Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by चंद्रसूर्यकुमार on Sat, 01/08/2022 - 18:06
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे. निवडणुक आयोगाने पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशात १०, १४, २०, २३, २७ फेब्रुवारी आणि ३ आणि ७ मार्चला ७ टप्प्यात मतदान होणार आहे. पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यात १४ फेब्रुवारीला तर मणीपूरमध्ये २७ फेब्रुवारी आणि ३ मार्चला दोन टप्प्यात मतदान होणार आहे. मतमोजणी गुरूवार १० मार्चला होणार आहे. कोरोनाच्या वाढत्या आकड्यांच्या पार्श्वभूमीवर सध्या १५ जानेवारीपर्यंत रोड शो, प्रचारसभांना बंदी असेल. तसेच मतदानकेंद्रांची संख्या वाढवून मतदारांची गर्दी कमी करण्याचा प्रयत्न असेल. प्रत्येक मतदानकेंद्रावर सॅनिटायझर, थर्मल गन वगैरे गोष्टी असतील. मतदानाची वेळ एक तासाने वाढविण्यात आली आहे. जर मतदाराचे अंगाचे तपमान जास्त आढळल्यास त्या मतदाराला टोकन दिले जाऊन शेवटच्या एक तासात मतदानासाठी परत बोलावले जाईल. ज्येष्ठ नागरीक, अपंग आणि कोविड रूग्णांना पोस्टाने मतदान करायची परवानगी दिली गेली आहे. मतमोजणीनंतर विजयी उमेदवाराला विजययात्रा काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. https://timesofindia.indiatimes.com/india/covid-protocols-for-assembly-elections-no-rallies-till-jan-15-polling-time-to-be-increased-by-an-hour/articleshow/88774608.cms
  • Log in or register to post comments
  • 47454 views

प्रतिक्रिया

Submitted by निनाद on Wed, 01/12/2022 - 03:48

In reply to उर्वरीत सहा राफेल लढाऊ विमाने लवकरच वायूदलात दाखल होणार.. by मुक्त विहारि

Permalink

राफेल लढाऊ विमाने

  1. हवेतून हवेत अधिक अंतरावर मारा करणारे क्षेपणास्त्र सामावून घेण्याची सोय,
  2. फ्रिक्वेन्सी जॅम करणारे रडार,
  3. अत्याधुनिक संपर्क यंत्रणा,
  4. जमिनीवरील रडारची सूचना देणारे रिसिव्हर,
  5. जमिनीवरील हालचालीची वेगाने नोंद करणारे संवेदक,
  6. विमानाच्या दिशेने येणाऱ्या क्षेपणास्त्राची जलद नोंद करणारी यंत्रणा
हे भारतीय वायूदलाने मागितले आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Wed, 01/12/2022 - 11:25

In reply to राफेल लढाऊ विमाने by निनाद

Permalink

हे भारतीय वायूदलाने मागितले आहेत.

मस्तच
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद on Wed, 01/12/2022 - 04:08

In reply to उर्वरीत सहा राफेल लढाऊ विमाने लवकरच वायूदलात दाखल होणार.. by मुक्त विहारि

Permalink

हे पहा

तेजस मार्क २ एचएएल तेजस मार्क २ वैशिष्ट्ये
  • क्रू: एक किंवा दोन
  • लांबी: १४.६० मीटर (४७ फूट १ १ इंच)
  • विंगस्पॅन: ८.५० मी (२७ फूट १ १ इंच)
  • उंची: ४.८६ मीटर ( १५ फूट १ १ इंच)
  • विंग क्षेत्र: ४४ मी २ (४७० चौरस फूट)
  • रिक्त वजन: ७,८५० kg ( १७,३०६ lb) (अपेक्षित)
  • एकूण वजन: १ १,३०० kg (२४,९ १२ lb) (अपेक्षित)
  • कमाल टेकऑफ वजन: १७,५०० kg (३८,५८ १ lb) (अपेक्षित)
  • इंधन क्षमता: ३,३०० kg (७,३०० lb) अंतर्गत; ड्रॉप टाकीसह ३,५०० kg (७,७०० lb)
  • पेलोड : ६,५०० kg ( १४,३०० lb) बाह्य स्टोअर्स
  • पॉवरप्लांट: १ × जनरल इलेक्ट्रिक F४ १४ आफ्टरबर्निंग टर्बोफॅन. (स्वदेशी १ १०KN इंजिन भविष्यात वापरले जाणार आहे) , ५८.५ kN (१३,२०० एलबीएफ) थ्रस्ट ड्राय, ९८ केएन (२२,००० एलबीएफ) आफ्टरबर्नरसह
कामगिरी
  • कमाल वेग: २,३८५.३६ किमी/ता ( १,४८२. १९ mph, १,२८७.९९ kn)
  • कमाल वेग: मॅच १.८
  • श्रेणी: २,५०० किमी ( १,६०० मैल, १,३०० nmi)
  • लढाऊ श्रेणी: १,५०० किमी (९३० मैल, ८ १० एनएमआय)
  • फेरी श्रेणी: ३ बाह्य इंधन टाक्यांसह ३,५०० किमी (२,२०० mi, १,९०० nmi)
  • सेवा कमाल मर्यादा: १७,३०० मी (५६,७५८ फूट)
  • g मर्यादा: +९/−३.५
  • थ्रस्ट/वजन : ०.८९ (७००० lb इंधनासह, २ SRAAMs आणि जनरल इलेक्ट्रिक F४ १४), १.०० (नियोजित) १ १० KNथ्रस्टच्या स्वदेशी इंजिनसह
शस्त्रास्त्र
  • गन: १ x ३० मिमी ( १.२ इंच) GSh-३०- १ [३७]
  • हार्डपॉईंट्स : सुमारे ६.५ टन क्षमतेचे १३ हार्डपॉइंट्स (अपेक्षित), तरतुदींसह:
  • हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे:
  • एमआयसीए (नियोजित)
  • उल्का (नियोजित)
  • अस्त्र (नियोजित)
  • एनजी-सीसीएम (नियोजित)
  • हवेतून पृष्ठभागावर मारा करणारी क्षेपणास्त्रे:
  • ब्रह्मोस-एनजी एएलसीएम
  • निर्भय (नियोजित)
  • वादळाची सावली (नियोजित)
  • क्रिस्टल भूलभुलैया
  • रेडिएशन विरोधी क्षेपणास्त्रे:
  • रुद्रम (नियोजित)
मार्गदर्शित युद्धसामग्री
  • HSLD- १००/२५०/४५०/५००
  • DRDO ग्लाइड बॉम्ब
  • डीआरडीओ लेझर-मार्गदर्शित बॉम्ब
  • सुदर्शन
  • क्लस्टर दारूगोळा
  • लॉइटरिंग दारूगोळा
  • कॅट्स अल्फा
एव्हियोनिक्स
  • एलआरडीई एईएसए रडार
  • DARE युनिफाइड इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट (UEWS)
  • DARE ड्युअल कलर मिसाइल अॅप्रोच वॉर्निंग सिस्टम (DCMAWS)
  • डेअर टार्गेटिंग पॉड
आता चेंगदू जे१० वैशिष्ट्ये
  • क्रू: १
  • लांबी: १६.०३ मीटर (५२ फूट ७ इंच)
  • विंगस्पॅन: ९.२५ मी (३० फूट ४ इंच)
  • उंची: ५.४३ मीटर ( १७ फूट १० इंच)
  • विंग क्षेत्र: ३३ मीटर २ (३६० चौरस फूट)
  • रिक्त वजन: ९,७५० kg (२ १,४९५ lb)
  • एकूण वजन: १४,००० kg (३०,८६५ lb)
  • कमाल टेकऑफ वजन: १९, २७७ किलो (४२,४९९ पौंड)
  • इंधन क्षमता: ४९५० L (३८६० Kg) अंतर्गत. ४००० एल (३१२० किलो) बाह्य ३ ड्रॉप टाक्यांसह (२x१६०० एल + १x८०० एल)
  • पॉवरप्लांट: १ × Saturn-Lyulka AL-३ १FN आफ्टरबर्निंग टर्बोफॅन इंजिन, ७९.४३ kN ( १७,८६० lbf) थ्रस्ट ड्राय, १२५ kN (२८,००० lbf) आफ्टरबर्नरसह
कामगिरी
  • कमाल वेग: मॅच १.८
  • स्टॉल गती: २०० किमी/ता ( १२० mph, १ १० kn)
  • श्रेणी: २,२५० किमी ( १,४०० मैल, १,२ १० nmi)
  • लढाऊ श्रेणी: ९०० किमी (५६० मैल, ४९० nmi)
  • फेरी श्रेणी: ३,२०० किमी (२,००० मैल, १,७०० nmi)
  • सेवा मर्यादा: १७,००० मी (५६,००० फूट)
  • g मर्यादा: +९/-३
  • चढाईचा दर: ३०० मी/से (५९,००० फूट/मिनिट)
  • विंग लोडिंग: ३८ १ kg/m २ (७८ lb/sq ft)
  • जोर/वजन : १.०५ ( शनि AL-३ १FN३ सह); १. १० ( WS- १०A सह)
  • तात्काळ वळण दर: ३० अंश प्रति सेकंद
  • रोल रेट: ३०० + अंश प्रति सेकंद
शस्त्रास्त्र
  • गन: १× ग्र्याझेव-शिपुनोव GSh-२३
  • हार्डपॉइंट्स: एकूण १ १ (६× अंडर-विंग, २× अंडर-इनटेक आणि ३× अंडर-फ्यूजलेज) ५६०० किलो बाह्य इंधन आणि शस्त्रास्त्रांच्या क्षमतेसह
  • रॉकेट: ९० मिमी अनगाइडेड रॉकेट पॉड्स
क्षेपणास्त्रे: हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे :
  • PL-८
  • PL- १० (J- १०C)
  • PL- १२
  • PL- १५ (J- १०C)
हवेतून पृष्ठभागावर मारा करणारी क्षेपणास्त्रे :
  • KD-८८
  • YJ-९ १
बॉम्ब:
  • लेझर-गाइडेड बॉम्ब: ( LT-२ )
  • ग्लाइड बॉम्ब: ( LS-६ , GB३ , GB२A , GB३A )
  • उपग्रह-मार्गदर्शित बॉम्ब: ( FT- १ )
  • अनगाइड बॉम्ब: २५० किलो, ५०० किलो
इतर:
  • विस्तारित श्रेणी आणि लोइटिंग वेळेसाठी ३ पर्यंत बाह्य इंधन ड्रॉप-टँक ( १× अंडर-फ्यूजलेज, २× अंडर-विंग)
एव्हियोनिक्स
  • १४७३H पल्स-डॉपलर फायर कंट्रोल रडार (J- १०A)
  • बाहेरून आरोहित एव्हियोनिक्स पॉड्स:
  • K/JDC० १A लक्ष्यीकरण पॉड (J- १०A वर)
  • Hongguang-I इन्फ्रा-रेड शोध आणि ट्रॅक पॉड टाइप करा (J- १०A वर)
  • KD-८८ आणि YJ-९ १ साठी CM-८०२AKG लक्ष्यीकरण पॉड (J- १०C वर)
  • KG६०० इलेक्ट्रॉनिक काउंटरमेजर पॉड
  • ब्लू स्काय नेव्हिगेशन/अटॅक पॉड
वरील माहितीमध्ये चूक भूल देणे घेणे मी यातला तज्ञ नाही! मी फक्त विकीवरून येथे देण्याची हमाली केली आहे. अधिक माहिती त्या त्या विकी पानावर वाचावी.
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद on Wed, 01/12/2022 - 04:35

Permalink

मौलानाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला.

बिहार मौलानाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. आरोपी मौलानाविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल, माहिती मिळताच मौलवी फरार झाला! पाटणामध्ये एका मदरशाच्या मौलवीने अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केला. पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल होताच मौलाना शाहबाज रझा मदरसा सोडून पळून गेला. या प्रकरणाबाबत दानापूरचे एसपी सय्यद इम्रान मसूद तपास करत आहेत. अशाच गुन्ह्यांमध्ये मौलवींचा सहभाग असल्याची अनेक प्रकरणे उप्र ते केरळ पर्यंत झालेली दिसून येत आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Wed, 01/12/2022 - 11:24

In reply to मौलानाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. by निनाद

Permalink

ह्या माहिती बद्दल धन्यवाद

धन्यवाद
  • Log in or register to post comments

Submitted by वामन देशमुख on Wed, 01/12/2022 - 11:43

In reply to मौलानाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. by निनाद

Permalink

हं...

पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल होताच मौलाना शाहबाज रझा मदरसा सोडून पळून गेला. या प्रकरणाबाबत दानापूरचे एसपी सय्यद इम्रान मसूद तपास करत आहेत
. हं...
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Wed, 01/12/2022 - 11:46

Permalink

महाराष्ट्रातील परिस्थिती अस्वस्थ करणारी; सरकारचा CBIवर तर परमबीर

महाराष्ट्रातील परिस्थिती अस्वस्थ करणारी; सरकारचा CBIवर तर परमबीर सिंह यांचा पोलीस दलावर विश्वास नाही- सुप्रीम कोर्ट ------ https://www.loksatta.com/maharashtra/ex-police-commissioner-has-no-faith-in-own-force-sc-abn-97-2757494/ ------- सुप्रीम कोर्टाने केलेली टिप्पणी आहे.... -------
  • Log in or register to post comments

Submitted by सॅगी on Wed, 01/12/2022 - 13:07

In reply to महाराष्ट्रातील परिस्थिती अस्वस्थ करणारी; सरकारचा CBIवर तर परमबीर by मुक्त विहारि

Permalink

हं..

आता सुप्रीम कोर्टाला अक्कल शिकवणारा हग्रलेख नॉटी संपादक पाडतीलच...
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Wed, 01/12/2022 - 19:04

In reply to हं.. by सॅगी

Permalink

जाऊ द्या....

संपादकांना सगळे समजते.
  • Log in or register to post comments

Submitted by सॅगी on Wed, 01/12/2022 - 19:51

In reply to जाऊ द्या.... by मुक्त विहारि

Permalink

चूक..

"नॉटी" संपादकांना सगळे समजते.. (असा त्यांचा समज असतो)
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Wed, 01/12/2022 - 18:27

Permalink

आता दुकानांच्या पाट्या मराठीतच, ठाकरे मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर

आता दुकानांच्या पाट्या मराठीतच, ठाकरे मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-big-decision-in-thackeray-cabinet-meeting-on-compulsary-marathi-names-on-shop-1025148/amp ----- निवडणूका जवळ आल्या वाटतं...
  • Log in or register to post comments

Submitted by धर्मराजमुटके on Wed, 01/12/2022 - 21:09

In reply to आता दुकानांच्या पाट्या मराठीतच, ठाकरे मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर by मुक्त विहारि

Permalink

हा नियम अगोदरपासूनच आहे.

हा कायदा / नियम अगोदरपासूनच आहे. अंमलबजावणी होत नाही त्याचे काही करता आले तर पहावे सरकारने.
मराठीत देवनागरी लिपीतील अक्षरे दुसऱ्या इंग्रजी किंवा अन्य लिपीतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत, अशी दुरुस्ती मंजूर करण्यात आली.
बहुधा हाच नवीन भाग असावा.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Wed, 01/12/2022 - 19:37

Permalink

मागच्या महिन्यात माझ्या

मागच्या महिन्यात माझ्या वाचनात आलेली बातमी म्हणजे इस्रो आणि चायनीज मोबाईल कंपनी ओप्पो यांच्यात झालेला करार. ! ISRO ties up with Chinese tech giant Oppo for R&D of NavIC messaging service ISRO-Oppo India deal: Row erupts over Chinese firm's collaboration with Indian space organisation

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मुस्कुराहट की बनावट में छुपाए हमने गम, दिखावट की हंसी से दुनिया के सामने खड़े हैं हम |
  • Log in or register to post comments

Submitted by सुक्या on गुरुवार, 01/13/2022 - 05:10

Permalink

चोर चोर मोसेरे भाई . . .

https://www.loksatta.com/thane/unauthorized-construction-by-shiv-sena-mla-pratap-saranaik-thane-municipal-corporation-zws-70-2759081/ मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा एक वादग्रस्त निर्णय ठाकरे सरकार ने घेतला आहे. शेतकर्‍यांच्या वीज पंपाचे बील कमी न करण्यासाठी महसुलाचे कारण देणार्‍या सरकारणे तब्बल २१ कोटी चा मलीदा एका अवैध बांधकाम करणार्‍या आपल्या सहकार्‍याला वाटला. आजवर कधीही न झालेली बाब. अजुन किती खालची पातळी गाठणार आहेत कोण जाणे. विशेष म्हणजे लोकायुक्तांना मात्र वेगळे आश्वासन दिले होते. ह्या सरकारचे खंदे समर्थक आता याचे कसे समर्थन करतील ते पहायचे आहे. नॉटी साले . . .
  • Log in or register to post comments

Submitted by आग्या१९९० on गुरुवार, 01/13/2022 - 11:50

In reply to चोर चोर मोसेरे भाई . . . by सुक्या

Permalink

कुठल्याच सरकारची पापे माफ करू

कुठल्याच सरकारची पापे माफ करू नये,त्यांना योग्य पद्धतीने विरोध करावा हे माझे वैयक्तिक मत. आणि असे चुकीचे पायंडे पाडत असतील तर त्यांना विरोध केलाच पाहिजे. उगीच लंगडे समर्थन करून आपल्याच पायावर धोंडा पाडून घेऊ नये. माझा गेले वर्षभर कायदेशीर लढा चालू आहे. https://www.misalpav.com/comment/1098316#comment-1098316 नियमाप्रमाणे योग्य बिल येईपर्यंत बिल भरणार नाही आणि कृषिवीजबिल माफी नको असेही तक्रारीत नमूद केले आहे. महामंडळाच्या प्रोसेजरप्रमाणे तक्रार केल्यामुळे वीजजोडणी तोडू शकत नाहीत. सगळ्यात कहर म्हणजे पावसाळ्यानंतर वीज वापरत असूनही वापर शून्य दाखवत आहेत. त्याचीही तक्रार केली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद on गुरुवार, 01/13/2022 - 05:44

Permalink

सरकारी नोकऱ्यांसाठी उर्दू अनिवार्य भाषा म्हणून रद्द!

लडाख महसूल विभागाने सरकारी नोकऱ्यांसाठी उर्दू अनिवार्य भाषा म्हणून रद्द केली आहे! लडाखच्या प्रशासनाने मंगळवारी केंद्रशासित प्रदेशातील विविध सरकारी नोकऱ्यांमध्ये भरतीसाठी उर्दू ज्ञानाची अनिवार्य आवश्यकता काढून टाकली. सरकारने काढलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार महसूल विभागातील अनेक पदांसाठी 'पदवीसह उर्दूचे ज्ञान' ऐवजी 'कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी' अनिवार्य केली आहे. सध्याच्या नियमांनुसार, नायब तहसीलदार, पटवारी आदींसह विविध सरकारी पदांवर भरतीसाठी उर्दूचे ज्ञान असलेले पदवीधर असणे बंधनकारक होते. परंतु बदललेल्या नियमांनुसार, या पदांसाठी केवळ पदवी पुरेसे असेल आणि उर्दूचे ज्ञान आवश्यक नसेल. काश्मिरी राज्यकर्त्यांनी लडाखवर लादलेल्या परकीय उर्दू भाषेपासून मुक्ती दिल्यामुळे लदाख ला आता खरे स्वातंत्र्य मिळाले आहे - असे येथील खासदार नामग्याल म्हणाले आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by Trump on गुरुवार, 01/13/2022 - 12:53

In reply to सरकारी नोकऱ्यांसाठी उर्दू अनिवार्य भाषा म्हणून रद्द! by निनाद

Permalink

छान!!

छान!!
सध्याच्या नियमांनुसार, नायब तहसीलदार, पटवारी आदींसह विविध सरकारी पदांवर भरतीसाठी उर्दूचे ज्ञान असलेले पदवीधर असणे बंधनकारक होते.
हे माहीतीच नव्हते.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on गुरुवार, 01/13/2022 - 14:02

In reply to सरकारी नोकऱ्यांसाठी उर्दू अनिवार्य भाषा म्हणून रद्द! by निनाद

Permalink

अतिशय उत्तम निर्णय

अतिशय उत्तम निर्णय भाषा हा संस्कृतीचा गाभा असतो. ब्रिटिशांनी हेच ओळखून, इंग्रजी लादली.
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद on गुरुवार, 01/13/2022 - 05:51

Permalink

उ प्र मध्ये अखिलेशचे समाजवादी सरकार येणार?

यूपीचे आणखी एक मंत्री दारा सिंह चौहान यांनी योगी आदित्यनाथ मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. अखिलेश यादव यांनी त्यांचे समाजवादी पक्षामध्ये स्वागत केले आहे. समाजवादी पक्षाची ताकद उ प्र मध्ये वाढते आहे असे दिसते आहे. पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सांगितले आहे की, जर त्यांच्या पक्षाला उत्तर प्रदेशात सत्ता मिळाली तर राज्यातील तरुण आणि विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉपचे वाटप केले जाईल. यादव यांनी विधानसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष जिंकल्यास घरोघरी ३०० युनिट मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले आहे. या फुकट खेळीमुळे दिल्ली प्रमाणे उत्तर प्रदेशात सत्ता पालटू शकेल.
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on गुरुवार, 01/13/2022 - 09:27

In reply to उ प्र मध्ये अखिलेशचे समाजवादी सरकार येणार? by निनाद

Permalink

उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेशात अमुक एक होईल किंवा होणार नाही असे बोलणे याक्षणी धाडसाचे होऊ शकेल. स्वामीप्रसाद मौर्य आणि आता हे दारासिंग चौहान हे मंत्री राजीनामा देऊन पक्षाबाहेर पडले ही खरी गोष्ट आहे. त्यांच्याबरोबर काही आमदारही गेले. असे म्हटले जात आहे की अजून काही आमदार पक्ष सोडून समाजवादी पक्षात जातील. पण भाऊ तोरसेकर म्हणत आहेत त्याप्रमाणे कशावरून हे सगळे लोक आपल्याला उमेदवारी नाकारली जाईल याची कुणकुण लागली म्हणून पक्ष सोडून जात नसावेत? अनेकदा केंद्र-राज्य सरकारविरोधात वातावरण नसेल पण स्थानिक आमदाराविरोधात लोकांच्या मनात असंतोष असेल आणि परत त्याच आमदाराला उमेदवारी दिल्यास स्थानिक पातळीवरील रोषाचा फटका बसून ती जागा गमावावी लागू शकते. असे बर्‍याच ठिकाणी झाले तर तितक्या जागा हातच्या जाऊ शकतात. अशा ठिकाणी उमेदवार बदलल्यास विजय मिळायची शक्यता वाढते. हे गणित लक्षात घेऊन भाजप ४५ ते ५० आमदारांना उमेदवारी नाकारणार आहे असे म्हटले जात आहे. त्या ४५-५० आमदारांमध्ये आपले नाव असेल ही कुणकुण लागली तर हे लोक पक्ष सोडून दुसरीकडे जाऊ शकतात. बंगालमध्ये शुभेंदू अधिकारी हा ममतांचा एकेकाळचा उजवा हात तृणमूल सोडून भाजपमध्ये गेल्यावरही असेच वातावरण उभे केले गेले होते. नंतर काय झाले हे आपल्याला माहित आहेच.
अखिलेश यादव यांनी सांगितले आहे की, जर त्यांच्या पक्षाला उत्तर प्रदेशात सत्ता मिळाली तर राज्यातील तरुण आणि विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉपचे वाटप केले जाईल.
२०१२ मध्येही ते आश्वासन त्यांनी दिले होते ना? २०१४ मध्ये लोकसभेत भाजपचा मोठा विजय झाल्यावर मुलायमसिंग यादव म्हणाले होते की लोकांनी अखिलेशने दिलेल्या लॅपटॉपवर मोदींची भाषणे बघितली आणि मत मोदींना दिले.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रदीप on गुरुवार, 01/13/2022 - 11:55

In reply to उत्तर प्रदेश by चंद्रसूर्यकुमार

Permalink

पक्ष सोडलेले

मंत्री/आमदार आता ६ झाले आहेत असे फ्रीप्रेसच्या बातमीत म्हटले आहे. ह्या सहा जणांपैकी, मौर्य व चौहान हे बाहेरून भाजपांत गेल्या काही वर्षांत आले होते, असेही ही बातमी नमूद करते. इतर चौघांच्या बाबतीत असे काही त्या बातमीत तरी म्हटलेले नाही. इतरस्त्र ह्याविषयी संदिग्धताच दिसते, हे मुख्य प्रवाहांतील मीडियाच्या अलिकडच्या गुणधर्माशी साजेसेच वर्तन आहे. मौर्य प्रभृतींनाही, भाजप ओबीसीसाठी काहीच करत नसल्याचा साक्षात्कार आताच होणे हेही विलक्षणच--- किंवा, सध्याच्या वातावरणात, नाहीच.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रदीप on गुरुवार, 01/13/2022 - 12:20

In reply to पक्ष सोडलेले by प्रदीप

Permalink

मूळ

वरील प्रतिसाद लिहील्यावर लगेच पाहिले तर अजून एक, सातवे आमदार, मुकेश वर्मा ह्यांनीही भाजपचा त्याग केलेला आहे, असे समजले. अर्थात, मुख्य प्रवाहांतील मीडिया अधिक काही सांगण्यास तयार नाही. पण हे संस्थळ सर्व आमदार/ खासदारांविषयी काही माहिती देते. त्यावरून मिळालेली माहिती अशी की... Mukesh Varma 2012 BSP Swamy Prasad Maurya 2021 BSP Brijesh Kumar Prajapati ?? Bhagawati Prasad 2007 BSP Vinay Shakya 2009 BSP (LS election candidate) Roshan Lal Verma 2021 BSP Dara Singh Chauhan 2014 BSP (LS election candidate) (वरील साल व पक्ष, सदर व्यक्तिंच्या ह्याअगोदरच्या निवडणूकीची माहिती देतात). म्हणजे ह्या सातांपैकी किमान सहाजण तरी पूर्वाश्रमीचे बसपाचे सभासद होते.
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on गुरुवार, 01/13/2022 - 12:23

In reply to मूळ by प्रदीप

Permalink

एका अर्थी चांगलेच

एका अर्थी असे बाहेरून आलेले लोक जात आहेत हे चांगलेच आहे. असे महाराष्ट्रातही व्हावे आणि राष्ट्रवादीमधून घाऊक प्रमाणावर आलेले लोक परत स्वगृही जावेत ही इच्छा आणि अपेक्षा.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on गुरुवार, 01/13/2022 - 13:59

In reply to एका अर्थी चांगलेच by चंद्रसूर्यकुमार

Permalink

बाहेरून आलेले लोक जात आहेत हे चांगलेच आहे

सहमत आहे....
  • Log in or register to post comments

Submitted by प्रदीप on गुरुवार, 01/13/2022 - 12:34

Permalink

कोव्हिडग्रस्त नेता

केजरीवाल कालपरवापर्यंत कोव्हिड्ग्रस्त असल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्या पाश्वभूमीवर हा व्हिडीयो भयानक वाटतो-- साहेब गर्दीत मास्क खाली करून खोकताहेत. अर्थात सर्वकाही लोकांना फुकटात द्यायचे ह्या त्यांच्या धोरणाशी हे सुसंगतच आहे, म्हणायचे!
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on गुरुवार, 01/13/2022 - 13:58

Permalink

रायगड, लोहगड आता कुलाबा किल्ला! बांधले थडगे, अंथरली हिरवी चादर…

रायगड, लोहगड आता कुलाबा किल्ला! बांधले थडगे, अंथरली हिरवी चादर… https://marathi.hindusthanpost.com/special/lohgad-fort-raigad-fort-shri-malang-gad-and-kulabba-fort-encroachment-by-muslim-archaeological-department-not-take-action/45698/ ------- ही गोष्ट खरी आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by रावसाहेब चिंगभूतकर on गुरुवार, 01/13/2022 - 17:37

Permalink

https://youtu.be/Lsf-94UlThY

https://youtu.be/Lsf-94UlThY स्टिंग ऑपरेशन. आता हे सिद्ध समजायला हरकत नाही की PM ना थांबवणे आणि त्यांच्या सभांना जाणारी गर्दी रोखणे हा एक कट होता. पंजाब सरकार बरखास्त करून राष्ट्रपती शासन लागू करून कट करणाऱ्यांची मुंडी उडवणे हा सर्वात समर्पक मार्ग असेल.
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on गुरुवार, 01/13/2022 - 22:16

Permalink

आप आणि मिस्ड कॉल्स

आम आदमी पार्टीने पंजाबचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असावा यासाठी लोकांची मते मागवली आहेत. त्यासाठी ७०७४८६०७४८ या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा असे आवाहन केले आहे. मिस्ड कॉल देऊन त्यातून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असावा हे कॉल करणार्‍याचे मत कसे काय कळणार आहे काय माहित. २०१३ मध्ये केजरीवाल पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हाही लोकांकडून मिस्ड कॉल घेऊन काँग्रेसचा पाठिंबा घ्यावा की नाही याविषयी मते मागवली गेली होती. सामान्य माणसाला न समजणार्‍या गोष्टी नेत्याला समजल्या पाहिजेत. तेव्हा नेत्याने सामान्य लोकांनाच विचारून आपली पावले उचलली तर त्याला काय अर्थ राहिला?
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद on Fri, 01/14/2022 - 04:51

Permalink

जुने मंदिर तोडले

सोमवारी, तामिळनाडू सरकारने वरधराजपुरममधील चेन्नईतील श्री नरसिंह अंजनेयर स्वामी मंदिर पाडले आहे. स्तालिन हा हिंदू विरोधी आहे सतत दिसून आले आहे. या आधीही मुतननकुलम या तलावाच्या काठावर असलेले १२५ वर्षे जुने मंदिर त्याने पाडले होते. एमके स्टॅलिन यांनी तामिळनाडूमध्ये राज्याचे मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर मंदिर पाडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याच सरकारने कोविड प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे कारण देत पोंगल सारख्या हिंदू सणाच्या कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. मात्र अशी बंदी इतर कोणत्याही धर्माच्या कार्यक्रमांवर घातली गेली नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Fri, 01/14/2022 - 09:46

In reply to जुने मंदिर तोडले by निनाद

Permalink

माहिती बद्दल धन्यवाद

माहिती बद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Fri, 01/14/2022 - 10:18

In reply to जुने मंदिर तोडले by निनाद

Permalink

द्रमुक

जयललितांनी वाजपेयींना त्रास दिला होता म्हणून भाजप समर्थकांना अण्णा द्रमुकपेक्षा द्रमुक त्यातल्या त्यात बरा वाटतो असे अनेकदा बघितले आहे. पण रामचंद्रन आणि जयललिता या दोघांनीही असले प्रकार केले नव्हते. भाजप आणि द्रमुक यांच्यात मुळातच विचारांमध्ये हा फरक आहे. त्यामुळे वाजपेयींच्या सरकारमध्ये द्रमुक सहभागी असला तरी दोन्ही पक्ष एकमेकांबरोबर फार गुण्यागोविंदाने नांदत होते असे नक्कीच नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on Fri, 01/14/2022 - 11:12

In reply to द्रमुक by चंद्रसूर्यकुमार

Permalink

भाजपा - अण्णा द्रमुक

महाराष्ट्रात जसा भाजपाला (जर गरज लागलीच तर...) इतर कोणाही पेक्षा शिवसेना हा जास्त सहज, सोयिस्कर सहकारी पक्ष आहे, तसा तमीळनाडूत (गरज आहेच..) अण्णा द्रमुक हा जास्त सहज आणि सोयिस्कर पक्ष आहे. द्रमुकचं कडवं द्रविडपण आणि कडवा उच्चवर्णीय हिन्दूविरोध भाजपाला मानवणारा आणि सोसवणारा नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Fri, 01/14/2022 - 10:27

Permalink

तुम्ही बलात्कारी, गुन्हेगारांना तिकीट देतात, मग मला का नाही?

तुम्ही बलात्कारी, गुन्हेगारांना तिकीट देतात, मग मला का नाही? उत्पल पर्रीकर यांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल https://www.tv9marathi.com/elections/goa-assembly-election-2022/goa-assembly-election-2022-utpal-parrrikar-ask-question-to-devendra-fadnavis-and-decided-to-contest-independent-from-panaji-615232.html/amp ------ घरचा अहेर मिळाला... भाजपने, ह्यातून योग्य तो धडा नक्कीच घ्यावा, ही अपेक्षा .... स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार देणे, इतपतच अपेक्षा आहे...
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Fri, 01/14/2022 - 11:19

In reply to तुम्ही बलात्कारी, गुन्हेगारांना तिकीट देतात, मग मला का नाही? by मुक्त विहारि

Permalink

पणजी

२०१४ मध्ये मनोहर पर्रीकर केंद्रात संरक्षणमंत्री म्हणून गेल्यावर त्यांनी पणजी या विधानसभा जागेच्या आमदारपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर तिथे पोटनिवडणुक झाली त्यात भाजपचे सिध्दार्थ कुंकळीणकर निवडून आले. त्या जागेवर उमेदवार म्हणून सिध्दार्थ कुंकळीणकर यांची निवड स्वतः मनोहर पर्रीकरांनी आपल्या कार्यकर्त्यांमधून केली होती. तेच २०१७ मध्ये विधानसभा निवडणुकांमध्येही जिंकले. २०१७ मध्ये मनोहर पर्रीकर गोव्याला मुख्यमंत्री म्हणून परत आले त्यानंतर त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन जागा परीकरांसाठी मोकळी केली होती. उत्पल पर्रीकरांना ते मनोहर पर्रीकरांचे पुत्र या एकाच कारणाने उमेदवारी दिली जायला नको हे मान्य. पण मागे म्हटल्याप्रमाणे बाबूश मोन्सेराटपेक्षा ते कधीही कितीतरी पटींनी चांगले उमेदवार ठरतील. पक्षासाठी काम केलेला उमेदवार हवा असेल तर मग या सिध्दार्थ कुंकळीणकरांचे नाव का डावलले जात आहे हे पण समजायला मार्ग नाही. बाबूश मोन्सेराट हा हरामखोर माणूस पक्षासाठी काम केलेल्या सिध्दार्थ कुंकळीणकरांपेक्षा चांगला उमेदवार वाटत असेल तर मग गोवा भाजप आत्मघाताकडे निघाला आहे हे नक्की.
  • Log in or register to post comments

Submitted by रात्रीचे चांदणे on Fri, 01/14/2022 - 11:29

In reply to पणजी by चंद्रसूर्यकुमार

Permalink

गोव्यातील तिकीट वाटप कोण बघतय

गोव्यातील तिकीट वाटप कोण बघतय माहिती नाही परंतु फडणवीस चांगल्या कार्यकत्यावर अन्याय करायला पटाईत आहेत. महाराष्ट्रात तावडे, बावनकुळे आणि खडसे यांची तिकिटे अशीच कापण्यात आली. खडसेवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत म्हणून तिकीट दिले नसेल हे एकवेळ मान्य केलं तरी राणे सारख्याच्याकघरात मात्र एकापेक्षा जास्त तिकिटे देण्यात आली.
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Fri, 01/14/2022 - 12:08

In reply to गोव्यातील तिकीट वाटप कोण बघतय by रात्रीचे चांदणे

Permalink

हो तेच

फडणवीसच गोव्याचे प्रभारी आहेत :(
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Fri, 01/14/2022 - 12:00

In reply to पणजी by चंद्रसूर्यकुमार

Permalink

बाबूश मोन्सेराट

सारखे उमेदवार, भाजपने, घेऊ नयेत
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Fri, 01/14/2022 - 12:14

In reply to बाबूश मोन्सेराट by मुक्त विहारि

Permalink

राणे चालले,बाबूश मोन्सेराट का नको ?

गंगाजल है सब पवित्र करेगा
  • Log in or register to post comments

Submitted by राघव on Fri, 01/14/2022 - 15:09

In reply to पणजी by चंद्रसूर्यकुमार

Permalink

गोवा भाजपच का.. महाराष्ट्र

गोवा भाजपच का.. महाराष्ट्र भाजपही त्याच वाटेवर आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Fri, 01/14/2022 - 21:03

In reply to गोवा भाजपच का.. महाराष्ट्र by राघव

Permalink

ते पण आहेच म्हणा ....

आत्ताच काही निर्णय घेतले तर उत्तम.... झूल अंगावर चढवता येते, पण कातडे आहे तसेच राहते. निवडून येणे ही पात्रता न बाळगता, निवडून नाही आलात तरी चालेल पण, धोरणे बदलणे अयोग्य. आमच्या पिढीने, शिवसेनेला विश्र्वासाने मतदान केले, पण आता शिवसेनेच्या हिंदूत्वावरचा विश्र्वास उडाला, भाजपच्या बाबतीत तरी ही गोष्ट व्हायला नको.
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Fri, 01/14/2022 - 11:35

Permalink

संजय राऊत उवाच

काल कोविडच्या परत बिघडत चाललेल्या परिस्थितीवर पंतप्रधान मोदींनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रकृतीच्या कारणामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्याऐवजी महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केले. नेहमीप्रमाणे वाचाळवील संजय राऊत यावर बोलले आहेत की मुख्यमंत्री त्या बैठकीला जाऊ शकले नाहीत म्हणून काय झाले? राज्यात सगळे काही सुरळीत चालू आहे. https://maharashtratimes.com/latest-news/india-news/there-is-no-issue-if-cm-uddhav-thackeray-not-attending-pm-narendra-modi-meeting-says-sanjay-raut/articleshow/88890611.cms . एक गोष्ट समजत नाही. राज्यात सगळे सुरळीत चालू आहे, आम्ही खूप लोकप्रिय आहोत, आम्ही अमुक आहोत, आम्ही तमुक आहोत या सगळ्या गोष्टी दरवेळेस बोलून का दाखवाव्या लागतात? जर का खरोखरच सगळे सुरळीत चालू असेल किंवा हे खूप लोकप्रिय असतील तर ते अगदीच उघडपणे दिसेल. ते परत परत सांगावे का लागते? याविषयी ब्रिटनच्या माजी पंतप्रधान (ज्यांना iron lady असे म्हटले जायचे) मार्गारेट थॅचर यांचे एक वाक्य नेहमी आठवते- Being powerful is like being a woman. If you have to tell you are, you are not.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Fri, 01/14/2022 - 11:58

In reply to संजय राऊत उवाच by चंद्रसूर्यकुमार

Permalink

ते रोमेल तत्वज्ञान पाळतात ...

सतत एकच धोषा लावायचा .... अर्थात, कितीही धोषा लावला तरी, निवृत्त नौसैनिकाला शिवसैनिकांनी मारहाण केली, ही छापील बातमी, मिटवू शकत नाहीत...
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Fri, 01/14/2022 - 22:26

Permalink

दारु पार्टी प्रकरण बोरिस जॉन्सन यांना भोवणार?

दारु पार्टी प्रकरण बोरिस जॉन्सन यांना भोवणार? भारतीय वंशाचा ‘हा’ नेता ब्रिटीश पंतप्रधान होण्याची दाट शक्यता https://www.loksatta.com/desh-videsh/odds-favour-indian-origin-rishi-sunak-as-next-british-pm-amid-mounting-pressure-on-boris-johnson-to-resign-scsg-91-2760886/?utm_source=Taboola_Recirculation&utm_medium=RC&utm_campaign=LS -------- ही खरी लोकशाही .... आपल्या देशांत, मास्क न लावता, लग्न कार्ये देखील होऊ शकतात, आणि नेते तर, लग्नात कितीही मंडळी बोलावू शकतात, असे होण्याची शक्यता आहे.... /strong> ------ ब्रिटन मध्ये, घराणेशाही नाही, ही बातमी म्हणजे, ह्याचा उत्तम पुरावा आहे...
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sat, 01/15/2022 - 09:46

Permalink

उत्तरप्रदेश भाजप गळती....

उत्तरप्रदेशातली निवडणूक रंगणार असे चित्र दिसायला लागले आहे. सद्य सरकारातल्या आत्तापर्यंत दोन मंत्री आणि आठ आमदारांनी राजीनामे दिले आहेत. योगी मंत्रीमंडळातील केबीनेट मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी राजीनामा देऊन ट्वीट करुन ”नाग रूपी आरएसएस एवं सांप रूपी भाजपा को स्वामी रूपी नेवला यू.पी. से खत्म करके ही दम लेगा” सध्या खळबळ उडवून दिलेली आहे. गेले दोन तीन दिवस भाजपा सोडून बाहेर पडणा-या नेते कार्यकर्त्यांच्या बातम्या येत आहेत. स्वामी प्रसार मौर्य हे मोठ्या संखेने सपात दाखल होतील असे वाटलेले नव्हते, असे अखिलेश यादव यांनी म्हटलेले आहे, आम्ही चारशे जागा जिंकु असा दावा केला आहे अर्थात निवडणुका म्हटले की दावे वगैरे करणे चालूच राहील. पण, भाजपावर किती परिणाम होईल हा प्रश्न महत्वाचा आहे. मला व्यक्तीगत वाटते की फ़ार परिणाम होणार नाही. जागा निश्चित कमी होतील परंतु सरकार बनवता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण होणार नाही अर्थात लोकशाही आहे, लोक होत्याचं नव्हते करायला फ़ार वेळ घेत नाही. केंद्रीय नेतृत्त्वावर याचा किती परिणाम होईल. तिकडेही मंत्रीमंडळात अनेकांचा जी गुदमरत असणार आहेच परंतु सध्या कोणी बाहेर पडणार नाही. कदाचित निवडणुका जवळ आल्यावर असे परिणाम तिकडेही होऊ शकतो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sat, 01/15/2022 - 10:00

Permalink

कोविड नियमांचे उल्लंघन, अडीच हजार ‘सपा’ कार्यकर्त्यांविरोधात FIR

कोविड नियमांचे उल्लंघन ; अडीच हजार ‘सपा’ कार्यकर्त्यांविरोधात FIR दाखल https://www.loksatta.com/elections/uttar-pradesh-election-fir-filed-against-2500-sp-workers-for-violating-covid-rules-msr-87-2762143/ ------- कोविड-१९ प्रकरणांमध्ये नव्याने वाढ झाल्याचे कारण देत निवडणूक आयोगाने १५ जानेवारीपर्यंत पाच निवडणूक राज्यांमध्ये सार्वजनिक रॅली, रोड शो आणि सभांवर बंदी घातली आहे. त्याचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचे आदेशही दिले आहेत. यामुळेच निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार यूपी पोलिसांनी हे गुन्हे दाखल केले आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sat, 01/15/2022 - 13:12

Permalink

मंडळ अधिकारी, तलाठ्याच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न

काळजाचा ठोका चुकवणारे थरारनाट्य; मंडळ अधिकारी, तलाठ्याच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न https://www.tv9marathi.com/maharashtra/other-district/nandurbarattempt-by-sand-smugglers-to-put-a-tractor-on-the-body-of-mandal-officer-talathi-in-nandurbar-615506.html -------- ह्या राजवटीत, सरकारी अधिकारी वर्गावर हल्ले चालूच आहेत. ठाण्यात देखील, एका पालिका कर्मचारीवर हल्ला झाला होता. --------
  • Log in or register to post comments

Submitted by शाम भागवत on Sat, 01/15/2022 - 17:12

Permalink

महाराष्ट्रातील १२ आमदारांचे

महाराष्ट्रातील १२ आमदारांचे निलंबन सुप्रीम कोर्ट उठवणार अशी चिन्हे दिसत आहेत. ६० दिवसांपेक्षा जास्त दिवसांचे निलंबन योग्य नसल्याची टिपण्णी सुप्रिम कोर्टाने केलेली आहे. यावर सरकारी वकिलांनी आपला युक्तिवाद लागलीच आवरता घेऊन, सरकारशी सल्लामसलत करण्यासाठी मुदत मागून घेतली. येत्या मंगळवारी कोर्टात सुनावणी आहे. जर कोर्टाने निलंबन उठवले तर मात्र सरकारची नव्हे तर महाराष्ट्र विधानसभेची नाचक्की होईल. कारण अधिवेशन चालू नसल्याने अध्यक्ष निलंबन रद्द करू शकत नाहीत व चूक सुधारू शकत नाहीत. सुप्रिम कोर्टाला विधानसभा अध्यक्षाच्या अधिकारांमधे ढवळाढवळ करायला निमित्त मिळाल्यामुळे संबंधीत तालिका अध्यक्षांचे नाव अजरामर होणार हे नक्की. कारण हा निर्णय आता पायाभूत निर्णय म्हणून समजला जाण्याची शक्यता आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Sat, 01/15/2022 - 17:40

Permalink

आदित्यनाथ गोरखपूरमधून निवडणुक लढविणार

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूर शहर मतदारसंघातून निवडणुक लढविणार आहेत. भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहिर केली त्यात हा उल्लेख आहे. आतापर्यंत योगी अयोध्येतून निवडणुक लढवतील असे म्हटले जात होते. नेहमीप्रमाणे संजय राऊत यांनी 'योगींविरोधात आम्ही अयोध्येत उमेदवार देऊ' असे म्हटले. पण योगी आपल्या शहरातून- गोरखपूरमधूनच निवडणुक लढवणार आहेत. समाजवादी पक्षाकडून अखिलेश यादव मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील हे नक्कीच आहे. पण ते विधानसभा निवडणुक लढविणार नाहीत. बसपा सत्तेत आल्यास मायावतीच मुख्यमंत्री होणार हे पण वेगळे सांगायला नको. पण या बबुआ आणि बुआंपैकी कोणीच निवडणुक लढविणार नाहीये. काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ही चर्चाच निरर्थक आणि हास्यास्पद आहे त्यामुळे तो प्रश्नच उभा राहत नाही. विधानसभा निवडणुकांमध्ये एक चेहरा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून पुढे आणला जातो तेव्हा त्याने निवडणुक लढवायला नको का? हे नितीशकुमारांविषयी पण लागू आहे आणि २००९ मध्ये मनमोहनसिंगांविषयीही तितकेच लागू आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by रावसाहेब चिंगभूतकर on Sat, 01/15/2022 - 19:59

In reply to आदित्यनाथ गोरखपूरमधून निवडणुक लढविणार by चंद्रसूर्यकुमार

Permalink

संजय राऊत याना त्यांच्या घरात

संजय राऊत याना त्यांच्या घरात तरी कोणी सिरियसली घेत असतील की नाही शंका आहे
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Sat, 01/15/2022 - 20:03

In reply to संजय राऊत याना त्यांच्या घरात by रावसाहेब चिंगभूतकर

Permalink

आवडते नेते

तरीही महाराष्ट्र राज्यपातळीवर संजय राऊत माझे सगळ्यात आवडते नेते आहेत. अखंडपणे गुडघ्यातले बोलून खरं तर बरळून कित्येक मते ते आपल्या बाजूला वळवत असतील. केंद्रीय पातळीवर मणीशंकर अय्यर याच कारणाने माझे सगळ्यात आवडते नेते आहेत. महाराष्ट्रात राऊतांच्या खालोखाल नाना पटोले आवडतात.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com