Skip to main content

त्यांनी हिंदीत का बोलावं?

लेखक उपयोजक यांनी सोमवार, 11/04/2022 18:52 या दिवशी प्रकाशित केले.
तीन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत एक विनंती केली की वेगवेगळ्या राज्यांमधल्या असमान मातृभाषा असणार्‍या लोकांनी एकमेकांशी संवाद साधताना इंग्रजीऐवजी हिंदी भाषा वापरावी. https://www.google.com/amp/s/indianexpress.com/article/india/people-dif… या अनावश्यक विनंतीला अहिंदी राज्यांमधे साहजिकच विरोध होतो आहे. विशेषत: दक्षिणेकडच्या राज्यांमधे. आता ज्या लोकांची मातृभाषा हिंदीच आहे त्यांना या विनंतीबद्दल काहीच आक्षेप नसणारेय.उलट त्यांचा आयता फायदाच होईल. आता प्रश्न असे आहेत. १. दोन राज्यांमधील असमान भाषिकांनी कोणत्या भाषेत एकमेकांशी बोलावं अशी विनंती गृहमंत्री का करत आहेत? लोकांनी कोणत्या भाषेत बोललं पाहिजे हे गृहखात्याच्या अखत्यारीत येतं का? २. या विनंतीला दक्षिणेकडच्या राज्यातले लोक सकारात्मक प्रतिसाद देतील असा भ्रम गृहमंत्र्यांना का झाला असावा? की ही विनंती हिंदीतून बोलू शकणार्‍या अहिंदी राज्यांतल्या लोकांसाठीच आहे? अशी विनंती केल्यावर ज्यांना हिंदी येत नाही ते लगेच हिंदी शिकून घेतील हा भ्रम गृहमंत्र्यांना का झाला असावा? ३. या विनंतीमागे कारण काय असावं? हिंदी पट्ट्यातल्या लोकांची सोय व्हावी? कारण हिंदी पट्ट्यातले लोक "हम तो पापी पेट के लिए आए हैं भाई" हे रडव्या चेहर्‍यानं सांगून अहिंदी भाषिकांना 'आमची सोय बघा' असंच सांगू पाहतात. हिंदीभाषिक अहिंदी राज्यातल्या भाषा शिकायला राजी नसतात. पण अहिंदी भाषिकांनी मात्र हिंदी शिकावी ही अपेक्षा बाळगतात. हे हिंदी पट्ट्यातले लोक हिंदीतर भाषा शिकणार कधी? ४. समजा दक्षिणभारतीय राज्यांनी किंवा ईशान्येकडच्या राज्यांनी एकत्र येऊन त्यांची एकच सामायिक बोलीभाषा निर्माण करुन हिंदीला कडवे आव्हान निर्माण केले तर? मग काय करतील अमित शहा? ५. इंग्रजीला अमित शाह यांचा विरोध का? इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे. कमालीची ताकदवान भाषा आहे.आंतरराष्ट्रीय भाषा आहे. उपयोगाची भाषा आहे. असं असताना ती न वापरता हिंदी का वापरायची?

वाचने 108679
प्रतिक्रिया 510

प्रतिक्रिया

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मारवाडी बोलून किंवा मारवाडी च अभिमान बाळगून बाकी राज्यात कोणताच व्यवसाय करता येणार नाही म्हणून अतिशय जड अंतःकरणाने लोकल भाषा आणि वेळ पडली तर हिंदी स्वार्थासाठी प्रेम म्हणून नाही बोलून स्वतःचा स्वार्थ साधणार हाच एकमेव हेतू.

In reply to by sunil kachure

मारवाडी बोलून किंवा मारवाडी च अभिमान बाळगून बाकी राज्यात कोणताच व्यवसाय करता येणार नाही म्हणून अतिशय जड अंतःकरणाने लोकल भाषा आणि वेळ पडली तर हिंदी स्वार्थासाठी प्रेम म्हणून नाही बोलून स्वतःचा स्वार्थ साधणार हाच एकमेव हेतू. सहमत आहे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

प्राणपणाने मराठीला विरोध नी हिंदी ला समर्थन देत आहेत.
हे कुठं दिसलं? डोळे खराब आहेत की मेंदू खराब आहे की मी जे मराठीत प्रतिसाद लिहिलेत ते समजण्याची पात्रता नाही? माझ्या आतापर्यंतच्या प्रतिसादांमध्ये केवळ इंग्रजी ऐवजी हिंदी असं लिहिलंय मी. मराठीऐवजी हिंदी असं कुठे दिसलं? का उगाच काहीही खोटं पसरवायचं?
स्वत घरात मारवाडीच बोलनार.
मी घरात कोणती भाषा बोलावी ह्याचा इथे काय संबंध? इथे तुम्हाला आणि इतरांना समजेल इतकं चांगलं मराठी मी लिहितोय ना? वैयक्तिक टिपण्णी हा निव्वळ फालतूपणाच झाला. तेच करायचं झालं तर मग, तुमची इथली वैयक्तिक माहिती एकदा स्वत:च वाचा -
वैयक्तिक माहिती नाव अमरेंद्र माहीष्मतीकर. शहर/गाव माहीष्मती नगरी. देश माहीष्मती साम्राज्य. आवडते संगीत धीवरा. माहीष्मती एंथेम. पंछी बोले है क्या? शिवम. ममता से भरी मनोहारी ममता से भरी कान्हा सोजा जरा चित्रपट, नाटक आणि दूरचित्रवाणी बाहुबली १, बाहुबली २. शक्तिमान, जुनीअर जी, शाकालाका बूम बूम, सोनपरी. आवडते खाद्यपदार्थ कटप्पा मामाचं ऊष्ट जेवण.
तुम्ही अमरेंद्र बाहुबली हे सदस्यनाम का घेतलंत? या दक्षिण भारतीय चित्रपटातल्या पात्राविषये तुम्हाला इतके प्रेम का? मराठी चित्रपटातल्या पात्राविषयी तुम्हाला असं प्रेम / अभिमान का नाही? तुम्ही मूळ मराठी नसून दक्षिण भारतीय आहात किंवा त्यांच्या ठायी तुमची निष्ठा आहे असं समजावं का? त्यामुळेच तुम्ही प्राणपणाने हिंदी या भारतीय भाषेला विरोध आणि इंग्रजी या परकीय भाषेला समर्थन देत आहात का? तुम्ही गुलामी मनोवृत्तीचे आहात काय? इंग्रजांचे हस्तक आहात काय? पुन्हा देशावर इंग्रजांचे राज्य यावे अशी तुमची इच्छा आहे काय? असले प्रश्न उपस्थित करता येतील, पण मी असले प्रश्न उपस्थित करणार नाही कारण तुमच्या वैयक्तिक / खासगी बाबींचा इथे उल्लेख अनुचित ठरतो. इतका किमान सभ्यपणा निदान मी तरी पाळतो. असो. इथे वैयक्तिक माझं मत सोडा मराठी नेत्यांचं याबाबत काय मत आहे? हे पाहा. मी वर सर्व सात प्रमुख पक्षांबाबत लिहिले आहे. कोणाचाच इंग्रजीऐवजी हिंदीला विरोध नाहीये. हे नेते / त्यांच्या पक्षाचे लोकप्रतिनिधी हे महाराष्ट्रातील जनतेने निवडून दिलेले असल्याने त्या नेत्यांचे मत हे महाराष्ट्राचे अधिकृत मत मानावे लागेल. तुम्हांस मान्य नसल्यास तुम्ही या नेत्यांऐवजी दुसर्‍या नेत्यांना निवडून द्या. जोपर्यंत महाराष्ट्रातील या सात (भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, समाजवादी, रिपाईं, मनसे) मुख्य पक्षांचे मत इंग्रजी वि. हिंदी या वादात हिंदीसोबत आहे तोवर मला इथे या धाग्यावर तुमच्यासोबत पुन्हा वेगळा युक्तिवाद करायची गरज नाहीये आणि उपयोग देखील नाहीये.

