Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by उपयोजक on Mon, 04/11/2022 - 18:52
तीन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत एक विनंती केली की वेगवेगळ्या राज्यांमधल्या असमान मातृभाषा असणार्‍या लोकांनी एकमेकांशी संवाद साधताना इंग्रजीऐवजी हिंदी भाषा वापरावी. https://www.google.com/amp/s/indianexpress.com/article/india/people-different-states-should-speak-hindi-not-english-shah-7858861/lite/ या अनावश्यक विनंतीला अहिंदी राज्यांमधे साहजिकच विरोध होतो आहे. विशेषत: दक्षिणेकडच्या राज्यांमधे. आता ज्या लोकांची मातृभाषा हिंदीच आहे त्यांना या विनंतीबद्दल काहीच आक्षेप नसणारेय.उलट त्यांचा आयता फायदाच होईल. आता प्रश्न असे आहेत. १. दोन राज्यांमधील असमान भाषिकांनी कोणत्या भाषेत एकमेकांशी बोलावं अशी विनंती गृहमंत्री का करत आहेत? लोकांनी कोणत्या भाषेत बोललं पाहिजे हे गृहखात्याच्या अखत्यारीत येतं का? २. या विनंतीला दक्षिणेकडच्या राज्यातले लोक सकारात्मक प्रतिसाद देतील असा भ्रम गृहमंत्र्यांना का झाला असावा? की ही विनंती हिंदीतून बोलू शकणार्‍या अहिंदी राज्यांतल्या लोकांसाठीच आहे? अशी विनंती केल्यावर ज्यांना हिंदी येत नाही ते लगेच हिंदी शिकून घेतील हा भ्रम गृहमंत्र्यांना का झाला असावा? ३. या विनंतीमागे कारण काय असावं? हिंदी पट्ट्यातल्या लोकांची सोय व्हावी? कारण हिंदी पट्ट्यातले लोक "हम तो पापी पेट के लिए आए हैं भाई" हे रडव्या चेहर्‍यानं सांगून अहिंदी भाषिकांना 'आमची सोय बघा' असंच सांगू पाहतात. हिंदीभाषिक अहिंदी राज्यातल्या भाषा शिकायला राजी नसतात. पण अहिंदी भाषिकांनी मात्र हिंदी शिकावी ही अपेक्षा बाळगतात. हे हिंदी पट्ट्यातले लोक हिंदीतर भाषा शिकणार कधी? ४. समजा दक्षिणभारतीय राज्यांनी किंवा ईशान्येकडच्या राज्यांनी एकत्र येऊन त्यांची एकच सामायिक बोलीभाषा निर्माण करुन हिंदीला कडवे आव्हान निर्माण केले तर? मग काय करतील अमित शहा? ५. इंग्रजीला अमित शाह यांचा विरोध का? इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे. कमालीची ताकदवान भाषा आहे.आंतरराष्ट्रीय भाषा आहे. उपयोगाची भाषा आहे. असं असताना ती न वापरता हिंदी का वापरायची?
  • Log in or register to post comments
  • 105993 views

प्रतिक्रिया

Submitted by sunil kachure on Sun, 04/17/2022 - 23:34

In reply to लेखमाला वाचली. धन्यवाद. by चेतन सुभाष गुगळे

Permalink

भाषिक अस्मिता

तामिळी लोकांची भाषिक अस्मिता का तीव्र आहे .त्यांचा हिंदी लं विरोध का आहे. ह्याचा इतिहास बघण्याच काही कारण नाही. हिंदी भाषा आणि उत्तरेतील आक्रमण थोपण्यास त्यांची भूमिका बिगर हिंदी राज्यांच्या हिताची आहे. आपल्या पण हिताची आहे. बिगर हिंदी राज्यांनी इंगर्जी वर प्रभुत्व मिळवावे. बिगर हिंदी राज्यातील राज्य सरकार नी वाद घालण्यात वेळ न घालवता. सर्व जनता इंग्रजी भाषा शिकेल असे शिक्षण धोरण आखून त्याची अंमलबजावणी करावी. दक्षिण भारत आणि बाकी बिगर हिंदी राज्य. ह्यांच्या मधील भाषेची अडचण दूर होईल. दुसऱ्या देशात,कॉर्पोरेट क्षेत्रात सर्व च ठिकाणी इंग्लिश उपयोगी पडेल. पण हिंदी स्वीकारली तर उत्तर भारतातील बेरोजगार,बेशिस्त लोकांचे लोंढे बिगर हिंदी राज्यांचे नुकसान करतील. भारतीय भाषा वैगरे भावनिक पॉइंट मध्ये काही अर्थ नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by Trump on Sun, 04/17/2022 - 23:41

In reply to लेखमाला वाचली. धन्यवाद. by चेतन सुभाष गुगळे

Permalink

डोळस पाठिंबा

आताच मराठी माणसांनी नीट डोळे उघडून पाह्यला हवे अन्यथा दाक्षिणात्यांच्या हिंदी विरोधा अंध पाठिंबा देणे म्हणजे देशाच्या विभाजनवादी वृत्तीस खतपाणी घालणे ठरेल.
श्री गुगळे, तुमचे मत बरोबर आहे. येथे मराठीभाषीक माझ्या समजानुसार, दक्षिण भारतीयांना फक्त हिंदी भाषेसंदर्भात डोळस पाठिंबा देत आहेत. हिंदी भाषेला विरोध म्हणजे भारताला विरोध असले काही म्हणु नका, अगदी सरसटीकरण आहे. -- जशी शिवसेनावाले, कोणतीही धाड बसली किंवा थोडी टिका झाली की महाराष्ट्राचा अपमान तसल्या प्रकारचे तुमचे विधान आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by चेतन सुभाष गुगळे on Wed, 04/20/2022 - 00:14

In reply to डोळस पाठिंबा by Trump

Permalink

ज्या प्रतिसादाखाली हे लिहिले

ज्या प्रतिसादाखाली हे लिहिले आहे त्या चौथा कोनाडा यांच्या प्रतिसादातील लिंक द्वारे उघडणारे लेख वाचा. तमिळ अस्मिता - हिंदी विरोध - स्वतंत्र द्रविड राज्याची मागणी या मुद्यांचा परस्परसंबंध त्यांच्या लेखमालेत आपल्याला सापडेल. माझा प्रतिसाद त्याच संदर्भाने आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by उपयोजक on Tue, 04/19/2022 - 12:05

In reply to लेखमाला वाचली. धन्यवाद. by चेतन सुभाष गुगळे

Permalink

धन्य आहात चेतन गुगळे

दाक्षिणात्यांच्या हिंदी विरोधा अंध पाठिंबा देणे म्हणजे देशाच्या विभाजनवादी वृत्तीस खतपाणी घालणे ठरेल. तुमच्या अर्धवट ज्ञानाची आणि दक्षिण भारतीयांबद्दलच्या तिरस्काराची व्याप्ती वाढत चालली आहे. दक्षिण भारतीयांचा खास करुन तमिळ लोकांचा हिंदीच्या सक्तीला विरोध आहे. हिंदी शिकण्याला नाही. खाली दक्षिण भारत हिंदी प्रचार सभेचं संकेतस्थळ दिलं आहे. ते जरा बघून घ्या. या संस्थेतर्फे हिंदीच्या विविध स्तरांवरच्या परीक्षा घेतल्या जातात. या संस्थेची कार्यालये आणि कार्यविस्तार तमिळनाडू ज्याच्याबद्दल तुमच्या मनात तीव्र आकस आहे त्या राज्यातही आहे बरं का! https://www.dbhpscentral.org/ केरळ,कर्नाटक,तेलंगण आणि आंध्र या चार दक्षिण भारतीय राज्यांमधे शाळेत हिंदी शिकवली जाते बरं का! मी स्वत: कितीतरी दक्षिण भारतीयांना हिंदी शिकवतो. तरीही माझा हिंदीच्या सक्तीला कडाडून विरोध आहे. मी दक्षिण भारतीय नाही. आता मला काय म्हणणार? विभाजनवादी की अजून काही? तुमची आणि तुमच्यासारख्या दक्षिण भारतीय भाषा शिकण्याची कटकट नको असणार्‍या उत्तरभारतीयांची सोय व्हावी म्हणून दक्षिण भारतीयांनी हिंदी शिकायचंय का? आणि दक्षिण भारतीयांनी हिंदी शिकायला अजून विरोध केला तर तुम्ही काय करणार? काय ताकद आहे तुमची? काय बिघडवणार तुम्ही दक्षिण भारतीयांचं?
  • Log in or register to post comments

Submitted by चेतन सुभाष गुगळे on Tue, 04/19/2022 - 23:54

In reply to धन्य आहात चेतन गुगळे by उपयोजक

Permalink

तुमच्याअर्धवट ज्ञानाची

तुमच्या
अर्धवट ज्ञानाची
आणि दक्षिण भारतीयांबद्दलच्या तिरस्काराची व्याप्ती वाढत चालली आहे.
असल्या द्वेषपूर्ण वैयक्तिक प्रतिसादाने तुमच्या विचारांची हीन पातळी दिसून येते तेव्हा ते टाळा. माझ्या ज्ञानाला अर्धवट ठरविण्याआधी मी ज्या प्रतिसादाखाली हे लिहिले आहे त्या चौथा कोनाडा यांच्या प्रतिसादातील लिंक द्वारे उघडणारे लेख वाचा. तमिळ अस्मिता - हिंदी विरोध - स्वतंत्र द्रविड राज्याची मागणी या मुद्यांचा परस्परसंबंध त्यांच्या लेखमालेत आपल्याला सापडेल. माझा प्रतिसाद त्याच संदर्भाने आहे. दक्षिण भारतीयांच्या तिरस्काराबद्दल - लोकल रामू नावाची एक वेबसाईट ज्यावर एक ठराविक रक्कम भरून आपण घरगुती वस्तू / उपकरणे यांच्या सेवा दुरुस्ती बद्दल कारागीर बोलवू शकतो. मी देखील असा कारागीर बोलाविला. पुण्यातील पिंपरी चिंचवड या भागात. हा कारागिर येऊन दुरुस्ती करुन गेला पण पुन्हा उपकरण खराब झाले पुन्हा येऊन दुरुस्ती करुन गेला आणि त्यानंतर पुन्हा उपकरण खराब झाले. प्रत्येक वेळी त्याने मोठी रक्कम माझ्याकडून घेतली. त्या कारागीराची तक्रार करण्याकरिता मी लोकल रामूला ईमेल केला तर काहीच उत्तर नाही. मग मी त्यांच्या संपर्क क्रमांकावर संपर्क केला तर त्यांच्याकडे संपर्क भाषा म्हणून दक्षिण भारतीय आणि इंग्रजी इतकेच पर्याय उपलब्ध. हिंदी नाही आणि मराठी देखील नाही. तरी मी इंग्रजीत त्यांचेसोबत संभाषण केले. त्यात त्यांचे इंग्रजीही फारसे चांगले नाही आणि तक्रार नोंदविल्यावर पुढे काहीच कार्यवाही नाही. अर्थात त्यांची अकार्यक्षमता हा वेगळा विषय आहे परंतु महाराष्ट्र राज्यातील पुणे शहरातील एका उपनगरात सेवा देऊन आर्थिक फायदा कमविणार्‍या या बंगळुरू स्थित संस्थेने ग्राहकांना हिंदी आणि / किंवा मराठी असे पर्याय न देता फक्त इंग्रजी व दक्षिणी भाषांचा पर्याय देणे हे तुम्हाला तरी योग्य वाटते का? अर्थात हे एकच उदाहरण नाही. मला असे अनेक अनुभव आले आहेत. मी या वृत्तीचा तिरस्कार करतो आणि ज्या लोकांमध्ये अशी वृत्ती आहे त्यांचा. ते कोणत्या वंश / प्रदेशाचे आहेत याचेशी त्याचा संबंध नाही. हे जर असे एखाद्या पंजाबी / गुजराथी कंपनीने केले असते तरी मला त्यांचा देखील तितकाच तिरस्कार वाटला असता.
दक्षिण भारतीयांचा खास करुन तमिळ लोकांचा
हिंदीच्या सक्तीला विरोध
आहे. हिंदी शिकण्याला नाही.
धाग्याच्या विषयात जो मूळ उल्लेख आहे तो सक्तीचा आहे का? आवाहन ह्या शब्दाचा अर्थ विनंती होतो की सक्ती? मराठीचे इतपत बेताचे ज्ञान तुम्हाला जर नसेल तर ते अर्धवट पेक्षाही कमी आहे असे म्हणावे लागेल.
केरळ,कर्नाटक,तेलंगण आणि आंध्र या चार दक्षिण भारतीय राज्यांमधे शाळेत हिंदी शिकवली जाते बरं का!
ते आम्हालाही माहिती आहे की या लोकांना हिंदी येतेच. फक्त ज्याला इंग्रजी किंवा स्थानिक भाषा येत नाही त्याला हा हिंदीचा पर्याय मुद्दामच न देता त्याची अडवणूक करणं हा यांचा उद्देश.
तुमची आणि तुमच्यासारख्या दक्षिण भारतीय भाषा शिकण्याची कटकट नको असणार्‍या उत्तरभारतीयांची सोय व्हावी म्हणून दक्षिण भारतीयांनी हिंदी शिकायचंय का?
हिंदी ऐवजी इंग्रजी वापरल्याने ह्या कटकटीचं काय होतं?
आणि दक्षिण भारतीयांनी हिंदी शिकायला अजून विरोध केला तर तुम्ही काय करणार? काय ताकद आहे तुमची? काय बिघडवणार तुम्ही दक्षिण भारतीयांचं?
आवाहन केलं आहे अमित शाह यांनी, त्याला विरोध दाक्षिणात्यांचा आणि या विरोधाला पाठिंबा तुमचा. या सगळ्याबद्दल काथ्याकूट सदरात धागा काढला तुम्ही. त्यावर अमित शाह यांचं आवाहन चूकीचं का नाही यावरचे मुद्दे मी मांडले जे काथ्याकूट या सदराखाली अपेक्षितच. एखाद्याचं काहीतरी बिघडवणं, तसे करण्याची ताकद काय आहे? वगैरे गुंडगिरी छाप मुद्यांना निदान माझ्याकडे तरी काही थारा नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 04/20/2022 - 07:52

In reply to तुमच्याअर्धवट ज्ञानाची by चेतन सुभाष गुगळे

Permalink

त्या कारागीराची तक्रार

त्या कारागीराची तक्रार करण्याकरिता मी लोकल रामूला ईमेल केला तर काहीच उत्तर नाही. मग मी त्यांच्या संपर्क क्रमांकावर संपर्क केला तर त्यांच्याकडे संपर्क भाषा म्हणून दक्षिण भारतीय आणि इंग्रजी इतकेच पर्याय उपलब्ध. हिंदी नाही आणि मराठी देखील नाही. तरी मी इंग्रजीत त्यांचेसोबत संभाषण केले. महाराष्ट्रात मी कोणालाही संपर्क केला किंवा माझ्याशी कोणी संपर्क केला तर मी फक्त मराठीतच बोलतो. समोरचा इतर भाषेत बोलत असेल तर तिला/त्याला शुद्ध मराठीत मराठीतच बोलण्यास सांगतो. बहुतेक वेळा ते मराठीत बोलतात किंवा मराठी बोलणाऱ्याकडे संभाषणाची सूत्रे सोपावतात. मराठी बोलण्यास नकार दिला तर मी संभाषण थांबवितो.
  • Log in or register to post comments

Submitted by उपयोजक on Sat, 04/30/2022 - 08:03

In reply to तुमच्याअर्धवट ज्ञानाची by चेतन सुभाष गुगळे

Permalink

म्हणजे तुम्ही

चुकीची , अर्धवट माहिती लिहिणार. ती बरोबरच आहे यावर ठाम राहून आपला हेका चालवणार. आणि ते दाखवून दिलं तर लगेच इतरांच्या विचारांची पातळी ठरवणार? तुमचा हेका असाच सुरु ठेवा. मी मात्र जमेल तितका हिंदीसक्तीविरोध करतच राहीन. विशेषत: उत्तरभारतीयांच्या सोयीसाठी हिंदी शिकू नका इतके आवाहन अहिंदी लोकांना नक्की करेन. दक्षिण भारतीयांचा एखाददुसरा अनुभव वाईट आला म्हणून झाडून सगळे द. भा हिंदीद्वेष्टे हा शोध लावण्यासाठी किती घाई केलीत तुम्ही? आणि बरोब्बर सगळे वाईट अनुभव तुम्हाला द.भारतीयांबद्दलच कसे काय आले हो? :) मग जर तुम्ही द.भा च्या गळ्यात हिंदी मारण्यासाठी सक्रियपणे काहीच करु शकत नसाल तर मग तुमचा हिंदी हेका काहीच कामाचा नाही. उगाच ऊर्जा वाया घालवताय आंजावर लिहून.
  • Log in or register to post comments

Submitted by चेतन सुभाष गुगळे on Sun, 04/17/2022 - 20:12

Permalink

राज ठाकरे यांच्या वाहनाची नंबर प्लेट

https://akm-img-a-in.tosshub.com/indiatoday/styles/photo_slider_753x543/public/images/photogallery/201211/7_111512092545.jpg?e4IkoVlG3rO6XirhpcJR7IpfCJnBtlsQ Image removed. ही नंबर प्लेट देवनागरीत लिपीत का? इंग्रजी ला विरोध म्हणून का? मग देवनागरीत टाकली म्हणजे फक्त मराठी भाषिकांनाच वाचता यावी म्हणून का? तसे असेल तर दक्षिण भारतात त्यांच्या लिपीत टाकली तर चालेला का? नाही ना? मग तरीही बिनदिक्कत टाकली आहे. का? तर कारण असे की ही देवनागरी लिपी हिंदी भाषिकांना सहज वाचता येते म्हणजेच हिंदी ही राष्ट्रभाषा अशी सोयीस्कर भूमिका या नंबर प्लेट मागे दिसते. अन्यथा जर तुमचा हिंदी भाषेला विरोध आहे आणि द्वितीय भाषा म्हणून तुम्ही इंग्रजी चालवून घेत असाल तर तुम्हाला नंबर प्लेट इंग्रजी भाषेतच लिहायला हवी. देशातल्या प्रत्येकाला तुमची स्थानिक भाषा येतेच का?
  • Log in or register to post comments

Submitted by sunil kachure on Sun, 04/17/2022 - 20:39

In reply to राज ठाकरे यांच्या वाहनाची नंबर प्लेट by चेतन सुभाष गुगळे

Permalink

९

हे मराठी मध्ये लिहले आहेत हिंदी ,देव नागरी कोठून मध्येच आणली . तुमचे खूप प्रतिसाद योग्य आहेत पण हा राज ठाकरे च्या गाडीच्या नंबर च संबंध हिंदी शी जुळवणे काही योग्य नाही. गुजराती मध्ये आकडे वेगळेच लिहल जातात . कित्येक गुजरात मधील गाड्यावर गुजराती मध्ये नंबर प्लेट असतील. ते आकडे तर हिंदी भाषा असणाऱ्या लोकांस पण समजणार नाही मग ह्या वरून गुजराती हिंदी द्वेष करणारे आहेत असा संबंध लावायचा का?
  • Log in or register to post comments

Submitted by चेतन सुभाष गुगळे on Sun, 04/17/2022 - 20:54

In reply to ९ by sunil kachure

Permalink

हे मराठी मध्ये लिहले आहेत

हे मराठी मध्ये लिहले आहेत हिंदी ,देव नागरी कोठून मध्येच आणली .
फक्त स्थानिक भाषेत नंबर प्लेट लिहायला परवानगी नाही. मूख्य नंबर प्लेट देशभर सर्वांना समजावी म्हणून रोमन भाषेत आणि जर तुम्हाला स्थानिक भाषेत लिहायचीच असेल तर अतिरिक्त नंबर प्लेट तुम्ही स्थानिक भाषेत लिहू शकता. परंतु इथे राज ठाकरेंनी इंग्रजी विरोध दर्शविताना स्थानिक भाषेत लिहित नंबर प्लेट लिहिली आहे. मुख्य रोमन भाषेतली नंबर प्लेट न लावताच. आता मुद्दा असा की देशभर प्रत्येकाने असे केले म्हणजे मुख्य रोमन नंबर प्लेट न लावता फक्त स्थानिक भाषेतच नंबर प्लेट लिहिली तर? अर्थातच गुजराती आणि दक्षिण भारतीय असे करत नाहीत. कारण त्यांची लिपी त्या भाषिकांखेरीज इतरांना वाचता येत नाही आणि अपघात व इतर गुन्ह्यांमध्ये वाहन ओळखणे अशक्य होईल. मग राज ठाकरेंनी हे असे का केले? साधे उत्तर आहे - मराठी मध्ये जरी नंबर प्लेट असली तरी लिपी देवनागरी असल्याने इतरां देखीलना वाचता येईल असा युक्तिवाद करता येतो. दुकानावरच्या इंग्रजी पाट्यांना काळे फासतानाही त्यांनी हेच केले होते. त्यांच्या मराठी आग्रहाबरोबर त्यांनी अनेकदा हिंदी विरोध देखील दामटला तर कधी कधी इंग्रजी विरोध देखील. समजा दक्षिणात्यांनी हिंदी विरोधा सोबत इंग्रजी लिपीला देखील विरोध दर्शविला तर काय होईल? तिथल्या इंग्रजी भाषिक पाट्यांना काळे फासण्यात आले तर केवळ स्थानिक लिपीतल्या पाट्या वाचून आपल्याला काय कळणार? सांगायचा उद्देश असा की राज ठाकरे इंग्रजी विरोध करीत होते तेव्हा मराठी अक्षरे चालून गेली ती केवळ त्यांची व हिंदीची देवनागरी ही एकच लिपी असल्याने.
ते आकडे तर हिंदी भाषा असणाऱ्या लोकांस पण समजणार नाही
Image removed. समजतील फक्त पाच व आठ या अंकांमध्ये किरकोळ फरक आहे. https://i.pinimg.com/564x/8a/96/8b/8a968bd3b7f8d2ed56626be0a32d6bea.jpg
  • Log in or register to post comments

Submitted by sunil kachure on Mon, 04/18/2022 - 00:19

Permalink

मुंबई मधील च उदाहरणे घेतली तर

हिंदी भाषिक म्हणजे.यूपी,बिहारी,अखंड mp ह्या राज्यातील लोक सोडली तर बाकी गैर मराठी लोक मराठी शिकण्याचा प्रयत्न करतात खूप लोक तर मराठी बोलतात पण खूप गैर मराठी वरील राज्य सोडून मराठी समजतात पण. गुजराती,राजस्थानी तर लवकर मराठी शिकतात. पाच सहा वर्ष इथे राहणारा असेल तरी मराठी समजतात. पण वरील राज्यातील बहुतांश लोक दोन दोन पिढ्या इथे राहून पण मराठी समजत नाहीत. मग अशा घामेंडी वृत्ती चा राग येणे साहजिक आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Mon, 04/18/2022 - 00:24

In reply to मुंबई मधील च उदाहरणे घेतली तर by sunil kachure

Permalink

+१

+१ अमीताभ बच्चन ते रस्त्यालरील भाजीवाला एकजात वृत्तीसारखी. मराठी शिकायची नाही म्हणजे नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by Trump on Mon, 04/18/2022 - 00:31

In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली

Permalink

चुक

श्री बच्चन मराठी बोलु शकतात. विनाकारण सरसकट द्वेष थांबवा.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Mon, 04/18/2022 - 00:47

In reply to चुक by Trump

Permalink

ते वाचत आहेत सरळ दिसतंय. अशा

ते वाचत आहेत सरळ दिसतंय. अशा प्रकारे ते मॅंडरीन, आफ्रिकन नी मल्याळम हा बोलू शकतात. ऊगाच खोटं पसरवणं थांबवा. “लाभले भाग्य अभ्यास बोलतो मराठ……
  • Log in or register to post comments

Submitted by Trump on Mon, 04/18/2022 - 00:58

In reply to ते वाचत आहेत सरळ दिसतंय. अशा by अमरेंद्र बाहुबली

Permalink

माझ्या माहितीप्रमाणे त्यांना मराठी येते.

भाषण वाचुनच करतात. उच्चार एकदम स्पष्ट आहेत. माझ्या माहितीप्रमाणे त्यांना मराठी येते. जर तुम्हाला लहानपणापासुन मराठी शिकेल्या माणसाइतके कौशल्य हवे असेत, तर बहुदा त्यांच्याकडे नसेल. ही पहा सुनबाई
  • Log in or register to post comments

Submitted by उपयोजक on Tue, 04/19/2022 - 12:09

In reply to चुक by Trump

Permalink

बच्चन

श्री बच्चन मराठी बोलु शकतात. विनाकारण सरसकट द्वेष थांबवा. साहित्य संमेलनातलं त्यांचं भाषण आहे. त्यात ते म्हणाले "लाभले भाग्य अभ्यास बोलतो मराठी" लिहून दिलेलं असूनही ही अवस्था यांची
  • Log in or register to post comments

Submitted by sunil kachure on Tue, 04/19/2022 - 15:05

In reply to बच्चन by उपयोजक

Permalink

जया बच्चन

हिचा एक किस्सा आठवत आहे .मराठी आणि महाराष्ट्र द्वेषाचा. लोकसभेत जया बच्चन बोलत होती जेव्हा राज ठाकरे नी रेल्वे मध्ये हिंदी भाषिक घुसवले जातात त्या विरुद्ध आंदोलन केले होते त्या वेळी.. ह्या जया नी मुंबई केंद्र शासित करा अशी मागणी केली लोकसभेत. त्या वेळी मुलायम सिंग जी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष होते. जशी अचानक जया नी मुंबई केंद्र शासित करण्याची मागणी केली. मुलायम सिंग जी लगेच उभे राहिले आणि त्यांनी सरळ विरोध केला. समाजवादी पक्ष मुंबई केंद्र शासित करण्याला विरोध करतो आणि जया जे बोलत आहे ते तिचे पर्सनल मत आहे. समाजवादी पक्ष त्याच्या शी सहमत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by चेतन सुभाष गुगळे on Wed, 04/20/2022 - 10:33

In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली

Permalink

श्री. अमिताभ बच्चन यांनी

श्री. अमिताभ बच्चन यांनी मराठी का शिकावं हे काही कळलं नाही. इथे इंग्रजी की हिंदी ही चर्चा चालू असताना हिंदी विरोधकांनी स्थानिक भाषा अथवा इंग्रजी असा पर्यायास पसंती दिली आहे. या भाषा द्विसूत्री नुसार संवाद साधण्याचे ठरवले तर श्री. अमिताभ बच्चन यांची काहीच अडचण होणार नाही. समोरचा त्यांना म्हणाला की मला तुमची हिंदी कळत नाही तर ते अस्खलित इंग्रजीत बोलतीलच की. https://en.wikipedia.org/wiki/Amitabh_Bachchan#Early_life Bachchan was educated at Boys’ High School & College, Allahabad; Sherwood College, Nainital; and Kirori Mal College, University of Delhi. त्यांनी चूकीचं मराठी वाचल्याच्या व्हिडीओ लिंक्स देण्यापेक्षा मी त्यांनी परिणामकारक इंग्रजी (न वाचता) बोलल्याची लिंक देऊ शकतो. https://youtu.be/rkOySwlEtVk?t=98
  • Log in or register to post comments

Submitted by कॉमी on Wed, 04/20/2022 - 10:40

In reply to श्री. अमिताभ बच्चन यांनी by चेतन सुभाष गुगळे

Permalink

+१

खरंय! ज्यांना इंग्लिश येतं अश्या कुणीच मराठी शिकण्याची गरज नाही, असे त्या लॉजिकने मानावे काय ?
  • Log in or register to post comments

Submitted by sunil kachure on Wed, 04/20/2022 - 13:01

In reply to श्री. अमिताभ बच्चन यांनी by चेतन सुभाष गुगळे

Permalink

तुमच्या लॉजिक प्रमाणे

तुमच्या लॉजिक प्रमाणे आणि आमच्या लॉजिक प्रमाणे त्यांनी मराठी किंवा इंग्लिश च बोलले पाहिजे. हिंदी cha marathi भाषिक राज्यात काय संबंध. पण ते हिंदी सिनेमे,सिरियल,मराठी भाषिक राज्यात राहून करतात. हे लॉजिक प्रमाणे चूक. असे पण आता बॉलिवूड ची आणि हिंदी भाषिक लोकांची सिनेमा उद्योगातील मक्तेदारी संपली आहे. दक्षिण भारतीय आणि बाकी भारतीय भाषेतील चित्र पट खूप उत्तम दर्जाचे आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by sunil kachure on Mon, 04/18/2022 - 01:15

Permalink

विदर्भ

विदर्भ बाबत चेतन ह्यांनी व्यक्त केलेल्या मतातून विदर्भ वेगळा हवा अशी मागणी करणाऱ्या मागे कोणता समाज आहे हे गुपित उघड होते. पूर्वी पण खूप लोकांनी ही शंका घेतली आहे . विदर्भ वेगळा करून महाराष्ट्र चे तुकडे व्हावेत असे प्रयत्न मारवाडी समाज करत आहे. वेगळा विदर्भ चे सूत्रधार हाच मारवाडी समाज आहे. महारष्ट्र विषयी इथेच ह्याच धाग्यावर किती द्वेष पूर्ण मत व्यक्त झाली. १)मुंबई मुळे महाराष्ट्र श्रीमंत आहे. मुंबई महाराष्ट्र ची राजधानी आहे तुम्हाला उठा ठेवी करायची गरज काय. २) मुंबई ची प्रगती . गुजराती,मारवाडी,आणि हिंदी भाषिक लोकांनी केला. ब्रिटिश लोक हेच मुंबई चे विकास करते आहेत. बाकी लोकांनी फक्त इथे येवून स्वार्थ साधला हे सोयीस्कर विसरले. ३)विदर्भ वेगळा झाला तर २४ तास वीज महाराष्ट्रात नसेल. म्हणजे ह्या राज्याचे तुकडे झाले पाहिजेत ही इच्छा. ४), हिंदी भाषिक मजूर आहेत म्हणून येथील उद्योग आहेत. परत महारष्ट्र च द्वेष. जगात खूप मजूर उपलब्ध आहेत. हिंदी भाषिक च हवेत काही गरज नाही. आणि जगात खूप उद्योगपती फायदा होत असेल तर उद्योग उभे करायला तयार आहेत.गुजराती आणि मारवाडी च हवेत असे काही नाही. हे सत्य परत विसरले. पण योग्य हवामान,योग्य शांत वातावरण,पाणी वीज ह्यांची सोय .प्रचंड समुद्र किनारा हे मात्र सर्व ठिकाणी उपलब्ध नाही . हे फक्त महाराष्ट्र आणि दक्षिणेतील राज्य इथेच उपलब्ध आहे. राजस्थान लं पाकिस्तान लागून आहे वाळवंटी प्रदेश आहे,पावसाची कमी आहे .विषम हवामान आहे.पाण्याची कमी आहे.शिक्षित लोकांची कमी आहे. किती ठरवले तरी आणि देशात मारवाडी च उद्योगपती असले तरी. ते राजस्थान लं प्रगत राज्य बनवू शकणार नाहीत. ना तिथे राहून ते श्रीमंत होणार आहेतं त्या साठी महारष्ट्र किंवा दक्षिणेतील राज्य हाच एकमेव पर्याय आहे. यूपी,बिहार मध्ये स्वस्त मजूर आहेत तर मग त्याच राज्यात उद्योगपती उद्योग का उभारत नाहीत. मुंबई ,पुणे आणि महाराष्ट्रात मध्ये च का उद्योग उभे करतात. महारष्ट्र वर प्रेम हे कारण नक्कीच नाही. त्यांचे उद्योग फक्त इथेच उभे राहू शकतात आणि प्रगती करू शकतात . हे सत्य मात्र तर कधीच स्वीकारत नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Mon, 04/18/2022 - 01:21

In reply to विदर्भ by sunil kachure

Permalink

सहमत. चेसुकू सरांची ईच्छा आहे

सहमत. चेसुकू सरांची ईच्छा आहे मराठीच महत्व कमी व्हावं अशी
  • Log in or register to post comments

Submitted by चेतन सुभाष गुगळे on Mon, 04/18/2022 - 01:29

In reply to सहमत. चेसुकू सरांची ईच्छा आहे by अमरेंद्र बाहुबली

Permalink

बाहुबली तुम्ही बाभळी आहात का?

बाहुबली तुम्ही बाभळी आहात का?
चेसुकू सरांची ईच्छा आहे मराठीच महत्व कमी व्हावं अशी
सदस्यनाम नीट लिहिता येत नाही. कॉपी पेस्ट चा पर्याय देखील आहे. काय तुम्ही मराठीची शान वाढविणार. इंग्रजी ऐवजी हिंदी वापरल्याने मराठीचं महत्त्व कसं कमी होतं यावर एक प्रबंध सादर करुन पीएचडी मिळवा.
  • Log in or register to post comments

Submitted by चेतन सुभाष गुगळे on Mon, 04/18/2022 - 01:27

In reply to विदर्भ by sunil kachure

Permalink

तद्दन खोटा आरोप

विदर्भ बाबत चेतन ह्यांनी व्यक्त केलेल्या मतातून विदर्भ वेगळा हवा अशी मागणी करणाऱ्या मागे कोणता समाज आहे हे गुपित उघड होते. पूर्वी पण खूप लोकांनी ही शंका घेतली आहे . विदर्भ वेगळा करून महाराष्ट्र चे तुकडे व्हावेत असे प्रयत्न मारवाडी समाज करत आहे. वेगळा विदर्भ चे सूत्रधार हाच मारवाडी समाज आहे.
जांबुवंतराव धोटे (https://bolbhidu.com/jambuvantrao-dhote/) हेनाव कधी ऐकलं नाहीत का? हे पण मारवाडीच होते का? विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळा करण्याचा आणि मारवाडी समाजाचा काही एक संबंध नाहीये. पुराव्याखेरीज असंबद्ध विधाने करु नका.
२) मुंबई ची प्रगती . गुजराती,मारवाडी,आणि हिंदी भाषिक लोकांनी केला.
माझ्या मूळ प्रतिसादात मी मारवाडी शब्द वापरलेला नाहीये. तशीही मुंबईत मारवाडी नव्हे तर गुजराती समाजाची संख्या जास्त आहे. मारवाडी फार कमी.
ब्रिटिश लोक हेच मुंबई चे विकास करते आहेत. बाकी लोकांनी फक्त इथे येवून स्वार्थ साधला हे सोयीस्कर विसरले.
बाकीच्यांनी स्वार्थ साधला आणि इंग्रजांनी उपकार केलेत? कोहिनूरसह अजुन काय काय लुटून नेले आणि तुम्ही त्यांचीच एजंटगिरी करताय. राणी काय तुम्हाला कोहिनूर हिरा ईनाम देणार आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by उपयोजक on Tue, 04/19/2022 - 12:11

In reply to विदर्भ by sunil kachure

Permalink

sunil kachure

या प्रतिसादाशी सहमत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by sunil kachure on Mon, 04/18/2022 - 01:28

Permalink

समुद्र किनारा

समुद्र किनारा फक्त बिगर हिंदू भाषा असणाऱ्या राज्यांना च आहे. महाराष्ट्र आणि दक्षिण भारताला सर्वात जास्त आहे. विदेशी व्यापार ह्या बिगर हिंदी भाषिक राज्यांवर च अवलंबून आहे ह्या मध्ये गुजरात पण येतों आणि फायदा दिसायला लागला की गुजराती कधी ही पक्षांतर करतील. हे प्रदेश आहेत म्हणून विदेशी व्यापार आहे. त्या मुळे बिगर हिंदी भाषा असणाऱ्या राज्यांचा सन्मान ठेवा . त्यांच्या शिवाय उद्योग,व्यापार मध्ये भारताने प्रगती करणे शक्य च नाही. उगाच हिंदी थोपवू नका. त्या पेक्षा कोणती तरी बिगर हिंदी भाषा शिका.
  • Log in or register to post comments

Submitted by चेतन सुभाष गुगळे on Mon, 04/18/2022 - 01:34

In reply to समुद्र किनारा by sunil kachure

Permalink

मराठी चालेल?

त्या पेक्षा कोणती तरी बिगर हिंदी भाषा शिका.
मला मराठी उत्तम येते. या धाग्यावर सर्वात जास्त संख्येचे आणि लांबीचे प्रतिसाद माझेच आहेत. बोला या मराठीच्या जोरावर माझं संपूर्ण देशात काम होईल? इंग्रजी किंवा इतर कोणतीही परदेशी भाषा सुचवू नका. ज्यादिवशी दक्षिणी राज्ये मराठीला दुसरी भाषा म्हणून स्वीकारतील मी हिंदी आग्रह सोडून देईन. इथे कन्नड लोक मराठी कानडी वादात बेळगावात मराठी माणसांची डोकी फोडत आहेत त्यावर उपाय शोधा आधी.
  • Log in or register to post comments

Submitted by sunil kachure on Mon, 04/18/2022 - 01:53

In reply to मराठी चालेल? by चेतन सुभाष गुगळे

Permalink

कर्नाटक आणि महाराष्ट्र

ह्यांचा तो प्रश्न आहे आम्ही तो डोके फोडून सोडवू किंवा प्रेमाने बसून सोडवू. शेवटी आम्हीच सोडविणार आहोत.
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Sat, 04/23/2022 - 13:17

In reply to मराठी चालेल? by चेतन सुभाष गुगळे

Permalink

¶¶ ज्यादिवशी दक्षिणी राज्ये

¶¶ ज्यादिवशी दक्षिणी राज्ये मराठीला दुसरी भाषा म्हणून स्वीकारतील मी हिंदी आग्रह सोडून देईन. ¶¶ मुद्दा पटला, श्री चेतन सुभाष गुगळे जी. मराठीचा देश पातळीवर अशा पद्धतीने गवगवा केला तर हिंदी की इंग्लिश हा प्रश्न मिटून जाईल !
  • Log in or register to post comments

Submitted by sunil kachure on Mon, 04/18/2022 - 01:51

Permalink

हा विषय निघालाच नसता

बहुभाषिक देश असताना एकच भारतीय भाषेचं महत्व जाहीर पने भारताच्या गृह मंत्र्याने करणेच खूप चुकीचं आहे. ह्याचा दुसरा अर्थ बाकी भारतीय भाषा काही कामाच्या नाहीत असा होतो. हे वर्तन चुकीचंच होते.
  • Log in or register to post comments

Submitted by चेतन सुभाष गुगळे on Mon, 04/18/2022 - 09:37

In reply to हा विषय निघालाच नसता by sunil kachure

Permalink

ह्याचा दुसरा अर्थ बाकी भारतीय

ह्याचा दुसरा अर्थ बाकी भारतीय भाषा काही कामाच्या नाहीत असा होतो.
की इंग्रजी?
  • Log in or register to post comments

Submitted by sunil kachure on Mon, 04/18/2022 - 12:41

Permalink

दक्षिण भारतीय का जवळचे वाटत असतात

तुलना केली हिंदी भाषिक आणि दक्षिण भारतीय तर .. दक्षिण भारतीय जवळचे का वाटत असतात. 1)ते महाराष्ट्रावर त्यांची संस्कृती थोपत नाहीत.त्यांचे रीती रिवाज ते त्यांच्या पर्यंत च मर्यादित ठेवतात. २)त्यांची भाषा ,संस्कृती मराठी लोकांनी आत्मसात करावी अशी त्यांची बिलकुल प्रयत्न नसतात. ३) ते महाराष्ट्र मधील राजकारणात हस्तक्षेप करत नाहीत. ४) त्यांचे कोणतेच नेते इथे येवून राजकीय भाषण करत नाहीत. एकदम विचाराने mature samaj aahe. ह्याच्या विरुद्ध उत्तर भारतीय आहेत ते त्यांच्या संस्कृती चा जाहीर उदो उदो करतात. ते येथील राजकारणात हस्तक्षेप करतात. त्यांचे नालायक काहीच कामाचे नसलेले बिनडोक पुढारी इथे येवून महाराष्ट्र ल शहाणपण शिकवतात. महाराष्ट्र ची प्रगती आमच्या मुळे झाली असा बकवास ,बिनडोक विचार दक्षिण भारतीय करत नाहीत. पण पूर्ण उत्तर भारत महारष्ट्र आणि दक्षिण भारतावर च पूर्ण अवलंबून आहे तरी ह्या प्रगत राज्यांची प्रगती आमच्या मुळे झाली असेल बकवास दावे हे अशिक्षित लोक करत असतात.
  • Log in or register to post comments

Submitted by sunil kachure on Mon, 04/18/2022 - 12:48

In reply to दक्षिण भारतीय का जवळचे वाटत असतात by sunil kachure

Permalink

उत्तर भारत म्हणजे

पंजाब,हिमाचल,बंगाल,कश्मिर ,७ सिस्टर, आसाम ,ओरिसा सोडून बाकी सर्व राज्य Mp सहीत बाकी राहिलेली सर्व राज्य गुजरात उत्तर भारतात येत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by वेडा बेडूक on Wed, 06/28/2023 - 19:03

In reply to दक्षिण भारतीय का जवळचे वाटत असतात by sunil kachure

Permalink

४) त्यांचे कोणतेच नेते इथे येवून राजकीय भाषण करत नाहीत.

के सी आर आलेत.
  • Log in or register to post comments

Submitted by sunil kachure on Mon, 04/18/2022 - 22:13

Permalink

वाद कशासाठी?

देशांनी प्रगती करावी,सर्व राज्यांनी एक मेकाशी प्रेमाने राहवे,सर्व भाषांचा सन्मान व्हावा. आपल्यावर अन्याय होत आहे अशी भावना देशातील कोणत्याच व्यक्ती मध्ये निर्माण होवु नये...देश एकसंघ असावा. असेच महाराष्ट्र लं वाटते. ह्या सर्व बाबी ची जबाबदारी केंद्र सरकार ची आहे. आणि ही जबाबदारी पक्ष विरहित अडविम केंद्रात कोणत्या ही पक्षाचे सरकार आले,राज्यात कोणत्या ही पक्षाच सरकार अस्ले तरी जबाबदारी कोणी विसरू नये देशभर ग्रामीण भागात रोजगार,शेती आणि शेतीवर आधारित उद्योग ना मदत. देशभर ग्रामीण भागात सर्व सुविधा झाल्या पाहिजेत .जेणे करून लोक स्थलांतर करणार नाहीत . कोणत्याच राज्याला ,कोणत्याच भाषिक लोकांना असुरक्षित वाटणार नाही. ही काळजी घेतली जावी. उत्तर भारतात केंद्र सरकार नी सक्ती दाखवून विकास योजना राबवाव्यात . असुरक्षित वाटले की लोक विरोध करतात. महाराष्ट्रात खूप प्रमाणात बाहेरील लोक येतात त्या मुळे महाराष्ट्र अस्वस्थ होतो. जी राज्य प्रगती करतात त्यांची हीच अवस्था होते कारण समतोल विकास होत नाही. असुरक्षित वाटणे देशासाठी नक्कीच चांगले नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Tue, 04/19/2022 - 11:18

Permalink

भाषिक चर्चेच्या अनुषंगाने

भाषिक चर्चेच्या अनुषंगाने अवांतर एक होतं गाव. "महाराष्ट्र" त्याचं नाव. गाव खूप छान होतं, लोक खूप चांगले होते. "मराठी" भाषा बोलत होते, गुण्यागोविंदानं नांदत होते. त्यांचं मन खूप मोठ्ठं होतं. वृत्ती खूप दयाळू होती. दुखलं- खुपलं तर एकमेकांच्या हाकेसरशी धावून जायचे. आल्या-गेल्याला सांभाळून घ्यायचे. एकमेकांना साथ देऊन जगण्याचं गाणं शिकवायचे, महाराष्ट्रात होता एक भाग. "मुंबई" त्याचं नाव. मुंबईसुद्धा छान होती; महाराष्ट्राची शान होती. सर्वांच्या आकर्षणाची बाब होती. आजूबाजूचे सगळेच मुंबईसाठी धडपडत होते. इथं आले, की इथलेच होऊन राहत होते. "अतिथी देवो भव...!" या उक्तीनुसार महाराष्ट्रातील लोकांनी सर्वांचं आदरातिथ्य केलं. पाहुण्यांचा मान म्हणून मागतील ते देऊ लागले. हळूहळू परिस्थिती बदलू लागली. "अतिथी" जास्त आणि "यजमान" कमी झाले. मुंबई कमी पडू लागली, आजूबाजूला पसरू लागली. सगळ्यांचीच भाषा वेगवेगळी होती. मराठी आपली वाटत नव्हती. प्रश्न मोठा गहन होता,पण माणसं मात्र हुशार होती, दूरदृष्टीची होती. त्यांना एक युक्ती सुचली. दूरदेशीची परदेशातील भाषा त्यांना जवळची वाटली. त्यांना वाटलं आपली मुलं शिकतील, परदेशात जातील, उच्चशिक्षित होतील. सर्वांचाच,अगदी "महाराष्ट्राचा" ही विकास होईल, म्हणून त्यांनी याच भाषेतील शिक्षणाची सोय केली. आजूबाजूला या भाषेत बोलणारे पाहून मराठी माणसंही खंतावली. आपल्यालाही हे आलंच पाहिजे म्हणून याच भाषेत शिकू लागली, शिकवू लागली, आणि मग हळूहळू मराठी कोणीच शिकेना, मराठी कोणीच बोलेना, बोलीभाषा ही बदलली. सगळ्याचा नुसता काला झाला. शुद्ध, सुंदर मराठीचा लोप झाला. ? ? ? ? ? ? ? ? ? अशा या महाराष्ट्रातील एक छोटा मुलगा आपल्या आईबरोबर माफ करा हं........ आपल्या 'मम्मी' बरोबर एकदा वाचनालयात गेला. चुकून त्याचा हात एका पुस्तकावर पडलं, त्यानं ते उघडलं. पुस्तक शहारलं, पानं फडफडली, आनंदित झाली. त्यांना वाटलं, चला निदान आज तरी आपल्याला कोणी वाचेल. इतक्यात त्या मुलानं विचारलं, (त्याच्या भाषेत) "मम्मी" कोणत्या भाषेतलं पुस्तक आहे गं हे ?'' 'मम्मी' खूप सजग होती, मुलाचं हित जाणत होती, सगळं ज्ञान पुरवत होती. पुस्तक परत जागेवर ठेवत म्हणाली, "अरे, खूप पूर्वी म्हणजे तुझ्या आजोबांच्या वेळेस, "मराठी भाषा" प्रचलित होती; आता कोणी नाही ती बोलत. पुस्तक कोमेजलं, पानं आक्रसली, पानांपानांतून अश्रू ठिबकले; पण................... हळहळ वाटण्याचं काही कारण नव्हतं. कारण, आता मराठी साठी दुःखी होणारं काळीज कोणाचंच उरलं नव्हतं.!! महाराष्ट्राची शान "मराठी"भाषा!!! मला एकानी विचारले तू मराठीत का 'पोस्ट' टाकतो....??? आणि, मी त्यांना एवढंच म्हटलं, आमच्या घरात "तुळस"आहे, 'Money plant'नाही. आमच्या घरच्या स्त्रीया "मंदीरात" जातात, 'PUB' मध्ये नाही. आम्ही मोठ्यांच्या पायाच पडतो, त्यांच्या डायरेक्ट गळ्यात मिठी मारत नाही. आम्ही "मराठी" आहोत, आणि मराठीच राहणार !!! तूम्ही English मध्ये मेसेज केलात तरी मी रिप्लाय मराठीतूनच देतो, याचा अर्थ असा नाही की, मला English येत नाही, अर्थ असा आहे की, मी आपल्याला मराठी शिकवतोय. अरे गर्व बाळगा तुम्ही मराठी असल्याचा... "तुळशी" ची जागा आता 'Money Plant' ने घेतलीय...!! "काकी" ची जागा आता 'Aunti' घेतलीय...!!! 'वडील' जिवंतपणीच "डेड" झालेत. अजुन बरंच काही आहे, आणि तुम्ही आत्ताच Glad झाले....??? "भाऊ" 'Bro' झाला...!! आणि "बहीण " 'Sis'...!!! दिवसभर मुलगा "CHATTING" च करतो... नाही तर रात्री झोपताना Mobile वर 'SETTING' पण करतो...!!! दुध पाजणारी "आई" जिवंतपणीच 'Mummy'झाली.!! घरची "भाकर" आता कशी आवडणार हो... ५ रु. ची 'Maggi' आता किती "Yummy" झाली...!!! माझा मराठी माणूसच "मराठी" ला विसरू लागलाय.... आपली संस्कृती लोप पावण्यापुर्वी ती जपण्याचा निदान प्रयत्न तरी करा !!! सौजन्य: कायप्पा ढकलपत्र
  • Log in or register to post comments

Submitted by कॉमी on Tue, 04/19/2022 - 12:56

In reply to भाषिक चर्चेच्या अनुषंगाने by चौथा कोनाडा

Permalink

सगळं भाषेबद्दल असताना मध्येच

सगळं भाषेबद्दल असताना मध्येच स्त्रियांनी पब मध्ये जाण्याचा विषय का घुसाडला असेल बुवा ?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Tue, 04/19/2022 - 13:40

In reply to भाषिक चर्चेच्या अनुषंगाने by चौथा कोनाडा

Permalink

"रिकामी"ची जागा "खाली" झाली,

"रिकामी"ची जागा "खाली" झाली, "शिमग्या"ची रंगपंचमी झाली, "सवाल"च्या बाबतीत "प्रश्न"च नव्हता!
  • Log in or register to post comments

Submitted by sunil kachure on Tue, 04/19/2022 - 14:41

Permalink

भाषा

भाषा हा विषय खूप संवेदनशील आहे. धार्मिक संघर्ष जितके नुकसान करू शकतो त्या पेक्षा जास्त नुकसान भाषिक संघर्ष मुळे होईल. धर्माबाबत लोक जशी आक्रमक असतात तशीच ती भाषे विषयी असतात. आता च्या आधुनिक काळात प्रगत युरोपियन देशात सुद्धा भाषिक वादविवाद होत आहेत. कॅनडा मध्ये पण भाषेवरून वेगळा प्रदेश मागतील जातो . बांगला देश आणि पाकिस्तान वेगळेवेगळे झाले त्याला भाषा हेच कारण आहे. देशात 50% वर बिगर हिंदी लोक आहेत त्यांची भाषा हिंदी नाही. आणि ही सर्व राज्य अशा ठिकाणी वसली आहेत की त्यांच्या विना ,त्यांच्या मदती विना भारत प्रगती करूच शकणार नाही. ह्याचा अर्थ ते देशावर प्रेम करत नाहीत असा नाही.. पण हिंदी ची जबरदस्ती झाली तर मात्र विरोध होणारच च.. भले आता तमिळ सोडून बाकी राज्यांनी प्रतक्रिया दिली नाही ह्याचा अर्थ त्यांची संमती आहे असा नाही. हिंदी अशीच देशावर लादली तर मात्र बिगर हिंदी राज्य तीव्र विरोध करतील. बंगलोर, चेन्नई,मुंबई,पुणे,हैद्राबाद, कलकत्ता,अहमदाबाद,सुरत अशा अनेक बिगर हिंदी प्रदेशातील शहर च भारताचे पॉवर इंजिन आहेत. आणि ह्या प्रगत शहरात उत्तर भारतातील लोक पोट भरायला जात आहेत आणि त्या त्या शहरातील मूळ संस्कृती मध्ये बदल करत आहेत. आणि हे कोणाला आवडत नाही. प्रगती करणे म्हणजे गुन्हा करणे असे वाटायला लागले आहे. मुंबई सोडा प्रतेक बिगर हिंदी राज्यातील शहरात येणाऱ्या उत्तर भारतातील हिंदी लोकांमुळे असंतोष आहे. हिंदी लादणे हे फक्त कारण होईल आणि विरोध रस्त्यावर दिसेल.
  • Log in or register to post comments

Submitted by sunil kachure on Tue, 04/19/2022 - 16:15

Permalink

मुंबई मध्ये जे मराठी लोकांचे होत आहे

मुंबई मध्ये जे मराठी लोकांना त्रास दायक वाटत आहे. तसे अनेक शहरात तेथील स्थानिक लोकांना त्रास दायक वाटत आहे . बंगलोर ची प्रगती होत आहे देशभरातील लोक तिथे मोठ्या प्रमाणात जमा होत आहेत. पोट भरणे हाच एकमेव हेतू बंगलोर प्रगत होण्यासाठी कोणी तिथे जात नाही. कन्नड लोक पण सेना किंवा ठाकरे सारखा विरोध तिथे नक्कीच करणार. विविध देशात पण स्थानिक विरुद्ध बाहेरचे हा वाद वाढत च जाणार आहे स्थलांतर असावे पण किती? ह्याला मर्यादा असावी. अनियंत्रित स्थलांतरित लोकांमुळे मुंबई च नाही तर जग अस्वस्थ होत आहे. तशा हिंसक प्रतिक्रिया पण जग भर होत आहेत. स्थलांतर किती असावे ह्या वर नियम बनणे गरजेचे आहे... पूर्ण बिहार ,आणि पूर्ण यूपी मधील तरुण पिढी देशभर जात आहे आणि देशाच्या एकते ला ह्या यूपी बिहारी मुळेच धोका निर्माण होईल.. कोणाला आता पटणार नाही पण हे सत्य च आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Wed, 04/20/2022 - 15:02

Permalink

बंगळुरूमध्ये हिंदी बॅनरमुळे

बंगळुरूमध्ये हिंदी बॅनरमुळे जैनांवर हल्ला केला, पण अरेबिक मधील बॅनरवर का काहीच प्रतिक्रिया नाही ? - तेजस्वी सूर्या स्थानिक कन्नड भाषाप्रेमींना सवाल. https://www.dnaindia.com/india/report-deeply-hurt-by-attack-on-jains-over-hindi-banner-in-bengaluru-they-never-question-use-of-arabic-tejasvi-surya-2782844
  • Log in or register to post comments

Submitted by sunil kachure on Wed, 04/20/2022 - 20:44

In reply to बंगळुरूमध्ये हिंदी बॅनरमुळे by चौथा कोनाडा

Permalink

अमित शाह ह्यांचे वक्तव्य

हिंदी वापरा हे अमित शाह ह्यांचे वक्तव्य ह्याला जबाबदार आहे. बिगर हिंदी भाषा असलेली लोक अस्वस्थ झाली म्हणून हा प्रकार घडला असावा. आता पर्यंत कधीच असे घडले होते का? दर वर्षी हिंदी मध्येच जैन समाज बॅनर लावत असतील.
  • Log in or register to post comments

Submitted by उपयोजक on गुरुवार, 04/21/2022 - 08:09

Permalink

आता बोला

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by चेतन सुभाष गुगळे on गुरुवार, 04/21/2022 - 12:23

Permalink

https://www.loksatta.com

https://www.loksatta.com/sampadkiya/agralekh/mcd-demolition-in-jahangirpuri-delhi-mcd-run-bulldozer-over-illegal-buildings-in-jahangirpuri-zws-70-2896718/ या मारुतमाया मोहाचा एक भाग म्हणजे इतके दिवस मराठीच्या नावाने छाती पिटणाऱ्यांस मराठीतील मारुतीस्तोत्र न आठवता हनुमान चालीसा गोड वाटू लागली. उत्तर भारत तर हिंदी भाषकच. त्यामुळे तेथे हनुमान चालीसा पठण हे ओघाने आलेच.
  • Log in or register to post comments

Submitted by सौंदाळा on गुरुवार, 04/21/2022 - 12:29

In reply to https://www.loksatta.com by चेतन सुभाष गुगळे

Permalink

यावर मला असे वाटते की स्वतःची

यावर मला असे वाटते की स्वतःची देशपातळीवर दखल घेतली जावी म्हणूनच मारुतीस्तोत्राच्या ऐवजी हनुमान चालीसाची निवड केली असावी. तसाही आता राज ठाकरेंना अयोध्या दौरा पण करायचा आहे. त्यामुळे ते या सगळ्या खेळ्या व्यवस्थित प्लॅन करुनच करत आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by चेतन सुभाष गुगळे on गुरुवार, 04/21/2022 - 12:46

In reply to यावर मला असे वाटते की स्वतःची by सौंदाळा

Permalink

म्हणजे देश पातळीवर दखल घेतली

म्हणजे देश पातळीवर दखल घेतली जावी याकरिता हिंदीची गरज आहे तर... हिंदीला विरोध असल्यामुळेच दक्षिण भारतीय नेते देशपातळीवर पोचू शकत नाहीत. नरसिंह राव (पाच वर्षे) आणि देवेगौडा (दीड वर्षे) हे अपवाद वगळता पंतप्रधान पद दक्षिण भारतीय नेत्यांना मिळाले नाही. म्हणजे हिंदी विरोध = स्वतःचेच नुकसान असे हे समीकरण आहे. महाराष्ट्रातील शरद पवार, देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे ह्या तीन पक्षांच्या नेत्यांना पंतप्रधानपदाची आस असल्याने या पक्षांचा कोणताही मोठा नेता हिंदीविरोधात दिसत नाही. महाराष्ट्र काँग्रेस तर कधीही हिंदी विरोध करुच शकणार नाही. सोनियाजी इथे येऊन हिंदीत भाषणे करतात त्याऐवजी त्यांनी ती इंग्रजीत केली तर काँग्रेसच्या निवडून येणार्‍या लोकप्रतिनिधींची संख्या अजुनच झपाट्याने कमी होईल. रिपाई, समाजवादी आणि एमायएम देखील हिंदीविरोध करताना कधी पाहिले नाही. अबू आझमींनी तर कानाखाली खाल्ली पण शपथ हिंदीतच घेतली. आठवले देखील केंद्रीय मंत्री असल्याने हिंदीत मुलाखती देत असतात, कविता देखील करतात. त्यांच्या इंग्रजी कविता मी कधी ऐकल्या नाहीत. एकमेव पक्ष मनसे हाच महाराष्ट्रात हिंदी विरोध करण्याची शक्यता होती. राज ठाकरेंच्या हनुमान चालिसा पठण घोषणेमुळे तीदेखील विरुन गेलीय.
  • Log in or register to post comments

Submitted by sunil kachure on गुरुवार, 04/21/2022 - 12:58

In reply to म्हणजे देश पातळीवर दखल घेतली by चेतन सुभाष गुगळे

Permalink

चेतन

तुम्ही हेका सोडा .देशपातळीवर जाण्यासाठी हिंदी ची बिलकुल गरज नाही. तुमचे खासदार किती आहेत त्याला महत्व आहे. महाराष्ट्र मध्ये मराठी फर्स्ट ही भूमिका घेवून सेने नी किंवा कोणत्या ही पक्षाने 48 पैकी 40 जागा मिळवल्या. प्रतेक बिगर हिंदी प्रदेशातील राजकीय पक्षांनी भाषिक अस्मिता जागृत करून जास्तीत जास्त लोकसभेच्या जागा जिंकल्या तर भारताचे सरकार त्यांच्या विना बनुच शकत नाही. हिंदी आणि देशपातळीवर महत्व ह्याचा काही संबंध नाही. राज ठाकरे काय करतात तो त्यांचा प्रश्न आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by sunil kachure on गुरुवार, 04/21/2022 - 13:09

In reply to चेतन by sunil kachure

Permalink

चेतन

ज्याला कोणताच base नाही असा आपला हट्ट आणि आपली मत विनाकारण इथे व्यक्त करत आहात. अनेक कॉमेडियन लोकांनी ह्या वर अनेक mims पण निर्माण केले आहेत. उत्तर भारतीय लोकात एक गुण असतो त्यांचे किती ही खोटे,चुकीचे असू ध्या. मीच बरोबर अशी त्यांची भाषा असते . लालू ना एका पत्रकार नी विचारले. बिहार मध्ये तुम्ही इतके दिवस सत्तेत आहात तरी बिहार हा अतिशय गरीब कसा. त्यांचा उत्तर भारतीय खास गुण उभाळून आला आणि त्यांचे उत्तर. बिहार काय अमेरिकेत पण गरीब लोक आहेत. पण अमेरिकेत जे गरीब असतात त्यांच्या कडे एक च कार असते आणि बिहार मध्ये जे गरीब आहेत त्यांच्या कडे सायकल मध्ये नसते. फरक आहे. मूळ पॉइंट वर परत. आंध्र प्रदेश. राष्ट्रीय पक्षाची सत्ता नाही. तमिळ nadu राष्ट्रीय पक्षाची सत्ता नाही. केरळ. राष्ट्रीय पक्षाची सत्ता नाही. बंगाल. राष्ट्रीय पक्षाची सत्ता नाही. महारष्ट्र. राष्ट्रीय पक्षाची सत्ता नाही. तेलंगणा राष्ट्रीय पक्षाची सत्ता नाहीं अजून अनेक राज्य आहेत.. हिंदी आणि राष्ट्रीय राजकारण आणि सत्ता ह्याच संबंध जोडला तर. अर्ध्या भारतात राष्ट्रीय पक्ष सत्तेवर नसतील. आणि अर्धे लोकसभेचे सभासद हिंदी विरोधी असतील.
  • Log in or register to post comments

Submitted by sunil kachure on गुरुवार, 04/21/2022 - 13:22

In reply to चेतन by sunil kachure

Permalink

अमित शाह

अमित शाह आणि प्रधान मंत्री मोदी गुजरात चे आहेत. ते हिंदी साठी मगरीचे अश्रू गाळत आहेत. त्यांना खरेच हिंदू विषयी इतके प्रेम आहे. त्यांनी गुजरात ची गुजराती ही राज्य भाषा बदलून ती हिंदी करून दाखवावी. गुजराती लोक कसे react होतील त्याचा नमुना बघायला मिळेल. हिंदी ही गुजरात ची राज्य भाषा आहे इतकेच फक्त हवेत जरी. अमित शाह किंवा मोदी बोलले तरी भविष्यात कधीच bjp गुजरात मध्ये निवडणूक जिंकू शकणार नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on गुरुवार, 04/21/2022 - 13:53

In reply to अमित शाह by sunil kachure

Permalink

+१

+१ जाऊद्या. गुगळे सरांची फक्त “आपले” हिंदी भाषीक लोक महाराष्ट्रात ऊरावर बसावे अशी ईच्छा आहे. त्यासाठी ते प्राणपणाने मराठीला विरोध नी हिंदी ला समर्थन देत आहेत. स्वत घरात मारवाडीच बोलनार.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • …
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • पान 7
  • पान 8
  • पान 9
  • पान 10
  • पान 11
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com