Skip to main content

त्यांनी हिंदीत का बोलावं?

लेखक उपयोजक यांनी सोमवार, 11/04/2022 18:52 या दिवशी प्रकाशित केले.
तीन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत एक विनंती केली की वेगवेगळ्या राज्यांमधल्या असमान मातृभाषा असणार्‍या लोकांनी एकमेकांशी संवाद साधताना इंग्रजीऐवजी हिंदी भाषा वापरावी. https://www.google.com/amp/s/indianexpress.com/article/india/people-dif… या अनावश्यक विनंतीला अहिंदी राज्यांमधे साहजिकच विरोध होतो आहे. विशेषत: दक्षिणेकडच्या राज्यांमधे. आता ज्या लोकांची मातृभाषा हिंदीच आहे त्यांना या विनंतीबद्दल काहीच आक्षेप नसणारेय.उलट त्यांचा आयता फायदाच होईल. आता प्रश्न असे आहेत. १. दोन राज्यांमधील असमान भाषिकांनी कोणत्या भाषेत एकमेकांशी बोलावं अशी विनंती गृहमंत्री का करत आहेत? लोकांनी कोणत्या भाषेत बोललं पाहिजे हे गृहखात्याच्या अखत्यारीत येतं का? २. या विनंतीला दक्षिणेकडच्या राज्यातले लोक सकारात्मक प्रतिसाद देतील असा भ्रम गृहमंत्र्यांना का झाला असावा? की ही विनंती हिंदीतून बोलू शकणार्‍या अहिंदी राज्यांतल्या लोकांसाठीच आहे? अशी विनंती केल्यावर ज्यांना हिंदी येत नाही ते लगेच हिंदी शिकून घेतील हा भ्रम गृहमंत्र्यांना का झाला असावा? ३. या विनंतीमागे कारण काय असावं? हिंदी पट्ट्यातल्या लोकांची सोय व्हावी? कारण हिंदी पट्ट्यातले लोक "हम तो पापी पेट के लिए आए हैं भाई" हे रडव्या चेहर्‍यानं सांगून अहिंदी भाषिकांना 'आमची सोय बघा' असंच सांगू पाहतात. हिंदीभाषिक अहिंदी राज्यातल्या भाषा शिकायला राजी नसतात. पण अहिंदी भाषिकांनी मात्र हिंदी शिकावी ही अपेक्षा बाळगतात. हे हिंदी पट्ट्यातले लोक हिंदीतर भाषा शिकणार कधी? ४. समजा दक्षिणभारतीय राज्यांनी किंवा ईशान्येकडच्या राज्यांनी एकत्र येऊन त्यांची एकच सामायिक बोलीभाषा निर्माण करुन हिंदीला कडवे आव्हान निर्माण केले तर? मग काय करतील अमित शहा? ५. इंग्रजीला अमित शाह यांचा विरोध का? इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे. कमालीची ताकदवान भाषा आहे.आंतरराष्ट्रीय भाषा आहे. उपयोगाची भाषा आहे. असं असताना ती न वापरता हिंदी का वापरायची?

वाचने 108679
प्रतिक्रिया 510

प्रतिक्रिया

अभिनिवेष आणि अक्कल ह्यांचा परपसर संबंध नीट अभ्यासता आला आणि अभिनिवेष असतो तिथे अकलेचा वास नसतो हे गृहीतक पक्के झाले डोक्यात

In reply to by उपयोजक

त्रास नाही करमणूक मात्र छान होते आहे, तुम्ही म्हणताय ते मुद्दे बरोबर आहेत, आगे बढो म्हणणार होतो पण ते हिंदी असल्यामुळे पुलेशु म्हणतो फक्त :)

आमच्या गावाकडच्या गणपाच्या एका शंकेचे निरसन विद्वत्तापूर्ण भद्रजन करतील अशी अपेक्षा. आम्ही गावाकडं मुंबईहुन लेफ्ट राईट लेफ्ट राईट करत बोलू फक्त मराठी(च)(लेंगे स्वराज लेंगे धर्तीवर) करत गेलो की गणपा म्हणतो. "वांडू, शेरातील मानसे काय बोलत्याती काय बी सुदरत नाय, च्यामारी टिम्बं टाकून अनुस्वार म्हंत्याती, आम्हीच ण ला न म्हणलं तर ही मानसं हस्त्यात अन आमाला सुद्ध मराठी बोला म्हणत्यात, सुद्ध मराठी म्हंजी कुटली रं (टिम्ब दिलं पग) ? अन असली आसं म्हनलो तरीबी ज्यानला यात नाय त्येन्नी त्या मराठीत का बोलाव रं ?"

In reply to by जेम्स वांड

गणपाची बोली भाषा वेगळी असू शकेल, हरकत नाही. पण प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे असल्याने गणपाने निदान प्राथमिक शिक्षण तरी घेतले असावे. जगाच्या नाही तरी आजूबाजूच्या गावच्या, तालुक्याच्या बातम्या वाचण्याकरिता कधी वृत्तपत्र वाचत असेल. त्यामुळे शुद्ध वा प्रमाण मराठी कशी आहे याचा त्याला थोडाफार अंदाज असू शकेल. विशिष्ट व्यवसायाची गरज असल्याखेरीज (उदा: शिक्षकी पेशा) समोरच्याने प्रमाण वा शुद्ध भाषेतच बोलायला हवं असा फारसा आग्रह कुणी धरत नाही..(अपवाद असतीलच अर्थात) त्यामुळे गणपाने शुद्ध भाषाच बोलायला हवी असे काही नाही पण ग्रामीण भाषेतले काही शब्द जर शहरी लोकांना माहितच नसतील समजतच नसतील तर शहरात गेलेल्या गणपाने ते शब्द टाळून शहरी भाषेतील काही शब्द आत्मसात करणे म्हणजे त्याच्या अस्मितेला मोठा धक्का असे काही नसावे. शहरातले लोकही ग्रामीण भागात स्थलांतरित झाले तर ग्रामीण भाषेतील काही शब्द शिकत असतीलच की...

In reply to by तर्कवादी

मुळात जी भाषा गणपा ची म्हणून लिहली आहे तीच चुकीची आहे. महाराष्ट्रात आता त्या रीती ने मराठी अगदी दुर्गम खेड्यात पण बोलली जात नाही. महाराष्ट्रात प्राथमिक शिक्षण तर सर्वदूर पसरले ल आहे. सर्वांना सर्व प्रकारची मराठी उत्तम समजते. उगाच सिनेमे बघून सद्यस्थिती शी विपरीत लोकांचे समज निर्माण झाले आहेत. ग्रामीण भागात राहणारा व्यक्ती म्हणजे खूप च जुनी मराठी बोलत असेल.असा.

In reply to by sunil kachure

मुळात जी भाषा गणपा ची म्हणून लिहली आहे तीच चुकीची आहे. महाराष्ट्रात आता त्या रीती ने मराठी अगदी दुर्गम खेड्यात पण बोलली जात नाही.
काहिच्या काही लिहु नका हो, काय ऐकलीय आणि कीती फिरलाय तुम्ही? किंवा जी गावठि म्हणून तुम्ही ऐकलीय ती एखाद्या उपनगरीफ्लॅटवासीय लेखकाची वाचलेली असावी. ग्रामीण सिनेमाचा काळ तर सरलाच पण वांडोबाची भाषा महाराष्ट्रातल्या कमीत कमी ५ जिल्ह्यात आजही सर्रास वापरली जाते.

In reply to by सुरिया

प्रतिवाद तरी का करावा इतका खोटा दावा आहे. पाच जिल्ह्यात तरी जेम्स नी लिहलेले मराठी भाषा बोलतो जाते असे सरळ फेकले आहे. पण कोणते पाच जिल्हे हे मात्र अजिबात सांगितले नाही. एक तरी vlogs दाखवा पुरावा म्हणून महाराष्ट्र मधील त्या व्हिडिओ त गणपा च्या तोंडी जी भाषा आहे ती बोलली जाते. आणि तेथील लोकांस पुण्या,मुंबई ची मराठी परकी वाटते ,त्यांना समजत नाही. २६ जिल्ह्यातील पाच जिल्ह्यात प्रमाण मराठी बोलत ,समजत नसेल. तर साक्षरता चे सर्व दावे चुकीचे ठरतील. महाराष्ट्र च काय पूर्ण भारत पाकिस्तान,बांगलादेश पेक्षा अशिक्षित आहे हे सत्य मान्य करावे लागेल.

In reply to by सुरिया

सुनीलजींचे प्रतिसाद लालित्य पाहून प्रतिसाद देणार नव्हतोच, आता तर त्या निर्णयावर शिक्कामोर्तब झालेच समजा. जमल्यास आपणही त्याची सवय करून घ्या, चला पाहू पाच जिल्हे फिरायला ;)

In reply to by तर्कवादी

तुमच्याशी बोलायला मजा येणार :) मुद्देसूद प्रतिवाद खालीलप्रमाणे :- गणपाची बोली भाषा वेगळी असू शकेल, हरकत नाही. खालील बहुतकरून शुद्धभाषामतवादी जनतेचे प्रतिसाद पाहून आपले मत अजूनही असेच असेल का ? पण प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे असल्याने गणपाने निदान प्राथमिक शिक्षण तरी घेतले असावे. प्राथमिक म्हणजे इयत्ता १ ते ४, ह्या वयात दिवसाच्या ५ तास शाळेत घालवलेल्या वेळेच्या जोरावर उरलेले १९ तास ग्रामीण परिवेशात राहणाऱ्या गणपाच्या जिभेला प्रमाण भाषेचे वळण लागेल का ? लक्षात घ्या इथे मी शेकडो पोरांवर ४-५ मास्तर वगैरे "निःशुल्क प्राथमिक शिक्षणाच्या" वास्तवात घुसतही नाहीये जगाच्या नाही तरी आजूबाजूच्या गावच्या, तालुक्याच्या बातम्या वाचण्याकरिता कधी वृत्तपत्र वाचत असेल. त्यामुळे शुद्ध वा प्रमाण मराठी कशी आहे याचा त्याला थोडाफार अंदाज असू शकेल. नक्कीच, अन वृत्तपत्रीय भाषा काही अंशी प्रमाणित असतेच, पण ते र ला ट लावून वाचणे अन प्रमाण मराठीचे अंदाज असणे ह्यात काही मैल अंतर असेल हे आपण मान्य कराल काय ? शहरात गेलेल्या गणपाने ते शब्द टाळून शहरी भाषेतील काही शब्द आत्मसात करणे म्हणजे त्याच्या अस्मितेला मोठा धक्का असे काही नसावे. गणपा टाईप मजुरी किंवा गेलाबाजार रोजगार पाहायला आलेल्या लोकांना अस्मितेची लक्झरी परवडेल का ? प्रश्न अस्मितेचा नाही अस्तित्वाचा आहे, वैच एक कप च्या द्या म्हणल्यावर जर शहरातील माणसाला अर्थ कळत असेल तर गणपाने शुद्ध मराठी बोलावी हा आग्रह कश्याला ? पुन्हा एकदा सांगतो सरकारी कामे, वृत्तपत्रे इत्यादींच्या प्रमाणभाषेला विरोध नाहीच पण ती गणपावर लादण्याचा पॉईंट नाही काही, हिंदी इम्पोजिशन मॅक्रो प्रश्न असेल पण हा मायक्रो प्रश्न आहे अन तो सोडवल्याशिवाय मी तरी मॅक्रोला किंमत देणार नाही, प्रॉब्लेम सोलविंग फ्लोचार्ट क्लिअर आहे माझा माझ्या डोक्यात तरी :)

In reply to by जेम्स वांड

तुमच्याशी बोलायला मजा येणार :)
धन्यवाद जेम्स साहेब खरंतर तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी आधीच दिलेलं असूनही तुम्ही पुन्हा तेच प्रश्न विचारताय म्हणून माझंही थोडं मनोरंजन होतंय... असो !!
खालील बहुतकरून शुद्धभाषामतवादी जनतेचे प्रतिसाद पाहून आपले मत अजूनही असेच असेल का ?
मिसळपाववरील शुद्धभाषामतवादी आणि वर उल्लेखलेला अशिक्षित वा अर्धशिक्षित गणपा यांचा संबंध फारसा येणार आहे का ? आणि आलच तरी त्याच्या परिस्थितीचं आकलन करता त्याच्याकडून शुद्ध भाषा बोलण्याचा आग्रह सहसा कुणी धरणार नाही (अपवाद असतातच.. ).. बाकी मिपावरही ग्रामीण बोली भाषेतील कथा /साहित्य अधूनमधून प्रसिद्ध होत असतंच आणि त्यास लोकप्रियताही लाभते. असो.
उरलेले १९ तास ग्रामीण परिवेशात राहणाऱ्या गणपाच्या जिभेला प्रमाण भाषेचे वळण लागेल का ?
मला वाटतंय मी आधीच उत्तर दिलंय .. तरी पुन्हा देतो " गणपाची बोली भाषा वेगळी असू शकेल, हरकत नाही." .. गणपाने प्रमाण भाषा बोलायला हवी असा आग्रह नाहीच हे आधी किमान दोनदा तरी म्हणून झालंय .. असो.
नक्कीच, अन वृत्तपत्रीय भाषा काही अंशी प्रमाणित असतेच, पण ते र ला ट लावून वाचणे अन प्रमाण मराठीचे अंदाज असणे ह्यात काही मैल अंतर असेल हे आपण मान्य कराल काय ?
थोडाफार अंदाज इतकंच मी म्हंटलंय.. आणि वाचनाची सवय असलेला जन्मभर काही र ला ट लावून वाचत नाही.. माझी दुसरी किंवा तिसरी शिकलेली आजी [१९३० च्या आधी जन्म, लग्नाआधी अ. नगर जिल्ह्यातील एका खेडेगावात व लग्नानंतर अ. नगर शहरात आयुष्य गेले] फार सहजपणे व आवडीने वृत्तपत्र वाचत असे.
वैच एक कप च्या द्या म्हणल्यावर जर शहरातील माणसाला अर्थ कळत असेल तर गणपाने शुद्ध मराठी बोलावी हा आग्रह कश्याला ?
आग्रह नाही असे अनेक वेळा म्हणून झाले तरी तुम्हाला तेच पद गायचे असल्यास माझा नाईलाज आहे .. बाकी उदाहरण देवून तुम्ही काम माझे सोपे केले.. "वैच एक कप च्या द्या " म्हंटल्यावर शहरी मराठी भाषिक चहावाला"वैच"शब्दाचा अर्थ समजला नाही किंवा "च्या" हा शब्द प्रमाण भाषेतला नाही म्हणून गणपाला चहा नाकारणार नाही.
पुन्हा एकदा सांगतो सरकारी कामे, वृत्तपत्रे इत्यादींच्या प्रमाणभाषेला विरोध नाहीच पण ती गणपावर लादण्याचा पॉईंट नाही काही, हिंदी इम्पोजिशन मॅक्रो प्रश्न असेल पण हा मायक्रो प्रश्न आहे अन तो सोडवल्याशिवाय मी तरी मॅक्रोला किंमत देणार नाही, प्रॉब्लेम सोलविंग फ्लोचार्ट क्लिअर आहे माझा माझ्या डोक्यात तरी :)
मला वाटते मी संतुलितपणे याचे उत्तर दिले होते तरी पण तुम्ही "माझा (पक्षी गणपाचा) प्रॉब्लेम सॉल्व झाला नाही म्हणूनच सूर लावणार असाल तर माझा नाईलाज आहे. माझे वाक्य पुन्हा लिहितो. "गणपाने शुद्ध भाषाच बोलायला हवी असे काही नाही पण ग्रामीण भाषेतले काही शब्द जर शहरी लोकांना माहितच नसतील समजतच नसतील तर शहरात गेलेल्या गणपाने ते शब्द टाळून शहरी भाषेतील काही शब्द आत्मसात करणे म्हणजे त्याच्या अस्मितेला मोठा धक्का असे काही नसावे." झालेच तर गणपासारखी अर्धशिक्षित माणसे शहरात कोणत्या कामासाठी येतात ? त्या निमित्ताने त्यांची उठबस कोणत्या लोकांशी असते ? त्या लोकांचा ग्रामीण बोलीभाषेशी यापुर्वी संबंध आलेला असेल हे मुद्दे विचारात घेतले तर गणपाची समस्या फक्त कागदावरची वाटते (अपवाद वगळून), वास्तववादी नाही.
प्रॉब्लेम सोलविंग फ्लोचार्ट क्लिअर आहे माझा माझ्या डोक्यात तरी
पण तरी प्रॉब्लेम आहेच असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सोल्युशनचाही विचार केला असेलच, नाही का ? तुमच्या मते काय सोल्युशन आहे ते सांगितलंत तर बरं होईल. पुढे त्याचा उहापोह करु.

In reply to by जेम्स वांड

गावठीपणा सोडून कुतूहलाने शहरी लोक कसे बोलतात त्याचे निरीक्षण करावे. म्हणजे गणपालाही प्रमाणभाषा जमायला लागेल. प्रमाणभाषा निर्माण करणार्‍यांनी त्या भाषेवर विशेष काम केलेले असते. खेडवळ लोक कोणत्याही भाषेचा उपयोग केवळ संपर्कभाषा म्हणून करतात. तस्मात गणपाला जास्त सिरियसली घेऊ नये.

In reply to by उपयोजक

खेडवळ लोक कोणत्याही भाषेचा उपयोग केवळ संपर्कभाषा म्हणून करतात. तस्मात गणपाला जास्त सिरियसली घेऊ नये.
तस्मात समस्त गणप्यांनी ह्या भाषा, प्रमाणभाषा, राज्य भाषा, राष्ट्रभाषा वगैरे प्रकरणालाच जास्त सिरियसली घेऊ नये. संपर्क होण्याशी मतलब.

In reply to by उपयोजक

प्रमाणभाषा निर्माण करणार्‍यांनी त्या भाषेवर विशेष काम केलेले असते.
प्रमाणभाषा ही फक्त प्रशासकीय सोय असते, विशेष काम त्यासाठी केलेले असते, भाषासेवा करायला नाही , त्यामुळे मुद्दा रद्द होतो, अन आपण भाषासेवा करतोय हा आवही शुद्ध भाषामतवाद्यांनी आणू नये. सन्माननीय अपवाद उदाहरणार्थ वि दा सावरकर, त्यांनीही जन्माला घातलेली शब्दसंपदा ही बोली वर आधारित अर्थात फोनेटिक्स बेस्ड होती अन दुर्दैवाने ती पण आजकाल कोणीच वापरत नाही शुद्धभाषिक पक्षीय सुद्धा थोडक्यात काय प्रमाण म्हणजे शुद्ध ही संकल्पनाच मुळात प्रमानभाषावादी बायसेस मधून उद्भवलेली आहे, भाषेचे अलंकार अन सौंदर्य हे बोलीतच असल्यामुळे बोलींचा मान न ठेऊ शकणाऱ्या शुद्धभाषावादी जनतेला सामान्य जनतेने जास्त मनावर घेऊ नये, ह्यातच महाराष्ट्र संस्कृतीचे हित आहे

महाराष्ट्रातील गणपाने कर्नाटकच्या संगप्पाशी इंग्रजीतून बोलावे असे फर्मान देखील काढले जाईल या इंग्रजांच्या एजंटांकडून...

In reply to by उपयोजक

यात नविन काय ? हिंदी भाषा हा विषय निघाला की यांची द्रविड अस्मिता संकटात येणार ! साता समुद्रापारची परकिय भाषा शिकू, बोलू पण हिंदुस्थानातलीच भाषा म्हणजे यांच्यावर परम-संकट !

In reply to by चौथा कोनाडा

हिंदीभाषिक शिकतात का इतर भारतीय भाषा? त्यांच्या राज्यातील अभ्यासक्रमात हिंदी व इंग्लिश व्यतिरिक्त एखादी इतर भाषा शिकणे सक्तीचे आहे का? तसं नसेल तर अहिंदीभाषिकांनी स्वत:ची भाषा व इंग्लिश व्यतिरिक्त हिंदी सक्तीने का शिकावी?

In reply to by उपयोजक

ह्यात चुकीचे काय लिहिले आहे ? ब्राम्हणांचा उल्लेख काही द्वेशपूर्ण नाही वाटला. दिलीये ती फॅक्ट आहे. गोलवळकरांचे विचार असे नाहीत असे असेल तर जरूर सांगा, मला कल्पना नाही.

In reply to by कॉमी

असं कसं म्हणता कॉमी? धागाकर्ता म्हणाले ब्राम्हण द्वेष आहे म्हंजे ब्राम्हण द्वेष असणारच. बॅट त्यांची आहे तेव्हा नियम पण त्यांचेच असणार. मान्य करायलाच पाहिजे :)

In reply to by रंगीला रतन

www.misalpav.com/comment/1139440#comment-1139440 या प्रतिसादात जे छायाचित्र डकवलं आहे आणि त्यात जी इंग्रजीत लिहिलेली सुलभ विधाने आहेत आणि त्यापैकी ज्यांच्या भोवती चौकटी करुन त्यांकडे विशेषत्वाने लक्ष वेधले आहे - त्यांचे भाषांतर - मराठी भाषिकांना समजेल असे - खालीलप्रमाणे होईल. आर्या अस्वलेंना आश्चर्य वाटतंय की संघाच्या वरच्या फळीतले सर्व मराठी ब्राह्मण असूनही ते देशभर हिंदी भाषेकरिता आग्रही का आहेत? त्यांना प्रत्युत्तर देताना आकाश लिहित आहेत की त्याने (म्हणजे मूळ मराठी भाषिक असण्याने) त्यांना (म्हणजे संघाच्या प्रमुख नेत्यांना) काही फरक पडत नाही. त्यांना ज्याप्रमाणे चीनमध्ये हान घराण्याचं प्राबल्य त्यासम काहीतरी करायचं आहे. देशात कृत्रिमपणे का होइना पण एकात्मतेची समज रुजविण्याकरिता ते स्वभाषेचा (म्हणजे अर्थातच मराठीचा) त्याग करण्यास देखील तयार आहेत. प्रत्येकानेच संघराज्यवाद, भाषा आणि हिंदू (म्हणून स्वतंत्र) ओळख याबद्दलचे श्री. गोळवलकर आणि त्यांच्या (म्हणजे संघाच्या) इतर नेत्यांचे समग्र विचार वाचायला हवेत. इथे भाषा महत्त्वाची आहे जात नाही. तरी मूळ इंग्रजी विधानांमधून ज्यांना
या भाषिक वादाला आता जातीय वळण मिळतंय
असं ध्वनित होत असेल त्यांनी निदान स्वतःचं इंग्रजी - मराठी भाषांतराचं ज्ञान पाहता आपल्या स्थानिक + इंग्रजी या भाषिक पर्यायांचा पुनश्च एकदा विचार करणे फारच गरजेचे आहे.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

इथे भाषा महत्त्वाची आहे जात नाही. चष्मा न लावता पाहिलात का हो फोटो? अस्वले बाईंनी ब्राह्मण असं स्पष्ट लिहिलंय. ते तसं लिहिण्याचं कारण स्पष्ट करा बघू. फक्त 'मराठी' असं का लिहिलं नाही अस्वलेंनी? की अर्धवट ज्ञानासोबत आता अर्धवट वाचनसुद्धा? :)

In reply to by उपयोजक

कुपमंडूकयोजकजी कुठलाही चष्मा न लावताही त्या विधानात ब्राम्हणद्वेष दिसत नाही. तुम्ही कुठला चष्मा लावला ते सांगा. उगाच छाती पिटून रडू नका. असले फालतू धागे काढणे व त्यावर फालतू प्रतिसाद देणे तुमचा शौक असेल आमचा नाही.

तर्कवादी, तुमच्या हायपोथॅटिकल सिनेरीओ बद्दल. तुम्ही डेस्क जॉब असलेला व्यक्ती घेतला आहे. तो भारतभराचा डेमोग्राफीक निर्देशक होत नाही. पश्चिम बंगाल मधल्या केवळ ८% जनतेला इंग्लिश बोलता येते.सगळे स्थलांतरित डेस्क जॉब करणारेच असतील असे नाही. सर्वांना इंग्लिश येत असते तर वादाचे कारण उदभवलेच नसते- त्यामुळे तुमच्या हायपोथॅटिकल उदाहरणातल्या माणसाला व्यवस्थित इंग्लिश बोलता येते- हे माझ्या दृष्टीने पूर्ण चित्रदर्शक उदाहरण नाहीये. मी आकडेवारीवर विसंबु शकतो, एका उदाहरणावर माझे मत बनवू शकत नाही. तुमचे पुढचे असम्पशन आहे दीर्घकाळ वास्तव. सगळ्यांचे तसे उद्दिष्ट नसते. काही लोक पुन्हा आपल्या राज्यात बदली घेण्यात धडपडत असतात आणि ४-५ वर्षात पुन्हाच जाणार असतात. त्यांनी काय करावे ? आणि हिंदी स्थानिक भाषेला रिप्लेस करेल हे जे तुम्ही म्हणता ती भीती इंग्रजी सोबत आहेच की. जर हिंदी मुळे स्थलांतरित व्यक्ती स्थानिक भाषा शिकायची तसदी घेणार नाही म्हणता, तर दुसरी भाषा इंग्रजी असेल आणि त्याचे इंग्रजीत काम होत असेल, तरी सुद्धा घेणार नाहीच कि. तुमचा स्थलांतरित माणूस बघा कि, तो तामिळ शिकला, पण त्याआधी त्याचे काम इंग्रजीत होत होते तरीही शिकला. पण हिंदी मध्ये काम होऊ लागले तर तो आणि त्याच्या पुढच्या पिढ्या शिकणार नाहीत असे तुम्ही assume केले. आज आपल्या रोजच्या बोलण्यातून हिंदी शब्द बाहेर ठेवायला किती प्रयास लागतात आणि इंग्रजी शब्द बाहेर ठेवायला किती प्रयास लागतात हे बघा.

In reply to by कॉमी

सर्वच मुद्दे बरोबर आहेत आणि त्यांची मांडणी देखील अचूक व संतूलित पणे केलेली आहे.

In reply to by कॉमी

तुम्ही डेस्क जॉब असलेला व्यक्ती घेतला आहे. तो भारतभराचा डेमोग्राफीक निर्देशक होत नाही. पश्चिम बंगाल मधल्या केवळ ८% जनतेला इंग्लिश बोलता येते
अगदी मान्य. ... किती टक्के लोकांना इंग्लिश येतं हा प्रश्नच नाही.. आणि ते याव / चांगलं याव ही अपेक्षा पण नाहीच. असो.. तुम्ही तुमचं एखादं उदाहरण सांगा , मग त्याचा उहापोह करु.. मान्य की एका उदाहरणावरुन निष्कर्ष काढू नये .. पण काहीच उदाहरणे समोर नसतील तर निव्वळ आकडेवारी पण फारशी उपयोगाची ठरत नाही. झालंच माझा एकच साधा सरळ मुद्दा आहे.. कुणी ही स्थानिक मनुष्य ज्याला कधीच परराज्यात/ परदेशात वगैरे जायचे नाही किंवा दुसऋआ भाषेतून कुठले शिक्षण घ्यायचे नाही तो उगाचच दुसरी भाषा शिकणार नाही ..आपल्या राज्यात, शहरात काही तामिळ न जाणणारे लोक येणार आहेत तेव्हा त्यांच्याकरिता म्हणून स्थानिक रिक्षावाला, फळवाला, इलेक्ट्रीशियन, प्लंबर, हे सगळे एखादी भाषा शिकून ठेवतील असं होणार नाहीच.
पण हिंदी मध्ये काम होऊ लागले तर तो आणि त्याच्या पुढच्या पिढ्या शिकणार नाहीत असे तुम्ही assume केले
हे बर्‍यापैकी होत आहे. सभोवती दिसतंय.. असो.

In reply to by तर्कवादी

असो.. तुम्ही तुमचं एखादं उदाहरण सांगा , मग त्याचा उहापोह करु.. मान्य की एका उदाहरणावरुन निष्कर्ष काढू नये .. पण काहीच उदाहरणे समोर नसतील तर निव्वळ आकडेवारी पण फारशी उपयोगाची ठरत नाही.
मला माझा मुद्दा मांडायला याबाबत उदाहरणातून बोलण्याची आवश्यकता वाटली नाही. थेट मुद्दा आणि मिमांसा चालून जाईल. अर्थात तुम्ही उदाहरण दिले त्यात सुद्धा गैर नाही, मी फक्त खंडन केले.
आपल्या राज्यात, शहरात काही तामिळ न जाणणारे लोक येणार आहेत तेव्हा त्यांच्याकरिता म्हणून स्थानिक रिक्षावाला, फळवाला, इलेक्ट्रीशियन, प्लंबर, हे सगळे एखादी भाषा शिकून ठेवतील असं होणार नाहीच.
त्यांना शिकावी वाटत नसल्यास अजिबात शिकू नये. त्यांनी ग्राहकांशी कोणत्या भाषेत बोलायचं हा सर्वस्वी त्यांचाच प्रश्न आहे. पण अमित शहा दुसरी भाषा म्हणून हिंदी वापरा अशी विनंती करतात त्यात काही गैर नाही, इतके माझे म्हणणे आहे. आणि हिंदी बोलणे म्हणजे आमच्या अस्मितेवर घाला आहे, त्यामुळे आम्हाला थोडेफार का असेना, हिंदी समजत असून सुद्धा आम्ही हिंदी बोलणारच नाही, वाटल्यास इंग्लिश बोलू पण हिंदी काहीही झाले तरी बोलणार नाही- असा पवित्रा घेणे हा त्या व्यक्तीचा हक्क आहे. त्यांना जोरजबरदस्तीने हिंदी बोलायला लावायचा प्रश्नच येत नाही. पण त्यांचा हा पवित्रा माझ्या व अनेकांच्या दृष्टीने अत्यंत तिरस्करणीय आहे हे सांगण्यात सुद्धा काही चूक नाही.
पण हिंदी मध्ये काम होऊ लागले तर तो आणि त्याच्या पुढच्या पिढ्या शिकणार नाहीत असे तुम्ही assume केले
हे बर्‍यापैकी होत आहे. सभोवती दिसतंय.. असो.
दुसरी भाषा (मग ती इंग्रजी असो वा हिंदी) ही संकल्पना असल्यावर परिणाम तेच होणार- स्थानिक भाषा शिकायची गरज कमी होणार. का दुसरी भाषा हिंदी असल्यावर परिणाम वेगळे होतात आणि दुसरी भाषा इंग्रजी असल्यावर परिणाम वेगळे होतात ? कि समस्या दुसरी भाषा या संकल्पनेबाबतच आहे ?

In reply to by कॉमी

त्यांना शिकावी वाटत नसल्यास अजिबात शिकू नये
झालं तर मग .. मी तेच म्हणतोय..
पण अमित शहा दुसरी भाषा म्हणून हिंदी वापरा अशी विनंती करतात
कोणताही व्यक्ती दुसरी भाषा स्वतःच्या गरजेनुसार शिकेल. इंग्लिश शिकून त्याची गरज भागत असेल तर इंग्लिश शिकेल, बंगाली शिकून भागत असेल तर बंगाली शिकेल. अमित शहा म्हणतात म्हणून शिकणार नाही... साधं सोपं आहे हे. पण हिंदी येत नाही म्हणजे तो माणूस राष्ट्राभिमानी नाही वा त्याला भारतात रहायचा हक्क नाही वगैरे अपप्रचार कुणी करत असेल तर विरोध होणार. बाकी स्वेच्छेने ज्याला जी भाषा शिकायची ती त्याने शिकावी..

In reply to by तर्कवादी

पण हिंदी येत नाही म्हणजे तो माणूस राष्ट्राभिमानी नाही वा त्याला भारतात रहायचा हक्क नाही वगैरे अपप्रचार कुणी करत असेल तर विरोध होणार.
हे मान्यच. मी खाली विरोधच केला आहे. अमित शहा विनंतीच करत होते की, सक्ती कुठे केलेली ?

In reply to by कॉमी

अमित शाह ह्यांनी लोकसभेत असे वक्तव्य केले की " दोन विविध भाषिक एकमेकाशी संवाद साधू इच्छितात तर त्यांनी संपर्क भाषा म्हणून वापर करा" हे बरोबर वाक्य आहे.ह्या मध्ये स्थानिक भाषा वापरू नका असा उल्लेख नाही,हे पण बरोबर आहे. पण लोकसभेत सल्ला देणारे देशाचे गृहमंत्री आहेत साधा,सामान्य माणूस नाही. आणि लोकसभा हे देशाचे सर्वोच्च सभागृह आहे तिथे देशाविषयी सर्व निर्णय होतात. हिंदी ही संपर्क भाषा वापरा इंग्लिश ऐवजी,म्हणजे ह्याचा दुसरा अर्थ एकदम साफ आहे हिंदी शिका. आता हिंदी शिकायची तर शाळेत च शिकवायला लागणार. देशासाठी च सल्ला त्यांनी दिला आहे ह्याचा अर्थ देशभर शाळेत हिंदी शिकवा. इतका मोठा अर्थ आहे त्यांच्या वक्तव्याचा. इथे काही जन फक्त त्यांच्या चार शब्दातील वाक्यावर च प्रतिसाद देत आहेत. पण त्यांच्या त्या चार शब्दाच्या वाक्याचा पूर्ण अर्थ समजून घेत नाहीत. उलट जे समजवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनाच फालतू, लोक असे संबोधत आहेत. त्यांच्या आयडी चा विकृत शब्दात उल्लेख करत आहेत.

हिंदुस्तान म्हणजे हिंदीभाषिकांचा देश होय. ज्यांना हिंदी बद्दल प्रेम नाही त्यांनी देशातून निघावे. ज्यांना हिंदीबद्दल द्वेष वाटतो ते परकीय देशांचे हस्तक आहेत. (स्लीपर सेल टाईप) -- इति उत्तर प्रदेशमधले भाजपा मिनिस्टर. Exclusionary politics तुम्हाला पण एक ना एक दिवस धरणार आहे हे लक्षात ठेवण्यासाठी हे उदाहरण मस्त आहे !

In reply to by कॉमी

ज्यांना हिंदीबद्दल द्वेष वाटतो ...
हिंदी शिकण्यास अनुत्सुकता = हिंदीबद्दल द्वेष ? म्हणजे जो माणूस म्हणतोय "मला माझ्या राज्यात रहात असताना दुसरी भाषा शिकाविशी वाटत नाहीये किंवा ती शिकण्याचं कारण दिसत नाहीये .. त्यात सदर दुसर्‍या भाषेचा द्वेष वगैरे काही नसताना ही मी परकीय देशाचा हस्तक ठरतो का ?"

In reply to by कॉमी

जगात जितके पण हुकूमशहा होवून गेले,जितक्या पण क्रूर हुकूमशाही राजसत्ता निर्माण झाल्या. ज्यांनी अमानुष हत्याकांड केली . मग त्या मध्ये हिटलर असतील किंवा कंबोडिया चे अध्यक्ष ,किंवा चीन चे communists सत्ता धारी. ह्या सर्वात एक परिस्थिती सामान होती. अतिरेकी राष्ट्रवाद,अतिरेकी वंश वाद ,अतिरेकी भांडवल वाद असेल किंवा समाजवाद.,साम्यवाद. ह्या सर्व हुकूमशहा ना लोकांनी पाहिले डोक्यावर घेतले .त्यांनी जो अतिरेकी वाद मांडला होता त्याचे डोळे झाकून समर्थन केले. विरोधी मत ना किंमत दिली नाही. सामान्य लोकांनी च ह्यांना प्रचंड लोकप्रियता असलेला व्यक्ती म्हणून स्वीकारले. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की विवेक बुद्धी नष्ट होते. लोकांच्या ह्या वृत्ती मुळेच क्रूर हुकूमशाही, हुकूमशहा जगात निर्माण झाले त्यांनी अनंत हत्या केल्या. आता थोडा फार त्याच दिशेने जाणारी स्थिती भारतात आहे. म्हणून एक लोक प्रतिनिधी असे जाहीर वक्तव्य करू शकतो. :हिंदी येत असेल तर च इथे रहा नाही तर चालते व्हा.: आणि ह्या वक्तव्याचे समर्थन करणारी लोक आहेत विवेक हरवून बसलेली.

संपर्क भाषा काय असावी ह्या वर लोकसभेत व्यक्त होणे . ह्याला खूप अर्थ आहेत. जागे नुसार आणि गरजेनुसार कोणती ही भाषा ही संपर्क भाषा असू शकते हिंदी चा उल्लेख करण्याची गरज नव्हती. भाषा कधीच एकटी येत नाही .ती पूर्ण लावजमा घेवून येते. इंग्लिश बरोबर पिझ्झा, बर्गर, सूट,मिनी स्कर्ट, केक ,दारू पार्ट्या आल्या,कुटुंब व्यवस्था उखडली गेली. हे फक्त भाषे चा परिणाम आहे. हिंदी स्वीकारली की तिच्या बरोबर. जुने रीती rivaj, outdated परंपरा,कट्टर हिंदुत्व,स्त्री स्वतंत्र च आकुंचन .हे सर्व येईल. उर्दू आणि अरबी भाषा जर कोणत्या दुसऱ्या देशाने शिकली आणि स्वीकारली तर त्या बरोबर मुस्लिम धर्म पण त्या देशात प्रवेश करेल.. भाषा एकटी नसते तिच्या बरोबर अनेक गोष्टी असतात. मराठी आहे म्हणुन मराठी संस्कृती आहे. मराठी नसेल तर मराठी संस्कृती पण नसेल.

स्वित्झर्लंड हा एक लहानसा आणि संपन्न देश आहे. त्यांची स्वतःची एक शिस्तबद्ध शैली असून ते इतके शांतिप्रिय आहेत की त्यांच्याकडे स्वतःचे लष्कर देखील नाहीये. अशा स्वतंत्र देशाचा नागरिक होण्याकरिता परक्या देशातील व्यक्तिकरिता काही जाचक अटी (म्हणजे अगदी घरात देखील कोणती भाषा बोलावी इत्यादी) ठेवणे हे स्वाभाविक आहे. अमेरिकेचा नागरिक होण्याकरिता देखील अशा काही अटी आहेत (घरातील भाषेबद्दल अट नसली तरीही घरात लहान मुलांसोबतची वर्तणूक, त्यांना द्याव्या लागणार्‍या स्वतंत्र खोलीसारख्या सोयी सुविधा इत्यादी). भारत हा एक संघराज्य देश आहे. एका राज्यातून दुसर्‍या राज्यात जाणे म्हणजे परकीय व्यक्तिने नागरिकत्वाकरिता अर्ज करण्यासारखे अजिबात नाही. तरीही टॅक्सी चालविण्यासारखे लोकाभिमूख व्यवसाय करण्याकरिता स्थानिक भाषा शिकणे गरजेचे आणि सक्तीचे करावे त्याशिवाय परवानगी देऊ नये. स्थानिक पातळीवर न्यायालयात वकिली करणार्‍या सर्वांनाच मराठी येते असा अनुभव आहे. उच्च न्यायालयात मला मराठीच वकील हवा असा आग्रह धरला तर कदाचित अशीलाचेच जास्त नुकसान होईल. हूशार वकिलाकडे भरपूर काम असतेच पण वकीलाला हूशार आणि परवडणार्‍या शुल्कात वकील मिळणे हे उच्च न्यायालयात तरी दुरापास्त असते. तेव्हा स्थानिक भाषेची सक्ती / आग्रह हा राज्यपातळीवर तारतम्य पाहूनच केला जावा. जो महाराष्ट्रात आजवर तरी योग्य प्रकारेच होत आहे. पुढे देखील होतच राहील अशी आशा आहे.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

अगदी सहमत. स्वीडन आणि भारत तुलना शक्य नाही. स्वीडन मधली लोकसंख्या भाषिक दृष्टीने बऱ्यापैकी एकसंध आहे असे म्हणता येईल. विकिपीडियावर दिसते की स्वीडन मधला सगळ्यात मोठ्ठा भाषिक अल्पसंख्यांकांचा गट फक्त ५% लोकसंख्येचा आहे. ११ दशलक्ष पैकी ९ दशलक्ष स्वीडन्सची मातृभाषा स्वीडिश आहे. भारतात तसे नाही हाच मुळात चर्चेचा विषय आहे. भाषेच्या जोरावर भारतात अंतर्गत निर्बंध आणणे म्हणजे परीणामकपणे देशाचे विभाजन केल्यासारखेच होईल.

In reply to by कॉमी

भाषेच्या जोरावर भारतात अंतर्गत निर्बंध आणणे म्हणजे परीणामकपणे देशाचे विभाजन केल्यासारखेच होईल. आता कळलं ना युपीची भाषा ईतर राज्यांवर का लादायला नको ते?? सुमार बुध्दीचे केंद्रीय नेते हिंदीत बोला म्हणून कितीही बोंबलू देत. बाकी ते स्विडन नाही तर स्वीत्झर्लंड बद्दल बोलत होते.

In reply to by कॉमी

भाषेच्या जोरावर भारतात अंतर्गत निर्बंध आणणे म्हणजे परीणामकपणे देशाचे विभाजन केल्यासारखेच होईल. आता कळलं ना युपीची भाषा ईतर राज्यांवर का लादायला नको ते?? सुमार बुध्दीचे केंद्रीय नेते हिंदीत बोला म्हणून कितीही बोंबलू देत. बाकी ते स्विडन नाही तर स्वीत्झर्लंड बद्दल बोलत होते.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

तुम्हीच लादली लादली म्हणून उगीच कांगावा करता आहात. कुठे लादलीये हिंदी ? तुम्हीच महाराष्ट्रात काम करायचे असेल तर मराठी बोलायचेच म्हणताय. >>>>बाकी ते स्विडन नाही तर स्वीत्झर्लंड बद्दल बोलत होते. हो, बरोबर. गडबडीत डोक्यात स्वीडन आले आणि स्वीडन बद्दल लिहिले गेले.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

एवढ्या रामायणानंतर तुम्ही हा प्रश्न विचारत असाल तर... काय बोलावं, ते सुचेना...

In reply to by कॉमी

हिंदी जास्त लोक बोलतात हा फालतू दावा तुम्ही केला होता. ह्याव्यतीरीक्त काही आहे का?? हिंदी भाषीक म्हणून पंजाब नी राजस्थान ही केंद्र सरकारने गुंडाळले होते त्यावर त्या राज्यातून प्रतीकूल प्रतिक्रीया ऊमटल्या हे तुमच्या गावीही नसेल. नंतर केंद्राला चुक मान्य करावी लागली हे ही तुम्हाला माहीत नसेलच. ऊगाचच ऊचलली जीभ लावली टाळ्याला नको.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

तुम्ही फालतू फालतू नुसतं म्हणता, मी दिलेली माहिती का चूक आहे म्हणलं कि गप्प होता. हे अजून काय काय असंबंद्ध लिहिले आहे तुम्हालाच माहित.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

म्हणून भारतात अहिंदी भाषकांवर हिंदी लादावी?? त्यासाठी स्वित्झर्लंड चं ऊदाहरण गैरलागू?? कैच्याकै प्रतिसाद आहे.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

स्थानिक पातळीवर न्यायालयात वकिली करणार्‍या सर्वांनाच मराठी येते असा अनुभव आहे. नागपूरच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात हिंदीत खटला चालवता येतो. पण मराठीत चालवता येत नाही. नागपूर महाराष्ट्रात येऊन किती वर्षे झाली.

In reply to by उपयोजक

नागपूरच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात हिंदीत खटला चालवता येतो. पण मराठीत चालवता येत नाही.
ह्यासंबंधी काही विदा आहे का आपल्याकडे ?? मूळ स्रोत वाचण्यास मिळाला तर आनंद होईल.

In reply to by जेम्स वांड

ढळढळीत बातम्या दिसत आहेत की २०१६ साली महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालय (कागदोपत्री अजूनही बॉम्बे हायकोर्ट) इथे किंवा भारतातील कुठल्याही हायकोर्टात व्यवहाराची भाषा ही इंग्रजी असेल, ती सोडून इतर भाषा लागू करण्यासाठी गव्हर्नरला पॉवर आहे असेही म्हणतात. हल्लीच मराठी भाषेत फलक लावण्यासंबंधी एका केस मध्ये उच्च न्यायालय म्हणते की The court observed, “Indeed, even in this High Court, we permit documents in Marathi in Devanagari although the language of court is English, unless translations are required by a particular bench or court. त्यामुळे मुंबई हायकोर्टाच्या केसेस मध्ये किंवा औरंगाबाद नागपूर ह्यापैकी कुठल्याच खंडपीठात मराठीत केसेस उभ्या राहत नाहीत, त्यातही नागपूर खंडपीठाला वेगळे नामनिर्देशित करण्यामागे आपला हेतू काय हे मात्र अनाकलनीय होते आहे. आभार.

In reply to by जेम्स वांड

या दोन खंडपीठांपैकी कोणत्या खंडपीठात हिंदीतून जास्त खटले चालत असतील हे मी सांगायची गरज नाही. औरंगाबाद असो की नागपूर ही दोन्ही खंडपीठे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्राची राज्यभाषा असणार्‍या मराठीत तिथे खटले चालवता येत नाहीत पण राष्ट्रभाषा किंवा महाराष्ट्राची राज्यभाषा नसलेल्या हिंदीत मात्र खटले चालवता येतात. याला आक्षेप आहे. नागपूरमधे हिंदीभाषिकांच्या तुलनेत मराठीभाषिक जास्त आहेत. असे असूनही तिथे खटले मराठीत चालवता येत नाहीत पण हिंदीतून चालवता येतात याला आक्षेप आहे. हिंदीला परवानगी मिळते मग मराठीला का नाही? अधिकृत राज्यभाषा असूनही?

In reply to by उपयोजक

या दोन खंडपीठांपैकी कोणत्या खंडपीठात हिंदीतून जास्त खटले चालत असतील हे मी सांगायची गरज नाही.
गरज आहेच, हे तुम्हाला स्पष्ट करून सांगावे लागेल साहेब तुमच्याच मुद्द्यांच्या समर्थनार्थ. मुंबई, औरंगाबाद, नागपूर ह्या तीनही खंडपीठांत किती केसेस आहेत, अन त्यातील हिंदीत किती आणि इंग्रजीत किती हे आता तुम्ही डेटा सहित सांगणे बरे असेल कारण तुम्ही नुसते दावे ठोकताय, डेटा शून्य विदा शून्य. तुमच्या अंदाजांवर मुद्दे चालत नाहीत, तुमची परसेप्शन अन बायसेस तुम्हाला लखलाभ पण महाराष्ट्राच्या एखाद भागाविषयी प्रतिकूल मत ठेऊ "तिथे तसेच असेल" म्हणणे सोपे अन सिद्ध करणे अवघड आहे, नागपूर कोर्टात किंवा तुम्हाला वाटते त्या खंडपीठात जास्त केसेस हिंदीत असतात ह्याला समर्थनार्थ डेटा द्या, दुसरं उलट फिरून मला डेटा मागू नका, दावा तुमचा सिद्ध तुम्हीच करायचा.

In reply to by जेम्स वांड

आधी म्हणालात नागपूरला हिंदीत खटले चालतात, त्यावर मी नीट माहिती दिली आहे की सगळ्याच खंडपीठांत हिंदीत केसेस चालतात, आता तुम्ही परत लांबड लावून त्या तुमच्या द्वेषजंत्रीत औरंगाबाद पण जोडले, मराठी आपणाला कळत नाही असे शक्य वाटत नाही त्यामुळे परत एकदा
मुंबई उच्च न्यायालयाच्या कुठल्याही खंडपीठात मराठीत खटला चालवता येत नाही, मग ते दस्तुरखुद्द मुंबईतील कोर्ट असो वा औरंगाबाद नागपूरचे खंडपीठ असो, त्यात नागपूर खंडपीठ किंवा औरंगाबाद खंडपीठ तितके दोषी धरुन मुंबई सोवळी ठेवणे हे निव्वळ चूक आहेच

आपण सामान्य लोक भाषे विषयी खूप हळवे असतो.व्यवहाराची भाषा ,संपर्क भाषा ह्याचा अर्थ तर सरळ आहे भाजी बाजारातील ,प्रवासातील ,कष्टाची कामं करणाऱ्या लोकांना गरज असलेली भाषा,. थोडक्यात महत्त्वाच्या क्षेत्राशी संबंधित असले तरी . ती भाषा सत्ताधारी लोकांची नसते. प्रतिभावंत,प्रतिष्ठित ,सेलिब्रिटी ,श्रीमंत ,कॉर्पोरेट सारख्या शक्ती शाली क्षेत्रं इत्यादी इत्यादी ह्यांची नसते. मराठी भाषे विषयी बोलतात ना. राजभाषा फाटके लुगडे नेसून कोपऱ्यात बसली आहे. थोडक्यात तशीच संपर्क भाषेची अवस्था असते. मग ती हिंदी असो,मराठी असो ,नाही बाकी कोणतीही भाषा इंग्लिश सोडून. थोडे पैसे आले की लोक लग्नपत्रिका इंग्लिश मध्ये प्रिंट करायला लागलेत आणि त्या पत्रिका आपल्याच मराठी भाषिक लोकांना वाटायला लागलेत. हेच बाकी भाषिक लोकांना पण लागू आहे. म्हणजे आर्थिक लेवल ल साजेशी आमची मातृ भाषा नाही हे दाखवले गेले आहे हे हिंदी भाषिक लोकांना पण लागू आहे हिंदी सिनेृष्टीतील पारितोषिक वितरण समारंभात सरळ इंग्लिश जास्त बोलली जाते म्हणजे ज्या हिंदी भाषेची त्यांना पैसा,प्रतिष्ठा दिली..ती हिंदी भाषा अवॉर्ड फंक्शन च्या लायकीची नाही. हीच वृत्ती ह्या मधून दिसते हे पण सर्व भाषिक लोकांना लागू आहे मोठमोठ्या पार्ट्या,उद्योगपती चे मेळावे, भाषा इंग्लिश.. कोणत्या आर्थिक स्तरातील लोक कोणती भाषा बोलतात त्या वर त्या भाषेची प्रतिष्ठा अवलंबून असते .बाकी सर्व भावनिक खेळ आहेत . ही दुसरी बाजू भाषा प्रेमाची.

आजची बातमी ''प्रादेशिक भाषेमधुन न्यायालयाचे कामकाज चालावे - इति पंतप्रधान मोदी'' चर्चेत उपयोगी व्हावा म्हणून मुद्दा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

@ प्रा. डॉ. सर, अस्मितेची कितीही प्रदर्शने भरवली तरी, मराठी माणूस, 'इंग्रजी म्हणजेच आर्थिक उन्नती' या पलिकडे बघण्यास तयार नाही हे कटू वास्तव स्विकारावे लागते असे तुर्त तरी म्हणावे लागेल. आपल्या उपरोक्त प्रतिसादामुळे १ मे निमीत्त २०१४ मध्ये मी याच विषयाशी अनुषंगिक अनुभवाधारीत लिहिलेला लेख आठवला.