✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

त्यांनी हिंदीत का बोलावं?

उ
उपयोजक यांनी
Mon, 04/11/2022 - 18:52  ·  लेख
लेख
तीन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत एक विनंती केली की वेगवेगळ्या राज्यांमधल्या असमान मातृभाषा असणार्‍या लोकांनी एकमेकांशी संवाद साधताना इंग्रजीऐवजी हिंदी भाषा वापरावी. https://www.google.com/amp/s/indianexpress.com/article/india/people-different-states-should-speak-hindi-not-english-shah-7858861/lite/ या अनावश्यक विनंतीला अहिंदी राज्यांमधे साहजिकच विरोध होतो आहे. विशेषत: दक्षिणेकडच्या राज्यांमधे. आता ज्या लोकांची मातृभाषा हिंदीच आहे त्यांना या विनंतीबद्दल काहीच आक्षेप नसणारेय.उलट त्यांचा आयता फायदाच होईल. आता प्रश्न असे आहेत. १. दोन राज्यांमधील असमान भाषिकांनी कोणत्या भाषेत एकमेकांशी बोलावं अशी विनंती गृहमंत्री का करत आहेत? लोकांनी कोणत्या भाषेत बोललं पाहिजे हे गृहखात्याच्या अखत्यारीत येतं का? २. या विनंतीला दक्षिणेकडच्या राज्यातले लोक सकारात्मक प्रतिसाद देतील असा भ्रम गृहमंत्र्यांना का झाला असावा? की ही विनंती हिंदीतून बोलू शकणार्‍या अहिंदी राज्यांतल्या लोकांसाठीच आहे? अशी विनंती केल्यावर ज्यांना हिंदी येत नाही ते लगेच हिंदी शिकून घेतील हा भ्रम गृहमंत्र्यांना का झाला असावा? ३. या विनंतीमागे कारण काय असावं? हिंदी पट्ट्यातल्या लोकांची सोय व्हावी? कारण हिंदी पट्ट्यातले लोक "हम तो पापी पेट के लिए आए हैं भाई" हे रडव्या चेहर्‍यानं सांगून अहिंदी भाषिकांना 'आमची सोय बघा' असंच सांगू पाहतात. हिंदीभाषिक अहिंदी राज्यातल्या भाषा शिकायला राजी नसतात. पण अहिंदी भाषिकांनी मात्र हिंदी शिकावी ही अपेक्षा बाळगतात. हे हिंदी पट्ट्यातले लोक हिंदीतर भाषा शिकणार कधी? ४. समजा दक्षिणभारतीय राज्यांनी किंवा ईशान्येकडच्या राज्यांनी एकत्र येऊन त्यांची एकच सामायिक बोलीभाषा निर्माण करुन हिंदीला कडवे आव्हान निर्माण केले तर? मग काय करतील अमित शहा? ५. इंग्रजीला अमित शाह यांचा विरोध का? इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे. कमालीची ताकदवान भाषा आहे.आंतरराष्ट्रीय भाषा आहे. उपयोगाची भाषा आहे. असं असताना ती न वापरता हिंदी का वापरायची?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
105992 वाचन

💬 प्रतिसाद (510)

प्रतिक्रिया

बोअरडम कुठल्या कुठे पळुन गेला !

चौथा कोनाडा
Mon, 04/25/2022 - 22:07 नवीन
एकंदरीत हिंदी आली जी आता जी प्रगत राज्य आहेत ती सर्व ३०० वर्ष तरी मागे जातील.
दिवस बोअर चालला होता ..... हा प्रतिसाद वाचला अन खो खो हसून बोअरडम कुठल्या कुठे पळुन गेला ! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sunil kachure

खरे आहे .हसू नका

sunil kachure
Tue, 04/26/2022 - 12:24 नवीन
महाराष्ट्रात हिंदी लोकांनी स्वीकारली. लगेच हिंदी मागोमाग. यूपी,बिहार ची राजकीय जातीयवादी संस्कृती आली. उत्तर भारतीय सन साजरे होवू लागले त्या बरोबर त्यांच्या परंपरा आल्या. लोक लग्नात चोऱ्या करायला लागले नवरदेवाच्या चपला ,बुट चोरायला लागले. दक्षिण भारताने हिंदी स्वीकारली नाही. तिथे लग्नात नवऱ्याचे बुट चोरले जात नाहीत. ही मोजकीच उदाहरणे तुम्हाला माझे मत समजायला मदत करतील. आणि हसणे थांबवून तुम्ही गंभीर व्ह्याल. अजून खूप आहेत उदाहरणे. राजस्थान मध्ये सती प्रथेचे समर्थन करण्यासाठी सती चे मंदिर आहे. भाषे बरोबर त्या जुनाट प्रथा पण येतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

एक शून्य जास्त

तर्कवादी
Tue, 04/26/2022 - 13:44 नवीन
दिवस बोअर चालला होता ..... हा प्रतिसाद वाचला अन खो खो हसून बोअरडम कुठल्या कुठे पळुन गेला !
म्हणजे हिंदी भाषिक राज्ये दक्षिणेकडील राज्यांच्या तुलनेत मागास आहेत याबद्दल दुमत नाहीच पण ...भावनेच्या भरात त्यांनी एक शून्य जास्त टंकला असावा :) असो.. कधी कधी विनोदी प्रतिसादही असायला हवेत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

हे काय म्हणताहेत

चौथा कोनाडा
Tue, 04/26/2022 - 15:00 नवीन
“हिंदी ही आता राष्ट्रभाषा राहिलेली नाही तर…”, प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत
  • Log in or register to post comments

बरोबर बोलत आहेत

sunil kachure
Tue, 04/26/2022 - 15:35 नवीन
साध्या शब्दात ..हिंदी ही भारतातील अती मागास राज्यातील भाषा आहे. मागास म्हणजे. 1) आर्थिक बाबतीत मागास २) सामाजिक सुधारणा बाबत मागास. ३) निती मत्ता मध्ये मागास. ४), परंपरा आणि अंध श्रद्धा ह्या बाबत मागास. अशा ह्या भाषेचा हट्ट धरणे हाच मूर्ख पना आहे. भाषा आणि संस्कृती,नीतिमत्ता,प्रगत विचार,ह्यांचा खूप जवळचा संबंध असतो. फक्त भाषा कशी योग्य आहे हा विचार च बालिश आहे. मी तर म्हणतो देशात हिंदी वर बंदी जाहीर केली तर .. राम मंदिर. काश्मीर प्रश्न. साक्षरता.. स्त्री स्वतंत्र. लोकशाही. जातीयवाद . धार्मिक वाद.. ह्यांची खरी उत्त्तर सापडतील आणि भारत जगातील महासत्ता बनेल. हिंदी chya नादाला लागल तर . केनिया पण भारतासाठी खूप प्रगत देश असेल.
  • Log in or register to post comments

अरे बाप रे

तर्कवादी
Wed, 04/27/2022 - 12:00 नवीन
देशात हिंदी वर बंदी जाहीर केली तर
सुनीलजी तुमचा मागचा एक प्रतिसाद बराच संतुलित होता. आता मात्र तुम्ही अगदीच टोकाचे विचार मांडत आहात. अशा प्रकारे दोन प्रतिसादांत मोठा विरोधाभास असल्याने तुमच्या आय डीची विश्वासार्हता कमी होवू शकते याची तुम्हाला कल्पना असावी. असो. एक भाषा म्हणून हिंदीचाही आदर आहेच आणि इतर भाषिकांनी ही हिंदी आपापल्या आवडीनुसार व कारणानुसार शिकायलाही हरकत नाही (कुणाला उत्तरेकडील राज्यांत भटकंती करायची असेल, कुणाला हिंदी चित्रपट बघावेसे वाटत असतील, कुणाला मुन्शी प्रेमचंद सारख्या साहित्यिकांचं साहित्य मुळातून वाचायचं असेल.. ई ई) ..मात्र हिंदी भाषिक लोक आपल्या राज्यात येणार आहेत आणि त्यांच्याशी संभाषण होवू शकावे म्हणून केवळ , अमित शहांच्या प्रेमळ आवाहनाखातर (!!) सगळ्यांनी हिंदी शिकावी हे मात्र फारसं संयुक्तिक कारण होवू शकत नाही इतकंच.. बाकी हिंदीवर राग नाही.. अनेक हिंदी चित्रपटांनी माझं मनोरंजन केलंय.. अनेक इंग्लिश वा दक्षिणी भाषेतले हिंदीत डब केलेले चित्रपटही उपलब्ध झाल्याने त्यातुनही मनोरंजन झालं आहेच.. .त्यामुळे माझा हिंदी वर राग नाहीच..( खरंतर कोणत्याच भाषेवर राग नाही. आणि असण्याचं कारणही नाही..) झालंच तर हिंदी भाषेतील मान्यवरांनी भाषाशुद्धीचं थोडं मनावर घेतलं तर हिंदीबद्दल आस्था वाढेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sunil kachure

एकाच आयडी वापरुन एकापेक्षा जास्त लोक प्रतिसाद लिहित असावेत

Trump
Wed, 04/27/2022 - 13:39 नवीन
तुमचा मागचा एक प्रतिसाद बराच संतुलित होता. आता मात्र तुम्ही अगदीच टोकाचे विचार मांडत आहात. अशा प्रकारे दोन प्रतिसादांत मोठा विरोधाभास असल्याने तुमच्या आय डीची विश्वासार्हता कमी होवू शकते याची तुम्हाला कल्पना असावी.
मलाही एक-दोनदा असेच आढळले होते. एकाच आयडी वापरुन एकापेक्षा जास्त लोक प्रतिसाद लिहित असावेत अशी शंका येऊन गेली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्कवादी

हिंदी वर बंदी असावी

sunil kachure
Wed, 04/27/2022 - 15:02 नवीन
हिंदी वर बंदी असावी हे माझे मत खूप विचार करून झाले आहे.. १)ये है स्वर्ग दरवाजा. २) ये है रावण की लंका.. ३)ये है नरक का दरवाजा. असेल फालतू कंटेंट फक्त हिंदी मध्येच असतात. हिंदी न्यूज चॅनेल म्हणजे जगातील सर्वात बकवास मीडिया. अनेक देशांनी पण हिंदी न्यूज चॅनेल वर आरोप केले आहेत.. अंध विश्वास पसरवणे,चुकीची बकवास माहिती पसरवणे हे उद्योग तर हिंदी मीडिया करत च असते. बाकी भाषिक मीडिया इतकी मूर्ख नक्कीच नाही त्या मुळे हिंदी वर देशात बंदी घातली गेली तर देश खूप विकास करेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Trump

श्री कचुरे, भाषा आणि माध्यमे

Trump
Wed, 04/27/2022 - 15:28 नवीन
श्री कचुरे, भाषा आणि माध्यमे ह्यात फरक आहे.
असेल फालतू कंटेंट फक्त हिंदी मध्येच असतात.
असल्या फालतु गोष्टींचा भाषेशी काही संबध नसतो. ते इतर भाषांमध्येही असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sunil kachure

मी फारशा न्युज बघत नाही

तर्कवादी
Wed, 04/27/2022 - 15:43 नवीन
मी फारशा न्युज बघत नाही त्यामुळे कोणत्या भाषेतले चांगले व कोणते वाइट त्याबद्दल माझा फारसा अभ्यास नाही. पण अलिकडे युक्रेन युद्धाच्या निमित्ताने बातम्या बघत होतो. आज तकचे काही पत्रकार युक्रेनमध्ये थांबून रिपोर्टिंग करत होते हे खरच कौतुकास्पद . "गौरव सावंत" आणि आणखी एक पवार नावाचे पत्रकार नावावरुन मराठी वाटतात पण त्यांचे हिंदी उच्चार , शब्दरचना ई चांगलं होतं... खासकरुन गौरव सावंतचं रिपोर्टिंग मला आवडलं. बाकी एकूणात हिंदीमधले मिडीया वाईट आहेत असं मानलं तरी त्याचा दोष भाषेला देणं योग्य होणार नाही. याच भाषेने मुन्शी प्रेमचंद सारखे साहित्यिकही दिले आहेत. भाषा शुद्ध राखण्याकडे फारसे ल़क्ष न दिल्याने अगदी औपचारिक वापराच्या हिंदी भाषेत उर्दु , फारसी , इंग्लिश ई भाषांतील शब्दांची प्रचंड भेसळ झाली आहे हाच काय तो भाषेचा दोष (खरं तर भाषा लिहिणार्‍या -बोलणार्‍यांचा दोष)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sunil kachure

अजय देवगन

sunil kachure
Wed, 04/27/2022 - 20:16 नवीन
हिंदी आपली राष्ट्र भाषा आहे. हसून हसून पुरेवाट झाली हे वाक्य ऐकून. त्या पुढे तर मोठा जोक आहे. दक्षिण भारतीय हिंदी राष्ट्र भाषा मानत नाहीत तर त्यांचे सिनेमे हिंदी मध्ये डब करतात. आता हसून हसून लोळणे च बाकी होत. सिनेमे भाषा कोणती आहे म्हणून लोकप्रिय होत नाहीत. आज काल कोणत्या ही भाषेतील सिनेमे कोणत्या ही भाषेत बदलता येतात. सिनेमे लोकप्रिय होतात कथा,अभिनय,योग्य विषय ह्या वर. हिंदी मध्ये दर्जा च राहिला नाही. ना कथा,ना अभिनय.ना योग्य विषय . ये देखो स्वर्ग का द्वार . ये देखो नरक का द्वार. इथपर्यंत च ह्यांची झेप.
  • Log in or register to post comments

+१

अमरेंद्र बाहुबली
Wed, 04/27/2022 - 20:55 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sunil kachure

अजय देवगणला पद्मश्री का दिलीय?

उपयोजक
Wed, 04/27/2022 - 22:32 नवीन
Image removed. चुकीची माहिती पसरवतोय
  • Log in or register to post comments

ही पूर्ण चुकीची माहिती अगदी

श्रीगुरुजी
Wed, 04/27/2022 - 22:43 नवीन
ही पूर्ण चुकीची माहिती अगदी प्रारंभापासून आपल्या डोक्यावर थोपविली गेली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक

व्यवहारीक प्रश्न आहे. त्यात

ॲबसेंट माइंडेड…
Wed, 04/27/2022 - 22:58 नवीन
व्यवहारीक प्रश्न आहे. त्यात चुकीचे काय ते सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक

एखादी भाषा राष्ट्रभाषा नसली

श्रीगुरुजी
Wed, 04/27/2022 - 23:23 नवीन
एखादी भाषा राष्ट्रभाषा नसली तर त्या भाषेत चित्रपट डब करायचे नाही का? असे असेल तर हिंदीभाषिक राज्यात अहिंदीभाषिकांनी आपली उत्पादने विकू नये अशीही मागणी होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर

पुन्हा विचारतो. व्यवहारीक

ॲबसेंट माइंडेड…
Wed, 04/27/2022 - 23:48 नवीन
पुन्हा विचारतो. व्यवहारीक प्रश्न आहे. त्यात चुकीचे काय ते सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

अजय देवगणचा दृश्यम् हा

श्रीगुरुजी
Wed, 04/27/2022 - 23:39 नवीन
अजय देवगणचा दृश्यम् हा चित्रपट चिनी भाषेत डब झाला आहे. आता चिनी भाषा ही आपली राष्ट्रभाषा नाही, तरीसुद्धा या भाषेत का डब केला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर

हा प्रश्न हिंदी भाषिक लोकांना का पडत नसेल

sunil kachure
Wed, 04/27/2022 - 23:33 नवीन
पाहिले तर हिंदी जास्त लोक बोलतात म्हणून ती श्रेष्ठ ह्या असल्या युक्तिवाद ला खरे तर काहीच किंमत नाही. Discover चॅनल,किंवा नॅशनल geography सारखे चॅनेल नी हिंदी मध्ये ऑडियो सुविधा दिलीच नसती तर.. पृथ्वी वर जी प्राणी,वनस्पती,समुद्रातील जीव ह्यांची माहिती हिंदी भाषा असणाऱ्या लोकांना जन्मात तरी मिळाली असतो का? हिंदी मध्ये असे कार्यक्रम निर्माण करण्याची क्षमता आहे का? दक्षिण भारतातील बाहुबली असेल किंवा पुष्पा असे मनोरंजन मूल्य खूप असलेले सिनेमे हिंदी मध्ये डब नसते केले तर . हिंदी भाषिक लोकांना त्या दर्जा चे सिनेमे बघायला मिळाले असते. पैसा महत्वाचा आहेच पण ज्ञान,विविध नावीन्य पूर्ण माहिती,सायन्स,विविध शोध हे हिंदी भाषिक राज्यात लागत नाहीत. हिंदी हिंदी करत बसले तर.खोल अज्ञाना च्या अंधार कोठडीत हा प्रदेश जाईल.
  • Log in or register to post comments

हिंदी सारख्या भाषेत Discover

चौथा कोनाडा
गुरुवार, 04/28/2022 - 16:01 नवीन
हिंदी सारख्या भाषेत Discover चॅनल,किंवा नॅशनल geography सारखे चॅनेल, डब केलेले दक्षिणी सिनेमे/ इतर भाषिक सिनेमे मराठी भाषिक माणुस (ज्याला इंग्रजी येत नाही, समजत नाही) समजू शकतो हा फायदाच नाही का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sunil kachure

एकंदरीतच चर्चा वाचून

जेम्स वांड
गुरुवार, 04/28/2022 - 07:57 नवीन
अभिनिवेष आणि अक्कल ह्यांचा परपसर संबंध नीट अभ्यासता आला आणि अभिनिवेष असतो तिथे अकलेचा वास नसतो हे गृहीतक पक्के झाले डोक्यात
  • Log in or register to post comments

लॉल

कॉमी
गुरुवार, 04/28/2022 - 08:17 नवीन
लॉल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

परपसर संबंध

उपयोजक
गुरुवार, 04/28/2022 - 18:27 नवीन
म्हणजे कसला संबंध? BTW त्रास होत असेल तर चर्चा वाचू नका. काळजी घ्या. _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

तुमचं निवांत चालू दे

जेम्स वांड
गुरुवार, 04/28/2022 - 19:35 नवीन
त्रास नाही करमणूक मात्र छान होते आहे, तुम्ही म्हणताय ते मुद्दे बरोबर आहेत, आगे बढो म्हणणार होतो पण ते हिंदी असल्यामुळे पुलेशु म्हणतो फक्त :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक

आता इतकी उद्बोधक चर्चा होतेच आहे तर

जेम्स वांड
गुरुवार, 04/28/2022 - 09:04 नवीन
आमच्या गावाकडच्या गणपाच्या एका शंकेचे निरसन विद्वत्तापूर्ण भद्रजन करतील अशी अपेक्षा. आम्ही गावाकडं मुंबईहुन लेफ्ट राईट लेफ्ट राईट करत बोलू फक्त मराठी(च)(लेंगे स्वराज लेंगे धर्तीवर) करत गेलो की गणपा म्हणतो. "वांडू, शेरातील मानसे काय बोलत्याती काय बी सुदरत नाय, च्यामारी टिम्बं टाकून अनुस्वार म्हंत्याती, आम्हीच ण ला न म्हणलं तर ही मानसं हस्त्यात अन आमाला सुद्ध मराठी बोला म्हणत्यात, सुद्ध मराठी म्हंजी कुटली रं (टिम्ब दिलं पग) ? अन असली आसं म्हनलो तरीबी ज्यानला यात नाय त्येन्नी त्या मराठीत का बोलाव रं ?"
  • Log in or register to post comments

प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे

तर्कवादी
गुरुवार, 04/28/2022 - 10:32 नवीन
गणपाची बोली भाषा वेगळी असू शकेल, हरकत नाही. पण प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे असल्याने गणपाने निदान प्राथमिक शिक्षण तरी घेतले असावे. जगाच्या नाही तरी आजूबाजूच्या गावच्या, तालुक्याच्या बातम्या वाचण्याकरिता कधी वृत्तपत्र वाचत असेल. त्यामुळे शुद्ध वा प्रमाण मराठी कशी आहे याचा त्याला थोडाफार अंदाज असू शकेल. विशिष्ट व्यवसायाची गरज असल्याखेरीज (उदा: शिक्षकी पेशा) समोरच्याने प्रमाण वा शुद्ध भाषेतच बोलायला हवं असा फारसा आग्रह कुणी धरत नाही..(अपवाद असतीलच अर्थात) त्यामुळे गणपाने शुद्ध भाषाच बोलायला हवी असे काही नाही पण ग्रामीण भाषेतले काही शब्द जर शहरी लोकांना माहितच नसतील समजतच नसतील तर शहरात गेलेल्या गणपाने ते शब्द टाळून शहरी भाषेतील काही शब्द आत्मसात करणे म्हणजे त्याच्या अस्मितेला मोठा धक्का असे काही नसावे. शहरातले लोकही ग्रामीण भागात स्थलांतरित झाले तर ग्रामीण भाषेतील काही शब्द शिकत असतीलच की...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

गणपाची भाषा

sunil kachure
गुरुवार, 04/28/2022 - 11:07 नवीन
मुळात जी भाषा गणपा ची म्हणून लिहली आहे तीच चुकीची आहे. महाराष्ट्रात आता त्या रीती ने मराठी अगदी दुर्गम खेड्यात पण बोलली जात नाही. महाराष्ट्रात प्राथमिक शिक्षण तर सर्वदूर पसरले ल आहे. सर्वांना सर्व प्रकारची मराठी उत्तम समजते. उगाच सिनेमे बघून सद्यस्थिती शी विपरीत लोकांचे समज निर्माण झाले आहेत. ग्रामीण भागात राहणारा व्यक्ती म्हणजे खूप च जुनी मराठी बोलत असेल.असा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्कवादी

मुळात जी भाषा गणपा ची म्हणून

सुरिया
गुरुवार, 04/28/2022 - 18:47 नवीन
मुळात जी भाषा गणपा ची म्हणून लिहली आहे तीच चुकीची आहे. महाराष्ट्रात आता त्या रीती ने मराठी अगदी दुर्गम खेड्यात पण बोलली जात नाही.
काहिच्या काही लिहु नका हो, काय ऐकलीय आणि कीती फिरलाय तुम्ही? किंवा जी गावठि म्हणून तुम्ही ऐकलीय ती एखाद्या उपनगरीफ्लॅटवासीय लेखकाची वाचलेली असावी. ग्रामीण सिनेमाचा काळ तर सरलाच पण वांडोबाची भाषा महाराष्ट्रातल्या कमीत कमी ५ जिल्ह्यात आजही सर्रास वापरली जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sunil kachure

ज्याला प्रतिवाद तरी का करावा

sunil kachure
गुरुवार, 04/28/2022 - 19:15 नवीन
प्रतिवाद तरी का करावा इतका खोटा दावा आहे. पाच जिल्ह्यात तरी जेम्स नी लिहलेले मराठी भाषा बोलतो जाते असे सरळ फेकले आहे. पण कोणते पाच जिल्हे हे मात्र अजिबात सांगितले नाही. एक तरी vlogs दाखवा पुरावा म्हणून महाराष्ट्र मधील त्या व्हिडिओ त गणपा च्या तोंडी जी भाषा आहे ती बोलली जाते. आणि तेथील लोकांस पुण्या,मुंबई ची मराठी परकी वाटते ,त्यांना समजत नाही. २६ जिल्ह्यातील पाच जिल्ह्यात प्रमाण मराठी बोलत ,समजत नसेल. तर साक्षरता चे सर्व दावे चुकीचे ठरतील. महाराष्ट्र च काय पूर्ण भारत पाकिस्तान,बांगलादेश पेक्षा अशिक्षित आहे हे सत्य मान्य करावे लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुरिया

पांडुरंग हरी वासुदेव हरी :)

जेम्स वांड
गुरुवार, 04/28/2022 - 19:40 नवीन
सुनीलजींचे प्रतिसाद लालित्य पाहून प्रतिसाद देणार नव्हतोच, आता तर त्या निर्णयावर शिक्कामोर्तब झालेच समजा. जमल्यास आपणही त्याची सवय करून घ्या, चला पाहू पाच जिल्हे फिरायला ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुरिया

तर्कवादी साहेब

जेम्स वांड
गुरुवार, 04/28/2022 - 20:03 नवीन
तुमच्याशी बोलायला मजा येणार :) मुद्देसूद प्रतिवाद खालीलप्रमाणे :- गणपाची बोली भाषा वेगळी असू शकेल, हरकत नाही. खालील बहुतकरून शुद्धभाषामतवादी जनतेचे प्रतिसाद पाहून आपले मत अजूनही असेच असेल का ? पण प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे असल्याने गणपाने निदान प्राथमिक शिक्षण तरी घेतले असावे. प्राथमिक म्हणजे इयत्ता १ ते ४, ह्या वयात दिवसाच्या ५ तास शाळेत घालवलेल्या वेळेच्या जोरावर उरलेले १९ तास ग्रामीण परिवेशात राहणाऱ्या गणपाच्या जिभेला प्रमाण भाषेचे वळण लागेल का ? लक्षात घ्या इथे मी शेकडो पोरांवर ४-५ मास्तर वगैरे "निःशुल्क प्राथमिक शिक्षणाच्या" वास्तवात घुसतही नाहीये जगाच्या नाही तरी आजूबाजूच्या गावच्या, तालुक्याच्या बातम्या वाचण्याकरिता कधी वृत्तपत्र वाचत असेल. त्यामुळे शुद्ध वा प्रमाण मराठी कशी आहे याचा त्याला थोडाफार अंदाज असू शकेल. नक्कीच, अन वृत्तपत्रीय भाषा काही अंशी प्रमाणित असतेच, पण ते र ला ट लावून वाचणे अन प्रमाण मराठीचे अंदाज असणे ह्यात काही मैल अंतर असेल हे आपण मान्य कराल काय ? शहरात गेलेल्या गणपाने ते शब्द टाळून शहरी भाषेतील काही शब्द आत्मसात करणे म्हणजे त्याच्या अस्मितेला मोठा धक्का असे काही नसावे. गणपा टाईप मजुरी किंवा गेलाबाजार रोजगार पाहायला आलेल्या लोकांना अस्मितेची लक्झरी परवडेल का ? प्रश्न अस्मितेचा नाही अस्तित्वाचा आहे, वैच एक कप च्या द्या म्हणल्यावर जर शहरातील माणसाला अर्थ कळत असेल तर गणपाने शुद्ध मराठी बोलावी हा आग्रह कश्याला ? पुन्हा एकदा सांगतो सरकारी कामे, वृत्तपत्रे इत्यादींच्या प्रमाणभाषेला विरोध नाहीच पण ती गणपावर लादण्याचा पॉईंट नाही काही, हिंदी इम्पोजिशन मॅक्रो प्रश्न असेल पण हा मायक्रो प्रश्न आहे अन तो सोडवल्याशिवाय मी तरी मॅक्रोला किंमत देणार नाही, प्रॉब्लेम सोलविंग फ्लोचार्ट क्लिअर आहे माझा माझ्या डोक्यात तरी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्कवादी

तुमच्याशी बोलायला मजा येणार :

तर्कवादी
गुरुवार, 04/28/2022 - 22:28 नवीन
तुमच्याशी बोलायला मजा येणार :)
धन्यवाद जेम्स साहेब खरंतर तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी आधीच दिलेलं असूनही तुम्ही पुन्हा तेच प्रश्न विचारताय म्हणून माझंही थोडं मनोरंजन होतंय... असो !!
खालील बहुतकरून शुद्धभाषामतवादी जनतेचे प्रतिसाद पाहून आपले मत अजूनही असेच असेल का ?
मिसळपाववरील शुद्धभाषामतवादी आणि वर उल्लेखलेला अशिक्षित वा अर्धशिक्षित गणपा यांचा संबंध फारसा येणार आहे का ? आणि आलच तरी त्याच्या परिस्थितीचं आकलन करता त्याच्याकडून शुद्ध भाषा बोलण्याचा आग्रह सहसा कुणी धरणार नाही (अपवाद असतातच.. ).. बाकी मिपावरही ग्रामीण बोली भाषेतील कथा /साहित्य अधूनमधून प्रसिद्ध होत असतंच आणि त्यास लोकप्रियताही लाभते. असो.
उरलेले १९ तास ग्रामीण परिवेशात राहणाऱ्या गणपाच्या जिभेला प्रमाण भाषेचे वळण लागेल का ?
मला वाटतंय मी आधीच उत्तर दिलंय .. तरी पुन्हा देतो " गणपाची बोली भाषा वेगळी असू शकेल, हरकत नाही." .. गणपाने प्रमाण भाषा बोलायला हवी असा आग्रह नाहीच हे आधी किमान दोनदा तरी म्हणून झालंय .. असो.
नक्कीच, अन वृत्तपत्रीय भाषा काही अंशी प्रमाणित असतेच, पण ते र ला ट लावून वाचणे अन प्रमाण मराठीचे अंदाज असणे ह्यात काही मैल अंतर असेल हे आपण मान्य कराल काय ?
थोडाफार अंदाज इतकंच मी म्हंटलंय.. आणि वाचनाची सवय असलेला जन्मभर काही र ला ट लावून वाचत नाही.. माझी दुसरी किंवा तिसरी शिकलेली आजी [१९३० च्या आधी जन्म, लग्नाआधी अ. नगर जिल्ह्यातील एका खेडेगावात व लग्नानंतर अ. नगर शहरात आयुष्य गेले] फार सहजपणे व आवडीने वृत्तपत्र वाचत असे.
वैच एक कप च्या द्या म्हणल्यावर जर शहरातील माणसाला अर्थ कळत असेल तर गणपाने शुद्ध मराठी बोलावी हा आग्रह कश्याला ?
आग्रह नाही असे अनेक वेळा म्हणून झाले तरी तुम्हाला तेच पद गायचे असल्यास माझा नाईलाज आहे .. बाकी उदाहरण देवून तुम्ही काम माझे सोपे केले.. "वैच एक कप च्या द्या " म्हंटल्यावर शहरी मराठी भाषिक चहावाला"वैच"शब्दाचा अर्थ समजला नाही किंवा "च्या" हा शब्द प्रमाण भाषेतला नाही म्हणून गणपाला चहा नाकारणार नाही.
पुन्हा एकदा सांगतो सरकारी कामे, वृत्तपत्रे इत्यादींच्या प्रमाणभाषेला विरोध नाहीच पण ती गणपावर लादण्याचा पॉईंट नाही काही, हिंदी इम्पोजिशन मॅक्रो प्रश्न असेल पण हा मायक्रो प्रश्न आहे अन तो सोडवल्याशिवाय मी तरी मॅक्रोला किंमत देणार नाही, प्रॉब्लेम सोलविंग फ्लोचार्ट क्लिअर आहे माझा माझ्या डोक्यात तरी :)
मला वाटते मी संतुलितपणे याचे उत्तर दिले होते तरी पण तुम्ही "माझा (पक्षी गणपाचा) प्रॉब्लेम सॉल्व झाला नाही म्हणूनच सूर लावणार असाल तर माझा नाईलाज आहे. माझे वाक्य पुन्हा लिहितो. "गणपाने शुद्ध भाषाच बोलायला हवी असे काही नाही पण ग्रामीण भाषेतले काही शब्द जर शहरी लोकांना माहितच नसतील समजतच नसतील तर शहरात गेलेल्या गणपाने ते शब्द टाळून शहरी भाषेतील काही शब्द आत्मसात करणे म्हणजे त्याच्या अस्मितेला मोठा धक्का असे काही नसावे." झालेच तर गणपासारखी अर्धशिक्षित माणसे शहरात कोणत्या कामासाठी येतात ? त्या निमित्ताने त्यांची उठबस कोणत्या लोकांशी असते ? त्या लोकांचा ग्रामीण बोलीभाषेशी यापुर्वी संबंध आलेला असेल हे मुद्दे विचारात घेतले तर गणपाची समस्या फक्त कागदावरची वाटते (अपवाद वगळून), वास्तववादी नाही.
प्रॉब्लेम सोलविंग फ्लोचार्ट क्लिअर आहे माझा माझ्या डोक्यात तरी
पण तरी प्रॉब्लेम आहेच असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सोल्युशनचाही विचार केला असेलच, नाही का ? तुमच्या मते काय सोल्युशन आहे ते सांगितलंत तर बरं होईल. पुढे त्याचा उहापोह करु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

गणपानं

उपयोजक
गुरुवार, 04/28/2022 - 18:32 नवीन
गावठीपणा सोडून कुतूहलाने शहरी लोक कसे बोलतात त्याचे निरीक्षण करावे. म्हणजे गणपालाही प्रमाणभाषा जमायला लागेल. प्रमाणभाषा निर्माण करणार्‍यांनी त्या भाषेवर विशेष काम केलेले असते. खेडवळ लोक कोणत्याही भाषेचा उपयोग केवळ संपर्कभाषा म्हणून करतात. तस्मात गणपाला जास्त सिरियसली घेऊ नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

सिरियसली

सुरिया
गुरुवार, 04/28/2022 - 18:41 नवीन
खेडवळ लोक कोणत्याही भाषेचा उपयोग केवळ संपर्कभाषा म्हणून करतात. तस्मात गणपाला जास्त सिरियसली घेऊ नये.
तस्मात समस्त गणप्यांनी ह्या भाषा, प्रमाणभाषा, राज्य भाषा, राष्ट्रभाषा वगैरे प्रकरणालाच जास्त सिरियसली घेऊ नये. संपर्क होण्याशी मतलब.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक

म्हणजे आम्ही बोलतो ते आणि

कॉमी
गुरुवार, 04/28/2022 - 18:43 नवीन
म्हणजे आम्ही बोलतो ते आणि तसेच बोलायचे अशी इच्छा आहे तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक

प्रमाणभाषा निर्माण करणार्

जेम्स वांड
गुरुवार, 04/28/2022 - 19:47 नवीन
प्रमाणभाषा निर्माण करणार्‍यांनी त्या भाषेवर विशेष काम केलेले असते.
प्रमाणभाषा ही फक्त प्रशासकीय सोय असते, विशेष काम त्यासाठी केलेले असते, भाषासेवा करायला नाही , त्यामुळे मुद्दा रद्द होतो, अन आपण भाषासेवा करतोय हा आवही शुद्ध भाषामतवाद्यांनी आणू नये. सन्माननीय अपवाद उदाहरणार्थ वि दा सावरकर, त्यांनीही जन्माला घातलेली शब्दसंपदा ही बोली वर आधारित अर्थात फोनेटिक्स बेस्ड होती अन दुर्दैवाने ती पण आजकाल कोणीच वापरत नाही शुद्धभाषिक पक्षीय सुद्धा थोडक्यात काय प्रमाण म्हणजे शुद्ध ही संकल्पनाच मुळात प्रमानभाषावादी बायसेस मधून उद्भवलेली आहे, भाषेचे अलंकार अन सौंदर्य हे बोलीतच असल्यामुळे बोलींचा मान न ठेऊ शकणाऱ्या शुद्धभाषावादी जनतेला सामान्य जनतेने जास्त मनावर घेऊ नये, ह्यातच महाराष्ट्र संस्कृतीचे हित आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक

व्होल वावर इज् आवर

चेतन सुभाष गुगळे
Fri, 04/29/2022 - 10:13 नवीन
महाराष्ट्रातील गणपाने कर्नाटकच्या संगप्पाशी इंग्रजीतून बोलावे असे फर्मान देखील काढले जाईल या इंग्रजांच्या एजंटांकडून...
  • Log in or register to post comments

घ्या. उघडा डोळे बघा नीट

उपयोजक
Fri, 04/29/2022 - 11:05 नवीन
https://fb.watch/cHcEks7nCg/
  • Log in or register to post comments

यात नविन काय ? हिंदी भाषा हा

चौथा कोनाडा
Fri, 04/29/2022 - 18:13 नवीन
यात नविन काय ? हिंदी भाषा हा विषय निघाला की यांची द्रविड अस्मिता संकटात येणार ! साता समुद्रापारची परकिय भाषा शिकू, बोलू पण हिंदुस्थानातलीच भाषा म्हणजे यांच्यावर परम-संकट !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक

हिंदीभाषिक शिकतात का इतर

श्रीगुरुजी
Fri, 04/29/2022 - 18:28 नवीन
हिंदीभाषिक शिकतात का इतर भारतीय भाषा? त्यांच्या राज्यातील अभ्यासक्रमात हिंदी व इंग्लिश व्यतिरिक्त एखादी इतर भाषा शिकणे सक्तीचे आहे का? तसं नसेल तर अहिंदीभाषिकांनी स्वत:ची भाषा व इंग्लिश व्यतिरिक्त हिंदी सक्तीने का शिकावी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

या भाषिक वादाला आता जातीय वळण मिळतंय :(

उपयोजक
Sat, 04/30/2022 - 08:14 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

ह्यात चुकीचे काय लिहिले आहे ?

कॉमी
Sat, 04/30/2022 - 11:34 नवीन
ह्यात चुकीचे काय लिहिले आहे ? ब्राम्हणांचा उल्लेख काही द्वेशपूर्ण नाही वाटला. दिलीये ती फॅक्ट आहे. गोलवळकरांचे विचार असे नाहीत असे असेल तर जरूर सांगा, मला कल्पना नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक

असं कसं म्हणता कॉमी?

रंगीला रतन
Sat, 04/30/2022 - 18:20 नवीन
असं कसं म्हणता कॉमी? धागाकर्ता म्हणाले ब्राम्हण द्वेष आहे म्हंजे ब्राम्हण द्वेष असणारच. बॅट त्यांची आहे तेव्हा नियम पण त्यांचेच असणार. मान्य करायलाच पाहिजे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

इंग्रजी विधानांचा भलताच मराठी अर्थ?

