Skip to main content

ताज्या घडामोडी नोव्हेंबर २०२१- भाग २

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी बुधवार, 17/11/2021 20:32 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात १५० प्रतिसाद झाल्यामुळे नवा भाग काढत आहे. गोव्यातील पोरी (Poriem) मतदारसंघातून २०१७ मध्ये माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणेंविरूध्द निवडणुक लढवून पराभूत झालेले भाजपचे विश्वजीत राणे यांनी भाजप सोडून आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. प्रतापसिंग राणेंच्या चिरंजीवांचे नावही विश्वजीतच आहे. ते भाजपमध्ये आहेत आणि राज्य सरकारमध्ये मंत्रीही आहेत. नामसाधर्म्यामुळे सुरवातीला वाटले होते की त्यांनीच आपमध्ये प्रवेश केला की काय. पण दुसर्‍या विश्वजीत राणेंनी पक्ष सोडला आहे. एकंदरीत गोव्यात भाजपचे तितके सोपे दिसत नाही. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा मान्द्रेमधून काँग्रेसच्या दयानंद सोपटे यांनी दणदणीत पराभव केला होता. २०१९ मध्ये जे काँग्रेसचे १० आमदार भाजपमध्ये सामील झाले त्यात हे दयानंद सोपटे होते. आता मान्द्रेमधून आपल्याला उमेदवारी मिळेल याची खात्री दयानंद सोपटेंना आहे तर लक्ष्मीकांत पार्सेकर सुध्दा आपला दावा सोडायला तयार नाहीत असे दिसते. एकेकाळी याच पार्सेकरांनी रमाकांत खलप यांच्यासारख्या मातब्बर नेत्याचा मान्द्रेमधून एकदा नाही तर दोनदा पराभव केला होता. पण त्यांचा २०१७ मध्ये दयानंद सोपटेंनी तब्बल २५% मताधिक्याने पराभव केला. त्यामुळे दोघेही आपला दावा सोडायला तयार दिसत नाहीत. इतक्या घाऊक प्रमाणात काँग्रेसमधून आमदार आयात केल्यानंतर ही डोकेदुखी भाजपला नक्कीच होणार होती. त्याचप्रमाणे विधानसभेचे माजी अध्यक्ष अनंत शेट यांचे मागच्या वर्षी निधन झाले. त्यांचे बंधू प्रेमेन्द्र शेट यांनी महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षात प्रवेश केला आहे. अनंत शेट उत्तर गोव्यातील मये मतदारसंघातून निवडून यायचे. त्याचप्रमाणे उत्तर गोव्यातील कळंगूटचे आमदार मायकेल लोबो यांनीही भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. उत्तर गोव्यातीलच म्हापसा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून माजी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसूझा अगदी आरामात निवडून येत असत. ते मनोहर पर्रिकरांचे मित्र होते आणि पर्रिकरांच्या आग्रहावरूनच ते भाजपमध्ये आले होते. मनोहर पर्रिकरांचे निधन झाले त्यापूर्वी दीड-दोन महिने या फ्रान्सिस डिसूझांचेही कर्करोगानेच निधन झाले. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचा मुलगा जॉशुआ अगदी थोडक्यात जिंकला होता. त्यावेळी भाजपने पर्रिकरांची विधानसभा जागा- पणजी पण गमावली होती. पणजी हा १९९४ पासून भाजपचा बालेकिल्ला होता आणि मनोहर पर्रिकरांचे निधन झाल्यानंतर दोन महिन्यातच झालेल्या पोटनिवडणुकीत देशात प्रचंड मोदी लाट असतानाही ती जागा भाजपने गमावली होती. तेव्हा सांगायचा मुद्दा हा की ज्या उत्तर गोव्यात भाजप बळकट होता तिथेच वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये अशाप्रकारच्या प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. या पडझडीला पर्रिकरांच्या शेवटच्या टर्ममध्येच सुरवात झाली होती हे पणजीतील पराभवावरून समजतेच. त्यातही जर बाबूश मोन्सेराटसारख्या फालतू आणि घाणेरड्या माणसाला भाजपने घरी घेतले असेल तर they deserve to lose. पण विरोधी पक्ष तितका प्रबळ राहिलेला नाही त्या कारणानेच भाजपला विजय मिळाला तर मिळू शकेल. अन्यथा गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाचे कठिण आहे. मला स्वतःला गोवा हे राज्य प्रचंड आवडते त्यामुळे या निवडणुकांमध्ये मी खूप जास्त रस घेत आहे. जशाजशा नवीन घडामोडी होतील त्याप्रमाणे इथे लिहिनच.

वाचने 57164
प्रतिक्रिया 256

प्रतिक्रिया

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

दुष्ट मोदी सरकारला हरवणे हाच एक अजेंडा होता .. बाकी शेतकऱ्यांची प्रगती वगेरे होतेच आहे .. ६० वर्षांपासुन ... मोदी त्याला खोडा घालत होते . .

In reply to by सुक्या

नवरा मेला तरी चालेल पण सवत रंडकी झाली पाहिजे या म्हणीचा अर्थ आज नव्याने कळला.

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

IT Department Raids In Nashik: नाशिकमध्ये खळबळ; कांदा व्यापाऱ्यांकडे सापडले घबाड; २५ कोटी जप्त, 'ते' ७५ कोटी कुठे गेले? https://www.google.com/amp/s/maharashtratimes.com/maharashtra/nashik/in… दलाल तुपाशी आणि शेतकरी उपाशी ...

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

नवरा मेला तरी चालेल पण सवत रंडकी झाली पाहिजे या म्हणीचा अर्थ आज नव्याने कळला.
ही चपखल म्हण पहिल्यांदाच ऐकली. आणखी अशा म्हणींचा एक स्वतंत्र धागा काढावा ही विनंती.

तीन कृषीकायदे रद्द करायचा निर्णय जाहीर करून नेहमीप्रमाणे मोदींनी धक्कातंत्राचा वापर केलेला दिसतो. मला व्यक्तिशः हा निर्णय आवडलेला नाही. आता सी.ए.ए मागे घ्या, ३७० परत आणा वगैरे मागण्या घेऊन आंदोलने होतील. आंदोलने करून मोदी सरकार झुकते हा संदेश गेला आहे हे चुकीचे झाले आहे. तसे असेल तर मग मुळात हे कायदे आणलेच का हा पण प्रश्न पडतो. पडद्याआड आपल्याला माहित नसलेल्या काही गोष्टी चालू असतील अशी अपेक्षा करू. हे कायदे शेतकर्‍यांच्या हिताचेच आहेत असे मोदी म्हणाले पण ते शेतकर्‍यांच्या हिताचे आहेत हे त्यांना समजावून देऊ शकलो नाही असेही ते म्हणाले. शेतकर्‍यांसाठी एक प्रामाणिक प्रयत्न मात्र सरकारने केला असे वाटते. कदाचित यानंतरच्या काळात दलाल लोक कशी शेतकर्‍यांची पिळवणूक करतात हे दिसून आले तर सामान्य शेतकर्‍यांमधूनच हे कायदे आणा अशी मागणी होईल ही अपेक्षा आहे का? समजत नाही. दुसरे म्हणजे ज्या शेतकर्‍यांच्या हितासाठी हे कायदे आणले होते त्यांनाच ते समजत नसेल (किंवा मध्यस्थांच्या आंदोलनाला ते विरोधही करत नसतील) तर मग त्यांच्यासाठी, त्यांच्या आंदोलनामुळे इतरांनी त्रास का सहन करायचा हा पण प्रश्न आहेच. यापुढे शेतकर्‍यांची परिस्थिती वाईट म्हणून कोणी रडगाणी गायला लागले तर त्यांना फाट्यावर मारावे. तुमची परिस्थिती सुधारायला हे कायदे आणले होते ते तुम्हाला समजत नसेल आणि त्याउपर तुम्ही रडगाणे गात असाल तर मात्र तुमच्याविषयी अजिबात सहानुभूती नाही. राज्यकर्त्यांना काही प्रसंगी चार पावले मागे यावे लागते (जसे कंदाहार विमान अपहरण प्रकरणात करावे लागले). प्रश्न तो नाही. त्यानंतर तो राज्यकर्ता काय करतो हे महत्वाचे. वाजपेयींनी कंदाहार विमान अपहरण प्रकरणानंतरही दहशतवाद्यांवर कडकडून कारवाई केली असे दिसले नाही. तेव्हा त्यावेळी मागे घेतलेली चार पावले थेट संसदेवरील हल्ल्यापर्यंत गेली. नेहरूंनाही अभिप्रेत असलेले हिंदू कोड बिल अंमलात आलेच नाही. त्यावेळी त्यांनाही ती माघार घ्यावी लागली होतीच. त्याविषयी नंतरही काही झाले नाही. या इतिहासाची पुनरावृत्ती होणार का हे बघायला हवे. आता कृषीकायद्यांवर माघार घेऊन दुसर्‍या कोणत्यातरी आघाडीवर (कदाचित समान नागरी कायदा?) मुसंडी मारली तर ठीक आहे नाहीतर वाजपेयी-नेहरूंप्रमाणे मोदीही बोटचेपे पंतप्रधान म्हणून इतिहासात गणले जातील. दुसरे म्हणजे या कायद्याच्या विरोधातील आंदोलने चालू असतानाच पंजाबमध्ये काँग्रेसमध्ये अमरिंदरसिंग बाहेर पडल्याने पोकळी निर्माण झाली आहे. त्या पोकळीचा फायदा आम आदमी पक्षाला व्हायची शक्यता आहे ही परिस्थिती आहे. २०१७ च्या विधानसभा निवडणुकांच्या वेळेस प्रचाराच्या दरम्यान केजरीवाल एका माजी खलिस्तानी दहशतवाद्याच्या घरी उतरले होते ही गोष्ट जगजाहीर आहे. त्यामुळेच काँग्रेसमागे हिंदू कॉन्सॉलिडेशन झाले आणि २०१७ मध्ये काँग्रेसला अपेक्षेपेक्षा मोठा विजय मिळाला. खलिस्तानी तत्वांनी 'सार्वमत २०२०' ही टूम आणली होती. त्याला आपचे नेते आणि पंजाब विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुखपालसिंग खैरा यांनी समर्थन दिले होते. https://www.hindustantimes.com/punjab/khaira-s-support-to-referendum-20… काहीही झाले तरी आम आदमी पक्ष आणि त्यांचे खलिस्तानी समर्थक असल्या तत्वांच्या हातात पंजाबसारख्या राज्याची सत्ता जायला नको. खलिस्तानी दहशतवादाचे थैमान काय असते हे देशाने १९८० च्या दशकात अनुभवले आहे. त्याची पुनरावृत्ती होण्याची भिती असेल तर ते थांबवायलाच हवे. कृषीकायद्यांवर चार पावले मागे येऊन पंजाबला आणि देशाला त्या धोक्यापासून वाचवायचे हा पण दुसरा उद्देश आहे का? शेवटी अमरिंदरसिंगांनी भाजपबरोबर येण्यासाठी हे कायदे मागे घ्यायची अट ठेवली होती. समजत नाही. पण या आंदोलनाच्या निमित्ताने खलिस्तानी तत्वे घुसायचा प्रयत्न करतील याचा अंदाज बांधण्यात मोदी सरकार अपयशी ठरले हे पण तितकेच खरे. बघू पुढे काय होते ते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

कायदे मागे घेऊन अमरिंदरसिंगांशी युती करण्यातील एक अडथळा मोदींनी दूर केला आहे. कदाचित हा यामागील दुसरा उद्देश असावा.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

मुळात मला हे कायदेच पटलेले नाहीत. अत्यंत vague, अर्धवट, नॉन सिरीयस आणि extreme असे कायदे होते. (आता स्टेप बाय स्टेप रिफॉर्मस् आणावेत आणि बांधा आणि सुधारा मोड ने व्यवस्था बनवण्याचे काम करावे मोदी हे करू शकतात) दीड अब्ज लोकांचा देश आहे, खाटकाचे दुकान नव्हे की झटक्यात मुंडके तोडावे प्रत्येक गोष्टीचे स्पष्ट काही उल्लेखच नव्हते प्रोव्हिजन्सचे असे वाटते. "माझ्या स्वप्नातील शेती" या विषयावर निबंध लिहिल्यागत निर्देशात्मक स्वरूपाचे कायदे होते मार्गदर्शक तत्वे अशी असू शकतात, कायदे नाही आता सरकारला आंतरराष्ट्रीय स्तरावर wto सोबत डील करावे लागेल मात्र! ते लोक msp वगैरे सगळ्या सिस्टम्स् ना सुद्धा सबसिडीच कंसिडर करतात Externally खूप मोठे प्रेशर तर असले कायदे करण्याकडे आहे WTO ने सरकारला msp देण्यापासून अश्व लावले आहेत बाली कॉन्फरन्स मध्ये वगैरे काँग्रेस काळापासून फार मॅटर सुरू आहेत हे. ओबामा ला पटवून हे इतके दिवस रेटले होते. मुळात रेटण्याची मुदत पण संपली आहे म्हणून कायदे वगैरे आणलेत घाईत. अर्थात सरकारवर अप्रस्तुत टीका करण्याचा मानस नाही माझा, सरकारने प्रयत्न केला पूर्ण पण चुकले, आता चुका सुधारून टप्प्याटप्प्याने सुधारणा आणाव्यात शेतीत हीच अपेक्षा आहे, अपेक्षा आहे कारण ह्या सरकारमध्ये ते करण्याची निर्णयक्षमता आणि नियत दोन्ही आहे, फक्त घिसाडघाई टाळून तोलूनमापून बदल आणावेत एकदम बोकांडी बसले का बदल कठीण जातात समाजाला.

In reply to by जेम्स वांड

त्रुटी असतील तर असे म्हणू आपण कि मोदी सरकार ने नीट समजवून सांगतले नाही पण एक उप मुद्दा कि जो राष्ट्रीय सुरक्षा आणि भारताची जगातील प्रतिमा या बरोबर जोडलेला आहे त्याबद्दल भारतात राहणाऱ्यांना कल्पना आहे कि नाही? भारताबाहेर अक्षरशः हे जणू शीख धर्मीय आणि त्याच्या विरोधी भाजप ( हिंदूवादी ) सरकार असे चित्र रंगवला जातंय आणि त्यात मुख्यतेव शीख बंधूच ( बंधू !) आहेत .. शेतकरी जर त्रासाला असेल तर इतर राज्यात का नाही प्रचंड विरोध? गुरुमुखीत पाट्या का? निहँग झेंडा का? मला तरी ऑस्ट्रेल्यात हे फार जाणवले .. खास करून मंध्यंतरीत झालेलया सार्वजनिक भारतीय समारंभहत सोशल मीडिया वर तर काय विचारूच नका आणि त्यात येथील डावे ( त्यातील अति डावे ) तर काय तारे तोंडत होते ...

कदाचित यानंतरच्या काळात दलाल लोक कशी शेतकर्‍यांची पिळवणूक करतात हे दिसून आले तर सामान्य शेतकर्‍यांमधूनच हे कायदे आणा अशी मागणी होईल ही अपेक्षा आहे का?
निदान पुढचे 10 वर्षे तरी शेतकऱ्यांबद्दल काही कायदे आणायचे धाडस मोदी सरकार करेल असे वाटत नाही (कदाचित 20-25 वर्षे सुद्धा). त्या दरम्यान दुसरे सरकार असेल तर तेही या प्रश्नांना हात घालेल असे वाटत नाही. या चांगल्या गोष्टींना विरोध करून शेतकऱ्यांनी आपल्याच पायांवर धोंडा पाडून घेतला आहे असे म्हणावे का? थोडक्यात म्हणजे शेतकरी दलालांचे गुलाम राहणारच असे निदान सध्या तरी वाटत आहे. बाकी MSP बद्दल पूर्वी जे चालू होते ते पुढे ही चालू रहाणार. म्हणजे MSP कागदावर असेल पण सर्व शेतकऱ्यांना ती देणे सरकारला शक्य ही नाही आणि त्याची गरज ही नाही. विका आता तुमचा माल दलालांनाच.

In reply to by सॅगी

मी आधीच लिहिलंय की हे कायदे मागे घेण्याचा चुकीचा निर्णय घेतल्याने हे फेक आंदोलक आता अजून माजतील व नवीन मागण्या सुरू करतील.

In reply to by सॅगी

तुम्ही कुणी लिहिले आहे? ह्याचा विचार न करता, काय लिहिले आहे? हे ओळखता.... मला अशीच अशिक्षित माणसे आवडतात... अशिक्षित मागतांना शंका फार ... ये सुसाट क्या है?

https://zeenews.india.com/marathi/world/america-gave-shocked-to-pakista… पॉलिटिकोचे वरिष्ठ परराष्ट्र व्यवहार वार्ताहर नहल तुसी यांनी ट्विट केले आहे की, "भारतातील मुस्लिमांवरील हिंसाचार वाढत असतानाही, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी CPC च्या धार्मिक स्वातंत्र्यासाठी 'विशेष चिंतेचा देश' या यादीतून भारताला दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अमरावती दंगल, आझाद मैदान दंगल, मालेगाव दंगल, मुजफ्फरपुर दंगल कुणी सुरू केली? अर्थात, माझ्या सारख्या अडाणी, अशिक्षित सर्वसामान्य शेतकर्याच्या मनांत ज्या शंका येतात, त्या इतरांच्या मनांत येतीलच, असा हट्टाहास नाही...

मोदींनी २ पावले मागे टाकली... शिख समुदायाच्या पवित्र दिवशी ही घोषणा करण्यात आली. या किसान आंदोलनात पाकिस्तान प्रायोजित प्रोजेक्ट खलिस्तानने देखील शिरकाव केलेला आपल्या देशातील लोकांनी पाहिला. या संदर्भात काही जुन्या बातम्या देत आहे. किसानों के हक की लड़ाई में घुसे खालिस्तान समर्थक, सिंघु बार्डर पर लगे हैं पोस्टर किसान आंदोलन की आड़ में देश के खिलाफ जहर उगल रहा खालिस्तानी गैंग, स्वतंत्रता दिवस के लिए बना रहा बड़ी प्लानिंग किसान आंदोलन में खालिस्तान के समर्थन का आरोप, भिंडरावाला की तारीफ करने वाली किताबें बांटी गईं कौन है मो धालीवाल, जिसकी बनाई टूलकिट थनबर्ग ने शेयर की थी? क्या है उसका खालिस्तान कनेक्शन? जानें सबकुछ इतक्या घटना, बातम्या आणि पुरावे असताना, जे लोक खलिस्तानी या आंदोलनात नव्हते असा दावा करतात ते देशद्रोही विचाराचे प्रतिनिधित्व करतात आणि माझ्या लेखी असे लोक देशद्रोहीच आहेत.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- बेशुमार जख्मों की मिसाल हूं मैं, फिर भी हंस लेता हूं कमाल हूं मैं.

In reply to by मदनबाण

. या किसान आंदोलनात पाकिस्तान प्रायोजित प्रोजेक्ट खलिस्तानने देखील शिरकाव केलेला आपल्या देशातील लोकांनी पाहिला जगभर तेच ... आणि कदाचित भारतापेक्षा जास्त हिरीरीने येथील शीख त्यात होते ... शिखांचाय प्रति असलेला आदर आता शून्यकडे वाटचाल करू लागलाय

In reply to by चौकस२१२

शिखांचाय प्रति असलेला आदर आता शून्यकडे वाटचाल करू लागलाय
इंदिरा गांधी- संजय गांधी- झैलसिंग यांनी लावलेल्या विषारी वृक्षाची फळे आहेत ती. मुळात शीख पंथाची स्थापना मोंगलांपासून हिंदू धर्माचे रक्षण करायला झाली होती. हिंदू कुटुंबांमधील मोठा मुलगा शीख पंथाची दिक्षा घ्यायचा आणि बाकीची भावंडं हिंदूच राहायची हा प्रकार अगदी दोन तीन पिढ्यांपूर्वीपर्यंत चालू होता. आताच्या पिढीच्या पंजाबी हिंदूंमध्ये आजी किंवा आजोबांचा भाऊ आणि त्याचे कुटुंब शीख असे कित्येक ठिकाणी बघायला मिळेल. त्यामुळे खरं तर शीख आणि हिंदू मुळात वेगळे नाहीतच. फाळणीच्या वेळेस झालेल्या दंगलींमध्ये हिंदूंइतकाच- खरं तर हिंदूंपेक्षा जास्त त्रास शीखांना झाला होता. मुसलमानांसाठी वेगळा पाकिस्तान मिळाला त्याप्रमाणे शीखांसाठी वेगळा देश मिळायला हवा अशी मागणी करणारी तत्वे पंजाबमध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच होती. अशी कट्टर तत्वे सगळीकडे बघायला मिळतात. पण त्यांना शीख समुदायात व्यापक समर्थन नव्हते. आपल्या घाणेरड्या राजकारणासाठी इंदिरा गांधींनी ती तत्वे मोठी केली. त्या विषवल्लीला लागलेली ही फळे आहेत. पिढ्यानपिढ्या आणि ऐतिहासिक काळापासून कधीच वेगळे नसलेल्या शीखांबरोबर दुरावा निर्माण झाला. आणि आपले पूर्वज ज्यांच्याशी पिढ्यानपिढ्या लढले तेच लोक आता त्यांना आपले वाटायला लागले असतील तर ते त्यांच्याविषयीचा आदर कमी व्हायचे कारण नक्कीच असू शकते आणि आहे. इतिहासात फार मागे जायची गरज नाही. फाळणीच्या वेळेस झालेल्या दंगलींमध्ये इस्लामिक दहशतवादामुळे कोणीनाकोणी नातेवाईक न गमावलेली फारच थोडी शीख कुटुंबे असतील. तरीही परत तेच लोक त्यांना आपले वाटत असतील तर अशा तत्वांविषयी जराही सहानुभूती वाटायचा प्रश्नच नाही. पण या सगळ्या दुराव्याची सुरवात इंदिरा गांधींनी केली हे पण तितकेच खरे. हा सगळा प्रकार बघितला तर खरं तर इंदिरा गांधी म्हणजे भारताच्या एक वाईट पंतप्रधान होत्या. (सर्वात वाईट पंतप्रधान कोण यासाठी नेहरू, इंदिरा गांधी आणि मनमोहनसिंग यांच्यात अगदी चुरशीची स्पर्धा असेल). त्यांनी स्वतः भस्मासूर उभे केले आणि पोसले. तेच पुढे उलटले आणि त्यांनीच इंदिरा गांधींची हत्या केल्यावर त्याच इंदिरा गांधींना लोक हुतात्मा वगैरे कसे काय म्हणू शकतात समजत नाही.

In reply to by मदनबाण

जाणत्या राजाच्या काळात किंवा त्यांचा पक्ष सत्तेत असताना बहुतेक आंदोलने चिरडलीच आहेत (गोवारी / मावळ). त्यामुळे यातही जास्त काही अपे़क्षा नाही. काल तर उघड धमकी दिली आहे सुत गिरणी कामगारांचे उदाहरण देउन. म्हणे विकेंद्रीकरणाचा फायदा झाला. बाकी त्यांना जिथे मलीदा खाता येतो त्याचे मात्र विकेंद्रीकरण होता कामा नये. बिळासाहेब पट्टी लाउन बसले आहेत की त्यांच्या मुसक्या बांधल्या आहेत ते माहेत नाही. काल म्हणे कृषीकायदे रद्द झाले त्याची प्रतिक्रिया द्यायला आले होते ...

In reply to by मदनबाण

सहज खोदले तर अजुन एक धक्कादायक बाब समजली . . . महराष्ट्र शासन प्रवासी कर म्हणुन १७.५ टक्के महामंडळाकडुन वसुल करते. म्हणजे हा कर सरकार जमा होतो. त्या वर महामंडळाचा काहीही हक्क नाही. महामंडळाकडे कर्मचार्‍यांचे पगार देण्यासाठी पैसे नसले तरी हा कर शासनाला द्यावाच लागतो. शासनाचे उत्पनाचे ते एन साधन आहे. बाकी जिथे पैसा आहे तिथे आताचे सरकार माघार घेत नाही हे मात्र खरे . . (पेट्रोल वर चा कर अद्याप कमी झाला नाही. उपमुख्यमंत्रा स्प्ष्ट बोलले आहेत. तो कर सरकार चे उत्पन्न आहे ... कमी होणार नाही. त्यात हा कर. महामंडळ भिकेला लागले तरी चालेल पण आम्ही कर सोडणार नाही)

In reply to by सुक्या

त्यात धक्कादायक काय आहे ? कोणत्याही इंडायरेक्ट टॅक्स वर सरकारचाच हक्क असतो. तुम्ही लोकांकडून घेतलेला gst चा पैसा सुद्धा स्वतःसाठी वापरू शकता नाही.

In reply to by कॉमी

नाही धक्कादायक असे काही नाही .. टॅक्स वर सरकारचाच हक्कच असतो. पण तो कसा वापरावा याचाही विचार व्हावा ... साखर कारखाने भ्रष्टाचाराच्या गाळात बुडाले तरी त्यांचे कर्ज माफ होते. सरकार कडुन अनुदान दिले जाते. शेतकर्‍याचे कर्ज दर वर्षी माफ होते. कमी दराने वीज वापरायला मिळते. मग जे महामंडळ कर्मचारी लोकांना पगार देउ शकत नाही त्याला मदत म्हणुन त्याला टॅक्स सवलत का देउ शकत नाही? तसा विचार तरी केला आहे का सरकारने? गंम्मत म्हणजे येता जाता जागतीक स्तरावर उपदेश देणारे आमचे महान नेते या बाबतीक तोंडात बेदाने धरुन बसतात काय ? आता अभ्यास करणार आहेत म्हणे. जमत नसेल तर स्पष्ट बोलावे. मागच्या सरकार मधे शिवसेने चे रावते परिवहन मंत्री होते .. आता परब शिवसेनेचेच आहेत. ६ वर्षे काय करत होते हे लोक .. महामंडळाची दैना काय २/३ महिण्यात झाली आहे काय ??

In reply to by सुक्या

आता परब शिवसेनेचेच आहेत... असं कसं .... तेंव्हा मुख्यमंत्री भाजपचे फडणवीस होते आणि आता केंद्रात भाजप सरकार आहे ... आता अभ्यासातून असाही निष्कर्ष निघू शकतो की, हे सगळे भाजपचेच कारस्थान आहे... बाय द वे, हर्बल तंबाखू खाल्ली की, अभ्यास करण्याची क्षमता वाढते का? आणि बुद्धीला चालना मिळते का? ह्याचा पण अभ्यास व्हायला पाहिजे...कारण, चार आण्याची अफू खाल्ली की वाट्टेल त्या कल्पना सुचू शकतात, असा कुणीतरी अभ्यास केलेले वाचनांत आले होते...

In reply to by मुक्त विहारि

चार आण्याची अफू खाल्ली की वाट्टेल त्या कल्पना सुचू शकतात, असा कुणीतरी अभ्यास केलेले वाचनांत आले होते... अहो अख्खाच्या अख्खा अग्रलेख लिहीला जाऊ शकतो....कल्पनांचे काय घेऊन बसलात..

In reply to by सॅगी

आणि असे अग्रलेख डोक्यावर घेणारी मंडळी पण मिळू शकतात दुनिया रंगरंगिली

In reply to by सुक्या

तो कमी होण्याची शक्यता धूसरच आहे .... आमदारकीच्या निवडणूका जवळ आल्या की कर कमी करण्याची शक्यता आहे... आता अशा गोष्टींनी, आमच्या सारखी अशिक्षित मंडळी भुलत नाहीत...

पेट्रोल डिझेलचे भाव वाढले तर केंद्र सरकार जबाबदार. गरिबांच्या तोंडचा घास काढून घेणारे सरकार इ इ आता केंद्र सरकारने आपला कर घसघशीत कमी केला तर राज्य सरकारचा हक्कच आहे कर गोळा करण्याचा बुद्धिवादी वाममार्गी लोकांचा दुटप्पीपणा उघडा पडला आहे जाता जाता -- बाकी सार्वजनिक जालावरचे पेट्रोल बद्दलचे विनोद आणि व्यंगचित्रे सध्या गायब झाली आहेत

In reply to by सुबोध खरे

पेट्रोल येथे १,९३ पर्यन्त गेले ,, वर्शपुर्वि १,१८ होते.. देश्भरत ३७- ४६% वाढ झलि... मोदिनिच केलि असवि मोरिसन बाबा ल सन्गुन ,, बहुतेक अदानिन्च्या मार्गे! कारन अदनि येथे कोळ्शच्या खनि चे मालक आहेत ( हा बादरयाण सम्बन्ध जोडत आहे मि जसे कि " मि भाजि खते मह्नुन मि शेतकरि अन्दोलनाला सम्र्थन देते " असा बादरयाण सम्बन्ध मिय खलिफ यन्नि जोडला होता तसा .....

In reply to by चौकस२१२

मोदीच जबाबदार आहेत. महागाई जगात कुठेही वाढली तरी आताचे सुट बुट वाले मोदी(च) जबाबदार आहेत. तुमच्या मोरीसन बाबा ने ऑस्ट्रेलिया विकायला काढला आहे. आडाणी मोदी चे मित्र आहेत म्हणुन सारे त्यांना मिळते आहे. त्यामुळे मोदीच जबाब्दार आहेत.

In reply to by सुक्या

सुक्याशेठ तुम्ही उपहासाने बोलताय कि खरच हे तुमचे मत आहे हे कळत नाहीये .. असे गृहीत धरतो कि तुम्ही जे लिहिले आहे ते तुमचे मत आहे तर मला वाटते बरेच वर्षे येथे राहून अभ्यास केल्यावर मला जरा तरी यावर बोलायचं अधिकार आहे ( कदाचित आपण पण या देशात असाल ) असो - मॉरिसन बाबाने देश विकायला काढलाय: असे काही प्रचंड खाजगीकरण येथे झाले नाहीये,,,अर्ध खाजगीकरण बरेच वर्षांपासून चालू आहे आणि ते लेबर ( दावे मजूर पक्ष ) आणि उजवे लिबरल नॅशनल युती दोन्हीच्या काळात - अडाणी जो ग्यालली बेसिन मध्ये खाण विकसित करतोय त्या राज्यात अनेक वर्षे लव्हबर चे सरकार आहे आणि त्यांचा याला पूर्ण विरोध नाहीये - मला हे समजत नाही कि भारतात राहोणाऱ्यांना अडानि किंवा टाटा सारख्याने आज भारताबाहेरील देशातील उद्योग विकसित केलं तर अभिमान वाटलं पाहिजे ( टाटा ने "टेटली" नामक चहा उद्योग घेतलं आहे ).. त्याला भारतातून विरोध कास काय? येथील स्तहनिक शेतकरी विरोध करतील तर ते समजु शकतो हे मान्य कि भारतीय खाजगी उद्योगपती येथे कसा कारभार करतात त्यावर शंका उपस्थायीत करायला कधी कधी वाव असतो - ऑस्ट्रेलाय पण भारतासारखे पेट्रोल साठी आयटी वॉर अवलंबून आहे त्यामुळे येथे हि प्रचंड प्रमाणात दार वाढले आहेत ..पण भारतातील आंधळ्या मोदी विरोधकांना वाटतं कि एकट्या भारतातच हि समस्या आहे !

In reply to by चौकस२१२

चौकस२१२, मी ते उपहासानेच बोललो होतो. काय आहे आज काल मोदी नाव आले की शिव्या देणे हे एकच काम काही लोक करतात. म्हणुन ते उपहासाने लिहिले होते. शिव्या द्यायला अगोदर टाटा बिर्ला होते .. आता अडानी अंबानी आलेत. बादरायण संबंध एकच "गुजराथी फॅक्टर". पेट्रोल च्या दर वाढीसाठी , पर्यायाने महागाई वाढण्यात जे अंध लोक फक्त मोदींना जाबाब्दार धरतात त्यांना एकतर खरी परीस्थीती काय आहे याचे काहीही ज्ञान नसते त्याउपर जागात काय चालले आहे याचेही काही ज्ञान नसते. फक्त आपला अजेण्डा रेटने एवढेच या लोकांना माहीत असते. मी जिथे राहतो तिथेही पेट्रोल ४०-४५ % महाग झाले आहे पण त्याला इथे कुणी राज्यकरते जबाब्दार आहेत असे म्हणत नाही. एनी वे. तुमच्या प्रतीसादाने २ गोष्टी (टेटली चहा उद्योग टाटा चा आहे व ग्यालली बेसिन साठी अडानी ला पुर्ण विरोध नाही) समजल्या .. धन्यवाद.

In reply to by सुक्या

सुक्या... चला म्हणजे तुम्हालाहि आता भाजपच्या आई टी सेल कडून पगार मिळणार तर .. तशी शिफारस करतो ...... हा हा हा अडाणी बद्दल ऑस्ट्रेल्यात ज्या राज्यात लेबर आहेत आणि ज्यानं भरपूर पैसे मिळणार आहेत ते ओरडत नाहीत ओरडतात ते उजवे ! असे चित्र होते .. पण दिवाळी कार्यक्रमात लेबर चे दावे च जास्त विरोधी दिसले... + त्यात भर म्हणजे सगळे निषेध फलक घेऊन पगडी धारी... जणू अडाणी पंजाब वर फक्त नांगर फिरवायला बसलाय सगळंच हास्यस्पद पण एकीकडे चीड आडनारे ,,, जमलेले भारतीय काही अगदी धार्मिक सण या भावनेने नव्हते जमलेले पण ञा खलिस्तान्यांनी मध्ये गालबोट लावले . हे सगळं फक्त कानडा आणि इंग्लड मध्ये होतो असे ऐकून होतो पण इकडे हि आले

18 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्यानंतर निर्ल्लज्ज मौलवी तिला म्हणतो,''तू...'' https://zeenews.india.com/marathi/india/18-year-old-girl-was-abuse-by-m… तरुणीच्या म्हणण्यानुसार, मदरशाचे प्रमुख असलेल्या एका मुस्लिम धर्मगुरूने एका दिवशी 18-19 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. यानंतर मुलींना दिशाभूल करत सांगण्यात आले की, अंघोळ केल्यावर तिचे सर्व पाप माफ होतील.

In reply to by मदनबाण

काही लोकांच्या मते मात्र, भूखंड तिथे श्रीखंड आणि श्रीखंड तिथे आम्ही...

https://www.loksatta.com/desh-videsh/rahul-gandhi-writes-open-letter-fa… आदरणीय माजी पंतप्रधान, कैलासवासी जवाहरलाल नेहरू यांच्या ह्याच गोष्टी मुळे, काश्मीरचा प्रश्र्न तयार झाला, चीनच्या ताब्यात तिबेट गेले...परमपूज्य राहुल गांधी, कधीकधी योग्य बोलतात....

https://www.loksatta.com/maharashtra/ravikant-tupkar-protest-turned-vio… आता हे कृषीप्रेमी राज्य सरकार काय भुमिका घेते, हे बघणे रोचक ठरेल... ST कामगारांचा प्रश्र्न अजून सुटलेला नाही (कोणे एके काळी, महाराष्ट्र राज्यात, शेतकरी कामगार पक्ष, ह्या नावाचा एक पक्ष देखील होता... पुलोदच्या स्थापनेत, शेकापचा सहभाग होता.. आता, त्या काळांत शेकापने केलेल्या मदतीचा, एखाद्याला विसर पडला असेल... शेतकरी आणि कामगार, यांच्या आत्महत्यांना कोण जबाबदार?)

महाराष्ट्र टाईम्समध्ये बातमी आली आहे- राजस्थानात राजकीय भूकंप. गेहलोत यांचे मंत्रीमंडळ सामूहिक राजीनामा देणार? https://maharashtratimes.com/india-news/rajasthan-cabinet-reshuffle-all… बातमी वाचली तर कुठचे काय. मंत्रीमंडळाची फेररचना करताना आधी सगळ्या मंत्र्यांचे राजीनामे घ्यायचे आणि ज्या मंत्र्यांना मंत्रीमंडळातून डच्चू द्यायचा आहे त्याच मंत्र्यांचे राजीनामे 'हे राजीनामे मान्य करा' अशा शिफारशीसह राज्यपाल/राष्ट्रपतींकडे पाठवायचे असे मंत्रीमंडळाची पुनर्रचना करताना मुख्यमंत्री/पंतप्रधान नेहमीच करतात. तेच राजस्थानात होत आहे असे दिसते. मग त्यात राजकीय भूकंप वगैरे म्हणून सनसनाटी निर्माण करायची काय गरज आहे?

महाराष्ट्र सरकारकडून स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्कात ५० टक्क्यांची कपात https://www.loksatta.com/maharashtra/government-of-maharashtra-reduces-… अधिकाऱ्याने सांगितले की, “आयात केलेल्या स्कॉचच्या विक्रीतून महाराष्ट्र सरकारला वर्षाला १०० कोटी रुपयांचा महसूल मिळतो. या कपातीमुळे सरकारचा महसूल २५० कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे कारण यामुळे एक लाख बाटल्यांवरून २.५ लाख बाटल्यांची विक्री वाढेल...... ------- माझ्या मते हे एका अर्थाने, व्यसनाला प्रोत्साहन आहे...

"आर्यन आणि अरबाज मर्चंट क्रूझवर स्वतंत्रपणे प्रवास करत होते, त्यांनी ड्रग्ज घेण्याची कोणतीही योजना आखल्याचा कोणताही पुरावा नाही. तसेच आर्यन खानच्या व्हाट्सअ‍ॅप चॅटमध्ये आक्षेप घेण्यासारखे काहीही नाही" मुंबई हायकोर्टाच्या जामीन आदेशात म्हंटले आहे. आता तरी पत्रकार 'भाऊ'/आबांनी वानखेडेचे गोडवे गाणे बंद करावे. केवळ नवाब मलिक आरोप करीत आहेत म्हणून भाजपा समर्थक अजूनही वानखेडे कसा निर्दोष आहे हे सांगण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. वास्तविक केंद्र सरकारने अंतर्गत माहिती काढुन त्याला तात्काळ निलंबित करायला हवे होते व चौकशी करून निर्णय घ्यायला हवा होता. वानखेडे खंडणी रॅकेट चालवतो हे आता उघड झाले आहे. https://www.loksatta.com/maharashtra/nawab-malik-serious-allegation-tha…

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

हायकोटाच हे मत असेल तर मग वानखेडेची चैकाशी होयलाच पाहिजे. एखादा अधिकारी आपल्या अधिकाराचा दुरूपयोग करत असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

असं असेल तर उच्च न्यायालयाने अनेक अटी लादून (पारपत्र जप्त, दर शुक्रवारी हजेरी, माध्यमांशी बोलण्यास बंदी, मुंबईबाहेर जाण्यास बंदी इ.) त्याला जामिनावर का सोडले? तो निर्दोष आहे असा निकाल देऊन खटला निकालात का काढला नाही? जामिनावर सुटल्यानंतर एक आठवड्याने त्याला NCB ने नक्की कशाच्या चौकशीसाठी बोलाविले होते? त्यांनी जामिनपत्र वाचले नव्हते का?

https://marathi.abplive.com/news/mumbai/mumbai-crime-nine-bangladeshis-… आता राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना काय कारवाई करणार? 1950च्या सुमारास, चीनला मदत करणार्या, कॉंग्रेस कडून, माझी तरी काही अपेक्षा नाही...

In reply to by मुक्त विहारि

१९५०? हे असे किती मागे जाणार्?'स्वातंत्र्यलढ्यात सामील होउ नका' म्हणून सांगणार्या लोकांना गुरू मानणारे दिल्लीत सत्तेवर आहेत.दिल्ली-लाहोर बससेवा करून नंतर हात पोळून घेणारे, पाकिस्तानी पंतप्रधानाच्या वाढदिवशी अचानक जाणारे ..ह्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवायची? पण लोकशाही आहे.. लोकांनी निवडून दिले आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

स्वातंत्र्यलढ्यात सामील होउ नका
याचा रेफरन्स पाठवाल का?
स्वातंत्र्यलढ्यात सामील व्हा
म्हणून सांगणाऱ्यांचे शिष्य विरोधी पक्षात आहेत याचा ही रेफरन्स पाठवा. धन्यवाद.

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

"Hindu nationalist parties like the Hindu Mahasabha openly opposed the call for the Quit India Movement and boycotted it officially" https://en.wikipedia.org/wiki/Quit_India_Movement RSS leaders met the secretary of the home department and “promised the secretary to encourage members of the Sangh to join the civic guards in greater numbers,”. The civic guards was set up by the imperial government as one of the “special measures for internal security.” https://thewire.in/history/rss-hindutva-nationalism

पीएम केअर फंडात बेहिशोबी पैसे पडून; मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत देण्याची संजय राऊतांची मागणी https://www.loksatta.com/desh-videsh/sanjay-raut-request-to-pm-narendra… महाराष्ट्र राज्यातील, CM Care फंडातले पैसे संपले का? बहुतेक राज्य सरकारने ते सगळे पैसे, शेतकरी वर्गाला दिले असावेत...

In reply to by मुक्त विहारि

Amravati Voilance : हिंसाचार... निर्बंध... अन् शिथीलता; अमरावतीत संचारबंदीमुळे व्यापाऱ्यांना 800 कोटींचा फटका? https://marathi.abplive.com/news/maharashtra/amravati-voilance-curfew-r… आता CM Care फंडातून व्यापारांना भरपाई, हे राज्य सरकार देणार का? अशी भरपाई दिली तर, महाराष्ट्र सरकारचा आदर्श केंद्र सरकार पण ठेऊ शकते. ---------

शिवसेनेचा शहरप्रमुख बायोडिझेल तस्करीचा मास्टरमाइंड?; धक्कादायक माहिती उघड https://maharashtratimes.com/maharashtra/ahmednagar-news/shiv-sena-ahme… काय बोलावं ते सुचेना....

आम्ही करेक्ट कार्यक्रम केला, दोन वर्षांपूर्वीच महाराष्ट्र स्वातंत्र्य झाला https://www.esakal.com/maharashtra/shivsena-leader-sanjay-raut-taunts-k… ह्याची फळे महाराष्ट्रातील जनता अजून उपभोगते आहे 1. निवृत्त नौसैनिकाला मारहाण झाली 2. एका बाईला हरामखोर म्हटल्या गेले 3. शेतकरी वर्गाला पुरेशी भरपाई मिळाली नाही 4. ST कामगार संप सुरू आहे ... तात्पुरत्या कर्मचारी वर्गाला निलंबित केले ह्यालाच स्वातंत्र्य म्हणायचे असेल तर, आमची ना नाही ...

समीर वानखेडे ह्याची लग्नपत्रिकाच आता बाहेर प्रसिद्ध झाली आहे. वडिलांचे नाव "दाउद्" असे स्पष्ट आहे. marriage वानखेडे कुटुंबियांचा भ्रष्टाचार व खोटेपणा चव्हाट्यावर येऊनही केंद्रातील सत्ताधारी समर्थक अजूनही वानखेडेचे समर्थन करताना दिसतात तेव्हा आश्चर्य वाटते.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

आता समीर वानखेडेंचा जन्म कोणत्या दवाखान्यात झाला, त्यावेळी सुईण कोण होती, नवजात बालकाचे वजन किती होते ही माहिती पण येऊ दे. मलिकांच्या कुटुंबात सर्वांनाच हर्बल तंबाखूचं व्यसन दिसतंय.

In reply to by श्रीगुरुजी

त्यामुळे, जास्त मनांवर घ्यायचे नाही... मूळ प्रश्र्न बाजूलाच राहिला की, कुणाकडे किती अंमली पदार्थ मिळाले?

In reply to by श्रीगुरुजी

खंडणी रॅकेट चालवणे,कस्टडी वाढवायची धमकी देऊन पैसे उकळणे, मिळालेला पैसा दिल्लीत ज्येष्ठांना पाठ्वणे हे हर्बल तंबाखूपेक्षा घातक आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

खुद्द मुखमंत्र्यानी वाझे ची पाठराखण केली होती. वाझेला अतिशय घाई करून परत नौकरीवर घेण्यात आलंय. हाच वाझे पोलीस दलातून काढल्यानंतर सेनेचा कार्यकर्ता म्हणून काम करत होता. वाझे ला फक्त पोलीस दलात घेतलाच नाही तर महत्वच्या केसेस पण दिल्या होत्या. वाझे प्रकरण हर्बल तंबाखूपेक्षाही भयंकर आहे.

In reply to by रात्रीचे चांदणे

तपास ई.डी/सी बी आय करत आहेच ना ? ज्याला केंद्राने बेल्जियमला पळून जाण्यास मदत केली तो परमबीर भारतात आला का ? कारण खंडणीचे आरोप त्यानेच केले आहेत.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

अजून एक फेक आरोप? परमबीर बेल्जियमला पळून गेलेत याचा काही पुरावा आहे का? आधीच्या ३ आरोपांचाही काही पुरावे आहेत का? तुमचे हे आरामखुर्चीत झुलत "सामना"ची रोज अगणित पारायणे करतात असं दिसतंय. त्याशिवाय असा हवेत गोळीबार होणार नाही.

In reply to by श्रीगुरुजी

द्राणाचार्यांनी संजीवनी विद्या, लक्ष्मणाला बरे करण्यासाठी आणली, हे देखील पटते .... बाबा वाक्यं प्रमाणं.... अशी मनोवृत्ती असलेली माणसे कमी नाहीत ...

In reply to by श्रीगुरुजी

परमबीर सिंह भारतातच; 48 तासांत हजर होतील; वकिलाचा दावा, ------- https://marathi.abplive.com/news/india/supreme-court-grants-interim-pro… ------ आज की ताज़ा ख़बर .....

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

तपास ई.डी/सी बी आय करत आहेच ना ? ई. डी./ सी बी आय तपास करेलच पण तो खुनाचा आणि खंडणीचा करेल. पण त्याला इतक्या घाईने पोलीस दलात नक्की कोणाच्या सांगण्यावरून घेतले आणि लगेच महत्वाच्या केसेस कश्या मिळाल्या ह्याचा तपास होणार नाही. वझेला पोलीस दलात परत घेण्याचा कार्यक्रम एका रात्रीत पार पडला होता.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

वाझे चा तपास ईडी / सिबीआइ करत आहे आणि ते जर बरोबर आहे; तर ईडी / सिबीआइ बाकी ठिकाणी तपास करते ते कसे काय चुकीचे? उगाच एक म्हण आठवली "राधासुता, तेव्हा कुठे होता तुझा धर्म?" अजुन एक वचन आठवले "वाझे काय लादेन आहे काय?" बाकी चालु द्या ... "गिरे भी तो टांग उपर" असाही एक वाक्प्रचार आठवला ....