

तेव्हा विरोध केलाच नव्हता

अमरेंद्र बाहुबली
Sat, 01/13/2024 - 20:36 नवीन
तेव्हा विरोध केलाच नव्हता लोकांनी??
↩ प्रतिसाद: धनावडे

तुमच्यासारख्या पुरोगाम्यानी

धनावडे
Sat, 01/13/2024 - 21:45 नवीन
तुमच्यासारख्या पुरोगाम्यानी नव्हता केला एवढं नक्की, जे आता त्याच्या नावाने बोंबा ठोकतायत आणि मंदिर म्हणजे ब्राम्हणांची सोय अस म्हणणारे ब्राम्हण असणाऱ्या शंकराचार्याच का म्हणून ऐकतायत, आणि तीन शंकराचायानी पाठिंबा दिलाय, आता ते तुम्ही तुमच्या सोईनुसार ऐकल / वाचल नसेलच.
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

बाब्बो. मी हिंदूत्ववादीचा

अमरेंद्र बाहुबली
Sat, 01/13/2024 - 22:22 नवीन
बाब्बो. मी हिंदूत्ववादीचा पुरोगामी डिक्लेर झालो?? तेही शंकराचार्यांचं समर्थन करून?? व्वा. सर्टीफीकेट वाटावे तर तुम्हीच. बाकी चारही शंकराचार्यांनी बहिष्कार टाकूनही नवीन तीन पाठिंबा देणारे शंकाराचार्य कुठून आणलेत?? की तुमिही सर्टीफीकेट देऊन नवीन तीन शंकाराचार्य घोषीत केले?? माझ्या अल्पमतीनूसार आम्हा हिंदूंचे ४ शंकाराचार्य आहेत तुमचा धर्म कोणता नी त्यातले हे नवीन तीन शंकाराचार्य कोण?? :)
↩ प्रतिसाद: धनावडे

जाऊ दे कुणाला सांगतोय,

धनावडे
Sat, 01/13/2024 - 23:58 नवीन
जाऊ दे कुणाला सांगतोय, तुमच्याशी चर्चा करणे आणि दगडावर डोक आपटणे एकच आहे, असो लवकर बरे व्हा .
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

ऊत्तर नसलं की मिपाकर असंच

अमरेंद्र बाहुबली
Sun, 01/14/2024 - 01:02 नवीन
ऊत्तर नसलं की मिपाकर असंच करतात. छान छान. प्रगती आहे तर.
↩ प्रतिसाद: धनावडे

शंकराचार्याना पसंत नाही

सुबोध खरे
गुरुवार, 01/18/2024 - 12:30 नवीन
शंकराचार्याना पसंत नाही म्हणून मंदिराचे बांधकाम आणि प्राणप्रतिष्ठा काही थांबणार नाही. नाहीतरी त्यांना फारसं कुणी विचारत नाहीच. काळ पुढेच जाणार आहे.
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

आम्हा हिंदूंसाठी “कुणाही“

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 01/18/2024 - 12:56 नवीन
आम्हा हिंदूंसाठी “कुणाही“ पेक्षा शंकराचार्य महत्वाचे. त्यांनी खोट दाखवली म्हणून ते कमी महत्वाचे होत नाहीत. ऊलट “कुणालाही” न भिता त्यांनी हिंदूंची बाजू घेऊन ठाम ऊभे राहीलेत. तियामुळे आम्हा हिंदूंत त्यांचा आदर दुनावलाय.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

कुणाला कशाचं, बोडकीला केसाचं.

वामन देशमुख
गुरुवार, 01/18/2024 - 13:02 नवीन
कुणाला कशाचं, बोडकीला केसाचं.
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

भलतेच विनोदी तुम्ही.

Trump
गुरुवार, 01/18/2024 - 17:58 नवीन
आम्हा हिंदूंसाठी “कुणाही“ पेक्षा शंकराचार्य महत्वाचे.
भलतेच विनोदी तुम्ही. आजुबाजुच्या १०० हिंदु घ्या आणि शंकराचार्यांची नावे विचारा. बहुसंख्यांना ती माहिती नसतील.
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

पण आता कळलंय. :)

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 01/18/2024 - 18:06 नवीन
पण आता कळलंय. :)
↩ प्रतिसाद: Trump

तुम्हाला तरी गुगल न करता चार

सुबोध खरे
गुरुवार, 01/18/2024 - 18:58 नवीन
तुम्हाला तरी गुगल न करता चार शंकराचार्यांची नावं आणि त्यांची पीठं कुठे आहेत ते सांगता येईल का? उगाच फुक्या कशाला मारताय? आणि यातील स्वरुपानंद कोणत्या पिठाचे आहेत हे पण सांगा
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

जे.....

कर्नलतपस्वी
Sat, 01/13/2024 - 23:56 नवीन
जे येतील त्यांच्या बरोबर जे नाही येणार त्यांच्या शिवाय. मी तर घरूनच, म्हणजे वाडीतुनच संजय चक्षू(TV) द्वारे पुजा अटेंड करणार.

https://youtu.be/UJXytBX-IDk

शाम भागवत
Sun, 01/14/2024 - 11:39 नवीन
https://youtu.be/UJXytBX-IDk?si=ztP-dUfNyUfjjdhe

https://youtu.be/UJXytBX-IDk

शाम भागवत
Sun, 01/14/2024 - 11:39 नवीन
https://youtu.be/UJXytBX-IDk?si=ztP-dUfNyUfjjdhe

राममंदिर/मशिद आल्याने माझ्या

सालदार
Mon, 01/15/2024 - 12:02 नवीन
राममंदिर/मशिद आल्याने माझ्या वैयक्तिक आयूष्यात तसुभरही फरक (पॉझिटीव) पडनार नाहीये. त्यामुळे माझ्यासाठी हा दिवस ऐतिहासिक नाही.

दिवाळी तर अजिबातच नाही.

सालदार
Mon, 01/15/2024 - 12:04 नवीन
दिवाळी तर अजिबातच नाही. आर्थिक परिस्थीती खुप खराब आहे.
↩ प्रतिसाद: सालदार

अनेक हिंदूंचं हेच मत आहे.

अमरेंद्र बाहुबली
Mon, 01/15/2024 - 12:25 नवीन
अनेक हिंदूंचं हेच मत आहे. ऐतिहासीक खरोखर नाहीये. जे लोक ऐतिहासीक सांगताहेत त्यांचा हेतू लपून नाही. बाकी तुमच्या सारख्या अनेकांची आर्थीक परिस्थीती खराब आहे पण सरकराला मंदिराची अधिक पडलीय.
↩ प्रतिसाद: सालदार

आमच्या सारख्यांच्या आर्थिक

सुबोध खरे
गुरुवार, 01/18/2024 - 12:32 नवीन
आमच्या सारख्यांच्या आर्थिक स्थिती उत्तम आहे तेंव्हा मंदिर व्हायलाच हवंय. मग बाकी ज्यांना रडारड करायची आहे त्यांना रडू द्या. हाथी चलत अपनी चाल कुतर भुकत हो तो भूकवा दो!
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

पण खर्च सरकार करतच नाही

धनावडे
Tue, 01/23/2024 - 17:22 नवीन
पण खर्च सरकार करतच नाही मंदिरासाठी, मिळालेल्या देणगीतून होतय ते बांधकाम.
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

खुळे कि काय ?

कपिलमुनी
Wed, 01/24/2024 - 14:51 नवीन
एवढी बेधडक विधाने कसे काय करतात ??
↩ प्रतिसाद: धनावडे

आता

तिमा
Mon, 01/15/2024 - 12:09 नवीन
मग आता यापुढे, रामाचा जन्म रामनवमीच्या ऐवजी २२ जानेवारीला साजरा करणार का ?

हिंदूंसाठी रामनवमी हाच राहनार

अमरेंद्र बाहुबली
Mon, 01/15/2024 - 12:25 नवीन
हिंदूंसाठी रामनवमी हाच राहनार. २२ जानेवारी हा कोणासाठी असेल हे सर्वाना माहीतीय. :)
↩ प्रतिसाद: तिमा

रामजन्म आणि मंदिरातील

सुबोध खरे
गुरुवार, 01/18/2024 - 12:33 नवीन
रामजन्म आणि मंदिरातील प्राणप्रतिष्ठा यांचा संबंध नाही. उगाच अब्दालीची शेंडी बाजीरावाला लावू नका
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

काय योगदान विचारणाऱ्या नारायण

अमरेंद्र बाहुबली
Mon, 01/15/2024 - 15:01 नवीन
काय योगदान विचारणाऱ्या नारायण राणेंना शंकराचार्यांचं सडेतोड उत्तर Look at this post on Facebook https://www.tv9marathi.com/politics/shankaracharya-avimukteshwaranand-slams-narayan-rane-over-ram-temple-issue-1116817.html?fbclid=IwAR2OOE_C-GDPQQtmESD9ZhhEg6Bv0RfmPCnjDqgOtel2pUmMvj75o1nCQs8_aem_AQjU4kwTzGXnuDEiXz7b70_s2MHq_bdDllLD5jGguN7XJaltGvgKYp9ARNgNkZDHJ8s हजारो वर्षापासून देश गुलामित होता. विधर्मियोंच्या नियंत्रणाखाली होता. पण तरीही आज सनातन धर्म टिकून आहे. नारायण राणे आपले माता-पिता, आजी-आजोबांसोबत सनातन धर्माच पालन करतायत, त्यामागे कुठली 100 वर्षांची संघटना किंवा 45 वर्षांचा पक्ष नाहीय. हे अडीच हजार वर्षांपासूनच्या शंकराचार्यांच्या परंपरेमुळे शक्य झालय” असं जगद्गुरु शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराजांनी म्हटलय. व्वाह. शंकराचार्य चांगलीच धुलाई करताहेत. :)

श्री अमरेंद्र बाहुबली, तुमचे शंकराचार्य प्रेम बघुन डोळे बघुन भर

Trump
Mon, 01/15/2024 - 15:45 नवीन
श्री अमरेंद्र बाहुबली, तुमचे शंकराचार्य प्रेम बघुन डोळे बघुन भरुन आले.
व्वाह. शंकराचार्य चांगलीच धुलाई करताहेत. :)
जसे तुमचे शंकराचार्य यांच्या ह्या विधानाला समर्थन आहे, तसे ते त्यांच्या सर्व मतांना आहे का?
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

श्री अमरेंद्र बाहुबली, तुमचे

अमरेंद्र बाहुबली
Mon, 01/15/2024 - 16:00 नवीन
श्री अमरेंद्र बाहुबली, तुमचे शंकराचार्य प्रेम बघुन डोळे बघुन भरुन आले. धन्यवाद. आमचं आमच्या धर्मावर नितातं प्रेम आहे. पण धर्माचा फायदा घेऊण वर धर्माचे नियम मोडून काही लोक जी चमकोगीरी करताहेत त्यावर शंकराचार्य प्रहार करताहेत ह्याला मात्र समर्थन आहे. धर्माच्या आड येनार्या नी धर्माचा गैरफायदा घेतला जातो तेव्हा शंकराचार्य हिंदूंसाठी ऊभे राहतात हे खरंच कौतूकास्पद आहे. कितीही ताकदवान असाल तरी शंकाराचार्यांपुढे व्याख्या विख्खी वूख्खूच. :)
↩ प्रतिसाद: Trump

राम मंदिर उभं राहिलं पण

अमरेंद्र बाहुबली
Mon, 01/15/2024 - 18:00 नवीन
राम मंदिर उभं राहिलं पण 'कारसेवक' उपेक्षित राहिला, आयुष्याच्या संध्याकाळी जगतोय हलाखीचं जीवन Look at this post on Facebook https://marathi.indiatimes.com/maharashtra/sangli/ram-mandir-consecration-ayodhya-story-of-karsevak-suresh-shelke-who-involved-in-ram-mandir-agitation/articleshow/106864817.cms?story=5

मंदिर मूळ बाबरी पासून ३ किमी

अमरेंद्र बाहुबली
Tue, 01/16/2024 - 11:17 नवीन
मंदिर मूळ बाबरी पासून ३ किमी अंतरावर बांधल्याच्या बातम्या आहेत काही ठिकाणी ५०० मीटर अंतरावर बांधल्याचा दावा केला जातोय. लोक गुगल मॅप छायाचित्रे प्रसारीत करताहेत, अजून संशोधन चाललंय. हे खरं असेल तर ही हिंदूंची घोर फसवणूक म्हणायला हवी.

हिंदूंची घोर फसवणूक

सुबोध खरे
गुरुवार, 01/18/2024 - 12:27 नवीन
हिंदूंची घोर फसवणूक तुमची पण घोर फसवणूक झाली का? आमची तर नाही झाली. मन्दिर अयोध्येत कुठेही बांधा आम्हाला चालेल
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

आमच्यासाठी रामजन्मभूमी ही

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 01/18/2024 - 12:54 नवीन
आमच्यासाठी रामजन्मभूमी ही बाबरीचा जागेवरचीच. कुणीही येऊन रामजन्मभूमी बदलत असेल तर ते हिंदूंना चालनार नाही.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

आमच्यासाठी रामजन्मभूमी ही

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 01/18/2024 - 12:54 नवीन
आमच्यासाठी रामजन्मभूमी ही बाबरीचा जागेवरचीच. कुणीही येऊन रामजन्मभूमी बदलत असेल तर ते हिंदूंना चालनार नाही.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

आमच्यासाठी रामजन्मभूमी ही

सुबोध खरे
गुरुवार, 01/18/2024 - 19:01 नवीन
आमच्यासाठी रामजन्मभूमी ही बाबरीचा जागेवरचीच हां मग श्री मोदी जर दुसरीकडेच मंदिर बांधत असतील तर तुम्ही बांधा आणखी एक भव्य मंदिर

मूळ जागेवर

हा का ना का आम्ही तुमच्या मंदिरालाही भेट देऊ आणि भरघोस देणगी पण देऊ
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

श्री मोदी जर दुसरीकडेच मंदिर

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 01/18/2024 - 19:07 नवीन
श्री मोदी जर दुसरीकडेच मंदिर बांधत असतील तर तुम्ही बांधा आणखी एक भव्य मंदिर मूळ जागेवर मंदिर मोदी बांधताहेत?? माझ्या माहीतीप्रमाणे दामोदरदास मोदी काही खुप श्रीमंत नव्हते की मोदीजींकडे इतके कोटी रूपये असतील मंदिर बांधायला.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा