मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

त्यांनी हिंदीत का बोलावं?

उपयोजक · · काथ्याकूट
तीन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत एक विनंती केली की वेगवेगळ्या राज्यांमधल्या असमान मातृभाषा असणार्‍या लोकांनी एकमेकांशी संवाद साधताना इंग्रजीऐवजी हिंदी भाषा वापरावी. https://www.google.com/amp/s/indianexpress.com/article/india/people-different-states-should-speak-hindi-not-english-shah-7858861/lite/ या अनावश्यक विनंतीला अहिंदी राज्यांमधे साहजिकच विरोध होतो आहे. विशेषत: दक्षिणेकडच्या राज्यांमधे. आता ज्या लोकांची मातृभाषा हिंदीच आहे त्यांना या विनंतीबद्दल काहीच आक्षेप नसणारेय.उलट त्यांचा आयता फायदाच होईल. आता प्रश्न असे आहेत. १. दोन राज्यांमधील असमान भाषिकांनी कोणत्या भाषेत एकमेकांशी बोलावं अशी विनंती गृहमंत्री का करत आहेत? लोकांनी कोणत्या भाषेत बोललं पाहिजे हे गृहखात्याच्या अखत्यारीत येतं का? २. या विनंतीला दक्षिणेकडच्या राज्यातले लोक सकारात्मक प्रतिसाद देतील असा भ्रम गृहमंत्र्यांना का झाला असावा? की ही विनंती हिंदीतून बोलू शकणार्‍या अहिंदी राज्यांतल्या लोकांसाठीच आहे? अशी विनंती केल्यावर ज्यांना हिंदी येत नाही ते लगेच हिंदी शिकून घेतील हा भ्रम गृहमंत्र्यांना का झाला असावा? ३. या विनंतीमागे कारण काय असावं? हिंदी पट्ट्यातल्या लोकांची सोय व्हावी? कारण हिंदी पट्ट्यातले लोक "हम तो पापी पेट के लिए आए हैं भाई" हे रडव्या चेहर्‍यानं सांगून अहिंदी भाषिकांना 'आमची सोय बघा' असंच सांगू पाहतात. हिंदीभाषिक अहिंदी राज्यातल्या भाषा शिकायला राजी नसतात. पण अहिंदी भाषिकांनी मात्र हिंदी शिकावी ही अपेक्षा बाळगतात. हे हिंदी पट्ट्यातले लोक हिंदीतर भाषा शिकणार कधी? ४. समजा दक्षिणभारतीय राज्यांनी किंवा ईशान्येकडच्या राज्यांनी एकत्र येऊन त्यांची एकच सामायिक बोलीभाषा निर्माण करुन हिंदीला कडवे आव्हान निर्माण केले तर? मग काय करतील अमित शहा? ५. इंग्रजीला अमित शाह यांचा विरोध का? इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे. कमालीची ताकदवान भाषा आहे.आंतरराष्ट्रीय भाषा आहे. उपयोगाची भाषा आहे. असं असताना ती न वापरता हिंदी का वापरायची?

वाचने 108330 वाचनखूण प्रतिक्रिया 510

In reply to by कॉमी

तर्कवादी Sat, 04/30/2022 - 19:05
तुम्ही डेस्क जॉब असलेला व्यक्ती घेतला आहे. तो भारतभराचा डेमोग्राफीक निर्देशक होत नाही. पश्चिम बंगाल मधल्या केवळ ८% जनतेला इंग्लिश बोलता येते
अगदी मान्य. ... किती टक्के लोकांना इंग्लिश येतं हा प्रश्नच नाही.. आणि ते याव / चांगलं याव ही अपेक्षा पण नाहीच. असो.. तुम्ही तुमचं एखादं उदाहरण सांगा , मग त्याचा उहापोह करु.. मान्य की एका उदाहरणावरुन निष्कर्ष काढू नये .. पण काहीच उदाहरणे समोर नसतील तर निव्वळ आकडेवारी पण फारशी उपयोगाची ठरत नाही. झालंच माझा एकच साधा सरळ मुद्दा आहे.. कुणी ही स्थानिक मनुष्य ज्याला कधीच परराज्यात/ परदेशात वगैरे जायचे नाही किंवा दुसऋआ भाषेतून कुठले शिक्षण घ्यायचे नाही तो उगाचच दुसरी भाषा शिकणार नाही ..आपल्या राज्यात, शहरात काही तामिळ न जाणणारे लोक येणार आहेत तेव्हा त्यांच्याकरिता म्हणून स्थानिक रिक्षावाला, फळवाला, इलेक्ट्रीशियन, प्लंबर, हे सगळे एखादी भाषा शिकून ठेवतील असं होणार नाहीच.
पण हिंदी मध्ये काम होऊ लागले तर तो आणि त्याच्या पुढच्या पिढ्या शिकणार नाहीत असे तुम्ही assume केले
हे बर्‍यापैकी होत आहे. सभोवती दिसतंय.. असो.

In reply to by तर्कवादी

कॉमी Sat, 04/30/2022 - 19:36
असो.. तुम्ही तुमचं एखादं उदाहरण सांगा , मग त्याचा उहापोह करु.. मान्य की एका उदाहरणावरुन निष्कर्ष काढू नये .. पण काहीच उदाहरणे समोर नसतील तर निव्वळ आकडेवारी पण फारशी उपयोगाची ठरत नाही.
मला माझा मुद्दा मांडायला याबाबत उदाहरणातून बोलण्याची आवश्यकता वाटली नाही. थेट मुद्दा आणि मिमांसा चालून जाईल. अर्थात तुम्ही उदाहरण दिले त्यात सुद्धा गैर नाही, मी फक्त खंडन केले.
आपल्या राज्यात, शहरात काही तामिळ न जाणणारे लोक येणार आहेत तेव्हा त्यांच्याकरिता म्हणून स्थानिक रिक्षावाला, फळवाला, इलेक्ट्रीशियन, प्लंबर, हे सगळे एखादी भाषा शिकून ठेवतील असं होणार नाहीच.
त्यांना शिकावी वाटत नसल्यास अजिबात शिकू नये. त्यांनी ग्राहकांशी कोणत्या भाषेत बोलायचं हा सर्वस्वी त्यांचाच प्रश्न आहे. पण अमित शहा दुसरी भाषा म्हणून हिंदी वापरा अशी विनंती करतात त्यात काही गैर नाही, इतके माझे म्हणणे आहे. आणि हिंदी बोलणे म्हणजे आमच्या अस्मितेवर घाला आहे, त्यामुळे आम्हाला थोडेफार का असेना, हिंदी समजत असून सुद्धा आम्ही हिंदी बोलणारच नाही, वाटल्यास इंग्लिश बोलू पण हिंदी काहीही झाले तरी बोलणार नाही- असा पवित्रा घेणे हा त्या व्यक्तीचा हक्क आहे. त्यांना जोरजबरदस्तीने हिंदी बोलायला लावायचा प्रश्नच येत नाही. पण त्यांचा हा पवित्रा माझ्या व अनेकांच्या दृष्टीने अत्यंत तिरस्करणीय आहे हे सांगण्यात सुद्धा काही चूक नाही.
पण हिंदी मध्ये काम होऊ लागले तर तो आणि त्याच्या पुढच्या पिढ्या शिकणार नाहीत असे तुम्ही assume केले
हे बर्‍यापैकी होत आहे. सभोवती दिसतंय.. असो.
दुसरी भाषा (मग ती इंग्रजी असो वा हिंदी) ही संकल्पना असल्यावर परिणाम तेच होणार- स्थानिक भाषा शिकायची गरज कमी होणार. का दुसरी भाषा हिंदी असल्यावर परिणाम वेगळे होतात आणि दुसरी भाषा इंग्रजी असल्यावर परिणाम वेगळे होतात ? कि समस्या दुसरी भाषा या संकल्पनेबाबतच आहे ?

In reply to by कॉमी

तर्कवादी Sat, 04/30/2022 - 20:33
त्यांना शिकावी वाटत नसल्यास अजिबात शिकू नये
झालं तर मग .. मी तेच म्हणतोय..
पण अमित शहा दुसरी भाषा म्हणून हिंदी वापरा अशी विनंती करतात
कोणताही व्यक्ती दुसरी भाषा स्वतःच्या गरजेनुसार शिकेल. इंग्लिश शिकून त्याची गरज भागत असेल तर इंग्लिश शिकेल, बंगाली शिकून भागत असेल तर बंगाली शिकेल. अमित शहा म्हणतात म्हणून शिकणार नाही... साधं सोपं आहे हे. पण हिंदी येत नाही म्हणजे तो माणूस राष्ट्राभिमानी नाही वा त्याला भारतात रहायचा हक्क नाही वगैरे अपप्रचार कुणी करत असेल तर विरोध होणार. बाकी स्वेच्छेने ज्याला जी भाषा शिकायची ती त्याने शिकावी..

In reply to by तर्कवादी

कॉमी Sat, 04/30/2022 - 20:35
पण हिंदी येत नाही म्हणजे तो माणूस राष्ट्राभिमानी नाही वा त्याला भारतात रहायचा हक्क नाही वगैरे अपप्रचार कुणी करत असेल तर विरोध होणार.
हे मान्यच. मी खाली विरोधच केला आहे. अमित शहा विनंतीच करत होते की, सक्ती कुठे केलेली ?

In reply to by कॉमी

sunil kachure Sat, 04/30/2022 - 22:25
अमित शाह ह्यांनी लोकसभेत असे वक्तव्य केले की " दोन विविध भाषिक एकमेकाशी संवाद साधू इच्छितात तर त्यांनी संपर्क भाषा म्हणून वापर करा" हे बरोबर वाक्य आहे.ह्या मध्ये स्थानिक भाषा वापरू नका असा उल्लेख नाही,हे पण बरोबर आहे. पण लोकसभेत सल्ला देणारे देशाचे गृहमंत्री आहेत साधा,सामान्य माणूस नाही. आणि लोकसभा हे देशाचे सर्वोच्च सभागृह आहे तिथे देशाविषयी सर्व निर्णय होतात. हिंदी ही संपर्क भाषा वापरा इंग्लिश ऐवजी,म्हणजे ह्याचा दुसरा अर्थ एकदम साफ आहे हिंदी शिका. आता हिंदी शिकायची तर शाळेत च शिकवायला लागणार. देशासाठी च सल्ला त्यांनी दिला आहे ह्याचा अर्थ देशभर शाळेत हिंदी शिकवा. इतका मोठा अर्थ आहे त्यांच्या वक्तव्याचा. इथे काही जन फक्त त्यांच्या चार शब्दातील वाक्यावर च प्रतिसाद देत आहेत. पण त्यांच्या त्या चार शब्दाच्या वाक्याचा पूर्ण अर्थ समजून घेत नाहीत. उलट जे समजवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनाच फालतू, लोक असे संबोधत आहेत. त्यांच्या आयडी चा विकृत शब्दात उल्लेख करत आहेत.

कॉमी Sat, 04/30/2022 - 11:01
हिंदुस्तान म्हणजे हिंदीभाषिकांचा देश होय. ज्यांना हिंदी बद्दल प्रेम नाही त्यांनी देशातून निघावे. ज्यांना हिंदीबद्दल द्वेष वाटतो ते परकीय देशांचे हस्तक आहेत. (स्लीपर सेल टाईप) -- इति उत्तर प्रदेशमधले भाजपा मिनिस्टर. Exclusionary politics तुम्हाला पण एक ना एक दिवस धरणार आहे हे लक्षात ठेवण्यासाठी हे उदाहरण मस्त आहे !

In reply to by कॉमी

तर्कवादी Sat, 04/30/2022 - 19:09
ज्यांना हिंदीबद्दल द्वेष वाटतो ...
हिंदी शिकण्यास अनुत्सुकता = हिंदीबद्दल द्वेष ? म्हणजे जो माणूस म्हणतोय "मला माझ्या राज्यात रहात असताना दुसरी भाषा शिकाविशी वाटत नाहीये किंवा ती शिकण्याचं कारण दिसत नाहीये .. त्यात सदर दुसर्‍या भाषेचा द्वेष वगैरे काही नसताना ही मी परकीय देशाचा हस्तक ठरतो का ?"

In reply to by कॉमी

sunil kachure Sat, 04/30/2022 - 23:11
जगात जितके पण हुकूमशहा होवून गेले,जितक्या पण क्रूर हुकूमशाही राजसत्ता निर्माण झाल्या. ज्यांनी अमानुष हत्याकांड केली . मग त्या मध्ये हिटलर असतील किंवा कंबोडिया चे अध्यक्ष ,किंवा चीन चे communists सत्ता धारी. ह्या सर्वात एक परिस्थिती सामान होती. अतिरेकी राष्ट्रवाद,अतिरेकी वंश वाद ,अतिरेकी भांडवल वाद असेल किंवा समाजवाद.,साम्यवाद. ह्या सर्व हुकूमशहा ना लोकांनी पाहिले डोक्यावर घेतले .त्यांनी जो अतिरेकी वाद मांडला होता त्याचे डोळे झाकून समर्थन केले. विरोधी मत ना किंमत दिली नाही. सामान्य लोकांनी च ह्यांना प्रचंड लोकप्रियता असलेला व्यक्ती म्हणून स्वीकारले. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की विवेक बुद्धी नष्ट होते. लोकांच्या ह्या वृत्ती मुळेच क्रूर हुकूमशाही, हुकूमशहा जगात निर्माण झाले त्यांनी अनंत हत्या केल्या. आता थोडा फार त्याच दिशेने जाणारी स्थिती भारतात आहे. म्हणून एक लोक प्रतिनिधी असे जाहीर वक्तव्य करू शकतो. :हिंदी येत असेल तर च इथे रहा नाही तर चालते व्हा.: आणि ह्या वक्तव्याचे समर्थन करणारी लोक आहेत विवेक हरवून बसलेली.

sunil kachure Sat, 04/30/2022 - 11:29
संपर्क भाषा काय असावी ह्या वर लोकसभेत व्यक्त होणे . ह्याला खूप अर्थ आहेत. जागे नुसार आणि गरजेनुसार कोणती ही भाषा ही संपर्क भाषा असू शकते हिंदी चा उल्लेख करण्याची गरज नव्हती. भाषा कधीच एकटी येत नाही .ती पूर्ण लावजमा घेवून येते. इंग्लिश बरोबर पिझ्झा, बर्गर, सूट,मिनी स्कर्ट, केक ,दारू पार्ट्या आल्या,कुटुंब व्यवस्था उखडली गेली. हे फक्त भाषे चा परिणाम आहे. हिंदी स्वीकारली की तिच्या बरोबर. जुने रीती rivaj, outdated परंपरा,कट्टर हिंदुत्व,स्त्री स्वतंत्र च आकुंचन .हे सर्व येईल. उर्दू आणि अरबी भाषा जर कोणत्या दुसऱ्या देशाने शिकली आणि स्वीकारली तर त्या बरोबर मुस्लिम धर्म पण त्या देशात प्रवेश करेल.. भाषा एकटी नसते तिच्या बरोबर अनेक गोष्टी असतात. मराठी आहे म्हणुन मराठी संस्कृती आहे. मराठी नसेल तर मराठी संस्कृती पण नसेल.

स्वित्झर्लंड हा एक लहानसा आणि संपन्न देश आहे. त्यांची स्वतःची एक शिस्तबद्ध शैली असून ते इतके शांतिप्रिय आहेत की त्यांच्याकडे स्वतःचे लष्कर देखील नाहीये. अशा स्वतंत्र देशाचा नागरिक होण्याकरिता परक्या देशातील व्यक्तिकरिता काही जाचक अटी (म्हणजे अगदी घरात देखील कोणती भाषा बोलावी इत्यादी) ठेवणे हे स्वाभाविक आहे. अमेरिकेचा नागरिक होण्याकरिता देखील अशा काही अटी आहेत (घरातील भाषेबद्दल अट नसली तरीही घरात लहान मुलांसोबतची वर्तणूक, त्यांना द्याव्या लागणार्‍या स्वतंत्र खोलीसारख्या सोयी सुविधा इत्यादी). भारत हा एक संघराज्य देश आहे. एका राज्यातून दुसर्‍या राज्यात जाणे म्हणजे परकीय व्यक्तिने नागरिकत्वाकरिता अर्ज करण्यासारखे अजिबात नाही. तरीही टॅक्सी चालविण्यासारखे लोकाभिमूख व्यवसाय करण्याकरिता स्थानिक भाषा शिकणे गरजेचे आणि सक्तीचे करावे त्याशिवाय परवानगी देऊ नये. स्थानिक पातळीवर न्यायालयात वकिली करणार्‍या सर्वांनाच मराठी येते असा अनुभव आहे. उच्च न्यायालयात मला मराठीच वकील हवा असा आग्रह धरला तर कदाचित अशीलाचेच जास्त नुकसान होईल. हूशार वकिलाकडे भरपूर काम असतेच पण वकीलाला हूशार आणि परवडणार्‍या शुल्कात वकील मिळणे हे उच्च न्यायालयात तरी दुरापास्त असते. तेव्हा स्थानिक भाषेची सक्ती / आग्रह हा राज्यपातळीवर तारतम्य पाहूनच केला जावा. जो महाराष्ट्रात आजवर तरी योग्य प्रकारेच होत आहे. पुढे देखील होतच राहील अशी आशा आहे.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

कॉमी Sat, 04/30/2022 - 12:34
अगदी सहमत. स्वीडन आणि भारत तुलना शक्य नाही. स्वीडन मधली लोकसंख्या भाषिक दृष्टीने बऱ्यापैकी एकसंध आहे असे म्हणता येईल. विकिपीडियावर दिसते की स्वीडन मधला सगळ्यात मोठ्ठा भाषिक अल्पसंख्यांकांचा गट फक्त ५% लोकसंख्येचा आहे. ११ दशलक्ष पैकी ९ दशलक्ष स्वीडन्सची मातृभाषा स्वीडिश आहे. भारतात तसे नाही हाच मुळात चर्चेचा विषय आहे. भाषेच्या जोरावर भारतात अंतर्गत निर्बंध आणणे म्हणजे परीणामकपणे देशाचे विभाजन केल्यासारखेच होईल.

In reply to by कॉमी

भाषेच्या जोरावर भारतात अंतर्गत निर्बंध आणणे म्हणजे परीणामकपणे देशाचे विभाजन केल्यासारखेच होईल. आता कळलं ना युपीची भाषा ईतर राज्यांवर का लादायला नको ते?? सुमार बुध्दीचे केंद्रीय नेते हिंदीत बोला म्हणून कितीही बोंबलू देत. बाकी ते स्विडन नाही तर स्वीत्झर्लंड बद्दल बोलत होते.

In reply to by कॉमी

भाषेच्या जोरावर भारतात अंतर्गत निर्बंध आणणे म्हणजे परीणामकपणे देशाचे विभाजन केल्यासारखेच होईल. आता कळलं ना युपीची भाषा ईतर राज्यांवर का लादायला नको ते?? सुमार बुध्दीचे केंद्रीय नेते हिंदीत बोला म्हणून कितीही बोंबलू देत. बाकी ते स्विडन नाही तर स्वीत्झर्लंड बद्दल बोलत होते.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कॉमी Sat, 04/30/2022 - 13:44
तुम्हीच लादली लादली म्हणून उगीच कांगावा करता आहात. कुठे लादलीये हिंदी ? तुम्हीच महाराष्ट्रात काम करायचे असेल तर मराठी बोलायचेच म्हणताय. >>>>बाकी ते स्विडन नाही तर स्वीत्झर्लंड बद्दल बोलत होते. हो, बरोबर. गडबडीत डोक्यात स्वीडन आले आणि स्वीडन बद्दल लिहिले गेले.

In reply to by कॉमी

हिंदी जास्त लोक बोलतात हा फालतू दावा तुम्ही केला होता. ह्याव्यतीरीक्त काही आहे का?? हिंदी भाषीक म्हणून पंजाब नी राजस्थान ही केंद्र सरकारने गुंडाळले होते त्यावर त्या राज्यातून प्रतीकूल प्रतिक्रीया ऊमटल्या हे तुमच्या गावीही नसेल. नंतर केंद्राला चुक मान्य करावी लागली हे ही तुम्हाला माहीत नसेलच. ऊगाचच ऊचलली जीभ लावली टाळ्याला नको.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कॉमी Sat, 04/30/2022 - 17:22
तुम्ही फालतू फालतू नुसतं म्हणता, मी दिलेली माहिती का चूक आहे म्हणलं कि गप्प होता. हे अजून काय काय असंबंद्ध लिहिले आहे तुम्हालाच माहित.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

म्हणून भारतात अहिंदी भाषकांवर हिंदी लादावी?? त्यासाठी स्वित्झर्लंड चं ऊदाहरण गैरलागू?? कैच्याकै प्रतिसाद आहे.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

उपयोजक Sat, 04/30/2022 - 21:38
स्थानिक पातळीवर न्यायालयात वकिली करणार्‍या सर्वांनाच मराठी येते असा अनुभव आहे. नागपूरच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात हिंदीत खटला चालवता येतो. पण मराठीत चालवता येत नाही. नागपूर महाराष्ट्रात येऊन किती वर्षे झाली.

In reply to by उपयोजक

जेम्स वांड Sun, 05/01/2022 - 16:34
नागपूरच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात हिंदीत खटला चालवता येतो. पण मराठीत चालवता येत नाही.
ह्यासंबंधी काही विदा आहे का आपल्याकडे ?? मूळ स्रोत वाचण्यास मिळाला तर आनंद होईल.

In reply to by जेम्स वांड

जेम्स वांड Sun, 05/01/2022 - 16:46
ढळढळीत बातम्या दिसत आहेत की २०१६ साली महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालय (कागदोपत्री अजूनही बॉम्बे हायकोर्ट) इथे किंवा भारतातील कुठल्याही हायकोर्टात व्यवहाराची भाषा ही इंग्रजी असेल, ती सोडून इतर भाषा लागू करण्यासाठी गव्हर्नरला पॉवर आहे असेही म्हणतात. हल्लीच मराठी भाषेत फलक लावण्यासंबंधी एका केस मध्ये उच्च न्यायालय म्हणते की The court observed, “Indeed, even in this High Court, we permit documents in Marathi in Devanagari although the language of court is English, unless translations are required by a particular bench or court. त्यामुळे मुंबई हायकोर्टाच्या केसेस मध्ये किंवा औरंगाबाद नागपूर ह्यापैकी कुठल्याच खंडपीठात मराठीत केसेस उभ्या राहत नाहीत, त्यातही नागपूर खंडपीठाला वेगळे नामनिर्देशित करण्यामागे आपला हेतू काय हे मात्र अनाकलनीय होते आहे. आभार.

In reply to by जेम्स वांड

उपयोजक गुरुवार, 05/19/2022 - 14:06
या दोन खंडपीठांपैकी कोणत्या खंडपीठात हिंदीतून जास्त खटले चालत असतील हे मी सांगायची गरज नाही. औरंगाबाद असो की नागपूर ही दोन्ही खंडपीठे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्राची राज्यभाषा असणार्‍या मराठीत तिथे खटले चालवता येत नाहीत पण राष्ट्रभाषा किंवा महाराष्ट्राची राज्यभाषा नसलेल्या हिंदीत मात्र खटले चालवता येतात. याला आक्षेप आहे. नागपूरमधे हिंदीभाषिकांच्या तुलनेत मराठीभाषिक जास्त आहेत. असे असूनही तिथे खटले मराठीत चालवता येत नाहीत पण हिंदीतून चालवता येतात याला आक्षेप आहे. हिंदीला परवानगी मिळते मग मराठीला का नाही? अधिकृत राज्यभाषा असूनही?

In reply to by उपयोजक

जेम्स वांड गुरुवार, 05/19/2022 - 14:26
या दोन खंडपीठांपैकी कोणत्या खंडपीठात हिंदीतून जास्त खटले चालत असतील हे मी सांगायची गरज नाही.
गरज आहेच, हे तुम्हाला स्पष्ट करून सांगावे लागेल साहेब तुमच्याच मुद्द्यांच्या समर्थनार्थ. मुंबई, औरंगाबाद, नागपूर ह्या तीनही खंडपीठांत किती केसेस आहेत, अन त्यातील हिंदीत किती आणि इंग्रजीत किती हे आता तुम्ही डेटा सहित सांगणे बरे असेल कारण तुम्ही नुसते दावे ठोकताय, डेटा शून्य विदा शून्य. तुमच्या अंदाजांवर मुद्दे चालत नाहीत, तुमची परसेप्शन अन बायसेस तुम्हाला लखलाभ पण महाराष्ट्राच्या एखाद भागाविषयी प्रतिकूल मत ठेऊ "तिथे तसेच असेल" म्हणणे सोपे अन सिद्ध करणे अवघड आहे, नागपूर कोर्टात किंवा तुम्हाला वाटते त्या खंडपीठात जास्त केसेस हिंदीत असतात ह्याला समर्थनार्थ डेटा द्या, दुसरं उलट फिरून मला डेटा मागू नका, दावा तुमचा सिद्ध तुम्हीच करायचा.

In reply to by जेम्स वांड

जेम्स वांड गुरुवार, 05/19/2022 - 14:39
आधी म्हणालात नागपूरला हिंदीत खटले चालतात, त्यावर मी नीट माहिती दिली आहे की सगळ्याच खंडपीठांत हिंदीत केसेस चालतात, आता तुम्ही परत लांबड लावून त्या तुमच्या द्वेषजंत्रीत औरंगाबाद पण जोडले, मराठी आपणाला कळत नाही असे शक्य वाटत नाही त्यामुळे परत एकदा
मुंबई उच्च न्यायालयाच्या कुठल्याही खंडपीठात मराठीत खटला चालवता येत नाही, मग ते दस्तुरखुद्द मुंबईतील कोर्ट असो वा औरंगाबाद नागपूरचे खंडपीठ असो, त्यात नागपूर खंडपीठ किंवा औरंगाबाद खंडपीठ तितके दोषी धरुन मुंबई सोवळी ठेवणे हे निव्वळ चूक आहेच

sunil kachure Sun, 05/01/2022 - 09:51
आपण सामान्य लोक भाषे विषयी खूप हळवे असतो.व्यवहाराची भाषा ,संपर्क भाषा ह्याचा अर्थ तर सरळ आहे भाजी बाजारातील ,प्रवासातील ,कष्टाची कामं करणाऱ्या लोकांना गरज असलेली भाषा,. थोडक्यात महत्त्वाच्या क्षेत्राशी संबंधित असले तरी . ती भाषा सत्ताधारी लोकांची नसते. प्रतिभावंत,प्रतिष्ठित ,सेलिब्रिटी ,श्रीमंत ,कॉर्पोरेट सारख्या शक्ती शाली क्षेत्रं इत्यादी इत्यादी ह्यांची नसते. मराठी भाषे विषयी बोलतात ना. राजभाषा फाटके लुगडे नेसून कोपऱ्यात बसली आहे. थोडक्यात तशीच संपर्क भाषेची अवस्था असते. मग ती हिंदी असो,मराठी असो ,नाही बाकी कोणतीही भाषा इंग्लिश सोडून. थोडे पैसे आले की लोक लग्नपत्रिका इंग्लिश मध्ये प्रिंट करायला लागलेत आणि त्या पत्रिका आपल्याच मराठी भाषिक लोकांना वाटायला लागलेत. हेच बाकी भाषिक लोकांना पण लागू आहे. म्हणजे आर्थिक लेवल ल साजेशी आमची मातृ भाषा नाही हे दाखवले गेले आहे हे हिंदी भाषिक लोकांना पण लागू आहे हिंदी सिनेृष्टीतील पारितोषिक वितरण समारंभात सरळ इंग्लिश जास्त बोलली जाते म्हणजे ज्या हिंदी भाषेची त्यांना पैसा,प्रतिष्ठा दिली..ती हिंदी भाषा अवॉर्ड फंक्शन च्या लायकीची नाही. हीच वृत्ती ह्या मधून दिसते हे पण सर्व भाषिक लोकांना लागू आहे मोठमोठ्या पार्ट्या,उद्योगपती चे मेळावे, भाषा इंग्लिश.. कोणत्या आर्थिक स्तरातील लोक कोणती भाषा बोलतात त्या वर त्या भाषेची प्रतिष्ठा अवलंबून असते .बाकी सर्व भावनिक खेळ आहेत . ही दुसरी बाजू भाषा प्रेमाची.

आजची बातमी ''प्रादेशिक भाषेमधुन न्यायालयाचे कामकाज चालावे - इति पंतप्रधान मोदी'' चर्चेत उपयोगी व्हावा म्हणून मुद्दा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार Sun, 05/01/2022 - 16:00
@ प्रा. डॉ. सर, अस्मितेची कितीही प्रदर्शने भरवली तरी, मराठी माणूस, 'इंग्रजी म्हणजेच आर्थिक उन्नती' या पलिकडे बघण्यास तयार नाही हे कटू वास्तव स्विकारावे लागते असे तुर्त तरी म्हणावे लागेल. आपल्या उपरोक्त प्रतिसादामुळे १ मे निमीत्त २०१४ मध्ये मी याच विषयाशी अनुषंगिक अनुभवाधारीत लिहिलेला लेख आठवला.

In reply to by चौथा कोनाडा

कॉमी Sun, 05/01/2022 - 13:28
इंग्रजीत बोलताना भारतीय शब्दांचे इंग्रजांसारखे उच्चार करायलाच हवेत का ? टॅमल असा तामिळचा उच्चार पहिल्यांदाच ऐकतोय. आणि राज ठाकरे कुणाचीतरी मिमिक्री करणार हे समजल्यावर आडियन्स कसा ओरडतो तसं हिंदीला चड्डीतलं मूल म्हणल्यावर आडियन्स ओरडतोय xD

In reply to by कॉमी

चौथा कोनाडा Mon, 05/02/2022 - 08:51
¶ आणि राज ठाकरे कुणाचीतरी मिमिक्री करणार हे समजल्यावर आडियन्स कसा ओरडतो तसं हिंदीला चड्डीतलं मूल म्हणल्यावर आडियन्स ओरडतोय ¶ सवांगता! वाटताहेत इंग्रजाळलेले उच्चार. तमिळ चा उच्चार टॅमिझ असाही ऐकण्यात आलाय. नक्की बरोबर उच्चार तज्ज्ञांना विचारावे लागतील.

sunil kachure Sun, 05/01/2022 - 17:30
प्राथमिक शिक्षण मातृभाषेत असेल तर खूप प्रभिवित पने मुल कोणताही विषय आत्मसात करू शकतात. त्या मुळे प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेत च हवं असा हट्ट सर्व च तज्ञ लोक धरतात. मातृभाषेचा गमंत च वेगळी आहे. ना लिपी,ना पाठांतर,ना व्याकरण काही ही न शिकता माणूस भाषा शिकतो. ते पण अतिशय कमी दिवसात. भाषेतील सर्व खाचाखोचा सहित. जेव्हा मुल पूर्ण बोलायला शिकत म्हणजे वयाच्या तीन चार वर्षात च. तेच मातृभाषा सोडून बाकी कोणती ही भाषा शिकायची झाली तर किती तरी वर्ष जातात. तरी त्या भाषेतील खाचाखोचा समजत नाहीत. अगदी उच्च शिक्षण,व्यावसायिक शिक्षण,विज्ञान हे पण मातृभाषेत च शिकवले तर. त्याचा खूप चांगला परिणाम होईल . ते व्यवहारिक ठरणारं नाही ती गोष्ट वेगळी

In reply to by उपयोजक

माहितगार Mon, 05/02/2022 - 08:50
विनोदी चित्रफीत मुद्दाम रेकॉर्ड केल्याचे लक्षात येते पण इतर हिंदीकर आपल्या हिंदीचे अधिक विनोदी किस्से सांगू शकतात. सहसा मराठी भाषिकांना हिंदी विनासायास समजते पण हिंदीतून बोलणे कठीण जाते. नागपूर अधिक संघात असल्याने हिंदीचा गडकरी फडणविसांचा सराव पवारांपेक्षा अधिक असूनही मराठी ढब अ‍ॅक्सेंट शिल्लक राहतेच. अगदी लोकमान्य टिळकांनी देवनागरी लिपीचा पुरस्कार करणारे भाषण हिंदीतून बोलणे कठीण जाते म्हणून स्पष्ट सांगून इंग्रजीतून केले होते. अर्थात विदर्भ, मराठवाड्यापेक्षा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणकरांना अधिक अवघड जात असावे त्यात पश्चिम महाराष्ट्रीय पूर्ण अशिक्षीत मराठी महिलांना हिंदी समजणे सुद्धा कठीण जाताना पाहिले आहे. .

In reply to by उपयोजक

चौथा कोनाडा Mon, 05/02/2022 - 11:27
छान संदर्भ. वाखु साठवली आहे. धन्यु. कोणते मराठी चित्रपट मल्याळम मध्ये ध्वनीबद्ध केलेले आहेत का ?

sunil kachure Mon, 05/02/2022 - 09:26
हिंदी भाषा म्हणून वाईट आहे ,बोली भाषा आहे,चड्डीत च असलेलं मुल आहे ही भाषेवर आलेली टीका वर वर वाटत असली तरी .तसे नाही. हिंदी भाषा डोक्यात जाते ह्याचा अर्थ जी लोक ही भाषा बोलतात त्या लोकांची वृत्ती बाकी देशातील लोकांपेक्षा वेगळी असल्या मुळे ती भाषा डोक्यात जाते बेशिस्त,सार्वजनिक ठिकाणी,सार्वजनिक वाहनात कसे ही वागणे. कोणाचं च ऐकून घेणे नाही, मीच शहाणा,आम्हीच श्रेष्ठ, हे आणि अनेक वाईट गुण हिंदी भाषिक लोकात हमखास असतात. कायदे न पाळणे,बेकायदेशीर कृत्य करणे,स्त्रिया न विषयी संकुचित मत. असे अनेक गुण हिंदी भाषा आणाऱ्या लोकात उर्वरित भाषा असणाऱ्या लोक पेक्षा जास्त असतात

कानडाऊ योगेशु Mon, 05/02/2022 - 13:37
एक मुद्दा अजुन कुणी मांडला नाहीये किंवा माझ्या नजरेतुन सुटला असावा. अमित्भै स्वतः गुजराथी असुन सुध्दा त्यांनी हिंदीचा वापर करावा अशी फक्त विनंती केली आहे. तस्मात अमितभैंचा भारतीयांमधले संभाषण सोपे व्हावे असे वाटण्याव्यतिरिक तसा काही स्वार्थी हेतु नसावा. तसा असला असता तर त्यांनी गुजराथीला आडुन आडुन प्राधान्य दिले असावे. ह्याचा अर्थ हा निघतो कि अमितभैंना गुजराथी समाजाबद्दल आत्मविश्वास असावा कि बाहेरची भाषा कुठलीही असो गुजराथी परस्परांतील संवाद गुजराथीमधुन्च करतील. अमितभंच्या ह्या विधानाचा गुजरातम्ध्ये काय परिणाम झाला आहे ह्याची कुणाला काही माहीती आहे का?

sunil kachure Mon, 05/02/2022 - 13:56
मुघल राज्यकर्त्यांनी,ब्रिटिश राज्य कर्त्यानी. महाराष्ट्र मधील सर्व किल्ले हल्ला करून उध्वस्त केले पण राजस्थान मधील केले नाहीत. का?. स्वतःच्या आर्थिक फायद्या साठी शील,अभिमान,विचार ह्यांचे ते लिलाव करत होते . पण महाराष्ट्र तसे करत नव्हता. गुजरात ची मानसिकता तीच आहे. फायद्यासाठी काही ही करतील . त्या मुळे अमित shah ना गुजराती लोकांची चिंता वाटत नाही

sunil kachure Mon, 05/02/2022 - 14:09
आणि देशाच्या एकतेला धोकादायक असणारे घटक. १) हिंदी भाषा २) हिंदी मीडिया. ३) धार्मिक वाद. ४) जातीय वाद. ५) व्यापारी स्वार्थी जमात आसाम,ओरिसा,पंजाब, हिमाचल, अती पूर्वेतील सात राज्य, दक्षिण भारतातील राज्य,कश्मिर.हिमाचल . ह्या भाग विषयी महाराष्ट्र सहित बाकी प्रगत राज्यांना राग नाही,द्वेष पण नाही.अखण्ड यूपी,अखंड बिहार,अखंड mp. ही राज्य आणि त्या राज्यातील लोक ह्या विषयी मात्र तीव्र संताप आहे. बंगाल,राजस्थान,गुजरात ही थोडी ठीक आहेत पण तिरस्कार करण्या इतकी वाईट नशित्म

sunil kachure Mon, 05/02/2022 - 20:25
हिंदी भाषा असणाऱ्या लोकांनी मराठी,गुजराती किंवा कोणती ही दक्षिण भारतीय भाषा शिकावी..जेव्हा त्यांना कायम स्वरुपी त्यांचे राज्य सोडून उदर निर्वाह करण्यासाठी दुसऱ्या राज्यात जाणे गरजेचे असते.. तात्पुरतं फिरायला जायचे असेल तर गरज नाही.

चौकस२१२ गुरुवार, 06/22/2023 - 10:32
हा प्रश्न सोडवणे सरळ नाही . याची खेचाखेच , मग टोकाची विधाने / राजकीय पोळी भा जने हे तर दिसतयच आता प्रश्न असा आह एकी जरी हिंदी हि काही राष्ट्रभाषा नसली आणि तिची सक्ती करेन अयोग्य असले तरी हे हि खरे नाही का कि अशी कोणती भाषा आहे कि जी भारतातील अनेक भासंचय त्या मानाने जवळ आहे ? तर उत्तर हिंदी असे दयावे लागेल . अनके भाषा जय लिप्या वापरतात त्याचेही हिंदीची देवनागरी लिपी साधर्म्य दर्शवते ( गुजराथी , बंगाली आणि अर्हताःत मराठी कदाचित गुरुमुखी ? हरयाणवी कोणती लिपी वापर माहित नाही तशी कोणती दक्षिणी भाषा आहे का ? यूरोपात फ्रेंच इटालियन आणि जर्मन आपापल्या भाषेहूतून वयहार करताट आणि यूरोपीन संसदेत? आणि जरी समाज त्यांनी तिसरी भाषा म्हणून इंग्रजी स्वीकारली असली तरी इंग्रजी हि फ्रेंच इटालियन आणि जर्मन यांचं जवळ आहे .. तोच तर्क हिंदी साठी हिंदी ची सक्ती नको पण प्रेमाने चुचकारत जर हिंदी राष्ट्रीय संसदेत वाढवली तर एवढा कडवा विरोध पण नको

In reply to by चौकस२१२

इपित्तर इतिहासकार गुरुवार, 06/22/2023 - 11:09
अशी कोणती भाषा आहे कि जी भारतातील अनेक भासंचय त्या मानाने जवळ आहे ? तर उत्तर हिंदी असे दयावे लागेल . आपल्या वरील विधानास पुरावा काय ? हिंदी ही हिंदी पट्ट्यात (पर्यायाने लोकसंख्या स्फोट झालेल्या) प्रदेशात बोलली जाते म्हणुन ती इतर "अनेक" भाषांच्या जवळ कशी ??