✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

ताज्या घडामोडी नोव्हेंबर २०२१- भाग २

च
चंद्रसूर्यकुमार यांनी
Wed, 11/17/2021 - 20:32  ·  लेख
लेख
आधीच्या भागात १५० प्रतिसाद झाल्यामुळे नवा भाग काढत आहे. गोव्यातील पोरी (Poriem) मतदारसंघातून २०१७ मध्ये माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणेंविरूध्द निवडणुक लढवून पराभूत झालेले भाजपचे विश्वजीत राणे यांनी भाजप सोडून आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. प्रतापसिंग राणेंच्या चिरंजीवांचे नावही विश्वजीतच आहे. ते भाजपमध्ये आहेत आणि राज्य सरकारमध्ये मंत्रीही आहेत. नामसाधर्म्यामुळे सुरवातीला वाटले होते की त्यांनीच आपमध्ये प्रवेश केला की काय. पण दुसर्‍या विश्वजीत राणेंनी पक्ष सोडला आहे. एकंदरीत गोव्यात भाजपचे तितके सोपे दिसत नाही. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा मान्द्रेमधून काँग्रेसच्या दयानंद सोपटे यांनी दणदणीत पराभव केला होता. २०१९ मध्ये जे काँग्रेसचे १० आमदार भाजपमध्ये सामील झाले त्यात हे दयानंद सोपटे होते. आता मान्द्रेमधून आपल्याला उमेदवारी मिळेल याची खात्री दयानंद सोपटेंना आहे तर लक्ष्मीकांत पार्सेकर सुध्दा आपला दावा सोडायला तयार नाहीत असे दिसते. एकेकाळी याच पार्सेकरांनी रमाकांत खलप यांच्यासारख्या मातब्बर नेत्याचा मान्द्रेमधून एकदा नाही तर दोनदा पराभव केला होता. पण त्यांचा २०१७ मध्ये दयानंद सोपटेंनी तब्बल २५% मताधिक्याने पराभव केला. त्यामुळे दोघेही आपला दावा सोडायला तयार दिसत नाहीत. इतक्या घाऊक प्रमाणात काँग्रेसमधून आमदार आयात केल्यानंतर ही डोकेदुखी भाजपला नक्कीच होणार होती. त्याचप्रमाणे विधानसभेचे माजी अध्यक्ष अनंत शेट यांचे मागच्या वर्षी निधन झाले. त्यांचे बंधू प्रेमेन्द्र शेट यांनी महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षात प्रवेश केला आहे. अनंत शेट उत्तर गोव्यातील मये मतदारसंघातून निवडून यायचे. त्याचप्रमाणे उत्तर गोव्यातील कळंगूटचे आमदार मायकेल लोबो यांनीही भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. उत्तर गोव्यातीलच म्हापसा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून माजी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसूझा अगदी आरामात निवडून येत असत. ते मनोहर पर्रिकरांचे मित्र होते आणि पर्रिकरांच्या आग्रहावरूनच ते भाजपमध्ये आले होते. मनोहर पर्रिकरांचे निधन झाले त्यापूर्वी दीड-दोन महिने या फ्रान्सिस डिसूझांचेही कर्करोगानेच निधन झाले. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचा मुलगा जॉशुआ अगदी थोडक्यात जिंकला होता. त्यावेळी भाजपने पर्रिकरांची विधानसभा जागा- पणजी पण गमावली होती. पणजी हा १९९४ पासून भाजपचा बालेकिल्ला होता आणि मनोहर पर्रिकरांचे निधन झाल्यानंतर दोन महिन्यातच झालेल्या पोटनिवडणुकीत देशात प्रचंड मोदी लाट असतानाही ती जागा भाजपने गमावली होती. तेव्हा सांगायचा मुद्दा हा की ज्या उत्तर गोव्यात भाजप बळकट होता तिथेच वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये अशाप्रकारच्या प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. या पडझडीला पर्रिकरांच्या शेवटच्या टर्ममध्येच सुरवात झाली होती हे पणजीतील पराभवावरून समजतेच. त्यातही जर बाबूश मोन्सेराटसारख्या फालतू आणि घाणेरड्या माणसाला भाजपने घरी घेतले असेल तर they deserve to lose. पण विरोधी पक्ष तितका प्रबळ राहिलेला नाही त्या कारणानेच भाजपला विजय मिळाला तर मिळू शकेल. अन्यथा गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाचे कठिण आहे. मला स्वतःला गोवा हे राज्य प्रचंड आवडते त्यामुळे या निवडणुकांमध्ये मी खूप जास्त रस घेत आहे. जशाजशा नवीन घडामोडी होतील त्याप्रमाणे इथे लिहिनच.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
56662 वाचन

💬 प्रतिसाद (256)

प्रतिक्रिया

एवढंच नाही..

सॅगी
Wed, 11/24/2021 - 14:19 नवीन
त्याला थाळी, उत्स्फुर्त प्रतिक्रिया अशी गोंडस नावेदेखील देतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विजय असो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

हलाल

उपयोजक
Wed, 11/24/2021 - 13:57 नवीन
https://www.thenewsminute.com/article/only-halal-meat-indian-cricketers-bcci-recommendation-stirs-row-157961
  • Log in or register to post comments

संताप

उपयोजक
Wed, 11/24/2021 - 14:48 नवीन
https://www.thenewsminute.com/article/spit-free-food-new-hate-campaign-targets-keralas-muslim-owned-restaurants-157944
  • Log in or register to post comments

संताप म्हणजे काय ? तुम्हाला

कॉमी
Wed, 11/24/2021 - 15:59 नवीन
संताप म्हणजे काय ? तुम्हाला संताप आलाय का ह्या हेट कॅम्पेन चा ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक

https://www.loksatta.com

धनावडे
Wed, 11/24/2021 - 17:05 नवीन
https://www.loksatta.com/maharashtra/24-percent-of-799-crore-maharashtra-cm-covid-fund-used-rti-abn-97-2691691/
  • Log in or register to post comments

#माफी

गणेशा
Wed, 11/24/2021 - 18:16 नवीन
वयक्तिक रित्या, निलेश साबळे ला माफी मागायला लावली का काय मला माहित नाहि.. पण अलीकडे मोदी शेठ नी संपूर्ण देशवासियांची माफी मागितली ते जास्त महत्वाचे वाटते... आणि शेतकऱ्यांना समजावण्यात ते कमी पडले असे त्यांना वाटले समजावण्याचे प्रकार : -रस्त्यात खिळे ठोकले.. - खलिस्तानी, देशद्रोही संबोधले.. - पाणी, लाठी मार दिला.. - कंटेनर्स लावले.. असो, समजावण्याची अजून काय काय मार्ग वापरले वा..
  • Log in or register to post comments

असं का केलं ते २६ जानेवारीला

श्रीगुरुजी
Wed, 11/24/2021 - 18:25 नवीन
असं का केलं ते २६ जानेवारीला समजलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

म्हणून मी म्हणतो की

रावसाहेब चिंगभूतकर
Wed, 11/24/2021 - 19:24 नवीन
म्हणून मी म्हणतो की प्रत्येकाला मोबाईल देऊन मोठे प्रॉब्लेम होणार आहेत. कुठल्याही आय ए एस अधिकाऱ्याने याच गोष्टी केल्या असत्या. कंटेनर लावणे, मध्ये लोकांना डायरेक्ट येता येऊ नये म्हणून अडथळे उभारणे वगैरे. पण आजकाल कोणीही सोम्या गोम्या उठतो आणि mob ला कसं हाताळावे ते इथे बसून सांगतो. जिओ चा जवळ जवळ फुकट डेटा वापरून मोबाईल वर कॉपी पेस्ट करायला काय जातं !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

मुळांत हे आंदोलन शेतकरी वर्गासाठी न्हवते ...

मुक्त विहारि
गुरुवार, 11/25/2021 - 12:07 नवीन
तसे असते तर, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आणि मध्य प्रदेश शेतकरी नक्कीच सहभागी झाले असते ... माझ्या ओळखीत सर्व शेतकरी वर्गाला, मोदींनी आणलेले कायदे योग्य वाटत आहेत, अर्थात ही सगळी शेतकरी मंडळी, मध्यम वर्गीय शेतकरी आहेत... तेंव्हा मोदींनी जे केले ते योग्यच केले .... आमच्या सारख्या अशिक्षित माणसांना, मोदींशिवाय पर्याय नाही .... ह्या गोष्टीने एक गोष्ट परत एकदा अधोरेखीत केली की, माझ्या सारख्या अशिक्षित माणसाच्या भल्यासाठी कॉंग्रेस नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

बरोबर..

गणेशा
Sun, 11/28/2021 - 11:35 नवीन
जसा राजा तशीच प्रजा.. आणि जशी प्रजा तसाच राजा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

कधी कधी घराणेशाही मुळे अपरिपक्व नेता लादल्या जातो...

मुक्त विहारि
Sun, 11/28/2021 - 18:10 नवीन
अशावेळी ही म्हण उपयोगी पडत नाही .... वंशपरापरागत पेशवेपद, हे एक ऐतिहासिक उदाहरण ... नंद घराणेशाही, हे दुसरे उदाहरण चीन मधले राजे हे तिसरे उदाहरण वाकाटक साम्राज्य, राष्ट्रकूट साम्राज्य, हे पण अशाच घराणेशाही मुळे लयास गेले असण्याची शक्यता आहे. रशियाचे झार साम्राज्य पण घराणेशाही मुळेच लयाला गेले लोकशाही असल्याने, आता आपण घराणेशाही टाळू शकतो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

वंशपरापरागत राजे ? दिल्लि

चौकस२१२
Mon, 11/29/2021 - 04:12 नवीन
वंशपरापरागत राजे ? दिल्लि पसुन कोल्हपुर पर्यन्त !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

खराब रस्त्यांवरुन केरळ उच्च न्यायालयाने अधिकाऱ्यांना झापलं

मुक्त विहारि
Fri, 11/26/2021 - 11:10 नवीन
“तुम्हाला लाज वाटत नाही का?”; खराब रस्त्यांवरुन केरळ उच्च न्यायालयाने अधिकाऱ्यांना झापलं https://www.loksatta.com/desh-videsh/kerala-high-court-reprimands-authorities-for-improper-maintenance-of-roads-vsk-98-2694188/ डोंबिवली येथे, खड्ड्यांत पडून, एका बाईला प्राण गमवावे लागले होते....
  • Log in or register to post comments

https://www.reuters.com

कॉमी
Sat, 11/27/2021 - 09:07 नवीन
https://www.reuters.com/business/healthcare-pharmaceuticals/what-we-know-about-covid-19-variant-detected-south-africa-2021-11-26/?taid=61a0f9fc9a8dbd0001047b95&utm_campaign=trueAnthem:+Trending+Content&utm_medium=trueAnthem&utm_source=twitter साऊथ आफ्रिकेत दिसलेल्या नव्या कोव्हिड व्हरायंट बद्दल माहिती.
  • Log in or register to post comments

मांडवली

सुनील
Sat, 11/27/2021 - 09:14 नवीन
अल्प प्रमाणात ड्रग्ज बाळगणे आता गुन्हा ठरणार नाही; संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मोदी सरकार मांडणार विधेयक. https://www.loksatta.com/desh-videsh/narcotic-drugs-and-psychotropic-substances-amendment-bill-decriminalise-possession-winter-session-abn-97-2691372/?fbclid=IwAR2HCAdbvRq4OPbjhvyyjzbeJbkLf6RGp5DghI9KUfmbtb1cHfruaaL6_ZI जबरदस्त मांडवली झालेली दिसतेय!!
  • Log in or register to post comments

+१

कॉमी
Sat, 11/27/2021 - 09:17 नवीन
उत्तम. मनापासून अभिनंदन. खरोखर चांगले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

अल्प प्रमाण म्हणजे किती ?

जेम्स वांड
Sat, 11/27/2021 - 09:56 नवीन
ह्यात ड्रग म्हणजे काय ते केले आहे का स्पष्ट ? नॅचरल ओकरिंग का सिन्थेटिक ड्रग पण चालतील ? एमपी मध्ये सरकारी परवाने मिळतात भांग दुकान चालवण्याचे आपल्याकडे अबकारी खाते आणि पोलीस मिळून खसखस उत्पादन घ्यायला म्हणून अफूच्या लागवडीचे लायसन्स देतात मराठवाड्यात, अतिशय कडक कंट्रोल्ड असते ते, झाडांची संख्या, निघा घेणाऱ्या मजूरांची व्हेरिफिकेशन्स, मालकाच्या सातबारा अन पेरेपत्रकाचे ड नमुन्याचे उतारे सगळे द्यावे लागते. उत्पादन झालेली अफू पण सरकार खरेदी करते रुद्रप्रयाग का डेहराडूनला कुठंतरी केंद्रसरकारी मोर्फीन (पेनकिलर) उत्पादक प्लांट आहे म्हणतात तिथे तो स्टॉक जातो असे काहीसे आहे. हे विधेयक इंटरेस्टिंग असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

योग्य कायदा

अनन्त अवधुत
Sat, 11/27/2021 - 14:49 नवीन
ड्रग्ज घेणारा हा व्यसनी आहे, गुन्हेगार नाही. चांगल्या कायद्याबद्दल अभिनंदन! जाता जाता: या कायद्याची मागणी आधीपासुन होती, आर्यनला अटक झाली त्याच्या आधीपासुन. लोकसत्ता काहीपण फेकते. हा कायदा मंजुर जरी झाला तरी त्याचा आर्यनला काही फायदा नाही. त्याला अटक झाली (ड्रग्ज बाळगण्याचा गुन्हा घडला) तेव्हा त्या कायद्यानुसार त्याला शिक्षा होईल. निर्भया केस मध्ये एक जण बाल गुन्हेगार होता, त्यामुळे त्याच्यावर बाल न्यायालयात खटला चालला. तो अटकेत असताना, बाल गुन्हेगारांवर बलात्कार, खून अशा खटल्यात प्रौढ म्हणून खटला चालवण्याचा कायदा मंजुर झाला होता, पण त्या बालगुन्हेगाराच्या खटल्यात बदल झाला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

अभिनंदन

माईसाहेब कुरसूंदीकर
Sun, 11/28/2021 - 11:52 नवीन
केंद्र सरकारचे अभिनंदन. नविन कायदे बनवणे व ड्रगबद्दल अस्तित्वातले कायदे बदलणे गरजेचे होते. ड्रग बाळगले नसतानाही अटक करणे व खोटी केस टाकून पैसे उकळायचा प्रयत्न सरकारी अधिकारी कसे करतात ते आपण आर्यन खान प्रकरणात पाहिले. त्याआधीही सुशांत सिंग प्रकरणात हेच घडले होते. चलाख व भ्रष्ट अधिकार्यांना मोदी सरकार समज देईल अशी आता आशा करूया.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त अवधुत

माई

सुबोध खरे
Wed, 12/01/2021 - 12:27 नवीन
माई तुमचे मत आदर्शवादी आहे. मादक द्रव्याच्या व्यापारातील दलालांकडून NCB चे अधिकारी कायमच पैसे उकळत आलेले आहेत. जसे आपले शार्प शुटर पोलीस गुंडांकडून एन्काउंटर करण्याची धमकी देऊन पैसे उकळत आलेले आहेत. या दोन्ही अधिकाऱ्यांना राजकारणी आणि सत्ताधीश कायम संरक्षण देत आलेले आहेत. हि व्यवस्था इतकी किडलेली आहे कि त्यात आमूलाग्र सुधार करण्याची आवश्यकता आहे. पण तसे होण्याची सूतराम शक्यता नाही. पकडले गेलेले अमली पदार्थ चोर वाटेने परत बाजारात येतात. सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढताना सांगितले कि गेल्या दशकात ६० लाख किलो अमली पदार्थ पकडले होते त्यापैकी १६ लाख किलो नष्ट केले आणि बाकीचा हिशेब लागत नाही. https://www.thehindu.com/news/national/consider-dedicated-storage-space-for-seized-drugs-sc/article7608512.ece Justice T.S. Thakur remarked that of the 60 lakh-kg contraband seized in the past decade, only 16 lakh kg had been found to be destroyed. गांजाची किंमत एका किलोला ३-४ हजार रुपये आणि हेरोइनची ७ कोटी. म्हणजे हे ४४ लाख किलो गांजा असेल तर त्याची किंमत १५०० कोटीच्या वर आहे आणि हेरॉईन असेल तर अक्षरशः अब्जावधी रुपये होतात. एकंदर किंमत किमान १५ हजार कोटी ते कमल काही शे अब्ज रुपये यात कुठेतरी आहे. दक्षिण अमेरिका खंडात अक्षरश सरकार बदलण्याची/ उलथवण्याची शक्ती असते या माफियांच्या हातात हि अशाच प्रचंड पैशामुळे. जी घटना सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचते त्याबद्दल काहीही होत नाही याचा अर्थच हा आहे कि हि प्रणाली वरपासून खालपर्यंत किडलेली आहे. एकटे मोदी काहीही करू शकणार नाहीत. बॉलिवूडच्या लोकांमध्ये दहशत निर्माण हेतू हा आहे कि असंख्य तरुण तरुणी तेथील तारकांचे अनुकरण करतात. "ड्रग्स घेणे" यात तेथे वैषम्य वाटण्याच्या ऐवजी हे लोक त्याचे निर्लज्ज समर्थन करता आणि त्याला प्रतिष्ठा प्राप्त करून देतात याबद्दल आक्षेप आहे. रस्त्यावरच्या गर्दुल्ल्यांचे कोण अनुकरण करतंय? हे कायदे अशा दुर्दैवी जीवांसाठी आहेत ज्यांचे कुणीही नाही. ज्यांना व्यसनापायी जीव धोक्यात घालावा लागतो आणि स्वतः नाश करत असताना पकडले गेले तर जामिनासाठी पैसे नसतातच तर महागडे वकील कुठून करणार. यामुळे अक्षरशः हजारो तरुण तुरुंगात खितपत पडलेले आहेत. मुळात हा छापे लक्षिमीपुत्रांवर नाहीतच तर त्यांच्यामार्फत दलालांपर्यंत पोचण्यासाठी आणि त्यांचे जाळे नष्ट करण्यासाठी घातलेले आहेत. पण सरकारतीलच काही लोक त्यात खोडा घालत आहेत. कारण त्यांचे पुत्र जावई नातेवाईक या व्यापारात गुंतलेले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

खलिस्तानी, देशद्रोही संबोधले.

चौकस२१२
Mon, 11/29/2021 - 04:10 नवीन
खलिस्तानी, देशद्रोही संबोधले.. मुद्दा नक्कीच होता,, भारताबाहेर हे इतक्या उघडपणे दिसत होते .. जणू काही शिखांचे धर्म यौद्ध आहे .. जणू काही शेतकरी फक्त पंजाब मध्ये आहे तुम्ही कोणत्याका पक्षाचे समर्थक असा पण हे कृपया लक्षात घ्या कि भारत एक देश असा विचा र केला तर हे जग भर मूठ भर असून सुद्धा विघटन वादि शीख आहेत त्यांनाच आवाज भारताला तापदायी ठरत आहे, या आंदोलनाचा फायदा खलिस्तानवादी आणि त्यांचे पाठीराखे यांनी नक्की घेतला बर अजूनही हे कायदे नाकी १००% शेतकर्यांच्य्या विरुद्ध कसे होते? कि ते मधील दलालांना पेचात आणणारे होते या बद्दल त्याचे समर्थक काही खुलासा देत नाहीत ,, नुसतं मोदी विरुद्ध हे किती दिवस चालणार !
  • Log in or register to post comments

सहमत

माईसाहेब कुरसूंदीकर
Mon, 11/29/2021 - 09:21 नवीन
सहमत. कृषी कायद्यांना विरोध का ? काय धोके आहेत? हे अजूनही विरोधक सांगत नाहीत. निदान शरद पवार वगैरे नेते सांगतील अशी अपेक्षा होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

सरकारला ह्या कृषि कायद्याचे

आग्या१९९०
Mon, 11/29/2021 - 09:29 नवीन
सरकारला ह्या कृषि कायद्याचे फायदे काय आहेत ते नीट सांगता येत नसल्याने मागे घ्यावे लागले ह्यातच सर्व काही आले. हे कायदे नसतानाही कंत्राटी शेती करत आहेत शेतकरी, थेट व्यापाऱ्याला आपला कृषीमाल विकत आहे. शेतीला फक्त उद्योगाचा दर्जा आणि सुविधा दिल्या तरी पुरेसे आहे. असले कायदे कागदावरच ठीक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

माजी कृषिमंत्री तर यावर

चौकस२१२
Mon, 11/29/2021 - 10:15 नवीन
माजी कृषिमंत्री तर यावर एक्स्पर्ट असले पाहिजेत ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

माननीय शरद पवार, यांनीच आधी असे कायदे हवेत, असे पुस्तकात लिहिले.

मुक्त विहारि
Mon, 11/29/2021 - 11:26 नवीन
आता मात्र विरोध करत आहेत ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

न्यू इंडिया

कॉमी
Mon, 11/29/2021 - 09:19 नवीन
https://www.ndtv.com/india-news/im-done-goodbye-says-comic-munawar-faruqui-after-12-shows-cancelled-in-2-months-2627851/amp/1
  • Log in or register to post comments

Good riddance !

रावसाहेब चिंगभूतकर
Mon, 11/29/2021 - 09:49 नवीन
Good riddance !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

उत्तम

चंद्रसूर्यकुमार
Mon, 11/29/2021 - 11:34 नवीन
अजिबात अश्रू ढाळायची गरज नाही. हाच हलकट मुनावर फारूकी राम-सीता या हिंदू देवतांची कशी टवाळी करत होता हे पुढील व्हिडिओत बघायला मिळेल. याच व्हिडिओमध्ये सीतेच्या तोंडात एक अपशब्द पण त्याने टाकला आहे असे दिसते. असल्या हरामखोरांविरूध्द कडक भूमिका घेतलीच पाहिजे. अन्यथा हिंदू देवतांविरोधात थोडा विनोद केला- मग काय झाले ही गाडी पुढे मग हिंदू समाजाला काहीही बोलले- मग काय झाले करत करत हिंदूंना देशोधडीला लावले, हिंदूंच्या कत्तली केल्या मग काय झाले पर्यंत जाते. त्यामुळे सुरवातीलाच अत्यंत कडक भूमिका घेऊन असल्या फालतू लोकांना गप्प बसवायलाच हवे. बास झाला तथाकथित बेगडी सहिष्णूपणा. आपल्या श्रध्दास्थानांची टवाळी केली तर कसे फतवे काढले जातात, कसे हलाल केले जाते हे या मनुष्याला माहित नसायची अजिबात शक्यता असेल असे वाटत नाही. तसे असेल तर मग इतरांच्या श्रध्दास्थानांची टवाळी आपण करू नये इतके तरी किमानपक्षी सौजन्य दाखवावे इतकी अक्कल याला नसेल तर असेच त्याला जबरदस्तीने गप्प बसवायला हवे. या न्यू इंडियाचा अभिमान आहे. हिंदूंनी असेच, यापेक्षा जास्त कडक वागायलाच पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

हिंदूंनी असेच, यापेक्षा जास्त कडक वागायलाच पाहिजे.

मुक्त विहारि
Mon, 11/29/2021 - 11:43 नवीन
हिंदू कधीच एकत्र येणार नाहीत ..... आपलंच नाणं खोटं ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

“आम्हाला माफ कर…”; मुनव्वर फारुकीचे स्वरा भास्करकडून समर्थन

मुक्त विहारि
Mon, 11/29/2021 - 20:00 नवीन
https://www.loksatta.com/manoranjan/swara-bhaskar-came-in-support-of-comedian-munavvar-farouki-said-it-is-shameful-nrp-97-2698220/lite/ काय बोलावं ते सुचेना ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

सरकारला ह्या कृषि कायद्याचे

चौकस२१२
Mon, 11/29/2021 - 10:14 नवीन
सरकारला ह्या कृषि कायद्याचे फायदे काय आहेत ते नीट सांगता येत नसल्याने मागे घ्यावे लागले बर मग आपण त्याचे तोटे सांगा ना? आणि हा जो आक्षेप होता कि "मध्यला दलालांना नको होता " तो आक्षेप कसा चुकीचा होता ते सदोहरान सांगा. होऊनच जाऊदे हा सूर्य हा जयंद्रथ याशिवाय " शेतकरी आंदोलन , शीख धर्मयुद्ध असे जे दिसत होते त्या बद्दला पण असं काही म्हणे चुकीचे आहे ते सांगा.. आम्ही धन्य होऊ या पुढे कुठे सार्वजनिकी दिवाळी वैगरे साजरा करताना आता छुपे खलिस्तानी हातात " बळीराजाचा" फलक घेऊन येणार याची तयारीच ठेऊ .. कर्नाटक त्रिपुरा बंगाल , केरळ तामिळनाडू येथील शेतकरी पण "पंजाबी शेतकर्या एवढाच " पेटून उठला होता आणि नऊ यॉर्क पासून ऑकलंड न्यू झीलंड मधील सर्व गुजराथी, मल्याळी मराठी समाज "फार्मर सपोर्ट म्हणून " गुरुंमुखी तुन पाट्या लिहून पेटून हिंदूवादी संघोट्या फॅस्टिस्ट इतर भारतीयांचं सणाच्या उत्सवात धुडगूस घालत होता .. हे हे दाखवा ... च्।लाआ लागा कामाला एकदाची आमची तोंडे बंद करा ..मग आम्ही पण गुरुग्रामात झाले तसे मुकात जाऊन गुरुद्वारात नमाज पडायला मोकळे ..
  • Log in or register to post comments

बर मग आपण त्याचे तोटे सांगा

आग्या१९९०
Mon, 11/29/2021 - 10:53 नवीन
बर मग आपण त्याचे तोटे सांगा ना? कायदे आणले सरकारने, मागेही घेतले सरकारने. त्यांना प्रथम विचारा ह्या कृषि कायद्याचे फायदे. एक तर ह्या सरकारचे कृषीविषयक ज्ञान तोळामासाच. त्यात फार विचार न करता घोषणा करायची हौस फार. २०२२ पर्यंत देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार असे २०१५ ला ह्या सरकारने घोषणा केली होती. हे लक्ष गाठायला वार्षिक कृषिविकासदर १२-१४ % असायला हवा. घोषणा झाल्यापासून २०१९ पर्यंत प्रत्यक्षात तो ३% पेक्षा कमी होता. ना नीट नियोजन ना धोरण होतं सरकारकडे. कोरोनामुळे पुढे अधिकच कठीण झाले. शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट होणार नाही ह्याची खात्री झाल्याने हे अपयश लपवण्यासाठी तीन कृषि कायदे आणले. तिकडेही अभ्यास कमी पडल्याने माघार घ्यावी लागली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

टेक्सास गव्हर्नर ग्रेग एबॉट यांचे अगाध अगाध ट्विट

कॉमी
Mon, 11/29/2021 - 10:32 नवीन

Biden banned travel from South Africa because of the new Covid variant.

Immigrants have recently been apprehended crossing our border illegally from South Africa.

Biden is doing nothing to stop immigrants from South Africa entering illegally.

Pure politics and hypocrisy.

— Greg Abbott (@GregAbbott_TX) November 28, 2021
१. अबॉट दादांना कदाचित यूएस आणि आफ्रिकेची एक बॉर्डर आहे असे वाटत असावे. किंवा, मधले प्रचंड समुद्री अंतर पोहत किंवा बोटींनी पार केले असे वाटत असावे. म्हणजे विक्रमच म्हणायचा. २.Immigrants have recently been apprehended crossing our border illegally from South Africa. Biden is doing nothing to stop immigrants from South Africa entering illegally. बॉर्डर वर अडवलं म्हणे- पण काहीच केले जात नाहीये... एकाच वेळी दोन परस्परविरोधी गोष्टींवर विश्वास. अमेरिकन कॉन्सर्व्हेटिव्ह मूर्खपणाचे जिवंत उदाहरण म्हणून जे ट्विट फ्रेम केले पाहिजे.
  • Log in or register to post comments

क्युबा

चंद्रसूर्यकुमार
Mon, 11/29/2021 - 11:24 नवीन
कम्युनिस्ट क्युबामधून लोक स्वतःचा जीव धोक्यात टाकून असेच बोटीने लोक अमेरिकेत यायचा शिरस्ता गेली कित्येक वर्षे चालू आहे- इतका की क्युबातून वैध-अवैधपणे अमेरिकेत आलेल्यांचे आणि त्यांच्या वंशजांचे प्रमाण क्युबाच्या लोकसंख्येच्या जवळपास १०% आहे. त्यामुळेच बहुदा सगळीकडून लोक अमेरिकेत असेच बोटीने किंवा पोहत येतात असे अ‍ॅबटदादाला वाटले असावे. काय करणार. मागच्या वर्षी एप्रिल-मे महिन्यात एक वेळ अशी आली होती की पूर्ण जगात जितके कोरोना रूग्ण होते त्याच्या ८-९% रूग्ण एकट्या न्यू यॉर्क राज्यात होते. तरीही आपण कोरोनावर कसे नियंत्रण मिळवले यावर पुस्तके लिहून स्वतःचीच लाल करून घेणारा न्यू यॉर्कचा माजी गव्हर्नर अ‍ॅन्ड्र्यू कुमो किंवा उबरसारख्या पूर्णपणे कॉन्ट्रॅक्टवरील लोकांवर आधारीत असलेल्या बिझनेस मॉडेलमध्ये त्या कॉन्ट्रॅक्टवरील वाहनचालकांची पिळवणूक होते असा तिरपागडा अर्थ लावून ते वाहनचालक सुध्दा (खरं तर सगळेच कॉन्ट्रॅक्टवरील लोक- फ्रीलान्सर धरून) कंपनीचे कर्मचारी आहेत म्हणून त्यांना पी.एफ किंवा दरवर्षी अमुक इतक्या भरपगारी सुट्ट्या दिल्याच पाहिजेत वगैरे गुडघ्यातील कायदे (एबी-५) संमत करणारा कॅलिफॉर्नियाचा गव्हर्नर गेव्हिन न्यूसम हे लिब्बू मूर्खपणाचे जिवंत उदाहरण म्हणून फ्रेम करून ठेवले पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

४ तासांत निर्णय देत आरोपीला जन्मठेपेची शिक्षा....

मुक्त विहारि
Mon, 11/29/2021 - 11:17 नवीन
बलात्कार प्रकरणात बिहार न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय; २४ तासांत निर्णय देत आरोपीला जन्मठेपेची शिक्षा https://www.loksatta.com/desh-videsh/bihar-araria-pocso-court-verdict-rape-case-within-24-hours-abn-97-2698159/ -------- महाराष्ट्रातील ह्या राजवटीत, तडकाफडकी निर्णय देणार, असे बोलले होते....
  • Log in or register to post comments

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून 'तलाठ्या'ची आत्महत्या,

मुक्त विहारि
Mon, 11/29/2021 - 11:40 नवीन
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून 'तलाठ्या'ची आत्महत्या, नातेवाईकांचा पोलीस ठाण्यात ठिय्या https://maharashtratimes.com/maharashtra/aurangabad/talathi-officer-commits-suicide-after-being-harassed-by-senior-officials/articleshow/87973209.cms आता राज्य कर्मचारी देखील आत्महत्या करायला लागले .... ह्यालाच प्रगती म्हणायचं का?
  • Log in or register to post comments

त्रिपुरातील स्थानिक स्वराज्यसंस्थांच्या निवडणुका

चंद्रसूर्यकुमार
Mon, 11/29/2021 - 18:51 नवीन
त्रिपुरात झालेल्या स्थानिक स्वराज्यसंस्थांच्या निवडणुकांमध्ये राज्यातील जवळपास सगळ्याच्या सगळ्या जागा भाजपने जिंकल्या आहेत. बंगाल आणि त्रिपुरामध्ये बरेच साम्य आहे याचे कारण स्वातंत्र्याच्या वेळेस आणि त्यानंतरही पूर्व पाकिस्तानात झालेल्या दंगलींमुळे मोठ्या प्रमाणावर बंगाली भाषिक हिंदू पूर्व पाकिस्तानातून (आणि नंतर बांगलादेशातून) त्रिपुरामध्ये आले. बंगालमध्ये ज्याप्रमाणे कम्युनिस्टांचे दीर्घकाळ राज्य होते त्याप्रमाणे त्रिपुरातही होते. २०१८ मध्ये राज्यात सत्तांतर झाले आणि भाजप सत्तेवर आला. ममता बॅनर्जींनी त्रिपुरामध्ये तृणमूलचे हातपाय पसरायचे प्रयत्न केले पण त्यांना फारसे यश मिळाले नाही. विधानसभेत ६० पैकी १०-१२ जागांपेक्षा जास्त यश त्यांना मिळू शकले नाही. २०२१ मध्ये बंगालमध्ये तिसर्‍यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर ममता आपला पक्ष राष्ट्रीय पक्ष करायच्या मागे लागल्या. गोव्यात लुईझिनो फालेरो, मेघालयमध्ये मुकुल संगमा असे माजी मुख्यमंत्री त्यांच्या पक्षात सामील झालेही. या पार्श्वभूमीवर बहुसंख्य बंगाली भाषिक नागरीक असलेल्या त्रिपुरामध्ये यश मिळविण्यासाठी ममतांनी कंबर कसली. पण राज्यातील जवळपास सगळ्या जागा (३३२ पैकी ३२९) भाजपने जिंकल्या. तृणमूलला एकाच जागेवर समाधान मानावे लागले.
  • Log in or register to post comments

माहिती बद्दल धन्यवाद .....

मुक्त विहारि
Mon, 11/29/2021 - 19:31 नवीन
माझ्या अंदाजाने, तृणमुल कॉंग्रेस म्हणजेच, ममता बॅनर्जी त्यामुळे, जोपर्यंत ममता बॅनर्जी आहेत, तोपर्य॔त तृणमुल कॉंग्रेस आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

ह्या बातमीनुसार केरळमधील 5000

रात्रीचे चांदणे
Mon, 11/29/2021 - 20:58 नवीन
ह्या बातमीनुसार केरळमधील 5000 च्या आसपास शिक्षकांनी धार्मिक आणि आरोग्याच्या कारणामुळे करोना विरुद्धची लस घेण्यास नकार दिला आहे. काही लोकांना आरोग्याच्या तक्रारी असतील तर लस न घायला ठीक आहे पण लस आणि धर्म याचा संबंध कुठे येतो हे समजत नाही.
  • Log in or register to post comments

इथे कायदाच हवा ....

मुक्त विहारि
Tue, 11/30/2021 - 11:31 नवीन
ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले नसतील, त्यांना घरीच स्थानबद्ध करा... सार्वजनिक स्थानबद्धता नको... झूंडीचा असंतोष, दंगलीला कारण्याभूत होण्याची शक्यता जास्त असू शकते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

विनोद

माईसाहेब कुरसूंदीकर
Tue, 11/30/2021 - 09:33 नवीन
ज्येष्ट पत्रकार विनोद दुआ ह्यांचे निधन झाल्याची चुकीची बातमी इंडिया टूडेने दिली आणि मग अनेकांनी 'ओम शांती' ट्वीट केले. https://www.opindia.com/2021/11/vinod-dua-not-dead-daughter-mallika-dua-refutes-rumours/
  • Log in or register to post comments

इलेक्ट्रॉनिक्स

उपयोजक
Wed, 12/01/2021 - 12:28 नवीन
https://thebhongaa.com/2021/12/01/central-electronics-limited-will-now-be-sold-to-nandal-finance-and-leasing-for-rs-210-crore/
  • Log in or register to post comments

अरेच्या

जेम्स वांड
Wed, 12/01/2021 - 12:44 नवीन
"ड्रग्स घेणे" यात तेथे वैषम्य वाटण्याच्या ऐवजी हे लोक त्याचे निर्लज्ज समर्थन करता आणि त्याला प्रतिष्ठा प्राप्त करून देतात याबद्दल आक्षेप आहे.
&#129300 &#129300 अगदी सहज बॉलीवूड स्टार्स असलेले देशद्रोही पब्लिकली "चिलम ओढा रे पोराहो" म्हणत असल्याचे दिसले. मजेशीर चित्र वाटले एकदम. &#128514 &#128514
  • Log in or register to post comments

"चिलम ओढा रे पोराहो"

अनन्त अवधुत
गुरुवार, 12/02/2021 - 06:21 नवीन
दम मारो दम गाणे आठवले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

ऑ !

जेम्स वांड
गुरुवार, 12/02/2021 - 09:16 नवीन
दम मारो दम गाणं ऐकून पोरं चिलमीला लागतात, तर मग ये जो देश हैं तेरा ऐकून सगळे देशभक्त होत नाहीत ? अजबच तर्क झाले हे तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त अवधुत

दम मारो दम गाणं ऐकून पोरं

सुबोध खरे
गुरुवार, 12/02/2021 - 09:58 नवीन
दम मारो दम गाणं ऐकून पोरं चिलमीला लागतात, तर मग ये जो देश हैं तेरा ऐकून सगळे देशभक्त होत नाहीत ? अजबच तर्क झाले हे तर. मुलं सुभाषितं लवकर शिकत नाहीत पण शिव्या का लवकर शिकतात? मास्तर "तमाशाने समाज बिघडला नाही आणि भजनाने सुधारला नाही" हे पिंजरा मध्ये असलेले वाक्य बरेचसे सत्य असले तरीही मादक द्रव्यांचा प्रश्न त्याच्यामागचे जीवशास्त्रीय कारण लक्षात घेतले तर इतका गंभीर का आहे हे समजून येईल. हेरोइनची ३-४ इंजेक्शन तुम्हाला आयुष्यभरासाठी व्यसनी बनवू शकतात (हि पहिली इंजेक्शन्स तुम्हाला फुकट दिली जातात) यावरून हा एक दिशा मार्ग आहे हे समजून चला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

कृपया हलके घ्या.

अनन्त अवधुत
गुरुवार, 12/02/2021 - 13:08 नवीन
अगदी सहज बॉलीवूड स्टार्स असलेले देशद्रोही पब्लिकली "चिलम ओढा रे पोराहो" म्हणत असल्याचे दिसले. मजेशीर चित्र वाटले एकदम.
ह्याला प्रतिक्रिया म्हणून मी ते गाणे टाकले. कृपया हलके घ्या. दम मारो दम गाणं ऐकून पोरं चिलमीला लागत नाहीत, कि ये जो देश हैं तेरा ऐकून सगळे देशभक्त होत नाहीत. चांगल्या सवयी लावण्यासाठी वेळ द्यावा लागतो, आणि वाईट सवयी लागायला वेळ लागत नाही (संगत लागते).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

नक्कीच

जेम्स वांड
गुरुवार, 12/02/2021 - 13:14 नवीन
आपल्या संयत प्रतिसाद आणि शब्दयोजनेबद्दल आपले कौतुक वाटते आहे मला, आवडलं ते नमूद करायलाच हवे. असे हलकेफुलके आजकाल कमीच बोलतात लोक, अन एकंदरीत बाजू लढवल्याचा अभिनिवेष नसणाऱ्या माणसांशी बोलणे सुखद वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त अवधुत

धन्यवाद!

अनन्त अवधुत
Fri, 12/03/2021 - 01:18 नवीन
कौतुकाबद्दल धन्यवाद!
एकंदरीत बाजू लढवल्याचा अभिनिवेष नसणाऱ्या माणसांशी बोलणे सुखद वाटते.
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

the clip where SRK was heard

सुबोध खरे
गुरुवार, 12/02/2021 - 09:54 नवीन
the clip where SRK was heard saying, “I have just told him that he can run after girls. Smoke as much as he wants. He can do drugs, can have sex. He can womanize.” https://www.opindia.com/2021/10/shah-rukh-aryan-khan-simi-garewal-interview-drugs/ शाहरुख खान असे जरी विनोदाने बोलला असला तरी तो कुठे बोलतोय आणि त्यातून (त्याच्या आणि इतरांच्या) तरुण मुलांना मुलाला काय संदेश गेला आहे ते पहा. NCB sources have said it has been found that Aryan Khan was consuming drugs for four years. He was on drugs even during his UK and Dubai stay. https://www.indiatoday.in/india/story/aryan-khan-cried-during-ncb-interrogation-had-drugs-for-4-years-1860411-2021-10-04 मुलगा दुबईत जर अमली पदार्थ घेताना पकडला गेला असता तर तेंव्हाच्या कायद्यानुसार किमान चार वर्षे ते आयुष्यभर तुरुंगात खितपत पडावे लागले असते. मजेशीर चित्र वाटले नसते एकदम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा