✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

हिरोशिमाचा स्मृतिदिवस

प
पराग१२२६३ यांनी
Fri, 08/06/2021 - 13:11  ·  लेख
लेख
जपानला शरणागती स्वीकारण्यासाठी भाग पाडण्याच्या दृष्टीने अमेरिकेने गुप्त ‘मॅनहॅटन प्रकल्प’ हाती घेतला होता. त्याच्या पहिल्या टप्प्यात 16 जुलै 1945 रोजी अमेरिकेने न्यू मेक्सिकोच्या वाळवंटात ‘त्रिनिटी’ या जगातील पहिल्या अण्वस्त्राची चाचणी घेतली. ती चाचणी यशस्वी झाल्यावर या नव्या अस्त्राच्या मदतीने जपानला आपल्या अटींवर शरणागती पत्करायला लावण्यासाठी मित्र देशांच्या हालचाली सुरू झाल्या. त्यानंतर अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर ‘मॅनहॅटन प्रकल्पा’त तयार करण्यात आलेली ‘Little Boy’ आणि ‘Fat Man’ ही अण्वस्त्रे अनुक्रमे 6 आणि 9 ऑगस्ट 1945 रोजी डागली. त्यानंतर 15 ऑगस्ट 1945 रोजी जपानने विनाअट शरणागती पत्करली. हिरोशिमावरील अण्वस्त्र हल्ल्यात सुमारे 1,40,000 हजार आणि नागासाकीवरच्या हल्ल्यात सुमारे 70,000 लोकांचा बळी गेला होता. दोन्ही शहरे तर बेचिराख झाली होती. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 6 ऑगस्टला ‘हिरोशिमा दिन’ पाळला जातो. राखेतून उभा राहिलेला जपान आज जगातील प्रमुख 7 विकसित देशांपैकी एक बनला आहे. पण अण्वस्त्रांच्या बाबतीत तो अतिशय संवेदनशील आहे. भारताचा आजवरचा अणुइतिहास, अण्वस्त्रप्रसारबंदी, अण्वस्त्रांचे संपूर्ण नि:शस्त्रीकरण याबाबतची भूमिका व जबाबदार आण्विकशक्ती या बाबी टोकियोने विचारात घ्याव्यात आणि अणुऊर्जा क्षेत्रात सहकार्य करावे असे भारताला वाटते. कारण भारत ‘अण्वस्त्रमुक्त जग’ या तत्वाशी कायम बांधिलकी व्यक्त करत आला आहे. जपानवरील अमेरिकेच्या अणुहल्ल्याला 75 वर्षे पूर्ण होऊन गेली आहेत. त्या पार्श्वभूमीवर टोकियोतील ऑलिंपिक स्पर्धांच्या समारोप समारंभात अणुहल्ल्याच्या स्मृतींवर आधारित कार्यक्रम सादर केला जाणार आहे. हा विषय सविस्तर खालील लिंकवरही आहे. https://avateebhavatee.blogspot.com/2021/08/blog-post_6.html?m=1
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
इतिहास
राजकारण
लेखनप्रकार (Writing Type)
समीक्षा
लेख
बातमी
माहिती

प्रतिक्रिया द्या
29867 वाचन

💬 प्रतिसाद (58)

प्रतिक्रिया

+१

अनन्त अवधुत
Fri, 08/13/2021 - 06:19 नवीन
जपान्यांनी दक्षिण पूर्व आशियात केलेल्या कत्तली पाहता तेच म्हणावेसे वाटते.
जपान्यांना तर सत्याग्रह, मोर्चा वगैरे आवडला असता, इतके सगळे गिनीपिग त्यांच्या जैविक शस्त्रांच्या चाचणीसाठी एका जागी सहज कुठे मिळायला. आपल्याला फक्त जर्मनीचा डॉ. मेंगेल माहिती आहे, पण ह्यांचे कारनामे फारसे कधी बाहेर आले नाहीत. हा एक दुवा इथे थोडी माहिती एकत्र केली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

आज डब्यात काय होतं ?

गॉडजिला
गुरुवार, 08/12/2021 - 03:29 नवीन
१५ ऑगस्ट ला येणार की दांडी मारणार ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

सहमत

पराग१२२६३
Wed, 08/11/2021 - 23:34 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

वर कुणीतरी लिहीलंय भारताने

अमरेंद्र बाहुबली
Sun, 08/08/2021 - 18:06 नवीन
वर कुणीतरी लिहीलंय भारताने ईंग्रजांच्या बाजुने युध्दात ऊतरायला नक होते. >>>> मुळात तेव्हा भारत अस्तित्वात होता का?? सैन्य ईंग्रजांच्या ताब्यात होते म्हणजे भारतीय सेना ब्रिटीश सेना होती??
  • Log in or register to post comments

या चर्चेमुळे वॉचमेन या

कॉमी
Tue, 08/10/2021 - 19:56 नवीन
या चर्चेमुळे वॉचमेन या सिनेमाची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

:)

गॉडजिला
Tue, 08/10/2021 - 22:20 नवीन
...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

जर्मनांच्य छळछवण्या, गोर्

मराठी_माणूस
Fri, 08/13/2021 - 11:49 नवीन
जर्मनांच्य छळछवण्या, गोर्‍यांचे वर्णाभेदामुळे माणसांना जनावरा सारखे वागवण्यांच्या गुलामी प्रथा, पोर्तुगीजांचे गोव्यातले Inquisition, ह्याचे ही उल्लेख ह्या निमित्ताने आवश्यक.
  • Log in or register to post comments

मी खुप रस घेउन बारकाईने सर्व

शानबा५१२
Sat, 08/14/2021 - 15:12 नवीन
मी खुप रस घेउन बारकाईने सर्व वाचत होतो तेव्हा विकीपीडीयाचे भराभर दाखले, दुवे दीले गेले, आणि खरच पुर्ण मुड गेला. वरती पण एका प्रतिसादात ही लिंक दीली आहे. https://en.wikipedia.org/wiki/Homeopathy होमिओपॅथी = Homeopathic remedies are biochemically inert, and have no effect on any known disease.[8][15][16] Hahnemann's theory of disease, centered around principles he termed miasms, is inconsistent with subsequent identification of viruses and bacteria as causes of disease. अरे आर्सेनिक अल्बम ३० पण होमिओपॅथीक आहे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा