✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

ताज्या घडामोडी नोव्हेंबर २०२१- भाग २

च
चंद्रसूर्यकुमार यांनी
Wed, 11/17/2021 - 20:32  ·  लेख
लेख
आधीच्या भागात १५० प्रतिसाद झाल्यामुळे नवा भाग काढत आहे. गोव्यातील पोरी (Poriem) मतदारसंघातून २०१७ मध्ये माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणेंविरूध्द निवडणुक लढवून पराभूत झालेले भाजपचे विश्वजीत राणे यांनी भाजप सोडून आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. प्रतापसिंग राणेंच्या चिरंजीवांचे नावही विश्वजीतच आहे. ते भाजपमध्ये आहेत आणि राज्य सरकारमध्ये मंत्रीही आहेत. नामसाधर्म्यामुळे सुरवातीला वाटले होते की त्यांनीच आपमध्ये प्रवेश केला की काय. पण दुसर्‍या विश्वजीत राणेंनी पक्ष सोडला आहे. एकंदरीत गोव्यात भाजपचे तितके सोपे दिसत नाही. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा मान्द्रेमधून काँग्रेसच्या दयानंद सोपटे यांनी दणदणीत पराभव केला होता. २०१९ मध्ये जे काँग्रेसचे १० आमदार भाजपमध्ये सामील झाले त्यात हे दयानंद सोपटे होते. आता मान्द्रेमधून आपल्याला उमेदवारी मिळेल याची खात्री दयानंद सोपटेंना आहे तर लक्ष्मीकांत पार्सेकर सुध्दा आपला दावा सोडायला तयार नाहीत असे दिसते. एकेकाळी याच पार्सेकरांनी रमाकांत खलप यांच्यासारख्या मातब्बर नेत्याचा मान्द्रेमधून एकदा नाही तर दोनदा पराभव केला होता. पण त्यांचा २०१७ मध्ये दयानंद सोपटेंनी तब्बल २५% मताधिक्याने पराभव केला. त्यामुळे दोघेही आपला दावा सोडायला तयार दिसत नाहीत. इतक्या घाऊक प्रमाणात काँग्रेसमधून आमदार आयात केल्यानंतर ही डोकेदुखी भाजपला नक्कीच होणार होती. त्याचप्रमाणे विधानसभेचे माजी अध्यक्ष अनंत शेट यांचे मागच्या वर्षी निधन झाले. त्यांचे बंधू प्रेमेन्द्र शेट यांनी महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षात प्रवेश केला आहे. अनंत शेट उत्तर गोव्यातील मये मतदारसंघातून निवडून यायचे. त्याचप्रमाणे उत्तर गोव्यातील कळंगूटचे आमदार मायकेल लोबो यांनीही भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. उत्तर गोव्यातीलच म्हापसा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून माजी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसूझा अगदी आरामात निवडून येत असत. ते मनोहर पर्रिकरांचे मित्र होते आणि पर्रिकरांच्या आग्रहावरूनच ते भाजपमध्ये आले होते. मनोहर पर्रिकरांचे निधन झाले त्यापूर्वी दीड-दोन महिने या फ्रान्सिस डिसूझांचेही कर्करोगानेच निधन झाले. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचा मुलगा जॉशुआ अगदी थोडक्यात जिंकला होता. त्यावेळी भाजपने पर्रिकरांची विधानसभा जागा- पणजी पण गमावली होती. पणजी हा १९९४ पासून भाजपचा बालेकिल्ला होता आणि मनोहर पर्रिकरांचे निधन झाल्यानंतर दोन महिन्यातच झालेल्या पोटनिवडणुकीत देशात प्रचंड मोदी लाट असतानाही ती जागा भाजपने गमावली होती. तेव्हा सांगायचा मुद्दा हा की ज्या उत्तर गोव्यात भाजप बळकट होता तिथेच वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये अशाप्रकारच्या प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. या पडझडीला पर्रिकरांच्या शेवटच्या टर्ममध्येच सुरवात झाली होती हे पणजीतील पराभवावरून समजतेच. त्यातही जर बाबूश मोन्सेराटसारख्या फालतू आणि घाणेरड्या माणसाला भाजपने घरी घेतले असेल तर they deserve to lose. पण विरोधी पक्ष तितका प्रबळ राहिलेला नाही त्या कारणानेच भाजपला विजय मिळाला तर मिळू शकेल. अन्यथा गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाचे कठिण आहे. मला स्वतःला गोवा हे राज्य प्रचंड आवडते त्यामुळे या निवडणुकांमध्ये मी खूप जास्त रस घेत आहे. जशाजशा नवीन घडामोडी होतील त्याप्रमाणे इथे लिहिनच.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
56662 वाचन

💬 प्रतिसाद (256)

प्रतिक्रिया

३७- ४६% वाढ झलि.

चौकस२१२
Mon, 11/22/2021 - 04:39 नवीन
पेट्रोल येथे १,९३ पर्यन्त गेले ,, वर्शपुर्वि १,१८ होते.. देश्भरत ३७- ४६% वाढ झलि... मोदिनिच केलि असवि मोरिसन बाबा ल सन्गुन ,, बहुतेक अदानिन्च्या मार्गे! कारन अदनि येथे कोळ्शच्या खनि चे मालक आहेत ( हा बादरयाण सम्बन्ध जोडत आहे मि जसे कि " मि भाजि खते मह्नुन मि शेतकरि अन्दोलनाला सम्र्थन देते " असा बादरयाण सम्बन्ध मिय खलिफ यन्नि जोडला होता तसा .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

मोदीच जबाबदार आहेत. महागाई

सुक्या
Tue, 11/23/2021 - 05:27 नवीन
मोदीच जबाबदार आहेत. महागाई जगात कुठेही वाढली तरी आताचे सुट बुट वाले मोदी(च) जबाबदार आहेत. तुमच्या मोरीसन बाबा ने ऑस्ट्रेलिया विकायला काढला आहे. आडाणी मोदी चे मित्र आहेत म्हणुन सारे त्यांना मिळते आहे. त्यामुळे मोदीच जबाब्दार आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

उपहासाने बोलताय कि खरच

चौकस२१२
Tue, 11/23/2021 - 06:13 नवीन
सुक्याशेठ तुम्ही उपहासाने बोलताय कि खरच हे तुमचे मत आहे हे कळत नाहीये .. असे गृहीत धरतो कि तुम्ही जे लिहिले आहे ते तुमचे मत आहे तर मला वाटते बरेच वर्षे येथे राहून अभ्यास केल्यावर मला जरा तरी यावर बोलायचं अधिकार आहे ( कदाचित आपण पण या देशात असाल ) असो - मॉरिसन बाबाने देश विकायला काढलाय: असे काही प्रचंड खाजगीकरण येथे झाले नाहीये,,,अर्ध खाजगीकरण बरेच वर्षांपासून चालू आहे आणि ते लेबर ( दावे मजूर पक्ष ) आणि उजवे लिबरल नॅशनल युती दोन्हीच्या काळात - अडाणी जो ग्यालली बेसिन मध्ये खाण विकसित करतोय त्या राज्यात अनेक वर्षे लव्हबर चे सरकार आहे आणि त्यांचा याला पूर्ण विरोध नाहीये - मला हे समजत नाही कि भारतात राहोणाऱ्यांना अडानि किंवा टाटा सारख्याने आज भारताबाहेरील देशातील उद्योग विकसित केलं तर अभिमान वाटलं पाहिजे ( टाटा ने "टेटली" नामक चहा उद्योग घेतलं आहे ).. त्याला भारतातून विरोध कास काय? येथील स्तहनिक शेतकरी विरोध करतील तर ते समजु शकतो हे मान्य कि भारतीय खाजगी उद्योगपती येथे कसा कारभार करतात त्यावर शंका उपस्थायीत करायला कधी कधी वाव असतो - ऑस्ट्रेलाय पण भारतासारखे पेट्रोल साठी आयटी वॉर अवलंबून आहे त्यामुळे येथे हि प्रचंड प्रमाणात दार वाढले आहेत ..पण भारतातील आंधळ्या मोदी विरोधकांना वाटतं कि एकट्या भारतातच हि समस्या आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

मी ते उपहासानेच बोललो होतो . . . गोंधळाबद्दल क्षमा असावी . .

सुक्या
Tue, 11/23/2021 - 06:36 नवीन
चौकस२१२, मी ते उपहासानेच बोललो होतो. काय आहे आज काल मोदी नाव आले की शिव्या देणे हे एकच काम काही लोक करतात. म्हणुन ते उपहासाने लिहिले होते. शिव्या द्यायला अगोदर टाटा बिर्ला होते .. आता अडानी अंबानी आलेत. बादरायण संबंध एकच "गुजराथी फॅक्टर". पेट्रोल च्या दर वाढीसाठी , पर्यायाने महागाई वाढण्यात जे अंध लोक फक्त मोदींना जाबाब्दार धरतात त्यांना एकतर खरी परीस्थीती काय आहे याचे काहीही ज्ञान नसते त्याउपर जागात काय चालले आहे याचेही काही ज्ञान नसते. फक्त आपला अजेण्डा रेटने एवढेच या लोकांना माहीत असते. मी जिथे राहतो तिथेही पेट्रोल ४०-४५ % महाग झाले आहे पण त्याला इथे कुणी राज्यकरते जबाब्दार आहेत असे म्हणत नाही. एनी वे. तुमच्या प्रतीसादाने २ गोष्टी (टेटली चहा उद्योग टाटा चा आहे व ग्यालली बेसिन साठी अडानी ला पुर्ण विरोध नाही) समजल्या .. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

सुक्या...

चौकस२१२
Tue, 11/23/2021 - 10:34 नवीन
सुक्या... चला म्हणजे तुम्हालाहि आता भाजपच्या आई टी सेल कडून पगार मिळणार तर .. तशी शिफारस करतो ...... हा हा हा अडाणी बद्दल ऑस्ट्रेल्यात ज्या राज्यात लेबर आहेत आणि ज्यानं भरपूर पैसे मिळणार आहेत ते ओरडत नाहीत ओरडतात ते उजवे ! असे चित्र होते .. पण दिवाळी कार्यक्रमात लेबर चे दावे च जास्त विरोधी दिसले... + त्यात भर म्हणजे सगळे निषेध फलक घेऊन पगडी धारी... जणू अडाणी पंजाब वर फक्त नांगर फिरवायला बसलाय सगळंच हास्यस्पद पण एकीकडे चीड आडनारे ,,, जमलेले भारतीय काही अगदी धार्मिक सण या भावनेने नव्हते जमलेले पण ञा खलिस्तान्यांनी मध्ये गालबोट लावले . हे सगळं फक्त कानडा आणि इंग्लड मध्ये होतो असे ऐकून होतो पण इकडे हि आले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

मदरशा बाबतीतली खालील बातमी वाचली....

मुक्त विहारि
Sat, 11/20/2021 - 11:02 नवीन
18 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्यानंतर निर्ल्लज्ज मौलवी तिला म्हणतो,''तू...'' https://zeenews.india.com/marathi/india/18-year-old-girl-was-abuse-by-madarsa-maulavi-force-her-to-believe-her-it-is-a-religious-things/592404 तरुणीच्या म्हणण्यानुसार, मदरशाचे प्रमुख असलेल्या एका मुस्लिम धर्मगुरूने एका दिवशी 18-19 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. यानंतर मुलींना दिशाभूल करत सांगण्यात आले की, अंघोळ केल्यावर तिचे सर्व पाप माफ होतील.
  • Log in or register to post comments

एसटी कामगारा दिल्या पगारी सुखी राहा...

मदनबाण
Sat, 11/20/2021 - 11:22 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- रफ़्तार कुछ इस कदर तेज़ हुई है जिन्दगी की, कि सुबह का दर्द शाम को पुराना हो जाता है।
  • Log in or register to post comments

गांव तिथे रस्ता आणि रस्ता तिथे ST

मुक्त विहारि
Sat, 11/20/2021 - 11:32 नवीन
काही लोकांच्या मते मात्र, भूखंड तिथे श्रीखंड आणि श्रीखंड तिथे आम्ही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

शिवसेना सचिवांच्या स्वागताला फरार जिल्हा प्रमुख खांडेंची हजेरी

मुक्त विहारि
Sat, 11/20/2021 - 11:48 नवीन
https://www.loksatta.com/maharashtra/attendance-chief-khande-shiv-sena-secretary-ysh-95-2686001/ काय बोलावं ते सुचेना....
  • Log in or register to post comments

“लुटमार, हट्टीपणा, अहंकाराला.."राहुल गांधींचं शेतकऱ्यांना पत्र

मुक्त विहारि
Sat, 11/20/2021 - 12:04 नवीन
https://www.loksatta.com/desh-videsh/rahul-gandhi-writes-open-letter-farmers-promises-support-future-struggles-vsk-98-2686216/ आदरणीय माजी पंतप्रधान, कैलासवासी जवाहरलाल नेहरू यांच्या ह्याच गोष्टी मुळे, काश्मीरचा प्रश्र्न तयार झाला, चीनच्या ताब्यात तिबेट गेले...परमपूज्य राहुल गांधी, कधीकधी योग्य बोलतात....
  • Log in or register to post comments

रविकांत तुपकरांच्या शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण;

मुक्त विहारि
Sat, 11/20/2021 - 14:10 नवीन
https://www.loksatta.com/maharashtra/ravikant-tupkar-protest-turned-violent-protester-tried-to-burn-buldhana-tahasildar-car-scsg-91-2686294/ आता हे कृषीप्रेमी राज्य सरकार काय भुमिका घेते, हे बघणे रोचक ठरेल... ST कामगारांचा प्रश्र्न अजून सुटलेला नाही (कोणे एके काळी, महाराष्ट्र राज्यात, शेतकरी कामगार पक्ष, ह्या नावाचा एक पक्ष देखील होता... पुलोदच्या स्थापनेत, शेकापचा सहभाग होता.. आता, त्या काळांत शेकापने केलेल्या मदतीचा, एखाद्याला विसर पडला असेल... शेतकरी आणि कामगार, यांच्या आत्महत्यांना कोण जबाबदार?)
  • Log in or register to post comments

राजस्थान

चंद्रसूर्यकुमार
Sat, 11/20/2021 - 15:12 नवीन
महाराष्ट्र टाईम्समध्ये बातमी आली आहे- राजस्थानात राजकीय भूकंप. गेहलोत यांचे मंत्रीमंडळ सामूहिक राजीनामा देणार? https://maharashtratimes.com/india-news/rajasthan-cabinet-reshuffle-all-ministers-of-gehlot-cabinet-may-resign/articleshow/87813977.cms बातमी वाचली तर कुठचे काय. मंत्रीमंडळाची फेररचना करताना आधी सगळ्या मंत्र्यांचे राजीनामे घ्यायचे आणि ज्या मंत्र्यांना मंत्रीमंडळातून डच्चू द्यायचा आहे त्याच मंत्र्यांचे राजीनामे 'हे राजीनामे मान्य करा' अशा शिफारशीसह राज्यपाल/राष्ट्रपतींकडे पाठवायचे असे मंत्रीमंडळाची पुनर्रचना करताना मुख्यमंत्री/पंतप्रधान नेहमीच करतात. तेच राजस्थानात होत आहे असे दिसते. मग त्यात राजकीय भूकंप वगैरे म्हणून सनसनाटी निर्माण करायची काय गरज आहे?
  • Log in or register to post comments

मटा, लोकसत्ता, सकाळ आणि सामना....

मुक्त विहारि
Sat, 11/20/2021 - 16:47 नवीन
ह्यांचे राजकीय विश्र्लेषण वाचण्यात काहीच अर्थ नसतो, हे माझे वैयक्तिक मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

महाराष्ट्र सरकारकडून स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्कात कपात ...

मुक्त विहारि
Sat, 11/20/2021 - 20:18 नवीन
महाराष्ट्र सरकारकडून स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्कात ५० टक्क्यांची कपात https://www.loksatta.com/maharashtra/government-of-maharashtra-reduces-excise-duty-on-scotch-whiskey-by-50-percent-srk-94-2686606/ अधिकाऱ्याने सांगितले की, “आयात केलेल्या स्कॉचच्या विक्रीतून महाराष्ट्र सरकारला वर्षाला १०० कोटी रुपयांचा महसूल मिळतो. या कपातीमुळे सरकारचा महसूल २५० कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे कारण यामुळे एक लाख बाटल्यांवरून २.५ लाख बाटल्यांची विक्री वाढेल...... ------- माझ्या मते हे एका अर्थाने, व्यसनाला प्रोत्साहन आहे...
  • Log in or register to post comments

आता

माईसाहेब कुरसूंदीकर
Sat, 11/20/2021 - 21:21 नवीन
"आर्यन आणि अरबाज मर्चंट क्रूझवर स्वतंत्रपणे प्रवास करत होते, त्यांनी ड्रग्ज घेण्याची कोणतीही योजना आखल्याचा कोणताही पुरावा नाही. तसेच आर्यन खानच्या व्हाट्सअ‍ॅप चॅटमध्ये आक्षेप घेण्यासारखे काहीही नाही" मुंबई हायकोर्टाच्या जामीन आदेशात म्हंटले आहे. आता तरी पत्रकार 'भाऊ'/आबांनी वानखेडेचे गोडवे गाणे बंद करावे. केवळ नवाब मलिक आरोप करीत आहेत म्हणून भाजपा समर्थक अजूनही वानखेडे कसा निर्दोष आहे हे सांगण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. वास्तविक केंद्र सरकारने अंतर्गत माहिती काढुन त्याला तात्काळ निलंबित करायला हवे होते व चौकशी करून निर्णय घ्यायला हवा होता. वानखेडे खंडणी रॅकेट चालवतो हे आता उघड झाले आहे. https://www.loksatta.com/maharashtra/nawab-malik-serious-allegation-that-aryan-khan-was-kidnapped-for-ransom-srk-94-2686658/
  • Log in or register to post comments

हायकोटाच हे मत असेल तर मग

रात्रीचे चांदणे
Sat, 11/20/2021 - 21:48 नवीन
हायकोटाच हे मत असेल तर मग वानखेडेची चैकाशी होयलाच पाहिजे. एखादा अधिकारी आपल्या अधिकाराचा दुरूपयोग करत असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

सहमत आहे ....

मुक्त विहारि
Sat, 11/20/2021 - 22:48 नवीन
सहमत आहे ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

असं असेल तर उच्च न्यायालयाने

श्रीगुरुजी
Sat, 11/20/2021 - 21:57 नवीन
असं असेल तर उच्च न्यायालयाने अनेक अटी लादून (पारपत्र जप्त, दर शुक्रवारी हजेरी, माध्यमांशी बोलण्यास बंदी, मुंबईबाहेर जाण्यास बंदी इ.) त्याला जामिनावर का सोडले? तो निर्दोष आहे असा निकाल देऊन खटला निकालात का काढला नाही? जामिनावर सुटल्यानंतर एक आठवड्याने त्याला NCB ने नक्की कशाच्या चौकशीसाठी बोलाविले होते? त्यांनी जामिनपत्र वाचले नव्हते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

सामान्य माणसाला असे प्रश्र्न पडणे स्वाभाविकच आहे ....

मुक्त विहारि
Sat, 11/20/2021 - 22:47 नवीन
काही लोकांच्या मनांत असे प्रश्र्न येत नाहीत ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

भिवंडीत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या नऊ बांगलादेशींना अटक

मुक्त विहारि
Sat, 11/20/2021 - 22:57 नवीन
https://marathi.abplive.com/news/mumbai/mumbai-crime-nine-bangladeshis-arrested-in-bhiwandi-1013675/amp आता राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना काय कारवाई करणार? 1950च्या सुमारास, चीनला मदत करणार्या, कॉंग्रेस कडून, माझी तरी काही अपेक्षा नाही...
  • Log in or register to post comments

१९५०

माईसाहेब कुरसूंदीकर
Sun, 11/21/2021 - 00:22 नवीन
१९५०? हे असे किती मागे जाणार्?'स्वातंत्र्यलढ्यात सामील होउ नका' म्हणून सांगणार्या लोकांना गुरू मानणारे दिल्लीत सत्तेवर आहेत.दिल्ली-लाहोर बससेवा करून नंतर हात पोळून घेणारे, पाकिस्तानी पंतप्रधानाच्या वाढदिवशी अचानक जाणारे ..ह्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवायची? पण लोकशाही आहे.. लोकांनी निवडून दिले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

स्वातंत्र्यलढ्यात सामील होउ

रावसाहेब चिंगभूतकर
Sun, 11/21/2021 - 00:42 नवीन
स्वातंत्र्यलढ्यात सामील होउ नका
याचा रेफरन्स पाठवाल का?
स्वातंत्र्यलढ्यात सामील व्हा
म्हणून सांगणाऱ्यांचे शिष्य विरोधी पक्षात आहेत याचा ही रेफरन्स पाठवा. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

हम्म

माईसाहेब कुरसूंदीकर
Sun, 11/21/2021 - 09:57 नवीन
"Hindu nationalist parties like the Hindu Mahasabha openly opposed the call for the Quit India Movement and boycotted it officially" https://en.wikipedia.org/wiki/Quit_India_Movement RSS leaders met the secretary of the home department and “promised the secretary to encourage members of the Sangh to join the civic guards in greater numbers,”. The civic guards was set up by the imperial government as one of the “special measures for internal security.” https://thewire.in/history/rss-hindutva-nationalism
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रावसाहेब चिंगभूतकर

Claims in wikipedia and wire!

श्रीगुरुजी
Sun, 11/21/2021 - 11:00 नवीन
Claims in wikipedia and wire!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

पीएम केअर फंडात बेहिशोबी पैसे पडून;

मुक्त विहारि
Sun, 11/21/2021 - 11:39 नवीन
पीएम केअर फंडात बेहिशोबी पैसे पडून; मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत देण्याची संजय राऊतांची मागणी https://www.loksatta.com/desh-videsh/sanjay-raut-request-to-pm-narendra-modi-to-help-the-families-of-the-dead-farmers-farms-law-abn-97-2687022/ महाराष्ट्र राज्यातील, CM Care फंडातले पैसे संपले का? बहुतेक राज्य सरकारने ते सगळे पैसे, शेतकरी वर्गाला दिले असावेत...
  • Log in or register to post comments

अमरावतीत संचारबंदीमुळे व्यापाऱ्यांना 800 कोटींचा फटका?

मुक्त विहारि
Sun, 11/21/2021 - 20:06 नवीन
Amravati Voilance : हिंसाचार... निर्बंध... अन् शिथीलता; अमरावतीत संचारबंदीमुळे व्यापाऱ्यांना 800 कोटींचा फटका? https://marathi.abplive.com/news/maharashtra/amravati-voilance-curfew-relaxation-amravati-curfew-hits-traders-for-rs-800-crore-1013718 आता CM Care फंडातून व्यापारांना भरपाई, हे राज्य सरकार देणार का? अशी भरपाई दिली तर, महाराष्ट्र सरकारचा आदर्श केंद्र सरकार पण ठेऊ शकते. ---------
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

शिवसेनेचा शहरप्रमुख बायोडिझेल तस्करीचा मास्टरमाइंड?

मुक्त विहारि
Sun, 11/21/2021 - 11:49 नवीन
शिवसेनेचा शहरप्रमुख बायोडिझेल तस्करीचा मास्टरमाइंड?; धक्कादायक माहिती उघड https://maharashtratimes.com/maharashtra/ahmednagar-news/shiv-sena-ahmednagar-city-chief-dilip-satpute-in-biodiesel-illegal-sale-racket/articleshow/87800970.cms काय बोलावं ते सुचेना....
  • Log in or register to post comments

आम्ही करेक्ट कार्यक्रम केला...

मुक्त विहारि
Sun, 11/21/2021 - 11:59 नवीन
आम्ही करेक्ट कार्यक्रम केला, दोन वर्षांपूर्वीच महाराष्ट्र स्वातंत्र्य झाला https://www.esakal.com/maharashtra/shivsena-leader-sanjay-raut-taunts-kangana-ranaut-and-chandrakant-patil-in-nasik-obw94 ह्याची फळे महाराष्ट्रातील जनता अजून उपभोगते आहे 1. निवृत्त नौसैनिकाला मारहाण झाली 2. एका बाईला हरामखोर म्हटल्या गेले 3. शेतकरी वर्गाला पुरेशी भरपाई मिळाली नाही 4. ST कामगार संप सुरू आहे ... तात्पुरत्या कर्मचारी वर्गाला निलंबित केले ह्यालाच स्वातंत्र्य म्हणायचे असेल तर, आमची ना नाही ...
  • Log in or register to post comments

निलोफर

माईसाहेब कुरसूंदीकर
Sun, 11/21/2021 - 12:35 नवीन
समीर वानखेडे ह्याची लग्नपत्रिकाच आता बाहेर प्रसिद्ध झाली आहे. वडिलांचे नाव "दाउद्" असे स्पष्ट आहे. Image removed. वानखेडे कुटुंबियांचा भ्रष्टाचार व खोटेपणा चव्हाट्यावर येऊनही केंद्रातील सत्ताधारी समर्थक अजूनही वानखेडेचे समर्थन करताना दिसतात तेव्हा आश्चर्य वाटते.
  • Log in or register to post comments

आता समीर वानखेडेंचा जन्म

श्रीगुरुजी
Sun, 11/21/2021 - 13:04 नवीन
आता समीर वानखेडेंचा जन्म कोणत्या दवाखान्यात झाला, त्यावेळी सुईण कोण होती, नवजात बालकाचे वजन किती होते ही माहिती पण येऊ दे. मलिकांच्या कुटुंबात सर्वांनाच हर्बल तंबाखूचं व्यसन दिसतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

वैयक्तिक पातळीवर उतरले आहेत....

मुक्त विहारि
Sun, 11/21/2021 - 13:20 नवीन
त्यामुळे, जास्त मनांवर घ्यायचे नाही... मूळ प्रश्र्न बाजूलाच राहिला की, कुणाकडे किती अंमली पदार्थ मिळाले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

हम्म

माईसाहेब कुरसूंदीकर
Sun, 11/21/2021 - 14:12 नवीन
खंडणी रॅकेट चालवणे,कस्टडी वाढवायची धमकी देऊन पैसे उकळणे, मिळालेला पैसा दिल्लीत ज्येष्ठांना पाठ्वणे हे हर्बल तंबाखूपेक्षा घातक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

यातील एक तरी आरोपाचा पुरावा

श्रीगुरुजी
Sun, 11/21/2021 - 14:37 नवीन
यातील एक तरी आरोपाचा पुरावा आहे का? का नेहमीचीच फेकाफेकी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

खुद्द मुखमंत्र्यानी वाझे ची

रात्रीचे चांदणे
Sun, 11/21/2021 - 17:22 नवीन
खुद्द मुखमंत्र्यानी वाझे ची पाठराखण केली होती. वाझेला अतिशय घाई करून परत नौकरीवर घेण्यात आलंय. हाच वाझे पोलीस दलातून काढल्यानंतर सेनेचा कार्यकर्ता म्हणून काम करत होता. वाझे ला फक्त पोलीस दलात घेतलाच नाही तर महत्वच्या केसेस पण दिल्या होत्या. वाझे प्रकरण हर्बल तंबाखूपेक्षाही भयंकर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

तपास

माईसाहेब कुरसूंदीकर
Sun, 11/21/2021 - 17:46 नवीन
तपास ई.डी/सी बी आय करत आहेच ना ? ज्याला केंद्राने बेल्जियमला पळून जाण्यास मदत केली तो परमबीर भारतात आला का ? कारण खंडणीचे आरोप त्यानेच केले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

अजून एक फेक आरोप? परमबीर

श्रीगुरुजी
Sun, 11/21/2021 - 19:12 नवीन
अजून एक फेक आरोप? परमबीर बेल्जियमला पळून गेलेत याचा काही पुरावा आहे का? आधीच्या ३ आरोपांचाही काही पुरावे आहेत का? तुमचे हे आरामखुर्चीत झुलत "सामना"ची रोज अगणित पारायणे करतात असं दिसतंय. त्याशिवाय असा हवेत गोळीबार होणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

काही लोकांना ....

मुक्त विहारि
Sun, 11/21/2021 - 19:26 नवीन
द्राणाचार्यांनी संजीवनी विद्या, लक्ष्मणाला बरे करण्यासाठी आणली, हे देखील पटते .... बाबा वाक्यं प्रमाणं.... अशी मनोवृत्ती असलेली माणसे कमी नाहीत ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

परमबीर सिंह भारतातच; 48 तासांत हजर होतील; वकिलाचा दावा,

मुक्त विहारि
Mon, 11/22/2021 - 18:55 नवीन
परमबीर सिंह भारतातच; 48 तासांत हजर होतील; वकिलाचा दावा, ------- https://marathi.abplive.com/news/india/supreme-court-grants-interim-protection-to-paramveer-singh-1014012/amp ------ आज की ताज़ा ख़बर .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

तपास ई.डी/सी बी आय करत आहेच

रात्रीचे चांदणे
Sun, 11/21/2021 - 19:33 नवीन
तपास ई.डी/सी बी आय करत आहेच ना ? ई. डी./ सी बी आय तपास करेलच पण तो खुनाचा आणि खंडणीचा करेल. पण त्याला इतक्या घाईने पोलीस दलात नक्की कोणाच्या सांगण्यावरून घेतले आणि लगेच महत्वाच्या केसेस कश्या मिळाल्या ह्याचा तपास होणार नाही. वझेला पोलीस दलात परत घेण्याचा कार्यक्रम एका रात्रीत पार पडला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

वाझे चा तपास ईडी / सिबीआइ करत

सुक्या
Tue, 11/23/2021 - 05:39 नवीन
वाझे चा तपास ईडी / सिबीआइ करत आहे आणि ते जर बरोबर आहे; तर ईडी / सिबीआइ बाकी ठिकाणी तपास करते ते कसे काय चुकीचे? उगाच एक म्हण आठवली "राधासुता, तेव्हा कुठे होता तुझा धर्म?" अजुन एक वचन आठवले "वाझे काय लादेन आहे काय?" बाकी चालु द्या ... "गिरे भी तो टांग उपर" असाही एक वाक्प्रचार आठवला ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

माईसाहेब .. परमबीर भारतात

सुक्या
गुरुवार, 11/25/2021 - 12:19 नवीन
माईसाहेब .. परमबीर भारतात आले की हो परत. बेल्जियमवाल्यांनी परत पाठवले की काय? काही सेटल्मेंट झाली काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

काही लोकं....

मुक्त विहारि
गुरुवार, 11/25/2021 - 12:27 नवीन
सामना वाचून आपली मते ठरवतात... आमची एक रूपयांत झुणकाभाकर खाऊन झाली आहे .... त्यामुळे, सामना वाचून मत ठरवणे, मी बंद केले आहे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

बेल्जियम

सॅगी
गुरुवार, 11/25/2021 - 17:30 नवीन
बेल्जियम महाराष्ट्रात सामील झाले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

रिलायन्स-अरामकोचे डील फिस्कटले! आता नवीन कंपनी स्थापन करणार;

मुक्त विहारि
Sun, 11/21/2021 - 19:11 नवीन
रिलायन्स-अरामकोचे डील फिस्कटले! आता नवीन कंपनी स्थापन करणार; मुकेश अंबानींचा मेगा प्लान ------- https://www.lokmat.com/photos/business/setback-mukesh-ambani-reliance-re-evaluate-saudi-aramco-deal-15-billion-dollars-cancelled-a719/amp/ ------ ह्याचे दूरगामी परिणाम, सामान्य माणसावर देखील कळतनकळत होण्याची शक्यता आहे...रेफरन्स =====> हा तेल नावाचा इतिहास आहे आणि एका तेलियाने आणि YASREF Refinery.... तेल गेले, लिथियम गेले, डोकी आली डोकेदूखी चीनला 1950च्या सुमारास, जवाहरलाल नेहरूंनी केलेल्या मदतीची, ही परतफेड आहे...
  • Log in or register to post comments

कारण विरोध नक्की कशाला होता

चौकस२१२
Mon, 11/22/2021 - 04:16 नवीन
कारण विरोध नक्की कशाला होता तेच मला कळलेले नाही. आजचा समोरच्या गाडीवर स्टिकर निरखून वाचले .. फार्मर क्लब ऑस्ट्रेलिया इंग्रजीत आणि गुरुमुखीतून लिहलेलं आणि गाडीवर निळे भाल्याच्या आकाराचे "निहँग" चिन्ह... त्यामुळे हे आंदोलन फक्त फूस लावलेले भारत आणि "अंदारकी बात" हिंदू विरोधी शीख करीत आहेत हे परत स्पष्ट झाले
  • Log in or register to post comments

वानखेडेचा

माईसाहेब कुरसूंदीकर
Mon, 11/22/2021 - 10:30 नवीन
वानखेडेचा खोटेपणा अधिकाधिक बाहेर येत चालला आहे. मुस्लिम असूनही 'हिंदू महार' जात दाखवुन ह्याने नोकरी मिळवल्याचे दिसतय. Image removed. २०-२५ हजार पानांचा गठ्ठा घेऊन मीडिया समोर येणारे किरीट सोमैय्य्या कुठे गेले? ते नवाब मलिकांचा भ्रष्टाचार बाहेर काढणार होते ना?
  • Log in or register to post comments

तसं असेल तर मलिकने योग्य त्या

श्रीगुरुजी
Mon, 11/22/2021 - 11:35 नवीन
तसं असेल तर मलिकने योग्य त्या तपास यंत्रणांकडे अधिकृत तक्रार दाखल करावी. सरकारी खर्चाने दुबईला सहलीला जाऊन तेथून रोज वानखेडेंची बदनामी करीत राहणे अत्यंत निषेधार्ह आहे. माझ्या ओळखीतील एका ख्रिश्चन मुलीचे लग्न एका केरळी हिंदू मुलाशी झाले होते. लग्नापूर्वी ती हिंदू झाली व लग्न श्रीकृष्ण मंदिरात हिंदू पद्धतीने झाले. दुसऱ्या दिवशी स्वागत समारंभात एका चर्चचा पाद्री उपस्थित होता. त्याने बायबलमधील काही ओळी म्हटल्या. नंतर ख्रिश्चन पद्धतीप्रमाणे सूट परीधान केलेला नवरा व पांढरा वेडिंग गाउन परीधान केलेली वधू आपापल्या आईवडीलांसमवेत बाहेरून आत आले तेव्हा त्यांच्यावर फुले टाकली जात होती. नंतर व्यासपीठावर जाऊन ते पाद्र्याशेजारी उभे राहिल्यावर त्याने अजून काही बायबल वचने म्हटली. या समारंभाचे फोटो पाहिले तर कोणीही म्हणेल की नवरा मुलगा ख्रिश्चन आहे. असो. समीर वानखेडे मुस्लिम असला तरी त्याने ड्रग केसमध्ये काय फरक पडतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

चाल ?

धर्मराजमुटके
Mon, 11/22/2021 - 12:03 नवीन
समीर वानखेडेंनी खोट्या जात प्रमाणपत्रावर नोकरी मिळविली असेल तर त्यांना सेवेत बडतर्फ करता येईल आणि एकदा खोटा तो आयुष्यभर खोटा या तत्त्वाने आर्यन खान प्रकरण निकालात निघेल असा काहीतरी प्लन वैयक्तीक खोदकामामागे असावा. आर्यन केसचे काय होईल हा त्यांच्या लेखी दुय्यम मुद्दा असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

ज्याने

माईसाहेब कुरसूंदीकर
Mon, 11/22/2021 - 12:52 नवीन
ज्या काशिफ खाने ही पार्टी आयोजित केली होती त्याची साधी चौकशी केली नाही. हा काशिफ खान फॅशन टी.व्ही.चा मुख्य आहे. आदिल नावाचा एक पंच वानखेडेच्या अनेक केसेस मध्ये दिसतो. किरण गोसावी नामक ठगाला वानखेडेने कामाला ठेवले होते. ५० लाखाची देवाण घेवाण झाली त्याची पूर्ण माहिती प्रभाकर साईल ह्या गोसावीच्या ड्रायव्हरने पोलिसांना दिली आहे. आर्यन खानला पकडुन आणणार्या गोसावीचा एन सी बी शी संबंध काय ह्याचे स्पष्टिकरण एन सी बीने दिलेले नाही. वानखेडेचे पैसे उकळण्याचे धंदे दिल्लीत ग्रुहमंत्रालयाला/एन सी बी मुख्यालयाला माहित नाहीत ह्यावर शेंबडे पोरही विश्वास ठेवणार नाही. https://thewire.in/government/witness-another-ncb-case-claims-sign-blank-papers-sameer-wankhede
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

समीर वानखेडे भ्रष्ट आहे की

सुबोध खरे
Wed, 11/24/2021 - 10:31 नवीन
समीर वानखेडे भ्रष्ट आहे की नाही हा मुद्दा वेगळा असून त्याने कारवाई केलेले लोक गुन्हेगार आहेत कि नाहीत हा मुद्दा साफ वेगळा आहे. समीर वानखेडे गुन्हेगार आहेत म्हणून नवाब मलिक ज्यांची पाठराखण करत आहेत ती माणसे निर्दोष आहेत असे नाही. या दोन्ही बाबी समांतर आहेत/ त्यांचा एकमेकांशी असलाच तर बादरायण संबंध आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा