Skip to main content

ताज्या घडामोडी- जानेवारी २०२२ (भाग २)

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी शनिवार, 08/01/2022 18:06 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे. निवडणुक आयोगाने पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशात १०, १४, २०, २३, २७ फेब्रुवारी आणि ३ आणि ७ मार्चला ७ टप्प्यात मतदान होणार आहे. पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यात १४ फेब्रुवारीला तर मणीपूरमध्ये २७ फेब्रुवारी आणि ३ मार्चला दोन टप्प्यात मतदान होणार आहे. मतमोजणी गुरूवार १० मार्चला होणार आहे. कोरोनाच्या वाढत्या आकड्यांच्या पार्श्वभूमीवर सध्या १५ जानेवारीपर्यंत रोड शो, प्रचारसभांना बंदी असेल. तसेच मतदानकेंद्रांची संख्या वाढवून मतदारांची गर्दी कमी करण्याचा प्रयत्न असेल. प्रत्येक मतदानकेंद्रावर सॅनिटायझर, थर्मल गन वगैरे गोष्टी असतील. मतदानाची वेळ एक तासाने वाढविण्यात आली आहे. जर मतदाराचे अंगाचे तपमान जास्त आढळल्यास त्या मतदाराला टोकन दिले जाऊन शेवटच्या एक तासात मतदानासाठी परत बोलावले जाईल. ज्येष्ठ नागरीक, अपंग आणि कोविड रूग्णांना पोस्टाने मतदान करायची परवानगी दिली गेली आहे. मतमोजणीनंतर विजयी उमेदवाराला विजययात्रा काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. https://timesofindia.indiatimes.com/india/covid-protocols-for-assembly-…

वाचने 47849
प्रतिक्रिया 172

प्रतिक्रिया

In reply to by चंद्रसूर्यकुमार

मंत्री/आमदार आता ६ झाले आहेत असे फ्रीप्रेसच्या बातमीत म्हटले आहे. ह्या सहा जणांपैकी, मौर्य व चौहान हे बाहेरून भाजपांत गेल्या काही वर्षांत आले होते, असेही ही बातमी नमूद करते. इतर चौघांच्या बाबतीत असे काही त्या बातमीत तरी म्हटलेले नाही. इतरस्त्र ह्याविषयी संदिग्धताच दिसते, हे मुख्य प्रवाहांतील मीडियाच्या अलिकडच्या गुणधर्माशी साजेसेच वर्तन आहे. मौर्य प्रभृतींनाही, भाजप ओबीसीसाठी काहीच करत नसल्याचा साक्षात्कार आताच होणे हेही विलक्षणच--- किंवा, सध्याच्या वातावरणात, नाहीच.

In reply to by प्रदीप

वरील प्रतिसाद लिहील्यावर लगेच पाहिले तर अजून एक, सातवे आमदार, मुकेश वर्मा ह्यांनीही भाजपचा त्याग केलेला आहे, असे समजले. अर्थात, मुख्य प्रवाहांतील मीडिया अधिक काही सांगण्यास तयार नाही. पण हे संस्थळ सर्व आमदार/ खासदारांविषयी काही माहिती देते. त्यावरून मिळालेली माहिती अशी की... Mukesh Varma 2012 BSP Swamy Prasad Maurya 2021 BSP Brijesh Kumar Prajapati ?? Bhagawati Prasad 2007 BSP Vinay Shakya 2009 BSP (LS election candidate) Roshan Lal Verma 2021 BSP Dara Singh Chauhan 2014 BSP (LS election candidate) (वरील साल व पक्ष, सदर व्यक्तिंच्या ह्याअगोदरच्या निवडणूकीची माहिती देतात). म्हणजे ह्या सातांपैकी किमान सहाजण तरी पूर्वाश्रमीचे बसपाचे सभासद होते.

In reply to by प्रदीप

एका अर्थी असे बाहेरून आलेले लोक जात आहेत हे चांगलेच आहे. असे महाराष्ट्रातही व्हावे आणि राष्ट्रवादीमधून घाऊक प्रमाणावर आलेले लोक परत स्वगृही जावेत ही इच्छा आणि अपेक्षा.

केजरीवाल कालपरवापर्यंत कोव्हिड्ग्रस्त असल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्या पाश्वभूमीवर हा व्हिडीयो भयानक वाटतो-- साहेब गर्दीत मास्क खाली करून खोकताहेत. अर्थात सर्वकाही लोकांना फुकटात द्यायचे ह्या त्यांच्या धोरणाशी हे सुसंगतच आहे, म्हणायचे!

रायगड, लोहगड आता कुलाबा किल्ला! बांधले थडगे, अंथरली हिरवी चादर… https://marathi.hindusthanpost.com/special/lohgad-fort-raigad-fort-shri… ------- ही गोष्ट खरी आहे का?

https://youtu.be/Lsf-94UlThY स्टिंग ऑपरेशन. आता हे सिद्ध समजायला हरकत नाही की PM ना थांबवणे आणि त्यांच्या सभांना जाणारी गर्दी रोखणे हा एक कट होता. पंजाब सरकार बरखास्त करून राष्ट्रपती शासन लागू करून कट करणाऱ्यांची मुंडी उडवणे हा सर्वात समर्पक मार्ग असेल.

आम आदमी पार्टीने पंजाबचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असावा यासाठी लोकांची मते मागवली आहेत. त्यासाठी ७०७४८६०७४८ या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा असे आवाहन केले आहे. मिस्ड कॉल देऊन त्यातून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असावा हे कॉल करणार्‍याचे मत कसे काय कळणार आहे काय माहित. २०१३ मध्ये केजरीवाल पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हाही लोकांकडून मिस्ड कॉल घेऊन काँग्रेसचा पाठिंबा घ्यावा की नाही याविषयी मते मागवली गेली होती. सामान्य माणसाला न समजणार्‍या गोष्टी नेत्याला समजल्या पाहिजेत. तेव्हा नेत्याने सामान्य लोकांनाच विचारून आपली पावले उचलली तर त्याला काय अर्थ राहिला?

सोमवारी, तामिळनाडू सरकारने वरधराजपुरममधील चेन्नईतील श्री नरसिंह अंजनेयर स्वामी मंदिर पाडले आहे. स्तालिन हा हिंदू विरोधी आहे सतत दिसून आले आहे. या आधीही मुतननकुलम या तलावाच्या काठावर असलेले १२५ वर्षे जुने मंदिर त्याने पाडले होते. एमके स्टॅलिन यांनी तामिळनाडूमध्ये राज्याचे मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर मंदिर पाडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याच सरकारने कोविड प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे कारण देत पोंगल सारख्या हिंदू सणाच्या कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. मात्र अशी बंदी इतर कोणत्याही धर्माच्या कार्यक्रमांवर घातली गेली नाही.

In reply to by निनाद

जयललितांनी वाजपेयींना त्रास दिला होता म्हणून भाजप समर्थकांना अण्णा द्रमुकपेक्षा द्रमुक त्यातल्या त्यात बरा वाटतो असे अनेकदा बघितले आहे. पण रामचंद्रन आणि जयललिता या दोघांनीही असले प्रकार केले नव्हते. भाजप आणि द्रमुक यांच्यात मुळातच विचारांमध्ये हा फरक आहे. त्यामुळे वाजपेयींच्या सरकारमध्ये द्रमुक सहभागी असला तरी दोन्ही पक्ष एकमेकांबरोबर फार गुण्यागोविंदाने नांदत होते असे नक्कीच नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

महाराष्ट्रात जसा भाजपाला (जर गरज लागलीच तर...) इतर कोणाही पेक्षा शिवसेना हा जास्त सहज, सोयिस्कर सहकारी पक्ष आहे, तसा तमीळनाडूत (गरज आहेच..) अण्णा द्रमुक हा जास्त सहज आणि सोयिस्कर पक्ष आहे. द्रमुकचं कडवं द्रविडपण आणि कडवा उच्चवर्णीय हिन्दूविरोध भाजपाला मानवणारा आणि सोसवणारा नाही.

तुम्ही बलात्कारी, गुन्हेगारांना तिकीट देतात, मग मला का नाही? उत्पल पर्रीकर यांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल https://www.tv9marathi.com/elections/goa-assembly-election-2022/goa-ass… ------ घरचा अहेर मिळाला... भाजपने, ह्यातून योग्य तो धडा नक्कीच घ्यावा, ही अपेक्षा .... स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार देणे, इतपतच अपेक्षा आहे...

In reply to by मुक्त विहारि

२०१४ मध्ये मनोहर पर्रीकर केंद्रात संरक्षणमंत्री म्हणून गेल्यावर त्यांनी पणजी या विधानसभा जागेच्या आमदारपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर तिथे पोटनिवडणुक झाली त्यात भाजपचे सिध्दार्थ कुंकळीणकर निवडून आले. त्या जागेवर उमेदवार म्हणून सिध्दार्थ कुंकळीणकर यांची निवड स्वतः मनोहर पर्रीकरांनी आपल्या कार्यकर्त्यांमधून केली होती. तेच २०१७ मध्ये विधानसभा निवडणुकांमध्येही जिंकले. २०१७ मध्ये मनोहर पर्रीकर गोव्याला मुख्यमंत्री म्हणून परत आले त्यानंतर त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन जागा परीकरांसाठी मोकळी केली होती. उत्पल पर्रीकरांना ते मनोहर पर्रीकरांचे पुत्र या एकाच कारणाने उमेदवारी दिली जायला नको हे मान्य. पण मागे म्हटल्याप्रमाणे बाबूश मोन्सेराटपेक्षा ते कधीही कितीतरी पटींनी चांगले उमेदवार ठरतील. पक्षासाठी काम केलेला उमेदवार हवा असेल तर मग या सिध्दार्थ कुंकळीणकरांचे नाव का डावलले जात आहे हे पण समजायला मार्ग नाही. बाबूश मोन्सेराट हा हरामखोर माणूस पक्षासाठी काम केलेल्या सिध्दार्थ कुंकळीणकरांपेक्षा चांगला उमेदवार वाटत असेल तर मग गोवा भाजप आत्मघाताकडे निघाला आहे हे नक्की.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

गोव्यातील तिकीट वाटप कोण बघतय माहिती नाही परंतु फडणवीस चांगल्या कार्यकत्यावर अन्याय करायला पटाईत आहेत. महाराष्ट्रात तावडे, बावनकुळे आणि खडसे यांची तिकिटे अशीच कापण्यात आली. खडसेवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत म्हणून तिकीट दिले नसेल हे एकवेळ मान्य केलं तरी राणे सारख्याच्याकघरात मात्र एकापेक्षा जास्त तिकिटे देण्यात आली.

In reply to by राघव

आत्ताच काही निर्णय घेतले तर उत्तम.... झूल अंगावर चढवता येते, पण कातडे आहे तसेच राहते. निवडून येणे ही पात्रता न बाळगता, निवडून नाही आलात तरी चालेल पण, धोरणे बदलणे अयोग्य. आमच्या पिढीने, शिवसेनेला विश्र्वासाने मतदान केले, पण आता शिवसेनेच्या हिंदूत्वावरचा विश्र्वास उडाला, भाजपच्या बाबतीत तरी ही गोष्ट व्हायला नको.

काल कोविडच्या परत बिघडत चाललेल्या परिस्थितीवर पंतप्रधान मोदींनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रकृतीच्या कारणामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्याऐवजी महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केले. नेहमीप्रमाणे वाचाळवील संजय राऊत यावर बोलले आहेत की मुख्यमंत्री त्या बैठकीला जाऊ शकले नाहीत म्हणून काय झाले? राज्यात सगळे काही सुरळीत चालू आहे. https://maharashtratimes.com/latest-news/india-news/there-is-no-issue-i… . एक गोष्ट समजत नाही. राज्यात सगळे सुरळीत चालू आहे, आम्ही खूप लोकप्रिय आहोत, आम्ही अमुक आहोत, आम्ही तमुक आहोत या सगळ्या गोष्टी दरवेळेस बोलून का दाखवाव्या लागतात? जर का खरोखरच सगळे सुरळीत चालू असेल किंवा हे खूप लोकप्रिय असतील तर ते अगदीच उघडपणे दिसेल. ते परत परत सांगावे का लागते? याविषयी ब्रिटनच्या माजी पंतप्रधान (ज्यांना iron lady असे म्हटले जायचे) मार्गारेट थॅचर यांचे एक वाक्य नेहमी आठवते- Being powerful is like being a woman. If you have to tell you are, you are not.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सतत एकच धोषा लावायचा .... अर्थात, कितीही धोषा लावला तरी, निवृत्त नौसैनिकाला शिवसैनिकांनी मारहाण केली, ही छापील बातमी, मिटवू शकत नाहीत...

दारु पार्टी प्रकरण बोरिस जॉन्सन यांना भोवणार? भारतीय वंशाचा ‘हा’ नेता ब्रिटीश पंतप्रधान होण्याची दाट शक्यता https://www.loksatta.com/desh-videsh/odds-favour-indian-origin-rishi-su… -------- ही खरी लोकशाही .... आपल्या देशांत, मास्क न लावता, लग्न कार्ये देखील होऊ शकतात, आणि नेते तर, लग्नात कितीही मंडळी बोलावू शकतात, असे होण्याची शक्यता आहे.... /strong> ------ ब्रिटन मध्ये, घराणेशाही नाही, ही बातमी म्हणजे, ह्याचा उत्तम पुरावा आहे...

उत्तरप्रदेशातली निवडणूक रंगणार असे चित्र दिसायला लागले आहे. सद्य सरकारातल्या आत्तापर्यंत दोन मंत्री आणि आठ आमदारांनी राजीनामे दिले आहेत. योगी मंत्रीमंडळातील केबीनेट मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी राजीनामा देऊन ट्वीट करुन ”नाग रूपी आरएसएस एवं सांप रूपी भाजपा को स्वामी रूपी नेवला यू.पी. से खत्म करके ही दम लेगा” सध्या खळबळ उडवून दिलेली आहे. गेले दोन तीन दिवस भाजपा सोडून बाहेर पडणा-या नेते कार्यकर्त्यांच्या बातम्या येत आहेत. स्वामी प्रसार मौर्य हे मोठ्या संखेने सपात दाखल होतील असे वाटलेले नव्हते, असे अखिलेश यादव यांनी म्हटलेले आहे, आम्ही चारशे जागा जिंकु असा दावा केला आहे अर्थात निवडणुका म्हटले की दावे वगैरे करणे चालूच राहील. पण, भाजपावर किती परिणाम होईल हा प्रश्न महत्वाचा आहे. मला व्यक्तीगत वाटते की फ़ार परिणाम होणार नाही. जागा निश्चित कमी होतील परंतु सरकार बनवता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण होणार नाही अर्थात लोकशाही आहे, लोक होत्याचं नव्हते करायला फ़ार वेळ घेत नाही. केंद्रीय नेतृत्त्वावर याचा किती परिणाम होईल. तिकडेही मंत्रीमंडळात अनेकांचा जी गुदमरत असणार आहेच परंतु सध्या कोणी बाहेर पडणार नाही. कदाचित निवडणुका जवळ आल्यावर असे परिणाम तिकडेही होऊ शकतो. -दिलीप बिरुटे

कोविड नियमांचे उल्लंघन ; अडीच हजार ‘सपा’ कार्यकर्त्यांविरोधात FIR दाखल https://www.loksatta.com/elections/uttar-pradesh-election-fir-filed-aga… ------- कोविड-१९ प्रकरणांमध्ये नव्याने वाढ झाल्याचे कारण देत निवडणूक आयोगाने १५ जानेवारीपर्यंत पाच निवडणूक राज्यांमध्ये सार्वजनिक रॅली, रोड शो आणि सभांवर बंदी घातली आहे. त्याचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचे आदेशही दिले आहेत. यामुळेच निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार यूपी पोलिसांनी हे गुन्हे दाखल केले आहेत.

काळजाचा ठोका चुकवणारे थरारनाट्य; मंडळ अधिकारी, तलाठ्याच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न https://www.tv9marathi.com/maharashtra/other-district/nandurbarattempt-… -------- ह्या राजवटीत, सरकारी अधिकारी वर्गावर हल्ले चालूच आहेत. ठाण्यात देखील, एका पालिका कर्मचारीवर हल्ला झाला होता. --------

महाराष्ट्रातील १२ आमदारांचे निलंबन सुप्रीम कोर्ट उठवणार अशी चिन्हे दिसत आहेत. ६० दिवसांपेक्षा जास्त दिवसांचे निलंबन योग्य नसल्याची टिपण्णी सुप्रिम कोर्टाने केलेली आहे. यावर सरकारी वकिलांनी आपला युक्तिवाद लागलीच आवरता घेऊन, सरकारशी सल्लामसलत करण्यासाठी मुदत मागून घेतली. येत्या मंगळवारी कोर्टात सुनावणी आहे. जर कोर्टाने निलंबन उठवले तर मात्र सरकारची नव्हे तर महाराष्ट्र विधानसभेची नाचक्की होईल. कारण अधिवेशन चालू नसल्याने अध्यक्ष निलंबन रद्द करू शकत नाहीत व चूक सुधारू शकत नाहीत. सुप्रिम कोर्टाला विधानसभा अध्यक्षाच्या अधिकारांमधे ढवळाढवळ करायला निमित्त मिळाल्यामुळे संबंधीत तालिका अध्यक्षांचे नाव अजरामर होणार हे नक्की. कारण हा निर्णय आता पायाभूत निर्णय म्हणून समजला जाण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूर शहर मतदारसंघातून निवडणुक लढविणार आहेत. भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहिर केली त्यात हा उल्लेख आहे. आतापर्यंत योगी अयोध्येतून निवडणुक लढवतील असे म्हटले जात होते. नेहमीप्रमाणे संजय राऊत यांनी 'योगींविरोधात आम्ही अयोध्येत उमेदवार देऊ' असे म्हटले. पण योगी आपल्या शहरातून- गोरखपूरमधूनच निवडणुक लढवणार आहेत. समाजवादी पक्षाकडून अखिलेश यादव मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील हे नक्कीच आहे. पण ते विधानसभा निवडणुक लढविणार नाहीत. बसपा सत्तेत आल्यास मायावतीच मुख्यमंत्री होणार हे पण वेगळे सांगायला नको. पण या बबुआ आणि बुआंपैकी कोणीच निवडणुक लढविणार नाहीये. काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ही चर्चाच निरर्थक आणि हास्यास्पद आहे त्यामुळे तो प्रश्नच उभा राहत नाही. विधानसभा निवडणुकांमध्ये एक चेहरा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून पुढे आणला जातो तेव्हा त्याने निवडणुक लढवायला नको का? हे नितीशकुमारांविषयी पण लागू आहे आणि २००९ मध्ये मनमोहनसिंगांविषयीही तितकेच लागू आहे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

संजय राऊत याना त्यांच्या घरात तरी कोणी सिरियसली घेत असतील की नाही शंका आहे

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

तरीही महाराष्ट्र राज्यपातळीवर संजय राऊत माझे सगळ्यात आवडते नेते आहेत. अखंडपणे गुडघ्यातले बोलून खरं तर बरळून कित्येक मते ते आपल्या बाजूला वळवत असतील. केंद्रीय पातळीवर मणीशंकर अय्यर याच कारणाने माझे सगळ्यात आवडते नेते आहेत. महाराष्ट्रात राऊतांच्या खालोखाल नाना पटोले आवडतात.

https://timesofindia.indiatimes.com/india/india-bags-order-from-philipp… भारताची एक शस्र आयातदार देश अशी ओळख जाउन आता शस्र आयातदार/ निर्यातदार अशी होइल. एके काळी सैन्याला दारुगोळा मिळवण्यासाठी सरकार कडे भीक मागावी लागत असे. सरकार कडे पैसे नाही हे कारण देऊन अनेक वर्षे सैन्याचे अधुनिकिकरण थांबवले गेले होते. त्या अनुशंगाने आता हा बदल नक्कीच सुखावणारा आहे ...

पाकिस्तानची पहिलीवहिली Security Policy जाहीर, हिंदुत्व हा देशासाठी धोका असल्याचा दावा ------- आता उदारमतवादी हिंदू काय मत व्यक्त करणार? राजा जयचंदच्या चुकीचे परिणाम, आत्ता दिसायला लागले. मी तरी, राजा जयचंदच्या पावला वर पाऊल टाकणार नाही...

शेतीमालाच्या दराला उतरती कळा, त्यात व्यापाऱ्यांचा अजब कारभार, नेमके काय झाले खामगाव बाजार समितीमध्ये? https://www.tv9marathi.com/agriculture/irregularities-in-auction-by-tra… असे होऊ नये, यासाठीच, भाजपने शेतकरी वर्गाला हितकारक, असे कायदे आणले होते. आता, महाराष्ट्र सरकार, शेतकरी वर्गासाठी, काय उपाय योजना करणार? हे बघणे रोचक ठरेल...

पणजी विधानसभा मतदारसंघात भाजपने बाबूश मोन्सराट या हरामखोराला उमेदवारी दिली आहे. पक्षाच्या या निर्णयाचा निषेध. जर उत्पल पर्रीकर अपक्ष म्हणून उभे राहणार असतील आणि मुख्य म्हणजे शिवसेनेशी काही संबंध नसेल तर पणजीतल्या लोकांनी त्याला मत द्यावे असे वाटते.

In reply to by मुक्त विहारि

पक्षाचाच निषेध. अजूनही काही लोकांचे डोळे ऊघडलेले नाहीत.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

उडदामाजी काळेगोरे असणारच पण, कॉंग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांपेक्षा, हिंदू हितवादी भाजप, मला तरी आवडते.... बाय द वे, नौसैनिकाला मारहाण केली, त्या पक्षा बद्दल, तुमची भुमिका काय आहे? सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण केली, त्या पक्षा बद्दल तुमची भुमिका काय आहे? हिंदू माणसाला जीवे मारण्याची धमकी दिली, त्या पक्षा बद्दल तुमची भुमिका काय आहे? असो, घराणेशाहीचा उदो उदो करण्यापेक्षा, थोडेफार वाचन करावे, हे उत्तम. चला आता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा, इतिहास वाचायला घेतो..

In reply to by अमरेंद्र बाहुबली

‘ही शिवसेना नव्हे, ही तर काँग्रेस सेना’ शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यावरुन राजकारण तापलं! https://www.tv9marathi.com/politics/amaravati-mla-ravi-rana-criticises-… ही अशी भिजत घोंगडी ठेवण्यापेक्षा, आधीच योग्य तो निर्णय द्यायला हवा होता... बाबरी मस्जिद पाडली कुणी? आणि श्रेय कुणी उपटले? आपण, एका रुपयांत मिळणारी, झुणकाभाकर पचवली नसल्याने, आपल्याला असे प्रश्र्न पडणार नाहीत.

In reply to by मुक्त विहारि

बेकायदेशीर पुतळा असेल तर हटवण्यास काय हरकत आहे?
‘ही शिवसेना नव्हे, ही तर काँग्रेस सेना’ शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यावरुन राजकारण तापलं!

In reply to by Trump

पण, हे स्पष्टीकरण शासनाकडून वेळीच अपेक्षित होते. म्हणून तर म्हणालो की, भिजत घोंगडी ठेवू नयेत.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

बाबूश मोन्सराट यांना उमेदवारी देणे चुकीचे असेल पण उत्पल यांनी केवळ आपण " मनोहरांचे पुत्र म्हणुन उमेदवारी द्या" हा हट्ट धरणे चुकीचे आहे? मग काँगेस आणि भाजपात फरक तो काय ?

In reply to by चौकस२१२

नक्कीच. याविषयी वर लिहिलेच आहे. मनोहर पर्रीकरांचे पुत्र हे एकमेव क्वालिफिकेशन असेल तर उत्पलना उमेदवारी द्यायला नको. पण सध्या भाजपने पणजीमध्ये ज्याला उमेदवारी दिली आहे तो मनुष्य गुंड आहे. बलात्कारापासून अनेक आरोप त्याच्या नावावर आहेत. असल्या हरामखोराला उमेदवारी का द्यायची आहे? आणि तो मुळचा भाजपचा थोडीच आहे? काँग्रेसमधून उचलून त्याला पक्षात घेऊन गळ्यातले लोढणे घेतले आहे. त्याच्यापेक्षा उत्पल नक्कीच चांगले उमेदवार नाहीत का?हा फरक आहे. जर पक्षाने बाबूश मोन्सेराटला उमेदवारी न देता सिध्दार्थ कुंकळीणकरसारख्या पक्षासाठी काम केलेल्याला, मनोहर पर्रीकरांनी आपल्या विधानसभा जागेवर उमेदवार म्हणून आपल्या कार्यकर्त्यांमधून निवडलेल्याला उमेदवारी दिली असती तर मी पण उत्पलचा दावा अयोग्य आहे असेच म्हटले असते आणि तो एक बंडखोर असेच म्हटले असते. पण बाबूश मोन्सेराटसारखा हलकट माणसाला उमेदवारी देणे पक्षाचा समर्थक म्हणून मला आणि माझ्यासारख्या अनेकांना मान्य नाही हे नक्कीच. त्याच्यापेक्षा स्वच्छ चारित्र्याचा कोणीही उमेदवार चालेल.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

आणि त्यातही उत्पल जर शिवसेनेत गेले किंवा अपक्ष उमेदवार म्हणून लढत असताना शिवसेनेची कोणतीही मदत घेतली तर मात्र त्यांच्याविषयी असलेली सद्भावना पूर्ण संपेल. आता जी काही थोडीफार सद्भावना (आदर नव्हे) त्यांच्याविषयी आहे ते मनोहर पर्रीकरांचे पुत्र म्हणून आहे. तेच मनोहर पर्रीकर हयात असताना संजय राऊतांनी (आणि उद्धव ठाकरेंनी सुध्दा) त्यांच्याविषयी सामनामधून गटारगंगा वाहिली होती हे पण वर लिहिलेच आहे. एखादा माणूस हयात असताना त्याला शिव्या घालायच्या आणि गेल्यावर मात्र 'तो कित्ती कित्ती चांगला होता' म्हणून गळे काढायचे हे ढोंग आहे. अपेक्षेप्रमाणे राऊत आणि ठाकरे ते करत आहेत. अशा शिवसेनेचा पाठिंबा/मदत उत्पलनी घेतली तर मात्र ती सद्भावना पूर्ण जाईल. शेवटी माझ्यासारख्यांना मनोहर पर्रीकरांना आदर द्यावासा वाटतो. तो त्यांच्या मुलाला आपोआप मिळणार नाही. आणि स्व.मनोहर पर्रीकरांना शिव्या घालणार्‍यांच्याच बरोबर त्यांचे पुत्र गेले तर मग इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा या न्यायाने उत्पलही मनोहर पर्रीकरांविषयी आदर वाटणार्‍यांच्या रोषाचे धनी ठरतील हे पण तितकेच खरे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

बाबूश मोन्सराट या अत्यंत हलकट आणि नराधमाबद्दल आठ, दहा वर्षांपूर्वीच ऐकले होते. गोव्यात पणजी, पर्वरी, फोंडा, मडगाव येथे नातेवाईक आहेत आणि सगळ्यांकडून मोन्सराटला खच्चून शिव्या घालताना ऐकले आहे. भाजपाने ही घाण घेऊन वर उमेदवारी पण दिली. अवघड आहे

पूलाच्या उद्घाटन प्रसंगी सेना-राष्ट्रवादी संघर्ष चव्हाट्यावर; NCP कडून ‘जितेंद्र आव्हाड आगे बढो’च्या घोषणा तर सेनेकडून… https://www.loksatta.com/thane/shivsena-vs-ncp-verbal-fight-during-igno… ----- ये तो होना ही था ....

एलॉन मस्कला आपापल्या राज्यात येण्याची आमंत्रणे अनेक मंत्र्यांनी दिली आहे. प. बंगाल सुद्धा मागे नाही !em

In reply to by बोका

मस्त . . . हे राजकारणी लोक काय खाउन इतके मस्त खोटे बोलतात काय माहीत. हीच व्हिजन (म्हणजे दीदी ची व्हिजन) टाटा चा प्लांट टाकायच्या वेळेस कुठे गेली होती? "बेन्गाल मीन्स बिझिनेस्स" हे पन लय भारी . . . ह ह पु वा.

Texas Attack: १० तासांच्या थरारनाट्यानंतर सिनेगॉगमधील ओलिसांची मुक्तता, हल्लेखोर ठार https://maharashtratimes.com/international/international-news/us-news-s… ------- पाकिस्तानी वंशाची अमेरिकी मेंदूतज्ज्ञ आफिया सिद्दीकी हिच्या सुटकेसाठी हल्लेखोराने हा हल्ला केला होता, अशी मागणी हल्लेखोराने केली होती. हल्लेखोराचे नाव महंमद सिद्दीकी होते, असे वृत्त 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वेबसाइटने दिले आहे. आफिया सिद्दीकी मूळची पाकिस्तानी नागरिक आहे. तिने बोस्टनमधून मास्टर्स आणि पीएच डी मिळ‌वली आहे. अल् कायदाशी संबंध असल्याच्या आरोपावरून तिला अफगाणिस्तानातील गझनी प्रांतात २००८मध्ये अटक करण्यात आली होती. तिला 'लेडी अल् कायदा' नावाने ओळखले जाते.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गोव्यात घरोघरी जाऊन प्रचार करत असल्याबद्दल श्री.रा.रा संजय राऊतांनी त्यांच्यावर टीका केली. त्यावर 'आम्ही काय करावे हे संजय राऊतांनी सांगायची गरज नाही. त्यांनी आपल्या पक्षाचे बघावे' असे प्रत्युत्तर केजरीवालांनी दिले. एक गोष्ट कळत नाही. आपण काय करावे हे न बघता इतर सगळ्या जगाने काय करावे हे सांगण्यात संजय राऊत एकदम तज्ञ आहेत. मला स्वतःला केजरीवाल हा मनुष्य अजिबात म्हणजे अजिबात आवडत नाही. गेल्या ७-८ वर्षात मिपावर मी ते वेळोवेळी लिहिलेही आहे. तरीही कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना स्वतः पक्ष शून्यातून उभा करणे आणि दिल्लीत दोनदा विधानसभा निवडणुक अगदी दणक्यात जिंकणे ही गोष्ट त्यांनी साध्य केली आहे. त्यांचे हे श्रेय कोणीच नाकारू शकत नाही. शिवसेनेने स्वबळावर मुंबई महापालिकेतही एकदाही बहुमत मिळवलेले नाही आणि निघालेत दिल्लीत ९०% विधानसभा जागा जिंकणार्‍याने काय करावे हे सांगायला. स्वयंभू असलेला कोणताही नेता एकाबरोबर युती करायची, त्याच्या नावावर आमदार निवडून आणायचे आणि मग सत्तेसाठी विरूध्द बाजूला जायचे असले आयत्या बिळातील नागोबाप्रमाणे प्रकार करणार्‍या ठाकरे आणि संजय राऊत या उपटसुंभांना हिंग लाऊनही विचारणार नाही हे अगदी समजण्यासारखे आहे. जे काही असेल ते. मला आप आवडत नाही आणि शिवसेना तर त्याहूनही आवडत नाही. तरीही हे सगळे विरोधी पक्ष आपापसात लहानसहान कारणाने भांडत आहेत आणि २०२४ मध्ये मात्र मोदींविरोधी सगळ्या विरोधी पक्षांची मोठी आघाडी बनणार अशा गोष्टी चालू आहेत.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

बर आहे या फुकटातल्या करमणुकीवर कर नाही भरावा लागत ते. राउतराव अजुन इम्रान खानला कसे काही शिकवायला गेले नाहीत?

संत रविदास जयंतीनिमित्ताने पंजाबमधील अनेक मतदार बाहेर असल्याने १४ फेब्रुवारी ही मतदानाची तारीख बदलायची मागणी होत होती. तशी मागणी सगळ्याच पक्षांनी केली होती. त्याप्रमाणे निवडणुक आयोगाने ती मागणी मान्य करून मतदान १४ ऐवजी २० फेब्रुवारीला घेण्यात येईल अशी घोषणा केली आहे.

मुंबई महापालिकेतील प्रभागांची संख्या २२७ वरून २३६ करायचा राज्य सरकारने डिसेंबर महिन्यात निर्णय घेतला होता. त्याविरोधात भाजप नगरसेवक कोर्टात गेले होते. मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे त्यामुळे आता मुंबई महापालिकेत २३६ प्रभाग असतील. त्यामुळे प्रभागांच्या सीमांची पुनर्रचना करावी लागेल. त्यासाठी राज्य सरकारने कसलेही काम चालू केले आहे (कुठली समिती/कमिशन नेमले आहे) अशाप्रकारची बातमी मी तरी वाचलेली नाही. तेव्हा यापुढे ते काम सुरू झाले तरी नागरिकांच्या सूचना/अभिप्राय/मते वगैरे मिळून काम पूर्ण करायला महिना दीड महिनाही गेला तरी आश्चर्य वाटू नये. मग या प्रभागांच्या सीमांविरोधात कोणी कोर्टात गेल्यास महाविकास आघाडी सरकारसाठी अगदी सोन्याहूनही पिवळे. कारण मग त्या परिस्थितीत मुंबई महापालिका निवडणुक टाळायचे कारण मिळेल. मग लवकरच पाऊस सुरू होईल त्यामुळे ऑक्टोबर-नोव्हेंबरशिवाय ही निवडणुक न घ्यायचे कारण मिळेल. सध्या ज्या प्रकारे कारभार आणि सगळ्या गोष्टी चालू आहेत त्यावरून आणि मुंबई महापालिकेत कित्येक वर्षे सत्ता असल्याने प्रस्थापितविरोधी मतांचा जोरदार फटका आपल्याला बसून शिवसेनेचा अभूतपूर्व पराभव होईल ही शक्यता नक्कीच असल्याने महाविकास आघाडी ही निवडणुक शक्य तेवढी लांबणीवर टाकायचा प्रयत्न करणार हे उघड आहे. जर प्रभागांची संख्या वाढवायची होती तर ते काम, हरकती वगैरे सगळ्या गोष्टी डिसेंबरपर्यंत पूर्ण होऊन मग वेळापत्रकाप्रमाणे फेब्रुवारीत निवडणुक घेण्याच्या दृष्टीने काम सुरू करणे शक्य होते. त्यासाठी मग हा प्रभागांची संख्या वाढवायचा निर्णय मे-जून किंवा फार तर जुलै महिन्यात घ्यायला लागला असता. तो तेव्हा न घेता डिसेंबरमध्ये घेतला याचाच अर्थ निवडणुका शक्य तितक्या लांबवायच्या हा महाविकास आघाडी सरकारचा उद्देश स्पष्ट दिसतच आहे. कोरोनाच्या वाढत्या आकड्यांचे निमित्त करून निवडणुक पुढे ढकलावी म्हणावे तर पाच राज्यात विधानसभा निवडणुक होत असल्याने आणि त्यात गोवा-युपीमध्ये शिवसेनाही मोठ्या उत्साहात सहभागी होणार असल्याने (तिथे त्यांना काळं कुत्रही विचारत नाही ही गोष्ट वेगळी) त्या कारणाने मुंबईतल्या निवडणुका पुढे कशा ढकलणार? तेव्हा हे आता प्रभागांच्या पुनर्रचनेचे काम आहे हे कारण आयते मिळाले आहे असे दिसते. या निवडणुका पावसाळा होण्यापूर्वी झाल्या तर आश्चर्य वाटेल. अर्थात या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलता येणार नाहीत. जर नेमेची येणार्‍या पावसाळ्यानंतर लगेच निवडणुक घ्यावी लागली तर सालाबादप्रमाणे पाणी तुंबणे वगैरे गोष्टी होऊन त्यामुळे मुंबईकरांना त्रास झाला तर तो त्रास आठवणीत अधिक ताजा असल्याने (फेब्रुवारीत निवडणुक झाली असती तेव्हा जितका असता त्या तुलनेत) त्याचा जास्त फटका शिवसेनेला बसायची शक्यता मात्र आहेच.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

भाजप सत्ते बाहेर राहील... महापौर शिवसेनेचा पण अधिकार मात्र, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस, यांच्याकडे राहतील ... येत्या विधानसभा आणि लोकसभेच्या साठी, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेनेला आत्ता चुचकारतील... भावी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान पदासाठी, महापौरपदाचे प्यादे बळी देतील... अर्थात, ह्याची सगळी भरपाई, विधानसभा आणि लोकसभेच्या वेळी, दोन्ही कॉंग्रेस, शिवसेनेकडून सव्याज वसूल करतील... शिवसेनेची धोरणे पसंत नाहीत, पण .... असे हाल व्हायला नकोत ... हिंदू की मराठी, ह्यात, माझा कल तरी हिंदू हितवादी असल्याने, भाजप शिवाय मला पर्याय नाही ... धर्म प्रथम ...

१९९६ बालहत्याकांडातील आरोपी सीमा आणि रेणुका गावित या बहिणींची फाशीची शिक्षा रद्द; ठाकरे सरकारवर ओढले ताशेरे https://www.loksatta.com/mumbai/mumbai-high-court-pronounce-judgement-o… ह्या राजवटीत, साधू हत्याकांड होते पण फाशीची शिक्षा झालेले सुटतात... कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष, जनतेच्या भल्यासाठी नाहीत .... हे माझे वैयक्तिक मत आहे....

In reply to by मुक्त विहारि

दयेच्या अर्जावर वेळेत निर्णय घेतला नसल्यामुळे फाशीची शिक्षा अमलात आणण्याची वेळ टळून गेली होती. थोडी सबुरी दाखवत चला आपले प्रेम व्यक्त करताना.

In reply to by सर टोबी

"मी पुन्हा येईन" वर विश्वास ठेवणाऱ्यांना पहाटेचा शपथविधी फियस्को झाल्यापासून तडफड होतेय बिजेपि समर्थकांची. चालायचेच. निचरा होणे गरजेचे.

In reply to by आग्या१९९०

आग्या चला होऊन जाऊद्या १) फडणवीस आणि भाजप ने तो पहाटेचा खेळ करून आपली पत/ इज्जत घालवली हे अगदी १००% मान्य - त्यामागचे कारण काही का असेना २) पण मग हे सांगा कि त्यात ५०% सहभागी असलेले माननीय अजितदादा यांना काय बरे शिक्षा मिळाली? स्वतःच्या पक्षाशी अशी जाहीर बेईमानी करून? पक्ष बदलणं हे वेगळे आणि असा चक्क खोटे पण करणे हे , वेगळे, एकवेळ राष्ठ्रवादीतच काकांना ना शह देऊन पक्षाची रणनीती जाहीर पने बदलली असती तरी समजले असते ( राष्ट्रीय मध्ये अंतर्गत लोकशाही आहे हे गृहीत धरलाय !) द्याल उत्तर ? हेच जर उद्य्या दुसऱ्या एखाद्या रुजलेलय लोकशाहीत कोणी एखाद्या वरिष्ठ नेत्याने केले असते तर त्यःची जवळ जवळ संपली असती ! का आपला "इमोशल हाय त्यो " म्हणून एका चॉकलेट मध्ये विषय संपवयाचा ! मी जर राष्ट्रवादी चा कार्यकर्ता असतो तर निश्चित जाब विचारला असता ! तुम्ही?

In reply to by चौकस२१२

त्यात ५०% सहभागी असलेले माननीय अजितदादा यांना काय बरे शिक्षा मिळाली? आपली ती सर्दी आणि दुसऱ्याचा करोना असतो साहेब जरा समजून घ्या कि.

In reply to by चौकस२१२

अशे प्रश्न विचारायचे नसतात चौकस२१२. अजितदादा म्हणजे अजितदादा आहेत. त्यांनी कुठलेही धंदे केले तरी ते कायम धुतल्या तांदळासारखे स्वच्छ असतात. अगदी अजितदादा पण मी कुठे काय केले वगेरे अभिर्भावात असतात. पहाटेचा तो शपथविधी कुठल्याही भाजप समर्थकाला पटला नव्हता. तशी नाराजी अगदी फडणवीसांपर्यंत गेली होती. फडणवीस यांनी पण ती चुक मान्य केली आहे. पण अजितदादा मात्र आपण त्या मंत्रीमंडळात उपमुख्यमंतत्री पदाची शपथ घेतली होती हे विसरुन त्यावर भाष्य करत असतात. त्यांच्या समर्थकांना ती एक खेळी वाटते. बाकी त्या घटने नंतर अजित पवार एक बिनभरवशाचा माणुस आहे, काकांपुढे त्याला काहीही किंमत नाही हेच अधिरेखित झाले. बाकी शिक्षा वगेरे मिथ आहे. त्यांना कुणी तिथे जबर्दस्ती आणले नव्हते. पण त्या पक्षात जाब विचारला की मार पडतो .. खुप उदाहरणे आहेत ... .

In reply to by चौकस२१२

मी जर राष्ट्रवादी चा कार्यकर्ता असतो तर निश्चित जाब विचारला असता ! तुम्ही? मीही राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नसल्याने जाब विचारू शकत नाही.

In reply to by सर टोबी

दयेच्या अर्जावर नक्की कोणी निर्णय घेतला नाही, कोर्टानुसार तर अमलबजावणी न झाल्यामुळें फाशी रद्द करून जन्मठेप केली आहे.

In reply to by सर टोबी

बातमी पुर्ण वाचल्यावर कळले की फाशीच्या अमल्बजावणील राज्य सरकारने विलम्ब लावला म्हणुन आरोपी बहीणी याचिका करु शकल्या. राज्य सरकारला राज्यपालान्चे अधिकार कमी करणे व त्यासाठी नियम बदलणे यासाठी वेळ आहे. घटनेनुसार राज्यपाल हे पद राज्यान्वर अन्कुश ठेवायला केले आहे. त्यातुन देशभर केन्द्र सरकारचा राज्य सरकारन्बरोबर समन्वय राहील आणी देश एकसन्ध राहील. जेव्हा राज्यपाल पद काढुन टाकावे असे राज्य सरकार म्हणतात तेव्हा ती मात्र घटनेची पायमल्ली नसते. सन्विधान धोक्यात नसते. कीती दुटप्पी राजकारण आहे हे. विरोधी पक्शाना केन्द्रात निवडुन न येण्याची एवढी खात्री आहे कि राज्यात निरन्कुश सत्ता मिळवायला आटापिटा चाललाय. पण भविष्यात केन्द्रात मोदी विरोधक आणि राज्यात भाजपा आली तर काय करणार?

In reply to by sunil kachure

मतप्रदर्शन करते आहे. पात्र नक्किच सच्चे आहे. इथे काही जणाना बरेच अवतार घेउन comments करायला यावे लागते आणि ते जास्त करुन मन्द गुलाम असतात.

पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटींची चौकशी करणाऱ्या न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांना धमकी गेल्या आठवड्यात पंतप्रधानांच्या सुरक्षेतबाबत कारवाईची मागणी करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयातील वकिलांना खलिस्तान समर्थकांकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. सुमारे डझनभर वकिलांनी धमकीचे फोन आल्याचा दावा केला. शिख फॉर जस्टिसच्या वतीने त्यांना इंग्लंडच्या क्रमांकावरून हे कॉल आले होते.... ------- कॉंग्रेसने केलेल्या चुकीचे परिणाम आहेत. घराणेशाहीचे समर्थन करणार्या, मतदारांना हे समजेलच असे नाही ...

मुंब्र्यात महापालिका सहाय्यक आयुक्तांवर फुटलेली काच घेऊन हल्ल्याचा प्रयत्न; आरोपी अद्याप मोकाट https://www.loksatta.com/thane/tmc-official-attacked-in-mumbra-sgy-87-t… ------ मुंब्रा स्थानक परिसरात सार्वजनिक रस्त्यावर मोहम्मद सलीम कुरेशी याने हा रस्ता त्याच्या मालकीचा असल्याचा दावा करत याठिकाणी पाण्याच्या टाक्यांचे अडथळे उभारले होते.... ह्याच राजवटीत, कल्पिता पिंपळे यांच्यावर देखील हल्ला झाला होता..... ---------