Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by चंद्रसूर्यकुमार on Sat, 01/08/2022 - 18:06
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे. निवडणुक आयोगाने पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशात १०, १४, २०, २३, २७ फेब्रुवारी आणि ३ आणि ७ मार्चला ७ टप्प्यात मतदान होणार आहे. पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यात १४ फेब्रुवारीला तर मणीपूरमध्ये २७ फेब्रुवारी आणि ३ मार्चला दोन टप्प्यात मतदान होणार आहे. मतमोजणी गुरूवार १० मार्चला होणार आहे. कोरोनाच्या वाढत्या आकड्यांच्या पार्श्वभूमीवर सध्या १५ जानेवारीपर्यंत रोड शो, प्रचारसभांना बंदी असेल. तसेच मतदानकेंद्रांची संख्या वाढवून मतदारांची गर्दी कमी करण्याचा प्रयत्न असेल. प्रत्येक मतदानकेंद्रावर सॅनिटायझर, थर्मल गन वगैरे गोष्टी असतील. मतदानाची वेळ एक तासाने वाढविण्यात आली आहे. जर मतदाराचे अंगाचे तपमान जास्त आढळल्यास त्या मतदाराला टोकन दिले जाऊन शेवटच्या एक तासात मतदानासाठी परत बोलावले जाईल. ज्येष्ठ नागरीक, अपंग आणि कोविड रूग्णांना पोस्टाने मतदान करायची परवानगी दिली गेली आहे. मतमोजणीनंतर विजयी उमेदवाराला विजययात्रा काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. https://timesofindia.indiatimes.com/india/covid-protocols-for-assembly-elections-no-rallies-till-jan-15-polling-time-to-be-increased-by-an-hour/articleshow/88774608.cms
  • Log in or register to post comments
  • 47454 views

प्रतिक्रिया

Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Sat, 01/08/2022 - 19:39

Permalink

गेल्या महिन्यात ज्या २ घटना [

गेल्या महिन्यात ज्या २ घटना [ १] पार्कर प्रोब ने सूर्याच्या करोना मधुन प्रवास केला. २] जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप चे अवकाशात प्रक्षपण. ] माझ्या पाहण्यात आल्या त्या संबंधी मी पाहिलेले व्हिडियो इथे देत आहे. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप च्या प्रवासाची लाईव्ह फिड इथे पाहता येईल. :- अवांतर :- बरेच दिवस मी एका मिपाकर आयडी ची फार आठवण काढत होतो... म्हणजे त्यांचे नाव आठवण्याचा प्रयत्न करत होतो. पण काही केल्या ते आठवतच नव्हते ! पण आत्ता आचनक मी स्वतःचेच मिपावरचे ग्रह तार्‍यांवर दिलेले प्रतिसाद शोधण्याच्या प्रयत्नात अचानक मला तो मिपाकर सापडला. मी सर्च केले "ग्रह misalpav मदनबाण" तेव्हा सर्च रिझल्ट मध्ये संवेदना https://savedanaa.blogspot.com/2012/04/blog-post_14.html हा ब्लॉग आलेला दिसला आणि त्या मध्ये मला माझी आयडी नमुद असलेली दिसली, सहज उत्सुकता चाळावली म्हणुन लिंक उघडली आणि भोचक मला परत जालिय स्वरुपात मिळाले. हा त्यांचा ब्लॉग :- https://bhochak.blogspot.com/ रस्त्यावरील अपघातात या मिपाकराला मिपाकर मंडळी कायमची गमावुन बसली ! दुसर्‍या दिवशी विकास काकांनी या घटनेमुळे रस्त्यावरील अपघात हा धागा लिहला होता. भोचक यांचे मिपावरील सर्व लिखाण इथे पाहता येईल :- http://www.misalpav.com/user/680/authored जुन्या मिपाकरांच्या आठवणी पाठलाग सोडत नाहीत...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Imran Khan - Satisfya (Official Music Video)
  • Log in or register to post comments

Submitted by सुक्या on Sun, 01/09/2022 - 08:41

In reply to गेल्या महिन्यात ज्या २ घटना [ by मदनबाण

Permalink

आठवण . .

भोचक यांची आठवण काढली आणी कसेसेच झाले ... त्याबरोबर श्रामो (श्रावण मोडक) पण आठवले ...
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sat, 01/08/2022 - 19:59

Permalink

जुन्या मिपाकरांच्या आठवणी पाठलाग सोडत नाहीत

सहमत आहे पोटे चंपाबाई उद्दाम हे त्यापैकीच काही .... हे सगळेच, माझ्यावर चांगलेच प्रेम करायचे .... नंतर बिचारे गायब व्हायचे ...
  • Log in or register to post comments

Submitted by Trump on Sat, 01/08/2022 - 20:09

In reply to जुन्या मिपाकरांच्या आठवणी पाठलाग सोडत नाहीत by मुक्त विहारि

Permalink

नंतर बिचारे गायब व्हायचे ?

नंतर बिचारे गायब व्हायचे
म्हणजे पृथ्वीलोक सोडुन गेले का?
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sun, 01/09/2022 - 16:57

In reply to नंतर बिचारे गायब व्हायचे ? by Trump

Permalink

मिपा वरून पंख फुटायचे

असो
  • Log in or register to post comments

Submitted by Trump on Sat, 01/08/2022 - 20:08

Permalink

नंतर बिचारे गायब व्हायचे ?

नंतर बिचारे गायब व्हायचे
म्हणजे पृथ्वीलोक सोडुन गेले का?
  • Log in or register to post comments

Submitted by Trump on Sat, 01/08/2022 - 20:11

Permalink

सभा, मिरवणुकावर व इतर प्रचारावर बंधने

करोनामुळे, सभा, मिरवणुकावर व इतर प्रचारावर बंधने आली आहेत. त्यामुळे कोणाला फायदा होईल?
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Sun, 01/09/2022 - 07:37

Permalink

https://www.lokmat.com

https://www.lokmat.com/jarahatke/sun-burn-out-will-turn-frozen-sun-says-nasa-scientists-a730/ फार गंभीर बातमी आहे. सर्वानी काळजी घ्यावी. हे काय चाललंय आघाडी सरकारच्या काळात?? मला तरी भाजपशीवाय पर्याय नाही. - भक्तविहारी.
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दा on Sun, 01/09/2022 - 09:52

In reply to https://www.lokmat.com by अमरेंद्र बाहुबली

Permalink

पुढची पाच अब्ज वर्ष भाजप

पुढची पाच अब्ज वर्ष भाजप सरकार येउद्या, मग बोलू आपण याच्यावर :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sun, 01/09/2022 - 10:15

Permalink

निवडणूक आणि ऑनलाईन माध्यमे...

उत्तरप्रदेशातील आणि इतर राज्यातील निवडणुकांचे बिगुल वाजले. करोना, ओमायक्रॉनमुळे प्रचार रॅल्यांना, संभांना बंदी असे असणार आहे, तेव्हा माध्यमं असतील ऑनलाईन आणि इतर अ‍ॅप्लीकेशन्स त्यावर प्रचाराचां भडीमार दिसणार आहे. प्रासंगिक, धार्मिक, सामाजिक, विकासाचे मुद्यांचं घमासान विविध जाल माध्यमांवर असणार आहेत, तेव्हा प्रचारात आघाडी अर्थात भाजपाची असेल आणि ते सर्वात पुढे असतील. समाजवादी पार्टी, बहुजन पार्टी, काँग्रेस यांना कंबर कसावी लागणार आहे, असे असले तरी उत्तरप्रदेशात इतर पक्षांचे सरकार येईल असे वाटत नाही, हा केवळ अंदाज. मागील निवडणुकीत बहुमताच्या आकड्यांपेक्षा शंभराने अधिक आघाडी भाजपाने घेतलेली होती. शेतकरी आंदोलन, केंद्रीय मुद्दे, राज्यसरकाराचे मुद्दे, याने तो अधिकचा आकडा कमी झाला तरी सरकार अल्पमतात येईल असे चिन्ह नाही. 'रिकाम्या खुर्च्या ते सुरक्षेतील त्रुटी' या सर्वांचा फायदा कोणाला होईल कसा होईल हे येत्या काळात दिसून येईल. भारतात माध्यमांचा सुकाळ सुळसुळाट पाहता भले बुरे परिणाम त्याचे दिसायला लागले आहेत. एकदा एखाद्या विचाराला योग्य आयडेंटेटी मिळाली किंवा त्यावर लादली की तो आपोआप एका गोटात आणि गटात चालल्या जातो. जगण्या मरण्याच्या प्रश्नांपेक्षा तो क्षणिक भडकाऊ विचार मेंदूचा ताबा घेतो आणि मग फेसबूक, इंस्टाग्राम, ट्वीटर, वाट्सॅप, विविध वृत्तवाहिन्यांवर चोवीस बाय सात दळण दळणारे भडक विचारांचे एक्सपर्ट्स आणि अगदी सार्वजनिक चर्चेच्या संकेतस्थळावरही चित्र विचित्र आयडींनी हे भडक विचारांचे लोन पसरवण्याचा उद्योग दिसतो. शिवराळ भाषा, धाकधपटशा, आक्रस्ताळपणा, भडक विचारांचा मारा या निवडणूकीत असणार आहे, तेव्हा प्रभावी मुद्देसुद विचार, आणि विकासाचे विचार, प्रत्यक्ष काम याला किती महत्व असेल ते या निवडणूकीत दिसेल, असे वाटते माध्यमांची ताकद मोठी असते, ती पुढे वाढतच जाणार आहे, या माध्यमांचा वापर उपयोग जनतेच्या हक्कांसाठी व्हायला हवा. तसा झाला नाही तर अनागोंदी माजेल आणि या माध्यमांवर गदा येईल असे वाटते, त्या सर्वच दृष्टीने ही निवडणूक वेगळी ठरेल असे वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by Trump on Sun, 01/09/2022 - 12:58

In reply to निवडणूक आणि ऑनलाईन माध्यमे... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

सुप्रभात सर.

सुप्रभात सर. तुमच्या विचाराचे मोती थोडे आमच्याकडे पण टाका.
भारतात माध्यमांचा सुकाळ सुळसुळाट पाहता भले बुरे परिणाम त्याचे दिसायला लागले आहेत. एकदा एखाद्या विचाराला योग्य आयडेंटेटी मिळाली किंवा त्यावर लादली की तो आपोआप एका गोटात आणि गटात चालल्या जातो. जगण्या मरण्याच्या प्रश्नांपेक्षा तो क्षणिक भडकाऊ विचार मेंदूचा ताबा घेतो आणि मग फेसबूक, इंस्टाग्राम, ट्वीटर, वाट्सॅप, विविध वृत्तवाहिन्यांवर चोवीस बाय सात दळण दळणारे भडक विचारांचे एक्सपर्ट्स आणि अगदी सार्वजनिक चर्चेच्या संकेतस्थळावरही चित्र विचित्र आयडींनी हे भडक विचारांचे लोन पसरवण्याचा उद्योग दिसतो. शिवराळ भाषा, धाकधपटशा, आक्रस्ताळपणा, भडक विचारांचा मारा या निवडणूकीत असणार आहे, तेव्हा प्रभावी मुद्देसुद विचार, आणि विकासाचे विचार, प्रत्यक्ष काम याला किती महत्व असेल ते या निवडणूकीत दिसेल, असे वाटते
हे एकाच बाजुने होते आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगणेशा on Sun, 01/09/2022 - 13:06

Permalink

कोरोनाच्या वाढत्या

कोरोनाच्या वाढत्या आकड्यांच्या पार्श्वभूमीवर सध्या १५ जानेवारीपर्यंत रोड शो, प्रचारसभांना बंदी असेल.
मतं खेचण्यासाठी लागणाऱ्या वाढत्या आकड्यांच्या पार्श्वभूमीवर १५ जानेवारीनंतर कोरोना चर्चांना बंदी असेल.
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Sun, 01/09/2022 - 13:11