चेतन सुभाष गुगळे
Sat, 04/30/2022 - 18:44 नवीन
www.misalpav.com/comment/1139440#comment-1139440 या प्रतिसादात जे छायाचित्र डकवलं आहे आणि त्यात जी इंग्रजीत लिहिलेली सुलभ विधाने आहेत आणि त्यापैकी ज्यांच्या भोवती चौकटी करुन त्यांकडे विशेषत्वाने लक्ष वेधले आहे - त्यांचे भाषांतर - मराठी भाषिकांना समजेल असे - खालीलप्रमाणे होईल. आर्या अस्वलेंना आश्चर्य वाटतंय की संघाच्या वरच्या फळीतले सर्व मराठी ब्राह्मण असूनही ते देशभर हिंदी भाषेकरिता आग्रही का आहेत? त्यांना प्रत्युत्तर देताना आकाश लिहित आहेत की त्याने (म्हणजे मूळ मराठी भाषिक असण्याने) त्यांना (म्हणजे संघाच्या प्रमुख नेत्यांना) काही फरक पडत नाही. त्यांना ज्याप्रमाणे चीनमध्ये हान घराण्याचं प्राबल्य त्यासम काहीतरी करायचं आहे. देशात कृत्रिमपणे का होइना पण एकात्मतेची समज रुजविण्याकरिता ते स्वभाषेचा (म्हणजे अर्थातच मराठीचा) त्याग करण्यास देखील तयार आहेत. प्रत्येकानेच संघराज्यवाद, भाषा आणि हिंदू (म्हणून स्वतंत्र) ओळख याबद्दलचे श्री. गोळवलकर आणि त्यांच्या (म्हणजे संघाच्या) इतर नेत्यांचे समग्र विचार वाचायला हवेत. इथे भाषा महत्त्वाची आहे जात नाही. तरी मूळ इंग्रजी विधानांमधून ज्यांना
या भाषिक वादाला आता जातीय वळण मिळतंय
असं ध्वनित होत असेल त्यांनी निदान स्वतःचं इंग्रजी - मराठी भाषांतराचं ज्ञान पाहता आपल्या स्थानिक + इंग्रजी या भाषिक पर्यायांचा पुनश्च एकदा विचार करणे फारच गरजेचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रंगीला रतन

साप साप म्हणुन भुई धोपटणे

रंगीला रतन
Sat, 04/30/2022 - 19:09 नवीन
साप साप म्हणुन भुई धोपटणे चालू आहे फक्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

चेतन गुगळे

उपयोजक
Sat, 04/30/2022 - 21:21 नवीन
इथे भाषा महत्त्वाची आहे जात नाही. चष्मा न लावता पाहिलात का हो फोटो? अस्वले बाईंनी ब्राह्मण असं स्पष्ट लिहिलंय. ते तसं लिहिण्याचं कारण स्पष्ट करा बघू. फक्त 'मराठी' असं का लिहिलं नाही अस्वलेंनी? की अर्धवट ज्ञानासोबत आता अर्धवट वाचनसुद्धा? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

कुपमंडूकयोजकजी कुठलाही चष्मा

रंगीला रतन
Sun, 05/01/2022 - 00:22 नवीन
कुपमंडूकयोजकजी कुठलाही चष्मा न लावताही त्या विधानात ब्राम्हणद्वेष दिसत नाही. तुम्ही कुठला चष्मा लावला ते सांगा. उगाच छाती पिटून रडू नका. असले फालतू धागे काढणे व त्यावर फालतू प्रतिसाद देणे तुमचा शौक असेल आमचा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक

विचारलंय कोणाला

उपयोजक
Sun, 05/01/2022 - 09:20 नवीन
पण मधेच घुसून आयडीप्रमाणे छपरी प्रतिसाद द्यायचाच. देत रहा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रंगीला रतन

तर्कवादी,

कॉमी
Sat, 04/30/2022 - 08:55 नवीन
तर्कवादी, तुमच्या हायपोथॅटिकल सिनेरीओ बद्दल. तुम्ही डेस्क जॉब असलेला व्यक्ती घेतला आहे. तो भारतभराचा डेमोग्राफीक निर्देशक होत नाही. पश्चिम बंगाल मधल्या केवळ ८% जनतेला इंग्लिश बोलता येते.सगळे स्थलांतरित डेस्क जॉब करणारेच असतील असे नाही. सर्वांना इंग्लिश येत असते तर वादाचे कारण उदभवलेच नसते- त्यामुळे तुमच्या हायपोथॅटिकल उदाहरणातल्या माणसाला व्यवस्थित इंग्लिश बोलता येते- हे माझ्या दृष्टीने पूर्ण चित्रदर्शक उदाहरण नाहीये. मी आकडेवारीवर विसंबु शकतो, एका उदाहरणावर माझे मत बनवू शकत नाही. तुमचे पुढचे असम्पशन आहे दीर्घकाळ वास्तव. सगळ्यांचे तसे उद्दिष्ट नसते. काही लोक पुन्हा आपल्या राज्यात बदली घेण्यात धडपडत असतात आणि ४-५ वर्षात पुन्हाच जाणार असतात. त्यांनी काय करावे ? आणि हिंदी स्थानिक भाषेला रिप्लेस करेल हे जे तुम्ही म्हणता ती भीती इंग्रजी सोबत आहेच की. जर हिंदी मुळे स्थलांतरित व्यक्ती स्थानिक भाषा शिकायची तसदी घेणार नाही म्हणता, तर दुसरी भाषा इंग्रजी असेल आणि त्याचे इंग्रजीत काम होत असेल, तरी सुद्धा घेणार नाहीच कि. तुमचा स्थलांतरित माणूस बघा कि, तो तामिळ शिकला, पण त्याआधी त्याचे काम इंग्रजीत होत होते तरीही शिकला. पण हिंदी मध्ये काम होऊ लागले तर तो आणि त्याच्या पुढच्या पिढ्या शिकणार नाहीत असे तुम्ही assume केले. आज आपल्या रोजच्या बोलण्यातून हिंदी शब्द बाहेर ठेवायला किती प्रयास लागतात आणि इंग्रजी शब्द बाहेर ठेवायला किती प्रयास लागतात हे बघा.
  • Log in or register to post comments

कॉमी,

चेतन सुभाष गुगळे
Sat, 04/30/2022 - 12:07 नवीन
सर्वच मुद्दे बरोबर आहेत आणि त्यांची मांडणी देखील अचूक व संतूलित पणे केलेली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी
  • «
  • ‹
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा