भारताच्या इतिहासामध्ये 22 जानेवारी 2024 चा दिवस सुवर्ण अक्षरात नोंदवला जाईल, कारण या दिवशी अनेक वर्षांनी रामलल्ला अयोध्येतील भव्य राम मंदिरात निवास करतील. अयोध्येत आता श्रीरामाच्या अभिषेकाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. संपूर्ण जग या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार आहे.
वाल्मिकी रामायणानुसार अयोध्येत प्रभू रामाचा जन्म झाला. अनेक वर्ष अयोध्येत रामाचं राज्य होतं. त्यानंतर प्रभू रामाने जल समाधी घेतल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर अनेक वर्षानंतर उज्जयिनीचा राजा विक्रमादित्य अयोध्येत आला होता. त्याने या ठिकाणी खोदकाम सुरू केलं. या ठिकाणी श्री रामाचं अस्तित्व असल्याचं दिसून आलं. त्यानंतर विक्रमादित्याने या ठिकाणी रामाचं मंदिर बांधलं. या मंदिरात नियमितपणे प्रभू रामाची पूजा होत होती. त्यानंतर अनेक राजे आले आणि गेले. 14व्या शतकात मुघलांची सत्ता आली. 1525मध्ये मुघल शासक बाबरचा सेनापती मीर बांकीने राम जन्मभूमीवरील मंदिर उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी मशीद बांधली. तीच बाबरी मशीद. तेव्हापासून मंदिर आणि मशिदीचा वाद सुरू होता.
१८५३ साली पहिल्यांदा हिंदू समुदायातील लोकांनी बाबरी मशीद आहे ती जागा राम मंदिराची होती आणि तिथे बाबरी मशीद पाडून राम मंदिर बांधले जावे अशी मागणी ब्रिटिश सरकारकडे केली आणि त्याबाबत खटला देखील कोर्टात दाखल केला. तेंव्हा पहिल्यांदा अयोध्येत राम मंदिर आणि बाबरी मशीद या वादावरून दोन समुदायात दंगल झाली. १८५९ साली ब्रिटिश सरकारने अयोध्येतील वादग्रस्त जागेला कुंपण घातले आणि मशिदीत मुस्लिम लोकांना तर बाहेर रिकाम्या जागेत चौथऱ्यावर हिंदूंना पूजा करण्याची परवानगी आली.
फेब्रुवारी १८८५ मध्ये महंत रघुवर दास यांनी फैजाबाद उपजिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर याचिका दाखल करून वादग्रस्त जागेवर मंदिर उभारण्याची परवानगी मागितली. पण बांधण्यासाठी अनुमती देण्यास कोर्टाने नकार दिला.
२३ डिसेंबर १९४९ रोजी वादग्रस्त जागेवर प्रभू राम आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती आढळून आल्याने या वादाने नवे वळण घेतले. अयोध्येत राम प्रकट झाले असा दावा हिंदूंनी केला तर मुस्लिम लोकांनी यावर आक्षेप घेत कोणी तरी रात्रीच्या अंधारात मूर्ती आणून तिथे ठेवल्याचा दावा केला. तो वाद वाढू लागला म्हणून तत्कालीन सरकारने ‘वादग्रस्त वास्तू’ म्हणून शिक्का लावला आणि मशिदीला टाळे लावले. १६ जानेवारी १९५० रोजी गोपालसिंह विशारद यांच्याकडून मशिदीतून मुर्त्या हटवण्यात येऊ नयेत तसेच कोणत्या ही अडथळ्या शिवाय मुर्त्यांची पूजा सुरू ठेवण्यात यावी, अशी फैजाबाद दिवाणी न्यायालयात मागणी करण्यात आली. न्यायालयाने मुर्त्या हटवण्यात येऊ नयेत परंतु त्या टाळेबंदीत राहतील आणि केवळ पुजाऱ्याकडून पूजा सुरू राहील. जनता बाहेरून दर्शन घेईल, असे आदेश दिले.
सन १९५९ मध्ये निर्मोही आखाड्याने कोर्टात मंदिर उभारणीसाठी दावा दाखल केला तर सन १९६१ मध्ये सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाने ही कोर्टात मशिदीचा दावा दाखल केला.
सन १९८४ मध्ये विश्व हिंदू परिषदेने मंदिर निर्मितीसाठी एका समितीची स्थापना केली. १ फेब्रुवारी १९८६ रोजी फैजाबाद न्यायालयात वादग्रस्त ठिकाणी लावण्यात आलेले टाळे उघडून हिंदूंना पूजा करण्याचा अधिकार बहाल करण्याचे आदेश देण्यात आले. या निर्णयाला विरोध करत बाबरी मशीद संघर्ष समिती स्थापन करण्यात आली. तेंव्हा केंद्रात काँग्रेसचे सरकार होते आणि राजीव गांधी पंतप्रधान होते.
१९८९ मध्ये विश्व हिंदू परिषदेचे नेते देवकीनंदन अग्रवाल यांनी मंदिराच्या दाव्या विषयक आणखीन एक खटला न्यायालयात दाखल केला आणि नोव्हेंबर १९८९ मध्ये केंद्र सरकार म्हणजेच तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या परवानगीने बाबरी मशिदीच्या काही अंतर दूर राम मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. सन १९९० साली भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा सुरू केली. त्यामुळे देशातील वातावरण ढवळून निघाले. लालू प्रसाद यादव यांच्या सरकारने बिहारमध्ये ही रथरात्रा रोखली आणि लाल कृष्ण अडवाणी यांना अटक केली. सन १९९१ मध्ये रथयात्रेचा भाजपला मोठा फायदा झाला. उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे सरकार आले आणि देश भरातून राम मंदिर उभारणीसाठी विटांची मोहीम सुरू झाली.
३० ते ३१ ऑक्टोंबर १९९२ रोजी धर्म संसदेत कारसेवेची घोषणा करण्यात आली आणि नोव्हेंबरमध्ये उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी मशिदीच्या संरक्षणाबाबत प्रतिज्ञापत्र सोपवलं. ६ डिसेंबर १९९२ रोजी लाखो कारसेवक अयोध्येत दाखल झाले ते ११:५० वाजता मशिदीच्या घुमटावर चढले जवळ पास ४:३० वाजेपर्यंत मशीद उदध्वस्त करण्यात आली. घाईघाईत एक लहान मंदिर तिथे उभारण्यात आले. बाबरी मशीद पाडली आणि त्याचे पडसाद देशभरात उमटले. गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि मुंबईत मोठ्या प्रमाणात जातीय दंगली झाल्या. या दंगलीत दोन हजार पेक्षा जास्त लोकांना आपले प्राण गमवावे लागले. तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही नरसिंह राव यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एम.एस लिब्रहान आयोगाची नियुक्ती केली.
१ जानेवारी २००२ रोजी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी अयोध्या विभागाची स्थापना केली. हिंदू मुस्लिम या दोन्ही पक्षकारांशी संवाद साधण्याची व वाद मिटवण्याची जबाबदारी अयोध्या विभागावर सोपवली. वादग्रस्त जागेवर मंदिर कधी अस्तित्वात होते का? याच्या पडताळणीसाठी अलाहाबाद न्यायालयाने पुरातत्व विभागाला सन २००३ मध्ये उत्खनन करण्याचे आदेश दिले. बाबरी मशीद पाडली तिथे उत्खनन करण्यात आले, जिथे मशीद पाडली तिथे दहाव्या शतकातील राम मंदिराचे अवशेष आढळून आले व तेथे राम मंदिर होते हे पुराव्या साहित सिद्ध झाले आणि तसा अहवाल भारतीय पुरातत्व खात्याने कोर्टात सादर केला.
३० सप्टेंबर २०१० रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने अयोध्येतील वादग्रस्त जमीन राम मंदिर, निर्मोही आखाडा आणि सुन्नी वक्फ बोर्ड यांच्यात समसमान वाटण्याचा निर्णय दिला. या निर्णयाला सर्वांनीच सर्वोच्च न्यायालयात आवाहन दिले. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च सर्वोच्च न्यायालयाने ९ मे २०११ रोजी स्थगिती दिली. सन २०१७ लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्या सह भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक नेते यांच्यावर खटला चालवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले.
८ फेब्रुवारी रोजी सुन्नी वक्फ बोर्डा तर्फे बाजू मांडताना ज्येष्ठ वकील राजीव धवन यांनी सुप्रीम कोर्टात या प्रकरणाची सुनावणी नियमित व्हावी अशी विनंती केली. ती विनंती कोर्टाने फेटाळली. १९९४ मध्ये इस्माईल फारुखी विरुद्ध भारतीय संघ यांच्यातील खटल्यात दिलेल्या निकलाचा फेरविचार व्हावा व हे प्रकरण घटनापीठाकडे पाठवण्यात यावे अशी मागणी राजीव धवन यांनी केली. ती मागणी देखील सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली.
सर्वोच्च न्यायालयाच्या संविधानिक पीठाने हिंदू पक्षाच्या बाजूने निकाल देत संपूर्ण वादग्रस्त जमीन राम मंदिरासाठी दिली. सोबतच मुस्लिम पक्षाला वादग्रस्त जमिनीपासून दूर पाच एकर जमीन मशीद उभारणीसाठी देण्याचा निर्णय दिला.
५ ऑगस्ट रोजी राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साहित १७५ जणांना सोहळ्यासाठी आमंत्रण देण्यात आले होते.
अशा प्रकारे प्रदीर्घ संघर्षानंतर शेवटी प्रभू श्रीराम यांच्या जन्मभूमीत त्यांचे मंदिर उभारले जात आहे.
या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारी रोजी घरोघरी श्री राम ज्योती प्रज्वलित करून दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. "हा ऐतिहासिक क्षण सुदैवाने आपल्या सर्वांच्या जीवनात आला आहे. या निमित्ताने सर्व 140 कोटी देशवासीयांनी 22 जानेवारी रोजी आपल्या घरी श्री राम ज्योती प्रज्वलित करून दिवाळी साजरी करावी", असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
प्रभु श्रीरामाच्या आशीर्वादाने आपणा सर्वांच्या आयुष्यातील अंधःकार दूर होवो आणि लौकरच रामराज्य येवो ही प्रार्थना!
||जय श्रीराम||
वाचने
60892
प्रतिक्रिया
199
मिसळपाव
प्रतिक्रिया
घंटा, थाळी वाजवणे दिवे लावणे
हिंदू घरात तसाही रोज दिवा
In reply to घंटा, थाळी वाजवणे दिवे लावणे by रंगीला रतन
फक्त दिवेच नाही तर प्रत्येक
In reply to हिंदू घरात तसाही रोज दिवा by अमरेंद्र बाहुबली
+०८०१२०२४
In reply to फक्त दिवेच नाही तर प्रत्येक by सुजित जाधव
जय श्रीराम....
छापील बातमी....
In reply to जय श्रीराम.... by मुक्त विहारि
काका राजकीय कमेंट्स नको.
In reply to छापील बातमी.... by मुक्त विहारि
ह्यात राजकीय काय आहे?
In reply to काका राजकीय कमेंट्स नको. by अमरेंद्र बाहुबली
आता जानेवारीतल्या मुख्य सण
मंदिर पुर्ण व्हायला अजून दोन
कधी नगर ला याच
In reply to मंदिर पुर्ण व्हायला अजून दोन by अमरेंद्र बाहुबली
जय श्रीराम!
वेडा बेडु़क. तुमचं सदस्य नाम
राममंदिराचा आनंद आहे
..
गाभार्यात मूर्ती तरी रामाचीच असेल ना ?
धर्म स्थापनेसाठी पृथ्वीवर
In reply to गाभार्यात मूर्ती तरी रामाचीच असेल ना ? by उनाड
चूकलंय.
In reply to धर्म स्थापनेसाठी पृथ्वीवर by विवेकपटाईत
कलयुगात नेहरूजी आणि वल्लभभाई
In reply to चूकलंय. by अमरेंद्र बाहुबली
गुड जोक.भगवंताचे कार्य करणारे
In reply to कलयुगात नेहरूजी आणि वल्लभभाई by अहिरावण
आजिबात नाही. तसा तुमचा गैरसमज
In reply to गुड जोक.भगवंताचे कार्य करणारे by विवेकपटाईत
यात माननिय भगवंत मान आणि
In reply to चूकलंय. by अमरेंद्र बाहुबली
सहमत आहे.
In reply to यात माननिय भगवंत मान आणि by चौथा कोनाडा
चाटे!
In reply to धर्म स्थापनेसाठी पृथ्वीवर by विवेकपटाईत
+१
In reply to चाटे! by कपिलमुनी
मुल्ला मुलायमचे कारनामे विसरलात?
मंदिरांपेक्षा ऊत्तम दर्जाची
In reply to मुल्ला मुलायमचे कारनामे विसरलात? by निनाद
हज सबसिडी देताना, हजारों
In reply to मंदिरांपेक्षा ऊत्तम दर्जाची by अमरेंद्र बाहुबली
चौसष्ट कोटींची हज सबसिडी तुमच्या डोळ्यात खुपतेय?
In reply to हज सबसिडी देताना, हजारों by विवेकपटाईत
चौसष्ट कोटींची हज सबसिडी
In reply to चौसष्ट कोटींची हज सबसिडी तुमच्या डोळ्यात खुपतेय? by सर टोबी
तुम्ही नक्की उच्च शिक्षित आहात?
In reply to चौसष्ट कोटींची हज सबसिडी by सुबोध खरे
तुम्ही बहुसंख्य ठरवणार का?
In reply to तुम्ही नक्की उच्च शिक्षित आहात? by सर टोबी
कोणत्या धर्माची? भारत हा
In reply to तुम्ही बहुसंख्य ठरवणार का? by वामन देशमुख
कोणत्या धर्माची? भारत हा सेक्युलर देश आहे. धर्माधारित नाही.म्हणून धर्म हा आपल्या घरी ठेवावा, धर्माचा बाजार मांडू नये.प्रतिसाद देण्यासाठी
In reply to तुम्ही बहुसंख्य ठरवणार का? by वामन देशमुख
चौसष्ट कोटींची हज सबसिडी
In reply to तुम्ही नक्की उच्च शिक्षित आहात? by सर टोबी
होतं असं
In reply to चौसष्ट कोटींची हज सबसिडी by सुबोध खरे
दुसऱ्यांच्या संभाषणात
In reply to होतं असं by सर टोबी
लोल
In reply to दुसऱ्यांच्या संभाषणात by सुबोध खरे
तुमचा सल्ला योग्य आहे
In reply to मंदिरांपेक्षा ऊत्तम दर्जाची by अमरेंद्र बाहुबली
चमकेगीरी करनार्यांना सांगा.
In reply to तुमचा सल्ला योग्य आहे by ज्ञानोबाचे पैजार
अबा तुमचा प्रतिसाद हुकलायं
In reply to चमकेगीरी करनार्यांना सांगा. by अमरेंद्र बाहुबली
हरवलेल्या इतिहासाला
ह्या कार्यक्रमावर हिंदूंच्या
राष्ट्रपती प्रमुख पाहुणे
In reply to ह्या कार्यक्रमावर हिंदूंच्या by अमरेंद्र बाहुबली
राष्ट्रपती प्रमुख पाहुणे
In reply to राष्ट्रपती प्रमुख पाहुणे by विवेकपटाईत
बाकी विभिन्न पंथांचे ४००० प्रमुख साधू संत ही येणार.हिंदू धर्मात चार पिठांच्या शॅकराचार्यांना महत्व आहे. असे कितीही साधू आले तरी त्यांना तितकं महत्व नाही मग चार हजार येवोत की आठ हजार. महत्वाचे मात्र शंकराचार्य.त्यांच्या न येण्याने त्यांची प्रतिष्ठा कमी होईल.दुसरी काही नाही .धर्मपिठप्रमूख गेले नाहीत तर त्या महत्वाच्या धार्मीक कार्यकर्माला काहीही महत्व राहनार नाही. तीने कार्यक्रम आयोजक नी कार्यक्रमाची प्रतिष्टा कमी होणार आहे. धर्मपिठप्रमूख नसल्याने हिंदूंनाही हा कार्यक्रम धार्मीक वाटत नाहीये. एकंदरीत जेवढा गवगवा केला तेवढा हा कार्यक्रम ऐतिहासीक वगैरे नाहीये. तिथे ना आम्हा हिंदूंचे धर्मपिठप्रमूख येणारेत ना आमच्या भारत देशाचे महामहीम राष्ट्रपती. एकंदरीत हा कार्यक्रम ना हिंदूंचा ना भारतीयांचा.तुमचे जे शंकराचार्यांबद्दल नवीन प्रेम उफाळुन आले आले ते भयंकर व
In reply to राष्ट्रपती प्रमुख पाहुणे by अमरेंद्र बाहुबली
त्यांची जातीव्यवस्थेबद्दल
In reply to तुमचे जे शंकराचार्यांबद्दल नवीन प्रेम उफाळुन आले आले ते भयंकर व by Trump
नावडतीचे मीठ अळणी
In reply to त्यांची जातीव्यवस्थेबद्दल by अमरेंद्र बाहुबली
आवडतीचा शेम्बूड गोड हे
In reply to नावडतीचे मीठ अळणी by सुबोध खरे
आवडतीचा शेम्बूड गोडहे आवडलं. सध्या देशात असंच वातावरण आहे. आवडतीच्या शेंबडासाठी लोक चक्क शंकराचार्यांनाही विरोध करताहेत.कार्यक्रम श्रीराम मंदिर
In reply to ह्या कार्यक्रमावर हिंदूंच्या by अमरेंद्र बाहुबली
तेच तर म्हणतोय. श्रीराम
In reply to कार्यक्रम श्रीराम मंदिर by विवेकपटाईत
अपुर्ण मंदिरात प्राणप्रतिष्ठा
आतापर्यंत चुकीच्या पद्धतीने
आबा पुरावा द्या.
In reply to आतापर्यंत चुकीच्या पद्धतीने by अमरेंद्र बाहुबली
https://marathi.abplive.com
In reply to आबा पुरावा द्या. by कर्नलतपस्वी
हा पुरावा विश्वसनीय नाही.
In reply to https://marathi.abplive.com by अमरेंद्र बाहुबली
मराठी ...
In reply to हा पुरावा विश्वसनीय नाही. by वामन देशमुख
अती बावचळलेले प्रोग्राम (एबीपी)
In reply to https://marathi.abplive.com by अमरेंद्र बाहुबली
नाशिकपासून मोदींनी जोरदार
सर्व लोक खुश आहेत नक्की
In reply to नाशिकपासून मोदींनी जोरदार by अहिरावण
सर्व लोक खुश आहेतनक्की कुणावर??मंदिर मूळ बाबरीच्या जागेपासून
ब्रेकिंग न्यूज
शंकराचार्य असुरात मोडतात का?
In reply to ब्रेकिंग न्यूज by विवेकपटाईत
तीन शंकराचार्यांनी आशीर्वाद
In reply to शंकराचार्य असुरात मोडतात का? by अमरेंद्र बाहुबली
शंकराचार्य का थयथयाट करताहेत?
In reply to तीन शंकराचार्यांनी आशीर्वाद by विवेकपटाईत
शंकराचार्य का थयथयाट करताहेत?किती खोटं लिहीनार??तीन शंकराचार्यांनी आशीर्वाद
In reply to तीन शंकराचार्यांनी आशीर्वाद by विवेकपटाईत
तीन शंकराचार्यांनी आशीर्वाद दिला आहे.किती खोटं लिहीनार?शंकराचार्याबद्दल प्रेम आताच
In reply to शंकराचार्य असुरात मोडतात का? by अमरेंद्र बाहुबली
तेव्हा विरोध केलाच नव्हता
In reply to शंकराचार्याबद्दल प्रेम आताच by धनावडे
तुमच्यासारख्या पुरोगाम्यानी
In reply to तेव्हा विरोध केलाच नव्हता by अमरेंद्र बाहुबली
बाब्बो. मी हिंदूत्ववादीचा
In reply to तुमच्यासारख्या पुरोगाम्यानी by धनावडे