Permalink

चंडिगड- गोवा

चंडिगड चंडिगड महापालिकेत काल महापौर पदासाठी निवडणुक झाली. अलीकडे झालेल्या महापालिका निवडणुकीत ३५ पैकी आपला १४, भाजपला १२, काँग्रेसला ८ आणि अकाली दलाला १ जागा मिळाली. महापालिकेत कोणालाही बहुमत न मिळाल्याने महापौर पद कोणत्या पक्षाला मिळणार हे स्पष्ट नव्हते. निवडणुक झाल्यानंतर काँग्रेसच्या ८ पैकी १ नगरसेविका भाजपमध्ये सामील झाली. त्यामुळे आपला १४ आणि भाजपला १३ अशी स्थिती आली. काँग्रेस-अकाली दलाने आपला पाठिंबा दिला असता तर आपचा महापौर निवडून आला असता. पण या दोन्ही पक्षांनी मतदानात भाग घेतला नाही. कारण स्पष्ट आहे. पंजाबमध्ये विधानसभा निवडणुक तोंडावर आली आहे आणि त्यात आप या दोन पक्षांचा प्रतिस्पर्धी आहे. मग ते आपल्याच प्रतिस्पर्ध्याला मदत कशी करतील? चंडिगडच्या महापालिका नियमाप्रमाणे स्थानिक खासदार महापालिकेचा पदसिध्द सदस्य असतो. भाजपच्या किरण खेर चंडिगडच्या खासदार आहेत. त्यामुळे त्यांचे मत भाजपला जाऊन १४-१४ अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यात आपच्या एका नगरसेवकाचे मत अपात्र ठरले. त्याचे कारण कळले नाही. पण त्यामुळे चंडिगडमध्ये भाजपला महापौरपद मिळाले. गोवा गोव्यात ममता बॅनर्जींनी प्रचाराचा झंझावात चालवला आहे. सगळीकडे तृणमूलचे बोर्ड आणि फ्लेक्स दिसत आहेत अशा बातम्या आहेत. असे करून भाजपविरोधी मतांमध्ये फूट पडून त्याचा फायदा भाजपलाच होईल अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. https://www.loksatta.com/maharashtra/shivsena-sanjay-raut-tmc-mamata-banerjee-goa-assembly-election-bjp-aap-sgy-87-2753770/ तसेच आप हा बाहेरचा पक्षही काँग्रेसच्या वाटेत काटे पेरत आहे अशी टीकाही राऊतांनी केली. आतापर्यंत शिवसेना ममता बॅनर्जींचे कौतुक करत आली आहे. दीड-दोन महिन्यांपूर्वी ममता बॅनर्जी मुंबईत आल्या तेव्हा शिवसेनेने त्यांचे स्वागत केले होते. पण आता त्याच ममता बॅनर्जींंवर टीका केली जात आहे. एक गोष्ट कळत नाही. तृणमूल बाहेरचा, आप बाहेरचा पण शिवसेना हा महाराष्ट्रातील पक्ष गोव्यात विधानसभा निवडणुक लढवायचे मनसुबे करत आहे तो पक्षही बाहेरचाच आहे की. तो कुठे गोव्यातला पक्ष आहे? पण त्याविषयी राऊत काही बोलणार नाहीत. चंडिगडच्या महापौर निवडणुकीत किंवा गोव्यात विधानसभा निवडणुकीत अशी टीका शिवसेनेने तृणमूल-आपवर केली या त्यामानाने लहान गोष्टी आहेत. पण यातून एक गोष्ट वारंवार अधोरेखित होत आहे आणि लोकांसमोर येत आहे. एका शहराच्या महापौर निवडणुकीत म्हणजे खूपच लहान निवडणुकीतही हे विरोधी पक्ष एकत्र येऊ शकत नाहीत. गोवा हे राज्य असले तरी मतदारांच्या संख्येच्या दृष्टीने खूप लहान आहे. गोव्यातील विधानसभा मतदारसंघात आहेत त्यापेक्षा मुंबई महापालिकेतील एकेका वॉर्डात अधिक मतदार आहेत. तेव्हा गोवा विधानसभा निवडणुक एकूण राष्ट्रीय पातळीचा विचार केला तर खूप लहान आहे. अशा लहान निवडणुकांमध्येही हे पक्ष एकत्र यायला तयार नाहीत तर आपापसात भांडत आहेत. मग २०२४ मध्ये हे सगळे पक्ष एकत्र येऊन मोदींविरोधात राष्ट्रीय आघाडी उघडणार यावर लोकांचा कसा विश्वास बसणार? आणि जरी अशी आघाडी झाली तरी ती कितपत स्थिर असेल हा प्रश्न उभा राहणारच.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sun, 01/09/2022 - 17:07

In reply to चंडिगड- गोवा by चंद्रसूर्यकुमार

Permalink

स्थिर असली तरी....

कितपत विश्र्वासार्हता असणार? 1978 च्या वेळी, भाजप आणि शेकाप मिळून, सरकार स्थापन झाले होतेच की.... पहिल्या दिवसापासूनच, मोरारजी आणि चरणसिंग, यांच्यात पंतप्रधान पदासाठी रस्सीखेच सुरू झाली...
  • Log in or register to post comments

Submitted by Trump on Sun, 01/09/2022 - 14:08

Permalink

डिगीटल रॅली

डिगीटल रॅली काय प्रकार असतो?
  • Log in or register to post comments

Submitted by जेम्स वांड on Sun, 01/09/2022 - 14:34

In reply to डिगीटल रॅली by Trump

Permalink

२०१४ च्या वेळी

मोदींची चहावाला सामान्य माणूस ही इमेज वापरून घ्यायला भाजपने ह्या संकल्पनेची मुहुर्तमेढ रोवून अतिशय कल्पक वापर केला होता, त्यावेळी रॅली उर्फ चाय पे चर्चा करायला भाजपचे बूथ कार्यकर्ते भिडले होते, ते वॉर्डनिहाय पेंडॉल सेट करत, तिथं गरम चहा आणि प्रसंगी अल्पोपहार असे बहुतकरून फक्त चहा आणि त्याच्यासोबत एकतर नेतृत्वाचे पक्षी मोदी, शहा आणि इतर गणमान्य नेत्यांचे भाषण एकतर लाईव्ह किंवा प्री रेकॉर्ड, त्याचेच विस्तारीकरण असेल डिजिटल रॅलीज असे वाटते मला.
  • Log in or register to post comments

Submitted by Trump on Sun, 01/09/2022 - 14:43

In reply to २०१४ च्या वेळी by जेम्स वांड

Permalink

ह्म्म

ह्म्म ट्विटरवर बरेचदा मी काँग्रेस आणि भाजप पुरस्कृत #टॅग असतात. तोही त्यातलाच प्रकार असावा. पण त्याच्या परिणामांबद्दल सांशक आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sun, 01/09/2022 - 17:01

Permalink

शिवसेनेची फक्त 1100 मतं, भाजपची साथ मिळाल्यानं जिंकलो! शिवसेना

शिवसेनेची फक्त 1100 मतं, भाजपची साथ मिळाल्यानं जिंकलो! शिवसेना आमदाराचं वक्तव्य https://marathi.abplive.com/news/maharashtra/shiv-sena-mla-sangola-shahaji-bapu-patil-speech-about-bjp-helps-him-in-election-1024346/amp -------- हळूहळू वाचा फुटायला लागली...
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sun, 01/09/2022 - 17:26

Permalink

ठाकरे सरकारच्या नवीन निर्बंधांनंतर चंद्रकांत पाटलांची टीका...

ठाकरे सरकारच्या नवीन निर्बंधांनंतर चंद्रकांत पाटलांची टीका; म्हणाले, “हे सरकार गेंड्यापेक्षाही….” https://www.loksatta.com/maharashtra/chandrakant-patil-reaction-on-new-covid-omicron-restriction-by-state-government-hrc-97-2753913/ प्रत्येकाला आपल्या जीवाची काळजी आहे, त्यामुळे सरकारने त्यांना कोणती काळजी घ्यावी हे सांगावं....ह्या बाबतीत सहमत आहे....
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sun, 01/09/2022 - 17:36

Permalink

अलिबाग कुलाबा किल्ल्यावरील अनाधिकृत मदार हटवा....

अलिबाग कुलाबा किल्ल्यावरील अनाधिकृत मदार हटवा; सरखेल कान्होजी आंग्रेंच्या वंशजांची मागणी.... https://www.lokmat.com/raigad/remove-unauthorized-madar-alibag-colaba-fort-demand-kanhoji-angre-descendants-a681/amp/ अलिबागच्या समुद्रात उभा असलेल्या हिंदवी स्वराज्याच्या सागरी राजधानी म्हणून ओळखला जाणाऱ्या कुलाबा किल्ल्यावर एक नवीनच प्रार्थनास्थळ उभे राहिल्याकडे आंग्रे यांनी लक्ष वेधले आहे.. -------- स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या एका आदेशानुसार, मलंगगडावर, शिवसैनिक गोळा झाले होते.......
  • Log in or register to post comments

Submitted by उपेक्षित on Sun, 01/09/2022 - 17:56

Permalink

विहार करणारे काकांची केस पारच

  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sun, 01/09/2022 - 18:59

Permalink

हेअरकट करताना जावेद हबीब केसात थुंकला

हेअरकट करताना जावेद हबीब केसात थुंकला, महिलेचा आरोप; Video व्हायरल झाल्यावर मागितली माफी.... https://www.google.com/amp/s/www.lokmat.com/national/jawed-habib-hair-spit-controversy-viral-video-apology-shared-video-instagram-social-media-a720/amp/ काय बोलावं ते सुचेना ....
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Mon, 01/10/2022 - 07:20

In reply to हेअरकट करताना जावेद हबीब केसात थुंकला by मुक्त विहारि

Permalink

तो भाजप पक्षात आहे सर. पुढील

तो भाजप पक्षात आहे सर. पुढील निवडणूकीत तुम्ही भाजपला मत न देऊन धडा शिकवू शकतात.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Mon, 01/10/2022 - 14:40

In reply to तो भाजप पक्षात आहे सर. पुढील by अमरेंद्र बाहुबली

Permalink

हो क्का? ... मग खालील बातम्या पण वाचा ....

48 घंटे में बंद करें जावेद हबीब के सभी सैलून वरना...' : BJP विधायक (https://www.google.com/amp/s/ndtv.in/india-news/bjp-mla-from-indore-akash-vijayvargiya-warned-to-shut-all-the-saloons-of-jawed-habib-2695734/amp/1) ------- जावेद हबीब पार्लर के खिलाफ फिर उठी आवाज, महिला भाजपा नेता ने की सीएम से बंद करने की मांग (https://www.google.com/amp/s/www.livehindustan.com/madhya-pradesh/story-jawed-habib-parlour-controversy-bjp-woman-leader-asks-cm-to-shut-5524335.amp.html) ------- निवृत्त नौसैनिकाला मारहाण केली, सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण केली, तेंव्हा त्या त्या पक्षातील कार्यकर्त्यांनी काय केले? ----- असो, आपल्या घराणेशाहीच्या निष्ठेपुढे, मी कधीच नतमस्तक झालो आहे ...
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sun, 01/09/2022 - 21:27

Permalink

मोदींचा ताफा थांबला तेथील सतलज नदीतून 'पाकिस्तानी बोट' जप्त

धक्कादायक ! मोदींचा ताफा थांबला तेथील सतलज नदीतून 'पाकिस्तानी बोट' जप्त ----- https://www.lokmat.com/national/shocking-modis-boat-stopped-pakistani-boat-seized-sutlej-river-punjab-a601/amp/ ------- विशेष म्हणजे, जेथून ही पाकिस्तानी नाव ताब्यात घेण्यात आली आहे. तेथूनच सतलुज नदी पाकिस्तानातून भारतात प्रवेश करते. अनेकदा येथूनच तस्करी करणाऱ्यांना अमली पदार्थांसह पकडण्यात आले आहे. तर, या प्रदेशात पाकिस्तानकडून शस्त्रास्त्रांची तस्करी करण्यात येते. फिरोजपूर हा पंजाबमधील अतिशय संवेदनशील प्रदेश आहे....
  • Log in or register to post comments

Submitted by आग्या१९९० on Sun, 01/09/2022 - 21:35

In reply to मोदींचा ताफा थांबला तेथील सतलज नदीतून 'पाकिस्तानी बोट' जप्त by मुक्त विहारि

Permalink

शेजारच्यांना धाकच राहिला नाही

शेजारच्यांना धाकच राहिला नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by सर टोबी on Sun, 01/09/2022 - 22:06

In reply to मोदींचा ताफा थांबला तेथील सतलज नदीतून 'पाकिस्तानी बोट' जप्त by मुक्त विहारि

Permalink

निरागसवृत्ती थोडी कमी करा ना

ज्या रस्त्याने मोदी जाणार हे नक्की झाले तो अकस्मात निर्णय होता. मोदी अमक्या रस्त्याने जाणार हे समजल्याबरोबर पाकिस्तान सिमेतून बोट घुसली? आणि मग सीमा सुरक्षा दल काय पाकिस्तानी बोटीला वाजत गाजत आणायला ठेवलं आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by रावसाहेब चिंगभूतकर on Sun, 01/09/2022 - 23:35

In reply to निरागसवृत्ती थोडी कमी करा ना by सर टोबी

Permalink

अकस्मात निर्णय त्या लेव्हल ला

अकस्मात निर्णय त्या लेव्हल ला घेतले जात नाहीत. SPG ने आधी जी पत्रे पोलिसांना पाठवली होती त्यात पाऊस असण्याबद्दल आणि alternate रूट तयार ठेवण्याबद्दल उल्लेख होता. An important disclosure has been made in the ASL report regarding the lapse in security of PM Modi in Punjab. The ASL report states that on January 1, when the talks between the SPG and Punjab Police took place, all the options were considered. On January 3, a letter was also sent by the SPG to the Punjab Police, in which information about all alternate routes was shared due to bad weather. At the same time, the Punjab government had said that the PM had suddenly made a plan to go by road, but everything had already been discussed. This information has been given in page 23 of the ASL report prepared by the SPG after the detailed ASL meeting. ADGP Punjab Police Incharge of Security Arrangement, IG CI Punjab, IGP Ludhiana Range, DIG Ferozepur, DC Ferozepur, SSP Ferozepur and other officers participated in the ASL meeting. VVIP was a part of the contingency route security arrangement and it was discussed in the ASL meeting. Detailed instructions are listed in the ASL report on how to secure a VVIP emergency route. Page 24 of the SL report also mentions that ‘alternate routes will also be identified and rehearsed’. Page 24 further mentions that ‘there are also some villages on the way’. There is a possibility of congestion on the route, so proper measures should be taken to control the crowd. Police personnel with ropes can also be deployed at sensitive places to control the crowd. It is again mentioned at the bottom of page 24 that there is a possibility of road movement from Bathinda to Firozpur due to bad weather conditions. Therefore, all the police stations coming in the middle of the way should be alerted.
  • Log in or register to post comments

Submitted by रावसाहेब चिंगभूतकर on Sun, 01/09/2022 - 23:37

In reply to निरागसवृत्ती थोडी कमी करा ना by सर टोबी

Permalink

अर्थात पाकिस्तानी बोट वगैरे

अर्थात पाकिस्तानी बोट वगैरे प्रकार निरर्थकच असावेत याबद्दल सहमत. माझे उत्तर फक्त अकस्मात निर्णयाबद्दल होते.
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद on Mon, 01/10/2022 - 04:41

Permalink

इस्लामवाद्यांचा पोलिस आणि भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला

आंध्र प्रदेश: कुर्नूलमध्ये मशिदीच्या बेकायदेशीर बांधकामाला विरोध केल्यानंतर इस्लामवाद्यांनी पोलिस आणि भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला केला. मुस्लिम गटाने पोलिस ठाण्याचा घेराव करून भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबारही करावा लागला. परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या हिंसाचारात श्रीकांत रेड्डी यांच्या कारचे नुकसान झाले. मुस्लिम जमावाने भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांवरही दगडफेक केली. आत्मकूर येथील पद्मावती शाळेच्या मागे मशीद बांधण्यावरून वाद सुरू आहे. बेकायदेशीरपणे बांधलेली मशीद रोखण्यासाठी भाजप नेते प्रयत्नशील आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Mon, 01/10/2022 - 16:41

In reply to इस्लामवाद्यांचा पोलिस आणि भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला by निनाद

Permalink

बेकायदेशीरपणे बांधलेली मशीद रोखण्यासाठी भाजप नेते प्रयत्नशील आहे

ह्यासाठीच, आमच्या सारख्या अशिक्षित पण हिंदू हितवादी लोकांना, भाजप शिवाय पर्याय नाही...
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद on Mon, 01/10/2022 - 08:54

Permalink

रोबोटिक्स हब बनण्यासाठी चीनी पंचवार्षिक योजना.

जागतिक रोबोटिक्स हब बनण्यासाठी चीनने पंचवार्षिक योजना तयार केली आहे. रोबोटिक्ससाठी जागतिक केंद्र बनण्याची आपली महत्त्वाकांक्षा पुर्ण करण्यासाठी चीनने पंचवार्षिक योजनेचे अनावरण केले आहे. सर्व्होमोटर्स आणि कंट्रोल पॅनेल सारख्या प्रमुख घटकांमधील सुधारणांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. स्पीड रिड्यूसर, सर्व्होमोटर्स आणि कंट्रोल्स यांसारख्या मुख्य रोबोट घटकांमध्ये यश मिळविण्यासाठी ठोस प्रयत्न केले जातील
  • Log in or register to post comments

Submitted by Trump on Mon, 01/10/2022 - 12:59

In reply to रोबोटिक्स हब बनण्यासाठी चीनी पंचवार्षिक योजना. by निनाद

Permalink

आपण किती वर्षे मागे आहोत

ह्या असल्या बातम्या पाहिल्या की आपण किती वर्षे मागे आहोत त्याची जाणीव होते.
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Mon, 01/10/2022 - 13:19

Permalink

गोव्यात महाविकास आघाडी नाही- संजय राऊत

गोव्यात आम्ही महाविकास आघाडीसाठी प्रयत्न केले पण काँग्रेसकडून प्रतिसाद मिळाला नाही असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. https://www.loksatta.com/desh-videsh/shivsena-sanjay-raut-reaction-before-the-assembly-elections-in-goa-abn-97-2754836/lite/ आता गोव्यात राष्ट्रवादीबरोबर युती करून शिवसेना निवडणुक लढवणार आहे. शिवसेनेची गोव्यात ताकद शून्य आहे. आतापर्यंत एकदाही स्वबळावर एकही जागा जिंकणे तर सोडूनच द्या इतर कोणाबरोबर युती करूनही शिवसेनेने कधी विधानसभेची जागा जिंकलेली नाही. शिवसेनेने स्वबळावर एकदाही आपल्या उमेदवारांचे डिपॉझिटही वाचवलेले नाही. तर राष्ट्रवादीने काँग्रेसबरोबर युती करून २००७ मध्ये ३ जागा जिंकल्या होत्या. २०१७ मध्ये चर्चिल आलेमाव हे एकमेव उमेदवार राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून गेले होते. पण हे गृहस्थ स्वयंभू आहेत. त्यांना जिंकायला राष्ट्रवादी पक्षाचा उपयोग शून्य झाला होता असे म्हटले तरी चालेल. आता तेच तृणमूल काँग्रेसमध्ये गेले आहेत. पूर्वी एकदा माजी मुख्यमंत्री विल्फ्रेड डिसूझा राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून गोवा विधानसभेवर निवडून गेले होते. पण त्यांचे निधन होऊनही सहा-सात वर्षे उलटली आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादीकडेही नाव घेण्याजोगा एकही नेता राज्यात राहिलेला नाही. अशा दोन पक्षांबरोबर राज्यात बर्‍यापैकी जनाधार असलेल्या काँग्रेसने का युती करावी? त्या युतीतून काँग्रेसला काय मिळणार होते? आणि संजय राऊत यांची परवाची भाषा होती- आम्ही राष्ट्रवादीबरोबर युती करत आहोत, काँग्रेसने आमच्याबरोबर यावे. एखाद्याला आपल्याविषयी किती अवास्तव कल्पना अशाव्यात?
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Mon, 01/10/2022 - 15:37

In reply to गोव्यात महाविकास आघाडी नाही- संजय राऊत by चंद्रसूर्यकुमार

Permalink

उत्पल पर्रीकर

मनोहर पर्रीकरांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर पणजीमधून निवडणुक लढवायला उत्सुक आहेत. पणजीमधून मनोहर पर्रीकर १९९४ पासून सहावेळा निवडून गेले होते. उत्पल पर्रीकरांनी पक्षासाठी काही काम केल्याचे निदान मला तरी माहित नाही. केवळ मनोहर पर्रीकरांचा मुलगा या एका क्वालिफिकेशनवर त्यांना उमेदवारी दिली जायला नको असे वाटते. पण मागे म्हटल्याप्रमाणे भाजपने बाबूश मोन्सेराट या बलात्काराचे आरोप असलेल्या गणंगाला काँग्रेसमधून आपल्या पक्षात घेतले आहे. बहुदा त्याला उमेदवारी दिली जाईल ही शक्यता आहे. त्याने तरी पक्षासाठी नक्की कोणते काम केले आहे? असल्या घाणेरड्या माणसाला उमेदवारी देण्यापेक्षा उत्पल पर्रीकर कधीही परवडले. त्यांनी पक्षासाठी फार काही केले नसले तरी त्यांची पाटी कोरी आहे. या बाबूश मोन्सेराटप्रमाणे घाणेरड्या आरोपांनी भरलेली नाही. तेव्हा बाबूशपेक्षा उत्पल पर्रीकर उमेदवार म्हणून नक्कीच चांगले. हे टाईप करता करताच एक बातमी वाचली की बाबूश मोन्सेराट आज संध्याकाळी महालक्ष्मी मंदिरापासून आपला प्रचार सुरू करणार होता पण त्याने तो बेत रद्द केला आहे. https://timesofindia.indiatimes.com/city/goa/babush-calls-off-campaign-launch-as-utpal-eyes-ticket/articleshow/88797261.cms . म्हणजे त्याला उमेदवारी मिळणार नाही ही पण शक्यता दिसते. तसे असेल तर फारच उत्तम. जर उत्पल पर्रीकरांना भाजपने उमेदवारी दिली नाही शिवसेना उमेदवारी देईल असे म्हटले जात आहे. तसे संकेत संजय राऊत यांनी दिले आहेत असे आंतरजालावर वाचले पण ती लिंक या क्षणी सहजासहजी मिळाली नाही. जसा आदर मनोहर पर्रीकरांविषयी वाटायचा तो आदर मनोहर पर्रीकरांचे चिरंजीव या एकाच क्वालिफिकेशनमुळे या उत्पल पर्रीकरांविषयी नक्कीच वाटत नाही/वाटणार नाही. पण ते शिवसेनेत गेल्यास मात्र त्यांच्याविषयी थोडीफार असलेली सद्भावनाही संपून जाईल हे नक्की. त्याच शिवसेनेच्या त्याच संजय राऊत यांनी आपल्या वडिलांविषयी नक्की काय गटारगंगा वाहिली होती याची आठवण सगळ्यांनाच करून द्यायला हवी. मनोहर पर्रीकरांनी ऑगस्ट २०१७ मध्ये पणजीमधून पोटनिवडणुक लढवली होती. त्यावेळी व्हॉट्सअ‍ॅपवर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता की केला गेला होता. त्या व्हिडिओत 'जर पणजीमधून पराभव झाला तर आपण केंद्रात संरक्षणमंत्री म्हणून परत जाऊ' असे पर्रीकरांनी म्हटले होते असे त्या व्हिडिओत सांगितले गेले. खखोदेजा. बाकी कोणा भाजप उमेदवाराचा पणजीमधून पराभव होऊ शकेल ही शक्यता मान्य केली तरी खुद्द पर्रीकरांचा पराभव पणजीमधून होईल ही शक्यता जवळपास शून्य होती. तेव्हा या व्हिडिओत तथ्य नसावे असे वाटते. तेव्हा हा व्हिडिओ आल्यावर संजय राऊत काय म्हणाले होते? मनोहर पर्रीकर हे एक अपयशी संरक्षणमंत्री होते. https://www.dnaindia.com/india/report-shiv-sena-says-parrikar-was-a-failure-as-defence-minister-2533903 . पर्रीकर अपयशी संरक्षणमंत्री असतील तर मग व्ही.के.कृष्णमेनन एकदम यशस्वी संरक्षणमंत्री होते नाही का? तसेच २०१८ मध्ये पर्रीकर कर्करोगाने आजारी असताना ते उपचारासाठी परदेशी गेले होते. तेव्हा राज्याला सेनापती नसल्याने प्रशासन कोलमडले आहे इतकेच नाही तर गोव्याला 'आजारी राज्य' म्हणून जाहीर करावे असली गटारगंगा त्याच संजय राऊतांनी वाहिली होती. https://www.lokmat.com/goa/announce-state-ill-health-goa-sanjay-raut/?fbclid=IwAR09xRAziG-ATvqlzX2jhjlazrhdSCM4szNR4YahF167PBFLGwJ4Bv_b6Dg . आणि त्यावेळी उद्धव ठाकरे हे सामनाचे संपादक होते त्यांना हे सगळे बरळलेले चालले होते. हे इतरांविषयी असले काही बरळत असतील तर मग हे स्वतः आजारी पडल्यावर लोक त्यांच्याविषयीही बोलणारच. त्याला इलाज नाही. असो. सगळ्यांनाच ज्यांच्याविषयी आदर होता अशा आपल्या वडिलांविषयी असले बरळणार्‍या पक्षात उत्पल पर्रीकर गेले तर मात्र त्यांच्याविषयी थोडीफार असलेली सद्भावनाही पूर्ण संपून जाईल. याची जाण उत्पलना असावी ही अपेक्षा.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Mon, 01/10/2022 - 16:39

In reply to उत्पल पर्रीकर by चंद्रसूर्यकुमार

Permalink

उत्पल पर्रीकर यांनी हिंमत दाखवायला हवी, संजय राऊत...

उत्पल पर्रीकर यांनी हिंमत दाखवायला हवी, संजय राऊत यांनी दिली मोठी ऑफर ------ https://pudhari.news/maharashtra/mumbai/99185/shivsena-leader-sanjay-raut-said-about-utpal-parrikar-in-view-of-goa-legislative-assembly-election-2022/ar ----- पर्रीकरांच्या कुटुंबानं शिवसेनेशी संबध जोडला तर शिवसेना ताकद पणाला लावायला तयार आहे, असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत. -------- गोव्या बाबतीत, सध्या तरी इतकेच.... -----भाजपने बाबूश मोन्सेराट या बलात्काराचे आरोप असलेल्या गणंगाला काँग्रेसमधून आपल्या पक्षात घेतले आहे.... ह्या आपल्या मताशी सहमत आहे...
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Mon, 01/10/2022 - 17:32

Permalink

चिनी सैन्याचा गलवानमधील फोटो

मध्यंतरी गलवानमध्ये चीनी सैनिकांनी त्यांचा झेंडा फडकावला अशी बातमी आली. त्यानंतर समस्त विरोधी पक्षांनी 'त्यावर मोदी बोलत का नाहीत' हे आकांडतांडव करून झाले. त्यात बेगानी शादी मध्ये दिवाना झालेले राऊतब्दुल्ला सगळ्यात पुढे. इथेही नेहमीच्या यशस्वी कलाकारांनी ते पोस्ट केले असले तरी आश्चर्य वाटू नये. त्यानंतर आपल्या सैन्याने आपले सैनिक गलवानमध्ये तिरंगा घेऊन आहेत हा फोटो पोस्ट केला तिथेच या प्रोपोगांडाची हवा काढून घेतली गेली. त्यानंतर आता पुढे आले आहे की चीनमधून आलेल्या त्या तथाकथित फोटोत सैनिक म्हणून असलेले लोक सैनिक नव्हतेच तर चिनी कलावंत होते आणि त्यांना चिकपने (चिनी कम्युनिस्ट पक्ष) हा 'इव्हेंट' करण्यासाठी मुद्दामून बोलावून घेतले होते. आणि हा प्रकार चीनच्या सोशल मिडिया साईट विबो (weibo) वर चिनी सदस्यांनीच उघडकीस आणला. https://www.newsx.com/world/china-used-actors-to-stage-flag-hoisting-video-in-galwan-valley.html असा कुठलातरी फोटो आल्यावर लगेच मोदींवर तुटून पडून मग नंतर आपलेच नाक कापून घ्यायची हौस या विरोधकांना का असते हे समजत नाही. तुमचा मोदींवर विश्वास नसेल तर त्याविषयी काहीच आक्षेप असू नये. पण निदान आपल्या सैन्यावर तरी विश्वास ठेवा.
  • Log in or register to post comments

Submitted by Trump on Mon, 01/10/2022 - 17:59

In reply to चिनी सैन्याचा गलवानमधील फोटो by चंद्रसूर्यकुमार

Permalink

दुर्देव वाटते ते भारताचे.

दुर्देव वाटते ते भारताचे. लोकशाहीसाठी चांगल्या विरोधी पक्षाची गरज असते, पण येथे सगळा वनवास आहे.
असा कुठलातरी फोटो आल्यावर लगेच मोदींवर तुटून पडून मग नंतर आपलेच नाक कापून घ्यायची हौस या विरोधकांना का असते हे समजत नाही. तुमचा मोदींवर विश्वास नसेल तर त्याविषयी काहीच आक्षेप असू नये. पण निदान आपल्या सैन्यावर तरी विश्वास ठेवा.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Mon, 01/10/2022 - 18:48

In reply to दुर्देव वाटते ते भारताचे. by Trump

Permalink

+1

+1
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Mon, 01/10/2022 - 18:51

In reply to चिनी सैन्याचा गलवानमधील फोटो by चंद्रसूर्यकुमार

Permalink

निदान आपल्या सैन्यावर तरी विश्वास ठेवा.

सहमत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by Trump on Mon, 01/10/2022 - 17:59

Permalink

दुर्देव वाटते ते भारताचे.

दुर्देव वाटते ते भारताचे. लोकशाहीसाठी चांगल्या विरोधी पक्षाची गरज असते, पण येथे सगळा वनवास आहे.
असा कुठलातरी फोटो आल्यावर लगेच मोदींवर तुटून पडून मग नंतर आपलेच नाक कापून घ्यायची हौस या विरोधकांना का असते हे समजत नाही. तुमचा मोदींवर विश्वास नसेल तर त्याविषयी काहीच आक्षेप असू नये. पण निदान आपल्या सैन्यावर तरी विश्वास ठेवा.
  • Log in or register to post comments

Submitted by उपेक्षित on Mon, 01/10/2022 - 22:19

Permalink

विहार करणारे काकांची केस पारच

  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Tue, 01/11/2022 - 11:35

Permalink

पुन्हा एकदा उत्तर कोरिया

उत्तर कोरियाची राजधानी प्याँगयाँगमधील लोकांचे हस्ताक्षराचे नमुने सरकारने मागवायला सुरवात केली आहे. त्याचे कारण आहे हुकुमशहा किम जोंग उनविषयी अपशब्द वापरला गेला आहे. देशात मोठ्या प्रमाणावर अन्नटंचाई निर्माण झाली आहे. अशावेळेस अन्नटंचाईवर उपाय शोधायचा सोडून लोकांनी खाणे कमी करावे हा सल्ला किम जोंग उनने दिला आहे. फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळेची राणी मेरीने 'ब्रेड नसेल तर केक खा' असे म्हटले होते त्यापेक्षा हे थोडेसे सौम्य धोरण म्हणायचे. तर सांगायचा मुद्दा म्हणजे या अन्नटंचाईमुळे लोकांमध्ये असंतोष वाढू लागला आहे. किमच्या पक्षाची बैठक चालू होती त्या इमारतीच्या बाहेर कोणीतरी 'किम जोंग उनमुळे लोक उपाशी मरत आहेत. He is a son of a *****' अशाप्रकारचे अपशब्द असलेली ग्राफिटी चिकटवली. झालं. आता हे नक्की कोणी केले आहे हे शोधून काढायला सीसीटिव्ही फुटेज तपासून बघितले जात आहेच पण त्याबरोबर लोकांच्या हस्ताक्षराचे नमुनेही गोळा करायला सुरवात केली आहे. ज्याने कोणी हा प्रकार केला आहे तो माणूस सापडला तर त्याची खैर नाही हे नक्की. एक प्रश्न पडतोच. उत्तर कोरियात किमच्या पक्षाकडे सर्वाधिकार असतील आणि किम म्हणेल तो कायदा असेल तर हे पक्षाचे लोक कोणावर तरी सूड उगवायला 'त्याचे हस्ताक्षर त्या ग्राफिटीमधील अक्षराप्रमाणे आहे' या नावावर एखाद्याला गायब करू शकत असतील का? हे सगळे पाहता भगवंताने आपल्याला अशा कोणत्या देशात जन्माला आणले नाही याबद्दल शतशः आभार मानावेसे वाटतात. आपण असे काही केले तर त्याचे नक्की परिणाम काय होणार याची पूर्ण कल्पना त्या माणसाला असूनही त्याने हे धाडस केले. म्हणजे किम जोंग उनच्या कम्युनिस्ट हुकुमशाहीत जिवंत राहण्यापेक्षा मेलेले परवडले असेच त्याला वाटत असणार ना? उत्तर कोरियातून बाहेर पडता येणे फार म्हणजे फारच कठिण आहे इतका कडक बंदोबस्त तिथल्या लष्कराने केला आहे. तरीही तिथून सीमेवरून दक्षिण कोरियात निसटायचा प्रयत्न करणारे आणि त्यात मरणारे लोक असतात. तीच गोष्ट बर्लिनची भिंत असतानाची. लोक आपला जीव धोक्यात घालून परिणामांची तमा न बाळगता कम्युनिस्ट राजवटींमधून निसटायचा प्रयत्न करत असतात आणि सामान्यांचे हे स्थलांतर नेहमी एकाच दिशेने होत असते. मानवी स्वातंत्र्य आणि अभिव्यक्तीचा कम्युनिझमइतका मोठा शत्रू मिळणे कठिण आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on Tue, 01/11/2022 - 12:18

In reply to पुन्हा एकदा उत्तर कोरिया by चंद्रसूर्यकुमार

Permalink

साम्यवाद

१) दक्षिण कोरियातील अन्याय्य भांडवलशाहीला कंटाळून उत्तर कोरियात स्थलांतर का होत नाही? २) अमेरिकेतील अन्याय्य भांडवलशाहीला कंटाळून व्हेनेझुएला/क्युबामध्ये स्थलांतर का होत नाही? ३) जपानमधील अन्याय्य भांडवलशाहीला कंटाळून चीनमध्ये स्थलांतर का होत नाही? ४) मध्य व पश्चिम युरोपातील अन्याय्य भांडवलशाहीला कंटाळून रशियात स्थलांतर का होत नाही? ५) साम्यवादात हुकुमशाही का असावी लागते? हुकुमशाहीशिवाय साम्यवाद असं एखादं उदाहरण आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Tue, 01/11/2022 - 12:24

In reply to साम्यवाद by तुषार काळभोर

Permalink

सर्व साम्यवादी लोकांना....

एकतर, चीन मध्ये पाठवावे किंवा उत्तर कोरियात...
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Tue, 01/11/2022 - 17:21

In reply to साम्यवाद by तुषार काळभोर

Permalink

हो

Image removed.
साम्यवादात हुकुमशाही का असावी लागते?
त्याचे कारण साम्यवाद हा मानवी स्वभावाला अनुसरून नसल्याने जर कोणत्याही बंधन-जबरदस्तीशिवाय साम्यवाद प्रत्यक्षात येऊ शकत नाही. याविषयी मागे कधीतरी मिपावर लिहिले होते. पण ती लिंक आता मिळत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Tue, 01/11/2022 - 13:37

Permalink

जावेद अख्तर यांचा मोदींना टोला; म्हणाले, “काल्पनिक धोक्याबद्दल..

जावेद अख्तर यांचा मोदींना टोला; म्हणाले, “काल्पनिक धोक्याबद्दल राष्ट्रपतींसोबत चर्चा केली पण २० कोटी…” https://www.loksatta.com/desh-videsh/javed-akhtar-calls-prime-minister-narendra-modi-security-lapse-an-imaginary-threat-scsg-91-2756089/lite/ ----- त्या प्रकरणा बाबत, कोर्टात केस सुरू आहे... पण, काही मुलभूत प्रश्र्न ... 1. काश्मीरी पंडितांना, जबरदस्तीने हुसकावून लावले, त्या बद्दल, हे कधी बोलले आहेत का? 2. अमरावती दंगली बाबत काही बोलले आहेत का? 3. गेला बाजार, ओवेसीने जेंव्हा, 100 कोटी गैर मुस्लिम लोकांना मारण्याची धमकी दिली, तेंव्हा हे काही बोलले आहेत का? 4. नुकतेच, रायगडावर, मजारीचा मामला झाला, त्या बद्दल हे काही बोलले आहेत का? ------ डाॅन मधला एक उत्तम डायलाॅग आहे, त्याच धर्तीवर मनांत विचार येतो की, हिंदू लोकांना भाजप शिवाय पर्याय नाही हे पटेल तेंव्हा पटेल, पण भाजप आला तर हिंदू लोकं उपेक्षित राहणार नाहीत, हे काही अशिक्षित हिंदू हितवादी लोकांना नक्कीच पटलेले आहे... भाजपात, मोदी, योगी, तेजस्वी सुर्या, अशी खरोखरच बाहुबली मंडळी नक्कीच आहेत...
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Tue, 01/11/2022 - 13:58

Permalink

भारतातील सर्वात मोठ्या ‘मावळ्या’कडून मुंबईतील पहिल्या २ किमी बोग

भारतातील सर्वात मोठ्या ‘मावळ्या’कडून मुंबईतील पहिल्या २ किमी बोगद्याचं काम पूर्ण, मुख्यमंत्र्यांकडून शाबासकी... https://www.loksatta.com/mumbai/cm-uddhav-thackeray-on-excavation-of-the-first-tunnel-of-mumbai-coastal-road-project-pbs-91-2755430/lite/ ----- अतिशय उत्तम काम ....
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Tue, 01/11/2022 - 14:10

Permalink

उर्वरीत सहा राफेल लढाऊ विमाने लवकरच वायूदलात दाखल होणार..

उर्वरीत सहा राफेल लढाऊ विमाने लवकरच वायूदलात दाखल होणार, शेवटची तीन असणार आणखी अत्याधुनिक https://www.loksatta.com/desh-videsh/the-last-three-rafale-that-will-join-the-indian-air-force-will-be-more-modern-than-others-asj-82-2756421/ ------ संरक्षणा बाबतीत, भाजप सरकार, योग्य तेच करत आहे... J 10C आणि राफेल, यांच्यातील, फरक आणि साम्ये, कुणी सांगीतले तर उत्तम...
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Tue, 01/11/2022 - 14:54

In reply to उर्वरीत सहा राफेल लढाऊ विमाने लवकरच वायूदलात दाखल होणार.. by मुक्त विहारि

Permalink

नौदलाला मोठं यश! सुपरसॉनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

https://www.esakal.com/desh/big-success-for-navy-successful-test-of-supersonic-brahmos-missile-marathi-news-jpd93 ------ भाजप सरकारच्या काळांत, संरक्षणदल अधिकाधिक सक्षम होत चालले आहे...
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com