In reply to by sunil kachure

महामूर्खपणाचा कळस आहे हा प्रतिसाद. तीन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत एक विनंती केली की वेगवेगळ्या राज्यांमधल्या असमान मातृभाषा असणार्‍या लोकांनी एकमेकांशी संवाद साधताना इंग्रजीऐवजी हिंदी भाषा वापरावी. असे धागाकर्त्याने लिहिले आहे ते वाचायची तसदी घेतली की नाही भौ? घेतली असती तर इतका फालतू प्रतिसाद लिहिला च नसता तुम्ही त्यांना खरेच हिंदू विषयी इतके प्रेम आहे. त्यांनी गुजरात ची गुजराती ही राज्य भाषा बदलून ती हिंदी करून दाखवावी. गुजराती लोक कसे react होतील त्याचा नमुना बघायला मिळेल.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

हिंदीला विरोध असल्यामुळेच दक्षिण भारतीय नेते देशपातळीवर पोचू शकत नाहीत. नरसिंह राव (पाच वर्षे) आणि देवेगौडा (दीड वर्षे) हे अपवाद वगळता पंतप्रधान पद दक्षिण भारतीय नेत्यांना मिळाले नाही. हिंदी विरोधाचा अजिबात संबंध नाही. नरसिंहराव व देवेगौडा हे राष्ट्रीय पक्षात असल्याने पंतप्रधान होऊ शकले. इतर वजनदार दक्षिण भारतीय नेते स्थानिक प्रादेशिक पक्षात असल्याने ते पंतप्रधान होऊ शकले नाही. देवेगौडांना हिंदी येत नसूनही ते पंतप्रधान झाले होते आणि त्यांनी बाळ ठाकरे व पवारांसोबत साटंलोटं करण्याचा प्रयत्न केल्यामुळेच सीताराम केसरींनी त्यांना जायला लावले. ते जाण्यामागे हिंदीविरोध किंवा हिंदी न येणे हे कारण नव्हते. म्हणजे हिंदी विरोध = स्वतःचेच नुकसान असे हे समीकरण आहे. भ्रम आहे. महाराष्ट्रातील शरद पवार, देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे ह्या तीन पक्षांच्या नेत्यांना पंतप्रधानपदाची आस असल्याने या पक्षांचा कोणताही मोठा नेता हिंदीविरोधात दिसत नाही. आपण कधीही पंतप्रधान होऊ शकणार नाही हे पवार व ठाकरे ओळखून आहेत. महाराष्ट्रातील हिंदीभाषिक मतांसाठी हे हिंदीला विरोध करीत नाहीत. सोनियाजी इथे येऊन हिंदीत भाषणे करतात त्याऐवजी त्यांनी ती इंग्रजीत केली तर काँग्रेसच्या निवडून येणार्‍या लोकप्रतिनिधींची संख्या अजुनच झपाट्याने कमी होईल. असं काही होणार नाही. हिंदी भाषण वाचून दाखविण्याऐवजी त्यांनी मराठीतले भाषण वाचले तर थोडीफार मते वाढू शकतील. आठवले देखील केंद्रीय मंत्री असल्याने हिंदीत मुलाखती देत असतात, कविता देखील करतात. त्यांच्या इंग्रजी कविता मी कधी ऐकल्या नाहीत आठवलेंना इंग्लिश येत नसणार. ते कविता वगैरे करीत नाहीत. ट ला ट, फ ला फ जोडून काहीतरी आचरटपणा करतात. एकमेव पक्ष मनसे हाच महाराष्ट्रात हिंदी विरोध करण्याची शक्यता होती. राज ठाकरेंच्या हनुमान चालिसा पठण घोषणेमुळे तीदेखील विरुन गेलीय यात काहीच आश्चर्य नाही. मनसे मराठीवादी पक्ष होता/आहे यावर मी कधीही विश्वास ठेवला नव्हता. सातत्याने भूमिका बदलून व कोलांट्या उड्या मारून राज ठाकरेंनी आपली विश्वासार्हता शून्य करून ठेवली आहे. भाऊ तोरसेकरांना मनसेविषयी कितीही साक्षात्कार होत असले व या पक्षाविषयी कितीही आशा वाटत असली तरी हा पक्ष संपलेला आहे सर्वांना माहिती आहे.

In reply to by श्रीगुरुजी

भाऊ तोरसेकरांना मनसेविषयी कितीही साक्षात्कार होत असले व या पक्षाविषयी कितीही आशा वाटत असली तरी हा पक्ष संपलेला आहे सर्वांना माहिती आहे. भाऊ तोसरेकर हे नाव दिसले की मन हळवे होते, म्हणजे अनेक स्तंभ, तुनळी विडीओ बनवूनही पद्मश्री कुणाला दिला भाजपने तर कंगनाला. प्रामाणीक कार्यकरनार्यांवर भाजप पक्ष नेहमी अन्याय करत आलाय. भाजपसाठी फक्त एक स्टेटमेंट देऊनही कंगना पद्मश्री पटकावते ना कितीतरू तुनळी चित्रफीता तयार करूनही भाऊंना काहीच नाही. अधून मधून देश, देशातूल नागरीकानाही भाजप पक्ष पद्मश्री देतो ह्याबदल्यात देशाने त्यांचे नी माननीय नकेंद्र मोदीजींचे ऊपकार मानायला हवेत.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

भाऊ तोरसेकरांना कशाला मिळणार पद्म पुरस्कार ? ते काय वार्ताहर नाहीत की काहीतरी माहित नसलेली बातमी आणतात. ते घरी बसून बातम्या वाचून त्यावर टिप्पणी करतात. कंगना राणावत निःसंशयपणे भाऊ तोरसेकरांपेक्षा तिच्या क्षेत्रात जास्त गुणवान आहे.

In reply to by कॉमी

सैफ अली खान सारख्यांना पद्मश्री मिळते तर चार वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळविणार्‍या कंगनाला पद्मश्री मिळण्यात आश्चर्य ते काय?

In reply to by चेतन सुभाष गुगळे

पद्मश्री कशी वाटली जाते हे काही गुपित नाही. त्याचे कौतुक कशासाठी. फिल्म लाईन मध्ये ऑस्कर मिळणे खरे कसोटी च . तिथे कसं लागतो.इथे चमचेगिरी लागते.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

सैफ अली खान सारख्यांना पद्मश्री मिळते तर चार वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळविणार्‍या कंगनाला पद्मश्री मिळण्यात आश्चर्य ते काय? पण भाजपसाठी राहलं कोण जास्त? कंगना की भाऊ?? बाकी कोरोनात अणेक लोकानी जनतेची सेवा केली पण भाजपपक्षाची केली नाही म्हणून पद्मश्रीस मुकले.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

हिंदीला विरोध असल्यामुळेच दक्षिण भारतीय नेते देशपातळीवर पोचू शकत नाहीत. मग दक्षिण भारतीय भाषांना विरोध असल्यानेच काँग्रेस आणि भाजप तमिळनाडूत स्वबळावर येऊ शकले नाहीत असे म्हणता येईल की.

देशपातळीवर चे नेते बघितले काही मोजके सोडून . तर असे लक्षात येईल ह्या देशपातळीवर च्या नेत्यांना स्वतःचे होम स्टेट मध्ये काहीच किंमत नसते. ह्या देशपातळीवर असणाऱ्या नेत्यांचे स्वतःचे राज्य, अगदी स्वतःच मतदार संघ पण अतिशय मागास असतो सर्व सुविधा पासून वंचित असतो. आणि हे नालायक देशाच्या सरकार मध्ये असतात. काय देशाची प्रगती करणार. ज्यांना स्वतःचा मतदार संघ सुधारता येत नाहीं.

खोटी ,कमजोर बाजू असून पण माझीच लाल म्हणून हिंदी भाषा असणारे हिंदी चे गुणगान गटार तेव्हा कधी कधी देश हीत विसरून भाषा लाच महत्व देवून भूमिका घ्यावी असे वाटते. भारत सरकार कडे टॅक्स किंवा बाकी मार्गाने येणारा पैसा ह्याचा डेटा बघितला तर हिंदी भाषिक राज्यांपेक्षा हिंदी भाषा नसणाऱ्या राज्यांचा हिस्सा खूप म्हणजे खूप जास्त आहे.भारत सरकार,भारतीय लष्कर किंवा भारताची कोणतीही संस्था फक्त हिंदी भाषा नसणाऱ्या राज्यांवर च अवलंबून आहे. हवं तर हिंदी भाषिक राज्यातून केंद्राला मिळणारा महसूल आणि हिंदी भाषा नसणाऱ्या राज्यातून केंद्राला मिळणारा महसूल हे Google वर सर्च करा काहीच देश उपयोगी नसून ह्यांची च लाल करताना बुद्धी गहाण ठेवली जात असेल का ?

In reply to by sunil kachure

हिंदी चे गुणगान गटार
व्वा, क्या बात, सुका साहेब ! "हिंदीला अंध विरोध नको" या मुद्द्याला चक्क गुणगान गटारीकडे नेऊन ठेवलेत !

हिंदी ही खूप कमी लोकांची भाषा आहे. पंजाब,हरियाणा,राजस्थान,यूपी (मधील अनेक भाग),हिमाचल प्रदेश,बिहार,झारखंड, chhatisgadh ,हे हिंदी भाषा बोलणारी राज्य नाहीत ..ह्या राज्यातील खूप मोठा समाज हा हिंदी बोलत च नाही. त्यांची प्रतेकाची भाषा वेगळी आहे आणि त्या ज्या भाषा आहेत त्यांचे हिंदी शी कोणतेच साधर्म नाही. Jharkhandi भाषा मी ऐकली आहे हिंदी चा त्या भाषेशी काहीच संबंध नाही. तसेच राजस्थानी,हरियानी,पंजाबी मिथिली,ह्या आणि अशा अनेक भाषा बोलणारे लोक च तिथे जास्त आहेत. आपली लोक थोडे तरी हिंदी समजतील पण वरील राज्यातील गाव खेड्यात राहणाऱ्या लोकांना आपल्या इतके पण हिंदी समजत नाही. असा माझा अंदाज आहे.

१) माझ्या कडे १९२० च ओरिजनल जमिनी खरेदी खत आज पण आहे . त्या मध्ये वापरलेली भाषा मराठी नाही तर मोडी आहे. आणि राजस्थानी भाषा पण मोडीत च लीहली जायची असे विकी सांगतो. भारताच्या अनेक प्रांतात पण मोडी लिपी अस्तित्वात असू शकते. २) बडोदा मध्ये सयाजीराव गायकवाड, इंदोर मध्ये शिंदे आणि होळकर घराणे,तमिळ nadu तंजावर मध्ये मराठी साम्राज्य ची सत्ता. ह्या आणि अशा अनेक ठिकाणी मराठी राजे राज्य करत होते त्यांची राज्यकारभार ची भाषा कोणती असावी असा प्रश्न मला नेहमी पडतो. त्यांनी नक्कीच राजाची भाषा म्हणून मराठी हीच राज्य कारभार ची भाषा अशी सक्ती केली नसणार. स्थानिक भाषेत च राज्य कारभार होत असावा. त्यांना काहीच अडचण आली नसावी कारण संस्कृती,भाषा लादणे अशी तेव्हा वृत्ती नव्हती. आताची काही वर्ष सोडली तर पूर्वी भाषिक संघर्ष झाल्याचे कुठेच वाचलेले आठवत नाही. ३)तेच मुघल साम्राज्य विषयी ते हिंदी नाही तर उर्दू आणि फारसी ,अफगाणी,भाषिक होते. पण त्यांचा पण भारतात विविथ भाधिक जो राज्यकारभार चालत असेल तो स्थानिक भाषेत च. त्यांनी स्थानिक भाषेला सन्मान दिल्या मुळे भाषा हा पहिला कधी वादाचा विषय नव्हत्या. तेव्हा हेतू साफ होते. पण आता भाषा पहिली लादली जाते किंवा फसवून लोकांना शिकवली जाते,नंतर त्याच भाषिक लोकांची संस्कृती येते .आणि शेवटी त्यांचीच सत्ता येते. हे सूत्र धोकादायक वाटत म्हणून भाषा स्वीकारली जात नाही. विचार करा. हिंदी आणि मराठी मध्ये काय फरक आहे? दोन्ही भाषा देवनागरी मध्येच लिहल्या जातात. दोन्ही भारत जवळ जवळ ५०% पेक्षा जास्त सामान शब्द आहेत त्यांचे अर्थ दोन्ही भाषेत एकच आहेत. मराठी लोक जे बिलकुल शाळेत गेले नाहीत.हिंदी शी त्यांचा कसलाच संबंध नाही. तरी हिंदी समजतात कारण दोन्ही भाषेत असणारी समानता. पण हा पण खूप महत्वाचा आहे आणि ह्याला अनेक राजकीय, वर्चस्व वादी अर्थ आहेत. हिंदी भाषा असणारे ,शिकलेले,अडाणी लोक पण सोडा. मराठी आणि हिंदी मध्ये इतके साम्य असून पण मराठी समजत नाहीत ह्याचा अर्थ काय? माझे मत .जर अडाणी मराठी लोकांना जे शिकलेले नाहीत ये..त्यांना हिंदी समजत असेल तर ह्या जे शिक्षित हिंदी भाषा वाले आहेत त्यांना मराठी समजायला काय अडचण आहे. उत्तर. काहीच अडचण नाही. फक्त स्व भाषा म्हणजेच श्रेष्ठ हा फालतू गर्व. दुसऱ्या भारतीय भाषे विषयी कमी पणाची भावना. हीच कारण आहेत. अडगे पना. एका शब्दात. जर हे हिंदी भाषा असणारे Adge वागत असतील तर बाकी लोकांनी का समजदार पना दाखवावा. सरळ प्रश्न आहे.

आता काही वर्षात भारतात भाषा द्वेष जास्त वाढलेला आहे.. ह्याची कारण वेगळी आहेत . चेतन किंवा जे हिंदी ची बाजू घेत आहेत ते समजत आहेत ती कारण नाहीत पूर्वी ची मुंबई थोडी आठवत आहे बाकी ऐकलेली आहे.. चाळीत राहणारे. शेजारी असणार मराठी कुटुंब आणि यूपी चे कुटुंब.. ह्यांच्या बायका ह्या ग्रामीण भागातील च असतं.. पुरुष इथे नोकरी करायचे. तर ह्या दोन यूपी आणि मराठी बायका ज्यांना एकमेकाची भाषा येण्याचा संबंध च नाही... तरी त्या संवाद साधायचा. यूपी ची बसी भोजपुरी मिश्रित हिंदी. आणि मराठी बाई विभागानुसार मराठी मध्येच बोलायच्या. दोघी स्वतःच्या भाषेत च बोलायच्या पण दोघी एकमेकाची भाषा समजून घ्यायच्या. काही अडचण नाही. जिथे समजत नाही तिथे हातवारे. पण तेव्हा प्रचंड प्रमाणत हिंदी भाषा असणारे इथे नव्हते ..त्या मुळे त्यांची भीती वाटत नव्हती.. आता प्रचंड प्रमाणात हिंदी भाषा बोलणारे इथे आणि देशातील अनेक भागात जात आहेत ..त्या मुळे अस्वस्थ वाटत आणि त्या मुळे भाषा द्वेष निर्माण होतो. असुक्षित पणाची भावना नॉन हिंदी राज्यात आहे त्या मुळे हिंसक प्रतिक्रिया पण उमटतात.

Amit शाह बोलत आहेत ते पूर्णतः राजकीय विधान आहे.खरी समस्या खूप वेगळी आहे. भाषा द्वेष किंवा कोणती भाषा संपर्क भाषा असावी ही समस्या च नाही. राजस्थान ची लोकसंख्या ८, करोड आहे ह्या मध्ये ह्या मध्ये ३० करोड परप्रांतीय लोक तिथे आली असती आणि त्यांची भाषा हिंदी असती तर राजस्थान सुध्धा हिंदी च कट्टर विरोधी झाला असता त्यांनी राजस्थानी भाषा चाचं आग्रह धरला असता. अमित शाह ह्यांच्या गुजरात ची लोकसंख्या ७, करोड आहे..त्यांच्या राज्यात ३०% तमिळ भाषिक लोकांनी आपले बस्तान बसवले असते किंवा 30% हिंदी भाषिक लोक तिथे असते. तर . .देश गेला खड्यत त्यांनी गुजराती सोडली च नसती. महाराष्ट्र मध्ये आज जवळ जवळ 32% लोक ही मराठी नाहीत. तरी महाराष्ट्र आणि मराठी लोकांनी देशप्रेम दाखवाव आणि स्वतःच्या भाषेचा अभिमान सोडून सर्वनाश ओढवून घ्यावा ही देशाच्या गृह मंत्र्यांची इच्छा असेल तर ते राज्य करण्याच्या लायकीचे नाहीत. जसे चर्चिल बोलले होते भारतीय राज्य करण्याच्या बिलकुल लायकीचे नाहीत. हे सत्य च वाटत जेव्हा देशाचा गृह मंत्री असले सल्ले देतो तेव्हा. महारष्ट्र सारखीच दक्षिण भारत मधील शहरांची अवस्था आहे..त्या दक्षिण भारतीय अस्वस्थ आहेत..ते विरोध करणार च .. ह्या सर्वांच्या भावना समजून घेवून केंद्रांनी लाँग टर्म योजना आखल्या पाहिजेत. हिंदी भाषिक मागास राज्यात बाकी भाषिक जात च नाहीत..त्या मुळे त्यांना ह्या प्रश्नाची तीव्रता माहीत नाही.

भाषिक वाद हा विषय लाईटली घेवू नये ..दीर्घ कालीन पण steady योजना आखून. आंतरदेशीय migration कमी होईल अशा योजना आखव्यात . भले बजेट मधील जास्त पैसे ह्या योजनांवर खर्च झाले तरी चालतील स्वतः केंद्रांनी त्या योजना राबवाव्यात राज्यांना सहभागी करून घेवू नये. वरवर दिसणारा हा भाषिक वाद अनियंत्रित स्थलांतर च परिणाम आहे. तो पण एकाचं दिशे नी. हिंदी भाषिक राज्य आणि हिंदी भाषा नसणारे राज्य..आताच योजना आखल्या नाहीत.उपाय योजना केल्या नाहीत तर स्थिती अतिशय गंभीर होवू शकते. अनेक विद्वान लोकांनी पण हा इशारा दिलेला आहे. रिॲलिटी आपण समजून घेतलीच पाहिजे. आणि वेळ येण्या अगोदर स्थिती कशी सुधारेल ह्याचा विचार करावाच लागतो. ह्याला च उत्तम राज्य करते म्हणतात.

रवींद्रनाथ टागोरांची गोरा हि कादंबरी हिंदीमध्ये अनुवादित वाचलेली. त्यातली हिंदी अगदी साजूक होती- संस्कृतप्रचुर शब्द असलेली. तशी सुद्धा हिंदी असते.

In reply to by कॉमी

https://www.youtube.com/playlist?list=PLUiMfS6qzIMyMuVAE36V44twlTqiuniS5 दूरदर्शन वरच्या हिंदी निर्मात्यांनी ८० व ९० च्या दशकांत अनेक बंगाली (जशी ब्योमकेश बक्षी आणि आता ही गोरा) आणि दक्षिण भारतीय (मालगूडी डेज्) यासारख्या अनेक प्रादेशिक भाषांमधील कलाकृतींचा हिंदीत अनुवाद करुन सादरीकरण केल्यानेच भारताच्या एका प्रांताला दुसर्‍या प्रांताची अगदी जवळून ओळख झाली. भारतीय एकात्मतेच्या दिशेने हिंदीचे हे योगदान नाकारणे हा अगदीच कृतघ्नपणा ठरेल.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

भारतीय एकात्मतेच्या दिशेने हिंदीचे हे योगदान नाकारणे हा अगदीच कृतघ्नपणा ठरेल. किती दक्षीणेतील भागातूल लोकानी हिंदीतील ब्योमकेश बक्षी पाहीली?? भारतीय एकात्मतेसाठी हिंदीची आजिबात आवश्यकता नाही. भारतीय एकातिमतेच्या नावाखाली हिंदी लादायचा डाव आजिबात साध्य होनार नाही. हिंदीचा जन्म १५० वर्षा आधीचा त्या आधीही भारत होता बरका.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

याने कसली एकात्मता साधली आणि यात हिंदीचे कसले योगदान? तेव्हा राष्ट्रीय दूरदर्शन ही एकच वाहिनी होती व त्यावर फक्त हिंदी कार्यक्रम असायचे म्हणून हिंदीत अनुवाद केला. दूरदर्शनवर इतर भाषांना संधीच देत नव्हते. यातून काही एकात्मता साधली गेली असती तर अहिंदी राज्यातून हिंदीला होणारा विरोध केव्हाच मावळला असता व हिंदी हीच आपली भाषा असल्याचे सर्वांनी मान्य केले असते.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

सहमत. ह्या सगळ्या मालिका बऱ्याच भारतीयांसाठी मौलिक ठेवा आहेत. हिंदीचा "अरबी, उर्दूमिश्रित उर्दूछाप हिंदी" असा उल्लेख पाहून अनेक पातळींवर आश्चर्य आणि खेद वाटला- १. उर्दू आणि अरबी ह्या "बाहेरच्या" भाषांचे मिश्रण चालत नाही, पण संबंध बाहेरची इंग्लिश भाषा चालते हे कसे ? २. संस्कृतप्रचुर हिंदीमध्ये लेखन करणारे कितीतरी उत्तमोत्तम लेखक आणि कवी होऊन गेलेत. माझ्या अतिशय मोजक्या हिंदी वाचनात सुद्धा ते नजरेत आलेत. वर म्हणलं तसं गोराचे अनुवादक, हरिवंशराय बच्चन, सिनेगीत लिहिणारे नीरज- ह्यांचे लेखन हा आरोप निराधार असल्याचे दर्शवते. ३. मराठी मध्ये काय फारसी, उर्दू शब्द कमी नाहीत. तिथे मात्र सावरकरांची भाषाशुद्धी मोहीम गाजवायची. हिंदीला मात्र अरबीमिश्रित उर्दूछाप असे घालूनपाडून बोलायचे. हा एक बायस म्हणायला पाहिजे.

In reply to by कॉमी

इंग्लिश भाषा चालते हे कसे ? ईंग्रजी ही ज्ञानभाषा आहे. ती शिकून जगाची द्वारं ऊघडतात. हिंदीभाषीत युपीब्हारीनी हिंदीला ज्ञानभाषा बनवलेले नाही. आपला परका हा संबंधच नाही. हिंदी भाषा शिकून कुणीही ज्ञानसंपन्नझालेले नाही. हिंदी ही भाषआ अभ्यासक्रमात घालून पाचवीच्या कोवळ्या मुलांच्या डोकियाला नकारन ताण देऊन ठेवलाय ती भाषा न त्या मुलांची मातृभाषा ना ज्ञानभाषा, फक्त बिहारी युपी पाणीपुरी वाले, मजूर, नी ईतर हलके काम करनार्यांची सोय व्हावी म्हणूव पाचवीच्या लहानग्यांच्या माथी हिंदी का मारावी? हाप्रश्न कोणत्याही सुज्ञ पालकाने स्वतला विचारून पहावा.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

माझ्या मुद्द्यामधले अर्धवट वाक्य कापून मूळ मुद्दा सोडून जुन्याच पटरीवर गाडी नेत आहात. तुमच्या प्रशनाचे उत्तर तुम्हाला आधीच दिले आहे. काकूबाईंना मिश्या असत्या तर, बहुसंख्य भारतीयांना ज्ञानभाषा इंग्रजी येत असती तर- छान झाले असते. पण येत नाही. ९०% भारतीयांना इंग्रजी समजत नाही.

In reply to by कॉमी

10% भारतीय लोकांना फक्त इंग्लिश समजते असे कोमि ह्यांचा दावा आहे. हा 10% आकडा त्यांनी कसा काढला असे ते विचारात नाही. जावू ध्या त्यांचे समाधान त्यांच्या मता नी 10,%, म्हणजे 14 कोटी लोक झाली पण भारतात असणारे डॉक्टर्स त्यांची संख्या. विविध corporate कंपनीत काम करणारी लोक. विविध five star hotel मध्ये काम करणारी लोक.. इंग्लिश भाषा शिकवणारे शिक्षक,मोठ मोठ्या दुकानात ,mall मध्ये काम करणारे. इंजिनिअर,नर्सेस,ह्या सर्वांचा आकडा बघितला तर14 कोटी पेक्षा खूप जास्त लोक इंग्लिश समजतात. दर वर्षी इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये दहावी पास करणाऱ्या मुलांची संख्या बघितली तर वार्षिक कोटी मध्ये लोक इंग्लिश समजणारी निर्माण होत आहेत . ह्या 10 % इंग्लिश भाषिक लोकांची संख्या 50 % होण्यास जास्त वर्ष लागणार नाहीत. .

दिल्ली आकाशवाणी केंद्रावरून सांगितल्या जाणाऱ्या बातम्यांची सुरूवात This is All India Radio अशी असायची. ८० च्या दशकात This is Aakaashwaani असा बदल केला गेला. या बदलाला सर्व दाक्षिणात्य राज्यांनी विरोध केल्याने तातडीने हा बदल रद्द केला होता. दाक्षिणात्य राज्यांना साधा एक शब्द बदललेला चालत नव्हता आणि म्हणे हिंदीमुळे भारतीय एकात्मतेच्या दृष्टीने पाऊल ठेवले गेले.

In reply to by श्रीगुरुजी

हिंदी ना देश, देशाची एकात्मता ह्यांचा काहीही संबंध नाही. पण काही अर्धवट लोक हिंदी म्हणजे देश असंच रेटत असतात.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

इंग्रजी ऐवजी भारतातीलच एक भाषा हिंदीचा वापर करण्याची विनंती करणार्‍यांवर अर्धवट असल्याचा आरोप करणारे परदेशी भाषा इंग्रजीचे समर्थन केल्याने पूर्णतः परके व अभारतीय ठरत आहेत.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

हो बरोबर आहे. हिंदीत बोललं त्यांच्याशी की विचारतात, "इंडिया से आये हो क्या?" यावरुन काय ते ओळखा.

भारताची एकात्मता हिंदी मुळे धोक्यात येईल.आणि अनेक वेळा आली पण आहे. हिंदी ही भारताचा एकात्मता धोक्यात आणू शकते. इतके स्पष्ट अनेक घटनेतून दिसून आले तरी ही लोक ते मान्य करणार नाही.

हिंदीतर राज्यांमधल्या लोकांना हिंदी शिकण्याची गरज किती आणि कुठे भासते? १. दक्षिण भारतीय मोठे उद्योजक हे हिंदी पट्ट्यातल्या मोठ्या उद्योजकांशी इंग्रजीतूनच संवाद साधतात.तितके इंग्रजीचे ज्ञान त्या दोघांना असणे सहज शक्य आहे. २. द. भारतातले लघुउद्योजक हे दलालांमार्फत उत्तरभारतातील लघुउद्योजकांसोबत व्यवसाय करतात. या ब्रोकर्सना हिंदी येते. बहुतेकवेळा हे लोक मारवाडी , गुजराती असतात. अजूनतरी बहुतांश लघुउद्योजक (मग ते उत्तरभारतीय असोत की द.भारतीय) हे इंग्रजीतून व्यावसायिक संवाद साधण्याइतपत सक्षम नाहीत.दक्षिण भारतातल्या सर्व राज्यांमधे शाळांमधे इंग्रजी भाषा शिकवली जात असूनही ही परिस्थिती आहे. याचा अर्थ असा की एखादी भाषा शाळेत शिकवली गेली की त्या भाषेत संवाद साधण्याइतकी क्षमता निर्माण होतेच असे काही नाही. दक्षिण भारतीय लघुउद्योजकांनी हिंदी शिकून ब्रोकर हटवून स्वत:च उत्तरभारतीयांना माल विकावा वगैरे म्हणणे हास्यास्पद आहे. प्रत्येक लघुव्यावसायिकाकडे तितका वेळ नसतो. शिवाय भाषा शिकण्यात जितका वेळ जातो तो वेळ ते काम ब्रोकरकडे दिल्याने वाचतो. ते आर्थिकदृष्ट्या त्या दक्षिणभारतीय व्यावसायिकाला परवडणारे असते. ३. पर्यटन या उद्देशाने उत्तरभारतात किंवा हिंदी समजते तिथे प्रवास व त्यानिमित्ताने तिथल्या फेरीवाल्यांशी संवाद किंवा रस्ता विचारणे. आता जे लोक उत्तरभारतात पर्यटनाच्या उद्देशाने जातील ते एकतर ट्रॅव्हल कंपनीमार्फत जातील किंवा स्वतंत्र वाहन करुन जातील. ट्रॅव्हल कंपनीतर्फे जातील ते टूर कोऑर्डिनेटरची किंवा गाडीत हिंदी येणारं कोणी असेल तर त्याचीच मदत घेतील. स्वतंत्र वाहन करुन जातानाही हेच करतील. त्यांच्यातला किमान एकजणतरी कामचलाऊ हिंदी येणारा तरी असणारच. तशी तजवीज करुनच ते जाणार. हिंदी अगदीच येत नसेल तर गुगल ट्रान्सलेट आहेच. ते लोकांना दाखवून मार्ग विचारता येणे शक्य आहे. शिवाय खाणाखुणांची भाषा आहे. काम होणे हा आणि इतकाच अशा परिस्थितीत हिंदीचा उपयोग असेल. मग असं असेल तर हिंदी न शिकल्याने दक्षिण भारतीयांचं फारसं ना पूर्वी अडलं होतं ना यापुढे अडेल. इंग्रजी समजणार्‍यांची संख्या वाढती आहे. त्यामुळे हिंदीची गरज अजून कमी होईल. व्हायलाच हवी. उत्तरभारतीयांना दादागिरी करण्याची संधी मिळता कामा नये. यामुळे दक्षिण भारतीयांमुळे न्यूनगंड निर्माण होतो आणि त्या न्यूनगंडातून ते हिंदी शिकू पाहतात. एखादी भाषा ही अशी जबरदस्तीने , न्यूनगंडाने शिकणे भाग पडू नये.

भविष्यात इंग्रजी चा टक्का वाढेल यात शंकाच नाही. पण मग हिंदी भाषिक देखील इंग्रजी शिकतील ना ? की केवळ इतर भाषिक ? समजा हिंदी भाषिकांची मुजोरी नको म्हणून आपण हिंदी बोलायचे नाही हे समजण्यासारखे आहे. पण मग उद्या ते आपल्याशी इंग्रजी भाषेत बोलायला लागले तर आपली भुमिका काय असावी ?

In reply to by धर्मराजमुटके

पण मग उद्या ते आपल्याशी इंग्रजी भाषेत बोलायला लागले तर आपली भुमिका काय असावी ? इंग्रजी ही पूर्ण देशाची संपर्कभाषा व्हायला काहीच हरकत नाही.इंग्रजी ही पूर्ण देशाची संपर्कभाषा बनल्यास 'आम्हीच या भाषेचे मूळ मालक' असा अभिनिवेश किंवा 'कसं वाकवलं? तुमच्याच राज्यात तुमची भाषा न शिकता आमच्या भाषेत लावलं किनई बोलायला?' असा कुत्सितपणा ,मग्रुरी भारतातील कोणत्याच राज्याला करता येणार नाही.

In reply to by उपयोजक

अगदी बरोबर. इंग्लिश संपूर्ण देशाची संपर्कभाषा झाली तर महाराष्ट्रात येऊन अमराठींना स्वत:ची भाषा लादता येणार नाही.

In reply to by धर्मराजमुटके

त्याच बरोबर ईंग्रजी शिकून थोडी अक्कल ही येईल. किती पोरं पैदा करावीत ईतकी हा अक्कल नाही हिंदी भाषकांना.

बोलणारी व्यक्ति जन्माने - मराठी बोलणार्‍या व्यक्तिचे पालक - मराठी आणि त्यातही वडील तर प्राध्यापक आणि कवी व्हिडीओ चित्रीकरणातील स्थळ - मुंबई, महाराष्ट्र https://www.facebook.com/SachinTendulkar/posts/pfbid0X5M8edPVX8baeNai2N… आणि व्हिडीओतील भाषा - ? मला तरी मराठी वाटत नाहीये.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

हिंदी ही पूर्ण देशाची भाषा नसली तरी सर्वात मोठी भाषा आहे. जास्तीतजास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहचावा म्हणून तो हिंदीत बोलतोय.

In reply to by उपयोजक

हिंदी ही पूर्ण देशाची भाषा नसली तरी सर्वात मोठी भाषा आहे.
मग इतका वेळ मी काय वेगळं मत मांडत होतो का?

सुसंस्कृत non हिंदी भाषिक राज्य हादरून गेली आहेत .हिंदी भाषिक राज्यातील अत्यंत मागास राजकीय परंपरा बघून. नको बाबा त्यांच्या शी संबंध पण नको आणि ती भाषा तर बिलकुल नको. हिंदी बरोबर. मागास जातीय व्यवस्था येणार च. .मागास राजकीय परंपरा येणार च. मागास विचार पद्धती येणार च मागास रीती रिवाज येणार च. बेशिस्त पना येणार च. गुंडागर्दी येणार च. एकंदरीत हिंदी आली जी आता जी प्रगत राज्य आहेत ती सर्व ३०० वर्ष तरी मागे जातील. जग प्रगती करत आहे आणि हिंदी भाषा आणि त्या लोकांची संस्कृती मान्य करून प्राचीन मागास काळात जायचे आहे का.

In reply to by sunil kachure

एकंदरीत हिंदी आली जी आता जी प्रगत राज्य आहेत ती सर्व ३०० वर्ष तरी मागे जातील.
दिवस बोअर चालला होता ..... हा प्रतिसाद वाचला अन खो खो हसून बोअरडम कुठल्या कुठे पळुन गेला ! Boredom 234

In reply to by चौथा कोनाडा

महाराष्ट्रात हिंदी लोकांनी स्वीकारली. लगेच हिंदी मागोमाग. यूपी,बिहार ची राजकीय जातीयवादी संस्कृती आली. उत्तर भारतीय सन साजरे होवू लागले त्या बरोबर त्यांच्या परंपरा आल्या. लोक लग्नात चोऱ्या करायला लागले नवरदेवाच्या चपला ,बुट चोरायला लागले. दक्षिण भारताने हिंदी स्वीकारली नाही. तिथे लग्नात नवऱ्याचे बुट चोरले जात नाहीत. ही मोजकीच उदाहरणे तुम्हाला माझे मत समजायला मदत करतील. आणि हसणे थांबवून तुम्ही गंभीर व्ह्याल. अजून खूप आहेत उदाहरणे. राजस्थान मध्ये सती प्रथेचे समर्थन करण्यासाठी सती चे मंदिर आहे. भाषे बरोबर त्या जुनाट प्रथा पण येतील.

In reply to by चौथा कोनाडा

दिवस बोअर चालला होता ..... हा प्रतिसाद वाचला अन खो खो हसून बोअरडम कुठल्या कुठे पळुन गेला !
म्हणजे हिंदी भाषिक राज्ये दक्षिणेकडील राज्यांच्या तुलनेत मागास आहेत याबद्दल दुमत नाहीच पण ...भावनेच्या भरात त्यांनी एक शून्य जास्त टंकला असावा :) असो.. कधी कधी विनोदी प्रतिसादही असायला हवेत...

साध्या शब्दात ..हिंदी ही भारतातील अती मागास राज्यातील भाषा आहे. मागास म्हणजे. 1) आर्थिक बाबतीत मागास २) सामाजिक सुधारणा बाबत मागास. ३) निती मत्ता मध्ये मागास. ४), परंपरा आणि अंध श्रद्धा ह्या बाबत मागास. अशा ह्या भाषेचा हट्ट धरणे हाच मूर्ख पना आहे. भाषा आणि संस्कृती,नीतिमत्ता,प्रगत विचार,ह्यांचा खूप जवळचा संबंध असतो. फक्त भाषा कशी योग्य आहे हा विचार च बालिश आहे. मी तर म्हणतो देशात हिंदी वर बंदी जाहीर केली तर .. राम मंदिर. काश्मीर प्रश्न. साक्षरता.. स्त्री स्वतंत्र. लोकशाही. जातीयवाद . धार्मिक वाद.. ह्यांची खरी उत्त्तर सापडतील आणि भारत जगातील महासत्ता बनेल. हिंदी chya नादाला लागल तर . केनिया पण भारतासाठी खूप प्रगत देश असेल.

In reply to by sunil kachure

देशात हिंदी वर बंदी जाहीर केली तर
सुनीलजी तुमचा मागचा एक प्रतिसाद बराच संतुलित होता. आता मात्र तुम्ही अगदीच टोकाचे विचार मांडत आहात. अशा प्रकारे दोन प्रतिसादांत मोठा विरोधाभास असल्याने तुमच्या आय डीची विश्वासार्हता कमी होवू शकते याची तुम्हाला कल्पना असावी. असो. एक भाषा म्हणून हिंदीचाही आदर आहेच आणि इतर भाषिकांनी ही हिंदी आपापल्या आवडीनुसार व कारणानुसार शिकायलाही हरकत नाही (कुणाला उत्तरेकडील राज्यांत भटकंती करायची असेल, कुणाला हिंदी चित्रपट बघावेसे वाटत असतील, कुणाला मुन्शी प्रेमचंद सारख्या साहित्यिकांचं साहित्य मुळातून वाचायचं असेल.. ई ई) ..मात्र हिंदी भाषिक लोक आपल्या राज्यात येणार आहेत आणि त्यांच्याशी संभाषण होवू शकावे म्हणून केवळ , अमित शहांच्या प्रेमळ आवाहनाखातर (!!) सगळ्यांनी हिंदी शिकावी हे मात्र फारसं संयुक्तिक कारण होवू शकत नाही इतकंच.. बाकी हिंदीवर राग नाही.. अनेक हिंदी चित्रपटांनी माझं मनोरंजन केलंय.. अनेक इंग्लिश वा दक्षिणी भाषेतले हिंदीत डब केलेले चित्रपटही उपलब्ध झाल्याने त्यातुनही मनोरंजन झालं आहेच.. .त्यामुळे माझा हिंदी वर राग नाहीच..( खरंतर कोणत्याच भाषेवर राग नाही. आणि असण्याचं कारणही नाही..) झालंच तर हिंदी भाषेतील मान्यवरांनी भाषाशुद्धीचं थोडं मनावर घेतलं तर हिंदीबद्दल आस्था वाढेल.

In reply to by तर्कवादी

तुमचा मागचा एक प्रतिसाद बराच संतुलित होता. आता मात्र तुम्ही अगदीच टोकाचे विचार मांडत आहात. अशा प्रकारे दोन प्रतिसादांत मोठा विरोधाभास असल्याने तुमच्या आय डीची विश्वासार्हता कमी होवू शकते याची तुम्हाला कल्पना असावी.
मलाही एक-दोनदा असेच आढळले होते. एकाच आयडी वापरुन एकापेक्षा जास्त लोक प्रतिसाद लिहित असावेत अशी शंका येऊन गेली.

In reply to by Trump

हिंदी वर बंदी असावी हे माझे मत खूप विचार करून झाले आहे.. १)ये है स्वर्ग दरवाजा. २) ये है रावण की लंका.. ३)ये है नरक का दरवाजा. असेल फालतू कंटेंट फक्त हिंदी मध्येच असतात. हिंदी न्यूज चॅनेल म्हणजे जगातील सर्वात बकवास मीडिया. अनेक देशांनी पण हिंदी न्यूज चॅनेल वर आरोप केले आहेत.. अंध विश्वास पसरवणे,चुकीची बकवास माहिती पसरवणे हे उद्योग तर हिंदी मीडिया करत च असते. बाकी भाषिक मीडिया इतकी मूर्ख नक्कीच नाही त्या मुळे हिंदी वर देशात बंदी घातली गेली तर देश खूप विकास करेल.

In reply to by sunil kachure

श्री कचुरे, भाषा आणि माध्यमे ह्यात फरक आहे.
असेल फालतू कंटेंट फक्त हिंदी मध्येच असतात.
असल्या फालतु गोष्टींचा भाषेशी काही संबध नसतो. ते इतर भाषांमध्येही असतात.

In reply to by sunil kachure

मी फारशा न्युज बघत नाही त्यामुळे कोणत्या भाषेतले चांगले व कोणते वाइट त्याबद्दल माझा फारसा अभ्यास नाही. पण अलिकडे युक्रेन युद्धाच्या निमित्ताने बातम्या बघत होतो. आज तकचे काही पत्रकार युक्रेनमध्ये थांबून रिपोर्टिंग करत होते हे खरच कौतुकास्पद . "गौरव सावंत" आणि आणखी एक पवार नावाचे पत्रकार नावावरुन मराठी वाटतात पण त्यांचे हिंदी उच्चार , शब्दरचना ई चांगलं होतं... खासकरुन गौरव सावंतचं रिपोर्टिंग मला आवडलं. बाकी एकूणात हिंदीमधले मिडीया वाईट आहेत असं मानलं तरी त्याचा दोष भाषेला देणं योग्य होणार नाही. याच भाषेने मुन्शी प्रेमचंद सारखे साहित्यिकही दिले आहेत. भाषा शुद्ध राखण्याकडे फारसे ल़क्ष न दिल्याने अगदी औपचारिक वापराच्या हिंदी भाषेत उर्दु , फारसी , इंग्लिश ई भाषांतील शब्दांची प्रचंड भेसळ झाली आहे हाच काय तो भाषेचा दोष (खरं तर भाषा लिहिणार्‍या -बोलणार्‍यांचा दोष)

हिंदी आपली राष्ट्र भाषा आहे. हसून हसून पुरेवाट झाली हे वाक्य ऐकून. त्या पुढे तर मोठा जोक आहे. दक्षिण भारतीय हिंदी राष्ट्र भाषा मानत नाहीत तर त्यांचे सिनेमे हिंदी मध्ये डब करतात. आता हसून हसून लोळणे च बाकी होत. सिनेमे भाषा कोणती आहे म्हणून लोकप्रिय होत नाहीत. आज काल कोणत्या ही भाषेतील सिनेमे कोणत्या ही भाषेत बदलता येतात. सिनेमे लोकप्रिय होतात कथा,अभिनय,योग्य विषय ह्या वर. हिंदी मध्ये दर्जा च राहिला नाही. ना कथा,ना अभिनय.ना योग्य विषय . ये देखो स्वर्ग का द्वार . ये देखो नरक का द्वार. इथपर्यंत च ह्यांची झेप.

In reply to by ॲबसेंट माइंडेड…

एखादी भाषा राष्ट्रभाषा नसली तर त्या भाषेत चित्रपट डब करायचे नाही का? असे असेल तर हिंदीभाषिक राज्यात अहिंदीभाषिकांनी आपली उत्पादने विकू नये अशीही मागणी होईल.

In reply to by ॲबसेंट माइंडेड…

अजय देवगणचा दृश्यम् हा चित्रपट चिनी भाषेत डब झाला आहे. आता चिनी भाषा ही आपली राष्ट्रभाषा नाही, तरीसुद्धा या भाषेत का डब केला?

पाहिले तर हिंदी जास्त लोक बोलतात म्हणून ती श्रेष्ठ ह्या असल्या युक्तिवाद ला खरे तर काहीच किंमत नाही. Discover चॅनल,किंवा नॅशनल geography सारखे चॅनेल नी हिंदी मध्ये ऑडियो सुविधा दिलीच नसती तर.. पृथ्वी वर जी प्राणी,वनस्पती,समुद्रातील जीव ह्यांची माहिती हिंदी भाषा असणाऱ्या लोकांना जन्मात तरी मिळाली असतो का? हिंदी मध्ये असे कार्यक्रम निर्माण करण्याची क्षमता आहे का? दक्षिण भारतातील बाहुबली असेल किंवा पुष्पा असे मनोरंजन मूल्य खूप असलेले सिनेमे हिंदी मध्ये डब नसते केले तर . हिंदी भाषिक लोकांना त्या दर्जा चे सिनेमे बघायला मिळाले असते. पैसा महत्वाचा आहेच पण ज्ञान,विविध नावीन्य पूर्ण माहिती,सायन्स,विविध शोध हे हिंदी भाषिक राज्यात लागत नाहीत. हिंदी हिंदी करत बसले तर.खोल अज्ञाना च्या अंधार कोठडीत हा प्रदेश जाईल.

In reply to by sunil kachure

हिंदी सारख्या भाषेत Discover चॅनल,किंवा नॅशनल geography सारखे चॅनेल, डब केलेले दक्षिणी सिनेमे/ इतर भाषिक सिनेमे मराठी भाषिक माणुस (ज्याला इंग्रजी येत नाही, समजत नाही) समजू शकतो हा फायदाच नाही का ?